मांसाहारामुळे अन्नटंचाईच्या समस्येला कसा मोठा हातभार लागत आहे त्याबद्दल माहीतीपूर्ण दुवे:
http://blog.wired.com/wiredscience/2008/04/food-riots-begi.html
http://www.fao.org/newsroom/en/news/2006/1000448/index.html
आजची पिढी ही पूर्वीच्या पिढ्यांच्या तुलनेत मांसाहाराकडे जास्त वळलेली आहे आणि रोज त्यात भर पडत आहे. मांसाहाराचे इतर बरेच तोटे अनेक वेळेस अनेक ठिकाणी नमूद केलेले आहेतच (मानवी शरीरातील पचनसंस्था मांसाहारासाठी उत्क्रांत झालेलीच नव्हती, मांसाहारामुळे होणारे आजार, वगैरे वगैरे). महावीर, बुध्द आदींनी या आपल्या जिव्हालौल्यासाठी एखाद्या जीवनाचा बळी घेण्यापासून समाजाला परावृत्त करायचा प्रयत्न केला पण त्याला मर्यादित यश आले.
पण आजची परिस्थिती अजून गंभीर आहे. मांसाहार हा अन्नसाखळीमध्ये शेवटच्या कडीमध्ये येत असल्याने तो भयंकर खर्चिक मामला आहे. खर्चिक नुसते खाणार्याच्या पाकीटाच्या दृष्टीने नव्हे तर पर्यावरणाच्या दृष्टीने सुध्दा. इतकेच नव्हे तर आज जी अन्नटंचाईची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबाबतीतही मांसाहार हा एक घटक जबाबदार असल्याचे दाखविलेले आहे. आजची अन्नटंचाई ही जागतिक आहे आणि त्यामुळेच पाश्चात्य विचारवंतही या मुद्द्याला मांडत आहेत. हा ब्लॉग लिहिणारा स्वतः कट्टर मांसाहारी होता हे सुध्द्दा लक्षात घ्यावे.
मला पूर्ण कल्पना आहे की मिसळपाववर मांसाहारप्रेमी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातले फारच थोडे आरोग्यासाठी वा धार्मिक (!) श्रध्दांसाठी मांसाहार करत असावेत. मला कोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया येतील याबद्दलही कल्पना आहे. मात्र, जे कोणी संवेदनाशील सभासद असतील ते किमान एकदा याबाबत विचार करतील अशीही खात्री आहे. माझ्या चैनीसाठी मी कोणा जीवाचा बळी घेतो हे जरी विचारात घेतले जात नसले तरी मनुष्य समाजाची अन्नविषयक व पर्यावरणविषयक हानी होऊ नये म्हणून स्वेच्छेने, चैनीचा मांसाहार जर कोणी कमी करायचे ठरविले तरी या लिखाणाचा उपयोग झाला असे मला मानता येईल.
सर्वे भद्राणि पश्यन्तु|
-ऐश्वर्या राय
प्रतिक्रिया
22 Apr 2008 - 6:35 pm | मनापासुन
धार्मिक (!) श्रध्दांसाठी मांसाहार ? धर्म च जर सांगत असेल की दुसर्या प्राण्याला ठार मारा.मग तो धर्म कसला....अधर्म च की
यासाठी श्रावण्या करतात हे माहीत होते मांसाहर करणे माहीत नव्हते?ती ही एक चैनच असते.
माझ्या चैनीसाठी मी कोणा जीवाचा बळी घेतो ?मला सांगा दूध शाकाहारी की मांसाहारी आणि ते मानवाला किती आवश्यक आहे? मानव सोडला तर इतर कोणताही प्राणी दुसर्या प्राण्याचे दूध काढुन पीत नाही. ते गरजेचे ही नसते
शाकाहार की मांसाहार हा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते ज्याचे त्याने ठरवावे
असे मला मनापासुन वाटते
22 Apr 2008 - 6:48 pm | मदनबाण
शाकाहार की मांसाहार हा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते ज्याचे त्याने ठरवावे
हे मात्र खरे.....
(१००% शाकाहारी)
मदनबाण
22 Apr 2008 - 7:33 pm | ऐश्वर्या राय
अपेक्षेप्रमाणे ही प्रतिक्रिया आलीच. आपल्याला लेखाचा संदर्भ समजला नाही की दुर्लक्षित करावासा वाटला? दिलेले दुवे, या प्रश्नाची सामाजिक बाजू सांगत आहेत. दूध पिण्यासाठी गाय वगैरे प्राण्यांना मारले जात नाही तेव्हा इथल्या चर्चेसंदर्भात हा मुद्दा गैरलागू. इथली चर्चा मांसाहारामुळे होणारी अन्नटंचाई व पर्यावरण हानि ही आहे.
