गाभा:
रामरक्षा ही केवळ महाराष्ट्रातच म्हटली जाते असा अनुभव आहे..
इतर प्रांतातले लोक ती का म्हणताना दिसत नाहीत?
जसे हनुमान चालिसा किंवा रामचरितमानस फक्त उत्तरेकडील लोकंच वाचतात/म्हणतात, तसेच आहे का हे?
महाराष्ट्रात मात्र बरेचसे लोक, त्यात बहुत करून आम ब्राह्मण समाज हमखास रामरक्षा म्हणताना आढळतो. ही रामरक्षा अगदी ल्हानपणापासूनच मुलांकडून पाठ करून घेतली जाते असेही निरिक्षण आहे.. परंतु महाराष्ट्र वगळता मात्र अन्य प्रांतिय लोक रामरक्षा म्हणताना आढळत नाहीत..
असे का?
कुणी जाणकार असल्यास याबाबत काही खुलासा करावा..
जाता जाता (ह घ्या) -
भय्ये मंडळी जसे सर्रास रामचरीतमानस म्हणतात त्याप्रमाणे महाराष्ट्रात आलेला पहिला भैय्या - श्रीराम, त्याच्या स्तुतिपर मात्र महाराष्ट्रात हमखास रामरक्षा म्हटली जाते..!
कदाचित राजसाहेबांना हे आवडणार नाही.. :)
असो..
तात्या.
प्रतिक्रिया
29 Oct 2010 - 6:51 pm | सुहास..
?
नवीनच माहीती.
जाणकारांच्या प्रतिक्षेच्या अपेक्षेत...
29 Oct 2010 - 6:53 pm | अवलिया
कदाचित महाराष्ट्रात विचारवंती भुते (धर्मावर टिका करणारी ) जास्त असल्याने रामरक्षा (आणि हनुमानस्तोत्र - भीमरुपी) जास्त प्रचारात असावी :)
29 Oct 2010 - 7:37 pm | मेघवेडा
प्रचंड सहमत!
बाकी ते म्हणत नाहीत तेच बरं. त्यांच्या त्या भयानक संस्कृत उच्चारांनी रामरक्षेलाही विनोदी स्वरूप प्राप्त झाले असते.
"ॐ सहेस्रशीऽरशा पुरूऽशे सहेसराऽक्ष सहेस्रपात" अशी काहीशी पुरूषसूक्ताची सुरूवात करतो आमच्या इकडच्या देवळात असणारा तो भय्या.. दोन मिनिटंसुद्धा बसावंसं वाटत नाही.
30 Oct 2010 - 5:58 am | चित्रा
त्यांना आपले (मराठी लोकांचे) उच्चार विचित्र वाटत असतील..
गायत्री मंत्रही उत्तरेत वेगळ्या प्रकारे म्हटला जातो.
1 Nov 2010 - 9:43 am | llपुण्याचे पेशवेll
उत्तरेत वेदपाठशाळेत जाऊन शिकलेल्या ब्राम्हणांचे उच्चार आपल्या इकडच्या संस्कृतासारखेच असतात. जसे 'हंस', 'दंश' हे उच्चार उत्तरेतले वेद वगैरे शिकलेले लोक 'हंस', 'दंश' असाच करतात 'हन्स','दन्श' असा करत नाहीत. हे मी पाहीले आहे स्वतः .
29 Oct 2010 - 7:03 pm | अविनाशकुलकर्णी
विचारवंती भुते


================================
खरय बाबा.....मनातले बोललात..दादा
29 Oct 2010 - 7:31 pm | प्रियाली
तुमच्या एका काकांनी रामरक्षेचे भाषांतर केले होते मनोगतावर. कृपया त्यांना विचारा. ;)
29 Oct 2010 - 7:40 pm | हुप्प्या
राम भैय्या कॅटॅगरीतला होता हे खरे. पण तो १४ वर्षे काढायची असे ठरवून आला होता. येताना लोंढे घेऊन आला नाही. भरत त्याच्या मागे आला तर त्याला परत धाडले. मोठ्ठ्या शहरात धंदाबिंदा सुरु करायच्या भानगडीत न पडता दंडकारण्यात पोचला. हनुमान आणि त्याच्या स्थानिक गँगला नोकर्या दिल्या. पूलबिल बांधून घेतला आणि रावणासारख्या दादाचा निकालही लावला. शेवटी वायद्याप्रमाणे अयोध्येला परतही गेला.
