हैयोंच्या अभ्यासपुर्ण लेखनानंतर

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
17 Nov 2010 - 1:32 am
गाभा: 

काय लावलय हे ओकांनी नाडीपुराण असा सामान्य वाचकांचा ग्रह होणे स्वाभाविक आहे.

तथापि, हैयो हैयैयो हे भारतीय व परदेशी भाषातज्ञ तर आहेतच शिवाय ७० पेक्षा जास्त प्राचीन ग्रंथम पासून ते फारसी, अरबी लिपींचे तज्ञ अभ्यासक आहेत. त्यांच्या अभ्यासपुर्ण या लेखनानंतर नाडी ग्रंथांकडे पहायची लोकांची मनोवृत्ती बदलेली आहे असे जाणवते.
ताडपट्यात खरोखरीच तमिळ भाषा असते का व अन्य मुळभूत शंका पुर्वी पासून उपस्थित केल्या गेल्या त्याचे निराकरण हैयोंच्या लेखातील जन्मदिनांकाचे व नवग्रहस्थितीचे वर्णन वाचून करणे आगत्याचे ठरले आहे.
खोलवर विचार केल्यावर नाडी ग्रंथांची पर्यायाने ओकांची टिंगल टवाळी करून चेष्टेवारी नेण्याचा हा विषय नाही, ही बाब वाटते तितकी हलकी फुलकी किंवा टाळून विचारावेगळी करायला येत नाही असे हैयोहैयैयोंनी नाडी ग्रंथावर तमिळभाषेच्या अनुशंगाने अभ्यासकार्य चालू केल्यापासून लक्षात येते. ते कसे ते पहा तर -
आता विविध आक्षेपांच्या संदर्भात विचार नीट वाचल्यावर त्यातून काय काय परिस्थिती उपस्थित होते याची झलक खाली मिळेल.
1. पहिला आक्षेप असा असतो की या ताडपट्ट्यात काहीही लिखाण कुठल्याही भाषेत केलेले नसते. त्या कोऱ्याच असतात. भासवले असे जाते की नाडीवाचक त्यात पाहून त्यातील मजकूर वाचतो आहे.
उत्तर - आता त्या ताडपट्टया कोऱ्या असतात की कि काहीतरी का होईना लिहिलेल्या असतात हे शोधणे हे काम केले पाहिजे. ते काम नाडी भविष्य केंद्रातजाऊन प्रत्यक्ष शोधकरून त्यांच्याकडील उपलब्ध ताडपट्टया पडताळाव्या लागतील. हैयोंनी व प्रस्तूत लेखकाने विविध केंद्रात जाऊन नाडीपट्यांचे फोटो सादर करून असे अभ्यासकार्य केले आहे. तसे केले असता त्या संपूर्णतः कोऱ्या नसतात. त्यावर मजकूर लिहिलेला असतो. हे लक्षात येते. त्यामुळे या आक्षेपातील खोटेपणा सिद्ध होतो.
2. दुसरा आक्षेप असा असतो की चर्चेसाठी जरी त्या ताडपट्ट्यात मजकूर असतो असे मानले तरी त्यातून नेमकी कुठली भाषा असते याचा अर्थबोध होत नाही.
उत्तर - यावर सोपे उत्तर असे की सध्या जे नाडी ग्रंथ पट्टीवाचनाचे काम करतात ते सर्व तमिळभाषी आहेत. ते यातील मजकूर वाचून दाखवतात अणि तो मजकूर परत एका ४० पानी वहीत सध्याच्या प्रचलित तमिळ लिपित पुन्हा लिहून काढतात. यावरून त्या मजकुराची भाषा तमिळ का अन्य कोणती असावी याची खात्री करता येते. या उलट ताडपट्ट्यांचे वाचन करणारे तमिळभाषिक सोडून अन्य भाषिकांतर्फे होते वा केले जाते असा पुरावा उपलब्ध करावा लागेल. तो तसा होत नाही. आक्षेप असा खोडून निघतो. शिवाय हैयोंनी नुकत्याच प्रकाशित लेखात नाडी पट्टीतील काही श्लोकांचे तमिल व देवनागरीतून केलेले कथन नाडी पट्टीतील भाषा प्रत्यक्ष तमिलच आहे असे निर्णायकपणे सिद्ध करते,
3. तिसरा आक्षेप असा की जरी मानले की ताडपट्टी मजकूर लिहिलेला असतो. त्याची भाषा तमिळ असते तर ती सामान्य तमिळ भाषिकाला का वाचायला येत नाही? त्या अर्थी नाडीपट्टी वाचन हा एक तमिळ नाडीवाचकांचा देखावा असतो.
