श्री. शरद यांच्या दर्शने या लेखमालेदरम्यान झालेल्या साद-प्रतिसादात संतांची समाधी याबद्दलच्या माझ्या वेगळ्या दृष्टीकोनात, प्रियालीताई म्हणतात त्याप्रमाणे, मी पिल्लू सोडले सोडले होते. प्रशांत, बिकांनी पुराव्यासहीत याबद्दल लिहीण्याचा आग्रह केला आहे; म्हणून मी हे लिहायला बसलो आहे. पण संपादकांच्या सूचनेवरून केलेल्या या लिखाणामुळे सर्वांचीच माझ्यावर इतराजी होऊन या आयडीलाच जीवंत समाधी दिली जाईल की काय अशी शंकाही मनात आहे. पण विचारा विचारात खेळ न गमावता लिहीतोच. मी मांडणार असलेल्या संतांच्या समाधी (ही समाधी म्हणजे ध्यानात लागणारी समाधी नाही तर जीवंत समाधी, जलसमाधी, अग्निसमाधी, जैन धर्मियांतील संथारा/ यम सल्लेखना व्रत वगैरे स्वत:चे अस्तित्व संपवण्याचे प्रकार) बाबतच्या दृष्टीकोनाला कसलेही कागदोपत्री पुरावे नाहीत. पण इतिहासातच काय अगदी तीन-चारवर्षांपूर्वीच्या काळातही या घटना घडून गेल्या आहेत; घडत आहेत, त्यांची पिढ्यान पिढ्या चालत आलेली परंपरागत विश्लेषणे आपल्याकडे आहेत. ती किती खरी मानायची किती खोटी मानायची हा ज्याची त्याची बाब आहे. पण झालेल्या आग्रहाचा विचार करता मी हा दृष्टीकोन मांडत आहे; अर्थातच त्यावर युजी कृष्णमूर्तींच्या विचारांचा प्रभाव आहे; आणि याबद्दलचा माझा दृष्टीकोन व्यापक ठेवायचा प्रयत्न केला आहे (नाहीतरी "अपुरी माहिती असताना उगाच मुक्ताफळे उधळतो", "फक्त करमणुकीसाठी साद-प्रतिसाद चाललेत", "दगडावर डोके आपटले तर फुटण्याचीच शक्यता अधिक" वगैरे चर्चा खरडवह्यांतून होतच आहे). असो.
तर मूळ विषय आहे समाधिस्थ लोक ! का घेतात हे लोक समाधी? किंवा आपण असे म्हणू हे लोक त्यांच्या जीवनातील एका विशिष्ट पॉईंटवर स्वत:चे अस्तित्व का संपवतात? सावधान! ही चर्चा उठसूठ आत्महत्त्या करणार्या आम आदमीबद्दल नाही तर पोहोचलेल्या लोकांबद्दल आहे.
(१) सर्वप्रथम अगदी अलिकडचे उदाहरण घेतो. औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील वडजी हे गाव. जशी महाराष्ट्रातील आजकालची गावे असतात तसेच हेसुध्दा - वारकरी, "धार"करी, सुष्ट-दुष्ट वगैरे सगळ्यांचा भरणा असलेले. याच गावचा एक भक्तीमार्गी तरूण - कृष्णा भांड (आता कृष्णा महाराज), पांडूरंगाचा भक्त, स्वत: शेती करणारा, अभंग वगैरे लिहीणारा, किर्तनरंगी रंगणारा, पांडुरंगाची भक्ती करावी, व्यसने करू नयेत, आईवडीलांना सुख द्यावे वगैरे गोष्टी लोकांना सांगणारा. चांगला चारधाम यात्रा करून आला. शेतात काम करतानाच याने एके ठिकाणी लाकडे जमा करून ठेवली. जवळपासच्या लोकांना वाटले ठेवली असतील आपली सहज. पण त्या दोन-चार दिवसांतच हा गावात, मित्रमंडळीत अखेरच्या निरोपाचे बोलणे करू लागला - "मला पांडुरंगाचं बोलावणं आलंय, मी लवकरच जाणार" वगैरे सांगू लागला. गावात सायंकाळच्या वेळी सगळ्यांना भेटला, बोलला, जवळच्या नातेवाईकांसोबतही मनमोकळे बोलणे केले आणि - दुसर्या दिवशी शेतात स्वत:च जमवलेल्या लाकडांची चिता रचून त्यावर रॉकेल टाकून ती पेटवली आणि त्यात त्याने स्वत:ची जीवनयात्रा संपवली !
(२) ही गोष्ट सात-आठ वर्षांपूर्वीची. उस्मानाबाद जिल्ह्यातील बालाघाटच्या डोंगररांगातील कुंथलगिरी नावाचे एक गाव. जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र. जैन मुनी, साध्वी यांचे स्थानक. त्यातलेच एक वयोवृध्द, तपोवृध्द मुनी. यांनी यम सल्लेखना घेतली. यम सल्लेखनेचा प्रकार थोडक्यात असा की सर्वप्रथम काही दिवस अन्नत्याग करायचा - फळांवर दिवस काढायचे. मग काही दिवसांनंतर फळेही बंद. पुढचे दिवस फक्त पाण्यावर काढायचे. या महिनाभराच्या काळात शरीरातला सगळा मेद विरून जातो. कातडी हाडांना चिकटते. शरीरातील हाडांचा फक्त पिंजरा तेवढा उरतो. मग पाणीही बंद. निसर्ग आपले कार्य उरकतो आणि प्राण शरीर सोडून उडून जातो! हे मुनीही गेले.
(३) आळंदी! इंद्रायणीचा रम्य तीर. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी या नावाचा एक तरूण. वयाच्या सोळाव्या वर्षी संस्कृत भाषेत असणारी भगवद्गीता मराठीत सांगणारी ‘ज्ञानेश्वरी’ लिहीली. त्यानंतर स्वत:चा अमृतानुभव लिहीला. तीर्थयात्रा केली. एकवीसावे वर्ष लागले होते. आध्यात्मिक/लौकिकातील जो-जो अनुभव घेता येणे शक्य होते तो पूर्ण झाला होता. भागवत धर्माचा पाया रचून झाला होता. संतपद गाठले होते. ज्ञानेश्वरांना संजीवन समाधीचे वेध लागले. लोकांना तसे बोलून दाखवले. आणि एक दिवस ज्ञानेश्वर संजीवन समाधीत प्रवेशले!
वर दिलेल्या समाधीच्या तिन्ही उदाहरणांसमोर का? हा प्रश्न ठेऊन पहा. काय उत्तर मिळते? फ्री वील? पण तशी फ्री वील तर आत्महत्या करून घेणार्या लोकांचीही असतेच ! की सगळे यश मिळवून झाल्यानंतर येणारे वैराग्य? की जग बदलत नाही म्हणून जगाबद्दल मनात निर्माण झालेला तिटकारा आणि त्या तिटकार्याचे स्वत:वर आलेले बुमरॅंग?
मला हा लौकीक/आध्यात्मिक जगतातील यश मिळवून मोकळा झालेल्या "सेल्फ" चा रिव्हर्स इफेक्ट - बुमरॅंग वाटतो. इथं ध्यान आणि भक्ती मार्गाबद्दल थोडीशी चर्चा करावी वाटतेय. ध्यानमार्गी साधकाचा अवलोकन विषय स्वत: तोच ! आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी (ही समाधी "ती" नव्हे) हा ध्यानमार्ग. या मार्गाने समाधीपर्यंत गेल्यानंतर, आणि आलेले अमृतानुभव सांगून झाल्यानंतरही पुढे नैसर्गिक मृत्यू घडेपर्यंत सुखाने कालक्रमणा का न व्हावी?
भक्तीमार्गीयांचेही हेच! दिवसरात्र नामस्मरण, ईश्वरसंकिर्तन, भजन-पूजन मग कुठेतरी ईशदर्शन - ते ईशदर्शन सतत, सर्वकाळ हवे असणे - देव (असलाच तर!) काही तेवढा रिकामा नसणे मग यांनीच देवाकडे जाण्यासाठी एक दिवस अग्निसमाधी घेणे किंवा जलसमाधी घेणे!
हे कृपया ७ मिनीटे ३८ सेकंदांपासून पुढे पाहा
यु सी, मेडीटेशन इज वन ऑफ दी वर्स्ट टेक्नीक दॅट पीपल आर प्रीचींग ... नोबडी हॅज डन सिरीयसली मेडीटेशन धीस इज व्हाट आय पॉईंट आऊट टू दी पीपल.. इफ यू हॅव मेडीटेटेड व्हेरी सिरीयसली फॉर लॉंगर पिरीयड्स दॅन दे क्लेम दॅट दे हॅव डन दे वील आयदर एंड अप इन दी लूनी बीन्स, सिंगीग लूनी ट्यून्स ऑर मेरी मेलडीज ऑर कमिट स्यूसाईड .. जम्प इन्टू दी रिव्हर.. मेनी ऑफ दोज सेजेस इन इंडिया हू प्रॅक्टीस्ड योगा, हू प्रॅक्टीस्ड मेडीटेशन टेक्नीक्स.. दे ऑल कमिटेड स्यूसाईड.. अॅण्ड दे कॉल दॅट जलसमाधी...