बाकी भैया लोकांनी ह्याचे अनुकरण केले तर त्यांचीही स्तोत्रे गायली जातील!
29 Oct 2010 - 7:59 pm | धमाल मुलगा
क्या ब्बात है!
मस्त प्रतिक्रिया :)
एकदम आवडली.
29 Oct 2010 - 8:04 pm | मेघवेडा
मस्त प्रतिक्रिया
असेच म्हणतो!
29 Oct 2010 - 9:58 pm | सूड
+१
30 Oct 2010 - 9:59 am | इनोबा म्हणे
जय महाराष्ट्र!
30 Oct 2010 - 12:26 pm | अवलिया
+३
मस्त !!
.
29 Oct 2010 - 10:05 pm | इंटरनेटस्नेही
.
29 Oct 2010 - 8:04 pm | असुर
+१
'स ण स णी त' प्रतिक्रिया!!
--असुर
29 Oct 2010 - 8:08 pm | प्रभो
आजपासून हुप्प्याभाईचे फ्यान आपण..
29 Oct 2010 - 8:25 pm | मितान
मस्त प्रतिक्रीया हुप्प्या !!! +१.....
30 Oct 2010 - 11:04 am | परिकथेतील राजकुमार
हुप्प हुप्प !! सहमत !
29 Oct 2010 - 9:05 pm | संजय अभ्यंकर
सहमत!
29 Oct 2010 - 9:28 pm | आत्मशून्य
+१
ओ खेचर भाउ महाराष्ट्रात आलेला पहिला भैय्या - श्रीराम ? हा कोणता जावइशोध ?
29 Oct 2010 - 10:45 pm | गोगलगाय
| दंडकारण्यात पोचला
ऑ! .. म्हणजे आमच्या नाशिकला?.. शुर्पनखेला पाठवण्यात रावणाव्यतीरीक्त दुसरा कोणाचा मनापासुन हात होता कि काय?
29 Oct 2010 - 10:58 pm | नितिन थत्ते
दंडकारण्ये प्रत्येक राज्यात असावीत.
छत्तीसगडमध्ये पण आहे.
30 Oct 2010 - 2:26 am | टिउ
प्रत्येक राज्यातच काय, महाराष्ट्रातही बर्याच गावात दंडकारण्ये आहेत...
29 Oct 2010 - 10:46 pm | मृत्युन्जय
+१०
29 Oct 2010 - 10:50 pm | बेसनलाडू
_/\_
(नतमस्तक)बेसनलाडू
30 Oct 2010 - 12:59 pm | अनुराग
छान आवडले
30 Oct 2010 - 12:59 pm | अनुराग
छान आवडले
30 Oct 2010 - 12:59 pm | अनुराग
छान आवडले
30 Oct 2010 - 12:59 pm | अनुराग
छान आवडले
30 Oct 2010 - 5:11 pm | ओम८६
भारीच ... :)
29 Oct 2010 - 8:20 pm | सूर्याजीपंत
मी काही कामानिमित्त अलाहाबादला गेलो होतो, तर तिथल्या देवळामध्ये मला रामरक्षा म्हणत असलेल्या व्यक्ती दिसल्या होत्या. तिथे देवळात लाउडस्पीकर वर हनुमानचालिसा चालू असते, पण लोकांना रामरक्षा म्हणताना मी स्वतः ऐकलेला आहे.
29 Oct 2010 - 8:47 pm | ईन्टरफेल
महाराष्ट्रात आलेला पहिला भैय्या - राम
हेच्च म्ह्न्तो मि
29 Oct 2010 - 10:00 pm | सुनील
रामरक्षेच्या शेवटच्या कडव्यात थोडी व्याकरणी गंमत आहे!
