महाराष्ट्र आणि मंत्री बदल (आपले मत काय?)

इंटरनेटस्नेही's picture
इंटरनेटस्नेही in काथ्याकूट
10 Nov 2010 - 8:21 pm
गाभा: 

पृथ्वीराज चव्हाण यांची निवड
पृथ्वीराज चव्हाण यांची निवड महाराष्ट्र या आपल्या पुरोगामी आणि विकसित राज्याच्या मुख्यमंत्री पदी झालेली आहे. आणि श्री अजितदादा पवार यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागलेली आहे. दोन्ही नेते हे चांगल्या प्रतिमेचे आणि काराक्षम म्हणून ओळखले जातात. पण या निवडीने काही प्रश आपल्यासमोर निशितच उभे राहतात, किंवा त्यांचे महत्त्व नव्याने अधोरेखित होते

आपले राज्य विकसित जरी असले तरी आपल्या समोरील प्रश्न देखील तितकेच बिकट आहेत.:

शिक्षण क्षेत्राचा झालेला बट्याबोळ
रोजगारी,
दळणवळण,
वाढती महागाई,
वाढती गुन्हेगारी,
मराठीचा प्रश्न,
अन्य.

हे प्रश्न सोडविण्यात नवीन नेतृत्व काही ठोस कामगिरी करू शकेल का?

आणि या निमात्ताने आणि विशेषतः काहीही स्पष्ट कारण नसताना झालेली भुजबळांची उचलबांगडी आणि त्याजागी झालेली अजित दादांची नेमणूक यामुळे राज्यातील पुढील राजकारण कसे बदलेल? तुम्हाला काय वाटते?

तुर्तास एवढेच, नवीन मंत्रीमंडळ बनल्यावर समोर येण्यार्‍या आणि अन्य काही अनुशांगिक बाबीं विषयी मी प्रतिसादातुन पुरवणी लेखन करेन. तोवर आपल्या मिपाकरंनी यावर चर्चा करवी ही विनंती. धन्यवाद.

--
RISHIKESH

प्रतिक्रिया

नवीन नेतृत्व काही ठोस कामगिरी करू शकेल का?

नाही.

पैसा's picture

10 Nov 2010 - 10:25 pm | पैसा

कोणत्याही राजकारण्यापासून काहीच अपेक्षा ठेवू नकोस. खुर्चीत जाऊन बसला की प्रत्येकजण आधीच्यासारखाच वागतो. सगळा दोष खुर्चीचा आहे. आम्ही आपले दर ५ वर्षानी मत देतो. एखादा अगदीच नावडला तर त्याला बदलतो. पण पुन्हा पुन्हा "येरे माझ्या मागल्या!"

मनोहर पर्रीकरांसारखा एखादा अपवाद असतो, पण तो लोकाना नको असतो! जास्त कार्यक्षम राज्यकर्ते पण आम्हाला नाही मानवत!

धमाल मुलगा's picture

10 Nov 2010 - 9:19 pm | धमाल मुलगा

नव्या चव्हाणसाहेबांच्या कामाबद्दल फारसं वाईट ऐकुन नाही. काँग्रेसच्या 'स्वच्छ चेहरा' गाळणीमध्ये हे फिट्ट बसले. आता पाहूया काय होतं. पवार(ज्यु.) ह्या पदापर्यंत आल्यानंतर पहायचं आणखी कसे कसे बद्ल घडतील ते. (आता पुण्याचे पालकमंत्री कोण मग? )

-(कृष्णाखोर्‍याच्या भानगडी संपण्याची वाट पाहत बसलेला) ध.

विसोबा खेचर's picture

10 Nov 2010 - 9:23 pm | विसोबा खेचर

हे प्रश्न सोडविण्यात नवीन नेतृत्व काही ठोस कामगिरी करू शकेल का?

नाही, मुळीच नाही..!

वैयक्तिक मत. राग नसावा..

तात्या.

चिरोटा's picture

10 Nov 2010 - 10:56 pm | चिरोटा

हे प्रश्न सोडविण्यात नवीन नेतृत्व काही ठोस कामगिरी करू शकेल का?

