नमस्कार ,
आमच्या शिरगाव हायस्कूल शिरगाव मधिल मुलांना संगणक शिक्षण मागील काही वर्षा पासून देण्यात येत आहे. गेल्या वर्षा पासून इंग्लंड मधिल न्यु कसल विद्यापीठा मार्फत सोल नावाचा प्रकल्प सुरू कर्ण्यात आला आहे. या प्रकल्पात विद्यार्थ्याना परदेशातील शिक्षकांकडून शिकवले जाते असा हा भारतातील ८ वा तर महाराष्ट्रातील १ ला प्रकल्प आहे. यात आमच्या शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत ची ६०० मुले शिक्षण घेत आहेत. आमच्या शाळेतील मुलांनां दिल्या जाणा-या शिक्षणाची दखल बी बी सी या दुरदर्शन वाहीनीने घेतली. आणी आमच्या या मुलांनी माहीती तंत्रज्ञानाचा वापर करून घेत असलेले शिक्षण चित्रीत केले. १ तासा चा कार्यक्रम बी बी सी २ या वाहीणीवर २६ नोव्हेंबर रोजी प्रसारीत करण्यात आला. आमच्या मुला,चे खुप कॉऊतुक करण्यात आले.आज आमच्या या ग्रामिण भागातील शाळेत दिले जाणारे शिक्षण आम्हाला अभिमानाचे आहे व इतर शाळांतील शिक्षंकाना आदर्शवत आहे.
आमची ही मुले स्काईप चा वापर करून परदेशातील शिक्षंकाशी आपल्या अभ्यासातील अडीअडचणी सोडवतात तर नवनवीन गोष्टी शिकतात. काही शिक्षक अमेरीकेतून तर काही इंग्लंड मधुन शिकवतात . शिक्षक हा नेहमी विद्यार्थी असला पाहीजे व मी ही तेच करतोय जगातील शिक्षकांकडून नवनवीन शिकवीण्याच्या पद्द्ती शिकत आहे अमेरीकन इंग्रजी व ब्रीटीश इंग्रजी मला भारतात माझ्या शाळेत बसून शिकता येत आहे व माझ्या शालेतील मुलेही शिकत आहेत. आम्ची मुले परदेशातील या शिक्षकांना आपली संस्क्रुती शिकवत आहेत. या माहीती तंत्रज्ञाना मुळे जग अगदी माऊस च्या एका क्लिक वर आले आहे.
मला नक्की असे वाटते की आमच्या शाळेतील मुलांची प्रगती ही शहरातील शाळेत शि़षण घेणा-या मुलांपेक्षा सरस आहे. आज मी माझ्या विद्यार्थाना ग्रुहपाठ हे गुगल ग्रुप च्या मदतीने देतो तर मुलेही ते आन लाईन सोडऊन मला सादर करतात आज आमच्या प्रत्य्क मुला कडे इ मेल पत्ता आहे.
आपण माझ्या या शाळेस नक्की भेट द्यावी व आमच्या मुलांचा हुरूप वाढवावा.
या सर्व गोष्टी मूळॅच आमची शाळा बी बी सी वर झळाकली
शिरगाव ची मुले बी बी सी वाहीणी वर
गाभा:
प्रतिक्रिया
1 Dec 2010 - 9:54 pm | गणेशा
आपल्या शाळेस भेट देण्यास नक्की आवडेल ..
लिहिलेली माहीती ही खुप छान आहे.
मला बी.सी.एस. ला गेल्यावरच संगणकावर बसता आले होते (आधी कसलाच क्लास केला नव्हता अआणि शाळा खुप छान होती पण संगणक प्रशिक्षण त्यावेळेस नगण्य होते)...आणि मग कसे टाइप करायचे हे त्यापुढे शिकलो.
आपल्या मुलांची ही प्रगती पाहुन आनंद वाटला ..
2 Dec 2010 - 5:41 am | गांधीवादी
आपल्या शाळेस भेट देण्यास नक्की आवडेल ..