रामो राजमणि: सदा विजयते
रामं रमेशं भजे
रामेणा भिर्हुता निशा चरचमू
रामाय तस्मै नमः
रामान्नास्ति परायणं परतरं
रामस्य दासोम्यहं
रामे चित्तलयः सदा भवतु मे
भो राम! मामुद्धर
ह्या आठही ओळींत, पहिला शब्द हा राम ह्या शब्दाची एकवचनाची प्रथमेपासून ते संबोधनापर्यंतची रुपे आहेत!
बाकी, तात्याच्या लेखावर व्याकरणावर प्रतिक्रिया लिहायला मजा आली!!!
30 Oct 2010 - 11:06 am | मी ऋचा
मस्तं हं! हे कधी लक्षात आलं नव्हतं! धन्यवाद!
30 Oct 2010 - 3:49 pm | विकास
व्याकरणी गंमत फारच छान आहे.
बाकी, तात्याच्या लेखावर व्याकरणावर प्रतिक्रिया लिहायला मजा आली!!!
हे वाक्य अजूनही सुधारून असे लिहीता येईलः "तात्यांच्या "संस्कृत" रचनेसंदर्भातील लेखात व्याकरणावर प्रतिक्रिया लिहायला मजा आली!!!" :-)
1 Nov 2010 - 1:01 pm | चिंतामणराव
४० वर्षांपुर्वि माझी आई टिळक महाराष्ट्र विद्यापिठा च्या परिक्षांसाठी शिकवण्या घेत असे तेंव्हा बहुदा पहिला धडा हाच असे.
29 Oct 2010 - 10:00 pm | विसोबा खेचर
हुप्प्याचे उत्तर आवडले.. :)
तात्या.
30 Oct 2010 - 12:52 am | पिवळा डांबिस
आपल्याकडे उच्चार स्पष्ट व्हावेत याकरता लहान मुलांना मुद्दाम रामरक्षा शिकवतात.
भय्ये लोकांनी एकंदरितच उच्चारांना फाट्यावर मारलेलं असल्याने त्यांना रामरक्षेची गरज वाटत नसावी!!!!:)
30 Oct 2010 - 9:48 am | अमोल केळकर
सहमत !
माझ्या मते लहान मुलांना ' र ' चा उच्चार स्पष्ट येण्यासाठी लहान पणापासूनच रामरक्षा शिकवली जाते
अमोल
30 Oct 2010 - 3:46 pm | विकास
आपल्याकडे उच्चार स्पष्ट व्हावेत याकरता लहान मुलांना मुद्दाम रामरक्षा शिकवतात.
सहमत. मी देखील घरापासून बाहेर अनेकदा हेच कारण ऐकल्याचे आठवते.
29 Oct 2010 - 11:38 pm | गोगलगाय
..हे राम..रक्षा कर आमची तुझ्या ह्या भैय्यांपासुन... म्हणुन..
30 Oct 2010 - 1:28 am | पक्या
मी पण मराठी कुटुंबातच रामरक्षा म्हणताना किंवा माहित असलेली पाहिले आहे. उ. भारतीय तर जाऊ देच पण अनेक द. भारतीय परिचितांनाही रामरक्षा माहित नाही.
असे का असेल ते मात्र माहित नाही.
1 Nov 2010 - 9:56 am | llपुण्याचे पेशवेll
आमच्या शेजारचे तेलगु कुटुंब त्यांचा गोतावळा जमवून अनेक स्तोत्र म्हणत असे त्यात रामरक्षाही म्हणत असत.
बाकी, कानडी आणि तेलुगु स्क्रिप्ट मधे लिहीलेली रामरक्षेची पुस्तकं विक्रिस असलेली मी अमेरीकेतल्या एका मंदिरात पाहीली आहेत.
30 Oct 2010 - 9:10 am | प्रचेतस
समर्थ रामदास हे श्रीरामाचे व हनुमानाचे भक्त. बुधकौशिक ऋषींनी रचलेल्या रामरक्षेचा प्रसार हा श्री समर्थांनीच महाराष्ट्रभर केला. व जोडीला भीमरूपी महारुद्रा हे मारुतीस्त्रोत्रही रचले. समर्थांच्या ह्या दोन स्त्रोतांच्या महाराष्ट्रातील सर्व्यवापी प्रचारामुळे घरोघरी आधी मारुतिस्त्रोत्र व त्यापाठोपाठ रामरक्षा म्हणण्याची प्रथा सुरु झाली असावी.
