नवा "Axis of Evil"?

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in काथ्याकूट
11 Dec 2010 - 12:52 pm
गाभा: 

रेगन जेंव्हां अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेंव्हां त्यांच्या रशियाच्या भेटीत त्यांनी रशियन जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात सोवियेत राजवटीचा "Evil Empire" असा उल्लेख केला होता.

नंतर 'धाकले' बुश (उर्फ 'बुशर्रफ') अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेंव्हां त्यांनी रेगनसाहेबांची कॉपी मारून इराण, उ. कोरिया आणि इराक या राष्ट्रांना "Axis of Evil" ही संज्ञा दिली. खरे तर या सर्व राष्ट्रांना अण्वस्त्रसज्ज करणार्‍या पाकिस्तानला मात्र 'बुशर्रफ'नी खड्यासारखे वगळले होते. कारण? देव जाणे! (तसेच लिबिया, सीरिया आणि चीनलाही कां वगळले होते तेही कळत नाहीं.)
काल नोबेल पारितोषिक वितरणाला अनेक अमेरिकेच्या 'ताटाखालची मांजरे' दल बदलून चीनच्या ताटाखाली गेली! त्यात लक्षात येणारी आणि अमेरिकेच्या कंपूत आहेत असे भासविणारी प्रमुख राष्ट्रे होती पाकिस्तान व सौदी अरेबिया. (आणखीही १५-एक राष्ट्रे होती.)
म्हणून मनात आले कीं पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि चीन यांचा नवा "Axis of Evil" तर बनला नाहीं?
'मिपा'करांना काय वाटते?

प्रतिक्रिया

विशेषतः रशीया व चीन आणी पाकीस्तान एका ताटात बघून हादरलो..... भलेही मग ते नोबेल वितरण असो.

वेताळ's picture

11 Dec 2010 - 1:27 pm | वेताळ

काळे काकाचे नाव चीन च्या मोस्ट वॉन्टेड यादीत येण्याची भिती वाटते.

आमचं नांव समद्या याद्यामंदी हाय पगा!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Dec 2010 - 6:23 pm | निनाद मुक्काम प...

त्याहून जास्त आश्यर्य इराण प्रसंगी एका ठरावात संयुक्त राष्ट्रसंघात भारत तटस्थ राहिला ह्याचे (पूर्वी तो इराणच्या बाजूने होता )
नैसर्गिक मैत्री दुसरे काय तटस्थ राहिला तेवढे ठीक आहे .उद्या अमेरिकेसोबत विरोध करून चालणार नाही .कारण इराण शी संबंध आपणास गरजेचे आहे. व इजारेल शी सुध्धा
बाकी पाकिस्तानी व चीनी हे छुपे नेत्र कटाक्ष अजून वाढले तर झरदारींच्या पेकाटात ...
मग अमेरिकेला नवीन पाळीव ....
सौदी नेत्यांचा चीनी दौरा हा अमेरिकेच्या पोटात गोळा आणणारा होता .कारण ह्यातून सौदीने आम्हास गृहीत धरू नका असा गर्भित इशारा अमेरिकेस दिला . ह्याने दोन मोठ्या समस्या अमेरिकेपुढे आहेत .आखातातील सर्वात श्रीमंत व प्रभावशाली राष्ट्र चीनच्या आहारी जाणे म्हणजे अमेरिकेचे पर्यायाने इजारेलचे भौगोलिक महत्व कमी होणे .व सौदी पेट्रो मनी चीनकडे जाणे .म्हणूनच अमेरीकेंच्या पुढाकाराने मनमोहन दौरा सौदी येथे झाला (ज्यावर पाकिस्तानने घोर चिंता' तेथील प्रसारमाध्यमात केली .व दुर्दैव नायर ह्याच्या गर्भित अर्थाचा प्रसार्माध्यामानी भारताच्या अर्थात ध म मा केला हा इतिहास सर्वाना न्यातच आहे .)त्यामुळे ह्या सध्यस्थितीत अमेरिकेला भारताला आखतात महत्व देणे व गुंतवणूकच करायची ना मग चीन कशाला ? जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत काय वाईट आहे .असे आखाती देशाने सांगणे ओघाने आलेच .
गेल्या काही वर्षात भारतीय कंपन्याची आखाती देशातील कंपन्यांची शॉपिंग भलतीच वाढली आहे .एकदा यु ए इ च्या अर्थ पुरवणीत नेहमीप्रमाणे भारताचे नाव अग्रक्रमी झळकल्याने आमचा एक पाक कलीग म्हणाला अरे हि यु ए इ ची अर्थ पुरवणी आहे का भारताची ? मी म्हणालो अरे पाकिस्तान मधील अर्थ पुरवणीत कोणाचे नाव असते अग्रभागी (पाकिस्तानात व्यापार होतो का ?)असा माझा छुपा सवाल लक्षात आल्यावर एक महत्वाचा फोन करण्याच्या बहाण्याने स्वारी पसार झाली .

राजेश घासकडवी's picture

12 Dec 2010 - 1:40 am | राजेश घासकडवी

मी हा लेख मिपाविषयी आहे असं समजून उघडला तर निघाला आंतरराष्ट्रीय राजकारणाविषयी...

पण प्रश्न उमटलाच. मिपावरती नवीन अॅक्सिस आहे का? जुना कुठचा होता?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Dec 2010 - 9:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एका प्रदीर्घ लेखाची वाट (पहात) आहे गुर्जी; काहीतरी प्रॉडक्टीव्ह लिहा पाहू आता!

ताज्या बातमीनुसार कुवेतच्या राजाने त्यांच्या ५० व्या राष्ट्रदिनानिमित्त भारताच्या राष्ट्रपतींना बोलावणे पाठविण्याचे सुतोवाच केले आहे. "Axis of Evil" ची एक डायमेंशन ( दिशा) पक्की होत आहे.........

रणजित चितळे's picture

13 Dec 2010 - 12:44 pm | रणजित चितळे

आपले निरिक्षण बरोबरच आहे.
मला वाटते प्रत्येक राष्ट्र स्वतःचा फायदा बघते. प्रत्येक राष्ट्राचा दृष्टीकोण त्याच मुळे घडत असतो.
चीन पि.ओ.के मध्ये रस्ते बांधुन देत आहे पाकीस्तानला (खरे म्हणजे स्वतः चे दळणवळण चांगले करणं चालले आहे त्याचे). पाकीस्तानला त्यांच्या घोरी व अजुन क्षेपणास्त्रांना चीन मदत करत आहे. काही दिवसांनी चीन पि.ओ.के वर अरुणाचल प्रदेष सारखी मालकी हक्क सांगु लागला तर त्यात काही नवल वाटायला नको.

आपले धोरण आखणा-यांनी हे लक्षात घेतले पाहीजे. आपण कधी दबावाखाली अँडरसनला सोडतो. कधी लीट्टे ला मदत करतो आणि स्वतःच्या राष्ट्रात पाकिस्तन ते बांगलादेश एक विशिष्ट कॉरीडॉर बनत चालला आहे त्याची खबर आपण घेत नाही. तसाच एक कॉरीडॉर नेपाळ पासुन आंध्रा पर्यंत माओईस्ट चा बनत चालला आहे त्याची सुद्धा आपण दखल पुर्णपणे घेतलेली नाहीये.

अशा परिस्तीथीत आपले

२०५० पर्यंत काय होइल हरी जोणे.