असेच म्हणेन.
शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी प्रोत्साहन देणारा प्रकल्प.
1 Dec 2010 - 11:03 pm | यकु
अत्तार गुर्जींचे अभिनंदन!
क्लिप नाही का बीबीसीवरची?
अवांतरः तुमच्या विद्यार्थ्यांना मिसळगावच्या सहलीला आणा ना एकदा.
1 Dec 2010 - 11:05 pm | सुनील
अगदी मनापासून अभिनंदन!
1 Dec 2010 - 11:11 pm | विलासराव
आपले आणी आपल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन.
1 Dec 2010 - 11:15 pm | संकेत
अभिनंदन - शाळेचे, गुर्जींचे आणि विद्यार्थ्यांचे.
1 Dec 2010 - 11:33 pm | क्रेमर
आत्तारसरांच्या कामाचे नेहमीच कौतुक वाटते. तुम्हा सर्व संबंधितांचे अभिनंदन. कृपया नवीन उपक्रमांची माहिती मिपावर देत रहावी.
2 Dec 2010 - 2:02 am | बिपिन कार्यकर्ते
पूर्ण सहमत.
2 Dec 2010 - 10:28 pm | प्रियाली
+१.
मुले, शिक्षक, शाळा सर्वांचे अभिनंदन.
1 Dec 2010 - 11:36 pm | प्राजु
खूप खूप अभिनंदन! मुलांचे आणि शाळेतल्या शिक्षकांचे सुद्धा! :)
2 Dec 2010 - 12:10 am | शुचि
कौतुकास्पद!!!
2 Dec 2010 - 7:23 am | मिसळभोक्ता
श्री. अत्तार सर,
सिस्टर सिटी च्या धरतीवर आमच्या शिक्षणविषयक संस्थेतर्फे मी एक सिस्टर स्कूल हा कार्यक्रम सुरू करतो आहे. कृपया आपल्याशी संपर्क साधण्यासाठी योग्य वेळ तसेच संपर्क क्रमांक व्यनीतून कळवाल का ?
धन्यवाद.
3 Dec 2010 - 8:58 am | मिसळभोक्ता
अत्तार सर, धन्यवाद. आपला नंबर मिळाला, जानेवारीत आमच्या शाळेची मीटिंग होईल तेव्हा आपल्याला आमच्या शाळेचे प्रिन्सिपॉल फोन करतील. त्या आधी मी आपल्याशी बोलून सिस्टर-स्कूल स्कीमविषयी चर्चा करेन.
2 Dec 2010 - 8:40 am | मदनबाण
वा... आनंद वाटला. :)
आपल्या या कामाचे खूप कौतुक वाटले आणि मुलांचे सुद्धा.
असेच नव नविन प्रकल्प आपण राबवावे हीच सदिच्छा व्यक्त करतो...
अवांतर :--- हल्लीच क्रांती शहा यांचे विचार ऐकायची संधी मिळाली होती ;त्यांची या लेखामुळे परत आठवण आली.
http://en.wikipedia.org/wiki/Kranti_Shah
2 Dec 2010 - 9:11 am | शिल्पा ब
मनापासुन अभिनंदन.
2 Dec 2010 - 11:37 am | अब् क
मनापासुन अभिनंदन.!!!!!!!
2 Dec 2010 - 12:20 pm | यशोधरा
अर्रे वा! मस्त बातमी! सर्वांचे मनापासून अभिनंदन! :)
2 Dec 2010 - 2:39 pm | प्राजक्ता पवार
मनापासून अभिनंदन :)
2 Dec 2010 - 2:40 pm | प्राजक्ता पवार
मनापासून अभिनंदन :)
2 Dec 2010 - 9:42 pm | अविनाशकुलकर्णी
मनापासून अभिनंदन
3 Dec 2010 - 7:41 am | रेवती
आपले आणि आपल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन!
तुम्ही नेहमीच मुलांसाठी तळमळीने काम करताना दिसता.
3 Dec 2010 - 9:01 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू