गाभा:
नमस्कार आपल्या सर्वांना (उशिरा का होईना) दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!,
उशिरा शुभेच्छा देण्या़चे एक कारण म्हणजे माझा आजार टायफ़ाईड. की ज्यामुळे नेटवर बसण्याची संधीच मिळाली नाही. आज वाटलं जरा बसावं नेटवर. ह्या लिखाणाचा उद्देश पण तोच आहे. मला आपल्या सर्वांकडून माहिती हवीय. टायफ़ाईड मध्ये काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल कृपया मला सांगा.
प्रतिक्रिया
14 Nov 2010 - 5:49 pm | लॉरी टांगटूंगकर
लोकांचे डोके खाऊ नये.
अभक्ष्य भक्षण आणि अपेयपान सोडून काहीही खाण्यास हरकत नसावी.शक्य तोवर एरन्डेल प्यावे .आणि बरोबर कारले आणि लाल भोपळा जोरदार खावा.
14 Nov 2010 - 5:57 pm | मीरसिका
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
16 Nov 2010 - 10:30 am | लॉरी टांगटूंगकर
16 Nov 2010 - 10:32 am | लॉरी टांगटूंगकर
फोटू टाकत होतो दिसत नाहीयेत
16 Nov 2010 - 11:00 am | शिल्पा ब
मग आम्ही काय करू?
14 Nov 2010 - 6:22 pm | चिगो
तिखट आणि तेलकट गोष्टी टाळा..खाण्यासोबतच पाण्याचीही काळजी घ्या. बाकी ते गुरगुटा भात वगैरे "पौष्टीक" आहार वगैरे सुरु ठेवा. मलाही झाला होता टायफॉईड, पण पथ्यं आठवत नाही फारशी..
14 Nov 2010 - 6:27 pm | नितिन थत्ते
तुमच्या डॉक्टरांनी काय सांगितले असेल त्याप्रमाणेच करा.
लोकांच्या सल्ल्याने वागू नका.
14 Nov 2010 - 6:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>तुमच्या डॉक्टरांनी काय सांगितले असेल त्याप्रमाणेच करा.
खरं आहे. नाही तर मी लिहिणार होतो. मुगाची दाळ खा.
मोसंबीचा रस घ्या. दूध घ्या. तळलेले पदार्थ खाऊ नका.
मसालेदार खाऊ नका. पाणी उकळून प्या. आणि महत्त्वाचं म्हणजे आराम करा. :)
-दिलीप बिरुटे
14 Nov 2010 - 6:50 pm | चिंतामणी
डॉक्टरांनी सांगीतलेल्यात मी थोडी भर घालतो. अधमोरे दह्याचे ताक प्यावे. सफरचंद खावीत. पचायला हलके पदार्थ खावेत. आणि खूप आराम करावा.
Get well soon. :)
14 Nov 2010 - 7:25 pm | नरेश_
औषधे आणि गोळ्या घ्यायला विसरू नका :) लवकर बरे व्हा.
14 Nov 2010 - 7:37 pm | सद्दाम हुसैन
कायम चुर्ण किंवा धौतियोग चुर्ण खावे.
रात्री घ्या , सकाळी ओक्के :)
14 Nov 2010 - 7:54 pm | चिंतामणी
रोगापेक्षा इलाज भयंकर आहे हा. :(
15 Nov 2010 - 11:16 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मिसळपाव टाळा ;-) !!!
16 Nov 2010 - 5:30 am | शिल्पा ब
डॉक्टरला विचारा
16 Nov 2010 - 5:37 am | आत्मशून्य
आणी तब्येतीला जपाच.
16 Nov 2010 - 5:13 pm | kalyani B
भरपुर शहाळे प्या.
16 Nov 2010 - 7:09 pm | तिमा
एक महिना पथ्य पाळा. मुगाचे वरण, मऊ भात, ताक इत्यादि. तेलकट, मिठाई, पोळी वगैरे टाळा.
वर दिलेल्या बहुतेक सूचना बरोबर आहेत, फक्त 'कायम चूर्ण' घ्यायला सांगणे हा तुम्हाला संपवण्याचा डाव आहे.