पवारांचे माहित् नाही. महत्वाचे मंत्रीपद सांभाळूनही चव्हाण ह्यांची प्रतिमा गेल्या साडे सहावर्षात खराब झालेली नाही. बायोडेटा पाहिला (http://india.gov.in/govt/rajyasabhampdetail.php?mpcode=1854 ) तर पैसे खाण्यासाटी चव्हाण राजकारणात आले नसावेत असे म्हणायला अजून जागा आहे.!
अर्थात स्वतः स्वच्छ असणे वेगळे आणि घाण स्वच्छ करणे वेगळे.

अपूर्व कात्रे's picture

11 Nov 2010 - 2:45 pm | अपूर्व कात्रे

सध्यातरी "चव्हाण"प्राश पासून महाराष्ट्राची सुटका नाही.

इन्द्र्राज पवार's picture

11 Nov 2010 - 3:14 pm | इन्द्र्राज पवार

"....हे प्रश्न सोडविण्यात नवीन नेतृत्व काही ठोस कामगिरी करू शकेल का?"

करू दे, असेच म्हणू या.

~ राजकारणाकडे वा राजकीय घडामोडीकडे आपण कितीही तुच्छतेने आणि नैराश्याने पाहिले तरी हा देश राजकारणी लोकच चालवतील यात दुमत होऊ नये. खंडप्राय आकाराचा देश, आणि अठरापगड जातीधर्माच्या कौलाखाली राहणारी एक अब्जाहून अधिक असलेली लोकसंख्या....यावर एखादा हिटलर, चेंगिझखान वा कॅस्ट्रो येऊन राज्य करेल हे कदापिही संभवत नाही. त्यामुळे 'सुसरीणबाई तुझी पाठ मऊ' या न्यायाने येणार्‍या मुख्यमंत्र्याकडे पाहायचे आणि त्याला त्याच्या त्या पदावरील कारकिर्दीसाठी शुभेच्छा द्यायच्या इतपतच या राज्यातील मतदार करू शकतो.

एक चव्हाण गेले अन् दुसरे चव्हाण आले...... उद्या पवार आले वा गेले..... रयतेच्या जीवनमानीत तसूभरही फरक पडणार नाही. अशोकरावांच्या काळात गॅस सिलेंडर मिळायला २१ दिवस लागत, पृथ्वीराजांच्या काळात ३ आठवडे लागतील....इतपतच.

इन्द्रा

धमाल मुलगा's picture

11 Nov 2010 - 3:19 pm | धमाल मुलगा

>>अशोकरावांच्या काळात गॅस सिलेंडर मिळायला २१ दिवस लागत, पृथ्वीराजांच्या काळात ३ आठवडे लागतील....इतपतच
कऽडक! जबरी टाकलाय. :)

यावर एखादा हिटलर, चेंगिझखान वा कॅस्ट्रो येऊन राज्य करेल हे कदापिही संभवत नाही. त्यामुळे 'सुसरीणबाई तुझी पाठ मऊ' या न्यायाने येणार्‍या मुख्यमंत्र्याकडे पाहायचे आणि त्याला त्याच्या त्या पदावरील कारकिर्दीसाठी शुभेच्छा द्यायच्या इतपतच या राज्यातील मतदार करू शकतो.

कदाचित अशा उदासीनतेच्याच उद्रेकातून एखादा हिटलर घडू शकतो. शेवटी आपल्याकडं 'आपलेच दात अन आपलेच ओठ' अशी परिस्थिती! त्यामुळं कोणी काही धड करायला निघाला, तर त्याला पहिला खोडा घालणारे आपलेच. मग 'सुसरबाई, तुझी पाठ मऊ' हेच करत बसावं लागणार. :(

अप्पा जोगळेकर's picture

12 Nov 2010 - 9:10 am | अप्पा जोगळेकर

यावर एखादा हिटलर, चेंगिझखान वा कॅस्ट्रो येऊन राज्य करेल हे कदापिही संभवत नाही.
मग हे चांगलंच आहे की. काही लोक आता भारतात हुकुमशाही आली पाहिजे. आता झाले हे बस झाले असा सूर लावत असतात. तसं तर म्हणायचं नाहीये ना ? हिटलर किंवा चेंगिझखान यांच्या गोष्टी वाचताना रंगून जावे इथवर ठीक आहे. त्यांनी घडवून आणली तशी हत्याकांडे घडणे हे कोणत्याही आधुनिक लोकशाहीसाठी ठीक नाही. ज्यांना लोकशाहीच मान्य नाही त्यांची गोष्ट वेगळी आहे.