उत्तर – असे लक्षात येते की सामान् तमिळभाषिकांना या ताडपट्ट्यांवरील मजकूर वाचायला येत नाही किंवा आला तरी अर्थबोध होत नाही. याचे मराठी भाषिकांना पटेल असे स्पष्टीकरण असे की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेत लिहिला गेला आहे. तरीही त्यातील छापील मराठीतील ओव्यांचा अर्थ सर्वसामान्य मराठी समजणाऱ्याला समजायला कठीण जाते. आता तीच ज्ञानेश्वरी जर मोडी भाषेत लिहून सध्याच्या मराठी वाचकाला दिली तर त्याची काय अवस्था होईल? त्याला नेमके काय लिहिलेले आहे याचा अर्थ बोध होणार नाही पण कोणी ती मोडी लिपि-भाषातज्ञ वाचायला लागले तर थोडा थोडा अर्थ कळेल. तोच अर्थ ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेल्या जाणकार मंडळींनी फोडकरून सांगितला की 'ओहो, असा अर्थ आहे!' असे उद्गार ओठी येतील. नेमके तेच सामान्य तमिळ भाषिकांचे होते असे हैयोंनी नाडी ग्रंथातील ओळी ओळींचा अर्थ फोड करून सादर केलेल्या पुराव्यावरून सिद्ध होते. त्यामुळे या आक्षेपात बिलकुल तथ्य नाही. हे लक्षात येते.
4. आक्षेप चौथा असा की सामान्य तमिळांना जरी ती वाचता आली नाही तरी ती तमिळ भाषातज्ञांनी तरी वाचून कुठे मान्य केली आहे?
उत्तर – या तऱ्हेचे अभ्यासकार्य अनेक वेगवेगळ्या पुर्वी पासून तमिळ भाषा तज्ञांकडून विविध ठिकाणी झाले आहे. तथापि अजूनही त्यांच्याकडून ते आणखी पद्धतशीरपणे व्हावे यासाठी हैयोहैयैयोंच्या बाजूने प्रयत्न करणे जारी आहे. श्री लंकेतील डॉ. अरसे कुलरत्ने अणि लंडनस्थित डॉ. एस. संबंधम या दोघांनी अत्यंत परिश्रमपुर्वक तीन भागांचा एका अभ्यास निबंध सन २००२ मधे लिहून प्रकाशित केला. त्यात त्यांच्या शोधाचा महत्वाचा निष्कर्ष होता की खरोखरच नाडीच्या ताडपट्ट्यात त्यांच्या संबंधातील नावे कोरलेली होती. त्यांनी तो शोध निबंध आभिप्रायार्थ पुनर्जन्मावर आयुष्यभर काम केलेल्या स्व. डॉ. आयन स्टीव्हन्सन यांना अमेरिकेत पाठवला होता. त्यात त्यांनी असे म्हटले होते की मी यावर तत्वतः विश्वास ठेऊ शकत नाही. तरीही असा नाडी ग्रंथांचा पुरावा खरोखर असल्यास तो अविश्वसनीयच नव्हे तर सध्याचे प्रस्थापित शास्त्राचे नियम उलथुन टाकणारा आहे असे सिद्ध होईल. तथापि यावर आणखी अभ्यास कार्य करावे लागेल. तेच काम हैयोंनीआता हाती घेतले आहे.
या पुराव्यांच्या संदर्भात विशेष उल्लेख करावा लागेल की नाडी ग्रंथ भविष्याच्या दि १४ ऑक्टोबर २००७ साली पुण्यात झालेल्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद चेन्नईच्या इन्स्टिट्युट ऑफ एशियन स्टडीज या तमिळ भाषेतील इंडॉलॉजीवर काम करणाऱ्या व विशेषतः ताडपत्रांच्या ग्रंथांवर शोधकाम व त्यांचे संरक्षण करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक, चालक डॉ. जी जॉन सॅम्युएल यांनी स्वीकारले होते. त्यांच्या सोबत त्याच संस्थेच्या ताडपत्रशोध विभागाच्या प्रमुख तमिळतज्ञ श्रीमती लक्ष्मी यांनाही बोलावले गेले होते. त्यांनी उपस्थितांसमोर त्या पट्टीतील अणि अन्य एका नाडीपट्टीतील मजकूर व विशेषतः नावे वाचून ती खरोखरीच ताडपट्टीत कूट तमिळ भाषेत कोरून लिहिलेली आहेत असा असल्याचा निर्वाळा दिला.
