गाभा:
एकनिष्ठते मधून प्रेम सिद्ध होत नाही. अधिक वाचण्या साठी इथे भेट द्या...
http://timesofindia.indiatimes.com/life-style/relationships/man-woman/Ex...
एकनिष्ठते मधून प्रेम सिद्ध होत नाही. अधिक वाचण्या साठी इथे भेट द्या...
http://timesofindia.indiatimes.com/life-style/relationships/man-woman/Ex...
प्रतिक्रिया
28 Oct 2010 - 5:05 pm | पंख
काहिच्या काहिच... ह्या ईंग्रजी वर्तमानपत्रांना असले काही छापण्यात विषेश रस असतो.. ते ईतकं सिरीअसली घ्यायचं नसतं. ठीक आहे घेतले तर घेतले, पण लगेच त्याचा धागा बनवून ईथे मिपावर लटकवायचाही नसतो.. लटकवले तेही एकवेळ ठीक, पण त्यात स्वतःचे काय विचार आहेत, काय मत आहे हे तरी जोडावं ना ? एक फुटकळ धागा... अशीच याची संभावना खेदाने करावी लागत आहे..
28 Oct 2010 - 5:23 pm | स्पा
+१
28 Oct 2010 - 5:26 pm | मालोजीराव
एका वृत्तपत्रान बाबतच्या सर्वेक्षणानुसार 'TOI' पांचटपणाच्या बाबतीत अग्रस्थानी आहे.
आणि याउपर हि विक्री पृथ:करण करणाऱ्या तज्ञांनी शेरा दिलाय कि नको त्या चर्चा, भडक छायाचित्रे यामुळेच हा पेपर जास्त चालतो.
'द हिंदू ' या वृत्तपत्राला सर्वोत्कृष्ट दर्जाचे इंग्रजी दैनिक म्हणून या सर्वेक्षणामध्ये गौरवण्यात आले आहे.
28 Oct 2010 - 5:18 pm | युयुत्सु
तुम्ही याकडे 'फुट्कळ धागा' म्हणून बघता तसे मी बघत नाही. वर नमूद केलेलं संशोधन प्रवाहाच्या विरुद्ध् मत नोंदवते. त्यातून निसर्गाच्या नियमांबद्दल आदर व्यक्त होतो म्हणुन माझे लक्ष त्याकडे गेले.
28 Oct 2010 - 10:42 pm | इनोबा म्हणे
वर नमूद केलेलं संशोधन प्रवाहाच्या विरुद्ध् मत नोंदवते.
हे जास्त महत्वाचे. नाही का?
28 Oct 2010 - 5:21 pm | मितान
या निसर्गनियमांबद्दल आपले मत जाणून घ्यायला आवडेल :)
28 Oct 2010 - 5:24 pm | युयुत्सु
समाजाच्या नियमांपेक्षा निसर्गाचे नियम जास्त श्रेष्ठ असतात या मताचा मी आहे.
29 Oct 2010 - 6:59 am | विकास
समाजाच्या नियमांपेक्षा निसर्गाचे नियम जास्त श्रेष्ठ असतात या मताचा मी आहे.
निसर्गात कपडे पण नसतात...
29 Oct 2010 - 9:02 am | Nile
निसर्गात कपडे असतात. अस्वले, फर असलेले प्राणी म्हणजे अजुन काय आहे?
29 Oct 2010 - 9:18 am | विकास
निसर्गात कपडे असतात. अस्वले, फर असलेले प्राणी म्हणजे अजुन काय आहे?
कपडे काढून ठेवता येतात आणि परत तसेच घालता येतात. माझ्या माहीतीत असे (किंवा कसलेच ;) ) अस्वल नाही जे थंडी संपल्यावर हायबरनेशन मधून बाहेर येते आणि काय उकाडा होतोय म्हणत फर काढून ठेवते, जमल्यास पाण्यातून खळबळून काढून वाळत टाकते आणि नंतर ते धूतवस्त्र म्हणून परत घालते. :-)
तुम्हाला माहीत असल्यास अवश्य सांगा.