इन्द्र्राज पवार's picture

12 Nov 2010 - 12:03 am | इन्द्र्राज पवार

"....कदाचित अशा उदासीनतेच्याच उद्रेकातून एखादा हिटलर घडू शकतो. ...."

पण कुठे.....? ध.मु....मुळात तुम्हाला जी उदासीनता इथे अभिप्रेत आहे ती खास मध्यमवर्गीय आणि अतिश्रीमंत (वा नवश्रीमंत) गटात सापडेल. त्यामुळे यांच्याकडून कसला आला आहे उद्रेक ? आमटीत मीठ कमी पडले म्हणून बायकोसमोर जितका शक्य आहे तितका करावा लागणारा उद्रेक ही यांची अंतीम धाव ! त्यामुळे हिटलर, कॅस्ट्रो इ. मंडळी यांच्या शब्दकोशात येणे केवळ अशक्य. या गटाला "आपण भले की आपले काम भले..." ही शिकवण ज्यादा प्यारी वाटत असते. प्रत्यक्षात सत्ताधारी तसेच विरोधी या दोन्ही पक्षांना सत्तेवर येण्यासाठी तळागाळातील आणि जातउतरंडीच्या राजकारणात शिजत असलेले गटच मतदानासाठी हवे असतात. तोच त्यांचा केन्द्रबिंदू असल्यानेच आज आपण पाहतोच की केवळ ४५ ते ५२ टक्के मतदानावर या देशात एखादा पक्ष वा आघाडी सत्तेसाठी "प्रबळ" दावा सांगू शकतो.

आणि भडकायचे असल्यास उद्या हाच प्रत्यक्ष मतदार भडकू शकतो....."मतदान उदासीनता" दाखविणारा व कोसल्यात राहू इच्छिणारा वर्ग नाही. तेव्हा धूर्त राजकारणीदेखील कोणाला भडकू द्यायचे नाही, कुणाला गोंजारायचे आणि कुणाच्या रागालोभाला भीक घालायची नाही, हे पूरेपूर जाणतो.

तेव्हा...."हिटलर इन इंडिया इज अ‍ॅन इम्पॉसिबल इव्हेन्ट...!"

इन्द्रा

सुक्या's picture

12 Nov 2010 - 1:19 am | सुक्या

सहमत.
एखादी क्रांती होण्यासाठी चीड येणे महत्वाचे असते. आजकाल लोकांना चीड येणे बंद झाले आहे. त्यामुळे उद्रेक वगेरे शक्य नाही. तेव्हा येरे माझ्या मागल्या . . म्हणायचे निवडणुका येइपर्यंत.

धमाल मुलगा's picture

12 Nov 2010 - 10:41 pm | धमाल मुलगा

दुर्दैवानं अत्यंत जळजळीत वास्तव.

सुनील's picture

12 Nov 2010 - 1:03 am | सुनील

हिटलर इन इंडिया इज अ‍ॅन इम्पॉसिबल इव्हेन्ट...!
सहमत!

पण दुर्दैवाने तसे झालेच तर, जनतेची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी होईल याची मात्र खात्री!

गांधीवादी's picture

12 Nov 2010 - 5:31 am | गांधीवादी

हिटलर इन इंडिया इज अ‍ॅन इम्पॉसिबल इव्हेन्ट...!
सहमत!

हिटलर नाही पण जिकडे तिकडे अजारकता माजणार आहे, त्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

शिक्षण क्षेत्राचा झालेला बट्याबोळ
रोजगारी,
दळणवळण,
वाढती महागाई,
वाढती गुन्हेगारी,
मराठीचा प्रश्न,
पैकी 'वाढती गुन्हेगारी' हि अगदी पेठां मध्ये सुद्धा ठळकपणे दिसू लागली आहे. लवकरच हा देश गुंडांच्या ताब्यात जाणार आहे असे दिसते असे वाटते.