जर्मनीत थॉमस रिटर नावाच्या एका नाडी भविष्यावर जर्मन भाषेत पुस्तके लिहिलेल्या व्यक्तीने तेथील तमिळ भाषेतील तज्ञाकडून नाडी ग्रंथ भविष्य ताडपट्टीतील मजकूर वाचून तो भविष्य कथन सोडून अन्य धार्मिक लेखन नसल्याचा निर्वाळा दिला असा उल्लेख त्यांच्या ''द सीक्रेट ऑफ इंडियन पामलीफ लायब्ररीज्" पुस्तकात केलेला आहे.
यापुढे जाऊन हैयहैयैयो त्या ताडपट्ट्यात व्यक्तीच्या बाबत अन्य तपशीलाचे उल्लेख, कसे असतात याचा अभ्यास करून या ताडपट्यांचे फोटो मिळवून यावर आणखी कार्य होणे अपेक्षित आहे.
5. आक्षेप पाचवा असा की नाडी ग्रंथ भविष्य सध्याच्या प्रचलित विज्ञानाच्या विरोधात जात असल्याने त्याला कितीही पुराव्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न निष्फळ आहे.
उत्तर - नुकताच एका सदस्याने हैयोंच्या लेखातील वर्णित एका व्यक्तीच्या जन्मतारखेला हैयोंनी नव्हे नाडी महर्षींनी कथन केलेला वार चुकीचा होता असे म्हणून आक्षेप घेतला होता. सध्याच्या प्रचलित कॅलेंडर प्रमाणे तो वार बरोबरच होता. मात्र जेंव्हा हैयोंनी त्यांचे ध्यान भारतीस परंपरेतील पंचांगानुसार वाराची गणना करून पहावी असे विनम्रपणे सुचवले त्यानंतर त्या सदस्याने हैयोंच्या विधानाची म्हणजेच पर्यायाने नाडी महर्षिंच्या कथनाला योग्य असल्याचे प्रांजळपणे मान्य केले. हैयोंनी सादर केलेल्या लेखातील जुळ्या बहिणींच्या जन्मवेळेची, दिनांकाची व नवग्रहांच्या स्थितीची नोंद फारच विचार करायला लावणारी आहे.
यापुढे जाऊन हैयोंनी व्यक्तीच्या नावाची नाडी पट्टयातून उकल करून दाखवावी म्हणजे व्यक्तीचे नाव त्याचे आईवडील किंवा वरिष्ठ नातलग ठरवतात व विधिपुर्वक ठेवतात अशी सामान्यपणे मान्यता आहे. या पेक्षा त्यांना तीच नावे ठेवायची प्रेरणा आपोआप घडते की काय यावर विचार करून मते व्यक्त करता येईल.
जर या ताडपट्याच्या मजकुरात व्यक्तीचे नाव व अन्य माहिती त्याने ती न पुरवलेली असता, त्याच्या जन्माच्या आधीपासून केंव्हातरी लिहून तयार असेल तर त्याला काय म्हणायचे? त्याची संगती कशी लावायची? ती संगती मानवी बुद्धीच्या स्तरावर लावता येत नसेल तर त्याला मानवी विज्ञानाच्या कक्षेबाहेरील म्हणजेच इंद्रीयगम्य ज्ञानाने ज्ञात न होणाऱ्या अदभूत शक्तीचा विलास किंवा लीला मानावे लागेल. कदाचित त्रिमितीच्या पलिकडे सध्या अज्ञात अन्य मितींच्या ज्ञानात त्या गूढाचे उत्तर सामावलेले असेल. भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ असा आपण करतो तसा भेद न करता काही गोष्टी घटना ज्ञात करता येऊ शकतात याचा शोध घ्यावा लागेल. मात्र नाडी भविष्य थोतांड मानून त्याच्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून असे म्हणत बसायचे की जर आम्हा विज्ञानवाद्यांनी नाडी ग्रंथांच्या या सत्यतेला तत्वतः मान्यता दिली तर आमच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पायाच निखळून पडतो म्हणून आम्हाला नाडी ग्रंथांच्या अस्तित्वाची दखल घेणे मान्य नाही. ही तर वैज्ञानिक विचारांशी प्रतारणा नव्हे काय?
या बाबींवर विचार हैयोंच्या लेखाच्या संदर्भात पुनर्जागृत व्हावा म्हणून हा धागा पुन्हा पुनर्जिवित करावासा वाटला.

