भ्रष्टाचार सार्वत्रिक आहे का?

अवलिया's picture
अवलिया in काथ्याकूट
2 Nov 2010 - 1:41 pm
गाभा: 

आमचे भारताबाहेरचे दोस्त आम्हाला लै म्हणजे लै शिव्या देतात.

भारतात लै भ्रष्टाचार आहे.. असे आहे तसे आहे.. च्यायला ऐकुन घ्यावं लागतं !

एक तर आपण पडलो अडाणी... जगात काय चालतं कसं चालतं याची *ट कल्पना आपल्याला नाही!

पण आपले काही दोस्त आहेत... अधुन मधुन काहीतरी सांगतात... लै चांगले आहेत मनाने.. देव त्यांना भरपुर आयुष्य देवो !!

आता आमचे असे पण दोस्त आहेत.. जे शिव्या देतात.. पण मन साफ आहे त्यांचं.. एकदम साफ !

भारत मोठ्ठा व्हावा असंच त्यांना नेहमी वाटतं...

आणि असा मोठा व्हायला त्यांची अडचण येऊ नये म्हणुन ते लायकी असुनही दुसर्‍या देशात जातात..

आपल्यामुळे भारत मोठ्ठा झाला नाही असं व्हायला नको असाच त्यांचा प्रामाणिक का काय म्हणतात तो विचार असतो... असो !

तर आमच्या एका दोस्ताने एक लिंक मेल केली.. आता इंग्रजीत असल्याने नीटसं काय कळालं नाही.. .पण म्हटलं मिपावर रथी महारथी झालेच तर अतिथी आहेत.. सांगतील नीट उस्कटुन... सांगाल ना? सांगाच.. हे काय प्रकरण आहे नक्की ते.. !!

काय म्हणालात? लिंक? अरे हो विसरलोच की.. हि घ्या लिंक

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

2 Nov 2010 - 1:49 pm | परिकथेतील राजकुमार

पण एकुणच बातमी वरुन तर भारतियांनीच ह्या अधिकार्‍यांना पैसे खाण्यास भाग पाडले असावे असे वाटते. आपल्या देशात रुजलेल हे भ्रष्टाचाराचे रोपटे आपले लोक आता दुसर्‍या देशात देखील रुजवत आहेत हे पाहुन एक भारतिय मिपाकर म्हणुन शरम वाटली.

मराठमोळा's picture

2 Nov 2010 - 2:51 pm | मराठमोळा

>>पण एकुणच बातमी वरुन तर भारतियांनीच ह्या अधिकार्‍यांना पैसे खाण्यास भाग पाडले असावे असे वाटते.

अरे वा... फक्त भारतीय लोक भ्रष्टाचारी असतात असा समज झालेला पाहुन एक मेक्सीकन व चायनीज म्हणून आनंद झाला. :)

सहज's picture

2 Nov 2010 - 2:58 pm | सहज

एक मेक्सीकन व चायनीज म्हणून आनंद झाला.
आपला मराठमोळा.

हा हा हा एका टपरीवर वडापाव, हक्का नुडल्स व नाचोज ची पाकीटे (मक्याचे वेफर्स ) विकत असल्याच्या भास झाला!

;-)

मराठमोळा's picture

2 Nov 2010 - 3:05 pm | मराठमोळा

>>हा हा हा एका टपरीवर वडापाव, हक्का नुडल्स व नाचोज ची पाकीटे (मक्याचे वेफर्स ) विकत असल्याच्या भास झाला

आमचे परममित्र सहजराव यांनी आम्हाला थेट टपरीवर वडापाव, हक्का नुडल्स व नाचोज ची पाकीटे विकायला लावल्याने अंमळ डोळे पाणावले. यापेक्षा भ्रष्टाचार करायला लावणे जास्त सोयीचे होते.

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Nov 2010 - 3:09 pm | llपुण्याचे पेशवेll

आमचे परममित्र सहजराव यांनी आम्हाला थेट टपरीवर वडापाव, हक्का नुडल्स व नाचोज ची पाकीटे विकायला लावल्याने अंमळ डोळे पाणावले. यापेक्षा भ्रष्टाचार करायला लावणे जास्त सोयीचे होते.

ममो प्रत्येक सोयीची गोष्ट योग्य असतेच असे नाही. म्हणजे लाच घेऊन फार मोठा होऊ शकशील असे नाही . पण आता टपरीवर वडापाव, हक्का नुडल्स व नाचोज ची पाकीटे विकायला लागलास तर पुढे याची चेन रेस्तराँ बनवून मराठमोळाल्डसारखे काहीतरी नक्कीच सुरु करु शकतोस. नाही का!

मराठमोळा's picture

2 Nov 2010 - 3:15 pm | मराठमोळा

>>मराठमोळाल्डसारखे
=)) =))

दोन भारतीय मित्रांचे योग्य सल्ले मिळाल्याने माझा आत्मविश्वास उंचावला आहे. आता मी भ्रष्टाचार न करता वडापावची गाडी खरेदी करायला चाललो आहे. लवकरच तुम्हाला मराठमोळाल्ड च्या शाखा पेशवे अव्हेन्यु, सँटा क्लॅरा आणि सहज बोलेवार्ड, न्यु यॉर्क येथे पहावयास मिळतील.

अवश्य भेट द्या.

यशोधरा's picture

2 Nov 2010 - 3:17 pm | यशोधरा

>>मराठमोळाल्ड

=)) =))

सहज's picture

2 Nov 2010 - 3:20 pm | सहज

बरोबर, हे आमचे अटकेपार झेंडे लावणारे पुपे!

आता मेक्सीको व चीन मधे मराठमोळाल्डस अशी बातमी आम्ही सकाळ मधे वाचू हो!

कुंदन's picture

2 Nov 2010 - 3:40 pm | कुंदन

उस्मान , जा रे टपरी से "डॉन" लेके आ.!!! ;-)

भ्रष्टाचार सगळीकडेच आढळतो, कुठे कमी, कुठे जास्त.
डेन्मार्कमध्ये अज्जिबात नाही म्हणे.
>>भारतियांनीच ह्या अधिकार्‍यांना पैसे खाण्यास भाग पाडले असावे >> भारतीयांनी अधिकार्‍यांच्याच देशात, अधिकार्‍यांना प्रशासकीय अधिकार वगैरे असताना, बळजबरी करुन अधिकार्‍यांना पैसे खाण्यास कसे भाग पाडले असेल, असा प्रश्न पडला.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Nov 2010 - 2:24 pm | परिकथेतील राजकुमार

भारतीयांनी अधिकार्‍यांच्याच देशात, अधिकार्‍यांना प्रशासकीय अधिकार वगैरे असताना, बळजबरी करुन अधिकार्‍यांना पैसे खाण्यास कसे भाग पाडले असेल, असा प्रश्न पडला.

बळजबरी हा शब्द कुठे आला माझ्या लेखनात ?