8 Jan 2014 - 12:43 am | आयुर्हित
अ रा रा रा ....
टायफ़ाईड व्हायच्या आधीच काळजी घेतली असती तर नसताना एवढा त्रास झाला.
जर तेव्हा छान छान वेळेवर जेवले असते तर नसता ना टायफ़ाईड झाला!
आता काहीही खाऊ नका. फक्त भाज्यांची गरमा गरम soup, मुगाच्या डाळीचे कढण, साबुदाण्याची(कमीत कमी दुधाची)खीर व भाताची पेज, नारळाचे पाणी, चहा खारी/बिस्किटे बस्स!
फळे,दुध,तळलेले,तिखट,पौष्टिक, जड अन्न पदार्थ घेऊ नयेत,कारण ज्वरात पोटाची पचनक्रिया मंदावलेली असते.
आपला मिपास्नेही : आयुर्हीत
8 Jan 2014 - 1:20 am | आदूबाळ
काहीही....उचलला हात आणि बडवला कीबोर्ड असं चाललंय का तुमचं आयुर्हित साहेब?
एक तर २०१० मधल्या धाग्याला २०१४ मध्ये प्रतिक्रिया देऊन तुम्ही नक्की काय साध्य करत आहात ते कळलं नाहीये. दुसरं म्हणजे "छान छान वेळेवर जेवलेल्या" एकाही मनुष्याला आजतागायत टायफाईड झाला नाहीये असं म्हणणं आहे का तुमचं?
तुमची तळमळ मी समजू शकतो. तुम्ही जी पथ्यं सांगताहात तीही बरोबर असू शकतील*. पण ती व्यक्त करायचा उत्तम मार्ग म्हणजे टायफाईडवर माहितीपूर्ण धागा काढणे - तो कशामुळे होतो, उपाय काय, पथ्यं काय वगैरे. (लेख मनोरंजकही होऊ शकेल - मलेरियासारख्या रोगावर उपचार कसे सापडले याची कहाणी कादंबरीपेक्षाही सुरस आहे. टायफाईडचंही असंच असू शकतं.)
"अभ्यासोनि प्रकटावे" हे आचरणात आणलंत तरच मिपावर तुम्हाला काही मान मिळेल, तुमची तळमळ सत्कारणी लागेल. (इस्पिकचा एक्का, जॅक डॅनियल्स, क्लिंटन यांचं उदाहरण पहा.) अन्यथा काही होणार नाही.
सल्ला अस्थानी असू शकेल, पण रहावत नाही म्हणून लिहिलं...
----------
*मी डॉक्टर नसल्याने आणि कधी टायफाईड झाला नसल्याने अनुभव नाही
8 Jan 2014 - 2:16 am | आयुर्हित
नक्कीच २०१० ला लिहिलेल्या माणसाला याचा फायदा होणार नाही.
पण
आज पासून पुढे काही वर्ष हा धागा लोक लक्षात ठेवतीलही.
नशीब त्या परमेश्वराचे तुम्हाला झाला नाही! पण कधीच कोणालाही विषमज्वर होऊ नये असे वाटले. आणि म्हणूनच हे सारे काही.... जेव्हा एखाद्यावर वेळ येते ना तेव्हा खूप हाल होतात हो, बिच्चार्यांचे.
विचार करा, एखादा सद्गृहस्थ/IT engineer कोठे तरी धावपळीत/परदेशात असेल,खाऊ घालणारा जवळचा/घरातला कोणी नाही, वरून खाण्याकडे दुर्लक्ष होत असेल तर.....
लांब कशाला जाताय, आपले सर्वांचे लाडके यश चोप्रा साहेब यश चोप्रा साहेब साध्या वाटणाऱ्या डेंगू(हाही एक ज्वरच आहे) मुळे गेलेत हो, जाता जाता भारतीय फिल्म सृष्टीचे किती तरी न भरून निघणारे नुकसान झाले.
असो. राग मानु नये व यापुढे सर्वांनी वेळेवर छान छान जेवत जाणे.
