घोटाळे इथले संपत नाही...

अवलिया's picture
अवलिया in काथ्याकूट
12 Nov 2010 - 2:33 pm
गाभा: 

घोटाळा केला म्हणुन अशोकरावांची गच्छंती झाली !

आता काही जण म्हणतात की त्यांनी नावात "राव" लावले म्हणुन सोनियाबैंनी त्यांना "जाव" म्हटले.
पण ते अंधश्रद्धाळू लोक ! त्यांच्याकडे आपण दूर्लक्ष करावे.

अशोक राव गेले पृथ्वीराज आले.
स्वच्छ चेहर्‍याचा मनुष्य महाराष्ट्राच्या भूमीवर राज्य करेल असे स्वप्न राहुलबाबांनी दाखवले.
जनता आतुर झाली आणि फुलापाकळ्यांचा वर्षाव करुन वर्षा चे दार उघडले !

हळुच अजितदादांनी भुजबळांच्या भुजांमधले बळ काढुन घेतले पण मंत्रीपदाची शपथ देऊन बांधुन ठेवले.

हा इतिहास जूना नाही.
सगळं कसं पद्धतशीर आणि व्यवस्थित चालू होतं पण म्हणतात ना काही जणांना हे पाहवत नाही.
तेच झालं.
ओबामांनी ज्या माहिती अधिकाराचे गोडवे गायले त्याचाच वापर करुन काही लोक नव्या सरकारला त्रास देत आहेत.
अल्लाह अशा काफरांना मिरचीची धुरी देवो.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6913045.cms

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

12 Nov 2010 - 2:49 pm | नितिन थत्ते

मस्त किस्सा.

पश्चिम महाराष्ट्रातले असलेल्या आणि दिल्लीत मंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना वडाळ्यात फ्लॅट घ्यायची काय आवश्यकता पडली याचीही माहिती घ्यायला हवी.

बाकी ते पृथ्वीराज चव्हाण हे नव्हेत असा खुलासा यायची शक्यता आहेच. ;)

शेवटचा प्रश्न: फेब्रुवारी २००९ मध्ये माहितीच्या अधिकारात मिळवलेली माहिती नोव्हेंबर २०१० मध्ये जाहीर करण्याचे कारण? :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2010 - 2:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>बाकी ते पृथ्वीराज चव्हाण हे नव्हेत असा खुलासा यायची शक्यता आहेच
हा हा असेही होऊ शकते. :)

माहिती अधिकाराचा उपयोग चांगला होतोय असे म्हणायला हरकत नाही.
स्वच्छ निष्कलंक,वगैरेवर सध्या दैनिकांची पानं भरुन वाहताहेत.

शेवटचा प्रश्नाला उत्तर : या प्रकरणात नांदेडचा हात आहे असे म्हणायचे आहे काय ? :)

-दिलीप बिरुटे

कुंदन's picture

12 Nov 2010 - 3:17 pm | कुंदन

नांदेडचा हात असणारच.
बारामतीचा नसावाच.

रन्गराव's picture

12 Nov 2010 - 3:04 pm | रन्गराव

भारी जमलं आहे :)

चिरोटा's picture

12 Nov 2010 - 3:10 pm | चिरोटा

ते पृथ्विराज हे नव्हेत म्हणजे? चितौडच्या पृथ्विराज चौहानांचा तो फ्लॅट आहे असा खुलासा नाही आला म्हणजे मिळवली.
फेब्रुवारी २००९ मध्ये माहितीच्या अधिकारात मिळवलेली माहिती नोव्हेंबर २०१० मध्ये जाहीर करण्याचे काय कारण?
हा महत्वाचा मुद्दा आहे. बहुतेक 'साहेबांनी'नी आधीच गृहपाठ करुन ठेवला असावा.चव्हाण दिल्लीहून उतरल्या उतरल्याच कार्यकर्त्यांना कामाला लावले.असो.
कायदेशीर बघायचे तर हा घोटाळा कसा काय होवू शकतो?सी.एम. कोट्यातला फ्लॅट कायदेशीररीत्याच घेतलाय.
(नैतिक्/अनैतिक आपण नंतर बोलूया!)

श्रावण मोडक's picture

12 Nov 2010 - 3:24 pm | श्रावण मोडक

हाहाहाहा... लई भारी.
या पृथ्वारीजांच्या आईचा पत्ता काय दिला आहे हे या बातमीत का नाही हे मात्र कळत नाही. शिवाय काही पत्रकारांनीही असे फ्लॅट मिळवले आहेत म्हणतात. त्यांची नावे, त्यांचे उत्पन्न का येत नाहीये या बातम्यात हेही कळत नाही. असं म्हणतात की आदर्शमध्येही एका मातब्बर पत्रकाराच्या बहिणीचा फ्लॅट आहे. तेही नाव पुढं का येत नाही कळत नाही. शिवाय, या मुख्यमंत्रीवाटपातील एकूणच गेल्या पंधरा वर्षातील याद्या का येत नाहीत बाहेर हेही कळत नाही.
काही कळत नाही बॉ आपल्याला तरी... :)

चालायचंच, बडे बडे राज्योमे ऐसी छोटी छोटी बाते होती रेहती है!

अनामिका's picture

12 Nov 2010 - 5:54 pm | अनामिका

http://www.starmajha.com/NewDiscussionReply.aspx?ForumID=14399
या दुव्यावरील बातमी वाचुन पुर्ण होत न होते तोच मिपावर हि बातमी वाचायला मिळाली
हाय रे कर्मा!इथेही अपेक्षाभंगच पदरी पडावा !

गांधीवादी's picture

12 Nov 2010 - 6:44 pm | गांधीवादी

पहिले पाढे पंचावन्न.....................

माहिती अधिकाराचे कार्यकर्ते अनिल गलगली यांना जीव गमवावा नाही लागला म्हणजे नशीब.
नाहीतर हे 'पांढरे दहशतवादी' कधी हल्ला करून खेळ खतम करतात ते कळत नाही.

माहिती अधिकाराचे कार्यकर्ते अनिल गलगली यांना जीव गमवावा नाही लागला म्हणजे नशीब.
नाहीतर हे 'पांढरे दहशतवादी' कधी हल्ला करून खेळ खतम करतात ते कळत नाही.

जिन्हे नाज है हिंद पर वो कहा है !

नगरीनिरंजन's picture

12 Nov 2010 - 10:01 pm | नगरीनिरंजन

च्यायला, सरळ सरळ गेमागेमी चालू आहे अन आपण बघायचा नुस्ता तमाशा.

चिरोटा's picture

13 Nov 2010 - 12:15 am | चिरोटा

फ्लॅट खासदार कोट्यातून मिळाला होता. गरीब कोट्यातून नाही.
हिं.टा.ची बातमी (http://www.hindustantimes.com/Chavan-may-return-flat-in-Mumbai-alloted-t... )
मिड-डे वाले म्हणता आहेत- फ्लॅट गरीब कोट्यातून मिळालाय-
The price of the said property was over Rs 40 lakh, but Chavan was allotted the flat for a mere Rs 4 lakh under the 5 per cent quota of the chief minister, reveals the RTI

प्रेस ट्रस्ट् वाले/सी.एम. म्हणता आहेत- खासदार कोट्यातून.
खासदार कोट्यातून असेल तर त्यात बेकायद्शीर म्हणता येणार नाही.
साला,हा आर्.टी.आय. सगळ्यांचीच झोप उडवणर बहुतेक!

विनायक प्रभू's picture

13 Nov 2010 - 1:07 pm | विनायक प्रभू

अवलियाचे अ‍ॅप्लीकेशन रिजेक्ट झाले होते काय?