अवचट आणि मी

मिसळभोक्ता's picture
मिसळभोक्ता in काथ्याकूट
30 Nov 2010 - 9:04 am
गाभा: 

सर्व मिपाकरांना सूचित करण्यात येते आहे की, श्री अनिल अवचट आणि आम्ही ह्यांचा काहीही संबंध नाही.

आदरणीय नंदन ह्यांनी आम्हाला प्रदान केलेले एक अवचटांचे पुस्तक आम्ही वाचलेले आहे, ते आम्हाला आवडले देखील.

पण त्याव्यतिरीक्त आम्ही समाजाची कुठलीही सेवा केलेली नाही.

आम्ही मध्यमवर्गीय असे स्वतःला समजत असलो, तरी साबुदाण्याची खिचडी खाणे आम्हाला नेहमी जमतेच असे नाही, आणि गरम पाण्याची बादली गेली सतरा वर्षे पाहण्याची पाळी देखील आमच्यावर आलेली नाही.

असो. मध्यमवर्गीयांवर आमचा फारसा रागही नाही, लोभही नाही.

मुळात आम्ही कुठल्या वर्गात, तेदेखील आम्हाला अद्याप उमजलेले नाही.

कारण सो कॉल्ड मध्यमवर्गीय ज्याला पापे समजतात, (म्हणजे उच्च आणि कनिष्ठ वर्गीयांनी केलेली कृत्ये) ती सर्व आम्ही केलेली आहेत.

आमच्या कार्पेट खाली कचराच नाही, कारण आमच्याकडे हार्ड वूड फ्लोअर आहे.

आम्ही गाणे ऐकताना गाणेच ऐकतो. गायकाला/गायिकेला कुठल्या विद्यापीठाने सो कॉल्ड पदवी दिलेली आहे, ते बघत बसत नाही.

पण आमच्या आवडत्या गायकाला अगदी पुणे विद्यापीठाने पी एच डी दिली असली तरी आम्ही त्याचा अपमान करत नाही.

असो.

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

30 Nov 2010 - 9:50 am | स्पंदना

काय ? कुठ ? कधी? कस? कुणाबरोबर? का?

मिसळभोक्ता's picture

30 Nov 2010 - 10:11 am | मिसळभोक्ता

आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत, आणि बाम्गडा खात नाही आनी भांगडा करत नाही !

तेव्हा आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतीलच.

(खरे सांगायचे, तर शार्क च्या तोंडात कोंबा तुमचे मसाले. मग बघू तुमची शक्ती !)

अवचटांचा अन बांगड्यांचा काय संबंध?

अन सुग्रण शक्तीचे प्रयोग करते अस कुणी सांगितल बाई तुम्हाला?

शार्क खाल्ला जात नाही अस वाटत का तुम्हाला?

बांगडा न खाताही भांगडा करता येतो हे ही माहित नाही का तुम्हाला?

मी प्रश्न उपस्थित केलेत ते उत्तरा साठी नाही हे मी सांगितल तर पटेल का तुम्हाला?

मिसळभोक्ता's picture

30 Nov 2010 - 10:46 am | मिसळभोक्ता

श्रीमती अपर्णाताई,

आदरणीय अक्षयमहोदयांना आमच्याबरोबर जरा "बसू द्या". मग आपण बोलू. चालेल?

स्पंदना's picture

30 Nov 2010 - 11:19 am | स्पंदना

मिभोकाका ( म्हणु ना काका? ) मला सौभाग्यवती म्हणावे हे मी सांगावे का तुम्हाला?

'बसु द्या' या शब्दाचा अर्थ कळेल का आम्हाला?

काय आहे 'अती' वाचनाने प्रत्येक शब्दाच्या 'छटा' समजुन घेतल्या शिवाय आदरणिय व्यक्ती कशाबरे 'बसु' शकतील हे समजेल का तुम्हाला?

आता वरील लेखात ' मध्यमवर्गियांनी जे करु नये ते सर्व आम्ही केले असे ' तुम्हीच म्हंटल्याने हा प्रश्न उपस्थीत होतो हे ही समजुन घ्याल ना तुम्ही?

जरी भासे अवांतर तरी हरेक प्रश्न लेखा उद्देशुन!

