मागील आठवड्यात बासुंदी करायचे ठरवले...कृती माहित नसल्याने तयार बासुंदी मिक्स
वापरले...पण म्हणावी तशी टेस्टी नाही झाली बासुंदी...जर कुणी मिपाकर खवा बासुंदीची कृती जाणत असेल तर ...कृपया मदत करावी...
साधारण ४- ५ लिटर दुध घ्यावे (म्हशीचे, फुल क्रीम).
एका पसरट कढईत गॅसवर उकळायला ठेवावे, कढइ जितकी मोठी व पसरट तितके चांगले, दुधाला उकळी फुटली की गॅस कमी करावा, आणि एका उचटनीने किंवा झार्याने मधे मधे हलवाले, हवे तर कढइत खाली काही चमचे टाकावे म्हणजे दुध लागत नाही, दुध थोडेसे लागतेच, तेंव्हा न घाबरता ते खरडुन काढावे. ते शिजुन एकजीव होते. साय धरु देवु नये. हळुहळु दुध तांबुस होते. दुध आटुन अर्धे झाले (तिन-चार तास) की चवीनुसार साखर टाकावी. तसेच दुधाचा मसाला व इतर गोष्टी आवडीनुसार टाकाव्या. थंड करुन वाढली तर छान घट्ट लागते, मला थंड बासुंदी नुस्ती खायला आवडते, काहींना गरमागरम पुरीबरोबर आवडते.
दुसरा शॉर्ट्कट म्हणजे दोन लिटर दुधात अर्धा किलो खवा टाकुन अर्धा तास शिजवावे, पण पहिल्या प्रकारची चव या प्रकाराला येत नाही.
नरसोबाच्या वाडीला बासुंदी चांगली मिळते, पण तिथे मोठ्या कढईत- मोठ्या आचेवर बासुंदी आटवतात,
रबडी हा प्रकार (म्हणजे घट्ट आटवलेली बासुंदी) खावा तर नरसोबाच्या वाडीचाच. तिथे खवा न घालता
बासुंदी बनवतात.
आम्ही गेलो की फक्त बासुंदीवरच ताव मारतो....
दोन जाड बुडाच्या नॉनस्टिक पॅनमध्ये दोन-तीन वाट्या दूध धालून आटवावे.आवडीनुसार दाट आटल्यावर ते काढून ठेवावे व आणखी थोडे दूध आटवावे. (मी १/३ होईपर्यंत तरी आटवते.) असे सर्व दूध आटवून झाले की साखर घालून पुन्हा सर्व एकत्र किंचित आटवावे.
केशर - वेलची पूड इ. बासुंदी जराशी निवल्यावर घालावे. चारोळी घालायची असल्यास तुपात हलकी तळून वेगळी ठेवावी आणि खाण्याच्या थोडी आधी मिसळावी.
लोखंडी कढईतली बासुंदी अतिशय खमंग आणि छान रंगाची होते, पण नवीन शिकताना सवय नसेल तर हमखास दूध खाली लागते. नॉनस्टिक पसरट भांड्यात दूध लागण्याची शक्यता खूप कमी असते त्यामुळे एकाच वेळी दोन भांड्यांत दूध आटवणे सोपे होते. थोडे- थोडे आटवायलाही वेळ तेवढाच लागतो, पण दोन भांड्यामुळे एकूण दूध निम्म्या वेळात आटवून होते. ही बासुंदी देखील चवदार खमंग लागते.
थोडे थोडे आटवण्याचा फायदा हा की एखाद्या वेळी चुकून दूध खाली जळले तरी तेवढा घाणा काढून टाकता येतो. सर्व दुधाला जळका वास लागत नाही. ( सर्व दूध एकदम आटवताना जर खाली लागले तर बहुतेक वेळा तो वास संपूर्ण दुधाला लागतो. जळकी खरवड काढून टाकली, वरून कितीही केशर घातले तरी तो जळकट वास खाताना डोके वर काढतोच).
मात्र भांड्यांचे नॉनस्टिक आवरण झिजलेले, चरे इ. पडलेले नसावे. (मी दूध आटवण्याचे भांडे वेगळे ठेवते) जर रोजच्या वापरातले भांडे असेल तर त्यात आधी केलेल्या उग्र चवीच्या पदार्थाचा वास शिल्लक राहिला नाही ना हे बघावे. दुधात वास सहज शोषले जातात.
लोखंडी कढई वापरायची असेल तर ती पांढरट दिसेपर्यंत घासावी अन्यथा बासुंदी बिघडू शकते.
दूध आटवता आटवता अखेरीस अगदीच कंटाळा आला तर एक लीटरला एक चमचा ह्या प्रमाणात तांदळाची बारीक पिठी गार दुधातून लावावी म्हणजे पटकन दाटपणा येतो. (पण अर्थातच ती निर्भेळ बासुंदी नाही.)
प्रतिक्रिया
5 Dec 2010 - 2:11 pm | पर्नल नेने मराठे
अग म्रुगजळ... अगदी सोपे आहे.
दुध आटव, त्यात साखर, चारोळ्या, केशर, वेलची घाल.
मी परवाच केली होती. त्यात मी सिताफळाचा गर घातला होता. सिताफळ बसुन्दी तयार ;)
5 Dec 2010 - 2:27 pm | अवलिया
सीताफळाचा गर कुठला ? बी च्या आतला की बाहेरचा?
5 Dec 2010 - 4:55 pm | शैलेन्द्र
बासुंदीची पाकृ ( पाच लोकांसाठी)
साधारण ४- ५ लिटर दुध घ्यावे (म्हशीचे, फुल क्रीम).
एका पसरट कढईत गॅसवर उकळायला ठेवावे, कढइ जितकी मोठी व पसरट तितके चांगले, दुधाला उकळी फुटली की गॅस कमी करावा, आणि एका उचटनीने किंवा झार्याने मधे मधे हलवाले, हवे तर कढइत खाली काही चमचे टाकावे म्हणजे दुध लागत नाही, दुध थोडेसे लागतेच, तेंव्हा न घाबरता ते खरडुन काढावे. ते शिजुन एकजीव होते. साय धरु देवु नये. हळुहळु दुध तांबुस होते. दुध आटुन अर्धे झाले (तिन-चार तास) की चवीनुसार साखर टाकावी. तसेच दुधाचा मसाला व इतर गोष्टी आवडीनुसार टाकाव्या. थंड करुन वाढली तर छान घट्ट लागते, मला थंड बासुंदी नुस्ती खायला आवडते, काहींना गरमागरम पुरीबरोबर आवडते.
दुसरा शॉर्ट्कट म्हणजे दोन लिटर दुधात अर्धा किलो खवा टाकुन अर्धा तास शिजवावे, पण पहिल्या प्रकारची चव या प्रकाराला येत नाही.
5 Dec 2010 - 10:07 pm | आशिष सुर्वे
बासुंदी......मदत हवी आहे...
शीर्षक वाचून वाटले की बासुंदी......'खायला' मदत हवी आहे...
ट्रंक भरतच होतो तेवढ्यात 'मायना' वाचला.. अन् मग बेत रद्द केला.. :)
5 Dec 2010 - 10:19 pm | निवेदिता-ताई
नरसोबाच्या वाडीला बासुंदी चांगली मिळते, पण तिथे मोठ्या कढईत- मोठ्या आचेवर बासुंदी आटवतात,
रबडी हा प्रकार (म्हणजे घट्ट आटवलेली बासुंदी) खावा तर नरसोबाच्या वाडीचाच. तिथे खवा न घालता
बासुंदी बनवतात.
आम्ही गेलो की फक्त बासुंदीवरच ताव मारतो....
5 Dec 2010 - 10:41 pm | शैलेन्द्र
नाही हो ताई, रबडी खावी तर मथुरा- इंदोरची...
6 Dec 2010 - 12:01 am | रेवती
वाडीचीही बासुंदी छान असते हो पण तिथे गरमागरम पुर्या नसल्यामुळे मी ताव नाही मारू शकत.;)
6 Dec 2010 - 11:03 pm | शैलेन्द्र
मी रबडी म्हणालो, बासुंदी नाही...
उत्तरेत बासुंदी मिळतच नाही, नाही म्हनायला गुजरातेत दुध्पाक नावाचा एक नापाक पदार्थ मिळतो.. याक्क्क,,,,,
पण रबडी.... मथुरा- वृन्दावन किंवा इंदोरचीच....
5 Dec 2010 - 10:59 pm | चिंतामणी
वाडीच्या बासुंदीला तोड नाही.
5 Dec 2010 - 10:26 pm | रेवती
कृपया खवा घातलेली बासुंदी करू नका. त्याला खरी बासुंदी म्हणवत नाही.
दूध निम्मे आटवून केलेली बासुंदी चांगली लागते.
5 Dec 2010 - 11:01 pm | चिंतामणी
दूध निम्मे आटवून केलेली बासुंदी चांगली लागते.
खवा घालुन बासुंदी करणे म्हणजे शॉर्टकट. त्याला आटवलेल्या बासुंदीची चव म्हणजे खमंगपणा येत नाही.