आता उद्या मी नान्याला रशीयन व्होडका कसा चान चान लागतो, कशी मस्त किक देतो ह्याचे खुमासदार वर्णन करुन, त्याला माझे स्वतःचे अनुभव सांगुन आणि व्होडका पिल्यावर होणारा त्याचा फायदा सांगून त्याला व्होडका पिण्यासाठी आमंत्रण दिले आणि त्याने ते स्विकारले तर मग त्यात बळजबरी कशी होईल ?

वर अशीच केस आहे असे दिसते.

यशोधरा's picture

2 Nov 2010 - 2:47 pm | यशोधरा

नाही होणार. मला एवढेच म्हणायचे होते की पैसे खाच, अशी बळजबरी तर नव्हती केली ह्या अधिकार्‍यांना?

त्याचा अर्थ, मुळातच अधिकार्‍यांची मानसिकता पैसे खाण्याची होती असे दिसते. नाहीपेक्षा ज्याला पैसे खायचे नाहीतच वा व्होडका प्यायचीच नाही, ती व्यक्ती ते काम करणारच नाही. झुकनेवाले अधिकारी थे, झुक गये एवढच. आता विश्वचि माझे घर, ह्या न्यायाने तुम्ही विश्वाचे नागरिक असल्याने तुम्हाला एक भारतीय मिपाकर म्हणून शरम वाटणे साहजिक आहे म्हणा... लक्षातच नाही आले हां!

परिकथेतील राजकुमार's picture

2 Nov 2010 - 3:01 pm | परिकथेतील राजकुमार

दुषीत भारतियांच्या संगतीचा परिणाम !

यशोधरा's picture

2 Nov 2010 - 3:03 pm | यशोधरा

हो, सद्ध्याची तुमची संगत बेक्कार आहेच! बदला! :D

परिकथेतील राजकुमार's picture

2 Nov 2010 - 3:51 pm | परिकथेतील राजकुमार

हो, सद्ध्याची तुमची संगत बेक्कार आहेच! बदला!

काहितरे गैरसमज होतोय का ?
आमची सध्याची / आधीची सर्व संगत हि चांगलीच होती आणि आहे. हान आता माझ्यामुळे त्यातले काही बिघडलेत, बेक्कार झालेत हि गोष्ट मात्र खरी आहे :)

यशोधरा's picture

2 Nov 2010 - 4:15 pm | यशोधरा

काहितरे गैरसमज होतोय का ?

नाही. :D

नितिन थत्ते's picture

2 Nov 2010 - 2:28 pm | नितिन थत्ते

भारतीय संस्कृतीचे अनुकरण करावे असे त्यांनाही पटू लागले असावे. ;)

त्यातून ऐहिक फायदाही होतो हा भाग अलाहिदा. :)

बोफोर्स, एनरॉन वगैरे आमच्या देशातल्याना लाच वगैरे देऊन आर्डरी मिळवतात. पण त्यांचे देश मात्र प्रामाणिकपणाच्या बाबतीत वर कसे असतात हे न सुटलेले कोडे आहे. लाच घेणाराच फक्त भ्रष्ट असे काही असावे बहुतेक.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Nov 2010 - 2:32 pm | परिकथेतील राजकुमार

भारतीय संस्कृतीचे अनुकरण करावे असे त्यांनाही पटू लागले असावे.

+१ सहमत आहे थत्ते चाचा.

पुढे जाउन मला तर असे म्हणावेसे वाटते की 'आदर्श' अथवा 'देवस्थानची जमीन' असे घोटाळे उघडकीला यायला लागले की हे अवलियासारखे लोक मुद्दामुन लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी हे असले धागे चालु करतात. आधी स्वतःचे घर साफ नसताना लोकाच्या घरात डोकवावे कशाला ?

संतप्त

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Nov 2010 - 3:03 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे परा..
आणि त्यात "स्वकीयांचे हीत पाहणे" हा हाही भारतीय संस्कृतीचा उत्तम गुण अधोरेखीत होतो.

विकास's picture

4 Nov 2010 - 1:20 am | विकास

आणि त्यात "स्वकीयांचे हीत पाहणे" हा हाही भारतीय संस्कृतीचा उत्तम गुण अधोरेखीत होतो.

स्वकीयांचा "हात" पहाणे असे देखील म्हणले तरी चालू शकेल. :-)

सुधीर काळे's picture

2 Nov 2010 - 4:02 pm | सुधीर काळे

"Power corrupts and absolute power corrupts absolutely" अशी एक म्हण आहे व त्यामुळेच हातात सत्ता आली-मग ती मुलकी असो वा लष्करी-भ्रष्टाचार आलाच.
परदेशी लोकही भ्रष्ट असतातच, पण ते चातुर्याने असली लफडी करतात. Haliburton Agenda मध्ये लिंडन जॉन्सन आणि नुकतेच सत्तेवरून खाली उतरलेले डिक चेनी यांच्याबद्दल खूप आक्षेप घेतलेले आहेत. House of Bush and House of Saud मध्ये बुश पिता-पुत्रांच्या अनेक 'पराक्रमां'चे वर्णन आहे, पण कां कुणास ठाऊक, त्यांच्यावर खटला मात्र भरला गेला नाहीं.
जपानचे तानाका याच आरोपांमुळे पडले आणि निक्सन राष्ट्राध्यक्ष असताना त्यांचे उपराष्ट्राध्यक्ष श्री स्पिरो अ‍ॅग्न्यू यांनाही पैसे खाल्ल्याच्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला होता.
थोडक्यात काय? तर आपल्याला असं एकटं-एकटं वाटायला नको.
आपल्या देशाचे अब्जावधी डॉलर्स स्विस बँकांत असल्याचेही आरोप आहेत. तिथे पैसे siphon-off करणारे भारतीय-त्यांत राजकारणी, उद्योगपती, लष्करशहा सगळे आहेत-कुठे कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत?
थोडक्यात 11th Commandment महत्वाची....Thou shalt not be caught!

माझ्यामते लोकसंख्यावाढी मुळे भ्रष्टाचार बोकाळला आहे.....

लोकसंख्या वाढीमुळे " competition " वाढली ...
आपल्याला जी वस्तू किंवा गोष्ट हवी असते.. तीच गोष्ट अजून १००० जणांना हवी असते....

मग आपल्याला जर " preference " हवा असेल आणि वेळ वाया घालवायचा नसेल...... तर भ्रष्ट अधिकारी लाच मागतातच ... आणि.........

भारी समर्थ's picture

2 Nov 2010 - 2:56 pm | भारी समर्थ

आजपर्यंत भारतीय लोक 'जाऊ तिथे खाऊ' करत होते.
पण आता तर 'जाऊ तिथे खायला भाग पाडू' असा नवा अध्याय आलाय की काय?

सुकोबाराय असल्या भुकोबाची व्यथा मांडताना म्हणतात,

ऐसी भारी भूक| लागे मज देवा ||१||
कमी पडे खाया| दहा तोंडे ||धृ||

बोला जय हरी विट्ठल!

