एका रूक्ष माईंड मॅपमध्ये मला अमेरीका आतापर्यंत कशी वाटली ते आपल्यापुढे मांडते आहे. हे जितकं अमेरीकेचं प्रतिबिंब आहे अर्थात तितकच माझ्या स्वभावाचंदेखील प्रतिबिंब आहे. एखाद्या लेखकाला, वैज्ञानिकाला, अभियंत्याला, एखाद्या कवीला हीच अमेरीका खूप खूप वेगळी भासू शकेल, चांगल्या अथवा वाईट कोणत्याही रीतीने. आपण प्रयत्न करू यात का हे या धाग्यात सांगण्याचा की अमेरीका व्यक्तीशःआपल्याला कशी वाटली ते?
हा माईंड मॅप -
प्रत्येक देशाचे कवी, गायक , अन्य कलाकार हे त्या त्या देशाचे अघोषित राजदूत असतात. आता माझ्या व्यवहारी, रूक्ष माईंड मॅप नंतर पुढील स्वर्गीय आवाजातील फ्रँक सिनात्रा चे गाणे ऐका. त्याला कशी वाटते अमेरीका? :) ...... केवळ स्वर्गीय आवाजातील हे गाणं ऐकून कोणालाही वाटेल अमेरीका म्हणजे स्वर्ग आहे. खूप ग्लॅमरस असं हे गाणं तितकच मंतरलेलं संगीत आणि आवाज लाभलेलं.
पण अमेरीका खरच अशी आहे का? चला तर चर्चा करू या. :)
प्रतिक्रिया
13 Dec 2010 - 6:32 am | गांधीवादी
>>आपण प्रयत्न करू यात का हे या धाग्यात सांगण्याचा की अमेरीका व्यक्तीशःआपल्याला कशी वाटली ते?
माफ करा, अमेरिकेत प्रत्यक्ष गेलेलो नाही, ऐकीव माहितीच्या आधारे मत देणे योग्य वाटत नाही.
भारतीयांना या मायानगरीचे सुप्त आकर्षण आहेच, त्यामुळे इतरांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील.
>>आता माझ्या व्यवहारी, रूक्ष माईंड मॅप नंतर..........
असो, पण हे मला 'माईंड मॅप कसे करावे' यासाठी एक उत्तम नमुना म्हणून आवडला.
अवांतर : कालच 'फंस गये ओबामा' हा हिंदी सिनेमा पहिले त्याची आठवण झाली.
13 Dec 2010 - 11:38 am | सूर्य
पण हे मला 'माईंड मॅप कसे करावे' यासाठी एक उत्तम नमुना म्हणून आवडला.
अगदी हेच म्हणतो. माईंड मॅप कसे करावे हे लक्षात येत आहे.
तसेच बहुतेक सर्व मतांशी सहमत आहे.
- सूर्य.
13 Dec 2010 - 6:36 am | स्पा
श्री. गांधीवादी यांच्या
प्रत्येक शब्दाशी सहमत
असाच नकाशा जर मुंबईच्या बाबतीत बनवला तर नक्की मत मांडेन
13 Dec 2010 - 7:03 am | मराठे
माईंडमॅप मस्त जमलाय.
अमेरिकेबद्धल आवडणारी गोष्टः
मी अमेरिकेत राहायला आल्यानंतर मला माझ्या कुटूंबासाठी जास्त वेळ देता येउ लागला. भारतात असताना दिवसांतले २-३ तास प्रवासात जात. त्यानंतर बायको-मुलाबरोबर फारसा वेळ मिळत नसे. त्याचप्रमाणे भारतात असताना सारखं वेगवेगळ्या प्रॉजेक्ट्स साठी फिरावं लागायचं. इथे आल्यानंतर सुदैवाने मी ५-५:३० पर्यंत घरी येउ शकतो. नंतरचा सगळा वेळ कुटूंबासाठी देता येतो.