6 Dec 2010 - 12:02 am | रेवती
खमंगपणा येत नाही.
भयंकर सहमत!
6 Dec 2010 - 4:30 pm | स्पंदना
रेवतीशी अजस्त्र सहमत!
5 Dec 2010 - 10:34 pm | निवेदिता-ताई
रेवती.............तु़झे मताशी मी सहमत आहे.
6 Dec 2010 - 6:30 am | शहराजाद
दोन जाड बुडाच्या नॉनस्टिक पॅनमध्ये दोन-तीन वाट्या दूध धालून आटवावे.आवडीनुसार दाट आटल्यावर ते काढून ठेवावे व आणखी थोडे दूध आटवावे. (मी १/३ होईपर्यंत तरी आटवते.) असे सर्व दूध आटवून झाले की साखर घालून पुन्हा सर्व एकत्र किंचित आटवावे.
केशर - वेलची पूड इ. बासुंदी जराशी निवल्यावर घालावे. चारोळी घालायची असल्यास तुपात हलकी तळून वेगळी ठेवावी आणि खाण्याच्या थोडी आधी मिसळावी.
लोखंडी कढईतली बासुंदी अतिशय खमंग आणि छान रंगाची होते, पण नवीन शिकताना सवय नसेल तर हमखास दूध खाली लागते. नॉनस्टिक पसरट भांड्यात दूध लागण्याची शक्यता खूप कमी असते त्यामुळे एकाच वेळी दोन भांड्यांत दूध आटवणे सोपे होते. थोडे- थोडे आटवायलाही वेळ तेवढाच लागतो, पण दोन भांड्यामुळे एकूण दूध निम्म्या वेळात आटवून होते. ही बासुंदी देखील चवदार खमंग लागते.
थोडे थोडे आटवण्याचा फायदा हा की एखाद्या वेळी चुकून दूध खाली जळले तरी तेवढा घाणा काढून टाकता येतो. सर्व दुधाला जळका वास लागत नाही. ( सर्व दूध एकदम आटवताना जर खाली लागले तर बहुतेक वेळा तो वास संपूर्ण दुधाला लागतो. जळकी खरवड काढून टाकली, वरून कितीही केशर घातले तरी तो जळकट वास खाताना डोके वर काढतोच).
मात्र भांड्यांचे नॉनस्टिक आवरण झिजलेले, चरे इ. पडलेले नसावे. (मी दूध आटवण्याचे भांडे वेगळे ठेवते) जर रोजच्या वापरातले भांडे असेल तर त्यात आधी केलेल्या उग्र चवीच्या पदार्थाचा वास शिल्लक राहिला नाही ना हे बघावे. दुधात वास सहज शोषले जातात.
लोखंडी कढई वापरायची असेल तर ती पांढरट दिसेपर्यंत घासावी अन्यथा बासुंदी बिघडू शकते.
दूध आटवता आटवता अखेरीस अगदीच कंटाळा आला तर एक लीटरला एक चमचा ह्या प्रमाणात तांदळाची बारीक पिठी गार दुधातून लावावी म्हणजे पटकन दाटपणा येतो. (पण अर्थातच ती निर्भेळ बासुंदी नाही.)
6 Dec 2010 - 1:17 pm | शिल्पा ब
हे वाचल्याने एकदम डोहाळे लागून आज बासुंदी केली :)
6 Dec 2010 - 1:44 pm | अवलिया
बाप रे ! हनुमानाच्या वर ताण !!
6 Dec 2010 - 1:50 pm | परिकथेतील राजकुमार
वारलो !!!
बासुंदीध्वजाच्या प्रतिक्षेत...
6 Dec 2010 - 2:48 pm | राजेश घासकडवी
आणि इथे घामाचे थेंब वगैरेही नसून निव्वळ मृगजळ आहे... :)
6 Dec 2010 - 4:36 pm | धमाल मुलगा
अरे बासुंदीध्वज काय, मृगजळ काय?
6 Dec 2010 - 8:46 pm | स्वच्छंदी_मनोज
हाताशी मोकळा वेळ, रविवार दुपार आणी झोपमोड होणार नाही याची खात्री असल्याशीवाय मी बासुंदीच्या वाटेला जातच नाही
7 Dec 2010 - 12:14 am | अविनाशकुलकर्णी
बासुंदी ची बशी पण मिळते ति दुधात टाकली कि दुध उतु न जाता आटत रहाते....
पण चितळ्यांची बासुंदी वा मथुरा भवन ची राबडी चांगली