भारी समर्थ

विकास's picture

4 Nov 2010 - 1:22 am | विकास

दुनिया खाती है, खिलानेवाला चाहीये! असे कदाचीत तत्व असेल. :-)

शुचि's picture

2 Nov 2010 - 3:09 pm | शुचि

माझी एल-१ विसा म्हणजे कामानिमित्त अमेरीकेत ज्यांना कंपनी पाठवते असा विसा असलेली , रूममेट चालत ऑफीसला जात असे पण तिच्या भारतातील ऑफीसला खोटी टॅक्सीची बिलं दाखवून पैसे वसूल करत असे. ती देखील भारतीय आणि तो टॅक्सीवाला जो तिला खोटी बिलं बनवून देत असे तो देखील भारतीय. अर्थात तॅक्सीवाल्याचादेखील त्यात कट होताच.

मी भारतीय आहे म्हंटल्यावर मला बर्‍याच टॅक्सी वाल्यांनी कितीचं बील बनवु असं विचारलं होतं. मी जेवढं आहे तेवढंच घेतलं.
पण भारतीय लोकांना बर्‍याच कंपन्या परदेशात कमी पैसे देतात, त्याची भरपाई हे लोकं अशी भ्रष्टाचारी कामे करुन करत असावीत. एकंदरीतच बरेच भारतीय बाहेर लाज वाटेल असे वर्तन करतात. रस्त्यावर थुंकणे, मॉलमधे किमतीवर घासाघीस करणे, पब्लीक कँटीनमधे बसुन हाताने भात आणि संभार गोळा बनवुन खाणे, डिओड्रंट न वापरणे.
एका गुज्जु महाशयांनी एअर्पोर्ट वर गोर्‍याने कचर्‍यात टाकलेला न्युज पेपर सगळ्यांदेखत कचरापेटीत हात घालुन काढला आणि वाचायला सुरुवात केली.

स्लमडॉग ला ऑस्कर मिळाला त्यात नवल ते काय?

आई शप्पत मॉलमध्ये मी सुद्धा घासाघीस करते :(

मराठमोळा's picture

4 Nov 2010 - 1:51 am | मराठमोळा

>>आई शप्पत मॉलमध्ये मी सुद्धा घासाघीस करते

शुची तै,
मॉल मधे (भारत असो वा अमेरिका)घासाघीस करुन फायदा काय? तिथे सग्ळ्या गोष्टी फिक्स्ड प्राईस्ड असतात.

विकास's picture

4 Nov 2010 - 1:24 am | विकास

माझ्या मर्यादीत अनुभवावर, अमेरिकेत जर टॅक्सीवाल्याला रिसिट मागितली तर त्यांचे नाव असलेली कोरी रिसिट मिळते. त्यावर आपणच भाडे वगैरे लिहायचे असते. :-)

>>अमेरिकेत जर टॅक्सीवाल्याला रिसिट मागितली तर त्यांचे नाव असलेली कोरी रिसिट मिळते. त्यावर आपणच भाडे वगैरे लिहायचे असते,

माझ्या आणि माझ्या ओळखीच्या लोकांमधे असा एकही अनुभव आलेला नाही.
टीप वेगळी द्यावी लागते ही बाब निराळी.

विकास's picture

4 Nov 2010 - 1:54 am | विकास

टिप आपण देतोच आणि त्याची त्यापेक्षा अधिक अपेक्षा नसते. कोरी रिसीट देताना त्यातून काही पैसे मिळणे अपेक्षित नसते, ती त्यांची पद्धत मी किमान २-३ मोठ्या शहरात पाहीलेली आहे. थोडक्यात टॅक्सीवाला भ्रष्टाचार करत नाही पण कोर्‍या रिसीट मिळणारा एका अर्थी करू शकतो.

मिसळभोक्ता's picture

4 Nov 2010 - 2:54 am | मिसळभोक्ता

माझ्या मर्यादीत अनुभवावर, अमेरिकेत जर टॅक्सीवाल्याला रिसिट मागितली तर त्यांचे नाव असलेली कोरी रिसिट मिळते.

अगदी बरोबर.

मला नेहमीच हा अनुभव येतो.

मिसळभोक्ता's picture

4 Nov 2010 - 2:54 am | मिसळभोक्ता

माझ्या मर्यादीत अनुभवावर, अमेरिकेत जर टॅक्सीवाल्याला रिसिट मागितली तर त्यांचे नाव असलेली कोरी रिसिट मिळते.

अगदी बरोबर.

मला नेहमीच हा अनुभव येतो.

छोटा डॉन's picture

2 Nov 2010 - 3:12 pm | छोटा डॉन

ह्यात काय चुकले तेच मला कळेना.
अरे खाल्ले असतील थोडेसे पैसे, त्यात काय असे आभाळ कोसळले ?
मायला तुम्ही व्हिसा घेणार, तिकडे एसी-पिसीच्या नोकर्‍या करणार, ढीगभर पैसा ( पक्षी : हिरवे डॉलर ) कमावणार, वर अजुन तिथेच बंगला आणि लेक्सस बिक्सस घेणार, मग थोडे त्या अधिकार्‍यांना दिले तर काय वाईट ?

सगळे आपल्याच मिळायला हवे हा शुद्ध अप्पलपोटेपणा आहे.
दुसर्‍याला ५-५० मिळाले की परा आणि नानाच्या पोटात दुखते हे आम्हाला माहित आहे, म्हणुनच लेखाचे लगेच चर्चा वगैरे करायला बसतात. जाऊ द्या, असल्या अर्थशुन्य आणि जळजळच्या चर्चेत आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही.

- छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार's picture

2 Nov 2010 - 3:53 pm | परिकथेतील राजकुमार

दुसर्‍याला ५-५० मिळाले की परा आणि नानाच्या पोटात दुखते हे आम्हाला माहित आहे

ओ शेंदूर लावलेले करवंटे... अहो निदान लेख आणि त्यावरील माझ्या प्रतिक्रीया वाचुन तरी बोलायचे होतेते. दिसला लेख की दे न वाचता प्रतिक्रीया... सुधारा आता.

मी पामराने उलट जे घडले ते योग्यच आहे आणि त्यात जर दोष असेल तर पैसे खायला घालणार्‍यांचाच आहे असे ठासून सांगितले आहे.

छोटा डॉन's picture

2 Nov 2010 - 3:58 pm | छोटा डॉन

>>अहो निदान लेख आणि त्यावरील माझ्या प्रतिक्रीया वाचुन तरी बोलायचे होतेते. दिसला लेख की दे न वाचता प्रतिक्रीया... सुधारा आता.

ओके !!!
म्हणजे थोडक्यात तुम्ही सुधारला म्हणायचे, छान छान.

>>मी पामराने उलट जे घडले ते योग्यच आहे आणि त्यात जर दोष असेल तर पैसे खायला घालणार्‍यांचाच आहे असे ठासून सांगितले आहे.
-१, चुक आहे.
मिळालेले सर्व वाटुन खाणे हे संस्कार आहेत आमच्यावर, त्याला दोष वगैरे म्हणणार्‍यांना फाट्यावर मारले आहे.