आवांतरः- नको असतील तर काढुन घेइन , पण बी पी नका वाढवुन घेउ. आम्ही मध्यम वर्गिय सुग्रणी सार्‍यांच्याच प्रकृतीची काळ्जी करतो.

विजुभाऊ's picture

1 Dec 2010 - 6:22 pm | विजुभाऊ

या पुढचा लेख बहुतेक
" टिळक गेले , गांधी गेले,,, मी देखील आजारी आहे"
अशा शीर्षकाचा असणार बहुतेक

राजेश घासकडवी's picture

30 Nov 2010 - 9:51 am | राजेश घासकडवी

मला उच्चमध्यमवर्गीयांचं एक व्यवच्छेदक लक्षण ठाऊक आहे. भेटलं की केलेल्या प्रवासाबद्दल किंवा खाल्लेल्या पदार्थांबद्दल बोलत राहायचं! आजारी मनाचं लक्षण आहे ते किंवा सारी कामप्रेरणा नष्ट झाल्याचं.

या विधानानुसार तुम्ही न-उच्चमध्यमवर्गीय. कारण तुम्ही न-खाल्लेल्या खिचडीबद्दल व न-केलेल्या नॉर्थ कॅरोलायनाच्या प्रवासाबद्दल बोलता. कसलं लक्षण आहे हे तुम्हीच ठरवा.

“अगं माझ्या बायो, जर ते इतकं सुंदर आहे तर एंजॉय कर आणि गप बस की. ट्विट करून जगापाशी बोंबलतेस याचा अर्थ आतूनच काहीतरी चुकलंय!”.

हाच निष्कर्ष तुम्हाला का लावू नये?

बाकी त्या लेखिकेची निष्कर्ष काढताना वाटेल ते निकष लावण्याची ष्टाइल आवडली. उगाच तुमची मध्यमवर्गीय सामान्यज्ञानी, तर्काने लडबडलेली मानसिकता नाही.

जे असुंदर आहे त्याच्या डोळ्यांत डोळा घालून पाहायचं एकदा का भयापोटी नाकारलं की मग सर्व गोष्टिंना सरसहा चांगलं म्हणणारा पोस्टमेनॉपॉझल समाजवाद हीच काय ती बुडत्याची काडी!

आधी तुम्ही प्री/पोस्ट मेनॉपोझल व स/किंवा नुसतेच माजवादी या कॉंबिनिशनपैकी काय ते सांगा मग तुम्ही बुडते की नाही व तुम्हाला काडी मिळणार की नाही हे ठरवता येईल.

मिसळभोक्ता's picture

30 Nov 2010 - 10:04 am | मिसळभोक्ता

सारी कामप्रेरणा नष्ट झाल्याचं.

कॉलिंग निष्क्रीय (?) नगरीनिरंजन...

हाच निष्कर्ष तुम्हाला का लावू नये?

ब्लॉग इज अ लार्ज ट्वीट. त्यामुळे हाच निष्कर्ष ज्ञानदा (ताई म्हणयचं जिवावर येतंय) ला का लाऊ नये ?

खरं सांगू का ?

पुलंनी असा मी असा मी मध्ये आपल्या आई वडिलांच्या मध्यमवर्गीय जनरेशनची जी वाट लावली त्यामुळे मी त्यांना हीरो समजत होतो.नंतर बाबा आमटे वगैरे सीता/राम इत्यादि मध्यमवर्गीय देवतांच्या भंजकांचा फ्यान झालो, आणि आता अवचटांचा होऊ इच्छित होतो, तेवढ्यात ज्ञानू ताईंनी हे सगळे मध्यमवर्गीय अशी "चेतावनी" दिली. त्यामुळे मी ती घेतली.

आता मी कुठलाही वर्गीय नाही. आता ध्येय एकच. ज्ञानदा देशपांडेंना त्या देशस्थ ऋग्वेदी का यजुर्वेदी हे विचारायचे. ऋग्वेदी असतील तर काहीच मज्जा नाही, हे नक्की !