कोणत्याही संवेदनाक्षम विषयासंदर्भात 'हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे' ही खूप सोयीस्कर पळवाट आहे. कोणाला दुखावण्याची भिती नको मग समाजाची दीर्घकालीन हानि झाली तरी चालेले. मला कोणी वाईट म्हणायला नको. ही टीपिकल भारतीय मनोवृत्ती आहे आणि त्याचे बरेच दुष्परीणाम आपण भोगलेले आहेत (उदा. लोकसंख्या). आता तरी यातून बाहेर पडायचा प्रयत्न होऊ दे.
टीपः तुम्ही, कदाचित तुमच्या नकळत 'इस्लाम' ला अधर्म म्हटलेत.. मला तसे म्हणायचे नव्हते असा खुलासा देऊ शकता ;-)
22 Apr 2008 - 8:27 pm | मनापासुन
'इस्लाम' ला अधर्म म्हटलेत.. हा हा हा हा मानले बुआ तुमच्या तर्काला . का इस्लाम सोडला तर इतर धर्मात हिंसा वर्ज्य आहे? रामायणात सुद्धा मांसभक्षणाचे /धर्मा साठी प्राण्याम्च्या हत्येचे बळीचे उल्लेख आहेत. ( उदा: अश्व मेध यज्ञ / नरमेध यज्ञ) त्यावेळीस तर इस्लाम चा उदय झालेला नव्हता. जत्रेत देवाला बोकड / कोंबडा कापणे हे कोणत्या धर्मात बसते?
पैगम्बराला जेंव्हा अन्नासाठी हिंसा याबद्दल विचारले तेंव्हा ते उद्गारले की तुम्ही शाकाहार करा किंवा मांसाहार करा हिंसा ही होत असतेच. फक्त एक करा की तुम्ही जेंव्हा अन्न ग्रहण करता तेंव्हा हत्या झलेल्या जीवाला सांगा की बाबारे तु आता माझ्या रक्ताचा मांसाच अंश म्हणुन रहाणार आहेस. तुम्ही सिद्धा विसरु नका की तुम्ही ही कधी तरी धुळीचा / एखाद्या प्राण्याच्या शरीराचा अंश होतात.
( संदर्भ्...प्रेषीत :खलील जिब्रान)
असो तुम्ही शाकाहार करा किंवा मांसाहार कर पर्यावरण नाश तर होणारच आहे.
जगातल्या सर्वानी जर ठरवले की शाकाहार करायचा तर अशी वेळ येइल की लोक अन्नासाठी एकमेकांचे खून करतील्.जगातील मोठी जनसंख्या ही समुद्राकाठी रहाते. त्यानी काय शाकाहारासाठीसमुद्रात शेती करावी?
दूध पिण्यासाठी गाय वगैरे प्राण्यांना मारले जात नाही तेव्हा इथल्या चर्चेसंदर्भात हा मुद्दा गैरलागू
दूध हे गायीचे रक्तापासुन निर्माण होते. एका अर्थाने गायीचे रक्तच म्हणाना . त्यासाठी रोज गायीचे रक्त पिळुन काढले जाते. हे हत्येपेक्षा भयंकर नाही वाटत तुम्हाला? तुम्ही रोज चहा पिताना चहात दोन चमचे गायीचे रक्त पित असता.
हे सगळे लक्षात न घेता केवळ शाकाहार की मांसाहार असला वाद फक्त वादासाठी म्हणुन आणल्यासरखा वाटतो.
हा विषय अजिबात संवेदनाक्षम नाही. तो केवळ ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. हे म्हंटल्याबद्दल मला कोणी वाईट म्हणाले तरी वाईट वाटणार नाही
इथली चर्चा मांसाहारामुळे होणारी अन्नटंचाई व पर्यावरण हानि ही आहे.
अन्न टंचाई मांसाहारा मुळे होत नाही ती लोकसंख्येमुळे होते . त्यामुळे ती चर्चा तशीही निरर्थक आहे. दुर्लक्षित करावी अशीच वाटली.