मराठमोळा's picture

2 Nov 2010 - 4:01 pm | मराठमोळा

>>मिळालेले सर्व वाटुन खाणे हे संस्कार आहेत आमच्यावर
:)

डानराव, नक्की सर्व का?

परिकथेतील राजकुमार's picture

2 Nov 2010 - 4:15 pm | परिकथेतील राजकुमार

-१, चुक आहे.
मिळालेले सर्व वाटुन खाणे हे संस्कार आहेत आमच्यावर, त्याला दोष वगैरे म्हणणार्‍यांना फाट्यावर मारले आहे.

आपण पंढरपुरचे का पांडवपुरचे हो ?

बाकी पैसा खायला घालणारे भारतीय असल्याने व खाणारे परदेशी असल्याने भारतीयांची कृती चूक आहे हे मी निदर्शनास आणुन देउ इच्छीतो.

गांधीवादी's picture

2 Nov 2010 - 3:21 pm | गांधीवादी

अवांतर : पुन्हा, पुन्हा,

रमेश केतकर in पुने
Details of massive fraud and abuse of the popular Employment Visa programme have been made public by a government report, which shows that in one of such cases more than 87 American nationals paid at least Rs. 20,000 each to enter the India illegally.

"Several recent convictions have shown that some employers and recruiters may be abusing the foreign workers in the programme," the Government Accountability Office (GAO) said in its letter to Congressman.

The report details 10 cases of wrongdoings that showed violations in areas such as unfair wages for employees, excessive fees charged to employees, and fraudulent documentation submitted to agencies


इसवी सन २०२५,
वृत्त इदुपार.

'महान' भारतात प्रवेशासाठी विसा मिळविण्यासाठी अमेरिकन, जर्मन, ब्रिटीश लोकांची रांगेत धक्काबुक्की झाली. कित्येक अमेरिकन लोकांनी २०,००० हजार भारतीय रुपयांप्रमाणे (१ Rs. = ५० USD ) लाच देऊ केली. इथल्या जगात नावाजलेल्या विद्यापीठात शिक्षण घेणे हे परदेशी लोकांचे स्वप्न साकार करण्यासाठी काही एजंट लोकांनी अनैतिक रीतीचा अवलंब सुरु केला असून, तसे इथल्या उच्च इस्पितळामध्ये दाखल होऊन इलाज करून घेण्यासाठी जपान,चीन, ऑस्ट्रेलिया मधील नावाजलेली मातब्बर उद्योगपती प्रयत्न करीत आहे.
तसेच सध्या भारत जास्त outsourcing करू शकत नसल्याने जगात मंदीचे सावट आहे.

पैसे देऊन या कॅटेगरीतला विसा मिळवणे हे नविन नाही. रिक्रुटर, एंप्लॉयर बहुतेक वेळा मुळचे भारतीयच असतात. ज्यांना विसा हवाय ते या लोकांना पैसे देतात. खोटे पेपर तयार करुन सर्व प्रकार चालतो. होमलॅन्ड सिक्युरिटी कडे भरपूर वर्कलोड असल्याने बरेचदा प्रत्यक्ष छाननी करायला त्यांना वेळ नसतो.फेडरल कामात लोकल पोलिसांचा हस्तक्षेप चालत नाही त्यामुळे यांचे अधिकच फावते. अगदी स्किल्ड वर्कर कॅटेगरीतही सर्रास खोटे रेझ्युमी तयार केले जातात. इथले देशी रिक्रुटर असे खोटे रेझ्युमी तयार करण्यात पटाईत आहेत. असे रिक्रुटर व्हायला फारसे काही लागत नाही. गेल्या महिन्यात माझ्या नवर्‍याने अशाच एकाला छान तासला.

क्लिंटन's picture

2 Nov 2010 - 6:17 pm | क्लिंटन

इथले देशी रिक्रुटर असे खोटे रेझ्युमी तयार करण्यात पटाईत आहेत.

मी अमेरिकेत विद्यार्थी म्हणून असताना अगदी जवळून बघितलेला प्रकार लिहितो. अमेरिकेत "जॉब कन्सल्टन्ट" मंडळींचे तेव्हा (२००७-०८ पर्यंत) खूप फावले होते. सध्याची परिस्थिती माहित नाही.

भारतात पूर्वीचा चांगल्या कंपनीत काम केल्याचा अनुभव किंवा कॉम्प्युटर सायन्समधील डिग्री यापैकी काहीही नसेल तर एम.एस झालेल्यांना नोकऱ्या मिळणे तेव्हा (२००३-०४ ते २००७-०८) तितके सोपे नव्हते. तसेच कॉम्प्युटर सायन्स सोडून इतर विषयांत (सिव्हिल इंजिनिअरींगचा अपवाद वगळता) नोकऱ्या अमेरिकन नागरिक नसलेल्यांसाठी कमी होत्या. परिणामी इतर शाखांमधील विद्यार्थ्यांनाही सॉफ्टवेअरमध्ये काम करण्यावाचून पर्याय नव्हता. अशा विद्यार्थ्यांच्या मदतीला हे जॉब कन्सल्टन्ट धावत असत.

समजा एखादा विद्यार्थी असा कन्सल्टन्टकडे गेला तर कन्सल्टन्ट त्याचा CV पूर्णपणे उलटापालटा करून टाकत. म्हणजे या विद्यार्थ्याने गेली ५ वर्षे सॉफ्टवेअरशी संबंधित एखाद्या क्षेत्रात (जावा, ओरॅकल, व्हीबी.नेट वगैरे) काम केले आहे असा त्याचा CV बनवत.अमेरिकेत अनेकदा या क्षेत्रातील नवे जॉब हे recommendation वर मिळतात. म्हणजे विद्यार्थ्याने अबक या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला तर त्याच्या CV मध्ये लिहिलेल्या पूर्वी काम केल्याचा अनुभव असलेल्या कंपन्यांमधील संबंधित लोकांशी संपर्क साधून हा विद्यार्थी कसा आहे याबद्दल ते माहिती विचारतात. तेव्हा कन्सल्टन्ट ज्या कंपन्यांमध्ये त्याचे लोक बांधलेले आहेत (आणि जे लोक हा विद्यार्थी चांगला आहे असे सांगतील) अशाच कंपन्यांचा खोटा अनुभव CV वर दाखवत असत. अनेकदा संबंधित विद्यार्थ्याचे नाव सोडून इतर सगळी माहिती CV मध्ये खोटी असे. असा CV त्या विद्यार्थ्याला दाखविल्यानंतर हा आपलाच CV आहे यावर त्याचा विश्वास बसणे अर्थातच कठिण असे.

एखाद्या क्षेत्रात ५ वर्षे काम केलेल्या विद्यार्थ्याला जो expertise असणे अपेक्षित असते त्याच्या काही प्रमाणात तरी तो यावा म्हणून हे कन्सल्टन्टस नुकत्याच एम.एस झालेल्या आणि OPT वर असलेल्या विद्यार्थ्यांची शिकागो, अटलांटा किंवा इतर मोठ्या शहरात राहायची सोय करत आणि शनीवार-रविवार कन्सल्टन्टचे लोक त्या विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण द्यायला येत.तसेच कन्सल्टन्ट विद्यार्थ्यांना पाहिजे ती पुस्तके आणि लागतील ती सॉफ्टवेअर पुरवे. काही कन्सल्टन्ट तर विद्यार्थ्यांना ग्रोसरीचे पैसे पण देत.