राजेश घासकडवी's picture

30 Nov 2010 - 10:27 am | राजेश घासकडवी

ब्लॉग इज अ लार्ज ट्वीट. त्यामुळे हाच निष्कर्ष ज्ञानदा (ताई म्हणयचं जिवावर येतंय) ला का लाऊ नये ?

स्टॅंड इन द लाइन. अदिती यांनी तो प्रश्न तिथल्या तिथे विचारला पण उत्तर मिळालेलं नाही.

बाकी साईझ मॅटर्स! त्यांचा लेख काहीतरी परिच्छेद घालून लांबलचक तरी केलेला होता. मी प्रश्न तुमच्या ट्वीटसदृश लेखावर विचारला होता!

तेवढ्यात ज्ञानू ताईंनी हे सगळे मध्यमवर्गीय अशी "चेतावनी" दिली. त्यामुळे मी ती घेतली.

वर्गांच्या व्याख्या बदलत असतात मिष्टर. तुम्ही मध्यमवर्ग सोडलात, पण दरम्यान मध्यमवर्गाने लय फाष्ट प्रगती करून तुम्हाला गाठलं सुद्धा! रेड क्वीन्स रेस का काय म्हणतात ना, ते हेच. आणि तसं म्हटलं तर बहुतेकांच्या वर कोणी तरी असतो व खाली कोणीतरी असतो. तेव्हा सगळेच मध्यमवर्गीय.

नगरीनिरंजन's picture

3 Dec 2010 - 6:36 am | नगरीनिरंजन

>>सारी कामप्रेरणा नष्ट झाल्याचं.

चमकोपणाच्या, खोट्या प्रतिष्ठेच्या, दर्दीपणाचा आव आणण्याच्या आपल्या सगळ्या बौद्धिक, भावनिक, मानसिक वासना हा तथाकथित उच्चमध्यमवर्ग (संस्थळावर होऊ न शकणार्‍या गोष्टींवर हिरीरीने लिहीणारेही त्यात आलेच) निर्लज्जपणे शमवत असताना, वेगळं होण्याच्या नादात फ्रींटुक होऊन तसल्या कोणत्याही तृप्तीला वंचित झालेले लोक असला गळा नेहमीच काढत असतात.
असो.

-(योग्य स्थळीकाळीच मोठेपणा घेऊन सक्रीय होणारा) नगरीनिरंजन

पंगा's picture

3 Dec 2010 - 5:09 am | पंगा

या विधानानुसार तुम्ही न-उच्चमध्यमवर्गीय. कारण तुम्ही न-खाल्लेल्या खिचडीबद्दल व न-केलेल्या नॉर्थ कॅरोलायनाच्या प्रवासाबद्दल बोलता. कसलं लक्षण आहे हे तुम्हीच ठरवा.

टिळकसुद्धा एकदा न खाल्लेल्या शेंगदाण्यां(च्या फोलपटां)बद्दल बोलले होते म्हणतात. म्हणजे उच्चमध्यमवर्गीय नसावेत बहुधा...

हाच निष्कर्ष तुम्हाला का लावू नये?

'निष्कर्ष' नव्हे हो, 'निकष'... 'निकष' लावून 'निष्कर्ष' काढतात. बरे ते जाऊ द्या आणि बाकी चालूद्या.

(नुकताच जेलमध्ये रहायला आलो आहे ) अर्थात अवचट साहेबांचे चर्चासत्र ऐकून.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Nov 2010 - 10:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

जर आदरणीय नंदन हे आदरणीय आहेत तर श्री. अनिल अवचट आणि ज्ञानूताई हे आदरणीय का नाहीत हो आदरणीय मिभोकाका?

((अन) आवरणीय)

परिकथेतील राजकुमार's picture

30 Nov 2010 - 11:37 am | परिकथेतील राजकुमार

मिभोकाका ह्या लेखाला 'अवचट आणि खवचट' असे नाव जास्ती शोभले नसते का?

आचरट

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Nov 2010 - 11:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पर्‍या, असं न कळणार्‍या विषयात मोठ्या लोकांच्या धाग्यावर तोंड खुपसून बोलू नये. गप बसावं कधीतरी तरी!!

