✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सावरकर आणि नास्तिकवाद

आ
आमोद शिंदे यांनी
Fri, 12/10/2010 - 01:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17822 वाचन

💬 प्रतिसाद (87)

प्रतिक्रिया

नास्तीक सावरकर !!

अर्धवटराव
Fri, 12/10/2010 - 04:26 नवीन
सावरकर नास्तीक अजीबात नव्हते. तर ते कर्मकांडाच्या विरुद्ध होते. अशी कुठलीही गोष्ट जी बुद्धीप्रामाण्याने पटत नाहि ति स्वीकारायला त्यांचा विरोध होता. सावरकरांची जगदंबेवर नितांत श्रद्धा होती. पण ती जगदंबा त्यांना मातृभूमीच्या रुपाने देखील दिसली. इथल्या दारिद्र्याने गांअजलेल्या माणसात त्यांना नारायण दिसला. शिवछत्रपती हाच त्यांचा महादेव. योगवसिष्ठाचा सावरकरांना व्यासंग होता आणि अष्टांग योग देखील त्यांनी डोळसपणे अभ्यासला होता. आता वरील मतांना पुराव्यानिशी शाबीत करायच्या भानगडीत मी पडणार नाहि... त्याचा काहि फायदा नाहि. (आस्तीक) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

ह्या विषयी आपले मत काय?

आमोद शिंदे
Fri, 12/10/2010 - 07:34 नवीन
सावरकर नास्तीक अजीबात नव्हते.
VD Savarkar was publicly an atheist.Even when he was the Hindu Mahasabha leader he used to publicly announce and advertise lectures on atheism, on why god is not there and why all religions are false. संदर्भ: Kumar, Pramod (1992). Towards Understanding Communalism. Chandigarh: Centre for Research in Rural and Industrial Development. p. 348. ISBN 9788185835174. OCLC 27810012. मिपाकर विकास आणखी प्रकाश टाकतीलच.
आता वरील मतांना पुराव्यानिशी शाबीत करायच्या भानगडीत मी पडणार नाहि
निदान काही संदर्भ तरी द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

नास्तिक सावरकर !!

अर्धवटराव
Fri, 12/10/2010 - 22:58 नवीन
मी स्पष्टीकरण, संदर्भ या भानगडीत न पडायचं एक कारण आहे... ते म्हणजे सावरकरांवर वापरायची फूटपट्टी आणि आस्तिक/नास्तिक या शब्दांच्या परिभाषा. आस्तिकत्व "एक विशिष्ट भाव आणि (त्या अनुसंगाने) काहि कर्म" असा काहितरी अर्थ प्रेरीत करतो. सावरकर त्यातल्या भावाशी निश्चित संलग्न होते. त्या भावातुनच त्यांच्या लहानपणिची अष्टभुजेची उपासना मोठे झाल्यावर अ़ज्ञेयवादात परिपक्व झाली. जर तुम्हाला शांकर-अद्वैतवाद आस्तीक वाटत असेल तर सावरकरांच्या आस्तिक्यावर शंका उरणार नाहि. >> निदान काही संदर्भ तरी द्या. मी सावरकरांचे साहित्य जे काहि थोडंफार वाचलं... आणि त्यांच्यावर इतरांचे विचार/लेख/साहित्य जे थोडंफार डोळ्याखालुन गेलं त्यावरुन माझं जे मत बनलं ते मी टंकलं. या सगळ्यांचा संदर्भ देतो म्हटलं तरी मी सध्या देउ शकणार नाहि. क्षमस्व. अवांतर : खाली इंद्रजीतचा फार उत्तम प्रतीसाद आलाय. सावरकरांच्या आस्तिक्याबद्दल माझं तसच मत आहे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

अवांतर : खाली इंद्रजीतचा फार

आमोद शिंदे
Sun, 12/12/2010 - 21:41 नवीन
अवांतर : खाली इंद्रजीतचा फार उत्तम प्रतीसाद आलाय. सावरकरांच्या आस्तिक्याबद्दल माझं तसच मत आहे.
इंद्रजीत ह्यांच्या प्रतिसादात "सावरकर देव मानत नव्हते" असे लिहिले आहे. तरीही त्यांना अस्तिक म्हणायचे असेल तर तुम्ही म्हणू शकता. माझ्या मते जो देव मानत नाही तो नास्तिक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

०.००००१ %

अर्धवटराव
Mon, 12/13/2010 - 04:19 नवीन
>>माझ्या मते जो देव मानत नाही तो नास्तिक म्हणुनच मी संदर्भ, स्पष्टीकरणाच्या भानगडीत पडत नव्हतो. तुमची व्याख्या फार ढोबळ आहे आणि सावरकर फार मोठे. त्या व्यक्तीला त्याच्याच फूटपट्टीने मोजावे... अवांतर : तुमच्या व्याख्येने जातो म्हटलं तर जगातले ०.०००००१% लोक देखील आस्तीक उरणार नाहित. देव मानणं हि फार फार अवघड गोष्ट आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

तुमच्या व्याख्येने जातो

आमोद शिंदे
Mon, 12/13/2010 - 07:39 नवीन
तुमच्या व्याख्येने जातो म्हटलं तर जगातले ०.०००००१% लोक देखील आस्तीक उरणार नाहित. देव मानणं हि फार फार अवघड गोष्ट आहे...
मग तुमची व्याख्या काय बरे? देव मानणं ही अवघड गोष्ट आहे? त्यात अवघड काय आहे?? अगदी शुचि सारख्यांच्यापासून कुणीही देव मानताना पाहिले आहे, त्यात नेमके अवघड काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

देव मानण्याच्या व्याख्या !!

