लेखाला काय नाव देऊ सुचतच नव्हतं..शेवटी आज सकाळी पाहिलेला प्रकार होता म्हणून आजची सकाळच देऊ अस ठरवलं.
असो...
झाल काय नेहमीप्रमाणे मी ऑफिस ला जायला निघालो . ऑफिस अगदी सातासमुद्रापलीकडे असल्यामुळे( अस मला वाटत) बस ची वाट पाहत होतो ( बस हि ऑफिस ची आहे ) तर सहज समोर लक्ष गेल... सकाळी सकाळी पुण्यात रस्ते झाडणारे सफाई कामगार दिसतातच... एक स्त्री आणि एक पुरुष दोघे मिळून रस्ता झाडत होते... त्यांच्या निरीक्षणावरून अस दिसत होत कि त्याने रस्ता झाडव आणि तिने कचरा गोळा करून हातात असलेल्या भल्या मोठ्या dustbin मध्ये तो कचरा टाकावा... पण चित्र काही विचित्रच होत. रस्ता दुभाजकाला लावलेल्या फुल झाडांमध्ये ती तो गोळा केलेला कचरा टाकत होती... आणि dustbin चक्क रिकामा होता.हे दृश्य मी अगदी ५ मिनिट पाहिलं असेल तेवढ्या वेळात त्यांनी २-३ ठिकाणी झाडून कचरा त्या फुल झाडांमध्ये टाकला. बिचारी ती झाडं, काय वाटल असेल त्यांना सकाळी सकाळी छान पाणी मिळव , छान सूर्यप्रकाश मिळावा, पण त्याऐवजी काय ? तर क च रा !!
मी माझ्या एका मित्राला हे दाखवले सुद्धा... हे पाहून मला काही सुचलंच नाही... का बर तिने अस कराव? तिला dustbin जड होईल अस वाटल असेल म्हणून कि तिला कंटाळा आला होता म्हणून कि , आजवर कोणी टोकाल नाही म्हणून , कि तिला काही घेण देन नाही म्हणून ह्या विचारानेच मनात काहीतरी वेगळीच घालमेल झाली. तेवढ्यात आमची बस आली आणि मी ऑफिसला निघालो .
हा माझा पहिलाच लेख आहे. त्यामुळे सांभाळून घ्या. लेखन अजून कसे नीट असावे हे पण सुचवा... :-)
प्रतिक्रिया
12 Nov 2010 - 11:47 am | नितिन थत्ते
कंपोस्ट खत बनावे म्हणून फुलझाडात कचरा टाकत होती.
12 Nov 2010 - 11:55 am | झक्कास...
अहो ते मला पण कळल हो...
पण कचऱ्यासोबत प्लास्टिक पण होत ना
12 Nov 2010 - 11:57 am | पंख
कंपोस्ट खत वाटरप्रुफ होण्यासाठी त्यात प्लॅस्टीकचा कचराही मिसळला असावा..
12 Nov 2010 - 12:08 pm | रन्गराव
१. जॉब सेक्युरीटी: शहरातले नागरीक सुज्ञ झाल्यामुळे आजकाल रस्त्यावर फारसा कचरा येत नसावा. रस्ते अस स्वच्छ राहू लागले तर ह्या गरीबांच्या पोटावर पाय. त्यामुळे ते सकाळी हा कचरा दुभाजकांमध्ये टाकतात आणि रात्री सर्व लोक झोपल्यावर पुन्हा रस्त्यावर विसकटात ( आयटीमध्ये नाही का बग असलेल प्रोडक्ट रीलीज करून नेक्स्ट व्हर्जन बनवत तसं)
२. पर्वा नाही- ह्याच्या कामाची कोणी दखल घेत नाहीत अशी त्यांची भावना बनली असेल आणि किती साफ केले तरी पूढच्या तासाभरात शहर पून्हा घाण टाकतेच रस्त्यावर. जॉब सॅटीस्फॅक्शन नसल्यामुळे ते अस करत असावेत.
12 Nov 2010 - 12:36 pm | चिरोटा
नविन मुख्यमंत्र्यांना जाब विचारायला हवा.
पुण्याचे पालक मंत्री कोण आहेत?