प्रतिक्रिया

चित्रा's picture

17 Nov 2010 - 2:22 am | चित्रा

हैयो हैयैयो यांच्या उपक्रमावरील दिवाळी अंकातील लेखानंतर आलेला लेख हा उपक्रमावरच द्यायला हवा होता असे वाटते. तो तिकडेही प्रसिद्ध करावा, अशी विनंती करते.

या ताडपट्याच्या मजकुरात व्यक्तीचे नाव व अन्य माहिती त्याने ती न पुरवलेली असता, त्याच्या जन्माच्या आधीपासून केंव्हातरी लिहून तयार असेल तर त्याला काय म्हणायचे? त्याची संगती कशी लावायची? त्याला मानवी विज्ञानाच्या कक्षेबाहेरील म्हणजेच इंद्रीयगम्य ज्ञानाने ज्ञात न होणाऱ्या अदभूत शक्तीचा विलास किंवा लीला मानावे लागेल. कदाचित त्रिमितीच्या पलिकडे सध्या अज्ञात अन्य मितींच्या ज्ञानात त्या गूढाचे उत्तर सामावलेले असेल.

इंद्रियगम्य ज्ञानाने ज्ञात न होणारी शक्ती कूट तामिळ लिपीत शाई/किंवा कसलीतरी लेखणी घेऊन का लिहीते?

का कोण जाणे मेल ब्रूक्सच्या मोझेसच्या टेन कमांडमेंटांची आठवण झाली.

" alt="" />

शशिकांत ओक's picture

17 Nov 2010 - 12:25 pm | शशिकांत ओक

चित्रा जी,
जरूर टाकायला हवे. तेथे ही टाकण्याचे काम करीन.
इथे हा धागा टाकायचे कारण हैयोंनी त्या लेखनाला इथे धागाटाकून सुरवात केली म्हणून मी इथे धागा टाकला. इतकेच.
टेन कमांडमेंट्सची आठवण झाल्याचे वाचून मला पुर्वी असेच वाटले होतेय याची आठवण झाली. तांबरमला असताना काही तमिळांशी नाडी ग्रंथांची चेष्टा करण्याच्या हेतूने मग दगडावर का कोरुन लिहिले नाहीत हे ग्रंथ असा वाद घातला होता.
नंतर मला वाटू लागले की लेखन सामुग्री व मजकूर यावरून तो कोठे व कसा लिहायचा ते ठरले जाते.
महर्षींना फक्त १० आज्ञा लिहायची गरज असती तर त्यांनीही कदाचित दगडाचा वापर केला असता. इथे असंख्य लोकांसाठी व हाताळायला सोईच्या म्हणून ताडपत्रांचा उपयोग सयुक्तिक असावा. असो.

