हा आहे रावस. आम्ही पहिलांदाच एवढा मोठा मासा आख्खा घरात आणला. आणला म्हणजे आणणे शक्य नाही तो आम्हाला पाठवला होता एका कोळ्याने ते पण विकतच हो. मग हा आला तेंव्हा आमच्या घरात बरच फोटो सेशन झाले अगदी काहीनी त्याला हातात धरुनही आपले फोटो काढले. त्यातला हा एक फोटो.
हा फोटोत जरा छोटाच दिसतोय पण प्रत्यक्ष बराच मोठा होता.
आता आम्ही ह्याचा असा निकाल लावला. घरात कापणे तर शक्य नव्हते मग पहिला बाजारातुन त्याला कापुन आणले. आणि खालील कृती केली.
रावस (कापुन, धुवुन) (फोटो गडपलेत)
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन घेतल्या
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल
चिंचेचा कोळ
वाटण : आल अर्धा इंच, लसूण ५-६ पाकळ्या, कोथिंबीर, मिरची १, ओल खोबर ४ चमचे.
रावसाच्या कालवणाची कृती :
टोपात तेलावर लसणाची फोडणी देउन हिंग, हळद, मसाला घालून त्यात वाटण घातले वर रावसाच्या तुकड्या घातल्या. वर वाटण, चिंचेचा कोळ मिठ, गरजे पुरते पाणी घालून उकळवले. ४-५ मिनीटांत गॅस बंद केला. सगळ कस झटपट.
हे आहे रावसाचे कालवण पण वरच्या रावसाचे नाही. मुद्दाम लिहीते कारण वरच्या फोटोच्या तारखेत आणि ह्या फोटोच्या तारखेत १ वर्षाचा फरक आहे. त्यामुळे मिपावर त्यावर भली मोठी चर्चा होणे संभव आहे. कोणी म्हणेल १ वर्षाने कालवण केल का ? पण त्यावेळी काढलेले फोटो डिलीट झालेत म्हणुन हे नंतर बाजारातुन आणलेल्या रावसाच्या कालवणाचे आणि तुकड्यांचे फोटो आहेत.
रावस असा तळला.
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल
रावसाच्या तळण्याची कृती :
रावसाच्या तुकड्यांना हिंग हळद, मिठ, मसाला लावुन तव्यावर लसणाची फोडणी देउन रावसाच्या तुकड्या शॅलो फ्राय केले. कश्या एका दमात झाल्या बघा तुकड्या तळून.
ह्या बघा तळलेल्या तुकड्या.
ह्या जरा करपल्यात. झटपट चा परीणाम दुसर काय ?
अधिक टिपा:
तळताना लसुण हा ऑप्शनल आहे. जर तळलेल्या लसूणाचा वास आवडत असेल तर घालावा. कारण मागे अशा काही पोस्ट आल्या होत्या. प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. नाही घातला तरी चालतो.
कालवण करताना बिन वाटणाच सुद्धा करता येत. पातळ आणि छान लागत.
प्रतिक्रिया
26 Nov 2010 - 2:41 pm | गवि
आईग्ग..
येतो तुमच्या घरी रावस घेऊन..
प्लीज्..छळ आहे हो हा..
26 Nov 2010 - 7:16 pm | चिरोटा
वा.एकदम मस्त.सोलकढी,भात आणि रावस.आमटीतला पण बरा लागतो.
26 Nov 2010 - 9:53 pm | विसोबा खेचर
!!!
28 Nov 2010 - 11:15 pm | लवंगी
अतिशय चवदार मासा,.. इथे पहायलापण नाही मिळत ग... तोंडाला पाणी सुटल
1 Dec 2010 - 7:46 pm | संदीप चित्रे
लै म्हणजे लैच दिवसात रावस खाल्ला नाही हे आता फारच प्रकर्षाने जाणवतंय :)
2 Dec 2010 - 4:38 am | बेसनलाडू
(मत्स्याहारी)बेसनलाडू
7 Dec 2010 - 4:43 pm | जागु
सगळ्यांचे धन्यवा. मध्ये काही दिवस रजेवर असल्याने हा धागा उघडलाच नव्हता. म्हणून प्रतिसाद द्यायचा राहिला.