कुजकट

परिकथेतील राजकुमार's picture

30 Nov 2010 - 1:49 pm | परिकथेतील राजकुमार

पर्‍या, असं न कळणार्‍या विषयात मोठ्या लोकांच्या धाग्यावर तोंड खुपसून बोलू नये. गप बसावं कधीतरी तरी!!

कोण मोठे आहे इथे ? तुझे ठिक आहे, पण मिभोकाका १६ वर्षाचे आहेत ना ?

नरेशकुमार's picture

30 Nov 2010 - 1:42 pm | नरेशकुमार

आमच्या कार्पेट खाली कचराच नाही, कारण आमच्याकडे हार्ड वूड फ्लोअर आहे.

जिन्के घर लाकुड के होते हय, वोह दुस्रो के घर पे काच नहि फेकते.

अविनाशकुलकर्णी's picture

30 Nov 2010 - 2:59 pm | अविनाशकुलकर्णी

सर्व मिपाकरांना सूचित करण्यात येते आहे की, श्री अनिल अवचट आणि आम्ही ह्यांचा काहीही संबंध नाही...
..................................................................
यावर श्री अनिल अवचट यांचे म्हणणे ऐकल्याशिवाय काय प्रतिक्रिया देणार?
श्री अनिल अवचट यांना एक संधि द्यावयास हवि

गुणाढ्याच्या पैशाची भाषेतील बृहत्कथा आणि आधुनिक युगातील बृहत्कथेत काही तरी फरक रहाणारच भौ !

दे सोडुन .... कसे !

मनीषा's picture

30 Nov 2010 - 7:55 pm | मनीषा

आय सी ... हं हं .... ग्रे ss ट !

ह्म्म .. तरीही असोच ....

ईन्टरफेल's picture

30 Nov 2010 - 8:49 pm | ईन्टरफेल

आय सी हा हा
एसी...........

त.........बसुन

प्रियाली's picture

30 Nov 2010 - 7:58 pm | प्रियाली

मिपावरील थोर साहित्यिक मिभो यांचे लेखन कौतुकास्पद आहे. लवकरच आपण कविता, विडंबने, कथा, कादंबर्‍या लिहू लागाल अशी आशा आहे.

विकास's picture

30 Nov 2010 - 9:15 pm | विकास

आदरणीय नंदन ह्यांनी आम्हाला प्रदान केलेले एक अवचटांचे पुस्तक आम्ही वाचलेले आहे, ते आम्हाला आवडले देखील.
पण त्याव्यतिरीक्त आम्ही समाजाची कुठलीही सेवा केलेली नाही.

अवचटांचे पुस्तक वाचणे ही देखील समाजसेवा आहे का? :-)

भडकमकर मास्तर's picture

1 Dec 2010 - 1:36 am | भडकमकर मास्तर

मुख्य विषय फारसा कळाला नाही.

अवांतर : आठ दहा वर्षांपूर्वीपर्यन्त प्रत्येक दिवाळी अंकातला अवचटांचा लेख शोधून वाचत असे...

आता दोन दिवाळी अंक वाचले ... एकात (मौज की दीपावली ) अमेरिकेतल्या कुठल्याशा प्रदेशात डोंगरांच्या मातीचा रंग या विषयावरच्या लेखथेंबोळ्या .... आणि लोकसत्तेतला माझा शिवबादादा हा लेख वचला...

गेले ते दिन गेले इतकेच म्हणतो

कोणाचा कोणाशी काही संबंध आहे/नाही ही वैयक्तीक बाब न्हवे काय ? मग अशा जाहीर काडीमोड घेण्याचा कार्यक्रमाचे प्रयोजन काय ?

पंगा's picture

3 Dec 2010 - 5:02 am | पंगा

आदरणीय नंदन ह्यांनी आम्हाला प्रदान केलेले एक अवचटांचे पुस्तक आम्ही वाचलेले आहे, ते आम्हाला आवडले देखील.

पण त्याव्यतिरीक्त आम्ही समाजाची कुठलीही सेवा केलेली नाही.

'आदरणीय श्री. नंदन यांनी प्रदान केलेले अवचटांचे एक पुस्तक वाचणे' ही समाजाची सेवा कशी होऊ शकते?

'समाजाची सेवा' याची व्याख्या काय? (चुकीच्या ठिकाणी विचारला का प्रश्न?)