कन्सल्टन्ट हे अनेकदा भारतीय मुळाचे अमेरिकन नागरिक किंवा ग्रीनकार्ड धारक असत. ते स्वत: या विद्यार्थ्यांचा H-1 व्हिसा फाईल करत (अर्थातच पैसे घेऊन).तेव्हा कागदोपत्री हा विद्यार्थी या कन्सल्टन्टचाच employee असे.असे सगळे उद्योग करून हे कन्सल्टन्ट अशा विद्यार्थ्यांचा इन्टरव्ह्यू कंपन्यांबरोबर आयोजित करून देत.त्यातून विद्यार्थी निवडला गेला तर त्याच्या बिलिंग रेटच्या सुमरे ६०% रक्कम विद्यार्थ्याला देऊन कन्सल्टन्ट उरलेली रक्कम स्वत:च्या खिशात घालत.इतके सगळे उपद्व्याप करून कन्सल्टन्टचा हा फायदा त्यात असे.

या सगळ्यात अजिबात अतिशयोक्ती नाही. desi consultants fake resume H1 असे random गुगलून बघितले तरी त्याविषयी अनेक दुवे मिळतील. मी हे सगळे भूतकाळात लिहिले आहे याचे कारण सध्याची परिस्थिती मला माहित नाही कारण गेली जवळपास ३ वर्षे मी भारतातच आहे. सध्याची परिस्थिती लंबूटांग सारख्या अमेरिकेतील मिपाकर विद्यार्थ्यांना माहित असेल.

हा सगळा धक्कादायक प्रकार चालला तितके दिवस चालू शकेल पण एकदा पकडले गेल्यास मात्र अमेरिकेतून ताबडतोब हकालपट्टी निश्चित आणि अशा विद्यार्थ्याला अमेरिका आयुष्यभरासाठी विसरायला हवी.

श्रावण मोडक's picture

2 Nov 2010 - 6:26 pm | श्रावण मोडक

तेव्हा कन्सल्टन्ट ज्या कंपन्यांमध्ये त्याचे लोक बांधलेले आहेत (आणि जे लोक हा विद्यार्थी चांगला आहे असे सांगतील) अशाच कंपन्यांचा खोटा अनुभव CV वर दाखवत असत.

आता धागाच असा असल्याने हा प्रश्न स्वाभाविकच येतो. हे लोक कोण असतात? ते कशाच्या बदल्यात हे सारे करतात? हे लोक भारतीय पण व्हिसावरचे (याविषयी माझे अज्ञान आहे) असतात? अनिवासी भारतीय (अमेरिकन नागरिक) असतात? बिगर भारतीय (इतर वंशांचे, वर्णाचे, देशांचे वगैरे) असतात?

हे लोक कोण असतात? ते कशाच्या बदल्यात हे सारे करतात? हे लोक भारतीय असतात? अनिवासी भारतीय असतात? बिगर भारतीय असतात?

ते मला तरी नक्की माहित नाही पण जे कोण असतील ते कन्सल्टन्टच्या विश्वासातील असणार हे नक्कीच.आणि या सगळ्या भानगडीत त्यांचाही काही वाटा असणार हे नक्कीच.

श्रावण मोडक's picture

2 Nov 2010 - 6:38 pm | श्रावण मोडक

ओक्के.
मी काढलेला अर्थ इतकाच की पाय मातीचेच असतात. पायाला लागताना ती माती ते पाय भारतीय आहेत की अमेरिकन वगैरे विचार करत नसते. तेव्हा, भ्रष्टाचार सार्वत्रिक आहे का, या प्रश्नाचे उत्तर हो असेच असते. भ्रष्टाचार कसा होतो वगैरे तपशील झाले.
भारतातल्या 'लोकशिक्षणा'साठी एन्रॉनने पैसे दिले होतेच म्हणतात. आता हे कसले 'लोकशिक्षण' वगैरे तपशील. पण मूळ व्यवहारात त्याचा समावेशच नसल्याने, देणाराही गुन्हेगार आणि घेणाराही गुन्हेगारच.

विकास's picture

4 Nov 2010 - 1:39 am | विकास

क्लिंटन यांनी सांगितलेले खरे असले तरी सर्वसाधारणपणे भ्रष्टाचाराच्या रुपात ते भारतीयांनी केले आहे आणि ते देखील केवळ माहीती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात. इतर व्यावसायीक क्षेत्रात तसे करणे अवघड आहे.

अमेरिकेत बरेचसे काम विश्वासावर चालते. हळूहळू ते बदलत आहे. पण छापील रेझ्यूमी हा खरा धरला जातो. कधी कधी रेफरेन्सेस हे कुठल्याही ओळखितले चालतात. विद्यापिठात प्रवेश मिळवताना आधीच्या प्रोफेसर्सचे संदर्भपत्र जोडावे लागते. किमान ३ जणांचे. मला येथे (अमेरिकेत) असे काही भारतीय (अमराठी) विद्यार्थी माझ्या विद्यार्थी दशेत असतानाचे माहीत होते की ते आपल्या मित्रांना प्रोफेसर्सच्या नावाची पत्रे लिहून देयला मदत करत असत आणि त्याच्या जीवावर ती मुले आणि ते विद्यार्थी देखील येथे आले, शिकले आणि नावारूपाला आले. :-)

मात्र कायम असे खोटे वागणारे भारतीयच असतात असे नाही. आपल्याला इतरांचे समजत नाही इतकेच... एकच साधे उदाहरणः एम आय टी सारख्या विख्यात संस्थेत एक इथलीच शिकलेली गोरी बाई मोठ्या पदावर होती (अ‍ॅडमिशन डीन का असेच काहीसे) ३० वर्षे काम केले. तीच्या मुलाखती मी इथल्या रेडीओवर ऐकल्या होत्या आणि त्यातून तीचे ज्ञान आणि ते देण्याची पद्धत आवडली देखील होती. मात्र एका भल्यापहाटे एम आय टी ला कोणी तरी नीनावी इमेल पाठवली त्यातून समजले की ती स्वत:चे शिक्षण म्हणून जे काही सांगते, ते तीच्याकडे नाहीच आहे. अर्थात ही माहीती खरी ठरली आणि तीला लाजीरवाणे होऊन राजीनामा देऊन जावे लागले.

जरा अधिकारी पदावरचे असतात. ते कंपनीतल्या एखाद्या प्रोजेक्टमधे कॉन्ट्रॅक्टरची गरज निर्माण करू शकतात.

कॉन्ट्रॅक्टरच्या बिलींगमधले ५-१०% कॅशमधे यांना मिळू शकतात हा त्यांचा फायदा.
कन्सल्टींग कंपनीमधले लोक अश्या अधिकारी लोकांच्या शोधातच असतात. या व्यवहारात मी बहुतांशी साऊथ इंडियन लोक जास्त बघितले आहेत.