करा आता कुटायला सुरूवात !
प्रतिक्रिया
12 Nov 2010 - 7:03 am | अविनाशकुलकर्णी
सावरकरांनी इच्छा मरण स्वीकारले होते..त्याला काय म्हणायचे? फ्री विल?
16 Nov 2010 - 1:17 am | विकास
सावरकरांनी इच्छा मरण स्वीकारले होते..त्याला काय म्हणायचे? फ्री विल?
त्याला प्रायोपवेशन म्हणतात. तेच विनोबा भाव्यांनी देखील केले होते. त्यांच्या वेळेस इंदीरा गांधींनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता हे आठवते. दोन्ही बाबतीत, हे जग सोडायची इच्छा करून आणि प्रायोपवेशनाला सुरवात करून मृत्यू येण्यामधे किमान वीसपंचवीस दिवसांचा कालावधी होता. आत्महत्याच करायची असती तर इतकी निवांतपणे केली नसती... सावरकरांनी त्यांच्या "आत्महत्या की आत्मार्पण" ह्या लेखात म्हणले होते, "धत्योहं धत्योहं कर्तव्यं मे न विधते किंचित – धन्योहं धन्योहं प्राप्तव्यं सर्वमाद्य संपन्नम". मी धन्य धन्य झालो आहे. माझे कोणतेही कर्तव्य करावयाचे उरलेले नाही आणि जे जे मिळवायचे ते सर्व मला प्राप्त झाले आहे.
विनोबांनी पण त्यांची भुमीका अशीच काहीशी स्पष्ट केल्याचे आठवते आहे.
16 Nov 2010 - 6:08 am | चतुरंग
प्रायोपवेशनच. हे करण्यासाठी असामान्य धैर्य हवे. "माझे पुरेसे जगून झाले आहे, आता करण्यासारखे काही राहिले नाही" असे ठरवून माझ्या आजोबांनी सुद्धा प्रायोपवेशन केले होते. हळूहळू आहार कमी करत शेवटी शेवटी फक्त पाणी आणि मग एकदिवस प्राणत्याग. कोणत्याही क्षणी भुकेमुळे तळमळून किंवा आप्तांच्या आग्रहापुढे इच्छाशक्ती ढासळू शकते. जबर आत्मबल असलेल्या व्यक्तीच असं करु शकतात. ही आत्महत्या खचितच नव्हे. कोणत्याही निराशेने किंवा असहाय्यपणाने हे होत नाही तर जीवितकार्य सफल झाले आहे आता जगण्याची आवश्यकता नाही हे ठरवून मगच प्रायोपवेशनाचे पाऊल उचलले जाते.
रंगा
12 Nov 2010 - 7:04 am | अडगळ
डीडी कोसंबी यांनी ज्ञानदेवांच्या समाधीला आत्महत्या म्हटल्याचे या अनुषंगाने आठवले. (पुराणकथा आणि वास्तवता , डीडी कोसंबी)
अर्थात त्याचा संदर्भ वेगळा होता .
बाकी ध्यान करणार्यांचा शेवट कसाही होवो , त्यांचा आयुष्याचा प्रवास ध्यानामुळे कितपत सुसह्य वा असह्य झाला हे महत्त्वाचे असे वाटते.
बोधी वृक्षाखाली सावलीत दाढी करणारा (अडगळ)
12 Nov 2010 - 7:29 am | प्रियाली
वरील तीनही उदाहरणे माझ्या वाचनातली आहेत. त्यामुळे तुमचे संदर्भ योग्य आहेत.
बाकी समाधीबद्दलचे मत मला ठीक वाटले. प्रतिपक्षाचीही काही मते असतील तर ती ऐकायला आवडतील. विशेषतः काही माणसांना एक जन्मही आपल्या कार्यासाठी पुरेसा वाटत नाही. आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्याला अमुक करता आले नाही किंवा तमुक कार्य राहून गेले ही खंत त्यांना वाटते. (इथेही सामान्यांचे उदाहरण घ्यायचे नाही. असामान्यांचेच घ्यायचे आहे आणि यासंबंधात एक लेख हल्लीच वाचला. कुठे ते आता अजिबात लक्षात येत नाही.) अशी माणसे आणि आपले कार्य पूर्णत्वाला गेले म्हणून नैसर्गिक मृत्यू टाळणारी माणसे यांच्यातील विरोधाभासाचे आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही.
असो.
तुम्हाला सांगितले होते की संदर्भांसहित लेखन व्हावे, असे असताना खालील वाक्यही योग्य संदर्भांच्या आधारे यायला हवे होते.
पण संपादकांच्या सूचनेवरून केलेल्या या लिखाणामुळे सर्वांचीच माझ्यावर इतराजी होऊन या आयडीलाच जीवंत समाधी दिली जाईल की काय अशी शंकाही मनात आहे.
अशी वाक्ये लेखातून टाळणे योग्य राहिल असे वाटते.
12 Nov 2010 - 8:49 am | यकु
>>>>>>पण संपादकांच्या सूचनेवरून केलेल्या या लिखाणामुळे सर्वांचीच माझ्यावर इतराजी होऊन या आयडीलाच जीवंत समाधी दिली जाईल की काय अशी शंकाही मनात आहे.
आमी काय विनोद बिलकुलच करायचा नाही की काय??
12 Nov 2010 - 5:03 pm | प्रियाली
अवश्य करा पण मग तो विनोद आहे असा डिस्क्लेमर असायला हवा कारण लेखाची उर्वरित शैली गंभीर आहे. असो. आता आपण तसा खुलासा केला हे बरे झाले.
12 Nov 2010 - 8:06 am | रन्गराव
उदाहरणे चांगली दिली आहेत. पण एक गोष्ट समजत नाही. हे लोक नेहमीच जर आपल्यापेक्षा जास्ती हुशार (तुमच्या शब्दात पोहोचलेले) असतील तर त्यांच्या समाधीमागचा हेतु आपल्या छोट्याश्या खोपडीत कसा काय घुसेल? म्हणजे बघा खोटे बोलणे वाईट. हे सर्वांना माहीत असते पण तरीही ते आपण टाळू शकत नाही. लोभ हा अजून ही वाईट पण तरीही आपण सर्वजण पैशाच्या मागे पळत असतोच. ईतक्या साध्या सोप्या गोष्टी आपल्या मंद बुद्धीला झेपत नसतील तर ज्यांनी ह्या आणि अजूनही कठीण गोष्टी आचरणात आणल्या त्यांच्या कृतींवर विवेचन जरा ........ म्हणजे अस बघा नुकतेच आकडेमोड करायला शिकलोय आणि फर्माज लास्ट थिअरम चुकीचा आहे असा सांगन हे जितका विसंगत होईल तितकच चुकीच आहे.
आता चित्रफितीमधल्या योगाबद्द्लच्या कमेंट बद्द्ल. हे फक्त योगाबद्द्ल नाही तर कुठल्याही कले बद्द्ल आणि अगदी गणिताबद्द्लही बोलता येईल. ज्या ज्या लोकांनी गणितातले ओपन प्रॉब्लेम्स वर काम केल किंवा गणितात फार मूलभत शोध लावले. त्यांच आयुष्य अभ्यासल तर अस लक्षात येईल की त्यांच आयुष्य फार सुखासुखी नव्हत. रामानुजन, मिनकॉस्की, गॅल्वा, गॉस, आणि अगदी अलिकदची उदाहरण द्यायची झाली तर पेरील्मन, टेड केझिंस्की ( युनिव्हर्सिटी बाँबर http://en.wikipedia.org/wiki/Ted_Kaczynski) ह्यांच आयुष्य ही आपल्या मानदंडानुसार फार हालाखीच होत. मग योगाशी समानता काढून ह्या चित्रफितीतल्या गुरूंच्या म्हणन्यानुसार गणित ही शिकवण बंद कराव का?
12 Nov 2010 - 8:12 am | शुचि
+१
>> त्यांच्या समाधीमागचा हेतु आपल्या छोट्याश्या खोपडीत कसा काय घुसेल?>>
अगदी हाच विचार मी करत होते. लहान बाळाला जसं मोठ्यांच्या कृती कळत नाहीत तद्वतच आपल्याला या महानुभावांच्या कृतींचा थांग लागणं अशक्य आहे.
आपण बोबडं देखील बोलू शकत नाही आपण टॅहँ टॅहँ करतोय आणि हे लोक प्रकांडपंडीत आहेत ..... कशी कळणार आपल्याला त्यांची भाषा?
12 Nov 2010 - 8:39 am | रन्गराव
अहो हा तूमच्या आवडीचा विषय आहे. आणि तुमचा बर्यापैकी अभ्यासही आहे ह्याबद्द्ल.
अशी छोटी प्रतिक्रिया नाही द्यायची. सविस्तर मत लिहा आणि आणि आम्हा दुरीतांची तिमिर दूर करा. शुचि ह्यांच्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी जागा आरक्षित :)
12 Nov 2010 - 8:44 am | यकु
हो हो! शुचिताईंना विनंती की याबाबत ज्ञानेश्वरांचीच एखादी ओवी वाचनात आली असेल तर कृपया अर्थासह ती द्यावी..