हे मनापासुन
23 Apr 2008 - 9:09 am | ऐश्वर्या राय
"फक्त एक करा की तुम्ही जेंव्हा अन्न ग्रहण करता तेंव्हा हत्या झलेल्या जीवाला सांगा की बाबारे तु आता माझ्या रक्ताचा मांसाच अंश म्हणुन रहाणार आहेस. "
या तर्काप्रमाणे उद्या एखादा चोर चोरी केलेल्या मालाबद्दल मूळ मालकाला असे काहिसे सांगेल, '' बाबारे, ही तुझी संपत्ती आता माझ्या संपत्तीचाच अंश म्हणून राहणार आहे.'
मग, सोडून द्यायचे का त्या चोराला (कारण त्याने खलिल जिब्रान ची प्रॉफेट ही कादंबरी वाचलेली आहे अथवा त्यातले हे सोयीचे - त्याच्या धंद्याच्या दृष्टीने - अवतरण त्याला माहीत आहे)? अरे चोरा, पण मूळ मालक काय तुझ्या मागे लागला होता का की कसे पण कर आणि या संपत्तिला 'तुझा अंश' बनव? तसेच, तो प्राणी काय तुम्हाला आग्रह करतो का तुमचा अंश बनवा म्हणून?
इस्लाम, प्राणिहत्या, हलाल इ. विषय हे खूप सविस्तर मांडण्याच्या लायकीचे आहेत पण ही ती चर्चा नव्हे. माझ्या लिखाणातले धार्मिक या शब्दानंतरचे उद्गारवाचक चिन्ह आपण लक्षात घेतलेले दिसत नाही. कित्येकदा मनुष्य स्वतःच्या सोयीसाठी, चैनीसाठी काही गोष्टी करतो आणि अपराधगंडातून मुक्ती मिळावी म्हाणून ती धार्मिक गरज असल्याची बतावणी करतो. देवदासी हे जसे त्याचे एक उदाहरण तसेच जत्रेत 'देवासाठी' बोकड कापणे हे सुध्दा. मांसाहार करताना कित्येक लोक (ज्यांना काही प्रमाणात अपराधगंड जाणवतो असे, निर्ढावलेले नव्हे) धार्मिक कारणाने खातो असा स्वतःचा गोड गैरसमज करून घेतात. त्याबद्दल ते उद्गारवाचक चिन्ह होते. वाचनाची सवय असणार्या कोणाला ते समजायला अवघड गेले नसावे.
22 Apr 2008 - 6:59 pm | इनोबा म्हणे
शाकाहार की मांसाहार हा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते ज्याचे त्याने ठरवावे
यांच्याशी सहमत
मूळात शाकाहार किंवा मांसाहार,दोन्ही प्रकारांत हत्या ही अटळ आहे.
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
22 Apr 2008 - 7:38 pm | ऐश्वर्या राय
किती हत्या कोणत्या प्रकारात होते ते महत्वाचे आहे. दिलेले दुवे तोच मुद्दा मांडत आहेत. एक पाऊंड बीफ बनवायला ५ पाउंड धान्य लागते असे त्यात दिले आहे. थोडक्यात, किमान ५ पट जास्त र्हास.
22 Apr 2008 - 7:14 pm | प्रशांतकवळे
माझ्या चैनीसाठी मी कोणा जीवाचा बळी घेतो हे जरी विचारात घेतले जात नसले तरी मनुष्य समाजाची अन्नविषयक व पर्यावरणविषयक हानी होऊ नये म्हणून स्वेच्छेने, चैनीचा मांसाहार जर कोणी कमी करायचे ठरविले
झाडात जीव नसतो का?
बरं पाश्चात्य विचारवंत काय लिहीतात त्यावर विश्वास किती ठेवावा? कधी ते चहाला अपायकारक संबोधतात तर कधी उपायकारक..
सुर्य पृथ्वीभोवती फिरतो हे लिहिणारे व मानणारे पाश्चात्य होते.
"ब्लॅक होल" मधुन काहीच उत्सर्जीत होत नाही हे लिहीणारा पाश्चात्य आहे जे त्याने कबुल केले की चुकीचे आहे म्हणुन!
प्रशांत
22 Apr 2008 - 8:03 pm | कोलबेर
प्रशांतराव जो संगणक आणि माहिती जाल वापरुन तुम्ही हा प्रतिसाद लिहिलात त्या दोन्हीही ह्या लबाड पाश्चात्यांच्याच देणग्या आहेत. त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका.
22 Apr 2008 - 7:32 pm | व्यंकट
चैनीच शिकरण, श्रीखंड, शेवयांची खीर वैगेरे बंद कराव्या लागतील, आणि उपकाराचा उपास सुरू करावा लागेल.
