प्राण्यांवर दया करा ?

शैलेश हिंदळेकर's picture
शैलेश हिंदळेकर in काथ्याकूट
23 Nov 2010 - 9:48 pm
गाभा: 

सकाळी वॉकला निघाल्यावर एक दॄष्य पहावयास मिळते. रस्त्यावर ठिकठिकाणी लहान लहान बिस्किटे पडलेली आढळतात. जैन बांधव ज्या ठिकाणी जास्त आहेत, अशा ठिकाणी हे दॄष्य हमखास दिसते. मी अनेक लोकांना पुडीतील बिस्किटे कुत्र्यांसमोर टाकताना पाहिले आहे. ती बिस्किटे अशीच पडून राहतात, बहुतेक कुत्र्यांना ती आवडत नसावीत? मुक्या प्राण्यांवर दया दाखवण्याची ही पद्धत वाईट नाही. पण फक्त सकाळी त्यांच्या पुढ्यात ही विशिष्ट बिस्किटे टाकली की त्यानंतर कुत्रे ती बिस्किटे खातात की कचर्या त जातात हे या बांधवांपैकी कुणी पहात असेल, असे वाटत नाही. जैन बांधवांचे अनुकरण आपले काही मराठी बांधवही आजकाल करताना दिसतात. याचा परिणाम असा की रस्तोरस्ती रांगोळ्या काढल्याप्रमाणे सकाळी ही बिस्कीटे नजरेस पडतात. माझ्या मते अशी दया दाखवण्यापेक्षा पांजरपोळाच्या धर्तीवर समस्त जैन बांधवांनी एक जागा निश्चित करुन सदर कुत्र्यांची राहण्याची सोय करावी. त्यात महानगरपालिकेच्या मदतीने कुत्रे पकडून आणून त्यांना कायमचे खाऊपिऊ घालावे, त्यांच्यावर औषधोपचार करावे. याचा परिणाम म्हणजे शहरातील भटक्या कुत्र्यांचा त्रास सामान्यांना होणार नाही आणि आपल्या जैन बांधवांचे हे दान सत्पात्री पडेल. या लेखामुळे जैन बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर त्याबद्दल क्षमस्व.

प्रतिक्रिया

यकु's picture

23 Nov 2010 - 10:00 pm | यकु

जैन बांधवानी करावे किंवा अन्य कुणीही.
पण आधी त्या कोपरखैराण्यातले आणि सगळ्या मुंबईतले सगळे कुत्रे तिथं घेऊन जावेत!
म्हणजे मी भीत नाही तसा कुत्र्यांना, पण भॉक्कऽऽऽ व्वाख्खऽऽऽ केलं की उगाच अंगावर काटा येतो.

कुत्र्यांचा कसला आलाय लाड?

खरे कुत्रे आमचेच - काळ्या आणि लाल्या! बाकी सगळे भॉक्कऽऽऽ व्वाख्खऽऽऽ

गवि's picture

24 Nov 2010 - 9:23 am | गवि

+ 100 for kabutars too.