खाली दिलेला प्रसंग नीट वाचा म्हणजे कदाचीत हे पुन्हा दुसर्या कुणासोबर घडणार नाही:
"माझा आयडियाचा प्रीपेड मोबाईल तीन वर्षांपासून आहे आणि तेही व्यवस्थित कागदपत्रके देवून घेतलेला आहे.
अचानक मला सप्टेंबर २०१० ला एस एम एस आला की कागदपत्रके जमा करा.
४ ऑक्टोबरला कागदपत्रके पूर्ण पणे भरून, तसेच फोटो देवूनही दसर्याला १७ ऑक्टॉबरला मोबाईल चे कॉल बंद झाले.
त्या दिवशी त्रास सहन करावा लागला तो वेगळाच.
ऑफिसचे कॉल महत्त्वाचे असल्या कारणाने मी दुसर्या कंपनीचा नंबर घेतला.
मग काही दिवस आयडीयाचे ऑफिस बंद होते.
मग मी एक दिवशी पुन्हा कागदपत्रके दिली कारण जुना नंबर अनेकांना दिला सल्याने तो बंद करणे योग्य वाटले नाही.
पूर्वीचा नंबर चालू झाला. मी कस्टमर केअरला विचारून खात्री सुद्धा केली, की माझा अॅड्रेस वगैरे सर्व पोहोचले आहे का.
ते हो म्हणाले.
पुन्हा दिवाळीच्या आदल्या दिवशी एसएमेस आला की कागदपत्रके अपूर्ण आहेत, ते द्या अन्यथा सेवा बंद करण्यात येईल.
मी कॉल केल्यावर ते म्हणाले की कागदपत्रके पुन्हा जमा करावी लागतील.
त्याचे कारण विचारले असता त्यांनी कारण सांगितले नाही.
फक्त पुन्हा कागदपत्रके पाहिजेतच असे सांगितले.
मग मी माझा प्रीपेड बॅलंन्स दुसर्या आयडीया नंबरवर ट्रान्सफर करण्याची शक्कल शोधली आणि आता पुन्हा कागदपत्रके जमा न करण्याचा व माझा नंबर अनिच्छेने कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला.
एका दिवसाला फक्त तीन वेळा ५० रुपये असे १५० रुपयेच फक्त ट्रान्स्फर होवु शकतात. ते मी केले.
पण अजून बॅलन्स शिल्लक होता.
पण त्यांना हे कळले असावे, तर त्यांनी ४८ ऐवजी २४ तासातच सेवा बंद कली.
आता बोला!!
माझे सगळे उपाय करून झाले. ते आयडीयावाले जुमानले नाहीत.
म्हणजे बॅलन्स खाण्याचा हा प्रकार आहे."
महत्त्वाची माहिती:
आयडीया टू आयडीया उरलेली बॅलन्स आपणांस दुसर्या आयडीया वर ट्रान्सफर करायचा असल्यास असा करा:
GIVE मोबाईल नंबर 50 असा एसएमएस करा ५५५६७ वर.
तीन वेळा.
अशा मुळे खालील प्रश्न मनात येतातः
ही कागदपत्रके सेंटरच्या कर्मचार्यांकडून गहाळ होत आहेत का?
विविध सेंटर मधून ती कंपनीच्या मेन ऑफिसमध्ये पोहोचतच नाहीत का?
नाहीतर पोहोचल्यावरही ते हेतुपूर्वक त्रास देतात का?
तसे असेल तर त्रास देण्यामागचा हेतू काय?
मोबाईल मध्ये खुप बॅलन्स शिल्लक असेल आणि त्या ग्राहका कडून तो संपत नसेल तर मुद्दाम बॅलंस खाण्यासाठी तर ते असे ते करत नसावेत ना?
कुठे जातात ही न पोहोचलेली किंवा "अपूर्ण" कागदपत्रके?