व्यंकट
22 Apr 2008 - 7:59 pm | कोलबेर
शिकरण, श्रीखंड, शेवयांची खीर वगैरे पदार्थांतुन पर्यावरणाची (तितकी) हानी होत नाही जितकी एखादा बर्गर अथवा लुसलुशीत स्टेक खाण्यातुन होते. त्यामूळे श्रीखंड शिकरण ह्यांची तुलना इथे अप्रस्तुत आहे.
22 Apr 2008 - 7:56 pm | कोलबेर
पर्यावरणाच्या र्हासाचा विचार केला असता मांसाहार कमी झाला पाहिजे ह्या म्हणण्यात निश्चितच तथ्य आहे. पूर्वी केवळ 'निरपराध जीवांची हत्या नको' ह्या कारणास्तव विरोध होणार्या ह्या विषयाला आता ही नविन (अधिक गंभीर) डायमेन्शन मिळाली आहे ह्या ऐश्वर्या राय ह्यांच्या म्हणण्याशी सहमत आहे.
पण तसेही भारतीयांच्या आहारात इतर खाद्य संस्कृतींच्या तुलनेत मांसाहाराचे प्रमाण नगण्य आहे. पाश्चात्य देशांमध्ये रोज दोन्ही वेळच्या जेवणाला (मोठ्या प्रमाणात) मांसाहार करणारे बहुसंख्येने आहेत. ते जो पर्यंत आपला मांसाहार (विशेषतः गाय आणि डूक्कर) जाणवण्या इतपत कमी करत नाहीत तो पर्यंत ह्या प्रश्नावर तोडगा निघणे कठीण आहे.
-कोलबेर
22 Apr 2008 - 10:09 pm | व्यंकट
नैसर्गीक रित्या निर्माण केलेले नसून त्यांची शेती केली जाते, व मागणी / आवश्यकते नुसार त्यांची पैदास होते, जस्ट लाईक केळी, दूध आणि तांदूळ... म्हणूनच मी तसे उदाहरणही दिले होते.
व्यंकट
23 Apr 2008 - 9:23 am | ऐश्वर्या राय
हे पूर्णपणे मान्य. आणि, दिलेला दुवा, त्यांच्यापैकी काही याबबत जागृत होत आहे हे दर्शविणारा आहे. इथे, भारतीयांनीही आपल्याला जमेल तशी ही जबाबदारी घ्यावी. ज्याप्रमाणे हरितगृह वायूंचे उत्सर्जन ही पाश्चात्यांची जास्त जबाबदारी आहे पण भारतीयांनीही आपला वाटा त्यात उचलला पाहीजे त्याप्रमाणेच. अन्नटंचाईचा सर्वात जास्त फटका आपल्यासारख्या देशाला बसतो. अमेरिका व इतर धनवान देश जास्त काळ ही अडचण सहन करू शकतात. या लेखात नमूद केलेले फिजीमधले दंगे हे एक उदाहरण आहे.
गेले २-३ आठवडे भारतात महागाईने उच्चांक गाठलेला आहे. इतका की सरकार बिथरून गेलेले आहे. आणि, ही महागाई प्रत्यक्ष टंचाईमुळे झालेली आहे. ही टंचाई भारतीय नाही तर जागतिक आहे. आज भारत धान्य विकत घ्यायला तयार असूनही विकायला इतर देश तयार नाहीत कारण तेच आज टंचाईचा सामना करत आहेत. हा लेख इतक्या योग्य वेळेस प्रकाशित झाल्याने इथे त्याचा दुवा दिला.
22 Apr 2008 - 8:28 pm | धोंडोपंत
कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हे सर्वात महत्वाचे आहे. त्यात धार्मिक बाबी आणू नयेत असे वाटते.
आम्ही स्वतः मालवणी पदार्थांचे दिवाने आहोत. कोंबडीवडे, सागुती, सोलकढी हे आम्हाला अमृतासमान आहेत.
उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म||
आपला,
(मांसाहारी) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
22 Apr 2008 - 10:59 pm | पिवळा डांबिस
सर्व मांसाहारी मिपाकरांना आम्ही जाहीर आवाहन करू इच्छितो की आजपासून त्यांनी मांसाहार सोडून द्यावा आणि पूर्णपणे शाकाहार अंगिकारावा!
स्वगतः
त्यामुळां तरी माशे-मटणाचे भाव खाली येतंत काय तां बघूयां! साली बाजाराक जावंची सोय उरली नाय!! चांगली पापलेटाची जोडी साली ६०० रुपयांच्या खाली गावणां नाय! काय म्हागाई म्हणूची का सोंग!!