29 Oct 2010 - 9:29 am | Nile
तुमची कपड्यांची वाख्या थोडीशी मॉडर्न आहे, पण तरीही काही प्राणी त्यांचे कपडे कमी जास्त करतात. कपडे हे निसर्गापासुन संरक्षणाचे साधन आहे ही सोपी आणि सरळ व्याख्या आहे असे मला वाटते. ते जर मान्य असेल तर हिवाळ्यात जाड फर असलेले आणि उन्हाळ्यात ते तेच फर त्यागुन पातळ करणारे प्राणी निसर्गात आहेत तसेच उन्हाळ्यात जास्तीचा(हिवाळ्यासाठीचा) पिसारा त्यागणारेही पक्षी आहेत असे वाचल्याचे आठवते, संदर्भ शोधुन देतो.
29 Oct 2010 - 9:34 am | विकास
आता तुम्ही कपड्यांची पण व्याख्या करणार तर! ;) अहो कपडे हे परत परत घालता येतात का नाही? का डिस्पोजेबल असतात?
29 Oct 2010 - 10:16 am | Nile
म्हणजे लज्जा हे प्रमुख कारण आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
29 Oct 2010 - 10:34 am | विकास
म्हणजे लज्जा हे प्रमुख कारण आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
असे कसे वाटले? माझे वाक्य काय आहे?
म्हणजे इंग्रजीत "reuse" आता लोकं अनेक गोष्टी reuse करतात ते काय लाज वाटते म्हणून का? :)
29 Oct 2010 - 10:50 am | Nile
निसर्ग आणि मानव ह्यात तुलना केलीत ना तुम्ही? मग रीयुझ हा मुद्दा असेल तर मग फक्त कपडे इतकेच संकुचित रहायचे कारण नाही. निसर्गात रीयुझ आहे का? (तुमच्या मुळ प्रश्नात नाही असे तुमचे प्रतिपादन आहे.) इतपत बरोबर आहे का? मग चर्चा पुढे चालवुयात.
29 Oct 2010 - 11:15 am | विकास
युयुत्सुंचा मुद्दा होता की ते "निसर्गाचे नियम जास्त श्रेष्ठ असतात" असे मानतात.
म्हणून मग म्हणले निसर्गाच्या नियमात कपडे बसत नाहीत तर ते मग तो नियम पण मानणार का.
थोडक्यात युयुत्सुना तो प्रश्न त्यांच्या मताच्या संदर्भात विचारला ज्यात तुम्ही कपडे आणि फर आणि अस्वल वगैरे मधे आणलेत. (आता युयुत्सुपण तुमचाच आयडी असल्यास गोष्ट वेगळी). म्हणून तुम्हाला अस्वलाच्या अंगावरील फर आणि कपडे यातील फरक कळण्यासाठी म्हणून reuse हा शब्द वापरला. बाकी मूळ प्रश्नाला उत्तर युयुत्सुंकडून त्यांच्या नियमांच्या मतासंदर्भात अपेक्षित आहे.
29 Oct 2010 - 11:28 am | Nile
तुम्हाला युयुत्सुंकडुनच उत्तर हवे असल्यास तुमच्या प्रतिसाद-प्रणयात हड्डी बनल्याबद्दल क्षमस्व. ;-) (ह. घेणे)
निसर्गाचे नियम आणि कपडे यातील संबंध मला तरी अजुन कळलेला नाही. असो.
29 Oct 2010 - 11:00 pm | शिल्पा ब
प्रतिसाद प्रणय...मस्त शब्द. 0:) 0) 0:-) :innocent:
28 Oct 2010 - 5:31 pm | चिरोटा
अहो ती फ्रेंच बाई तिच्या पुस्तकाचा( Men, Love, Fidelity) खप वाढवतेय.गेल्या वर्षी ह्याच बाईची बातमी इथे होती-http://www.telegraph.co.uk/news/worldnews/europe/france/6908022/Husbands...