12 Nov 2010 - 10:29 pm | आत्मशून्य
आप्ल्याला ह्या ओवीचा अर्थ काय हे कधी डोक्यातच शिरले नाही. म्हणजे "जो जे वान्छील तो ते लाभो" ते सूदध्दा समस्त "प्राणीजात" ? आता जगाच्या ज्ञात अज्ञात इतिहासात किन्वा अगदी पूराणात असे मूळात घडलेच कधी आहे की सार्वानाच जे जे हवे ते ते मीळाले ?
12 Nov 2010 - 8:22 am | यकु
रंगराव,
तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या समाधीमागचा हेतू आमच्या लहानशा खोपडीत घुसू शकत नसला तरी त्यांचे ते असे अचानक निघुन जाणे नक्कीच आमच्या (किमान माझ्या ) खोपडीत घुसलेय.
तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या समाधीमागचा हेतू आमच्या लहानशा खोपडीत घुसला नसेल, आणि तुमच्या मोठ्या खोपडीत घुसला असेल तर कृपया जरा सांगा.. त्यासाठीच चर्चा सुरु केलीय.
जनरल विधानं करू नका. आपली मंदी बुध्दी काय प्रकार असतो? एकतर तुमची मंद बुध्दी म्हणा किंवा माझी मंद बुध्दी म्हणा.
एवढ्या साध्या प्रश्नासाठी कुणाच्याच सल्ल्याची गरज नाही. आणि ते चित्रफितीतले गुरू वगैरे नाहीत बरं!
12 Nov 2010 - 8:32 am | रन्गराव
हे काय हो एकनाथ, आपण एकाच बाजूला आणि फ्रेंड्ली फायर मध्ये मारले जाणार काय?
तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या समाधीमागचा हेतू आमच्या लहानशा खोपडीत घुसू शकत नसला तरी त्यांचे ते असे अचानक निघुन जाणे नक्कीच आमच्या (किमान माझ्या ) खोपडीत घुसलेय.
तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या समाधीमागचा हेतू आमच्या लहानशा खोपडीत घुसला नसेल, आणि तुमच्या मोठ्या खोपडीत घुसला असेल तर कृपया जरा सांगा.. त्यासाठीच चर्चा सुरु केलीय.
हेच म्हणायच आहे. इथं "आपण" हे तुम्हला किंवा मला आदरार्थी म्हणून नव्हे तर आपल्या सारख्या सर्व न पोहोचलेल्या लोकांसाठी लिहिल आहे. आणि मंद बुद्धी हे उपहासत्मक आहे. खर तर चुकलच थोडं. "व्यवहारीक बुद्धी" अस लिहायल हव होत. भावना दुखावल्याबद्द्ल माफी मागतो.
आणि तो विषय माझ्या खोपडीतही घुसलेला नाही हे वेगळ सांगायची गरज नसावी आता.
एवढ्या साध्या प्रश्नासाठी कुणाच्याच सल्ल्याची गरज नाही. आणि ते चित्रफितीतले गुरू वगैरे नाहीत बरं!
फक्त एक तर्क मांडायचा होता. तुम्हाली चुक ठरवायच नव्हतं असो परत एकदा माफी मागतो. :)
12 Nov 2010 - 8:27 pm | नगरीनिरंजन
ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली, तुकारामांचे सदेह वैकुंठगमन झाले म्हणजे खरोखर काय काय घडले हे आपण ठामपणे सांगू शकत नाही. ज्ञानेश्वरांचा मृत्यु त्यांनी स्वतःहून जवळ केला आणि तुकारामांचा अज्ञात ठिकाणी आणि अज्ञात प्रकारे झाला किंवा करविला एवढंच अनुमान आपण काढू शकतो. वैकुंठ नावाचा प्रकार आहे आणि तुकाराम महाराज खरोखरच तिकडे गेले अशी ठाम श्रद्धा असणार्यांनी पुढे वाचण्याचे कष्ट घेऊ नयेत.
जरी आपल्याला नेमकं काय झाल ते माहिती नसलं तरी त्यांच्या व त्यांच्या समकालीनांच्या साहित्यातून त्यांच्या मनःस्थितीचा आणि विचारसरणीचा मागोवा घेऊन आपण अंदाज करू शकतो. त्यासाठी काही गोष्टींबद्दलचे पूर्वग्रह काढून टाकले पाहिजेत. पहिला म्हणजे, हे संत थोर होते म्हणून त्यांचं माणूसपण नाकारू नये. ते कितीही महान असले तरी एखादे विशिष्ट जीवनकार्य करण्यासाठी आपण पृथ्वीवर जन्मलो आणि ते झाले की आपण निघून जायचे असा त्यांचा स्वतःबद्दल समज असणे दुरापास्त आहे. त्यांच्या साहित्यातही ते कधी असा आव आणताना दिसत नाहीत. दुसरा म्हणजे, सगळे संत एकाच प्रकारचा विचार करून समाधी घेतात असं असेलच असं नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती. आणि तिसरा म्हणजे, आत्महत्या ही आत्महत्या असते. थोर संताने केली म्हणून ती उदात्त आणि सामान्य माणसाने केली म्हणजे हीन असं काही नसतं.
ज्ञानेश्वरांच्या समाधीबद्दल लिहीताना नामदेव म्हणतात,
कलियुगी जन आत्याती करिती |
साहवेना की यासी काही केल्या ||
नामा म्हणे आता देहासी विटला |
स्वरुपी पालटला ज्ञानदेव||
यावरून आपण असं म्हणू शकतो की ज्ञानदेवांवर स्वतःवर झालेले आणि इतर पीडितांवर होणारे अन्याय, अत्याचार यामुळे ते विटून गेले असणार. शिवाय ते बुद्धीमान होतेच आणि गीतेचे भाषांतर करण्यासाठी त्यांनी गीता पूर्णपणे समजावून घेतली होती. आयुष्याचं क्षणभंगुर रूप समजलेला आणि मोहाच्या प्रत्येक क्षणाला एक पुनर्जन्म मानणार्या कोणत्याही बुद्धीमान माणसाला प्रचंड विरक्ती आली नाही तरच नवल. या विरक्तीतूनच त्यांनी देह त्यागण्याचे म्हणजेच प्रचलित भाषेत आत्महत्या करण्याचे ठरवले असावे. पण ती त्यांनी उघडपणे सर्वांसमोर का नाही केली त्याचं कारणही त्यांनी दिलं आहे.
हे विपायें आगीत पडे | तरी भस्मचि होऊनि उडे |
जाहले श्वानां वरपडे | तरीं तें विष्ठा ||
.....
.....
कां झाकिलिये घटीचा दिवा | काय जी नेणो जाहला केव्हा |
तिये रीती पांडवा | देह ठेवी ||
म्हणजेच मृत्युबद्दल आपल्याला घोर अज्ञान आहे तर मृत्युही अज्ञात ठिकाणी अज्ञात वेळी झाला पाहिजे म्हणजे जर मृत्युनंतर काही घडत असेल तर ते समजेल ही कल्पना. नाहीतरी जाळला तरी राख आणि कोल्ह्या कुत्र्यांनी खाल्ला तरी विष्ठाच होणार देहाची. म्हणजे यात पुनर्जन्म किंवा विठूला भेटणे वगैरे काही भानगड लिहीली नाही आहे.
तुकाराम महाराज ही असेच विरक्त. मरणाबद्दल त्यांनी स्पष्ट लिहूनच ठेवलं आहे.
आपुले मरण पाहिले म्या डोळा |
तो झाला सोहळा अनुपम |
आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने |
सर्वात्मकपणे भोग झाला ||
यातही काही विमान, वैकुंठ आणि विठूची भेट असा प्रकार नाही. आहे तो फक्त जीवन आणि मृत्युबद्दलचा समभाव. विरक्तीच्या एका बिंदूवर पोचल्यावर मॅट्रिक्समध्ये निओला जसे सगळीकडे आकडे दिसतात तसं भोवतालच्या विश्वाचं बेगडी रूप समोर आल्याशिवाय राहात नाही.
विशेष म्हणजे, ज्या संतांना प्रस्थापित समाज घटकांचा त्रास झाला त्यांनाच अशी अपार विरक्ती आलेली दिसते. म्हणजे या समाधीमागे इतर काहीही चमत्कारिक प्रकार नसून केवळ दु:ख आणि दैन्य पाहून आलेल्या विरक्तीमुळे जीवनयात्रा संपवण्याचा हेतू आहे असे म्हणायला भरपूर वाव आहे.
बाकी यशवंत यांनी दिलेल्या त्या उदाहरणातला तरूण जर विठूला भेटायला जातो म्हणून चितेत शिरला असेल तर त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असावा असे वाटते.
12 Nov 2010 - 9:05 pm | यकु
नगरीनिरंजन,
तुमचा ओव्यांसहित दिलेला विस्तृत खूपच प्रतिसाद भावला. मी विषय मांडलाय किंवा आपले मत जुळते म्हणून नव्हे, तर खरंच वरच्या निस्पृह प्रतिसादाला दादच द्यायला पाहिजे - तशी मी ती देतो.