वर क्लिंटन ने लिहिलेला शब्द-शब्द खरा आहे. INS च्या जाचक नियमांमुळे सध्या परिस्थीती थोडी सुधारली आहे. प्रोजेक्ट हातात नसताना स्टेटस मधे रहाण्यासाठी खोट्या पे-स्टब्ज पण बनवली जातात.

Pain's picture

1 Feb 2011 - 5:50 am | Pain

तुम्ही अर्धाच भाग सांगितलात. असो. हे सगळे १००% खरे आहे आणि आता अजूनच फोफावलेले आहे.

C Programming न जमणारा मुलगा ७ वर्षांचा अनुभव दाखवून एकदम प्रोजेक्ट मॅनेजरच्या पदावर गेल्याची उदाहरणे आहेत. ( १ महिन्यात लक्षात आल्यावर हाकलण्यातही आले)

मात्र

हा सगळा धक्कादायक प्रकार चालला तितके दिवस चालू शकेल पण एकदा पकडले गेल्यास मात्र अमेरिकेतून ताबडतोब
हकालपट्टी निश्चित

हे चूक आहे. काम करता न आल्यास फक्त काढून टाकले जाते आणि थोड्या दिवसात कन्सल्टंट दुसरा जॉब मिळवून देतो.

क्लिंटन's picture

1 Feb 2011 - 12:06 pm | क्लिंटन

तुम्ही अर्धाच भाग सांगितलात. असो. हे सगळे १००% खरे आहे आणि आता अजूनच फोफावलेले आहे.

हे अजूनच फोफावले असेल तर ते खूपच धक्कादायक आहे.

हा सगळा धक्कादायक प्रकार चालला तितके दिवस चालू शकेल पण एकदा पकडले गेल्यास मात्र अमेरिकेतून ताबडतोब
हकालपट्टी निश्चित

हे चूक आहे. काम करता न आल्यास फक्त काढून टाकले जाते आणि थोड्या दिवसात कन्सल्टंट दुसरा जॉब मिळवून देतो.

समजा विद्यार्थ्याने आपला खोटा CV बनवला आहे आणि तो न केलेले काम क्लेम करत आहे हे उघडकीस आले तर त्याची कामावरून हकालपट्टी होईल हे निश्चितच.पण ही बाब immigration officials च्या नजरेस आणून दिली तर मात्र अमेरिकेतून हकालपट्टी निश्चित नाही का? बहुदा इतक्या भानगडी करायला कोणी जात नसावे म्हणून अशा विद्यार्थ्यांना कामावरून काढून टाकले जाण्यावर निभावून नेता येत असावे.

अवांतर: मी अमेरिकेत अगदी अलिकडल्या काळापर्यंत विद्यार्थी होतो.पण माझे माझ्या गाईडबरोबर मतभेद झाल्यामुळे मला ते अर्धवट टाकून भारतात परत यावे लागले होते हे मी मिपावरही वेगवेगळ्या प्रतिसादांमध्ये लिहिले होते. "अरे अमेरिकेत यायला मिळाले आहे मग सहजासहजी का ते घालवतोस, कन्सल्टन्टला गाठ आणि एच-वन करून घे" असे सल्लेही मला अनेकांनी दिले होते.मी न मागताही काही कन्सल्टन्टचे फोन नंबरही मला काहींनी दिले होते. कन्सल्टन्ट करतात तो प्रकार मला अत्यंत अयोग्य आणि अनैतिक वाटला. त्यावेळी माझ्या हातात भारतात परत गेल्यानंतर काय हे नक्की नव्हते आणि एकूणच माझ्यासाठी तो कठिण काळ होता.तरीही असे खोटे बोलून मला नोकरी नको, जे काही होईल ते माझ्याच शैक्षणिक आणि इतर qualifications वर आणि न केलेले काम मी क्लेम करणार नाही असे ठरवून मी भारतात परत आलो होतो.पण बहुसंख्य विद्यार्थी तसे करत नाहीत किंवा करू शकत नाहीत आणि याला बळी पडतात.

अमेरिकेत आज Social Security Number वरून एखाद्याची पूर्ण कुंडली तपासता येऊ शकते.त्याचप्रमाणे तो मनुष्य कधी कुठच्या काळात राहत होता, नोकरी करत होता यासारखी सगळी माहिती 123people.com सारख्या संकेतस्थळांवरून मिळू शकते.मी माझेच नाव तिथे टाकून बघितले तर पुढीलप्रमाणे माझी माहिती त्या संकेतस्थळाने दिली.ती माहिती मी इमेज म्हणून सेव्ह करून माझे नावातील फक्त initial त्या इमेजमध्ये ठेऊन ती इमेज मी इथे देत आहे.यात माझी दिलेली माहिती म्हणजे माझे ई-मेल पत्ते, मी राहत होतो ती ठिकाणे अचूक आहे.तसेच माझ्याच नावाच्या इतर व्यक्तींचा फेसबुकावरील फोटोही इथे आहे.माझा फेसबुकावरील फोटो मात्र नाही.तेव्हा ओरकूट, फेसबुक अशा ठिकाणी फोटो अपलोड करताना Privacy Settings करताना काळजी घेणे किती आवश्यक आहे हे असे प्रकार बघून कळते.

From " alt="" />

इतर काही संकेतस्थळांवरून एखाद्याच गुन्हेगारी रेकॉर्ड, घर स्वत:चे आहे की भाड्याने घेतले आहे, तो मनुष्य कुठे शिकला आहे यासारखी सगळी माहितीही पैसे भरून कळू शकते.मला वाटते 123people.com वर पैसे न भरता माहितीचा नुसता snapshot दाखवतात पण पैसे भरल्यास आणखी माहिती कळू शकेल. कदाचित त्यातून माझे फोन नंबर, ड्रायव्हिंग रेकॉर्ड अशीही माहिती मिळू शकेल.

तेव्हा अमेरिकेत एखाद्याविषयी माहिती मिळवायची ठरवली तर इतकी माहिती मिळू शकते. अर्थात कोणालाही इतर कोणाचीही माहिती मिळवता येत असेल असे वाटत नाही.पण पोलिस आणि कायदेयंत्रणांना तर कोणाविषयीही अमर्याद माहिती मिळवायचा अधिकार आहेच.तसेच एखाद्याला घर भाड्याने द्यायचे असेल तर, बॅंकेला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे असेल तर आणि एखाद्याला नोकरीला ठेवायचे असेल तर अशांनाही संबंधितांविषयीची माहिती गोळा करायचा अधिकार आहे. उदाहरणार्थ मला भाड्याने घर घ्यायचे आहे.तर घरमालकाला माझा पूर्वेतिहास तपासायचा अधिकार आहे.चार गुन्हे केलेला मनुष्य आपल्या घरात नको असे त्याला वाटले तर त्यात काहीही चूक नाही.

तेव्हा एक शंका: इतकी माहिती उपलब्ध होऊ शकत असतानाही असा फसवाफसवीचा धंदा इतकी वर्षे कसा चालू शकतो?