अर्धवटराव
Tue, 12/14/2010 - 01:22 नवीन
साधारणत: "देव" या संकल्पनेच्या २ व्याख्या आहेत... १) विश्वनियंता- जो या विश्वाचा पसारा एका हाती चालवतो. हि व्याख्या मानतो म्हटलं तर आपले कर्म करुन आपले भविष्य घडवायचा किती स्कोप आहे, या विचाराने आपली झोप उडायला हवी २) सच्चिदानंद- सर्व दृष्य्-अदृष्य जगाचं मूळ आणि एकमेव कारण, सर्व प्राणीमात्रांचं खरंखुरं स्वरूप. हि व्याख्या मानतो म्हटलं तर "मी आणि इतर" हा भेद नाहिसा होउन मनुष्य सर्व चिंता, दु:खां पासुन अलीप्त होईल. यातील कुठलीही व्याख्या मानणारे मला तरी कोणी भेटलं नाहि अजून. तुम्हाला काहि अनुभव ?? अवांतर, पण महत्वाचं- जाणण्यात आणि मानण्यात फार फरक आहे. 'मानणं' हा मनाच्या प्रांतातला विषय आहे... तुम्ही जे काहि "मानता" त्याचं प्रतीबींब तुमच्या वागण्यात, विचारात पडायलाच हवं अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

साधारणत: "देव" या

आमोद शिंदे
Tue, 12/14/2010 - 05:49 नवीन
साधारणत: "देव" या संकल्पनेच्या २ व्याख्या आहेत... १) विश्वनियंता- जो या विश्वाचा पसारा एका हाती चालवतो. हि व्याख्या मानतो म्हटलं तर आपले कर्म करुन आपले भविष्य घडवायचा किती स्कोप आहे, या विचाराने आपली झोप उडायला हवी २) सच्चिदानंद- सर्व दृष्य्-अदृष्य जगाचं मूळ आणि एकमेव कारण, सर्व प्राणीमात्रांचं खरंखुरं स्वरूप. हि व्याख्या मानतो म्हटलं तर "मी आणि इतर" हा भेद नाहिसा होउन मनुष्य सर्व चिंता, दु:खां पासुन अलीप्त होईल.
बरं! (संदर्भ काय तुम्ही देत नाही. तेव्हा तुर्तास बरं!)
यातील कुठलीही व्याख्या मानणारे मला तरी कोणी भेटलं नाहि अजून. तुम्हाला काहि अनुभव ??
व्याख्या कुणी केल्या? नक्की दोनंच आहेत का?
अवांतर, पण महत्वाचं- जाणण्यात आणि मानण्यात फार फरक आहे. 'मानणं' हा मनाच्या प्रांतातला विषय आहे... तुम्ही जे काहि "मानता" त्याचं प्रतीबींब तुमच्या वागण्यात, विचारात पडायलाच हवं
नक्की मुद्दा काय आहे? देव मानतो तो देवळात जातो. म्हणजेच मानण्याचे प्रतिबींब वागण्यात नाही का? त्यात असामान्य किंवा अवघड काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

परत एकदा !!

अर्धवटराव
Wed, 12/15/2010 - 06:15 नवीन
>>व्याख्या कुणी केल्या? नक्की दोनंच आहेत का? संदर्भ द्यायचाच तर एक देता येईल... माझा कॉमन सेन्स... >>देव मानतो तो देवळात जातो. म्हणजेच मानण्याचे प्रतिबींब वागण्यात नाही का? त्यात असामान्य किंवा अवघड काय आहे? "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी | तेणे मुक्ती चारी साधियेल्या" -संदर्भ- वारकर्‍यांचा हरिपाठ. यात जे असामान्य, अवघड साध्य आहे तेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

देव मानतो तो देवळात जातो.

आमोद शिंदे
Fri, 12/17/2010 - 02:53 नवीन
देव मानतो तो देवळात जातो. म्हणजेच मानण्याचे प्रतिबींब वागण्यात नाही का? त्यात असामान्य किंवा अवघड काय आहे? मूळ प्रश्नाचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

"असामान्य काय" चे उत्तर !!

अर्धवटराव
Fri, 12/17/2010 - 05:23 नवीन
>>देव मानतो तो देवळात जातो. म्हणजेच मानण्याचे प्रतिबींब वागण्यात नाही का? - ते प्रतिबिंब "जाणण्याचे", "मानण्याचे" नाहि. अर्थात, हा फरक एकदम डिजिटल स्वरुपाचा १/० असा दाखवता येणं कठीण आहे. >>त्यात असामान्य किंवा अवघड काय आहे? "यात जे असामान्य, अवघड साध्य आहे तेच" असं जे पुर्वीच्या प्रतिसादात म्हटलय ते... >>मूळ प्रश्नाचे काय? हा मूळ प्रश्न सावरकरांच्या आस्तिक्याचा म्हणताय का? तर हो... ते आस्तिक होते. त्यांच्या आस्तिक्याचं डेमोन्स्ट्रॅशन इतर सामान्य लोकांसारखं देवळात जाणे, पुजापाठ करणे या स्वरुपाचं नसेल कदाचित.. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

सावरकर आस्तिक होते असे तुमचे

आमोद शिंदे
Sun, 12/19/2010 - 23:49 नवीन
सावरकर आस्तिक होते असे तुमचे खरंच मत असेल तर ह्याहून मोठा त्यांच्या विचारांचा पराभव नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

बरं !!