सुट्ट्या येताआहेत, तेव्हा हे सगळ्या गोष्टींचे मार्केटिंग चालु होणारच.जगात सतत दु:ख घेवून जगणार्या व्यक्तींच्या मुलाखती घेवून मी पण संशोधन करु शकतो.
28 Oct 2010 - 5:41 pm | मालोजीराव
ज्या देशामध्ये सेक्स पार्लर हि कन्सेप्ट official आहे त्या देशा साठीच हे विचार शोभतात, आणि त्यांना अशीही सवय आहेच अनैसर्गिक गोष्टी नैसर्गिक म्हणून इतरांच्या माथी मारायची.
आपणही मग मुर्खासारखे ३७७ वगैरे कायदे काढतो.
28 Oct 2010 - 6:22 pm | युयुत्सु
तुमचे नैसर्गिक आणि अनैसर्गिक विषयीचे फण्डे चुकीचे आहेत याची जाणीव करुन देऊ इच्छितो.
28 Oct 2010 - 6:23 pm | युयुत्सु
तुमचे नैसर्गिक आणि अनैसर्गिक विषयीचे फण्डे चुकीचे आहेत याची जाणीव करुन देऊ इच्छितो.
28 Oct 2010 - 7:23 pm | पैसा
पशु आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे वागतात. आणि मनुष्य हा एकच असा प्राणि आहे ज्याने संस्कृति तयार केली आहे. माणूस आणि पशु यांच्यात हा एक मोठा फरक आहे. त्यातूनही काही माणसे विकृतीकडे वळतात. प्रवृत्ति, संस्कृति आणि विकृती यातून ज्याला जे भावतं आणि परवडतं ते त्याने निवडावं!
28 Oct 2010 - 10:01 pm | शैलेन्द्र
"पशु आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे वागतात. आणि मनुष्य हा एकच असा प्राणि आहे ज्याने संस्कृति तयार केली आहे. "
माणुस हाही शेवटी प्राणीच आहे(तुम्ही "पशु" ज्या अर्थी म्हणालात तो अर्थ अभिप्रेत नसल्याने मी तो शब्द टाळतो) , त्याने निर्माण केलेली तथाकथीत संस्कृती ही इतर काही नसुन प्रकृतीच्या(निसर्गाच्या) नियमांना (व अकांक्षांना) काही एका साचात बसवण्याचा केलेला प्रयत्न आहे. हा साचा जर अती घट्ट केला तर त्यातुन विकृती तयार होते. म्हणुन तो वारंवार मोडुन नवा बनवावा लागतो. जे समाज हे करतात त्यांची संस्कृती बदलती राहुनही टिकुन राहते.
स्त्री पुरुष संबधाबद्द्ल म्हणाल तर वंश सातत्याची आदीम ईच्छा ही प्रकृती, सतत बदलती विवाहसंस्था व तीचे नियम ही संस्कृती, व तिच आणी तिच अंतीम सत्य हे समजणे ही विकृती.
स्त्री पुरुष संबन्धात बळजबरी सोडता(सर्व प्रकारची) इतर सारे प्रकार नैसर्गीक समजायला हवेत.
28 Oct 2010 - 6:09 pm | Dhananjay Borgaonkar
मला एक सांगा..कोण ती फ्रेंच बाई तिला पहिजे तस लिहिते..त्या ड्बड्या टाईम्स मधे छापुन येते.
तुम्हाला वैयक्तिकदृष्या हा विचार पटतो का?पटला तर तुम्ही ठेवणार का बाईला??
नसेल पटत तर मग हा खटाटोप कशासाठी???
28 Oct 2010 - 6:15 pm | प्रियाली
मला हा प्रश्न जाम आवडला.