कळावे,लोभ असावा.
आपला मिपास्नेही :आयुर्हीत
8 Jan 2014 - 1:35 am | प्रभाकर पेठकर
टायफॉईड म्हण्जे मुदतीचा ताप का? ७,१४,२१ दिवसांचा? निष्णांत डॉक्टरांच्या सल्यानेच पथ्य आणि औषधांचे सेवन करावे. ताप बरा झाल्यावरही डॉक्टर सांगतील तो पर्यंत पथ्य पाळावी लागतात नाहितर पॅराटायफॉईड होतो (टायफॉईड उलटतो) असे म्हणतात की असा उलटलेला ताप भयंकर असतो. नेहमीच्या औषधोपचारांना तो दाद देत नाही.
टायफॉईड मध्ये शक्तीपात भयंकर होतो. त्यामुळे संपूर्ण बरे झाल्यावर, डॉक्टरांच्या सल्ल्याने, शक्तीवर्धनासाठी अंडी आणि पायासुप घेतात असे 'ऐकले' आहे.
8 Jan 2014 - 3:30 pm | साती
पेठकर काका, ऐकीव माहिती चुकीची आहे.
असा टायफॉईड उलटून पॅराटायफॉईड होत नाही.
टायफॉईड आणि पॅराटायफॉईडचे जंतू एकाच कुळातले आहेत.
त्यांच्या संसर्गाने आजारही सेमच होतात.
खाली एका प्रतिसादात मी चांगली लिंक दिली आहे.
8 Jan 2014 - 3:34 pm | कपिलमुनी
काका,
जनहितार्थ पायासुप ची रेशिपी टाका ना!
जागू तै ने माबो वर ही रेशिपी टाकली आहे .. हैदराबादचा पाया सूउ ते ह्येच का ?
8 Jan 2014 - 9:47 am | सुबोध खरे
टाय फोईड साठी लस मिळते ती जरूर घ्यावी. त्याने तीन वर्षे पर्यंत संरक्षण मिळते. भारतात त्याची किंमत साधारण तीनशे रुपयापर्यंत आहे. माझ्या पूर्ण कुटुंबाला मी स्वतः दर तीन वर्षांनी देतो. प्रतिबंध हा पश्चात उपायापेक्षा जास्त चांगला.
http://www.pediatriconcall.com/forpatients/vaccination/typh.asp
उत्तम आहार हा केंव्हाही चांगलाच परंतु दुर्दैवाने टायफोईड टाळण्यासाठी त्याचा काहीही उपयोग होत नाही.
8 Jan 2014 - 12:44 pm | आयुर्हित
उत्तम मार्गदर्शन.
लक्ष लक्ष धन्यवाद
कळावे, लोभ असावा.
आपला लाडका: आयुर्हीत
8 Jan 2014 - 3:36 pm | कपिलमुनी
या वर्षीपासून चालू !
विकांतालाच घेतो सर्वांना टोचून !
8 Jan 2014 - 3:27 pm | साती
टायफॉईडविषयी थोडक्यात आणि सोप्प्या शब्दात माहिती
इथे आहे.
http://www.public.health.wa.gov.au/2/601/2/typhoid_and_paratyphoid_fact_...
8 Jan 2014 - 3:34 pm | साती
आमचे शिक्षक प्रोफेसर राममूर्ती सर सांगत असत की टायफॉईड या एका आजाराने डॉक्टराना आणि लिगल इल्लिगल प्रॅक्टिसर्सना घरावर सोन्यची कौले घालायला मदत केली.
8 Jan 2014 - 4:02 pm | साती
कसे ?
तर टायफॉईडची बरीच लक्षणे व्हेग आहेत.
साधा सर्दी खोकला, श्वसनसंस्था, पचनसंस्था यांची छोटीमोठी व्हायरल आणि बॅक्टेरियल इंन्फेक्शने यांची लक्षणही जवळपास सारखी.
टायफॉईड साठी वापरली जाणारी विडाल टेस्ट फॉल्स पॉजिटीव (आजार नसतानाही पॉजिटिव) येण्याची शक्यता जास्त.