तो जो तरूण होता, तो महाराष्ट्रातल्या एका नामवंत प्रकाशकाचा पुतण्या होता. आता ते अग्निसमाधिस्थ महाराज आहेत आणि त्यांच्या अभंगाचे ग्रंथ, त्या तरूणावरची कादंबरी वगैरे त्याच प्रकाशकांकडून प्रसिध्द झालेली आहे. विशेष म्हणजे हे प्रकाशक अ.निं.स. वाल्या दाभोलकरांचे अगदी जानी दोस्त! पण काय करता, चालायचंच.
12 Nov 2010 - 10:21 pm | प्रियाली
आवडला.
13 Nov 2010 - 6:58 am | यशोधरा
नगरी निरंजन, तुमचा प्रतिसाद अतिशय आवडला.
13 Nov 2010 - 10:01 am | राघव
प्रतिसाद आवडला. :)
संत म्हणजे काय? ज्याची देहबुद्धी मेली आणि तरिही लोकांत आहे तो संत. कारण असे झाले की स्वतःसाठी जगण्याचे त्यांना काहीही कारण उरत नाही. मग ते लोकांत कशासाठी आहेत? कोणतेतरी विशिष्ट कार्य करण्यासाठी. जीवन्मुक्त म्हणतात ते हेच असावे.
देहबुद्धी म्हणजे काय? अहंकाराला जन्म देते ती विचार-आचार शृंखला म्हणजे देहबुद्धी.
अहंकाराचे मूळ कशात? स्वामित्व भावनेत. श्रीतुकाराम महाराजांच्या दृष्टीनं स्वामी म्हणजे पांडुरंग.
संत कार्य करतात ते या प्रकारच्या स्वामित्व भावनेत.
मी करतोय असे ते म्हणतात ते वेगळे अन् आपण सामान्य जन म्हणतो ते वेगळे ते या ठिकाणी.
आपुले मरण पाहिले म्या डोळा |
तो झाला सोहळा अनुपम |
आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने |
सर्वात्मकपणे भोग झाला ||
ह्या ओवीकडे त्या दृष्टीनं बघायला हवं. ह्या ओवीत या देहबुद्धीच्या मरण्याच्या क्षणाचे वर्णन आहे.
जेव्हा आपण संतांच्या एखाद्या बोलण्याचा विचार करू तेव्हा त्यांनी कोणत्या भावात ते म्हटलंय हे खूप महत्त्वाचे आहे नाही तर अर्थाचे अनर्थ होतात.
12 Nov 2010 - 8:22 am | रन्गराव
"पिल्लू सोडल आहे", "अपुरी माहिती असताना उगाच मुक्ताफळे उधळतो", "फक्त करमणुकीसाठी साद-प्रतिसाद चाललेत", "दगडावर डोके आपटले तर फुटण्याचीच शक्यता अधिक" अशा कमेंट्स जास्ती सिरियस्ली घेवू नकात. दोन परिस्थित अशा कमेंट्स येतात- १. अस लिहिणार्यानच फ्क्त तुम्हाला डिवचून पिल्लू सोडायच असत किंवा करमणूक करून घ्यायची असते. ;) २. (हे जरा जास्ती गंभीर आहे पण मिपा वर काही अंशी होत खरं) विरोधकांचे तर्क संपलेले असतात.
आणि लेख किंवा आयडीला समाधी मिळण्याबद्द्ल म्हणाल तर त्याच लॉजिक कुणाला समजलय अस वाटत नाही. नानांनी काही मंत्र सांगितला होता त्याचा उपयोग होतोय का बघा फार काळजी वाटत असेल तर ;)
12 Nov 2010 - 9:37 am | राघव
काय बोलता? असे खरेच एकही उदाहरण नाही की जे सर्वोच्च समाधी अवस्थेत पोहोचल्यानंतर जास्त काळ जिवंत राहिले नाहीत? बरे ते असो.
मला जरा काही शंका आहेत. तुम्ही दूर करू शकाल.
युजींचे स्वतःचे त्यांच्या कलॅमिटीच्या अवस्थेबद्दल काय म्हणणे आहे? ती अवस्था म्हणजे नक्की काय ते जाणून घ्यावेसे वाटले. तुमच्या लेखांमधे मागे तुम्ही संदर्भ दिलेला पण जरा माझ्या सोयीसाठी आत्ता परत देऊ शकाल काय?
युजींनी या अवस्थेनंतर, जेव्हा लोक त्यांच्याकडे जायला लागलेत तेव्हा, सर्व गोष्टींनाच नाकारणे सुरू केलेले. युजींवरच्या लेखमालेतल्या शेवटच्या लेखामधे बहुदा तुम्ही उल्लेख केला होतात. ते का असे करत असावेत याबद्दल तुमचे स्वतःचे काय मत आहे?
12 Nov 2010 - 12:26 pm | प्रशु
एकनाथ राव तुमचा खरा मुद्दा हा आहे कि तुम्ही हे सगळ यु जी च्या चष्म्यातुन पहाता. त्या मुळे तुम्हाला हे सर्व संत, त्यांची वागणुक, शिकवण हि टाकाऊ अथवा बिनकामाची वाटते. हेच आपण यु जी बद्द्ल देखिल म्हणु शकु. ह्याचा काय पुरावा आहे की यु जी म्हणतात तेच सत्य आणि बाकी सर्व मिथ्य...
मुळात काय, एक हत्ती आणि चार आंधळे..
बा़कि तुमच्या लेखाने धुराळाबिराळा बिलकुल उडाला नाहि हो....
12 Nov 2010 - 4:10 pm | प्रियाली
मला वाटतं लेखकाचं नाव यशवंत आहे. एकनाथ हे बहुधा त्यांच्या वडिलांचे नाव असण्याचा संभव आहे.
हे खरेच आहे. पक्ष आणि प्रतिपक्ष आपापल्या बाजू लढवत असतात त्यामुळे यशवंत यांच्या मताचा प्रतिवादही योग्य संदर्भांनी यायला हवा. समाधी घेणार्या महानुभावांनी आपली भूमिका मांडली असल्यास वाचायला आवडेल.
खरे आहे. अद्याप तरी धुरळा उडालेला नाही पण उडणारच नाही याची ग्यारंटी देता येत नाही.
12 Nov 2010 - 5:36 pm | रन्गराव
खरे आहे. अद्याप तरी धुरळा उडालेला नाही पण उडणारच नाही याची ग्यारंटी देता येत नाही.
काय बेत आखलाय की काय वादळ वगैरे उठवायचा? तस असल तर सांगा, फुटाणे आणि लाह्या तयार ठेवतो ;)
12 Nov 2010 - 8:01 pm | प्रशु
सर्वप्रथम चुकीचे नाव लिहिल्याबद्द्ल यशवंतरावांची माफी मागतो..
समाधी घेणार्या महानुभावांनी आपली भूमिका मांडली असल्यास वाचायला आवडेल.
अहो प्रियालीताई, समाधिस्त महानुभाव आप्ली भूमिका मिपावर मांडणार कुठुन? त्यांचा समाधितस्थळात ल्यपटोप, आंतरजालिय जोडणी आणि मदतनीस म्हणुन कोणाला पाठवायचे? चला एक गोष्ट तरी ईथे स्वीकारली जातेय कि त्या महानुभावांची पण काहि एक तात्विक भुमिका आहे. हे ही नसे थोडके..
आता रहाता राहिला धुराळ्याचा प्रश्न, यशवंतरावांनी मागच्या भागात जो धुराळ्यचा दावा केला होता तो अगदीच पुचाट निघाला....
12 Nov 2010 - 8:53 pm | यकु
नावात काय विशेष नाही हो - माफी वगैरे मागू नका.
खाली उत्तर दिलं आहे!
12 Nov 2010 - 10:01 pm | प्रियाली
मी त्यांनी मिपावर येऊन भूमिका मांडावी असे लिहिलेले नाही. त्यांनी भूमिका मांडली असल्यास म्हणजे कधी लेखनातून, अभंग ओव्यांतून समाधीची मीमांसा केली असल्यास (ती प्रतिपक्षाने )मिपावर मांडावी.
आपल्या विधानांतील अधोरेखीत गोष्टी दुर्लक्ष करण्याजोग्या आहेत.
अशा विषयांवर चांगली चर्चा कशी होऊ शकते त्याचे चांगले उदाहरण नगरीनिरंजन यांनी दिलेले आहे.
12 Nov 2010 - 10:32 pm | प्रशु
त्यांनी भूमिका मांडली असल्यास म्हणजे कधी लेखनातून, अभंग ओव्यांतून समाधीची मीमांसा केली असल्यास
आणि नसेल मांडली असेत तर आता मांडावी आशी तुमची अपेक्षा आहे का? तुम्हाला मी मांडलेल्या गोष्टी दुर्लक्ष करण्याजोग्या वाटत असतील तर जरुर करा काहि आग्रह नाहि पण फक्त संतांनी समाधी घेतली म्हणुन त्यांची आत्महत्या करणार्यां लोकांबरोबर तुलना करणे हे जरा हास्यास्पद आहे आणि म्हणुन हा प्रतिक्रिया प्रपंच..
