(२६/११ चा मुहूर्त टळून गेल्यावर) वाराणसीत झालेला स्फोट.........

गांधीवादी's picture
गांधीवादी in काथ्याकूट
8 Dec 2010 - 8:35 am
गाभा: 

दहशतवाद्यांनी नेहमीप्रमाणे संवेदनशील भागांना लक्ष्य करून आपले काम साधले(?). आता पुन्हा एकदा निषेध, मेणबत्त्या, संरक्षण, हे सर्व शब्द पुढची पंधरा दिवस ऐकायला मिळेल. नेहमीप्रमाणे आपले माननीय पंतप्रधान चिंता व्यक्त करून कठोर कारवाई करण्याचे आदेश देतील. दहशतवादी काही पकडले जाणार नाहीत आणि (आपलेच काही हिरे गमावून) पकडले गेलेच तरी २०/२५ वर्षे आरामात तुरुंगात खातपीत आयुष्य काढतील. नेहमीप्रमाणे लवकरच जनता सगळे विसरून पुढच्या स्फोटाची वाट बघण्यास सज्ज होईल. तो स्फोट लोकल मध्ये, रेल्वे स्टेशनावर, बागेत, उपहारगृहात, गर्दीत, शाळेत, कि एखाद्या धार्मिक स्थळावर होईल ते सांगता येत नाही.

एव्हाना 'प्रत्येक स्फोटात १००-२०० जरी गेले तरी ह्या महान भारताला काही फरक पडत नाही', हे 'त्या' दहशतवाद्यांना समजायला हवे होते. १०/१२ हजार लोक जो पर्यंत मरत नाहीत तो पर्यंत त्यांना काय कोण गंभीर घेत नाही. त्यात कोणाचा नंबर लागणार हे मात्र देवालाच आणि त्या दहशतवाद्यांनाच ठाऊक. 'काहीही झाले तरी माझा नंबर न लागो' हाच प्रत्येक व्यक्ती आपापल्या जागी बसून विचार करत असेल. आणि नंतर ज्यांचे आप्त स्वकीय गेले कि त्यानां थोडीफार आर्थिक मदत करून आणि श्रद्धांजली वाहून आम्हाला आमचे 'कर्तव्य पार पडल्याचे' समाधान होते.

धन्य तो देश. आणि धन्य त्या देशाचे राज्यकर्ते.

'पुढच्या स्फोटात आपला नंबर लागला तर आपल्या मुलाबाळांचे कसे होईल ?' हा विचार करून त्याच्या भविष्याची चिंता करत असलेला, किंवा 'मुलाबाळांचेच काही बरेवाईट झाले तर आपला पुढे जगण्याचा आधार काय ?' हा विचार करत बसलेला 'मी'(एक सामान्य व्यक्ती).

प्रतिक्रिया

चिंतामणी's picture

8 Dec 2010 - 9:24 am | चिंतामणी

६/१२ साठी होता.

हे वाचा.

"इंडियन मुजाहिदीन' या दहशतवादी गटाने हा स्फोट घडविल्याचा दावा काही प्रसिद्धिमाध्यमांकडे "ई-मेल' पाठवून केला. बाबरी मशीद पाडल्याचा सूड उगविण्यासाठी हे कृत्य केल्याचा दावा "ई-मेल'मध्ये करण्यात आला आहे

http://72.78.249.124/esakal/20101207/5203424300892137496.htm

बाकी "पंतप्रधानांकडून चिंता व्यक्त" इत्यादी सोपस्कार आहेतच त्या बातमीत.

भगवा दहशतवाद (काहींच्या मते) आणि भगव्याविरुद्धचा दहशतवाद यातुन भारताची कधी सुटका होणार?

परिकथेतील राजकुमार's picture

8 Dec 2010 - 11:06 am | परिकथेतील राजकुमार

भगवा दहशतवाद (काहींच्या मते) आणि भगव्याविरुद्धचा दहशतवाद यातुन भारताची कधी सुटका होणार?

श्री. अवलिया आपण टॅक्स वगैरे भरत नसल्याने आपण असल्या विषयात दखल देऊ नये.

राडेबाजविरोधक

वेताळ's picture

8 Dec 2010 - 11:07 am | वेताळ

ह्याचा प्रतिसोध म्हणुन सनातन वाले सुतळी बॉम्ब कुठल्यातरी पडीक थिअटर बाहेर फोडतील.

आणि त्याचे भांडवल करुन मुळचा बॉम्बस्फोट विचारवंत सोईस्कररित्या विसरतील !

वेताळ's picture

8 Dec 2010 - 11:18 am | वेताळ

जहाल हिंदुत्ववाद्याना निधी कमी पडतो आहे.तसेच त्याना उकसवणारे त्याची डोकी भरवुन आपण स्वःता एसीत बसुन अफगान पिस्ते व सौदीची खजुर खात बसतात. त्यात हे जहालवादी इतर देशात जावुन स्फोट करायचे सोडुन आपल्याच घरातील भांडी फोडत बसतात.

खरं आहे.. काय करता येईल यावर एक लेख येउ द्या ! आपण छापवुन आणु सगळीकडे ;)

गांधीवादी's picture

8 Dec 2010 - 5:00 pm | गांधीवादी

नुकतेच माननीय केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज स्पष्ट केले कि 'उत्तर प्रदेश सरकारला दशाश्‍वमेध घाटावर अतिरेकी हल्ला होण्याची शक्‍यता असल्याचा इशारा गेल्या २५ फेब्रुवारी (नऊ महिने अगोदर) रोजीच देण्यात आला होता.'

हे दहशतवादी सुद्धा किती हुशार आहेत, कुठेकुठे हजार ठिकाणी हल्ला करणार ते अगोदरच कळवून ठेवतात, आणि नेमका मुहूर्त चुकवून एखाद्याच ठिकाणी हल्ला करतात. ठेवा कुठेकुठे संरक्षण ठेवतात ते.
भारतात अशी लाख्खो ठिकाणे आहेत कि जिथे पुढील एक वर्षात अतिरेकी हल्ला होऊ शकतो. कुठेकुठे ठेवणार संरक्षण.

सरकारला हे कधी समजणार कि अतिरेकी हल्ल्यांपासून संरक्षण देणे यापेक्षा हि कीड नाहीशी कशी होईल याचा विचार करणे जास्त महत्वाचे आहे.

वा 'गांधीवादी'! लेखही छान आणि प्रतिसादही छान.
हे हल्ले म्हणजे भूकंपासारखे आहेत. एकाद्या ठिकाणी होणार-होणार हे माहीत असते. जागा माहीत असते पण कधी होणार हे कळत नाहीं त्यामुळे इशारे निरुपयोगी ठरतात!

चिंतामणी's picture

8 Dec 2010 - 11:53 pm | चिंतामणी

हे पहा केंद्रिय गृहमंत्र्यांचे वक्तव्य.

http://timesofindia.indiatimes.com/videoshow/7065976.cms

उ.प्र.सरकारला दोष देत आहेत झाल्या प्रकाराबद्दल.

यांची [म्हणजे केंद्र सरकारची] जबाबदारी नाही हे दाखवायचा केवीलवाणा प्रयत्न वाटला.

येथे वाचालया मीळेल.

वाराणसीत पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच स्फोट

http://72.78.249.124/esakal/20101208/4837353062114613313.htm