गुजरातच्या प्रगती§

सुकामेवा's picture
सुकामेवा in काथ्याकूट
11 Nov 2010 - 4:08 pm
गाभा: 

गुजरातच्या प्रगतीची ही बातमी वाचून आनंद झाला
अशी प्रगती महाराष्ट्रामध्ये होऊ शकते का

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

11 Nov 2010 - 4:24 pm | चिरोटा

डोके ताळ्यावर ठेवून जात्,धर्म,भाषा,पैसा ह्यांच्या पलिकडे लोकांनी आणि पुढार्‍यांनी विचार केला तर शक्य आहे.नाहीतर तर युपी/बिहारपेक्षा आपण बरे ह्यात सामाधान मानुया.

रणजित चितळे's picture

11 Nov 2010 - 4:52 pm | रणजित चितळे

कामगार कल्याण क्षेत्रात सुद्धा भरीव कामगिरी केली आहे. एंप्लॉयमेंट एक्सचेंज मधुन नोक-या देण्यात पहिल्या क्रमांकावर आहे राज्य

अवलिया's picture

11 Nov 2010 - 4:54 pm | अवलिया

नितीन थत्ते काय म्हणतात?

नितिन थत्ते's picture

11 Nov 2010 - 5:22 pm | नितिन थत्ते

ऐहिक प्रगती काही खरी नाही असे माझे मत सध्या झाले आहे. ;)

शिवाय ठेविले अनंते तैसेची रहावे असे आमचे थोर्थोर संत सांगून गेलेच आहेत. :)

विकास's picture

11 Nov 2010 - 5:47 pm | विकास

शिवाय ठेविले अनंते तैसेची रहावे असे आमचे थोर्थोर संत सांगून गेलेच आहेत.

का ठेविले नरेन्द्रे तैसेची रहावे असे म्हणायचे आहे? ;)

बाकी महाराष्ट् ही संतांची भूमी आहे का संथांची? :(

चिरोटा's picture

11 Nov 2010 - 6:00 pm | चिरोटा

बिट्स पिलानी + बर्कली वाले आता आले आहेत. महाराष्ट्र लवकरच टेक्नोभूमी म्हणून ओळखली जाईल.

अप्पा जोगळेकर's picture

12 Nov 2010 - 1:38 pm | अप्पा जोगळेकर

एकच वादा, एकच वादा |
अजितदादा अजितदादा ||

गांधीवादी's picture

12 Nov 2010 - 5:46 am | गांधीवादी

जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रीत होत नाही तोपर्यंत काहीही शक्य नाही.

आज प्रत्येक नेत्याला हे माहित असून सुद्धा कोणी त्या साठी कायदा करण्याचा ठोस विचार करताना दिसून येत नाही.
आजकालचे राजकारण पाहता कोणालाही दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात रस नाही असेच दिसते, कोणत्याही समस्येला तात्पुरती मलमपट्टी करून पुढचे पुढे बघु हेच कामचलाऊ धोरण अवलंबून वेळ मारून नेली जाते.

इथे एक बाब नमूद करुशी वाटते कि महाकाय चीनने सुद्धा हा धोका ओळखून लागलीच 'एक कुटुंब, एक मुल' हा कायदा सुरु केला आहे. (शेतकरी आणि ज्या जोडप्याच्या आईवडिलांना ते एकच अपत्य आहेत अश्या जोडप्यांना ह्यातून वगळलेले आहे, असे काहीतरी आहे.)

सुनील's picture

12 Nov 2010 - 7:03 am | सुनील

हॅ हॅ हॅ

महाकाय चीनने सुद्धा हा धोका ओळखून लागलीच 'एक कुटुंब, एक मुल' हा कायदा सुरु केला आहे. (शेतकरी आणि ज्या जोडप्याच्या आईवडिलांना ते एकच अपत्य आहेत अश्या जोडप्यांना ह्यातून वगळलेले आहे, असे काहीतरी आहे.)

फक्त शेतकरी नव्हेत तर अल्पसंख्यांकानादेखिल वगळले आहे!

आता, आहे तयारी (अल्पसंख्यांकाना वगळून) ही पॉलिसी भारतात राबवण्याची???

असो, ह्या पॉलिसीचे दुष्परिणाम, जे नंतर दिसणारच होते, दिसू लागले आहेतच!

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Nov 2010 - 11:48 am | llपुण्याचे पेशवेll

अगदी अगदी . करावीच पॉलिसी इंप्लिमेंट. आणि त्याआधी अप्लसंख्यांकांची व्याख्या पण बदलावी. म्हणजे एकदम बॅलन्स होईल.

गांधीवादी's picture

12 Nov 2010 - 5:46 pm | गांधीवादी

>>ह्या पॉलिसीचे दुष्परिणाम, जे नंतर दिसणारच होते, दिसू लागले आहेतच!
ह्या बद्दल जास्त काही माहित नाही, माहिती दिल्यास आभारी राहील.

मला केवळ 'आपली लोकसंख्या नियंत्रित ठेवावी' एवढेच म्हणायचे होते.

नितिन थत्ते's picture

12 Nov 2010 - 5:48 pm | नितिन थत्ते

सुदर्शन साहेबांनी तर संख्या वाढवायला सांगितली आहे.

तिमा's picture

12 Nov 2010 - 7:18 pm | तिमा

आणि सोनिया गांधींवर खालच्या पातळीवर जाऊन आचरट आरोप केले आहेत.

गांधीवादी's picture

12 Nov 2010 - 7:22 pm | गांधीवादी

आहे त्यांनाच पुरेस अन्न, वस्त्र, निवारा नाही, अजून खाणारी तोंडे आणून काय करायचं. :-(

'हम दो, हमारा एक' हेच यशस्वी भारताचे सूत्र होईल.

महाराष्ट्रालाही एका नरेंद्र मोदींची गरज आहे.. काँग्रेसेतर पक्षातच नरेंद्र मोदी तयार होऊ शकतो, पक्षश्रेष्ठींच्या आज्ञेशिवाय हे कोंग्रेसवाले आंघोळही करीत नाहीत, हे काय महाराष्ट्राला तारणार ?

चिरोटा's picture

12 Nov 2010 - 12:40 pm | चिरोटा

म्हणजे आतापर्यंत 'सदा अग्रेसर' राज्याची जी प्रगती झाली ती पक्षश्रेष्ठींमुळेच ना?