12 Nov 2010 - 10:34 pm | llपुण्याचे पेशवेll
फक्त संतांनी समाधी घेतली म्हणुन त्यांची आत्महत्या करणार्यां लोकांबरोबर तुलना करणे हे जरा हास्यास्पद आहे आणि म्हणुन हा प्रतिक्रिया प्रपंच
याच्याशी सहमत...
12 Nov 2010 - 10:36 pm | प्रियाली
मला काय म्हणायचे ते मी स्पष्ट वर लिहिले आहे तर हा पुढचा प्रश्न कशासाठी? वादासाठी वाद घालायचा म्हणून वाटेल ते बोलताय का?
मला हास्यास्पद वाटत नाही म्हणूनच चर्चा व्हावी असे वाटते.
12 Nov 2010 - 11:50 pm | प्रशु
प्रश्न ज्ञानेश्वरांचा नाहि असे कसे तुम्ही म्हणु शकता? बाकिच्या दोघांचा तो आहेच पण तो ज्ञानेश्वरांचा देखील आहेच ना. आणि ह्याच तिघांनी तथाकथीत आत्महत्या केल्या आणि बाकींच्यांच काय ? त्यांच्या बद्द्ल मी विचारले असता ते सर्व ह्या चर्चेत बसत नाहित असे धागा लेखक म्हणत आहेत. चर्चांच करायची आहे ना मग करा ना.
समाधी म्हणजेच आत्महत्या असा नविन अर्थ रुजवण्याची तुमचा अट्टाहास का?
प्रतिसादातील लेखाशी संबंधित प्रश्नांखेरीज अन्य प्रतिसाद संपादित.
धन्यवाद.
-संपादक मंडळ
13 Nov 2010 - 12:56 am | प्रशु
प्रशु यांनी कृपया वैयक्तिक स्वरूपाचे आरोप-प्रत्यारोप येथे करू नयेत असे सुचवतो. हा प्रतिसाद आणि पर्यायाने , त्याच्या अनुरोधाने आलेले इतर प्रतिसाद संपादित करण्यात येत आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा.
- संपादक मंडळ.
12 Nov 2010 - 8:56 pm | यकु
प्रियालीताई, धन्यवाद!
आहे!
12 Nov 2010 - 6:59 pm | यकु
प्रशु,
मी आजपर्यंत बरेच चष्मे वापरून पाहिले.
सर्वात शेवटी युजी आणि कंपनीचा चष्मा वापरतोय हे खरं!
तुम्ही आठवण केलीत म्हणून सहज आता पाहिले तर या चष्म्याला काचाच नाहीत!
नुसत्या चौकटी!
तरीही सुस्पष्ट दिसू लागलंय; चष्मा वापरायची काहीच गरज राहीली नाही मग.
बादवे, तुमच्या चष्म्याचे मॅन्युफॅक्चरर कोणते?
12 Nov 2010 - 8:30 pm | प्रशु
आहो सर्वात शेवटी काय म्हणताय... उद्या अजुन एखादा नविन चष्मा तुम्हाला मिळणार नाहि ह्याची काय हमी? आणि चष्म्याला काचा नसल्या तरी चौकट आहेच ना. आता दृष्टी स्वच्छ झालीच आहे तर ती चौकट पण फेकुन द्या की.
आता वळुया तुम्ही दिलेल्या उदाहरणांकडे,
एक वारकरी, दुसरे जैन मुनी आणि तिसरे ज्ञानेश्वर अशी तीन उदाहरणे देऊन तुम्ही असे भासवित आहात कि हे समस्त संत एकदा का ज्ञानप्राप्ती झाली कि लगेच देहत्याग करतात (तुमच्या संकल्पने नुसार आत्महत्या). हा दावा अतिशय फसवा व निखालस खोटा आहे हे कोणालाहि लगेच जाणवेल. तुमच्या माहिती दाखल खाली काहि नावे देतो जे संत म्हणुन प्रसिध्द आहेत आणि त्यांनी अश्या आत्महत्या केलेल्या नाहित. उदा. स्वामी समर्थ, गजानन महाराज, माणीक प्रभु, गो॑तम बुद्ध, येशु क्रिस्त आणी ईत्तर. ह्या महानुभावांन बद्द्ल तुमचे काय म्हणणे आहे.
रहाता राहिला माझ्या चष्म्याचा प्रश्न, तर मला कोणताच चष्मा आजुन नाहि. खुप कमी वाचन केलय मी. पण तरी मला असे वाटते की वर उल्लेखलेल्या सर्व व्यक्ति अगदी युजी स़कट, त्यांनी तशी साधना अथवा काय म्हणाल ते कष्ट केले आणि त्यांना जे काहि वाटले ते त्यांनी व्यक्तिसापेक्श सांगितले अथवा आचरणात आणले.
अमुक एक जण म्हणतो म्हणुन दुसरा चुकिचा असे दाखवणारा चष्मा वा चौकट काय कामाची आणि त्यावर उगाच धुराळा उडवण्याचा बाता का माराव्या.
12 Nov 2010 - 8:49 pm | यकु
फुकट सल्ल्याबद्दल आभार. माझा प्रतिसाद चष्मा काढून वाचलात तर दिसेल की मी तो चष्मा वापरून त्याला काचाच नसल्याने, आणि कुठलाही चष्मा न वापरताही स्पष्ट दिसू शकत असल्याने तो फेकून दिला आहे.
मी काहीही भासवीत नाहीय. माझं जे मत आहे ते स्पष्ट लिहीलं आहे. ते जे वर संत दिलेले आहेत - "दे आर नॉट इन क्वेश्चन फॉर दी मोमेंट!" कालच्या विषयाच्या अनुषंगानं ही चर्चा सुरू केली आहे. अनावश्यक वादात मला रस नाही. त्या महानुभावांबद्दल मला विचारू नका. सो सर, यूज यूवर ओन ब्रेन.
अभिनंदन! आपणावर कधीही चष्मा वापरण्याची वेळ येऊ नये हीच सदिच्छा. धुराळा उडवण्याचा दावा मी केलेला नाही, उलट - कशाला धुरळा उडवायचा असा प्रश्न मी विचारला होता- होऊनच जाऊद्या म्हणणारे तेच का तुम्ही? बाता का माराव्या? याच प्रश्नाचं उत्तर, तुम्ही दिलंत तर, मला तुमच्याकडूनच ऐकायला आवडेल.
12 Nov 2010 - 9:20 pm | प्रशु
मी काहीही भासवीत नाहीय. माझं जे मत आहे ते स्पष्ट लिहीलं आहे. ते जे वर संत दिलेले आहेत - "दे आर नॉट इन क्वेश्चन फॉर दी मोमेंट!" कालच्या विषयाच्या अनुषंगानं ही चर्चा सुरू केली आहे. अनावश्यक वादात मला रस नाही. त्या महानुभावांबद्दल मला विचारू नका. सो सर, यूज यूवर ओन ब्रेन.
चांगली पळवाट शोधलीत. काय म्हणे तर हे लोक नॉट इन क्वेश्चन फॉर दी मोमेंट, पण मुळ मुद्दा जो होता कि ज्ञानप्रातिनंतर संत तुमच्या भाषेत आत्महत्या करतात, हा तुमचा दावा निकालात निघाला म्हणुन पळुन जाताय? लोकांना त्यांचा मेंदु वापरायचा सल्ला देता मग वापरु द्याना उगाच त्यांच्या चष्म्याबद्द्ल का उठाठेव करता...
धुराळा उडवण्याचा दावा मी केलेला नाही, उलट - कशाला धुरळा उडवायचा असा प्रश्न मी विचारला होता- होऊनच जाऊद्या म्हणणारे तेच का तुम्ही? बाता का माराव्या? याच प्रश्नाचं उत्तर, तुम्ही दिलंत तर, मला तुमच्याकडूनच ऐकायला आवडेल.
कशाला धुरळा उडवायचा हा प्रश्न तुम्हीच कालच्या दर्शने मध्ये विचारला होतात. होय, आणि होऊनच जाउद्या म्हणणारा मीच आहे पण ज्या आविर्भावात तुम्ही म्हटलं होतं ते वाचुन अस्मादिकांची अशी भावना झाली कि काहितरी भयानक सत्य बाहेर पडणार आहे पण कसलं काय नि कसलं काय....
12 Nov 2010 - 10:39 pm | यकु
चष्म्याचा उल्लेख सर्वप्रथम तुमचा आहे. आणि कसला दावा आणि कुठे निकालात निघाला हो? जे जसं दिसलं तसं मी मांडलं, त्याला इतरांनी सहमती दर्शवली - विषय संपला. हां, तुमच्या मनात नक्कीच खळबळ होतेय ती तुम्हाला मान्य नाही - आणि दुसर्यांना पळपुटा म्हणून मोकळे. स्वामी समर्थ, गजानन महाराज, माणीक प्रभु, गो॑तम बुद्ध, येशु क्रिस्त आणी ईत्तर वगैरे लोकांना तुम्ही इथं आणलंत आणि त्यांच्याबद्दल माझं मत विचारलंत - त्यांच्याबद्दल काय इथंच उप-लेख लिहीत सुटू आणि धाग्याचा बोर्या वाजवू काय? म्हणून म्हणालो युज युवर ओन ब्रेन्स. मी केलेली तुमच्या म्हणण्याप्रमाणं उठाठेव तुम्हाला दिसू शकलीय, तर प्रतिसाद देण्याची उठाठेव तुम्ही करायला नको होतीत - पण तुम्ही केलीत. प्रत्येकाचीच घडण तशी असते त्याला कोण काय करणार?