विडाल दोन पद्धतीने करतात ट्यूब आणि स्लाईड.
बर्याच ठिकाणी यातली स्लाईड पद्धत वापरतात.
जी ट्यूबपेक्षा जास्त बेभरवशाची आहे.
पेशंटना एखाद्या आजाराचे नाव ऐकायला बरे वाटते.
टायफॉईडची टेस्ट बर्याच वेळा पॉजिटिव येतेच (नेमके किती डायल्यूशनमध्ये पॉजिटिव आल्यावर पॉजिटिव म्हणायचं याचे त्या त्या भौगोलिक एरिया नुसार नॉर्म्स आहेत पण ते कुणी पाळत नाही.)
क्रमशः
8 Jan 2014 - 5:11 pm | साती
एकदा टायफॉईड आहे म्हटल्यावर डॉक्टर पेशंट दोघांचेही समाधान.
९०टक्केहून जास्त वेळा केवळ तीन ते पाच दिवसांच्या साध्या
अँटिबायोटिक्सनी टायफॉईड (खरोखर असेलच तर) बरा होतो.
उरलेल्या १० पैकी पाचांना हायफाय अँटिबायोटिक लागतील तर पाच टक्के काँप्लिकेट होतील.
मात्र नैतिक प्रॅक्टिस नसणारे डॉक्टर/ वैद्य/ आर एम पी साळ्यानाच भारीतली अँटिबायोटिक्स देतात.
पूर्वी जेव्हा योग्य अँटिबायोटिक उपल्ब्ध नव्हती तेव्हा टायफॉईडने जीवावर बेतण्यासारखे काँप्लिकेशन होत.
आतड्याला अल्सर हे त्यातील एक.
म्हणून मग पथ्य वैगेरे सांगत.
आजकाल तेच लक्षात ठेऊन काही प्रॅक्टिशनर्स किंबा नातेवाईकमंडळी रुग्णाला जीवघेणे पथ्य करयला भाग पाडतात.
मग विटॅमिन डेफिशीयन्सी होते. जास्त करून विटॅमिन बी ची कारण दूध, मांस असे सारेच प्राणिज पदार्थ बंद करतात.
त्यामुळे न्यूरोपथी, अॅनेमिया आणि फारच जास्त झाल्यास हिमोलायटिक जाँडिस होतो. (काविळ)
अगोदर टायफॉईड झाला आणि आता काविळ हे कित्तीतरी रूग्णांकडून ऐकायला मिळते.
एकूण काय टायफॉईड असो किंवा नसो, कोणत्याही तापात तुम्हाला पचेल ते कमी तिखट , मसाले इ. घालून तुम्ही खाऊ शकता.
उलट्या, अॅसिडीटी जुलाब होत असतील तर द्रवपदार्थ जास्त घ्या.
सगळे पदार्थ खाताना हायजिन मात्र पाळा.
समाप्त!
8 Jan 2014 - 6:04 pm | आयुर्हित
धन्यवाद, फार छान माहिती दिली आपण.
"अगोदर टायफॉईड झाला आणि आता काविळ" म्हणजे अती ...महा....भयानकच आहे की हो आजारी पडणे.
त्यापेक्षा प्रतिबंध केलेला केव्हाही चांगला.
कळावे, लोभ असावा
आपला मिपास्नेही: आयुर्हीत
8 Jan 2014 - 6:50 pm | बाबा पाटील
१)ज्वारीची भाकरी किंवा गव्हाचा फुलका.
२)भोपळा,दोडका ,कारले,घोसाळे,पडवळ,लाल माठ ,काटे माठ,राजगिरा,पालक,भेंडी,तांदुळचा. फक्त
३)मुगाची डाळ,मुग तांदळाची खिचडी,
४)गाइचे दुध,तुप.,गोड ताक
५)सफरचंद,मोसंबी,शहाळे,डाळिंब.
६)१५ दिवस तरी कोमट पाणीच प्यावे.
वरिल सोडुन इतर कुठलाही आहार घेउ नये.