प्रतिक्रिया
10 Nov 2010 - 12:21 pm | पंख
मी गेली ७ वर्षे एअरटेलचा प्रीपेड नंबर वापरत आहे, आजपर्यंत असा त्रास झालेला नाही.. माझ्या बाबतीत तरी ग्राहकसेवा केंद्राचा (म्हणजे कस्टमर केअर ) अनुभव चांगलाच आहे.. माझ्या काही तक्रारी असल्यास त्यावर त्वरीत कार्यवाही झालेली आहे..पुढची ७० वर्षे हाच नंबर वापरायचा ईरादा आहे..
एक सुखी एअरटेल ग्राहक
-पंख..
10 Nov 2010 - 12:28 pm | परिकथेतील राजकुमार
कसे सुचतात हो तुम्हाला हे असले एक एक विषय ? ;)
माझा अनुभव :-
मला एयरटेल मधुन असाच फोन आला होता. आधी माझी माहिती विचारायला सुरुवत झाली. मी सुरुवातच माजोरीपणाने केली.
"सर प्लिज कन्फर्म युर अॅड्रेस अँड रजिस्ट्रेशन नेम"
"मराठीत बोला"
"सर प्लिज तुमचा अॅड्रेस आणि ज्यांच्या नावावर हा नंबर रजिस्ट्रर आहे त्याची माहिती द्या"
"का?"
"सर नविन कायद्याप्रमाणे आम्ही पुन्हा एकदा इश्यु केलेली कार्डस आणि त्यांचे रजीस्ट्रेशन ह्यांचे व्हेरिफिकेशन करत आहोत."
"बर मग? तुम्ही एयरटेल मधुनच बोलताय ह्याची काय खात्री ? माझी माहिती मी तुम्हाला कुठल्या भरोशावर द्यायची?"
"सर तुम्ही ह्या नंबरला कॉलबॅक करुन खात्री करुन घेउ शकता"
"आम्हाला काय तेवढेच उद्योग आहेत का?"
"ओके सर, पण निदान तुमची कागदपत्रे, आयडी प्रुफ तुम्हाला पुन्हा जमा करायला लागणारच आहेत"
"का ? जुनी रद्दीत घातलीत का? का त्याच्यावर दुसर्या कुणाला नवा नंबर इश्यु करताय?"
"सर गवर्मेंटच्या नव्या रुल प्रमाणे तुम्हाला ती जमा करायचीच आहेत."
"मग माझी जुनी कागदपत्रे परत द्या. नाहितर मला जुनी कागदपत्रे तुमच्याकडे जमा आहेत आणि ती योग्य आहेत, तरी सुद्धा तुम्ही पुन्हा नविन कागदपत्रे माझ्याकडून जमा करुन घेत आहात असे लिहुन द्या."
"असे करता येत नाही सर !"
"मग करता यायला लागेल तेंव्हा फोन करा. नाहितर लेखी स्वरुपात कागदपत्रांची मागणी करा मी जमा करतो."
त्यानंतर ८ महिने उलटले. कागदपत्रे जमा न करताही माझा नंबर व्यवस्थीत चालु आहे.
10 Nov 2010 - 12:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्याकडे आधी आयडीयाचं पोस्टपेड कनेक्शन होतं, काही प्रॉब्लेम नव्हता. पण घर बदललं, नव्या घरात आयडीयाचं नेटवर्क नव्हतं, हापिसाततर नव्हतंच. मग वडाफोन घेतला आणि आयडीयाचं कनेक्शन रद्द करायला गेले तर तिथली बाई रदबदली करायला लागली, "किमान प्रीपेडमधे बदलून घ्या". तिला मी "आर्मला टावर्नाय" सांगायचा प्रयत्न केला. पण ती तिचा ठेका बदलायला तयार नाही. मग सरळ सांगितलं, "ठीक आहे, मी कनेक्शन ठेवते, पण यापुढे मी एक पैसाही भरणार नाही आणि हे तुम्हाला मान्य आहे असं तुमच्या लेटरहेडवर लिहून द्या."