तुमची अपेक्षेप्रमाणं एटरटेन्मेंट करू शकलो नाही त्याबद्दल खेद वाटतो.
माझ्यापुरतं तुमचं बोलणं निकालात निघालेलं आहे. त्यामुळं मी तुमच्यापुरता आता मी शांत बसतो. जन्मभर साद-प्रतिसाद चालू शकतात - पण तेवढा वेळ तुमच्याकडंही नसेल अशी आशा आहे माझ्याकडेही नाही ही फॅक्ट आहे.
चर्चेत हिरीरीनं भाग घेतल्याबद्दल धागाकर्ता म्हणून तुमचे आभार मानतो.
12 Nov 2010 - 11:24 pm | प्रशु
तुमच्या सत्याची वेगळी बाजु मी मांडायचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याला 'नॉट इन क्वेश्चन फॉर दी मोमेंट'' ठरवुन मोकळे होता हा पळपुटेपणा नाहि तर काय आहे. ज्ञानप्राप्तीनंतर संत आत्महत्या करतात हा तुमचा दावा नव्हता काय आणि तो मी उदाहरणासकट खोडुन काढला तर त्याला तुम्ही माझी नसती उठाठेव ठरवुन मोकळे होताय हा कुठचा न्याय.
ज्ञानेश्वरांच्या समाधीला एक न्याय आणि इत्तरांना वेगळा अशी सोयीची भुमीका तुम्ही कसे काय घेऊ शकता? मी ज्यांना ह्या धाग्यात खेचुन आणले आहे ते पण संतच होते आणि त्यांनीहि समाधीच घेतली पण फरक येवढाच की त्यांनी ती त्यांच्या ज्ञानप्राप्तिनंतर बर्याच कालावधीने घेतली पण तुम्ही त्यांना ह्या धाग्यात सामिल करुन घ्यायला तयार नाहित का ते तुमचं तुम्हालाच ठाऊक..
आणि हो माझ्या जडणघडणी वर टीका (कि टिका) करणे म्हणजे विषय सोडुन माझ्यावर खाजगी शेरेबाजी करुन ह्या धाग्याचा बोरया कसा वाजेल अशी तुम्ही स्वतःच सोय करुन ठेवली आहे,
आत्महत्या आणि समाधी ह्यांना समानार्थी शब्द म्हणुन मान्यता देण्याचा तुमचा हेतु आहे काय?
12 Nov 2010 - 2:35 pm | रणजित चितळे
वेदांतुन, शास्त्रांतुन, उपनिषदांमधुन, गीतेतुन कधीही टोकाची भुमिका घ्या असे प्रतिपादिले नाही. टोकाचे वैराग्य, टोकाचा संन्यास, टोकाचा उपवास, टोकाची व्रते, टोकाची कर्मे, टोकाचा निस्वार्थीपणा ह्याला विरोधच नाही तर ते तामसी कर्म मानले गेले आहे. उलट माणसाने जगात राहुन, जगाच्या चांगल्या गोष्टींचा अस्वाद घेउन, कर्म न सोडता, प्रसन्न व आनंदी राहुन आपली सदसदविवेक बुद्धी हळु हळु कशी वाढवावी व आत्म्याची उन्नती कशी करावी व त्यासाठी कसे जगायचे हेच प्रत्येक ठिकाणी प्रतिपादिले आहे.
12 Nov 2010 - 7:28 pm | विलासराव
चांगला चारधाम यात्रा करून आला. शेतात काम करतानाच याने एके ठिकाणी लाकडे जमा करून ठेवली. जवळपासच्या लोकांना वाटले ठेवली असतील आपली सहज. पण त्या दोन-चार दिवसांतच हा गावात, मित्रमंडळीत अखेरच्या निरोपाचे बोलणे करू लागला - "मला पांडुरंगाचं बोलावणं आलंय, मी लवकरच जाणार" वगैरे सांगू लागला
यशवंतराव,
आत्त्ताच चारधाम यात्रा करुन आलोय. जरा विरक्ती आल्यासारख पन वाटायला लागलय. पुढे काय वाढुन ठेवलय कळायला मार्ग नाही.
अवांतरः घेउ का काय समाधी?
12 Nov 2010 - 7:32 pm | यकु
नकं, नकं !!!
एडी वैनीचं कसं व्हनार ऽऽऽऽऽ!!!!
असं नका करू देवा!!
12 Nov 2010 - 7:38 pm | विलासराव
>>>>>>>नकं, नकं !!!
आता तर घ्यावीच वाटतेय.
>>>>>>एडी वैनीचं कसं व्हनार ऽऽऽऽऽ!!!!
हे त्या पांडुरंगालाच माहीत.
12 Nov 2010 - 7:34 pm | रन्गराव
खरच विरक्ती लागली असती तर मिपावर काथ्या कुटण्याऐवजी देवळात टाळ कुटायला गेला असता. दोन चार दिस गेले की सगळी विरक्ती उतरेल ;)
12 Nov 2010 - 7:41 pm | विलासराव
खरच विरक्ती लागली असती तर मिपावर काथ्या कुटण्याऐवजी देवळात टाळ कुटायला गेला असता. दोन चार दिस गेले की सगळी विरक्ती उतरेल
स्वानुभव कि काय?
12 Nov 2010 - 7:47 pm | रन्गराव
मग काय उगाच थापा मारतोय अस वाटल की काय. लहानपणी कुठली तर गरीब अभ्यासू पोराची गोष्ट वाचली की कसा चार दिवस आपल्याला पण अभ्यास करावस वाटायच आणि जरा चार दिवस सरले की हायच की धुडगुस ;) ईरक्तीच पण असच असतय!
12 Nov 2010 - 8:00 pm | विलासराव
>>>>>>>चार दिवस आपल्याला पण अभ्यास करावस वाटायच आणि जरा चार दिवस सरले की हायच की धुडगुस ईरक्तीच पण असच असतय
खरय.
12 Nov 2010 - 10:53 pm | आत्मशून्य
जिवनमूक्त (enlightenment) अवस्था मिळाल्यानन्तर एकाद्याचा खून झाला काय, अपघात घडला काय, किन्वा त्याने आत्महत्या केली काय, अथवा नैसर्गीक म्रुत्यू झाला काय ... त्याला सर्व सार्खेच.
व्हीडीओमधे यू.जी बूवाबाजि बद्दल खरेच चान्गले आणी सत्य बोलोतो आहे, पण क्रूपया enlightenment मिळनारे आत्महत्या करतात असा गैरसमज करून घेउ नका, कारण की सगळेच तसे वागत नाहीत. अत्यन्त समजूतदारपणे डोळस्पणे हे वीषय बघावेत.
12 Nov 2010 - 11:59 pm | अर्धवटराव
>>ही चर्चा उठसूठ आत्महत्त्या करणार्या आम आदमीबद्दल नाही तर पोहोचलेल्या लोकांबद्दल आहे.
यशवंतराव,
तुम्ही एका इंटरेस्टींग चर्चेला सुरूवात केली आहे. वरील वाक्यात "पोहोचलेल्या लोकांबद्दल" आपण जो उल्लेख केलात त्याबद्द्ल कुतुहल म्हणुन मी थोडंफार वाचन केलं आहे. खरं सांगायचं तर अंमळ झोप यायची ते सगळं वाचताना. जाड जूड शब्द आणि तसलेच न कळणारे अर्थ. मनाची सम अवस्था काय, चेतनेची उच्च पातळी काय, सुख्-दु:ख समान मानणे काय.. बरं हे शब्द तरी ओळखीचे वाटतात.. काहि काहि शब्दांचा तर अगदीच अर्थभेद होत नाहि, उदा. सहस्त्राकार चक्र वगैरे. मग असा प्रश्न पडायचा कि हे सगळं ज्याना उमगलं त्यांच्या वागण्यात तरी एकवाक्यता पाहिजे ना. ते ही नाहि. समर्थ रामदासस्वामी शेवट पर्यंत सामाजीक कार्य करत राहिले, तर ज्ञानदेवांनी स्वतःला भुयारात कोंडुन घेत जगाचा निरोप घेतला. क्रियायोगवाले योगानंदांचे शरीर तर म्हणे त्यांचे देहावसान झाल्यावर महिनाभर ताजे-तवाने होते म्हणे. (त्याचा लिखीत पुरावा देखील वाचला. असं होतं तर सरळ सरळ आणखी महिनाभर जीवंत रहायचं ना...). टिळकांनी गीतारहस्यात म्हटले कि ज्ञानोत्तर अवस्थेत (म्हणजेच हि "पोचलेली" अवस्था काय? टिळकच जाणे)देखील संन्यास वगैरे भानगडीत न पडता अखंड कर्तव्यरत रहावे, तर कोणि म्हणतं कि संसार असार आहे तेव्हा ज्ञानी माणसाने गुपचाप चंबुगबाळे गुंडाळुन जंगलाचा रस्ता धरावा. ते कोण ते गोंदवलेकर महाराज गुरुनिष्ठेला पात्र होताना जिवाची पर्वा करत नाहित तर तुमचे यु.जी. रमणमहर्षींचं मोक्षाचं आव्हान बघुन, ते स्विकारण्या ऐवजी पळुन जातात. कोणी ओव्या, अभंग, ग्रंथ लिहीतात तर कोणी वेड्यापिश्यासारखं जीवन जगतात. कोणि नैतिकतेचा पाठ पढवतात तर तुमचे यु.जी. सारखे लोक सगळ्या नैतिकता वगैरे झूठ आहे , आई ही मॉन्स्टर आहे-तिचा वध करा.. असलं काहितरी भयंकर बोलतात.