चित्रा's picture

18 Nov 2010 - 12:42 am | चित्रा

महर्षींना फक्त १० आज्ञा लिहायची गरज असती तर त्यांनीही कदाचित दगडाचा वापर केला असता.

महर्षी? का शक्ती?

जरूर टाकायला हवे. तेथे ही टाकण्याचे काम करीन.

२४ तास उलटून गेले. टाका, लवकर टाका तिथेही लेख.

सहज's picture

18 Nov 2010 - 6:37 am | सहज

>२४ तास उलटून गेले. टाका, लवकर टाका तिथेही लेख.

हा लेख तिथे कधी टाकायचा त्यावेळेबद्दल महर्षींनी काय लिहले आहे याची आपल्याला कल्पना आहे का? नसल्यास कृपया नाडीपट्टी केंद्रात जाउन आधी माहीती करुन घ्या मगच बोला. दृष्टांत, कुत्रा/कावळा प्रसंग घडेल मग योग्य मुहूर्तावर जगाच्या उद्धाराचे हे कार्य घडेल.

शशिकांत ओक's picture

25 Nov 2010 - 11:52 am | शशिकांत ओक

आपल्या सुचनेचे पालन
उपक्रमवर हा लेख टाकला आहे.
सुचवल्याबद्दल धन्यवाद. काही कारणाने नेटशी संपर्क न करता आल्याने विलंब झाला. असो.

विजुभाऊ's picture

25 Nov 2010 - 12:48 pm | विजुभाऊ

फार पूर्वी आदिवासी दगड वापरायचे
त्या नन्तर झाडाची पाने वापरू लागले
आणि थोडे प्रगत झाल्यानन्तर टॉयलेत पेपर वापरू लागले असे कोणीतरी म्हम्टले आहे

लंबूटांग's picture

17 Nov 2010 - 2:36 am | लंबूटांग

>>>1. पहिला आक्षेप असा असतो की या ताडपट्ट्यात काहीही लिखाण कुठल्याही भाषेत केलेले नसते. त्या कोऱ्याच असतात. भासवले असे जाते की नाडीवाचक त्यात पाहून त्यातील मजकूर वाचतो आहे....................त्यामुळे या आक्षेपातील खोटेपणा सिद्ध होतो.

लोक पण ना ..कैच्या कैच आक्षेप घेतात.. असो. मान्य त्यात काहीतरी लिहीलेले असते.

>>>2.दुसरा आक्षेप....................यावर सोपे उत्तर असे की सध्या जे नाडी ग्रंथ पट्टीवाचनाचे काम करतात ते सर्व तमिळभाषी आहेत. ते यातील मजकूर वाचून दाखवतात अणि तो मजकूर परत एका ४० पानी वहीत सध्याच्या प्रचलित तमिळ लिपित पुन्हा लिहून काढतात. यावरून त्या मजकुराची भाषा तमिळ का अन्य कोणती असावी याची खात्री करता येते.

कसे काय बॉ? नाही म्हणजे मी कोण्या अगम्य लिपीतला मजकूर मराठीत लिहीला आणि सांगितले की ती अगम्य लिपी म्हणजे मोडी भाषा आहे तर मान्य कराल का? आणि मी अगदी यथायोग्य भाषांतर केले आहे कशावरून?

>>>3.तिसरा आक्षेप....................त्यामुळे या आक्षेपात बिलकुल तथ्य नाही. हे लक्षात येते.

परत वरचीच शंका..