नरेशकुमार's picture

12 Nov 2010 - 8:21 am | नरेशकुमार

मंत्री बदल पटला तर ठिक नाहि तर महाराष्ट्र बदल.

इन्द्र्राज पवार's picture

12 Nov 2010 - 10:07 am | इन्द्र्राज पवार

"....मंत्री बदल पटला तर ठिक नाहि तर महाराष्ट्र बदल."

~ या प्रतिक्रियेचा नेमका अर्थ समजला नाही....पण 'महाराष्ट्र बदल' म्हणजे श्री.नरेशकुमार याना "सत्ताधारी पक्ष बदल" असे अपेक्षित असले तर मात्र असे म्हणावे लागेल की त्यामुळे राज्याच्या मानसिक जडणघडणीत फार काही लक्षणीय बदल होईल असे संभवत नाही. सोमवारचा विरोधी नेता मंगळवारी 'वर्षा" बंगल्यात जावून बसला की तो 'आदर्श' च्या वाटेने जाणारच नाही याची शाश्वती कुणीच देवू शकत नाही.

तेव्हा मतदारातील उदासिनता जोपर्यंत संपुष्टात येत नाही, तोपर्यंत हा खो-खो चा खेळ चालतच राहणार. आणि आपल्या दुर्दैवाने 'उदासिनतेचा' प्याला इथे कधीही रिता होणार नाही असेच एक अनाकलनीय चित्र घरभिंतीवर आहे.

इन्द्रा

किती आले आणि किती गेले ?? कोण कुणासाठी काय करतोय हेच काळात नाही आहे. जोवर घराणेशाही संपत नाही तोवर काही खरं नाही हेच खर...वैयक्तिक मत.

बाकी अवांतर एक कविता आठवली...
----------------------
मला माहिती आहे की माझ्हा बा गेला ह्याच रस्त्याने..
मीबी जाईन ह्याच रस्त्याने रगत ओकत ओकत.

कधीतरी असा वाटत की ओतावा रॉकेल ह्या धरतीवर आणि पेटवून द्यावा सूर्याने तीला..
पण वाटत तितका ते सोपं नाही आहे.

सूर्य काय रोज येतो, रॉकेल कधी मिळणार ते सांगा. :-)

----------------------

अविनाशकुलकर्णी's picture

12 Nov 2010 - 10:56 pm | अविनाशकुलकर्णी

१३० कोटी लोकांना रोज गिळायला मिळते हे नशिब समजा..

लोकसंख्या आटोक्यात आणली नाहि तर ते पण अवघड होणार आहे..तसे झाले तर त्यात हि आरक्षण येणार..

गिळायला मिळतंय हे ठीक.. परंतु आमच्या नशीबाने मिळतंय. त्यात हे नेते आणि राजकारणी काय हातभार लावतात ? उलटा आमच्या मुखातला घास काढून खातात.

मढयावरचा लोणी खाणारी ही जात. खरच आपण एवढे अगतिक आहोत का की आपण षंढ झालो आहोत ? कुणालाच का बरे चीड येत नाही ?

(... वैयक्तिक मत.. कुणावर ही आकस नाहि.)

अविनाश कदम's picture

14 Nov 2010 - 2:44 am | अविनाश कदम

गेल्या साठ वर्षात जेव्हढे मुख्यमंत्री आले त्यांनी जे केलं त्यापेक्षा हे मुख्यमंत्री काही वेगळे करू पाहतील तर त्यांना मुख्यमंत्री म्हणून अनफीट ठरवून परत पाठविले जाईल. भारतीय लोकशाहीतील राज्यकर्ती म्हणून जी जमात सध्या अस्तित्वात आली आहे तिच्याशी पंगा घेणे कुणालाही शक्य नाही. त्याला पाण्यात राहून माशांशी वैर घेणे म्हणतात. थोडाफार देखावा ठिक आहे. अती क्लिनपणा केलात आणि आमच्या नाका-तोडाशी येऊन आमची उपासमार झाली तर पक्षश्रेष्ठींनाही फाट्यावर मारू, हा त्यांचा उसूल आहे. कंडोमपात कशी ‘आपण सारे भाऊ , सारे मिळून खाऊ’ म्हणत महायुती घडली आहे.