मग राग बदलला आणि म्हणायला लागली, "तुम्ही कंपनीला कॉल करून हे सांगा ना; तुमच्या इथेही कव्हरेज मिळू शकेल." आता मात्र मी पुण्यात आहे याची मला आठवण झाली, आणि मी तिला बाणेदार उत्तर दिलं, "महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं नेटवर्क अशी बढाई मारणार्या तुमच्या कंपनीला जर पूर्वेच्या ऑक्सफर्डच्या विद्यापीठात नेटवर्क सर्व्हीस देता येत नाहीये तर तो माझा प्रश्न नाही."
आता नेटवर्क कव्हरेज चांगला आहे, पण एकच प्रॉब्लेम आहे. ऑफिसच्या वेळेत आणि नंतरही मिपाकर कॉल करतात आणि वर "वाढदिवसाच्या शुभेच्छा" देतात! ;-)
10 Nov 2010 - 11:27 pm | मराठे
:bigsmile: :D :-D :lol: :bigsmile: :D :-D :lol: :bigsmile: :D :-D :lol:
कडेलोट!!!!
16 Nov 2010 - 11:49 pm | चिंतामणी
आता मात्र मी पुण्यात आहे याची मला आठवण झाली, आणि मी तिला बाणेदार उत्तर दिलं,
या निमीत्ताने पुणेकरांना चांगले म्हणल्याबद्दल (म्हणजे तसे दर्शवल्याबद्दल) आभार.
10 Nov 2010 - 8:33 pm | आत्मशून्य
मी त्याना फक्त माझे नाव पून्हा दिले, बाकि काहि शक्य नाही बोललो, त्यावर ते म्हणाले की तूमची मूदत वाढ्वून देत आहोत आणी या वेळेत तूम्हाला कागदपत्रे पुन्हा जमा करायला लागतील, आणी माझा फोन पून्हा activate झाला तो अजून चालूच आहे, हे लोक साले सण येणार आहे हे बघून service block करतात की काय असे वाटत आहे.
17 Nov 2010 - 2:24 pm | चांगभलं
बरं मग ?
10 Nov 2010 - 12:32 pm | मराठमोळा
सगळे चोर आहेत. केबल टीवी असो, वा ईंटरनेट, मोबाइल फोन सगळीकडे ग्राहकाची फसवणुकच आहे.
मला रोमिंग चार्जेस १५० रुपये महिना सांगुन ६५०/- लावले, तक्रार केली आहे, महिना झाला अजुन उत्तर नाही. आणि बील नाही भरलं तर लगेच सेवा बंद करतील.
10 Nov 2010 - 1:19 pm | निमिष सोनार
एक संशय असाही येतोय की ऑडीट मध्ये दाखवण्यासाठी त्यांच्याकडे ज्या मोबाईलधारकांची कागदपत्रके नाहीत, त्यांच्या साठी सुद्धा ते लोक आपलीच परत परत मागवलेली कागदपत्रके वापरत असतील?
म्हणजे, आपल्याच तीन चार वेळा दिलेल्या त्याच त्याच कागद पत्रांचा उपयोग वेगवेगळया नंबरसाठी तर ते वापरत नाही ना?
तसे असेल तर हा खुपच गंभीर विषय आहे.
हे कुठेतरी थांबले पाहिजे.
10 Nov 2010 - 1:25 pm | मराठमोळा
टेलीकॉम कंपन्या कधीच कागदपत्रे संभाळुन ठेवत नाहीत.
जमा झालेली कागदपत्रे स्कॅन करुन सॉफ्ट कॉपी ठेवतात, कागदे श्रेड करुन फेकुन देतात. कधी कधी श्रेड पन करतात की नाही माहित नाही.
10 Nov 2010 - 3:33 pm | नितिन थत्ते
आपण पैसे खाऊन खोटी कागदपत्रे देणार्या सरकारी कारकुनांना हसतो/नावे ठेवतो.
पण बहुतेक मोबाईल कंपन्यांचे बरेचसे डीलर/विक्रेते स्वतःच अशी बनावट कागदपत्रे बनवून कनेक्शन विकतात आणि एवढी कनेक्शन्स विकल्याचे कमिशन लाटतात. (दहशतवाद्यांना आरामात सिमकार्डे मिळतात यात आश्चर्य नाही).