अर्धवटराव
Mon, 12/20/2010 - 03:18 नवीन
तसं सावरकरांच्या विचारांचा पराभव व्हावा... तोहि माझ्या कडुन... गंमत वाटली :) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

अनुयायांनी नेत्याच्या

आमोद शिंदे
Mon, 12/20/2010 - 07:54 नवीन
अनुयायांनी नेत्याच्या विचारांचा पराभव करणे ह्यात नविन काहीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

करेक्ट !!

अर्धवटराव
Mon, 12/20/2010 - 09:22 नवीन
एकदम बरोबर बोललात राव !! अवांतरः तुम्हि कोणाला कोणाचे अनुयायी म्हणताहात ?? मी सावरकरांचा अनुयायी आहे असं म्हणत आहात कि काय? अहो एव्हढी लायकी असती तर एव्हाना २-४ चांगली कामे नसती का झालि आमच्या हातुन. बाकि सावरकरांच्या वैश्वीक देवाबद्दलच्या कल्पना ऐकुन्/वाचुन सुद्धा तुम्ही त्यांना नास्तीक म्हणत असाल तर तुम्ही आस्तीकत्वाला अनावश्यकपणे कर्मकांडाशी जोडुन आपल्या मापात सावरकरांना बसवायचा प्रयत्न करताहात. अर्थात त्याला कोणाचि ना नाहि... आमचि किंव्हा स्वातंत्र्यविरांचि सुद्धा... (अनुयायी???) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

१) विश्वनियंता- जो या

Nile
Tue, 12/14/2010 - 06:39 नवीन
१) विश्वनियंता- जो या विश्वाचा पसारा एका हाती चालवतो. हि व्याख्या मानतो म्हटलं तर आपले कर्म करुन आपले भविष्य घडवायचा किती स्कोप आहे, या विचाराने आपली झोप उडायला हवी
असा विश्वनियंता आहे असे मानतात पण तरीही ज्यांची झोप उडालेली नाही अशांना तुम्ही काय म्हणता? असे लोक आहेत हे पुराव्यानिशी शाबीत करायच्या भानगडीत मी पडणार नाहि... त्याचा काहि फायदा नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

पुराव्याचि गरज नाहि राव !!

अर्धवटराव
Wed, 12/15/2010 - 06:17 नवीन
>>असा विश्वनियंता आहे असे मानतात पण तरीही ज्यांची झोप उडालेली नाही अशांना तुम्ही काय म्हणता? जो "जाणतो" कि विश्वनियंता आहे, पण "मानत" नाहि... (जाणता) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

जो "जाणतो" कि विश्वनियंता

Nile
गुरुवार, 12/23/2010 - 06:30 नवीन
जो "जाणतो" कि विश्वनियंता आहे, पण "मानत" नाहि... (जाणता) अर्धवटराव -रेडि टु थिंक
अहो हो, पण त्यांना तुम्ही म्हणता काय? बाकी जाणणारे अजाण इतके झालेत सद्ध्या की तो विषयच नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अहो हो, पण त्यांना तुम्ही म्हणता काय?

अर्धवटराव
Fri, 12/24/2010 - 00:20 नवीन
आम्हि त्यांनाहि आस्तीकच म्हणतो. मुळात आमच्या आस्तीकपणाच्या/देवाबद्दलच्या परिभाषा "भाव" ओरिएंटेड आहेत, आणि भाव हा सब्जेक्टीव्ह विषय आहे. >>बाकी जाणणारे अजाण इतके झालेत सद्ध्या की तो विषयच नको ते तशे नेहमीच होते, आहेत आणि पुढेहि राहतील. आस्तीक-नास्तीक, श्रद्धा-विवेक, कल्पना-तर्क... इ. आणि इतर अनेक काठांना धरुन मनुष्याचे विचार प्रवाहीत होत राहतील-दोलायमान होत राहतील. तेंव्हा इतरांना काय वाटतं याचा (अतिरीक्त) विचार करत बसण्यापेक्षा आपाल्याला जे योग्य वाटतं त्या मार्गावरुन जाणे ईष्ट !! (इतर) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

सावरकरांवरचा एक उत्तम लेख

मुक्तसुनीत
Fri, 01/07/2011 - 21:07 नवीन
१. हा प्रतिसाद कुणालाही उद्देशून नाही. सोयीकरता इथे चिकटवतो आहे. २. या प्रतिसादामध्ये सावरकरांच्या आस्तिकते/नास्तिकतेची चर्चा नाही त्यामुळे तो मूळ विषयाला अनुसरून नाही असे म्हणता येईल. मात्र हा लेख सावरकरांवरचा एक उत्तम लेख आहे, तो अन्य लोकाना वाचता यावा या उद्देशाने इथे लिंक देतो आहे. http://lekhsangrah.wordpress.com/2010/12/05/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0-%E2%80%98%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