अमेरिकेबद्धल न आवडणारी गोष्टः
जवळ पैसा / सुबत्ता आहे म्हणून जरूरीपेक्षा जास्त खरेदी करणे व त्यापायी निसर्गसंपत्तीचा , पैशाचा अपव्यय करणे. एक उदाहरण म्हणून सांगतो, इथल्या शाळेत मुलगा जायला लागला तेव्हा त्याला मधल्या सुट्टीसाठी दिलेला डबा जर संपला नाही तर उरलेलं सरळ कचर्याच्या डब्यात फेकायला सांगतात. हे आम्हाला जेव्हा समजलं तेव्हा मग आम्हीच त्याला उरलेलं न फेकता डब्यातंच ठेवायला सांगितलं. ही "फेकायची" वृत्ती मला अजिबात आवडत नाही. ("थोडा खाओ थोडा फेको"... जाने भी दो यारों)
13 Dec 2010 - 8:33 am | अवलिया
वर केलेला अमेरिकेच्या आकलनाचा विचार, त्यात फेड या संस्थेचा अंतर्भाव नसल्याने अर्धवट आहे.
सबब प्रतिसाद नाही.
मात्र इतरांचे प्रतिसाद वाचत आहे :)
13 Dec 2010 - 9:36 am | चांगभलं
+१
13 Dec 2010 - 10:16 am | चिंतामणी
पण चर्चेत भाग घेणे शक्य नाही.
सं.मं.ला विनंती. धागा "फक्त अनिवासी भारतियांच्या प्रतिक्रीयेसाठी" असा मार्क करावा.
(निवासी भारतीय) चिंतामणी
13 Dec 2010 - 1:25 pm | पर्नल नेने मराठे
विषय चांगला आहे. पण चर्चेत भाग घेणे शक्य नाही.
शुचीनी विसा दिला तर जाइन न मग काय ते सन्गेन.
(अनिवासी भारतीय)
13 Dec 2010 - 1:26 pm | शिल्पा ब
शुचि कधीपासुन विसा द्यायला लागली?
13 Dec 2010 - 1:28 pm | पर्नल नेने मराठे
आतातर तिला द्यावाच लागेल ;)
कय ते $ घे पण मला स्पॉन्सर करच ग =))
13 Dec 2010 - 1:30 pm | शिल्पा ब
LOL
13 Dec 2010 - 2:23 pm | नितिन थत्ते
पूर्वी म्हातारी मंडळी "एकदा मला काशीला नेऊन आण" असे म्हणायची त्याची आठवण झाली.
13 Dec 2010 - 2:24 pm | अवलिया
रोचक प्रतिसाद.
चुचुआज्जींची प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक
13 Dec 2010 - 2:25 pm | शिल्पा ब
आपण अजूनही तरुण आहात (असे आपल्याला वाटते ) याची दखल घेतली आहे...
13 Dec 2010 - 2:39 pm | पर्नल नेने मराठे
ह्यांना म्हातारी न काशी ह्या शिवाय दुसरे काही दिसतच नाही :(
ह्यानांच अमेरिकेला पाठवायची खरी गरज आहे.
शुचे , मला नको पण ह्या थत्तेंना विसा दे ग बै !!! ;)
आणी ह्यांना पब , कसिनो न काय ते तिकदे नेउन आण =))
13 Dec 2010 - 2:42 pm | शिल्पा ब
पब अन कासिनोत काय असतं? दारू अन जुगार...तिकडे गेल्याने काय फरक पडतो गं चुचु?
13 Dec 2010 - 2:49 pm | पर्नल नेने मराठे
ह्म्म्..........ह्याला उत्तर द्यायची जबाबदारी नानाने उचलली आहे हे ग्रुहित धरुयात ;)
13 Dec 2010 - 3:07 pm | टारझन
असं नाना ला गृहीत धरुन सिंगल आउट करणे मला जाम खटकलेले आहे. ... कृपया णाणातर्फे चुचुवर शिस्तभंगाची कार्यवाही व्हावी.
- चम्चु
13 Dec 2010 - 3:11 pm | पर्नल नेने मराठे
=))
13 Dec 2010 - 3:21 pm | नरेशकुमार
टार्या नको असे करुस, आपलिच मानसे आहेत. सोडुन दे.
अॅक्चुलि त्या बाया आहेत, पन त्या आपल्याच बाया आहेत असे लिहिने चान्ग्ले वाटत नाय.
