साहित्य :
दोन वाटी तांदूळ, ४ वाट्या बारीक चिरलेला पालक, थोडेसे मसाला व कच्चे शेंगदाणे, ३-४ लाल मिरच्या, पाणी, १ चमचा धने-जिरेपूड, ४ चमचे तेल, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, पाव चमचा हिंग, ३-४ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी ओले खोबरे, २ चमचे टोमॅटो सॉस , मीठ चवीपुरते.
कृती :
हिरव्या मिरच्या उभ्या चिराव्या . तांदूळ धुवून ठेवावे. पालक पाण्यात ठेवावा , त्यात अर्धा चमचा हळद घालावी. १५- ते २० मिनिटांनी पालक चाळणीवर हाताने काढून ठेवावा. म्हणजे माती पाण्यात खाली बसेल . नंतर चाळणीतला पालक धुवावा. अलगद पाणी पिळून काढावे. पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी, जिरे, हिंग व लाल मिरच्या फोडणीस टाकून त्यावर थोडेसे पाणी फोडणीस टाकावे. त्यात मीठ, धनेजिरेपूड, उभ्या चिरलेल्या मिरच्या,कच्चे शेंगदाणे घालावे. उकळी आली म्हणजे तांदूळ व पालक घालावे. उकळी फुटली की दोन मिनिटे ठेवून नंतर तेच पातेले कुकरमध्ये ठेवून भात शिजवावा. नंतर २-३ चमचे साजुक तूप कडेने सोडावे.
वाढताना ओले खोबरे ,थोडेसे मसाला शेंगदाणे व कोथींबिर वरून पेरावे व टोमॅटो सॉस बरोबर खायला द्यावा.
हा भात मसालेदार भाजी-आमटीबरोबर सुध्दा छान लागतो.
प्रतिक्रिया
13 Dec 2010 - 9:29 pm | स्वैर परी
एकदम चमचमीत! बाकि सॉस का बर? दह्याबरोबर/ रयत्याबरोबर देखील एकदम झक्कास लागेल कि!
उद्याच करुन बघते!
13 Dec 2010 - 10:17 pm | संजयशिवाजीरावगडगे
आवडीनुसार पालक भात दह्याबरोबर/ रयत्याबरोबर खा ! खाऊ घाला !
एकदम झक्कास !@! टेस्ट !!
14 Dec 2010 - 2:43 pm | परिकथेतील राजकुमार
अहो गडगे तुमची पाकृ त्या ग्लोबल मराठी वाल्यांनी १२ एप्रिलाच चोरली बघा.
साली हि जालीय चोरांची जात लैच माजलीये आजकाल. तुम्ही खंप्लेंट नोंदवा बघु ताबडतोब.
14 Dec 2010 - 9:51 am | आंसमा शख्स
चांगली कृती आहे. करून पाहू...
14 Dec 2010 - 2:36 pm | प्राजक्ता पवार
जरा वेगळी पाकृ. मी करते तेव्हा पालक , लसुण , मिरची , मसाला मिकरमध्ये वाटुन मग त्या वाटणात भात शिजवते. बाकी पुलावाच्या भाज्या देखील घातल्या तरी चविला छान लागतो.
फोटोदेखील टाका :)