म्हागाईन गांजलेलो
पिवळो डांबिस
23 Apr 2008 - 12:08 am | विसोबा खेचर
मानवी शरीरातील पचनसंस्था मांसाहारासाठी उत्क्रांत झालेलीच नव्हती, मांसाहारामुळे होणारे आजार, वगैरे वगैरे).
आपल्या आजारांचं काय करायचं अन काय नाही ते मांसाहार करणारी मंडळी पाहून घेतील असं मला वाटतं! इतरांनी त्याची नसती काळजी करू नये असंही मला वाटतं!
सालं उद्या आजारी पडलो तर आमची आम्हीच बीलं भरणार आहोत ना? की कुणी शाकाहारी माईचा लाल आमची बिलं भरायला येणार आहे? नाही ना? मग आमचं आम्ही पाहून घेऊ! मेलो तरी बेहत्तर पण तिच्यायला मरण्यापूर्वी चापून मटणवडे, माश्याची आमटी, तळलेले बोंबिल आणि कोलंबीभात खाऊ! ;)
महावीर, बुध्द आदींनी या आपल्या जिव्हालौल्यासाठी एखाद्या जीवनाचा बळी घेण्यापासून समाजाला परावृत्त करायचा प्रयत्न केला पण त्याला मर्यादित यश आले.
हा हा हा! दॅट्स इट! :)
भलतीसलती कामं करायला घेतली की फारसं यश येतच नाही! च्यामारी, आम्ही काय खायचं नी काय नाही हे तो बुद्ध कोण ठरवणार? साला, आम्ही काय त्याच्या पैशांनी खातो का?
त्यातले फारच थोडे आरोग्यासाठी वा धार्मिक (!) श्रध्दांसाठी मांसाहार करत असावेत.
हो हो! मी त्यापैकी एक! ;)
मात्र, जे कोणी संवेदनाशील सभासद असतील ते किमान एकदा याबाबत विचार करतील अशीही खात्री आहे.
माझ्यापुरतं बोलायचं झालं तर माझ्या संवेदना मी खात असलेल्या बोंबलाबरोबरच मेल्या आहेत! :)
मनुष्य समाजाची अन्नविषयक व पर्यावरणविषयक हानी होऊ नये म्हणून स्वेच्छेने, चैनीचा मांसाहार जर कोणी कमी करायचे ठरविले तरी या लिखाणाचा उपयोग झाला असे मला मानता येईल.
माझ्यापुरतं बोलायचं झालं तर माझ्याकरता तरी आपल्या या लिखाणाचा शून्य उपयोग आहे असंच म्हणावं लागेल! असो, तरीही आपण जे काही लिहिलं आहे ते आपले व्यक्तिगत विचार असावेत असं मला वाटतं आणि त्याचा मी आदर करतो!
सर्वे भद्राणि पश्यन्तु|
म्हणजे काय? तुमचं ते शाकाहारी संसकृत आपल्याला कळत नाय साहेब! आवशीच्या भाषेत काही कळेल असं लिवा!
आपला,
(बोंबिल व मालवणी मटणाचा प्रेमी) तात्या.
23 Apr 2008 - 6:35 am | विकास
मांसाहाराबद्दलचा पर्यावरणीय दृष्टिकोन मान्य आहे. त्याबद्दल अजून एक म्हणावेसे वाटते की (जे मी पण पाळायचा प्रयत्न करतो - मांसाहाराबद्दल आणि शाकाहाराबद्दल पण) : आपण शक्यतोवर अन्न वाया घालवू नये. एक तर अनेकांना खायला मिळत नसते तसेच साधनसंपत्ती ते अन्न आपल्यापर्यंत पोचायला वापरलेली असते. त्यामुळे ते वाया घालवणे हे कुठेतरी अनैतिक आणि बेजबाबदारपणाचे वाटते.
बाकी आता जगाला बाजरपेठ जागतीक करण्याचे "ज्ञान" देऊन अमेरीकेन्स आता "लोकल फूड" वगैरेची भाषा करू लागले आहेत - त्यात पर्यावरणाबद्दलची जशी (कधी कधी) तळमळ असते तशीच स्वतःची स्थानीक अर्थव्यवस्था टिकवण्याबाबतची काळजी पण!
23 Apr 2008 - 6:39 am | व्यंकट
>>आपण शक्यतोवर अन्न वाया घालवू नये.
सहमत.
व्यंकट
23 Apr 2008 - 7:03 am | पिवळा डांबिस
अन्न वाया घालवू नये.