13 Dec 2010 - 5:44 pm | बद्दु
हे हे हे हे हेहे हे हे हे हेहे हे हे हे हे
13 Dec 2010 - 3:13 pm | नितिन थत्ते
>>शुचे , मला नको पण ह्या थत्तेंना विसा दे ग बै !!! Wink
आणी ह्यांना पब , कसिनो न काय ते तिकदे नेउन आण
पण ते व्हिश्यासाठी $ तूच देणार ना?
ता. क. आणि पब + कॅसिनोचे $ वेगळे इकडे आधीच पाठवून द्या.
13 Dec 2010 - 2:36 pm | परिकथेतील राजकुमार
विशिष्ठ लोकांनी विशिष्ठ लोकांसाठी काढलेला अजुन एक धागा.
चालु द्या...
त्यानी अमेरीकेला किंवा अमेरीकस्नना काय शाट फरक पडतो ?
13 Dec 2010 - 5:10 pm | स्पा
त्यानी अमेरीकेला किंवा अमेरीकस्नना काय शाट फरक पडतो ?
13 Dec 2010 - 10:30 am | टारझन
सुंदर सुंदर साड्यां घेंण्या जांयचे कोठे ..... सांग णा सखये .. मज तु सांग णा सखये ...
-(१०१ मेगाहर्टझ्) आर्जे टारझन
अय्या टारझन तु बाळाराम मधे कसा ?
नाकापोका चिंगापो पिकाचुका नाकांगा
13 Dec 2010 - 10:44 am | वेताळ
रांगेतुन बाहेर नेवुन झडती घेतात.
13 Dec 2010 - 10:51 am | टारझन
हा प्रतिसाद कोणाला झेपेल की नाही ह्या बाबद साशंक होतो ... पण वेताळ ने बरोबर मुद्द्यावर बोट ठेऊन मला गहिवरुन आणलेले आहे. वा वेताळ .. .तुम्हीच देशहितार्थ प्रतिसाद देऊ शकतात .
- पेताड
13 Dec 2010 - 10:58 am | चिंतामणी
टारझनसुध्दा गहिवरतो हे वाचुन डोल्ल्यात पानी आले.
13 Dec 2010 - 10:34 am | युयुत्सु
विलासलालसा विलासीनां यद्देशे परिपूर्यते।
मनोरथानां सा भूमि: अमेरीका इति उच्यते॥
अर्थ- विलासी लोकांच्या विलासाच्या इच्छा ज्या देशात पूर्ण होतात त्या मनोरथांच्या भूमीला अमेरीका असे म्हणतात.
(या ऋचेचे कर्ते ऋषि आम्हीच! - युयुत्सु)
13 Dec 2010 - 10:54 am | गवि
13 Dec 2010 - 10:56 am | सुधीर काळे
वाsssssव! सुरेख!!
13 Dec 2010 - 10:59 am | सुधीर काळे
मी वयाच्या ३६व्या वर्षापासून आणि अनिवासी भारतीय नव्हतो तेंव्हांपासून अमेरिकेला कंपनीच्या कामांसाठी वारंवार जात आलेलो आहे आणि अलीकडे माझी दोन्ही मुले आणि दोन्ही नाती (granddaughters) तिथे असल्याने 'रतीबा'सारखा जातो!
माझ्या मते तारुण्यात प्रकृती ठणठणीत असताना अमेरिकेसारखा दुसरा देश नाही आणि वाढत्या वयाबरोबर प्रकृती उताराला लागली कीं भारतासारखा दुसरा देश नाहीं!
13 Dec 2010 - 10:58 am | वेताळ
अतिशय अभ्यासपुर्ण निष्कर्ष काढला आहे.
तरुण वयात जाण्यासाठी?????
ह्याबद्दल नीट माहिती द्याल का काका? आम्ही तर तरुणांसाठी पुर्वेतील एका देशाचे नाव एकुन होतो.
13 Dec 2010 - 11:04 am | सुधीर काळे
हाहाहा! मनातील शंकासुरासारखा दुसरा असुर नाहीं!
तरुणपणी औषधोपचार लागत नाहींत आणि म्हातारपणी अमेरिकेतील औषधोपचार परवडत नाहींत!