१

कवितानागेश
Fri, 12/10/2010 - 07:59 नवीन
सारांश (१) जे सृष्टिनियम विज्ञानास प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगान्ती सर्वथैव अबाधित, शाश्वत, सनातन असे आढळून आले आहेत तेच काय ते खरे सनातन धर्म होते. (२)पारलौकिक वस्तुस्थितीचे असे प्रयोगसिद्ध ज्ञान आपणास मुळीच झालेले नाही. यास्तव तो विषय अद्याप प्रयोवस्थेत आहेसे समजून त्याविषयी अस्तिरूप वा नास्तिरूप काहीच मत करून घेणे अयुक्त आहे. त्या पारलौकिक प्रकरणी नाना क्लृप्ति सांगणारे कोणचेही धर्मग्रंथ अपौरुषय वा ईश्वरदत्त नसून मनुष्यकृत वा मनुष्यस्फूर्त आहत. त्यांच्या क्लृप्ति प्रमाणहीन असल्याने त्यास सनातन धर्म, शाश्वर सत्य असे म्हणता येत नाही. (३) मनुष्याचे झाडून सारे ऐहिक व्यवहार, नीति, रीति, निर्बंध हे त्यास या जगात हितप्रद आहेत की नाहीत या प्रत्यक्षनिष्ठा कसोटीनेच ठरविले पाहिजेत, पाळले पाहिजेत, परिवर्तिले पाहिजेत. "परिवर्तिनि संसारे' ते मानवी व्यवहारधर्म सनातन असणेच शक्य नाही, इष्ट नाही. महाभारतामध्ये म्हटले आहे तेच ठीक की, "अत: प्रत्यक्षमार्गेण व्यवहारविधि नयेत्‌।' http://www.savarkar.org वरून
  • Log in or register to post comments

२

कवितानागेश
Fri, 12/10/2010 - 08:00 नवीन
तरीदेखील ज्या कोणच्या हेतूने वा हेतूवाचून ही विश्वाची प्रचंड जगड्‌व्याळ उलाढाल चालू आहे तीत एक अत्यंत तात्पुरता नि अत्यंत तुच्छ परिणाम म्हणून का होईना, पण मनुष्याला, त्याच्या लांबीरुंदीच्या गजाने मापता यावे असे, त्याच्या संख्येत मोजता यावे असे, इतके सुख नि इतक्या सोयी अपभोगिता येतात हा मात्र आणि एढाच काय तो ह्या विश्वाच्या देवाचा मनुष्यावर झालेला उपकार होय! मनुष्याला ह्या जगात जे सुख मिळू शकते तेवढेही मिळू न देण्यासारखीच जर ह्या विश्वाची रचना ह्या विश्वाच्या देवाने केली असती, तर त्याचा हात कोण धरणार होता! हे सुगंध, हे सुस्वर, हे सुखस्पर्श, हे सौंदर्य, हे सुख, ह्या रुचि, ह्या सोयी आहेत, त्याही अमूप आहेत! ज्या योगायोगाने मनुष्यास ह्या सर्व लाभत आहेत त्या योगायोगाला शतश: धन्यवाद असोत! ज्या विश्वशक्तींनी कळत न कळत असा योगायोग जुळवून आणला त्यांना त्या अंशापुरते मनुष्याचा देव म्हणून संबोधिल्याचे समाधान आपल्यास उपभोगिता येईल, उपकृत भक्तीचे फूल वाहून त्यास पूजिताही येईल! परंतु त्या पलीकडे ह्या विश्वाच्या देवाशी, वाटच्या भिकारड्याने सम्राटाशी जोडू पहावा तसा कोणचाही बादरायण संबंध जोडण्याची लचाळ हाव मनुष्याने आमूलात्‌ सोडून द्यावी हेच इष्ट! कारण तेच सत्य आहे! आपले चांगले ते देव करील, देव चांगले करील तर मी सत्यनारायण करीन, ही आशा, ही आशा, हा अवलंब, अगदी खुळचट आहे! कारण तो अगदी असत्य आहे. ज्या ज्या संकटातून आपणास सोडविले म्हणून आपण देवाचा सत्यनारायण करतो त्या त्या संकटात प्रथम आपणास ढकलतो कोण? तोच सत्यनारायण, तोच देव! जो प्रथम आपला गळा कापतो आणि नंतर त्यास मलम लावतो त्याची मलम लावण्यासाठी पूजा करावयाची तर प्रथम गळा का कापलास म्हणून त्याची आधी यथेच्छ शोभाही करावयास नको काय? विश्वाच्या देवाच्या ठायी ह्या दोन्हीही भावना अनाठायी नि असमंजस आहेत. ती विश्वाची आद्यशक्ति ज्या काही ठराविक नियमांनी वर्तते आहे ते तिचे नियम समजतील ते समजून घेऊन त्यातल्या त्यात आपल्या मनुष्यजातीच्या हिताला नि सुखाला पोषक होईल तसा त्यांचा साधेल तितका उपयोग करून घेणे इतकेच मुनष्याच्या हातात आहे. मुनष्यजातीच्या सुखाला अनुकूल ते चांगले, प्रतिकूल ते वाईट. अशी निती-अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे. देवास आवडते ते चांगले आणि मनुष्यास जे सुखदायी ते देवास आवडते ह्या दोन्ही समजुती खुळचट आहेत; कारण त्या असत्य आहेत. विश्वात आपण आहोत पेक्षा विश्व आपले नाही; फार फार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे; फार फार मोठ्या अंशी ते आपणास प्रतिकूल आहे-असे जे आहेत ते नीटपणे, धीटपणे समजून घेऊन त्याला बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे! आणि विश्वाच्या देवाची खरी खरी तीच पूजा!! http://www.savarkar.org वरुन
  • Log in or register to post comments