पूर्ण सहमती!!
23 Apr 2008 - 7:25 am | कोलबेर
अन्न वाया घालू नये ह्याबाबत पूर्ण सहमत पण ते वाया जाऊ नये म्हणून विनाकारण पोटात ढकलणे देखिल तितकेच अयोग्य. उदा. पानात थोडा जास्तच भात पडला असता आता वाया कसा घालवायचा? म्हणून पोटात अनावश्यक भरायचा हे देखिल अयोग्यच. थोडक्यात, हवे तितकेच पानात वाढून घ्यावे आणि तरीही जास्त पडल्यास ते झाकून ठेवावे/ दान करावे अथवा मनावर दगड ठेवून त्याची विल्हेवाट लावावी.
23 Apr 2008 - 7:55 am | विकास
>>>अन्न वाया घालू नये ह्याबाबत पूर्ण सहमत पण ते वाया जाऊ नये म्हणून विनाकारण पोटात ढकलणे देखिल तितकेच अयोग्य.
अगदी मान्य! म्हणूनच मी "शक्यतोवर" म्हणले. आपण म्हणता ती सवय विशेष करून अमेरिकन रेस्टॉरंट मधे ठेवावी लागते (मनावर दगड ठेवून विल्हेवाट) - विशेष करून ऑन द बॉर्डर्स अथवा चिज केक फॅक्टरी सारखी ठिकाणी. (अमेरीकेत नसलेल्यांना - चिज केक फॅक्टरी हे रेस्टॉरंटच आहे फक्त चिज केक नाहीत!)
23 Apr 2008 - 9:00 am | व्यंकट
>>विनाकारण पोटात ढकलणे देखिल तितकेच अयोग्य
सहमत
व्यंकट
23 Apr 2008 - 8:12 am | ॐकार
बुद्धासंबंधी मासांहाराचे विवेचन वेगळे आहे. हिंसा टाळावी असे सूत्र प्रामुख्याने दिसते. परंतु मांसाहार केवळ हिंसा होते म्हणून टाळावा असे विवेचन सापडत नाही.
अन्नटंचाईला मासांहारापेक्षा अन्ननिर्मिती, अन्नसाठा, अन्नग्रहणक्षमता यांचा न जुळणारा ताळमेळ कारणीभूत आहे. शाकाहार/मांसाहार यांचे बरे-वाईट परिणाम हा लेखाच मुद्दा नसल्याने, अन्ननिर्मिती, अन्नसाठा आणि ग्रहण ह्या मुद्द्यांवर विचार व्हायला हवा.
मागे एकदा दूधाला रास्त भाव न आल्याने महाराष्ट्रात/मुंबईत कितीतरी लि. दूध रस्त्यावर ओतल्याची सचित्र बातमी वर्तमानपत्रात वाचली होती. अन्नटंचाईचे प्रमुख कारण mass production ही आहे.
महिनाभराच्या पाहणीनुसार आमच्या ऑफिसमध्ये साधारण ५ दिवसांमागे तब्बल १००० किग्रॅ अन्न वाया जात होते (शाकाहार + मांसाहार) ! मग पोस्टर्स, तक्ते, मेल्स यातून केटरर्सने लोकांना याची जाण करून दिली तेव्हा ते प्रमाण ५०० किग्रॅ वर आले.
अन्नटंचाईला मांसाहारापेक्षा राजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण आणि आपली अनास्था जास्त कारणीभूत आहे.
23 Apr 2008 - 9:31 am | ऐश्वर्या राय
हे कसे काय अन्नटंचाईला कारण आहे? कृपया खुलासा व्हावा. नेहमी मास प्रोडक्शनमुळे वस्तूची उपलब्धता वाढते मग अन्नाचीच टंचाई कशी होते? तुम्ही दिलेले दुधाचे उदाहरण हे टंचाई संदर्भात योग्य वाटत नाही.
ज्या ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्या सर्वांवर उपाय काढण्याचे प्रयत्न व्हावेत. त्यातच एक मांसाहार कमी करणे याचाही अंतर्भाव होतो.
23 Apr 2008 - 2:36 pm | ॐकार
दूधाचा नास, कांदे सडून फुकट जाणे, भरपूर डंप्लिंग्ज खराब होणे याने कृत्रिम टंचाई उद्भवत नाही काय? मास प्रॉडक्शन चा परिणामा नाही का हा? मास प्रॉडक्शनही मागणी तसा पुरवठा तत्त्वावरच बेतलेले आहे. नाशिवंत पदार्थांबाबत हा ताळमेळ चुकला तर नक्कीच फरक पडतो.