13 Dec 2010 - 11:09 am | गवि
तरुण वयात जाण्यासाठी?????
ह्याबद्दल नीट माहिती द्याल का काका? आम्ही तर तरुणांसाठी पुर्वेतील एका देशाचे नाव एकुन होतो.
तरुणांसाठी असलेल्या पूर्वेकडील उपरिनिर्दिष्ट देशात तरुणपणी गेल्यास तातडीने आणि दीर्घकालीन औषधोपचारांची गरज पडण्याची "रिस्क" असते..
असे ऐकतो.
13 Dec 2010 - 11:11 am | टारझन
अलिकडे जपाणी तेलाची जाहिरात जोरदार चालते टिव्ही वर @@
गेल्या आठवड्यात बाबांबरोबर टिव्ही पहात होतो ... ही जाहिरात कसली आहे माहितीच नव्हती.
एक गारुडी येतो .. पेटारा खोलतो .. आणि त्यातल्या णागा समोर पुंगी वाजवायला लागतो .. णाग जागचा ढिंम्म हालत नाही ... ते पाहून बाबा आणि मी लै मोठमोठ्याने खोखो-धोधो स्टाईल मधे हसलो .. .
तोच गारुडी खिशातुन एका तेलाची बाटली काढतो आणि त्या णागावर टाकतो ... तोच णाग एकदम फना काढुन २ फुट उभा रहातो . मग "जापानी तेल ... आपके सबसे *** पलो का साथी "
नंतर बाबा गॅलरीत निघुन जातात .. आणि मी ओशाळलेल्या तोंडाने पाणी प्यायला किचन मधे जातो .
असो . तात्पर्य ज्या म्हातार्यांना औषधोपचार परवडत नाही त्यांन्ना स्मृती समर्पित ;)
- टारुं चुं सुं
13 Dec 2010 - 11:52 am | नरेशकुमार
तोच णाग एकदम फना काढुन २ फुट उभा रहातो .
प्रसन्ग अगदि डोळ्यासमोर ताठ उभा केला आहेस.
13 Dec 2010 - 11:21 am | विजुभाऊ
शुची झकास माइन्ड मॅप
13 Dec 2010 - 11:26 am | शिल्पा ब
<<<तुम्हाला अमेरीका कशी वाटते?
इथे सासरचे नसल्याने मोकळं आणि रीलॅक्स वाटतंय ;)
13 Dec 2010 - 11:29 am | टारझन
इथे अमेरिकेविषयी तुमची मते काय आहेत असे अपेक्षित असावे. आपण दिलेले उत्तर तुम्ही सासरी सोडुन कुठेही असता तरी लागु पडते असे वाटते. चु.भु.द्या.घ्या.
- लादेण
13 Dec 2010 - 11:33 am | शिल्पा ब
हो, पण भारतात कुठेही असले तरी सासरचे टपकतातच....हे बरंच लांब आणि महाग (हेल्थ इन्शुरन्स वगैरे) पडते...त्यामुळे थोडे सुख...आणि हेच आमचे अमेरिकेबद्दलचे मत आहे...काय प्रॉब्लेम?
13 Dec 2010 - 11:42 am | Nile
तरीच तुम्ही संस्थळावर इतका उच्छाद मांडता वाटतं, काही बंधनंच नाहीत म्हणल्यावर काय! ;-)
13 Dec 2010 - 11:45 am | शिल्पा ब
मग तुम्हाला सासुरवास कोण करणार? ;)
13 Dec 2010 - 12:00 pm | नरेशकुमार
देवा मला अशी सुन देउ नकोस रे............................................................(डोळा मारन्याच चित्र )
(डोळा मारन्याच चित्र कसे लावतात ?)
13 Dec 2010 - 12:04 pm | शिल्पा ब
हो पण मुलगी मात्र लांबच रहावी असं मनातल्या मनात म्हणालात की नाही? ;)
13 Dec 2010 - 12:17 pm | विजुभाऊ
( डोळा मारन्याच चित्र कसे लावतात?)