यावरुन

कवितानागेश
Fri, 12/10/2010 - 07:58 नवीन
या २ उतार्‍यांवरुन सावरकरांना कुठल्या 'व्याख्येत' कोंबून बसवायचे ते बसवा!
  • Log in or register to post comments

माउ! __/\__

स्पंदना
Fri, 12/10/2010 - 08:58 नवीन
माउ! __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

+१

शहराजाद
Sun, 12/19/2010 - 08:18 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

धन्यवाद

राजेश घासकडवी
Fri, 12/10/2010 - 09:24 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

अरे बापरे

नितिन थत्ते
Fri, 12/10/2010 - 08:03 नवीन
अरे बापरे !!!! सावरकरही विचारजंतच होते म्हणायचे. ;) पण आम्हाला हे विचारजंत सावरकरच आवडतात बॉ.
  • Log in or register to post comments

सहमत आहे. परंतु ते देवपूजा,

अवलिया
Fri, 12/10/2010 - 08:45 नवीन
सहमत आहे. परंतु ते देवपूजा, धर्म मानणार्‍यांविरुद्ध गरळ ओकत नसल्याने आणि जी काही टिका करत त्यामागचा उद्देश हिंदूंनी योग्य मार्गावर यावे हाच उदात्त हेतु असल्याने (काही जण त्यांनी केली तशी टीका करुन मीच बघा किती शहाणा याचे केविलवाणे प्रदर्शन करतात) मी सावरकरांना विचारवंत (किंवा थत्ते म्हणतात तसे विचारजंत) असे न म्हणता द्रष्टा वा दार्शनिक असे संबोधणे जास्त योग्य समजतो. थत्ते त्यांना विचारजंत समजत असतील तर ते तसे समजु शकतात. सावरकरांनी त्यांच्या कर्मकांडविरोधी आग्रही प्रतिपादनातले किती मुद्दे आद्य शंकराचार्यांच्या साहित्यातुन घेतले आहेत यावर आमोद शिंदे किंवा नितिन थत्ते प्रकाश टाकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

परंतु ते देवपूजा, धर्म

आमोद शिंदे
Fri, 12/10/2010 - 08:57 नवीन
परंतु ते देवपूजा, धर्म मानणार्‍यांविरुद्ध गरळ ओकत नसल्याने आणि जी काही टिका करत त्यामागचा उद्देश हिंदूंनी योग्य मार्गावर यावे हाच उदात्त हेतु असल्याने
तुम्ही स्वतः देवपूजा करणारे. तेव्हा सावरकर देवपूजा करणार्‍यांवर जी टीका करत ती तुम्हाला मान्य आहे का? सावरकरांचा हेतू उदात्त होता हे तुम्हाला मान्य आहे तर तुम्ही देवपूजा करायचे थांबलात का?
सावरकरांनी त्यांच्या कर्मकांडविरोधी आग्रही प्रतिपादनातले किती मुद्दे आद्य शंकराचार्यांच्या साहित्यातुन घेतले आहेत यावर आमोद शिंदे किंवा नितिन थत्ते प्रकाश टाकतील.
नाही बुवा. हा मुद्दा नविनच आहे. तुम्हीच प्रकाश पाडा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

सावरकर देवपूजा करणार्‍यांवर

अवलिया
Fri, 12/10/2010 - 09:00 नवीन
सावरकर देवपूजा करणार्‍यांवर टिका करत की देवपूजेच्या नावाखाली असलेल्या अपप्रवृत्तीं / अंधश्रध्दा यावर टिका करत ते स्पष्ट करावे. सरसकट देवपूजेवर टीका करत असा निष्कर्ष तुम्ही काढलेला दिसत आहे. तोपर्यंत मी रत्नागिरीच्या पतितपावन मंदीरात जाउन येतो. तुम्हाला त्या मंदीराविषयी माहिती असेलच असा कयास आहे. बाकी नवीन मुद्यावर आपणच अभ्यास करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

परंतु ते देवपूजा, धर्म

आमोद शिंदे
Fri, 12/10/2010 - 09:02 नवीन
परंतु ते देवपूजा, धर्म मानणार्‍यांविरुद्ध गरळ ओकत नसल्याने आणि जी काही टिका करत त्यामागचा उद्देश हिंदूंनी योग्य मार्गावर यावे हाच उदात्त हेतु असल्याने
असे तुम्हीच लिहिले आहे. देवपूजा करणार्‍यांवर ते टीका करत असा त्याचा अर्थ होतो. तसेच..
VD Savarkar was publicly an atheist.Even when he was the Hindu Mahasabha leader he used to publicly announce and advertise lectures on atheism, on why god is not there and why all religions are false.
ह्याचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

परंतु ते देवपूजा, धर्म

अवलिया
Fri, 12/10/2010 - 09:04 नवीन
परंतु ते देवपूजा, धर्म मानणार्‍यांविरुद्ध गरळ ओकत नसल्याने आणि जी काही टिका करत त्यामागचा उद्देश हिंदूंनी योग्य मार्गावर यावे हाच उदात्त हेतु असल्याने
असे तुम्हीच लिहिले आहे. देवपूजा करणार्‍यांवर ते टीका करत असा त्याचा अर्थ होतो. हा हा हा सोईस्कर निष्कर्ष. चालू द्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

बरं..