ज्या ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्या सर्वांवर उपाय काढण्याचे प्रयत्न व्हावेत. त्यातच एक मांसाहार कमी करणे याचाही अंतर्भाव होतो लेखात हा सूर असता तर नक्कीच प्रतिसाद तसा आला असता!
23 Apr 2008 - 9:59 am | विजुभाऊ
ऐश्वर्या राय भौ
तुम्ही इथे प्रत्येकाचे म्हणणे खोडुन काढायचा प्रयत्न करताय. पण तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे तेच कोणाला कळालेले दिसत नाही इथे.
मला वाटते की ते तुम्हाला स्वत:लाच कळलेले नसावे. तुम्ही सनातन प्रभाती आहात काहो?
असो
अन्नटंचाईला मांसाहारापेक्षा राजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण आणि आपली अनास्था जास्त कारणीभूत आहे. १००००००% सहमत
***उद्या एखादा चोर चोरी केलेल्या मालाबद्दल मूळ मालकाला असे काहिसे सांगेल, '' बाबारे, ही तुझी संपत्ती आता माझ्या संपत्तीचाच अंश म्हणून राहणार आहे.'****
त्याच जिब्रान ने मोहंमदाचे चोरी बद्दल चे विचार ही त्यात उधृत केले आहेत " चोरा इतकाच ज्याच्याकडे चोरी झाली आहे तो सुद्धा चोरीसाठी जबाबदार आहे" हे विचार आपण वाचले नाहीत की ते सोयीस्करपणे तुमच्याकडच्या पुस्तकात छापले नव्हते?
"गायीचे दूध" हा मुद्दा तुम्ही सोयीस्कर पणे टाळलेला दिसतो. असो
**"पर्यावरणाच्या र्हासाला मांसाहार जबाबदार आहे"** हे तुमचे एकुण मत आहे असे दिसते.
प्रत्येकाला आपले मत बाळगण्याचा हक्क आहे. "Every One has Right to go Wrong"
ऐश्वर्या राय भौ तुम्ही तुमचा हक्क बजावला.आता इतराना त्यांची मते बाळगण्याचा हक्क मिळू द्या.
किमान हक्कांच्या आग्रहात : विजुभाऊ
23 Apr 2008 - 1:47 pm | ऐश्वर्या राय
मोहंमदाचे चोरी बद्दल चे विचार: "चोरा इतकाच ज्याच्याकडे चोरी झाली आहे तो सुद्धा चोरीसाठी जबाबदार आहे"
मूळ विषयाला सोडून पण एक उपयुक्त माहीती (जर खरी असेल तर) दिल्याबद्दल आभार. भारतीय दंडविधान लिहीणार्या कोणालाच कशी बरे ही माहीती नाही? भारतीय राहूदे, अरबस्तानात तरी?
23 Apr 2008 - 2:13 pm | विजुभाऊ
तुमच्या माहीतीखातर :माहीतीचे खरेपण पवित्र कुराणशरीफ वाचुन ताडुन घेणे
The robbed is equally responsible as the robber is.........हा त्या कुराणाच्या ११ :०५ व्या आयतीचा अनुवाद.
त्यासोबत आणखी एक उप आयत आहे "जुल्म ढानेवाले से भी ज्यादा जुल्म सहनेवाला सजा का हकदार है"
मला अरबी दंडविधान माहीत नाही. जिब्रान हा लेबनीज होता. वरच्या दोन्ही गोष्टी ह्या त्याने मो. पैगंबरांनी पर्वतावरुन आल्यानन्तर लोकानी विचारलेल्या प्रश्नाना उत्तरे देताना लिहिल्या आहेत.
पैगंबरानी लोकाना समान हक्क मिळावे ; ते मागुन मिळणार नाहीत ;त्यासाठी लोकांत आत्मसंमान जागृत व्हावा.लोकानी गुलामगिरी सहन करु नये म्हणुन हे सांगितले आहे.
राहता राहिला शरियत : तो कायदा अनेक देशात लागु आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हेगारी बरीच कमी झाली आहे.
अर्थात कायद्याचा अर्थ कोण कस काढतो त्यावर बरेच असते. आपल्याकडेही कायद्याचा कीस काढणारी बरीच मंडळी आहेत.
उ.सू.: वाचता येत असेल तर "प्रॉफेट" या खलील जिब्रानच्या नीतान्तसुंदर पुस्तकाचे कधीतरी वाचन करुन बघा.