हे असं का? हा "पोहोचलेपणा" नक्की काय असावा? का काहि लोक त्यामागे जिवाचं रान करतात? तुम्ही काल "पाठीच्या मणाक्यात जाळ होतोय, डोकं १००० किलोचं झालय" असं काहि तरी म्हणालात... हे सुद्धा त्या पोहोचलेपणाच्या मार्गाचं लक्षण आहे काय?
असो... मुद्दा असा, कि सामान्य लोकांच्या भाषेत हा "पोहोचलेपणा" तुम्ही समजाउन सांगु शकाल काय? कुणाचाहि संदर्भ न देता.. तुमच्या यु.जींचा देखील नाहि. एकदा या "पोहोचलेपणा"ची व्याख्या पक्की झालि कि मग त्या अवस्थेतील लोक असं जीवन अर्ध्यावरच का सोडतात याचा विचार करता येईल.
(हरवलेला) अर्धवटराव
13 Nov 2010 - 7:14 pm | आत्मशून्य
सहमतना:)
14 Nov 2010 - 4:43 pm | यकु
मी सुध्दा कुतूहल म्हणूनच वाचन सुरू केलं होतं आणि नंतर प्रयोग. ज्याचं वाचून झोप येते त्याचं वाचत राहून जाग येण्याची शक्यता किती ते सांगता येत नाही. ही चक्रे वगैरे फार अद्भुत प्रकार नाहीत. त्या सगळ्यांच्याच शरीरात इन बिल्ट असलेल्या डॉर्मंट ग्लॅण्ड्स (निरूपयोगी ग्रंथी) च काम काय आहे आणि त्या कशासाठी तिथे आहेत हे सायन्सला अद्यापही उमगलेलं नाही. इकडे, पौर्वात्य देशांत आणि विशेषत: भारतात ध्यान वगैरे प्रकारांतून त्या ग्रंथी पुन्हा सक्रिय करायच्या आणि सगळ्या मानसिक-शारीरिक गुंत्यांतून बाहेर पडायच (थोडक्यात मुक्त व्हायचं) हा हजारो वर्षांपासून चालत आलेला पायंडा आहे.. भक्तीमार्ग म्हटला तरी त्यात मानसिकताच हॅमर होत असते आणि त्याचा शरिरावर परिणाम होतोच.. त्यामुळं ध्यान आणि भक्तीमार्ग हे दोन विरूध्द कोन दिसत असले तरी ते एकाच त्रिकोणाचे आहेत.. मग फरक कसला? (हे थोडं अवांतर झालंय.. पण होऊद्या आता काय..)
ज्यांना उमगलं त्यांच्या वागण्यात एकवाक्यता नसली तरी चालेल कारण समोरच्या ऑडीयन्सच्या आणि त्या-त्या काळातील गरजेच्या कलेनं सगळे प्रकार होत गेलेले आहेत.. आणि पुन्हा "मला उमगलेले अमके आणि मला उमगलेले ढमके" टाईप पुस्तके लिहिणार्या/टीका लिहीणारे जुने काळचे आचार्य आणि आजच्या लेखकांमुळंही बराच बोर्या वाजलेला आहे.. कारण जो-तो स्वत:च्या मानसिकतेतून, त्या-त्या कुवतीनुसार समजून घेत असतो आणि बोलत असतो पण ते काही फायनल पिक्चर असू शकत नाही... ते स्वत: पाहायचंच असेल तर मारूतीच्या बेंबीत स्वत:चंच बोट घातल्याशिवाय मार्ग नाही
युजींना रमण महर्षींनी आव्हान नव्हतं दिलेलं, मी तुला मोक्ष देऊ शकतो - पण तु तो घेऊ शकतोस काय असा प्रश्न रमण महर्षींनी केला आणि जो मोक्ष देण्याची पात्रता बाळगतो त्यानं असला अजागळ प्रश्न विचारणं, विशेषत: सगळं करून बसलेल्या माणसाला असा प्रश्न विचारणं युजींना खटकलं आणि "मी कुणा दुसर्याकडून तो घेऊच शकत नसेल तर खड्ड्यात गेला तो मोक्ष" अशी प्रतिक्रिया होऊन युजी निघुन आले... नैतिकतेचा पाठ देण्याबाबत आणि नैतिकता वगैरे झूठ आहे याबाबत बोलायचं तर या दोन्ही गोष्टीत कसलाच फरक नाही... कोणताही माणूस जीवन आणि त्याच्या सर्वव्यापी विकराल हातातून सुटून कुठे जाऊ शकणार? अठराही पुराणे हरिसी गाती...
युजीपूर्व "पोहोचलापणा" हा पूर्णत: मानसिक रूपांतरणावर आधारित होता. म्हणजे पोहोचलेला माणूस कसाही असो, फक्त बोलणं सुंदर असलं की संपलं ! पण युजी हे एकच असं उदाहरण आहे ज्याचं मानसिक रूपांतरण घडूनही, बुध्दांची अवस्था अनुभवूनही तेवढ्यावरच त्यांनी समाधान मानलं नव्हतं... ते आणखी पुढे खोदत गेले आणि पुढे मग शरीराच्या प्रत्येक पेशीचाच स्फोट घडून युजींची ती मानसिकताही मृत पावली आणि ती मानसिकता ज्या शरीरात होती ते शरीरही मृत पावलं.. काही काळच.. आणि नंतर ते शरीर जीवंत झालं तेव्हा तिथं माणूस नव्हताच... फक्त माणूस नसलेलं जीवंत शरीर आणि त्याची कार्य.. त्याला कसले नियम लागत नव्हते, नैतिकतेची बंधानं लागत नव्हती.. त्यामुळे युजी अद्भुत आहेत.. आणि हे रॅशनलही वाटतं.. कारण प्रत्येकाची मानसिकता शरीरात असते आणि शरीर त्या मानसिकतेकडूनच ऑपरेट होत असतं.. म्हणून ते दोन्हीही रूपांतरीत होणे हाच आणि केवळ हाच मापदंड मी मानतो. त्यांनी उपदेश देणे/ शिष्यवर्ग तयार करणे वगैरे भानगडी न करता जे आहे, जसं आहे त्याबद्दल अगदी मनगटानं शेंबूड पुसणार्या पोराच्या प्रश्नालाही शिव्या घालत का होईना पण उत्तरे दिली.... आणि झाल्या गोष्टीचं प्रस्थ न माजवण्याचा अलिखित नियम अगदी मृत्यू होईपर्यंत युजींकडून पाळल्या गेलाय..
माझ्या बाबतीत सुरू झालेल्या लक्षणांबद्दल मी काही सांगू शकत नाही आणि कुणी काही सांगितलं तर ते फक्त " आणखी वाट पहा" यापेक्षा जास्त काहीही नसतं. कारण या प्रक्रियांचा अगदी ठाम रोडमॅपच कुणाकडे नसतो..कारण जाणते लोक हे आकाशात उडालेल्या पक्ष्यासारखे आहेत... कुठून उडाले त्याचा माग काढून फायदा नाही कारण पुढचा मार्ग हवेतला आहे..
सध्यातरी "पोहोचलेपणा" म्हणजे काय ते सांगायला मी अगदीच अपात्र आहे, नेहमीच अपात्र राहिन. कारण कुठलाही नियम बनवला की खेळ,खलास! कुणाचाही संदर्भ द्यायचा नाही असं ठरवलं तर नथिंग टू से, नथिंग, नथिंग.. ओन्ली नथिंग थाऊजण्ड टाईम्स.. बोलबच्चनपणा करून दुकानदारी सुरू करायचा समाजमान्य पर्याय माझ्याकडे आहे... पण त्यापेक्षा बरे धंदे मला करता येतात आणि त्यातून पोटापाण्याची चांगली सोय होतेय ( हे वाक्य मिपावरील माझ्या आध्यात्मिक लिखाणाबद्दल बायका स्वयंपाक घरात तोंडाला पदर लाऊन बोलत असतात तसे बोलणारांना उद्देशून, अरे या ना लेको जरा चव्हाट्यावर! कळू द्या तुमचीही अक्कल ) ... मला जे जीवन अर्ध्यावर सोडून गेले ते लोक फक्त मानसिक रूपांतरण घडलेले लोक होते असे वाटते.. म्हणजे घास तोंडापर्यंत आलेले पण त्याची चव न चाखलेले.. पुढे मग त्यांनी त्या घासाबद्दल कितीही रसाळ भाषेत बोलणे केलेल असो - ते युजलेसच! हे माझं जसं युजलेस आहे तसं.