आमोद शिंदे
Fri, 12/10/2010 - 09:08 नवीन
VD Savarkar was publicly an atheist.Even when he was the Hindu Mahasabha leader he used to publicly announce and advertise lectures on atheism, on why god is not there and why all religions are false. ह्याचे काय? असेही विचारले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

काय करायचे आहे या वाक्याचे ?

अवलिया
Fri, 12/10/2010 - 09:11 नवीन
काय करायचे आहे या वाक्याचे ? माफ करा माझं इंग्लिश भाषेचे ज्ञान तुटपुंजे आहे. भाषांतर द्या संपुर्ण उतार्‍याचे, मागील पुढिल संदर्भासह म्हणजे विचार करुन सांगता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

ह्या वाक्यात सावरकर अ‍ॅथेइस्ट

आमोद शिंदे
Fri, 12/10/2010 - 09:18 नवीन
ह्या वाक्यात सावरकर अ‍ॅथेइस्ट होते असे म्हंटले आहे. अ‍ॅथेइस्ट ह्या इंग्रजी शब्दाचा अर्थ नास्तिक असा होतो. म्हणजेच देवावर सरसकट श्रद्धा नसणारा. अधिक माहिती हवी असल्यास पुस्तकाचे नाव दिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

ओके.

अवलिया
Fri, 12/10/2010 - 17:10 नवीन
ओके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

VD Savarkar was publicly an

नरेशकुमार
Fri, 12/10/2010 - 17:46 नवीन
माफ करा माझं इंग्लिश भाषेचे ज्ञान तुटपुंजे आहे. भाषांतर द्या संपुर्ण उतार्‍याचे, Image removed. VD Savarkar was publicly an atheist. Even when he was the Hindu Mahasabha leader he used to publicly announce and advertise lectures on atheism, on why god is not there and why all religions are false. वी डी सावरकर सार्वजनिक रूप से एक नास्तिक था. यहां तक कि जब वह हिंदू महासभा के नेता सार्वजनिक रूप से घोषणा की कि वह इस्तेमाल किया और विज्ञापित था नास्तिकता पर क्यों भगवान वहाँ नहीं है और सभी धर्मों झूठे हैं क्यों, पर व्याख्यान दिए. मला thank you बोलाय्ला विस्रु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

नितिन थत्ते जी

चिंतामणी
Fri, 12/10/2010 - 23:04 नवीन
खरा सनातन धर्म कोणता? विज्ञाननिष्ठ निबंध हे http://www.savarkar.org या साईटवर "बुद्धीवाद" या सदराखाली आहेत. ते वाचावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

विज्ञाननिष्ठ निबंध

नितिन थत्ते
Sat, 12/11/2010 - 08:00 नवीन
दुव्याबद्दल धन्यवाद. विज्ञाननिष्ठ निबंधांची पारायणे २० वर्षांपूर्वी करून झाली आहेत. अजूनही कधीतरी उघडून वाचतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

युरोपने विज्ञानाची कास धरली

निनाद मुक्काम …
Fri, 12/17/2010 - 06:11 नवीन
युरोपने विज्ञानाची कास धरली .कर्मकांडे धर्मातून कमी केली .व त्याने प्रगतशील शिस्तप्रिय समाज उभारला .ज्या वेळी सावरकरांनी त्यांचे विज्ञाननिष्ठ विचार मांडले .तेव्हा चा काळ हा जातपात व कर्मकांड ह्यांनी भारलेला होता .समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने ह्या दृष्ट्या नेत्याने आपले विचार मांडले .अर्थात ते तत्कालीन समाजाला अनुसरून होते .आता पुलाखालून बरेच पाणी निघून गेले आहे .आपला समाज त्या मानाने ६० वर्षात बराच प्रगत झाला आहे .पण त्याच बरोबर त्याच्या समोर नवी आव्हाने आहेत .सावरकरांच्या कथनाचा मतितार्थ सार लक्षात तसे आचरण केले पाहिजे .त्याच्या वाक्यातील प्रत्येक वाक्यांचा अर्थ आजच्या परिस्थितीत जशाचा तसा लावण्यापेक्षा त्याम्हील मर्म जाऊन घेणे समाजहिताचे ठरेल .हिंदू हे नाव फार मोठ्या वैदिक आणि मंगल परंपरेचे सार आहे .त्यात अनेक स्थित्यंतर आली .अगदीच नवे सांगायचे तर अनिवासी भारतीयांनी सातासमुद्रापलीकडे हिंदू संस्कृती नेली .स्थानिक संस्कृतीतील चांगले विचार व आचार घेऊन नवीन अनिवासी भारतीयांची हिंदू संस्कृती अधिक परिपूर्ण केली .आजही कुटुंबव्यवस्था .शिक्षणाचे महत्व /सण व त्यामागील परंपरा जपल्या नि स्थानिक समाजात मनांचे स्थान मिळवले .तसेच सावरकरांच्या विचारामागील भावना समजून घ्याव्या. नुसता शब्दांचा काथ्याकुट करू नये असे मला वाटते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