23 Apr 2008 - 1:28 pm | अवलिया
महावीर, बुध्द आदींनी या आपल्या जिव्हालौल्यासाठी एखाद्या जीवनाचा बळी घेण्यापासून समाजाला परावृत्त करायचा प्रयत्न केला पण त्याला मर्यादित यश आले.
बुद्धाचा मृत्यु बोकडाचे मांस खावुन अजीर्ण झाल्यामुळे झाला या गोष्टीचा आपणास विसर पड्ला असावा
(अधुन मधुन शाकाहारी) नाना
23 Apr 2008 - 1:56 pm | सत्या
जमायच नाय र बाबा...!!!
23 Apr 2008 - 2:59 pm | लिखाळ
नमस्कार,
आपले, कोलबेरचे आणि विकास यांचे चर्चेसंदर्भातले विचार पटले.
अन्नटंचाईया विषयाला अनेक पैलू आहेत त्यातील हा एक. अन्न्साखळी (खरेतर फूडपिरॅमिड) मध्ये बायोमास हे पिरॅमिडच्या शिखराकडे जावे तसे कमी होते हे खरेच आहे. पण
१. या बाबत विचार करताना स्थानिक परिसंस्थांचा विचार मुख्यत्वाने झाला पाहिजे. त्यामुळेच सरसकट विधानातून तत्व सांगितले तरी अंमलबजावणी मात्र स्थानिक जैवविविधता आणि रचना पाहून झाली पाहिजे. उदा. गुहागरच्या सागरकिनार्यावरील लोक त्याच किनार्यावर आणि आसपास असणार्या प्राण्यांवर जगत असतील तर त्यांनी ते बंद करण्याचे काही कारण नाही. ते स्वतःच त्या परिसंस्थेचा भाग आहेत. पण पुण्यातले लोक जर तेथे मिळणार्या 'तिसर्या'* ट्रक भरौन आणून विकून संपवत असतील तर कालांतराने मोठा प्रश्न उद्भवेल.
२. त्यामुळेच एकेठिकाणी प्राण्यांची पैदास होते पण त्यांना लागणारे तृणधान्य भलतीकडून येते आणि दोनही ठिकाणच्या नैसर्गिक-उर्जा-वहन पद्धतिचा विचका होतो.
या सारख्या बाबतीत तारतम्य कसे सिद्ध करावे आणि त्यातील अर्थकारण कसे सांभाळावे हा मोठा प्रश्नच आहे.
* तिसर्या हा किनार्यानजीक मिळणारा काही जीव आहे अशी माझी समजूत आहे. तसे नसेल इतर कोणते नाव घ्यावे :) उदाहरण म्हणून केवळ एक नाव घेतले.
-- लिखाळ.
मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.
23 Apr 2008 - 3:26 pm | सहज
गेल्या महिनाभरात सर्व देशातील प्रमुख बातम्यात अन्नटंचाई, वाढत्या किमती ही बातमी हमखास येते आहे.
विचार करायला लावणारे दुवे आहेत.
तीच मुख्य अपेक्षा आहे. व जमेल तशी आपल्या परीने थोडि का होईना कृती.
30 Apr 2008 - 11:19 pm | देवदत्त
इथे काही सदस्य म्हणताहेत की मांसाहार करू नये. जगात अन्नटंचाई होतेय.
शाकाहारानेही अन्नटंचाई होतेय.
अहो, आपण इथे मांसाहार/शाकाहारावर चर्चा करत बसलोय. तिथे कोंडोलिसा राइस ह्यांनी सरळ सांगितले की भारतीयांचा आहार सुधारल्याने जगात अन्नटंचाई झालीय.
छ्य्या... आता झुणका भाकरच खावे लागेल. बहुधा कंदमुळेच. :''(
अरे हो, ते विजेचे बल्ब, ट्युबलाईट, माती खाणारेच बरे. ;)
30 Apr 2008 - 11:52 pm | प्रभाकर पेठकर
तिथे कोंडोलिसा राइस ह्यांनी सरळ सांगितले की भारतीयांचा आहार सुधारल्याने जगात अन्नटंचाई झालीय.
तिला म्हणावं, भारतात राईस जास्त खातात. सांभाळून मुक्ताफळे उधळ...
1 May 2008 - 12:07 am | चतुरंग
म्हणजे इकडे माणशी दोन दोन जणांचे खाणे हादडून गेल्या वीस वर्षात अमेरिका कशी अतिलठ्ठ झाली आहे ते आधी बघा म्हणावं. :$
चतुरंग