मी भिलाईमध्ये असताना एका स्थानिक व्यक्तीचे वीज बील पुरावा म्हणून देऊन माझ्या नावावर कनेक्शन घेतले होते. मी त्या घरात राहतो असा कोणताही पुरावा मी दिला नव्हता. त्या पत्त्यावर राहतो की नाही हे पहायला कोणीही आले नाही. कनेक्शन बिनबोभाट चालू राहिले.
अशी कागदपत्रे मागितल्यावर ती आपण देतो तेव्हा नेहमी एका कागदावर तसे लिहून सही - शिक्का मारून घ्यावा. नंतर त्रास झाल्यास ट्राय (TRAI) कडे तक्रार करावी.
(सिमकार्ड सरेंडर केल्यास तर "सिमकार्ड सरेंडर केले" असे जरूर लेखी घ्यावेच).
.
.
.
.
(खाजगी कंपन्यांच्या तथाकथित उच्च दर्जाच्या ग्राहकसेवेचा अनुभव घेतलेला)
10 Nov 2010 - 3:38 pm | परिकथेतील राजकुमार
+१ थत्ते चाचांशी सहमत.
जुने एयरटेलचे पोस्ट्-पेड कनेक्शन सरेंडर करताना कंपनीकडून संपुर्ण बिल सेटल झाल्याचे व नंबर सरेंडर केल्याचे सहि शिक्क्यासह लिहुन घेतले आहे.
10 Nov 2010 - 8:48 pm | आत्मशून्य
माझे कडे BPL चे card होते ते मी काही दिवस recharge केले न्हवते, जूना काळ म्हणून माझे out going/incoming लवकरच बन्द झाले. माझाही काळ थोडा वाइट चालू होता आणी मी ते काही recharge करू शकलो नाही. काही महीन्यानी ती company हच ने घेतली व मला कागद्पत्रे पून्हा जमा करावीत म्हणून मेसेज तेव्हडा पाठवला. मी काही ते केले नाही. बरोबर सहा महीन्यानी मला ज्या लोकानी फोन केले ते म्हणाले की तूझा number दूसराच कोणीतरी receive करत आहे :D, कपाळावर हात मारून मी माझ्याकडील deactivated card कायमचे फेकून दीले :D.
10 Nov 2010 - 3:42 pm | यकु
ब्लॉग वरून पुन:प्रकाशित जुना अनुभव.
निमिष सोनार यांच्या संतापात सहभागी आहे.
आयडियावाल्यांनी मागच्या महिन्यात जीपीआरएस वापरले नसूनही साडेसातशे रूपयांचे बिल केले. ई-मेलने तक्रार केली तर कॉल सेंटरवर तक्रार करा असे उलट उत्तर. त्यांच्याकडे तक्रार करत बसण्यात काही मजा नसते. तस्मात तो विषयच सोडून दिला. परिणाम? फोन बंद आणि बिल कधी भरणार? कॅश की चेक? चे कॉल सुरू. दुसरीकडे फोन बंद असल्यामुळे कॉल करणारे नाराज, बर्याच वेळा नुकसानसुद्धा. शेवटी फोन सुरू करण्याशिवाय पर्याय नाही.
तक्रार करायला जा, तर कॉलसेंटरवाल्या अजागळ लोकांपर्यंत जाईपर्यंत हे राम ! म्हणायची पाळी येते. आधी हे दाबा, नंतर ते दाबा, मग अत्यंत हिणकस पण गोड आवाजाची बाई "आमचे एक्झिक्युटीव्हज या क्षणी इतरांना सेवा देण्यात व्यस्त" असल्याचे सांगते. मग थोडावेळ संगीत आणि मग आयडिया में आपका स्वागत है और मै फलाणा/णी-बिस्ताना/नी आपकी क्या सेवा कर सकता हूं?
"आपने पिछले महिने ज्यादा बिल लगाया था वो कम करना है और नंबर फिरसे शुरू करना है"
"आपका नंबर?"
"**************"
"पूरा नाम?" (प्रिन्स ऑफ झांजीबार..!)
"************"
डेट ऑफ बर्थ? (बिफोर क्राईस्ट....आता काय सांगू तुला?)
"..........??"
इथे माझ्या कपाळावरची शीर तटतटून येते. पण मी सर्वात पहिला टॅंहां! कधी केला ती तारिख त्याला सांगतो.
"पप्पा की भी डेट ऑफ बर्थ चाहिये क्या?"
"नहीं, उसकी जरूरत नहीं"
"बताईये मै आपकी क्या सेवा कर सकता हूं?"
"आपने पिछले महिने ज्यादा बिल लगाया था वो कम करना है और नंबर फिरसे शुरू करना है. मैने पूरा का पूरा सोलासो रूपये का बिल भर दिया है."
"आपकी रिक्वेस्ट हमारे पास आ गयी है, पर आज सॅटर्डे होने की वजह से मंडे नौ बजकर पैंतालिस बजने के बाद ही आप का नंबर शुरू हो सकेगा, सर"
"क्यों? आज, अभी शुरू करने में क्या प्रॉब्लेम है?"
"जो शुरू करते है वो नहीं है सॅटर्डे है इसलिये"
"तो तु क्या उखाडने के लिये वहां बैठा है क्या?"
"असभ्य भाषा का इस्तेमाल ना करें सर, नहीं तो मुझे कॉल समाप्त करना होगा.."
"अरे? कॉल रेकॉर्ड हो रही है ना? डरो मत.."
"मै डर नहीं रहां हूं, पर असभ्य भाषा का इस्तेमाल ना करें"
"असभ्य भाषा के सिवाय चलता नहीं, सभ्य भाषा लोगों की समझ के बाहर है.."
"माफ करें सर, आपका नंबर तो मंडे को ही शुरू होगा"
"एक तो खालीपिली एक्झेसिव्ह बिल लगाया, फिर महिनेतक फोन बंद, नुकसान हुआ है वो क्या आदित्य बिर्ला का बाप देगा क्या??"
"आप असभ्य भाषा का इस्तेमाल कर रहे है, इसलिये कॉल काटी जा रही है.."
"तुम सब डाकू हो...सोफास्टिकेटेड डाकू...~!!"
आता एवढं झाल्यावर सोमवारीच काय पण डूख धरून हे लोक कधीच फोन सुरू करणार नाहीत असे वाटले. पण रविवारी रात्री सहज कार्ड टाकले, तर आश्चर्यम!! फोन सुरू झाला होता. त्या बिचार्याने उगाच शिव्या खाल्ल्या . सॉरी म्हणायला फोन करावा तर नेमका माणूस पुन्हा हाती लागत नाही. नावेपण खरी असतात की खोटी रामजाणे.
10 Nov 2010 - 3:43 pm | सहज
इंडीयामधे असे किती त्रास असतात नै. ह्या गांधीवादींना आम्हा इंडीयावाल्यांच्या समस्येबद्दल काही लिहवत नाही. आमचे त्रास, कष्ट कधी दिसणार नाहीत.
10 Nov 2010 - 3:46 pm | परिकथेतील राजकुमार
हा शब्द काळजाला भिडला !
10 Nov 2010 - 3:50 pm | सहज
ते बिकादेशी आपलं बांग्लादेशी राजरोस तुमच्या कॅफेत येतात, सर्व सेवा उपभोगतात.
आम्ही इतके चान चान देवनागरी टंकूनही, मायमराठीची सेवा करुनही, आमच्याच देशात आम्हाला उपरे ठरवू पहाताय का?
10 Nov 2010 - 3:58 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या अशा शब्दांच्या आडून आपण आमचे चारित्र्यहनन करु पाहात आहत काय ? आमच्या स्वच्छ व्यवसायाविषयी जनमानसात अफवा पसरवु नयेत :(
आम्ही कधी तुम्हाला उपरे म्हणले बॉ ? हान आता तुम्हाला कोळी डान्स वगैरे येतो का ?
10 Nov 2010 - 4:11 pm | सहज
असे म्हणताय? बर ठीक. शे. आ. घा. आ.
बाकी चर्चा खवतून.
(डॉनश्रीचा मित्र) सहज
10 Nov 2010 - 3:43 pm | धमाल मुलगा
ग्राहक मंचाकडे तक्रार करा,
तक्रारीची एक प्रत TRAI ला पाठवा आणि तिसरी IDEA ला.
11 Nov 2010 - 4:17 am | शिल्पा ब
कसलं डोम्बलाच ग्राहक मंच? मी एकदा त्यांना कोणत्यातरी बुटाच्या दुकानासंदर्भात फोन केला तर ती बाई मला विचारते कशी कि " हा नंबर कोणी दिला? "
आणि काहीच केलं नाही ते वेगळंच...
10 Nov 2010 - 5:57 pm | स्पंदना
अहो मला तर मी जेन्व्हा जेन्व्हा येते तेन्व्हा तेन्व्हा हाच प्रॉब्लेम आहे. कायम फोन बंद. अन साधारण २० दिवसांसाठी रोमिंग मला नाही परवडायच हजार भर फोन होतात. पण तुम्ही जे वर सांगितलय ना अगदी तस्सच पिडतात सब मिट योर पेपर्स, ह्याव अन त्याव. @@@@@@@@@@@@@@@@ चे कुठल्वे. अस्सा राग येतो ना. बस.
10 Nov 2010 - 6:27 pm | इनोबा म्हणे
एअरटेल ही 'व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिसेस'चे मास अॅक्टिव्हेशन करत असते.
बॅलेन्स कमी होत असेल तर STOP असा १२१ ला समस करा.कुठल्याही सेवा चालू असतील तर त्याची लगेच माहिती मिळेल.
10 Nov 2010 - 6:51 pm | तिमा
माझ्या अनुभवाप्रमाणे प्रीपेड कनेक्शन हेच शेवटी कमी कटकटींचं आणि रोमिंगला सोईस्कर पडते. सेवांमधे एअरटेल व वोडाफोन हे त्यातल्या त्यात बरे आहेत.
10 Nov 2010 - 7:51 pm | रेवती
आम्हाला आयडीयाच्या प्रिपेडचा अनुभव बरा आहे.
फक्त पासपोर्टस दाखवावे लागले.
10 Nov 2010 - 7:58 pm | प्रभो
कॉर्पोरेट कार्ड वापरत असल्याने असले काही करावं लागलं नाही... :)
10 Nov 2010 - 11:18 pm | पैसा
माझ्याकडच्या बीएसएनएल च्या प्रीपेडची कागदपत्रे मी ७ वर्षात ३ वेळा दिली आहेत! ते लोक प्रामाणिकपणे सांगतात, की आमच्या ऑफिसातून फायली हरवल्या!
दुसर्या आयडियाच्या नंबराची ही कागदपत्रांची काही कटकट नाही. नेटवर्क चांगलं आहे. पण आणखी एक लूटमारीचा प्रकार म्हणजे एक कसली तरी "समर कॉण्टेस्ट" आहे असं म्हणत रोज ५/- रुपये खातात. हा प्रकार बंद करण्यासाठी सतत ३ दिवस त्या दिव्य कस्टमर सपोर्टला फोन करत होते. त्या लोकांशी बोलणं म्हणजे सहनशक्तीचा कडेलोट! शेवटी एकदाचा झाला बंद! पण तेव्हा आणखी एक मौलिक माहिती कळली, ती म्हणजे या नंबरला कॉल करण्यासाठी चार्जेस पडतात!
न सांगता डायलर टोन सुरू करणे त्याचे पैसे कापणे हे तर नेहेमीचंच झालंय. या विविध लूटमारीच्या आयडियाना कंटाळून माझ्या भावाने त्याच्या 'आयडिया' च्या नंबरवर बॅलन्स शून्य ठेवायला सुरुवात केलीय! न रहेगा बाँस, न बजेगी बांसुरी!!
16 Nov 2010 - 11:06 pm | लॉरी टांगटूंगकर
ते लोक प्रामाणिकपणे सांगतात, की आमच्या ऑफिसातून फायली हरवल्या!
वारलो!!!! मेलो१!!!!@@@@@
भारत सरकार झिन्दाबाद
16 Nov 2010 - 3:03 pm | निमिष सोनार
मी एकाने सुचवलेल्या आयडीयाच्या एका तक्रार करण्याची सोय असलेल्या ईमेल वर तक्रार केली तर उत्तर काय आले माहितेय?
"पुन्हा (चौथ्यांदा) डोक्युमेंट आणि फोटो सबमीट करा"
म्हणजे
"करावीच लागतील."
मी उत्तर दिले आहे, की "जोपर्यंत मी या आधी ची तीन वेळा सबमीट केलेली डॉक्युमेंट्स आणि माझे तीन कलर फोटो तुम्ही मला माझ्या पत्त्यावर पोस्टाने/कुरियर परत करत नाहीत तोपर्यंत मी पुन्हा चौथ्यांदा डॉक्युमेंट सबमीट कर्णार नाही.
आणि ग्राहक मंचाकडे जरूर तक्रार करेन आणि न्यूज चॅनेल्स कडे तक्रार करणार."
बघूया काय होते ते!!
मात्र, काहीतरी गौडबंगाल आहे हे नक्की.
डॉक्युमेंट्स कुठेतरी गहाळ होताहेत अथवा वापरली जाताहेत हे नक्की...
ग्राहक मंचाचा फोन किंवा ईमेल किंवा वेबसाईट कुणाला माहिती आहे का?
16 Nov 2010 - 3:06 pm | निमिष सोनार
ग्राहक मंचाचा फोन किंवा ईमेल किंवा वेबसाईट कुणाला माहिती आहे का?
कृपया द्यावा.
17 Nov 2010 - 2:09 pm | जयंत कुलकर्णी
ही एक चांगली organization आहे.
http://www.cercindia.org/
17 Nov 2010 - 10:16 am | विजुभाऊ
माझ्या एका मित्राने कोणताच नंबर न घेतासुद्धा अॅड्रेस व्हेरीफिकेशन साठी त्याच्या घरी एकजण येऊन गेला. फोनवर त्याच्याशी कोणीतरी स्त्री जातीची व्यक्ती ( पोलीसी रीपोर्टात स्त्री जातीचे अर्भक असा उल्लेख असतो त्याप्रमाणे) बोलली.
मागाहून कळाले की त्या मित्राचे व्हेरीफिकेशन एक स्थळ म्हणून झाले होते.
18 Nov 2010 - 1:07 pm | निमिष सोनार
मी ग्रीव्हन्स सेल (grievance.mh@idea.adityabirla.com) ला पुढे ईमेल द्वारे उत्तर दिले की :
"जर का चार तासांत मोबाईल चालू झाला नाही तर मी न्यूज चॅनेल कडे सांगेन. तेथे माझ्या ओळखी आहेत.
आणि चौथ्यांदा मी डोक्युमेंट सबमीट करण्या आधी माझी या आधीची तीन वेळा दिलेली डॉक्स कुरियरने परत पाठवा.
आणि मी ग्राहक मंचा कडे चाललो आहे."
...खरेच चार तासांच्या आत नंबर सुरु झाला आणि त्यांनी कबूल केले की तुमची कागदपत्रके आमचे कडे आहेत.
पण....
मग या आधी जे काय होते ते कशासाठी होते हे कळायला मार्ग नाही.
आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो की आपण या चर्चेत भाग घेवून विविध अनिभव शेअर केले, त्या अनुषंगाने विविध उपयुक्त माहिती एकमेकांना कळली.
सध्यातरी नंबर चालू आहे.
पुढे बघू या...