शब्द होती मूक तेव्हा रंगते ही भैरवी..

स्वैर परी's picture
स्वैर परी in काथ्याकूट
2 Nov 2010 - 2:23 pm
गाभा: 

आंतरजालावर ई पेपर वाचत असताना, ई-सकाळ वर एक अतिशय भन्नाट धागा सापडला आहे.मुलतानी ते भैरवी या शीर्षका खाली दिलेली रागमाला आवर्जुन ऐकवी अशी आहे. त्या बद्दल पुरविलेली महिती अशी:
न्यू जर्सीच्या विश्र्व नाट्यसंमेलानात पुण्याच्या भरतनाट्य संशोधन मंदिराने सादर केलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाने मराठी माणसांची मने जिंकली. याच नाटकातली गाजलेली रागमाला भरतच्या सहकार्याने ई-सकाळच्या वाचकांसाठी सादर केली आहे.

पुरूषोत्तम दारव्हेकरांची लेखणी आणि पं. जितेंद्र अभिषे्की यांच्या संगीत दिग्दर्शनातून साकारलेली ही रागमाला आपणाला नक्कीच आनंद देईल याची खात्री आहे.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

2 Nov 2010 - 2:46 pm | विसोबा खेचर

दुवा ऐकू येत नाही..

अभिषेकीबुवांची 'हिंडोल गावत सब..' ही रागमाला आहे का ही?

तात्या.

स्वैर परी's picture

2 Nov 2010 - 2:54 pm | स्वैर परी

यातील रागमाला आहे! आणि खुपच सुंदर आहे!

स्वैर परी's picture

2 Nov 2010 - 2:55 pm | स्वैर परी

यातील रागमाला आहे! आणि खुपच सुंदर आहे!

तिमा's picture

2 Nov 2010 - 8:09 pm | तिमा

रागमाला ऐकली. फारच छान आहे.