हे असे
किंवा मग असे
का मग तुम्हाला हे असे म्हणायचे आहे
13 Dec 2010 - 6:08 pm | नरेशकुमार
इजुभौ, कन्च्या तोन्डनि सान्गु, कि कोनत डोला मारलेलं चित्र आवल्ल ते. मला लाज वाटु र्हायली.
13 Dec 2010 - 11:42 am | वेताळ
असा देश जिथे स्वःताची मुले शोधावी लागतात.
आता तरी पटला का तो तुला?
13 Dec 2010 - 11:57 am | नरेशकुमार
असा देश जिथे स्वःताची मुले DNA चाचन्या करुन शोधावी लागतात. अस पन आहे.
14 Dec 2010 - 1:07 am | चिंतामणी
ढकलपत्रातुन आलेला हा नमुना बघ.
सगळ्या अमेरिकन मुलांची नाव,
जॅकसन
विलसन
मार्कसन
रोबिनसन
केनसन
जॉनसन
डेविडसन
जेमसन
सॅमसन
अशी का असतात?
कारण त्यांच्या आयांना लक्षात ठेवायला बर पडत कि कोणाचा बाप कोण आहे ते.. ;)
13 Dec 2010 - 12:03 pm | वेताळ
नर्या हलकट आहेस लेकाच्या.
13 Dec 2010 - 12:37 pm | मराठी_माणूस
दुसर्याने कसे वागवे ते सांगुन स्वतः वाटेल तसे वागणारा दीड शहणा देश
13 Dec 2010 - 1:28 pm | शिल्पा ब
सगळीकडचे पैशेवाले असंच वागतात अस नाही का वाटंत तुम्हाला?
13 Dec 2010 - 2:38 pm | अविनाशकुलकर्णी
हॉलिवुड सिनेमातुन दिसली तिच अमेरीका आम्हास माहित आहे...मोठे रस्ते... वेगवान गाड्या..कसिनो.....मुक्त वातावरण..ऐश्वर्य..सुबत्ता...सुंदर व मन मोकळ्या मुली....बिकिनी....प्रशस्त घरे..
जर अशीच असेल तर कुणाला नाहि आवडणार अमेरिका???
13 Dec 2010 - 3:31 pm | टारझन
बराय तुम्ही हॉलिवुड डायरेक्टर नाहीत ... नाय तर एका डायलॉक मधे चित्रपट संपावला असता =))
13 Dec 2010 - 6:26 pm | नरेशकुमार
तुमिच हॉलिवुड डायरेक्टर झालात तर,
बाप्रे,
.
.
.
.
किबोर्डच फुटला.
13 Dec 2010 - 5:05 pm | छत्रपती
तिकदे गेल्याखिरी कसे सन्गनर बाइ तुल्.अमरेका कची वातले.
आमे रानत रअहतो बिदी पेतो. हुरदा खतो. लइ थन्दी पदली ह्य वर्सई.
आमल्ल बुन्ग पात्व म्न्ग आमे मिसलपाव भगुन्यात गालुन आनतो तिकदे तरी मारुन.
मग आमे दगा कादु 'तुमले मिस्ल्पाव कचा वत्ते'.
13 Dec 2010 - 5:24 pm | नरेशकुमार
कन्च्या गावातलि भाषा हाय व्ह्य रं हि, कायबी कल्ला नाय.
13 Dec 2010 - 5:32 pm | छत्रपती
अरेरेरे नर्या तुल मराथी कल्त नाय क्म?
येदच दिस्तय्....थोदा असुध हे ...सुदरुन गे.
13 Dec 2010 - 5:34 pm | पर्नल नेने मराठे
आचरटपणाचा कळस आहे.
13 Dec 2010 - 5:50 pm | छत्रपती
काकु कोन्ला अच्र्त मन्ल्या तुमे?????
13 Dec 2010 - 6:05 pm | नरेशकुमार
ओ मॅडम , म्या तक्रार करल काय तुमचि, अशि दादागिरी चाल्नार नाय, सान्गुन ठेवतो.
13 Dec 2010 - 6:04 pm | नरेशकुमार
बर बाबा सुधरुन घेतो
अरे पन हे हिन्दि आहे का मराथी ते तरि सान्ग.
13 Dec 2010 - 6:12 pm | छत्रपती
अरे दादा तुज खरद्व्ही पग कि.