मिपाकरांना सावरकरांच्या

अप्पा जोगळेकर
Fri, 12/10/2010 - 08:31 नवीन
मिपाकरांना सावरकरांच्या नास्तिकवादा विषयी काय वाटते? आम्ही सावरकरांचे चाहतो आहोत पण त्या बाबतीत आम्ही पूर्ण असहमत आहोत असे साधारण मत आहे का? की सावरकरांना भक्तीरस/अध्यात्म/देव ह्या गोष्टी समजल्या नाहीत असे मत आहे? सावरकरांना काय वाटत होते आणि काय पटत नव्हते यावर स्वतःची मते बनवण्याचे काही कारण दिसत नाही. आपल्याला स्वतःला काय योग्य वाटते हे अधिक महत्वाचे मानले पाहिजे. बाकी श्री. लीमाउजेट यांनी श्री. सावरकर यांचा 'विश्वाचा ईश्वर' हा अख्खा उताराच दिला असल्यामुळे सगळ्या गोष्टींवर झगझगीत प्रकाश पडलाच आहे. सावरकर नास्तीक अजीबात नव्हते. तर ते कर्मकांडाच्या विरुद्ध होते. अशी कुठलीही गोष्ट जी बुद्धीप्रामाण्याने पटत नाहि ति स्वीकारायला त्यांचा विरोध होता. सावरकरांची जगदंबेवर नितांत श्रद्धा होती. पण ती जगदंबा त्यांना मातृभूमीच्या रुपाने देखील दिसली. जसजसे दिवस पुढे सरकतात तसतसा माणसाच्या मतांमध्ये फरक पडत जातो. बालपणीचा अष्टभुजेचा उपासक पुढे अज्ञेयवादी झाला असे 'सावरकर दर्शन' या पुस्तकात वाचल्याचे आठवते. सावरकरांची धर्माविषयक मते ऐकून काही कर्मठ ब्राम्हणांनी 'जर का आज पेशवाई असती तर सावरकरांसारख्या पाखंडी सुधारकांना हत्तीच्या पायाखाली तुडवले असते' असे विधान केले होते असे वाचले आहे. हा धागा किमान अर्धशतक फटकावणार हे नक्की. अजून विकास, इंद्रराज पवार हे स्टार खेळाडू मैदानात यायचे आहेत. आलमगीराच्या सैनिकांना पाण्यात शिवाजीचा घोडा दिसायचा तसे मिसळपाव वर सगळ्यांना जिथेतिथे सावरकर दिसतात. - व्यक्तीपूजा अथवा देवपूजा न करणारा पाखंडी
  • Log in or register to post comments

सावरकरांना काय वाटत होते आणि

आमोद शिंदे
Fri, 12/10/2010 - 08:59 नवीन
सावरकरांना काय वाटत होते आणि काय पटत नव्हते यावर स्वतःची मते बनवण्याचे काही कारण दिसत नाही.
'सावरकरांना मानतो' असे म्हणणे म्हणजे काय मग? सावरकरांना काय वाटत होते, त्यांची मते काय होती ह्याच्याशी काहीही देणे घेणे असू नये असे तुम्हाला का वाटते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

'सावरकरांना मानतो' असे म्हणणे

अप्पा जोगळेकर
Wed, 12/15/2010 - 08:58 नवीन
'सावरकरांना मानतो' असे म्हणणे म्हणजे काय मग? सावरकरांना काय वाटत होते, त्यांची मते काय होती ह्याच्याशी काहीही देणे घेणे असू नये असे तुम्हाला का वाटते? म्हणजे त्यांना जे योग्य वाटत होतं तेच योग्य आहे आणि त्यांना जे अयोग्य वाटत होतं ते अयोग्य आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे काय ? पुन्हा त्यांची मते ही त्या काळाच्या अनुषंगाने बनवलेली असणार. ती मतं आजच्या काळात उपयोगी पडतीलच याची गॅरेंटी देता येत नाही. शिवाजीने कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडीचोळी देउन सन्मानाने परत पाठवले याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्पष्ट शब्दांमध्ये शिवाजीला दोष दिलेला आहे. त्यांच्या मते शत्रूच्या स्त्रियांना बटकी बनवणे, त्यांची खांडोळी करणे, आपला धर्म जबरदस्तीने शत्रूवर लादणे या सगळ्या गोष्टी शिवाजीने करायला हव्या होत्या. मला शिवाजीराजेही ग्रेट वाटतात आणि स्वा. सावरकरही आणि महात्मा गांधीही. काळा आणि पांढरा या दोन रंगांशिवाय अधेमधेही काही शेड्स असतात ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

सावरकर,गांधी, महम्मद अली जीनांनाही मानतो

चंद्रू
Sun, 12/19/2010 - 01:11 नवीन
मी सावरकर आणि महम्मद अली जीना दोघांनाही मानतो. हिंदूराष्ट्राच्या मागणी मागे सावरकरांचे जे म्हणणे होते तेच जीनांचेही होते. त्यामुळे अखेर शेवटी मुस्लिम राष्ट्र निर्माण झाले. पण दुर्दैवाने भारतात हिंदू राष्ट्र निर्माण झाले नाही. जसवंतसींग आणि आडवानी हे दोघेही सावरकरवादी असल्याकारणाने त्यांना महम्मद अली जीनांचे महत्व कळले आहे. भारतात हिंदूराष्ट्र निर्माण करायचे असेल तर सावरकरांचे तत्त्वज्ञान व जीनांचे व्यवहारी राजकारण याची कास धरायला हवी. तेव्हा सावरकरभक्तांनी मरहूम महम्मद अली जीनांचे विचार व व्यवहार यांचा जरूर अभ्यास करावा. मी सावरकर-जीनावादी असलो तरी मला मधून मधून महात्मा गांधीही आवडतात. प्रत्येक महान व्यक्तींचे आपल्याला पटतात ते थोडे थोडे विचार जरूर घ्यावेत आणि आपले मत बनवावे यात काहीच चूक नाही. जे विचार पटतात तेव्हढ्यापुरते आपण त्यांचे भक्त जे पटत नाहीत ते सोडून द्यावेत. बिन बुडाचे गाडगे असण्यात खरी मजा आहे. वाटेत तसे व वाटेल तितके गडगडायचे सुख मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