30 Oct 2010 - 2:52 pm | JAGOMOHANPYARE
हुप्पुजी,
१४ वर्षानी परत जायचंच हा नियम फक्त भैय्यानीच का पाळायचा? पंजाब सिंध गुजरात द्राविड उत्कल बंगा.... याना हा नियम का नाही? :) . इतर महाराष्ट्रातील लोकानीही हे मनावर घ्यायला हवं ना?
आज भैय्या नको असे जे म्हणताहेत, त्यांचे पूर्वजही उत्तर भारतातूनच आले आहेत.
एवढंच कशाला, त्यांचं आराध्यदैवत छत्रपती त्यांचेही मूळ पुरुष राजस्तानातील राणा प्रतापांच्या घराण्यातील आहेत.
राम आणि शाम दोन्ही भैय्याच.... देवाने दोन जन्म घेतले... दोन्ही यु पी तच... एकही जन्म मुंबईत नाही.. पुण्यात तर नाहीच नाही... :) ...
30 Oct 2010 - 2:56 pm | अवलिया
सगळ्यांनीच आफ्रिकेत चलावे...
गणपा ! जरा डाळीत पाणी घाल रे... बरीच मंड्ळी येत आहेत.
30 Oct 2010 - 2:58 pm | परिकथेतील राजकुमार
बघा बघा मी म्हणले न्हवते की हा नाना परप्रांतिय आहे म्हणुन !
31 Oct 2010 - 10:56 pm | प्रिया देशपांडे
जागोमोहनशी सहमत्.शिवाय बर्याच ग्रामिण घाटी,नागपुरी लोकांचे वर्तन भैयांसारखेच असते. गुटखा खावून कुठेही पचापचा थुकायचे,जोरजोरात खिदळायचे ,ग्रुप्स करुन हिंडायचे.
(मुंबैकर्)प्रिया
1 Nov 2010 - 11:37 am | JAGOMOHANPYARE
मुंबईकर बाई, तुमचा गैरसमज होतोय... मुंबईत येऊन १४ वर्षे झालेल्या सर्वानीच निघून जावे, असे मला सुचवायचे आहे... तुम्ही / तुमचे पालक येऊन किती वर्षे झाली? १४ पेक्षा जास्त झाली का? :)
1 Nov 2010 - 12:29 pm | प्रिया देशपांडे
पालक येवून ४० वर्शे होवून गेली.तुमच्या मताशी सहमत. मुंबई सर्वांची आहे पण आपण खूप आधिपासून इथे रहात असाल तरचं. नाहीतर जावा तुमच्या गावाला बिगीबिगीं. नागपूर असो वा कानपूर,लखनौ असो वा लास्लगाव तुम्ही बाहेरचेच.
1 Nov 2010 - 12:22 pm | इनोबा म्हणे
जागोमोहनशी सहमत्.शिवाय बर्याच ग्रामिण घाटी,नागपुरी लोकांचे वर्तन भैयांसारखेच असते. गुटखा खावून कुठेही पचापचा थुकायचे,जोरजोरात खिदळायचे ,ग्रुप्स करुन हिंडायचे.
पण आमच्या एका मुंबईकर मित्राला पान खाऊन रस्त्यावर पच्चकन थुंकणे अभिमानास्पद वाटते. त्याचे काय?
ग्रुप्स करुन हिंडायचे
हि आपली तक्रार आहे? :D
1 Nov 2010 - 12:33 pm | प्रिया देशपांडे
अर्थात तक्रारच आहे ती. ग्रुप करुन ट्रेन-बस मध्ये यायचे जोरजोरात बोलायचे,टवाळी करायची हा मराठी कल्चरचा भाग आहे हे मान्य पण कधी कधी अती होते असे वाटते.
1 Nov 2010 - 12:40 pm | परिकथेतील राजकुमार
आदरणीय प्रियाजींशी सहमत आहे.