आता येथ वद नकु. मनतरी रगावले आम्ला.
13 Dec 2010 - 6:21 pm | नरेशकुमार
आयला त्या मन्त्र्यान्च्या, घाबरु नगस, भादरुन टाकु एकेकाला.
.
.
.
बर आत तु बोल्तोस म्हनुन वद नग.
चुप चुप
13 Dec 2010 - 9:03 pm | सूर्यपुत्र
>>येदच दिस्तय्....थोदा असुध हे ...सुदरुन गे.
"गे"तलं... ;)
13 Dec 2010 - 5:44 pm | इंटरनेटस्नेही
मस्त धागा. =)) =))
कार्यबाहुल्यामुळे दीर्घ प्रतिसाद काही काळानंतर देईन!
परा, टारझन, स्पा यांच्याशी बाडीस.
-
ॠषिकेश इंटेश,
मिपा दुर्लक्षित पँथर.
13 Dec 2010 - 5:46 pm | विनायक प्रभू
अ कंट्री गॉन म्याड अशी वाटते.
13 Dec 2010 - 7:32 pm | पुष्करिणी
लेखिका आणि गवि दोघांचेही माइंड्मॅप्स मस्त... अमेरिका कधी बघीतली नसल्यानं उत्तर देउ शकत नाही.बाकी चुचुला व्हिसा पाठवणार असलीस तर मीही येइन म्हणते तिच्याबरोबर..
13 Dec 2010 - 7:37 pm | सुनील
छान चर्चा चाललीय्...चालू दे...
(अधून-मधून उसगावकर) सुनील
13 Dec 2010 - 7:53 pm | गणेशा
जे जे मित्र - नातेवाईक अमिरेकेत राहतात/किंवा काही दिवस राहुन आले आहेत त्यांच्या तोंडुन जी माहीती मिळते तसेच राजकारणातुन जी अमेरिका दिसते
असे दोन्ही माहिती घेवुन्च आमचे चित्र बनत असते ..
--
तुम्हीच एका धाग्यात सांगितले की शाळेचा असा पृओब्लेम आहे की चाकु वगैरे ...
मग आमच्या पुढे तेच चित्र तयार झाले ..
कोणॅए काय सांगितले की लगेच तसे चित्र ...
अमेरिके बद्दल सध्यातरी आमच्या मित्रांना/नातेवाईकांना जे वाटते तेच चित्र आमच्याकडे उमटते ..
15 Dec 2010 - 3:56 am | निनाद मुक्काम प...
अमेरिका हि निर्वासितांची भूमी आहे .पण हे निर्वासातीत आपला देश सोडून जेव्हा ह्या देशात येतात त्यात काही हुशार असतात काही मेहनती पण एक गोष्ट सर्वात समान असते असते .ती म्हणजे महत्वाकांक्षा
ह्या भूमीला स्वप्नांचा देश म्हणतात .कारण अमेरिकन ड्रीम पाहणे व साकारणे ह्या साठी लागणारे सर्व घटक सोयी व सर्वात महत्वाचे सरकारचे धोरण असते .भारतात कारकुनी करणाऱ्या माझ्या आजोबांच्या पिढीतील दुसरी पिढी तिथे गेली .व कष्टाने व सन्मार्गाने करोड व अब्जपती झाले .ह्याचे श्रेय त्यांना मिळण्या इतकेच ह्या देशाला त्यांच्या संस्कृतीला जाते .जी कार्मावादाचा पुरस्कार करते .व प्रगती साधते .प्रगती साधल्यावर चंगळवाद आला व त्यचे दुष्परिणाम म्हणजे कुमारी माता/ अमली पदार्थ /आत्मकेंद्री व्यक्तिमत्व / असुरक्षित भावविश्व /एकलेपणा नीती मूल्यांचे अवमूल्यन (ह्या तील बहुसंख्य गोष्टी आता भारतात येत आहेत कारण प्रगती हि चंगळ
वादाची सख्खी बहिण आहे .) ह्यांच्या राजकारणी लोकांनी व्यापारी लोकांसाठी जगभरात अशांतता मांडली आहे कारण संयुक्त राष्ट्र संघाला दुय्यम स्थान देऊन जगाचे पोलीस बनत आहेत .पेट्रोल व नैसर्गिक वायू व अविकसित देशाची नैसर्गिक साधन सामुग्री व खनिजे आपल्या अधिपत्याखाली येण्यासाठी जे काही ह्या लोकांनी आरंभले आहे त्यामुळे जगभरात अनेक देशात अमेरिकेला शत्रू मानून कमालीचा द्वेष करणारी माणसे
आहेत .ह्यांच्या हव्यासा पोटी जग मंदीत ढकलल्या गेले अशी जाणीव समस्त जगात आहे . अमेरिका म्हणजे एक वेगळे जग असा समाज ह्यांचे सरकार व हॉलीवूड सिनेमे ह्यांना करून देतात .(परग्रहावरील आक्रमणे व त्यातून देशाला वाचवायचा ठेका अमेरिकन माणसे व रास्त्राध्यक्ष करतात ) तरी हॉलीवूड ने तमाप जगातील लोकांना मनोरंजनाचे समान व्यासपीठ मिळवून दिले व ह्यांचे सुपरस्टार हे जगभरातील लोकांचे आदर्श झाले .