बाई ठेवणे म्हणजे बाजारातून एक जुडी कोथिंबीर आणण्यासारखे सोपे असते असे वाटते का लोकांना. (हे धनंजय यांना उद्देशून नाही. वरची चर्चा वाचून सहज वाटले.)
28 Oct 2010 - 6:22 pm | मालोजीराव
हीच ती फ्रेंच बया...मानसोपचार तज्ञ आहे म्हणे ....पण सध्या तरी तिलाच गरज वाटते मानसोपचार तज्ञाची
28 Oct 2010 - 6:27 pm | आंबोळी
आयला,
ही बया 'म्हातारी हेलन' वाटतीय राव!
28 Oct 2010 - 8:27 pm | धमाल मुलगा
आंबोळी अंकल,
सुदृढ हा शब्द राहिलाय का लिहायला?
28 Oct 2010 - 9:56 pm | मृत्युन्जय
म्हातारी हेलन सुदृढतेच्या सगळ्या व्याख्यांमध्ये बसते हो. सलमान खानची ;">(सावत्र)span> आई ती हीच हो.
31 Oct 2010 - 3:52 pm | chipatakhdumdum
सलमान खान च्या सावत्र आईच नाव हेलन आहे हे बरोबर आहे. मात्र हिंदी सिनेमात आयटेम गाण्यावर नाचणारी हेलन (महेबुबा महेबुबा...शोले) ही ती नव्हे. सलमान खान ची आई हेलन हिने सिनेमात कधीही काम केलेल नाही.
31 Oct 2010 - 4:35 pm | पैसा
http://en.wikipedia.org/wiki/Helen_(actress)
इथेही पहा. शिवाय सलमान च्या मुलाखतीत त्याने या गोष्टीचा उल्लेख केलेला पाहिलाय.
28 Oct 2010 - 10:44 pm | शिल्पा ब
आर्थिक ताकद असेल तर पुरुष सुद्धा ठेवतात असे ऐकून आहे...अनुभव नाही अजुनतरी ;)
29 Oct 2010 - 12:40 am | धनंजय
परवा आठवड्याच्या बाजाराला जायला उशीर केला, तर शेतकर्याच्या कोथिंबिरीच्या जुड्याही संपल्या होत्या :-(
कोथिंबीर आणून ठेवणे इतके हिट-ऑर-मिस.
बाई आणून ठेवणे म्हणजे हिट-ऑन-मिस(-अँड-मिस)!
29 Oct 2010 - 12:51 am | प्रियाली
आणखी एक मिस! तो अर्थातच तुमच्या लक्षात आला असावा म्हणा.
वरचे धनंजय तुम्ही नाही, ते धनंजय बोरगावकर. (मला बोरगावकर लिहायला कंटाळा आला होता. ;))
पण इथे लोकांना लग्न करायला मुलगा किंवा मुलगी मिळत नाही आणि इथे लग्न करून वर बाया ठेवायच्या गोष्टी चालतात.
एका बाईला सांभाळणारा पुरुष महान असतो. दोन बायकांना सांभाळणारा पुरुष देव असावा. ;-) ही व्याख्या आता उपक्रमावर लिहिते.
29 Oct 2010 - 12:57 am | Nile
अहो ते फार सोप्पं असतं हो. फुलराणीतला दगडु साळुंके आठवुन पहा. पण सभ्यतेच्या बुरख्यातल्यांना ते जमणं कठिण.
29 Oct 2010 - 12:55 am | Nile
लॉळ लॉळ लॉळ*
आमचा रेमंड म्हणतो, हीज मिसेस इज ओन्ली मिसेस.. म्हणुनच आय 'थिंक यु कान्ट मिस (विथ मिस)' असे मत झाले असावे? ;-)
*साभार 'पेन'
28 Oct 2010 - 7:29 pm | स्वाती२
>>>पटला तर तुम्ही ठेवणार का बाईला?? :D
28 Oct 2010 - 6:17 pm | युयुत्सु
प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या आयुष्यात एक तरी राधा असते, हे राम शेवाळकरांचे विधान मटा मध्ये वाचल्याचे स्मरते.