आंतरजालावर (विशेषतः मिपावर) देखील काही हलकट लोक ग्रुप करुन अवांतर बोलायचे, टवाळी करायची असे प्रकार करताना आढळतात.
1 Nov 2010 - 1:17 pm | मृत्युन्जय
ग्रुप करुन ट्रेन-बस मध्ये यायचे जोरजोरात बोलायचे,टवाळी करायची हा मराठी कल्चरचा भाग आहे हे मान्य
हा मराठी कल्चरचा भाग आहे?
31 Oct 2010 - 11:14 pm | मृत्युन्जय
राम आणि शाम दोन्ही भैय्याच.... देवाने दोन जन्म घेतले... दोन्ही यु पी तच... एकही जन्म मुंबईत नाही.. पुण्यात तर नाहीच नाही... ...
बरोबर आहे. एकदम बरोबर. देवाने अधर्माचा नाश करण्यासाठी जन्म घेतला. अन्यायाची जिथे बजबजपुरी माजली होती तिथेच जन्म घ्यायला लागला ना त्यामुळे त्याला. त्यामुळेच मुंबईत नाही. पुण्यात तर नाहीच नाही... ...
1 Nov 2010 - 6:10 am | Nile
च्यायला असे आहे का! आम्हाला कुणा नाठाळाने दशरथ हा एक न्याय्य, शुर-वीर राजा होता, अन त्याची प्रजा अत्यंत सुखी वगैरे होती सांगितले होते कुणास ठावुक! म्हणजे आयोध्या नगरी रामाच्या जन्मावेळी-आधी एक जगण्यासारखी नव्हती तर! धन्यवाद.
1 Nov 2010 - 10:10 am | मृत्युन्जय
असं आहे तर मग रामराज्य का म्हणतात हो? दशरथराज्य का नाही म्हणत?
1 Nov 2010 - 10:06 am | llपुण्याचे पेशवेll
एवढंच कशाला, त्यांचं आराध्यदैवत छत्रपती त्यांचेही मूळ पुरुष राजस्तानातील राणा प्रतापांच्या घराण्यातील आहेत.
शिवाजी महाराजांचा मूळ वंश शिसोद चा असे मानले जाते. शिवाजी महाराजही तिथे जन्मले असते तर कदाचित आपल्या बहीणी मुघलांना देऊन स्वतःचे चतकोर राज्य वाचवण्यात धन्यता मानली असती.
कारण वातावरणाचा प्रभाव असतोच. महाराष्ट्रात देखील शिवाजीराजांना त्यांच्या हयातीत मदत करणारे सगळे गरीब बिचारे मावळेच होते. तथाकथित खानदानी सगळे त्यांच्या विरोधातच उभे होते (काही अपवाद सोडता)
राम आणि शाम दोन्ही भैय्याच.... देवाने दोन जन्म घेतले... दोन्ही यु पी तच... एकही जन्म मुंबईत नाही.. पुण्यात तर नाहीच नाही... ...
पुणे मुंबईत तेव्हा सुधा विद्वान आणि तपस्वी लोक रहात असावेत. कारण पंचवटीपासून सगळीकडे दक्षिणेत दंडकारण्यच होते असे मानतात. लोणावळ्याजवळ आणि आसपासच्या अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ऋषिंच्या आश्रमाच्या जागा दाखवतात. असो.
आज भैय्या नको असे जे म्हणताहेत, त्यांचे पूर्वजही उत्तर भारतातूनच आले आहेत.
सहमत. महाराष्ट्रात केवळ दगडच आहेत आणि होते. म्हणूनच कोणीतरी महाराष्ट्राला दगडांच्या देशा असे सार्थ म्हटले आहे. बाकी सगळे इकडे बाहेरून आलेले आहे.
30 Oct 2010 - 3:50 pm | जागु
रामरक्षा म्हणा की रामचरीत मानस किंवा हनुमान चालीसा म्हणा सगळ्यात शेवटी एकच राम आहे.
31 Oct 2010 - 1:07 am | पुष्करिणी
माझ्या ओळखीचे कानडी लोक रामरक्षा म्हणतात