4. आक्षेप चौथा ...यापुढे जाऊन हैयहैयैयो त्या ताडपट्ट्यात व्यक्तीच्या बाबत अन्य तपशीलाचे उल्लेख, कसे असतात याचा अभ्यास करून या ताडपट्यांचे फोटो मिळवून यावर आणखी कार्य होणे अपेक्षित आहे.

निष्कर्ष जाणण्यास उत्सुक. मागे कोणत्यातरी लेखात वाचल्याचे स्मरते की नाडी केंद्रात photo काढू देत नाहीत आणि voice\ video recording सुद्धा करू देत नाहीत?

5. आक्षेप पाचवा.......
जर आम्हा विज्ञानवाद्यांनी नाडी ग्रंथांच्या या सत्यतेला तत्वतः मान्यता दिली तर आमच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पायाच निखळून पडतो म्हणून आम्हाला नाडी ग्रंथांच्या अस्तित्वाची दखल घेणे मान्य नाही. ही तर वैज्ञानिक विचारांशी प्रतारणा नव्हे काय?

नाही मी मान्य करायला तयार आहे पण सारासारबुद्धीला पटतील असे तर्कशुद्ध explanation मागत आहे.. असे कसे शक्य आहे हे कळण्यासाठीच सगळा खटाटोप...

सर्वात basicप्रश्न म्हणजे जुळणारी ताडपट्टी मिळाली की मग ती मला का देऊन का टाकत नाहीत? अथवा किमान पक्षी नष्ट का करत नाहीत? तेवढेच पुढील शोधकार्य सोपे नाही का?

नाही म्हणजे १००० ताडपट्ट्यांमधून १ शोधण्यापेक्षा ९९९ मधून १ शोधण्यास कमी वेळ नाही लागणार का? हा आपला आमचा common sense हो .. विज्ञाननिष्ठ कसा विचार करतात हे जाणून घ्यायला आवडेल.

शशिकांत ओक's picture

7 May 2011 - 11:01 am | शशिकांत ओक

लंबु जी,
पहिला आक्षेप 'काहीच्या काहीच' असल्याचे मान्य झाल्याने

लोक पण ना ..कैच्या कैच आक्षेप घेतात.. असो. मान्य त्यात काहीतरी लिहीलेले असते.

पुढील आक्षेपांना तुम्ही सकारात्मकपणे पहायला तयार आहात असे वाटून लिहितो.
आक्षेप दुसरा व तिसरा -

कसे काय बॉ? नाही म्हणजे मी कोण्या अगम्य लिपीतला मजकूर मराठीत लिहीला आणि सांगितले की ती अगम्य लिपी म्हणजे मोडी भाषा आहे तर मान्य कराल का? आणि मी अगदी यथायोग्य भाषांतर केले आहे कशावरून?

उत्तर - जरी कोणी अगम्य लिपीत - समजा मोडीत मजकूर लिहिलेला आहे असे म्हटले तर ज्याला मोडी भाषा येते अशा तज्ज्ञ व्यक्ती कडून त्या लिपीची फोड करून काय लिहिलेले आहे याचा साक्षमोक्ष लावता येतो. तसाच हैयोंनी कूटतमिळलिपीचा अभ्यास करून त्यातील मजकुराचा अर्थ शोधला आहे.
उरला प्रश्न त्या मजकुराचा तपशील कशाशी पडताळायचा - त्या मजकुराचे भाषांतर यथायोग्य आहे की नाही याची परीक्षा करायला ज्या व्यक्तीची ती पट्टी आहे असे सांगितले जाते त्याने ती माहिती अचुक आहे की नाही ते सांगितले तर ते कुटलिपीचे कोडे सहजी सुटते.
चौथा आक्षेप -

नाडी केंद्रात photo काढू देत नाहीत आणि voice\ video recording सुद्धा करू देत नाहीत?