त्यामुळेच अमेरिकेला नवे ठेवणारे तमाम जगातील लोकांचे दुसरा देश स्थायिक होण्यासाठी अर्थात अमेरिका असतो .(ह्यांच्या घटनेतील १४ वे कलम मला खूप आवडते .)तरी भांडवल शाहीचा अतिरेक ह्यांनी निर्माण केला सून जगभरातील प्रमुख अर्थसत्ता त्याचा गुलाम झाल्या आहेत .लोकशाहीची नवी व्याख्या ह्यांनी निर्माण केली आहे ' व्यापार्यांनी व्यापारासाठी चालावेला व्यापार म्हणजे राजकारण अर्थात लोकशाही .जिथे अमेरिकन लोकांना वाटते त्यांच्याकडे अमर्याद व्यक्ती स्वन्तान्त्र्या आहे .पण खरे तर ते ह्या भांडवलदारांचे खेळणे आहेत .एक बाजार पेठ ह्या खेरीज त्यांना कोणतेही महत्व नही म्हणून देशात रोजगार निर्माती दुय्यम मानून जेव्हा अधिक नफ्यासाठी ह्यांचे भांडवलदार दुसर्या देशात संसार थाटतात .तेव्हा सामान्य अमेरिकन आउट सोर्सिंगच्या नावाने चीन भारताच्या नावाने खडा फोडतात (ह्या मुद्यावर अमेरिकन अनिवासी मत वाचायला आवडेल .)
आज अमेरिकेत भारताने पुढील ५ वर्षात ५००००० नोकर्या निर्माण करण्याचे त्यांच्या सहकार्याने ठरविले आहे . ह्या भारतीय रोजगार हमी योजनेचा प्रचार व जमेल तशी स्वदेशाची भूमिका अमेरिकन गावात शहरात पोहचावा (अमेरिकन ज्यू जसे इजारेल चे प्राधान्य जपतात तसे तुम्ही पण जपा
15 Dec 2010 - 5:16 am | बेसनलाडू
सविस्तर प्रतिसाद आवडला.
(अमेरिकस्थ)बेसनलाडू
15 Dec 2010 - 6:36 am | निनाद मुक्काम प...
मी आशा करतो कि माझा प्रतिसाद केवळ सविस्तर ह्या कारणासाठी आवडला नसावा .
आमच्या हिल्टन व डोरेंत हॉटेल मध्ये ८०% अमेरिकन येतात .अर्थात ते फक्त एका वर्गाचे प्रतिनिधित्व करतात .बाकी अमेरिकन पर्यटक जगात सर्वत्र आवडले जातात ते त्यांच्या टिपिंग च्या सवयीमुळे
15 Dec 2010 - 8:14 am | हुप्प्या
अमेरिकेतील आवडणार्या गोष्टी
१. शिस्तबद्ध वाहतूक
२. शांतता ही एक जपण्याची गोष्ट हे मानले जाते आणि पाळले जाते.
