साहित्यः बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, तिखट, थोडासा गोडा मसाला, तूप, नेहमीच्या साध्या पोळीसाठी मळलेली कणिक, तांदळाची पिठी, जिरे, तेल
क्रुति: प्रथम एका ताटलीमध्ये कांदा, कोथिंबीर आणि जिरे मिक्स करुन घ्यावे. मीठ, तिखट लगेच घालू नये नाहितर पाणी सुटते. आता कणकेच्या दोन लहान लाट्या लाटून २ छोट्या पोळ्या करुन घ्याव्यात. त्यापैकी १ छोटी पोळी घेउन तिच्या एका बाजूला तूप लावून घ्या. मग एका पराठ्याला पुरेल इतके वरील कांद्याचे मिश्रण एका वाटीत/बाउलमधे घेउन त्यात चविपुरते मीठ, तिखट, थोडासा गोडा मसाला घालून हे मिश्रण एकजीव करुन ते तूप लावलेल्या पोळीवर पसरा. नंतर त्यावर उरलेली पोळी ठेवून सर्व बाजूने हाताने थोडा दाब द्या. पराठ्याच्या कडा बेचव लागू नयेत म्हणून कडांना करंजीला घालतो तशी मुरड घालून घ्या. (यासाठी तूप लावलेली पोळी लाटतानाच आकाराने थोडी मोठी लाटावी. म्हणजे कांदा मिश्रण घालून वर जी पोळी ठेवतो त्या पोळीवर खालच्या पोळीची मुरड व्यवस्थित बसेल).
आता हा पराठा तांदूळाची पिठी लावून छान लाटून तव्यावर दोन्ही बाजूनी छान भाजून घ्या. आणि गरम गरम पराठा लोणी/बटर घालून टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणी बरोबर वाढा.
प्रतिक्रिया
25 Nov 2010 - 2:43 pm | निवेदिता-ताई
छान आहे पदार्थ...........पण कांदा कच्चाच ठेवायचा का?????
25 Nov 2010 - 4:25 pm | Pearl
हो. कांदा कच्चाच ठेवायचा. तो पराठ्यामधे कच्चा लागत नाही.
25 Nov 2010 - 4:35 pm | सुत्रधार
कान्द्याची किंमत थोडे दिवस परवडणार नाही आता. करुन खायला जरा टेम लागणार.
छान पाक कला. फोटू??
25 Nov 2010 - 6:50 pm | डावखुरा
ट्राय करुन पहावा लागेल एकुणच बेत जंमणार असे दिसतेय...
बनवल्यावर प्रतिक्रिया देतो....
धन्यु पर्ल...
4 Dec 2010 - 2:53 pm | चिंतामणी
करण्याचे धैर्य होत नाही हो किंमत बघुन.
कांदा न चिरताच डोळ्यातुन पाणि आले. :(
प्रथेप्रमाणे फोटु न टाकल्यामुळे १० पैकी ६ मार्क दिले आहेत.
4 Dec 2010 - 6:03 pm | अवलिया
अरे वा ! कांदा खाता म्हणजे तुम्ही चांगलेच श्रीमंत असणार !!