उत्तर - होय. ते फोटो काढून देत नाहीत. कारण त्यांना जर वाटले की तसे फोटो काढणारे त्यांची अपकीर्ती करायला कारणीभूत होईल तर ते का देतील? समजा कोणी तुमच्या घरी जाऊन तुमची यथेच्च निंदा करायला आम्ही आलोय असे सांगितल्यावर तुम्ही त्यांना फोटो काढायला द्याल काय? माझ्याशी वाद घालायला तुम्ही हो देखील म्हणाल पण सामान्यतः आपण राजी होणार नाही.
पण याचा अर्थ ते कोणालाच फोटो काढून देत नाहीत असा होत नाही जर त्यांची खात्री झाली तर ते आनंदाने फोटो काढू देतात. नव्हे आपल्या खर्चाने फोटोग्राफरची सोयही करतात. असे अनुभवायला मिळते. उरला प्रश्न टेप रेकॉर्डींग करायचा. ते स्वतः जर सर्व नाडी पट्टीतील मजकुराचे भाषांतर आपणहून टेपकरून देत असतील तर ग्राहकाने आपल्या बाजूने ते चोरून करायची गरज नसते. तरीही कोणी आम्हाला अगदी पहिली नाडी पट्टी वाचायला लागल्यापासून टेप करायचे आहे असे सांगून केले तर त्याला ते नाही म्हणणार नाहीत.
आक्षेप पाचवा-

नाही. मी मान्य करायला तयार आहे पण सारासारबुद्धीला पटतील असे तर्कशुद्ध explanation मागत आहे.. असे कसे शक्य आहे हे कळण्यासाठीच सगळा खटाटोप...

उत्तर - सारासार बुद्धीच्या पलिकडे नाडी ग्रंथांचे सत्य आहे असे पटले तर आपण मान्य करायला तयार आहात म्हणून मी उत्तर देण्याच्या भरीला पडलो. उरला प्रश्न तर्कशुद्धतेचा - नाडीपट्टीतील लेखन हे खरोखरच त्या त्या व्यक्तीला लागू पडते कि नाही ही तर्कशुद्धतेची कसोटी आहे असे मानावे लागेल. ती जर कोणी करायला तयार नसेल तर मी काय करणार तुम्ही करायला तयार आहात. मी तशा कसोट्या करून बसलोय. पण मी त्याबाबत बोलू इच्छित नाही कारण ज्याने त्याने आपली नाडी पट्टी पाहिल्याशिवाय त्याचा विश्वास बसणे शक्य नाही असा माझा अनुभव आहे. असे म्हणणारे अनेक आहेत की ओक तुमचे अनुभव असतील लाख पण मला नाडी ग्रंथांचा जोवर अनुभव येत नाही तोवर मी ते थोतांड मानणार. म्हणून मी ज्याचा त्याने अनुभव घ्यावा असे वारंवार म्हणतो. गणिताने वा तर्काने इतक्या नाडी पट्या लिहिणे, त्यांना साठवण करायला लागणारी जागा उपलब्ध असणे शक्य नाही आदि तर्क म्हणून बरोबर आहेत पण नाडी ग्रंथांच्या सत्यते पुढे ते फिके पडतात.असा अनुभव आहे. तो आपण घेणार काय असा प्रश्न आहे.

विलासराव's picture

18 Nov 2010 - 9:20 am | विलासराव

>>>>>>>>असे म्हणणारे अनेक आहेत की ओक तुमचे अनुभव असतील लाख पण मला नाडी ग्रंथांचा जोवर अनुभव येत नाही तोवर मी ते थोतांड मानणार. म्हणून मी ज्याचा त्याने अनुभव घ्यावा असे वारंवार म्हणतो.

हे नाडीग्रंथ प्रकरण नवीनच आहे.
पण तरीही ओक यांनी दिलेली माहिती वाचुन आपली नाडी पट्टी पहावी असे वाटायला लागलेय.
पण ती खात्री करायला काय करावे लागेल?
काही फी वगैरे पडेल काय?
खरं सांगायचं तर फुकटात काम होणार असेल तरच करावं असा विचार आहे.