16 Nov 2010 - 12:10 am | अर्धवटराव
तुमचे हे वाक्य बघा:
१) भारतात ध्यान वगैरे प्रकारांतून त्या ग्रंथी पुन्हा सक्रिय करायच्या आणि सगळ्या मानसिक-शारीरिक गुंत्यांतून बाहेर पडायच (थोडक्यात मुक्त व्हायचं) हा हजारो वर्षांपासून चालत आलेला पायंडा आहे..
२) युजीपूर्व "पोहोचलापणा" हा पूर्णत: मानसिक रूपांतरणावर आधारित होता.
जर भारतात/जगात हजारो वर्षांपासुन मुक्त व्हायची कला लोकांना ठाउक आहे तर मग युजीपूर्व "पोचलेपणा" केवळ मानसीक होता असं तुम्ही कसं म्हणु शकता? इतर सर्व ज्ञानशाखांप्रमाणे अध्यात्माच्या प्रांतातही धंदेवाईक लोक होते/आहेत. स्वतःच्या "पोचलेपणाबद्दल" अर्धवट/पूर्णपणे चूकीची खात्री असणारे देखील आहेत. पण आध्यात्मीक ज्ञानसाधनेची युजीपूर्व आणि युजीउत्तर अशी काळी-पांढरी विभागणी करणे हे फार धाडसाचे आहे असं तुम्हाला वाटत नाहि काय? मला युजी वा इतर कोणाही व्यक्तीच्या फायनल अवस्थेबद्दल काहिही म्हणायचे नाहि. ज्यातलं मला काहि कळत नाहि तिथे जज्मेंट देण्यात काय हाशिल? मुद्दा फक्त हाच कि "मला कळलेला हा एकच मार्ग योग्य, बाकि सर्व पाखंड" हि वृत्ती बाळगून आपण या प्रचंड ज्ञानविश्वाला संकुचीत तर करत नाहि आहोत ना? आपल्याला ज्या मार्गाची खात्री पटलीय त्या मार्गाबद्दल कॉन्फीडंट असणं चांगलच. पण इतर मार्ग निखालस चूकीचे, असा निकाल त्यावरुन काढणे चूक आहे असं मला वाटतं.
मी तुम्हाला कुठलाहि संदर्भ न देता "पोचलेपणा" बद्दल लिहायला का म्हटलं ? तर तुमच्या एकंदर लिखाणावरुन असं दिसतय कि या क्षेत्रात तुम्ही दोन पाउलं टाकलेली आहेत. हा प्रवास सुरु करण्या आगोदर तुम्हाला काहि जाणवलं असेल, त्यात काहि तथ्य वाटलं असेल. तुमची स्वतःची "पोचलेपणा"बद्द्ल काहि भुमीका असेल. जर तुम्ही हे विषद करु शकलात, आणि मला ते समजलं तर त्याचा मला फायदाच होईल... हा जो शंकांचा धुराळा उडालाय तो विरळ व्हायला मदत होईल. चित्र थोडंफार स्पष्ट होईल...
अर्धवटराव
16 Nov 2010 - 8:20 pm | यकु
हो.
कारण यापैकी कुणाच्याही शरीराच्या पेशीय रूपांतरणाचा कुठलाही संदर्भ सापडत नाही. चित्त पालटणे वगैरे तर सर्वांनाच दररोजच होत असते. जे कुणी वास्तविक जीवनमुक्त असतील त्यांच्याकडे पाहून कोणत्या तरी हुशार लोकांनी उपनिषदे इ.लोकांनी लिहीले. उपनिषद लिहीणारे ते ऋषि काही वास्तविक त्या अवस्थेत नव्हते; पण मेंटल ह्~अमरींग ने मानसिकता बदलू शकते.
२) युजीपूर्व "पोहोचलापणा" हा पूर्णत: मानसिक रूपांतरणावर आधारित होता.
वरील प्रमाणे.
17 Nov 2010 - 10:45 am | कवितानागेश
डॉर्मंट ग्लॅण्ड्स (निरूपयोगी ग्रंथी)
मला वाटते, सुप्त हा शब्द योग्य आहे, निरुपयोगी काहीच नसते, उत्क्रांतीमध्ये टिकून राहिलेली प्रत्येक गोष्ट 'उपयोगीच आहे'
आणि या 'ग्रंथी' (यासाठी nerve ganglion असा शब्दप्रयोग मी कुठेतरी वाचला आहे) सुप्त समजल्या जातात कारण त्यांचा 'नक्की' उपयोग अजून समजला नाही.
बुध्दांची अवस्था अनुभवूनही तेवढ्यावरच त्यांनी समाधान मानलं नव्हतं
बेसिकमध्ये राडा!
बुध्दांच्या अवस्थेपलिकडे केवळ आनंद आहे आणी अपार करुणा आहे. जी गौतम बुध्दांमध्ये स्पष्ट दिसते.
कुणाला समाधान मिळले नाही, आणी करुणाही निर्माण झाली नाही, उलट तडफड व चीड वाढत गेली, याचाच सरळ अर्थ असा की बुध्द्त्व प्राप्त झालं नाही.
मनुष्य ''खरोखरच' ज्ञानी वगरै होउ लागतो, त्याला निसर्गनियम कळतात, मनुष्यस्वभाव कळतो, दु:खाची कारणे कळतात, जाणवतात, ( कळणे आणी जाणवणे यात फरक असतो बरं का!), अशा वेळेस तड्फड आणी व्याकुलता शिल्लक रहात नाही.
प्रेमाचे, करुणेचे अश्रु असतात, दुखा:चे, रागाचे बिल्कुल नसतात.
14 Nov 2010 - 8:10 pm | सद्दाम हुसैन
खुप मनोरंजन झाले ...
16 Nov 2010 - 9:52 pm | कवितानागेश
बराच वेळ मौन पाळून, शेवटी कंटाळून टंकायाला घेतेय.........
आता समाधी का घ्यावी हा प्रश्न आहे, की कशी घ्यावी हा प्रश्न आहे, की अजून काही?
हे मला नीटसे कळले नाही..
खरे तर 'यकु' नक्की काय शोधतायत हेच मला नीटसे कळेलेले नाही!
मी जे काही वाचले आहे त्यातून काही गोष्टी सांगू शकते,
मुळात समाधी म्हणजे मृत्यू नाही , आत्महत्या तर नाहीच नाही.
ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधीत आहेत!
त्यांची देहभावाना संपून ते विश्वातीत झाले आहेत. थोडक्यात 'consciousness' विस्तारला.
ही अवस्था 'योग्य' योगाभ्यासानेच येते. मन एकाचवेळेस सूक्ष्म होते व विश्वव्यापीही होते, त्यामुळे शरीरातील अनेक अनावश्यक क्रिया थांबून ते स्थिर होऊ लागते.
यासाठी अनेक मार्ग आहेत, योग्य मार्गदर्शनाखाली केले तर निदान जंगलात वाट चुकल्याची भावना तरी येणार नाही.
समाधी ही शरीराची एक विशिष्ट अवस्था ( व अर्थातच मनाची सुद्धा- कारण मन, अंतर्मन हे संपूर्ण शरीराचेच भाग आहेत) आहे.
या अवस्थेत काल थांबतो, आणी 'अहम' संपतो. ( म्हणजे नक्की काय ते नंतर...!)
जे शरीरच संपवतात, ते नक्की 'विटले' होते का, याचा शोध घ्यायला हवा. ( मला वाटते 'नाही')
विटलेपणा, पळपुटेपणा आणी इतिकर्तव्यता यात मूलभूत फरक आहेत. त्याचा घोळ कशाला?
अर्धवट आयुष्य सोडणे हे अयोग्यच आहे, पण ते अर्धवट आहे की 'झाले काम एकदाचे' हे कुणी ठरवायचे?
अर्थातच स्वत:नी !
मग त्यात आपण टीका-टिप्पणी करणारे कोण?
आता तुकारामांबद्दल ,
सामाधीच्याही पुढची एक पायरी असते, सदेह वैकुंठगमन!
याचा सरळसरळ अर्थ असा आहे की पंच महाभूते त्यांची त्यांची विलीन झाली.
माती, पाणी, हवा, आग आणी या सगळ्याला नियंत्रित करणारे,मोजता ना येणार 'आकाश' तत्व
हे सगळे शरीरात एक 'फॉर्म' घेऊन एकत्र आले होते ,
ते संपूर्ण वेगळे होऊन संपून गेले ......
आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने |
सर्वात्मकपणे भोग झाला ||
यातून हाच अर्थ प्रतीत होतो असे मला वाटते...
ते नक्की 'कसे' साध्य केले हे मला अजूनतरी माहीत नाही,
कळले की नक्की लेख टाकेन!
"....कारण या प्रक्रियांचा अगदी ठाम रोडमॅपच कुणाकडे नसतो.."
"Truth is a pathless land" हेच खरे आहे!
तोपर्यंत यकुना 'हॅप्पी प्रक्रिया'!
16 Nov 2010 - 9:58 pm | अर्धवटराव
हा एक नविनच पैलू वाचायला मिळाला... बघु समजतं का ते.
(वाचक) अर्धवटराव