जसवंतसींग आणि आडवानी हे

आळश्यांचा राजा
Sun, 12/19/2010 - 08:06 नवीन
जसवंतसींग आणि आडवानी हे दोघेही सावरकरवादी असल्याकारणाने त्यांना महम्मद अली जीनांचे महत्व कळले आहे.
विचार करण्यासारखी टिप्पणी आहे. जिना जेवढे बदलत गेले होते, तेवढे सावरकर बदलत गेलेले नाहीत हा भागही लक्षात ठेवला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रू

'सावरकरांना मानतो' असे म्हणणे

अप्पा जोगळेकर
Wed, 12/15/2010 - 09:07 नवीन
'सावरकरांना मानतो' असे म्हणणे म्हणजे काय मग? सावरकरांना काय वाटत होते, त्यांची मते काय होती ह्याच्याशी काहीही देणे घेणे असू नये असे तुम्हाला का वाटते? म्हणजे त्यांना जे योग्य वाटत होतं तेच योग्य आहे आणि त्यांना जे अयोग्य वाटत होतं ते अयोग्य आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे काय ? पुन्हा त्यांची मते ही त्या काळाच्या अनुषंगाने बनवलेली असणार. ती मतं आजच्या काळात उपयोगी पडतीलच याची गॅरेंटी देता येत नाही. शिवाजीने कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडीचोळी देउन सन्मानाने परत पाठवले याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्पष्ट शब्दांमध्ये शिवाजीला दोष दिलेला आहे. त्यांच्या मते शत्रूच्या स्त्रियांना बटकी बनवणे, त्यांची खांडोळी करणे, आपला धर्म जबरदस्तीने शत्रूवर लादणे या सगळ्या गोष्टी शिवाजीने करायला हव्या होत्या. मला शिवाजीराजेही ग्रेट वाटतात आणि स्वा. सावरकरही आणि महात्मा गांधीही. काळा आणि पांढरा या दोन रंगांशिवाय अधेमधेही काही शेड्स असतात ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

सावरकरांनी स्पष्ट शब्दांमध्ये

आमोद शिंदे
Fri, 12/17/2010 - 02:40 नवीन
सावरकरांनी स्पष्ट शब्दांमध्ये शिवाजीला दोष दिलेला आहे. त्यांच्या मते शत्रूच्या स्त्रियांना बटकी बनवणे, त्यांची खांडोळी करणे, आपला धर्म जबरदस्तीने शत्रूवर लादणे या सगळ्या गोष्टी शिवाजीने करायला हव्या होत्या.
हे तर फारच स्फोटक आहे. माझ्यासाठी ही माहिती नविन आहे. आप्पा, ह्याच सोर्स मिळू शकेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

माझी करमणूक झाली

कवितानागेश
Fri, 12/10/2010 - 09:20 नवीन
"'सावरकरांना मानतो' असे म्हणणे म्हणजे काय मग">> मानणे याचा अर्थ आदर असणे, त्यांच्याकडून शिकणे असा होतो. ('शिकणे' म्हणजे कॉपी करणे नाही, कॉपी करुन गाणार्‍या गायकानासुद्धा आपण 'शिकला' असे म्हणत नाही, तिथे विचारांचे काय?). निस्पृह विचार व समाजाबद्दल कणव ठेउनसुद्धा परखड आणी काटेकोर नियम मांडणे, हे त्यांच्याकडून शिकावे, निरपेक्ष देशभक्ती शिकावी.... उदा: मी माझ्या आईला व आजीला पण 'पर्फेक्शनिस्ट' म्हणून मानते, पण त्यांची मते स्थलकालातित मानून हट्टानी पाळत नाही,( त्यांच्यासारखे कामाचे डोंगर उपसत नाही),शिवाय त्यांना 'मानण्याचा' इतरानाही आग्रह करत नाही. माझ्या स्वतःच्या स्वभावाप्रमाणे मला 'झेपेल' ते त्यांच्यासारखेच प्रेमानी व मनापासून करते.
  • Log in or register to post comments

हेच जाणून घ्यायचे आहे...

आमोद शिंदे
Sun, 12/12/2010 - 21:45 नवीन
उदा: मी माझ्या आईला व आजीला पण 'पर्फेक्शनिस्ट' म्हणून मानते, पण त्यांची मते स्थलकालातित मानून हट्टानी पाळत नाही
छान उदाहरण. सावरकरांविषयीही तुमचे हेच मत आहे का? त्यांची देवाविषयीची मते स्थलकालातित आहेत म्हणून असहमत? की आणखी काही..हेच जाणून घ्याचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

कालपरवाच सावरकरांचे समग्र

पाषाणभेद
Fri, 12/10/2010 - 10:04 नवीन
कालपरवाच सावरकरांचे समग्र साहित्य एका कोण्या वेबसाईटवर प्रकाशीत झालेले आहे. savarakara........com असली काहीतरी वेबसाईट आहे. .com आहे एवढे नक्की. कुणीतरी शोधा अन सांगा.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा