WWIEF केप टाऊन नवीन

अनिल सोनुने's picture
अनिल सोनुने in काथ्याकूट
4 Nov 2010 - 12:31 am
गाभा: 

नमस्कार मित्रांनो,
बऱ्याच दिवसानंतर आज मिपावर लिहितो आहे. माझ्या एका प्रकल्पावर काम सुरु असल्याने लेखन करता आले नाही तरीही एखादी तरी चक्कर मिपावर असतेच.
असो, वर्ल्डवाईड इनोव्हेटीव एज्युकेशन फोरम 2010 साठी माझी निवड केप टाऊन येथे झाली होती. दिनांक 26 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या कालावधीत हा कार्यक्रम पार पडला. संबंधित फोरमसाठी देशातून ९ प्रकल्प निवडले होते. त्यात महाराष्ट्रातून माझा एकट्याचा प्रकल्प सादर करण्याची संधी मला मिळाली. सदरील स्पर्धा ही वर्ग अध्यापनात संगणकाचा, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या विषयी असते. सदर स्पर्धा देशपातळीवर मायक्रोसॉफ्ट ही कंपनी आयोजीत करीत असते. या वर्षी २ लाखाच्या वर शिक्षकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यातील प्रत्येक राज्यातून 10 प्रकल्प देशपातळीवर निवडून त्यातील १० प्रकल्प आंतरराष्ट्रीय परीषदेसाठी निवडले जातात. थोडक्यात भविष्यातील शाळा कशा असतील याबद्दल हे प्रकल्प असतात. यावर्षी ८५ देशांमधून ५५० शिक्षक यात सहभागी झाले होते. इतर देशांतील शिक्षणक्षेत्रातील प्रगती पाहता आपल्याला अजूनही खूप काही करण्यासारखे आहे हे जाणवते.
उदा. दक्षिण अफ्रिकेतील सर्व शिक्षकांना तेथील सरकारने लॅपटॉप पुरविले आहे. ऑस्ट्रियातील एका शिक्षकाचा प्रकल्पात त्याच्या वर्गातील सर्व विद्याथ्यांकडे टॅब्लेट पी.सी. होते. सहभागी शाळांपैकी बहुतेक सर्व शाळांमध्ये व्हाईट बोर्ड (इंटरऍ़क्टीव्ह) चा वापर केला जाते. इंटरनेट तर सर्व ठिकाणी वापरलेच जाते.आपण किती दिवस खडू फळा या साहित्यांनी शिकविणार आहोत. शिक्षणक्षेत्रात अतिशय प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आपण एखादी शाळा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवू शकतो. जेणेकरुन त्यावरुन मिळणाऱ्या रिझल्टवरुन ही गोष्ट आपल्याला परवडेल की नाही ते कळू शकेल.
संबंधित कार्यक्रम हा जगातील नवोपक्रमशील शिक्षकांसाठी एक पर्वणी असते. दर वर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. मागील दोन वर्षापासून महाराष्ट्राला प्रतिनिधित्व मिळाले नव्हते.
फोरममध्ये जगातील शिक्षक कोणकोणते नवीन प्रकल्प वर्गात राबवितात याची माहिती मिळाली. बऱ्याच गोष्टी शिकण्यास मिळाल्या. यातून आपल्या येथेही काही प्रकल्प राबविता येतील पण भौतिक सुविधांचा अभाव असल्याने यावर मात कशी करावी हा प्रश्न आहे. मला माझ्या शाळेवर असा एखादा प्रकल्प राबवायचा असल्यास आर्थिक मदत दानशूर व्यक्तींकडून होऊ शकेल काय ?
From Cape Town

प्रतिक्रिया

सविस्तर लिहीले तर समजू शकेल

तुम्हाला व्हाईट बोर्ड प्रोजेक्टर लागणार आहेत का? असल्यास किती (प्रत्येक वर्गात एक धरल्यास)? प्रत्येक प्रोजेक्टरची किंमत किती? फक्त कुतूहल म्हणून हे प्रश्न.

अनिल सोनुने's picture

4 Nov 2010 - 1:27 am | अनिल सोनुने

साधारण ७०००० पर्यंत किंमत असावी. असे ७ हवे आहेत.

विकास's picture

4 Nov 2010 - 1:13 am | विकास

आपले अभिनंदन!

जरा सविस्तर लिहीले तर समजू शकेल. आपला प्रकल्प काय होता/आहे? आपल्याला कुठला प्रकल्प राबयावचा आहे? नक्की कुठला वयोगट? कुठला सामाजीक गट (म्हणजे नेहमीच्या शाळा, झोपडपट्टीतील /अतीग्रामीण भाग/वनवासी इथल्या मुलांपर्यंत शि़क्षण पोचवणे) अथवा अजून काही जे येथे लिहीलेले नाही.

धन्यवाद

अनिल सोनुने's picture

4 Nov 2010 - 1:26 am | अनिल सोनुने

मी ग्रामीण भागातील जिल्हा परीषदेच्या शाळेवर शिक्षक आहे. व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी powerpoint, Videos, Animations इ. च्या साह्याने ‍शिकवतो.यासाठी लागणारे कंटेंट मी स्वत: विकसित केले आहे.त्यासाठी शाळेचा एक संगणक व माझा वैयक्तिक लॅपटॉप मी वापरतो. गेल्या दोन वर्षापासून मी हा प्रकल्प राबवितो आहे व मुलांना शाळेची गोडी वाटते आहे. मुलांचा अध्ययन अनुभव अतिशय प्रभावीपणे देता येतात असा माझा अनुभव आहे. निकालाचा स्तर सुद्धा वाढला आहे.

मुख्य म्हणजे मुलांच्या अनुभवकक्षा नक्कीच रुंदावत असणार. कौतुकास्पद आहे आपला उपक्रम. मुलांच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचा फार मोठा वाटा असतो.
आपले अभिनंदन.

सिद्धार्थ ४'s picture

4 Nov 2010 - 11:46 am | सिद्धार्थ ४

कौतुकास्पद उपक्रम...पुढिल वाटचाली साठी शुभेछा ..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2010 - 8:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्वा सर...! मस्त भरारी घेत आहात. आपल्या प्रकल्पाला शुभेच्छा आहेतच...!

-दिलीप बिरुटे

पंख's picture

4 Nov 2010 - 11:38 am | पंख

सविस्तर लिहिल्यास आवडेल.. पण एकूणच काहीतरी चांगलेच आहे याची कल्पना येते.. आपल्या प्रकल्पास शुभेच्छा..

पंख's picture

4 Nov 2010 - 11:40 am | पंख

WWIEF मुळे हा लेख wrestling federation शी संबंधित असावा असे समजून कालपासून हा धागा ऊघडला नव्हता ;)

प्रिय सोनुने गुरुजी ( सर लिहिले तर बरे वाटते -- लिहितांनासुद्धा..काय हे इंग्रजीचे जोखड! निघता निघत नाही, असो)
तुमच्या प्रकल्पाबद्दल लिहा. आम्हाला ( मला तरी) तुमच्या प्रकल्पाबद्दल वाचायला आवडेल.

तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा

गोगलगाय's picture

5 Nov 2010 - 4:48 am | गोगलगाय

श्री. अनिल, तुमचा पत्ता, ई-मेल, शाळा ..ई. कळवा.