झट्पट झन्झनित फिश करि...............

पियुशा's picture
पियुशा in पाककृती
15 Dec 2010 - 10:32 am

(बर्याच दिवसापासून विचार करत होते कोणती डिश देऊ ? आमच्या आजीला सर्दी झालिये, मग माशाचा रस्सा वरपायाचा गरम गरम म्हणून मासे बनविन्याचा योग आला आणि मला लिहिन्याचाही.......... )
झटपट तर्रिवाली फिश करी .......
मी चोपड़ा मासा वापरला आहे तुम्हाला जो आवडतो तो स्वच्छ धुवून काटे काढून त्याचे पिस करून घ्या.
साहित्य :- मासे पावून किलो , ९-१० लसून पाकळ्या, १/२ -१ इंच आल , कोथिम्बिर , खोबर किसलेल ३-४ मोठे चमचे , 2 मध्यम टमाटर , १ चमचा मीठ,
लाल तिखट (आवडीनुसार)तेल ,जीर हिंग ,कडीपत्ता, चुटकीभर हिंग आणि थोड़ी हळद...
मसाला :- खोबर ,लसून ,आल , कोथिम्बिर ,१ टमाटर , १ चमचा मीठ, सर्वे साहित्य (न भाजता ) मिक्सी मधे थोड पानी घालून बारीक़ वाटुन घ्या .
फोडनी : तेल आवडीनुसार घाला मी ३ मोठे चमचे घातले , त्यात जीर , कडीपत्ता , हिंग घालून तडतडवा , नंतर वाटलेला हिरवा मसाला घाला , १ चिरलेला टोमाटो घालून तेल सुटेपर्यंत खमंग परतून घ्या, झनझनित हव असेल तर थोड जास्ती लाल तिखट घाला ,थोड मीठ घालून पानी घाला
ग्रेवी जाशी हावी तेवढी घट्ट / पातळ करून घ्या ,थोडीशी हळद घाला ,आता फिश चे तुकडे ग्रेवित सोडा ,८-१० मिनिट झाकण ठेवा ,
गरमागरम झनझनित तर्रिवाली फिश करी तैयार आहे ,भात , भाकरी वा चपाती कशाबरोबर ही वरपा..........
(आईची मोलाची मदत )
fish
fish
fishfish

प्रतिक्रिया

पियुशा's picture

15 Dec 2010 - 11:00 am | पियुशा

फोटो मोबाइल वर काढले आहेत क्लिअरिटी बद्दल आधीच क्षमस्व !

फोटो मोबाइल वर काढले आहेत क्लिअरिटी बद्दल आधीच क्षमस्व !

खुलाश्याबद्दल धन्यवाद. तोंड लाळावले.

जेवायला कधी बोलावताय ?

- षार्कमासा
चिंगळ्या पिंगळ्या माश्यांनी नाद करायचा नाय :)

पियुशा's picture

15 Dec 2010 - 11:57 am | पियुशा

कधिहि ये बिन्धास्त जेवयला

आता बोलवुन काय फायदा ? आता ते मासे कोणत्या तलावात पोहत असतील कोणास ठाऊक ...
पुण्हा कराल तेंव्हा माश्यांऐवजी कोंबडीचा बेत करा आणी पत्ता देऊन बोलवा :) (तोंडदेखले आमंत्रण नको )

- (खादाड) टारु
लाजला तो संपला

निवेदिता-ताई's picture

15 Dec 2010 - 1:34 pm | निवेदिता-ताई

जमलय की तुला...........मस्त मस्त

स्पा's picture

15 Dec 2010 - 11:02 am | स्पा

वॉव.............

तोंडाला जाम पाणी सुटलंय..............
मस्त यार...............

sneharani's picture

15 Dec 2010 - 11:33 am | sneharani

मस्त ग!

टारझनशी सहमत. तोंडात पाणी आले. वाहिले अगदी.

तर्रीदार दिसतेय करी.
रंग खतर्नाक आहे.

अहा..

श्रीराम गावडे's picture

15 Dec 2010 - 12:25 pm | श्रीराम गावडे

बोचर्‍या थंडित अस कहितरि हवच होत. गरमागरम.

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे |
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ||
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म |
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म || ...

चला आणा पाहु ताट पुढ्यात आता.

चिंतामणी's picture

15 Dec 2010 - 1:20 pm | चिंतामणी

फारच भन्नाट. खायची तिव्र इच्छा बळावली आहे.

प्रकाश१११'s picture

15 Dec 2010 - 2:01 pm | प्रकाश१११

मस्त लाल रंग . त्यावर तरंगणारी तर्री .
पेरलेली कोथिंबीर . कांद्याची पात
नि सोबत चपाती की [!!] ??
खूप छान नि ग्रेट.!!

आशिष सुर्वे's picture

15 Dec 2010 - 2:35 pm | आशिष सुर्वे

कालवणातला मासा म्हन्जे आम्चा 'कच्चा बिंदू' (इक प्वाईंट) बर्र का..
जल्ला तोंडात पानी तरारलं ओ..

कौशी's picture

15 Dec 2010 - 8:51 pm | कौशी

पाकक्रुती बघुन जाम भुक लागली.

युनिव्हर्सल निषेध... आम्ही पट्टीचे शाकाहारी असल्याने तर्रीचा जोरदार निषेध करत आहोत..

- शाकाहारी पिंगू

चिंतामणी's picture

15 Dec 2010 - 11:57 pm | चिंतामणी

बोंगाली बाबुला विचारा अथव युरोपात विचारा, ते सांगतील मासा शाकाहारी प्रकारातच आहे.

(कोणिही XXXXXXXXXXचा क्षीण प्रयत्न वगैरे कॉमेंट्स करू नयेत. मिपाचा भाषेत "फाट्यावर मारण्यात येतील". )

निवासी भारतीय (आणि मत्स्यप्रेमी) .- चिंतामणी

हे वाचले आहेत का? ह्या आणि अश्या अनेक पाकृ मिळतील "पाककृती"वर क्लिक केल्यावर.

पिवळा डांबिस's picture

16 Dec 2010 - 12:24 am | पिवळा डांबिस

पाककृती मस्त झणझणीत दिसते आहे!
पण "चोपडा" मासा म्हणजे कोणता मासा ते कळलं नाही!!!
मला फक्त प्रियांका चोपडा माहिती आहे!!!
(ती ही रुचकर असावी!!;))
पण चोपडा मासा?
कॉलिंग जागु! कॉलिंग जागु!! कॉलिंग जागु!!!
:)

मला फक्त प्रियांका चोपडा माहिती आहे!!!
(ती ही रुचकर असावी!)

हाहाहा.... ही पिडांकाकांची आवड आहे...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Dec 2010 - 6:48 am | निनाद मुक्काम प...

अश्या कालवणाची उणे ५ ते १० तापमानात राहणार्या मला नितांत गरज आहे ती चक्षु मोदन करून भागवावी लागणार तर.

मस्त दिसतेय चित्रात

इंटरनेटस्नेही's picture

16 Dec 2010 - 8:05 am | इंटरनेटस्नेही

मस्त! टोन्डाला पाणी सुटले!

पियुशा's picture

23 Dec 2010 - 4:24 pm | पियुशा

तुम्हा सर्वाना धन्यु