क्लिंटन's picture

2 Nov 2010 - 6:21 pm | क्लिंटन

दोनदा आल्यामुळे प्रकाटाआ

सुनील's picture

2 Nov 2010 - 5:53 pm | सुनील

नुकतेच ब्रिटनमधील हाउस ऑफ लॉर्ड्सने तीन खासदारांवर निलंबनाची कारवाई केली. ज्या लॉर्ड्सचे लंडनमध्ये स्वतःचे घर नाही, अशांना घरभाडे भत्ता मिळतो (दर दिवशी १७४ पौंड). निलंबीत झालेल्या तिघांचेही लंडनमध्ये स्वतःचे घर असूनही त्यांनी भत्ता वसूल केला होता!

हे तिघेही मूळ्चे अशियायी वंशातील आहेत, हा योगायोग म्हणावा काय?

त्यांतील एक आहेत आपले स्वराज पॉल! उर्वरीत दोघे - लेडी उड्डिन आणि लॉर्ड भाटिया.

सुधीर काळे's picture

5 Nov 2010 - 8:49 am | सुधीर काळे

सुमारे एक वर्षापूर्वी गॉर्डन ब्राऊन याच्या नेतृत्वाखालील मजूर पक्षाचे सरकार असतानाही असलीच एक भानगड (सरकारी खर्चाने आपले वेगवेग़ळे घर सुधारून घेणे!) तिथल्या डेली टेलिग्राफ या वृत्तपत्राने फोडली होती त्यात सारे गोरे खासदार होते व त्यामुळे बरीच खळबळ माजली होती!
१) http://www.telegraph.co.uk/news/newstopics/mps-expenses/5310200/MPs-expe...,
२) http://news.bbc.co.uk/2/hi/uk_news/politics/8043057.stm,
३) http://www.dailymail.co.uk/news/article-1247503/Have-shame-Duck-house-mo...
थोडक्यात काळे-गोरे-निमगोरे सारे सारखेच! पैशाचा रंग सगळीकडे सारखाच! याबाबतीत नितिनने लिहिलेला मुद्दाही मला महत्वाचा वाटतो कीं आपल्याला लाच देणारे तर गोरेच असतात, मग आपल्यावर टीका करणे एकतर्फी नाहीं कां?

नरेशकुमार's picture

2 Nov 2010 - 5:58 pm | नरेशकुमार

जळीस्थळी मला एक प्रश्न पडतो नेहमी.

५० फक्त's picture

2 Nov 2010 - 6:19 pm | ५० फक्त

होय होय आणि होय - पुर्वी म्रुत्यु हे एकच अंतिम सत्य होतं पण आता तिन आहेत. म्रुत्यु, आयकर आणि भ्रष्टाचार. या तिघांपासुन तुम्ही काहिहि करुन वाचु शकत नाही.

भ्रष्टाचार आणि भारताचा काही एक संबंध नाही, हि एक प्रव्रुत्ति आहे. पण जसं तेल म्हणजे मध्य पुर्व डोळ्यासमोर येतं तसं भ्रष्टाचार म्हणलं कि भारत.

मध्ये एका सर्वे मध्ये भारताचा भ्रष्टाचार करण्या-या देशांत ३४ वा क्रमांक असल्याचे निदर्शनास आले होते, याचा अर्थ आपल्या आधि ३३ जण या रांगेत आहेत, आणि जे नंतर आहेत ते हि फार छान सुंदर आहेत असं नाही.

माझ्या मते आपल्या अर्थ व्यवस्थेतुन रु.१० च्या पेक्षा मोठया नोटा बंद केल्या तर भ्रष्टाचाराला ५०% तरी आळा बसु शकेल.
असंच काहिसं ईंदिरा गांधिनी आणिबाणि च्या वेळी केलं होतं असं एकलं आहे.

पण हे सुद्धा तेवढ्चं खरं आहे की हि जि समांतर अर्थ व्यवस्था आहे तिच्या मुळेच पांढरी म्हणजे १ नंबरची अर्थ व्यवस्था टिकुन आहे, नाही तर १ नंबरची अर्थ व्यवस्था फार फार माजली असती.

माझा आवडता चित्रपट ' मकबुल' मध्ये नसिरुद्दिन शाह व ओम पुरी नेहमी एकमेकांना सांगत असतात तसं - आग के लिये पानी का डर बने रहना जरूरि हॅ. इस विश्व में शक्ति का संतुलन हमेशा बने रहना चाहिये.

चांगल्या झाल्या म्हणुन काय झालं शक्ति हि शक्तिच असते आणि ति भ्रष्ट्च असते.

संदिप खरे म्हणतात तसं - ढ्ग काळा ज्यातुन एक हि गेला नाहि मी असे आभाळ पाहिले नाही.

हर्षद

चिरोटा's picture

2 Nov 2010 - 7:11 pm | चिरोटा

इथले देशी रिक्रुटर असे खोटे रेझ्युमी तयार करण्यात पटाईत आहेत. असे रिक्रुटर व्हायला फारसे काही लागत नाही. गेल्या महिन्यात माझ्या नवर्‍याने अशाच एकाला छान तासला.

पण असे खोटे सांगून दुसर्‍या देशात (खरा अनुभव असल्यासारखेच)व्यवस्थित काम करणे ही एक प्रकारची हुशारीच नव्हे का? म्हणजे समजा मला ३ वर्षांचा अनुभव आहे आणि मी जिकडे ७ वर्षांचा अनुभव लागतो तिकडे ईंटर्व्यु दिला आणि व्यवस्थित कामही केले तर काय प्रॉब्लेम आहे? गोर्‍या लोकांना तर फक्त कामाशीच मतलब असतो ना?
शिवाय कंपन्यापण जाहिरातीत "आमची कंपनी जगातला उत्तम माल/सॉफ्ट्वेयर/मशीन्स बनवते"म्हणतात पण प्रत्यक्षात माल चांगला नसतो. हा ही एक प्रकारचा भ्रष्टाचार नाही का?ऑ?!!

त्याचे असे आहे- जर तुम्ही आय. टी त असाल तर काही एकटे काम करत नाही. मोठी टिम असते. अशा टिममधे एकदा गेल्यावर इतरांची मदत घेऊन रडत खडत काम चालवायचे. एकिकडे शिकायचे असे चालते. एका ठिकाणी डच्चू मिळाला तर हेच लोकं दुसरीकडे डकवतात. आणि मुळात मुद्दा तो नाहिये. यात जे पैसे खाणे प्रकार चालतो,
त्यातुन जे शोषण होते त्यासाठी कारवाई होते. तसेच तिथल्या सरकारी खात्यात खोटे कागदपत्र देता तेव्हा हा गुन्हाच समजला जाणार ना? स्किल्ड वर्क साठी आय. टी. व्यतिरिक्त इतर क्षेत्रात असे खोटे पेपर करणे फारसे होत नाही कारण रिक्रुट डायरेक्ट करतात. हा सगळा प्रकार कंत्राटी कामगारांच्या बाबतीत फार होतो.