३. पराकोटीचे स्वातंत्र्य. मताचे, वेषाचे, विचारांचे, धर्माचे.
४. सामान्य माणसाचा लाचखोरीशी संबंध येत नाही. लायसन, पासपोर्ट, वाहतूकीचे नियम तोडल्याचा दंड हे सगळे नियमानुसार होते.
५. ग्राहकाला राजा मानण्याची वृत्ती.
६. भटकंती करायला भरपूर संधी.
७. तमाम स्थानिक लोकांना फुकट उपलब्ध असणारी आणि भरभरून साहित्य पुरवणारी समृद्ध ग्रंथालये.
८. इतर संस्कृतीविषयी असणारा खुला दृष्टीकोन. विविध देशांच्या पद्धतीची रेस्टॉरंटे ओसंडून वहात असतात. चिनी, भारतीय, मेक्सिकन, अमेरिकन, इटालियन, अफगाणी, मध्यपूर्वेची, जपानी, इथोपियन. जे म्हणाल ते इथे असते आणि लोक हौसेने वेगवेगळे प्रकार खाऊन बघतात.
९. कष्टाला मिळणारी प्रतिष्ठा. भारताच्या तुलनेत कष्ट करणे कमीपणाचे मानत नाहीत. (अर्थात काही कामांची चेष्टा केली जाते. म्याकमधे हँबर्गरच्या पॅट्या उलटणे हे तितकेसे सन्मानाचे नाही. मात्र कॉलेजमधे काम करताना थोडी मदत म्हणून असे केले तर नाके मुरडत नाहीत. आपल्याकडे कुणी वडापावची गाडी चालवली तर तो कामातून गेला असेच बहुधा समजतील).
न आवडणारे
१. वाढता पॉलिटिकल करेक्टनेस ज्यामुळे विचारस्वातंत्र्यावर घाला येतो की काय असे वाटते आहे.
२. सरकारी उधळपट्टी.
३. उगाचच युद्धखोरी वृत्ती. बहुधा संरक्षण विभागाची काँट्रॅक्टे मिळवणार्यांच्या बलिष्ठ लॉबीमुळे होत असावे. इराक, अफगाणिस्तानात कुठे थांबायचे हे न कळल्यामुळे अमाप पैसे वाया घालवले आहेत.
४. उतरणीला लागलेली अर्थव्यवस्था. अमेरिकेत बनलेल्या छोट्या मोठ्या, थोड्या महाग पण दर्जेदार व टिकाऊ वस्तू जाऊन तिथे स्वस्त पण तकलादू चिनी माल येतो आहे.
५. सुट्ट्यांची कमतरता. युरोप वा भारताच्या तुलनेत.
15 Dec 2010 - 8:20 am | बेसनलाडू
(मनकवडा)बेसनलाडू
15 Dec 2010 - 8:39 am | समई
१) नवरा बायको एकमेकाना वेळ देऊ शकतात्(घराजव्ळ ऑफिस)....लग्न झाल्या झाल्या ईकडे आलात तर उत्तमच
२) पहिल्या दिवसापासुन बायको हि घराचि राणि असते...बाकि आठड्यातुन १-२ वेळा सासुबाईं बरोबर गोड गोड बोलले कि झाले :):)
३)बायका रेसिपि़ज चि देवाण घेवाण करत रहातात्..अगदि संजय ठुम्मा.आदि कुक च्या सग्ळ्या रेसिपि पहाय्ला आणी कराय्ला वेळ आणी स्वातंत्र्य मिळ्त..:):)
४) मस्त घरि भांडि घासायला लागतात
५) गाडिवरचा स्नो काढाय्ला लागतो :)
६) मिड्ल ईस्टन केक,मीठाई(बकलावा),मेक्सिकन ,थाई,चायनिज् असे हॉटेल असतात...
बाकि एकच स्वातंत्र्य स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य :) :)
कसलाहि जाच नाहि कि नातेवाईकांचि कचकच नाहि..
(अर्थात या सग्ळ्याला दुसरि बाजु आहेच्...पण मला हेच वाट्ते)
बोला SSSS पुंडलिकSSS वरदा SSSSहारिSSSS विठ्ठ्ल