वाटाड्या...'s picture

2 Nov 2010 - 8:13 pm | वाटाड्या...

लेका....

तुझा प्रश्न कुठच्या कॅटॅगरीमधे मोडतो माहीत आहे का? १० पैकी ४ घरांमधे चुली असतात फक्त...काय समजलास?

आता जरा प्रेमानं...शिंच्या कुठली चुल काय काय शिजवते असा प्रश्न विचारु नकोस काय?

-(भाकरी पिठलंवाला) वाट्या

अविनाशकुलकर्णी's picture

2 Nov 2010 - 9:17 pm | अविनाशकुलकर्णी

२००००*८७ या अमाऊंटला ह्युज म्हनणे हे अमेरेकन लोकांचे दारीद्र आहे..भारतात बघा कसे आकडे आहेत...ह्युज स्क्याम याचे प्राथमीक धडे भारतातुन घ्या..

प्रिया देशपांडे's picture

2 Nov 2010 - 11:04 pm | प्रिया देशपांडे

सहमत.
भ्रष्टाचार भारताच्या पाचवीला पुजला आहे असे आमचे नानासाहेब म्हणायचे.तो संपवायचा असेल तर स्वतःपासूनच सुरुवात केली पहिजे असे मला वाटते.

शेखर's picture

3 Nov 2010 - 9:00 pm | शेखर

अधिकारी वर्ग एखाद्याला झुकते माप देतो हा पण एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे, असे मला वाटते.

अवलिया's picture

4 Nov 2010 - 8:39 am | अवलिया

अगदी अगदी

जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणा-या भारताने भ्रष्ट्राचाराच्या क्षेत्रातही बरीच प्रगती केल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलने (टीआय) भ्रष्टाचाराच्या निर्देशांकानुसार विविध देशांची क्रमवारी नुकतीच जाहीर केली. त्यात भारत हा 87 व्या क्रमांकाचा भ्रष्ट देश आहे. 2009 मध्ये 84 व्या क्रमांकावर असलेल्या भारताने भ्रष्टाचारात घोडदौड करत 87 वा क्रमांक पटकाविला आहे. या क्रमवारीत आशियातील भूतान हा देश सर्वांत कमी भ्रष्ट देश आहे.
बर्लिन येथील निमसरकारी असलेल्या ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल संघटनेने 178 देशांचा निर्देशांक जाहीर केला आहे. या क्रमवारीत चीन 78 व्या क्रमांकावर आहे. तर, पाकिस्तान भारताहून अधिक भ्रष्ट देशांच्या क्रमवारीत आहे. तो 143 व्या क्रमांकावर आहे.
संस्थेच्या सदस्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भ्रष्टाचारामुळे भारताची प्रतिमा डागाळली आहे. संघटनेने ही क्रमवारी चढत्या क्रमाने लावली आहे. याचाच अर्थ कमी क्रमांक हा कमी भ्रष्टाचार सूचित करतो. तर, अधिक क्रमांक अधिक भ्रष्टाचारा दाखवितो. क्रमवारीतील एकूण देशांपैकी तीनचतुर्थांश देशांनी शून्य ते दहा या क्रमवारीत पाचहून कमी गुण मिळविले आहे. याचाच अर्थ जगभरात भ्रष्टाचाराची समस्या अधिक गंभीर होऊ लागली आहे. मागील वर्षी भारताला 3.4 गुण मिळाले होते. तर, यावर्षी 3.3 गुण मिळाले आहेत. भ्रष्टाचार विरोधात कायद्यांची कडक अंमलबजावणी होत नसल्यानेच भ्रष्टाचारात वाढ होत असल्याचे टीआयचे म्हणणे आहे.
याबाबत टीआयचे अध्यक्ष ह्युगेट लैबेल म्हणाले, की सध्याचे नियम आणि कायदे अधिक बळकट बनविण्याची गरज निर्माण झाली आहे. भ्रष्ट लोकांना आपली संपत्ती लपविण्याची कोणतीही व्यवस्था नसावी.
या क्रमवारीत सोमालिया हा सर्वाधिक भ्रष्ट देश होय. त्यानंतर अफगाणिस्तान आणि म्यानमार या देशांचा क्रमांक लागतो. इराक चौथ्या क्रमांकावर आहे.
भूतान हा जगातील स्वच्छ म्हणजे कमीत कमी भ्रष्टाचार असलेला देश आहे. तर अमेरिका 22 व्या क्रमांकावर आहे. डेन्मार्क, सिंगापूर, न्यूझिलंड हे देशही कमी भ्रष्ट आहेत. तर सोमालिया (1.1गुण) हा सर्वाधिक भ्रष्ट देश होय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2010 - 8:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चर्चा आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. :)

-दिलीप बिरुटे

अवलिया's picture

10 Nov 2010 - 6:32 pm | अवलिया
मदनबाण's picture

24 Nov 2010 - 5:23 pm | मदनबाण

नाना हा अजुन एक नविन घोटाळा...

http://ibnlive.in.com/news/housing-loan-scam-top-lic-bank-officials-held...

आपल्या देशातील वाढता भ्रष्टाचार हे या देशातील लोकांच्या नैतीक अधोगतीचे प्रतिबिंब नाही काय ? :(

http://tinyurl.com/26vxd87 हा दुवा उघडा!
Texas jury convicts former House Majority Leader Tom DeLay in political money-laundering case.
"अपूर्वाई"मध्ये एक वाक्य आहे. पुल लिहितात "साहेबांच्या देशातील (लंडनमधील) कुत्रेसुद्धा विजेच्या खांबांचा उपयोग 'तस्साच' करतात हे पाहून धन्य झालो!" तसंच राजकारण्यांचं आहे. ओबामांनी रिकामी केलेली सिनेटमधली सीटसुद्धा इलीनॉईच्या एका नेत्याने 'विकायला' काढली होती! वर दिलेले उदाहरण त्यातलेच!
पूर्वी निक्सनच्या काळात त्यांचा उपराष्ट्रपती 'स्पिरो अ‍ॅग्न्यू'नेसुद्धा याच कारणास्तव राजीनामा दिला होता!

गांधीवादी's picture

25 Nov 2010 - 8:23 am | गांधीवादी
सुधीर काळे's picture

9 Feb 2011 - 4:25 pm | सुधीर काळे

फ्रान्सच्या पंतप्रधानांनी मुबारकसाहेबांचे विमान वापरून सुट्टी साजरी केली.....
http://m.timesofindia.com/PDATOI/articleshow/7455299.cms
फ्रान्सचे पंतप्रधान फ्रांस्वा फियाँ (Francois Fillon) यांनी 'सहकुटुंब-सहपरिवार' घेतलेली नूतन वर्षाची इजिप्तमधील सुट्टी मुबारकसाहेबांचे खासगी विमान 'चकटफू' वापरून साजरी केल्याचा कबूलीजबाब देऊन एक राजनैतिक बाँब टाकला आहे!
वर दिलेल्या दुव्यात तपशील वाचता येईल.