28 Oct 2010 - 7:03 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत आहे !
मी पण कुठेतरी वाचले आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, आणि त्या स्त्री च्या मागे त्याची बायको असते.
28 Oct 2010 - 7:05 pm | प्रियाली
या न्यायाने प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाला सोळा सहस्त्र बायकाही हव्यात. ;)
28 Oct 2010 - 7:08 pm | परिकथेतील राजकुमार
कर्तृत्ववान राहु दे ;) आम्ही तर वाचलय की जगात म्हणे फक्त दोनच पुर्णपुरुष होउन गेले. एक श्रीकृष्ण आणि दुसरा अर्जुन.
28 Oct 2010 - 7:10 pm | प्रियाली
आणि बाकीचे? ;) अर्धनारी....????
28 Oct 2010 - 7:14 pm | परिकथेतील राजकुमार
अग खरच सांगतोय.
माझ्या वाचनात आले होते. कुठे संदर्भ मिळाला तर देतो.
28 Oct 2010 - 7:36 pm | प्रियाली
अर्जुनाचे माहित नाही पण कृष्णाला पूर्णपुरुष म्हणतात कारण त्याला स्तनाग्र नाहीत जी सर्वसामान्य इतर पुरुषांना असतात.
संदर्भः व्यासपर्व किंवा दुर्गाबाईंशी ऐसपैस गप्पा. (दुर्गाबाई नक्की)
पण मग या संदर्भाने बाकीचे सर्व..... :(
28 Oct 2010 - 10:20 pm | रन्गराव
थोडा गोंधळ होतोय. तुम्ही जे सांगितल ते अर्जुनाच्या बाबतीत होत बहुदा कृष्णाच्या नाही!
28 Oct 2010 - 10:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>थोडा गोंधळ होतोय. तुम्ही जे सांगितल ते अर्जुनाच्या बाबतीत होत बहुदा कृष्णाच्या नाही!
'व्यासपर्व' या दुर्गाबाईंच्या पुस्तकात 'पूर्णपुरुष कृष्ण' पहिलेच प्रकरण आहे.
-दिलीप बिरुटे
28 Oct 2010 - 10:46 pm | रन्गराव
वाचायला हव. माहीतीबद्द्ल धन्यवाद!
29 Oct 2010 - 2:28 pm | llपुण्याचे पेशवेll
+१ रंगराव म्हणतात ते खरं आहे. मी देखील असेंच वाचले आहे. अर्जुन पूर्णपुरूष मानला जायचा.
29 Oct 2010 - 2:46 pm | रन्गराव
पु. पे , कृष्ण आणि अर्जून ह्यापैकी रेमंड्सचे कपडे ज्याने एंडॉर्स केले तो पूर्ण पूरूष अस म्हणून मुद्दा निकलात काढुया. कारण दुर्गाबाई बरोबर का आमच्या लहानपनीच्या शाळेतल्या बाई ह्या भांडणात पडण्यात काही अर्थ नाही. ;)
29 Oct 2010 - 5:00 pm | प्रियाली
बृहन्नडेच्या वेशात शोभून दिसणारा आणि रणांगणावर हातपाय गाळणारा अर्जुन पूर्णपुरुष?
हे राम!!!!!! रामाकृष्णा वाचव रे या पूर्णपुरुषांपासून. ;)
29 Oct 2010 - 5:03 pm | परिकथेतील राजकुमार
अर्जुनाचे 'दिलसे पुरुष है !' असे काहिसे असावे ;)
29 Oct 2010 - 5:32 pm | विकास
रामाला मर्यादा पुरूषोत्तम म्हणतात आणि कृष्णाला संपूर्ण पुरूष.
5 Nov 2010 - 9:56 pm | मूकवाचक
आणि ते काय जे आहे ते पुरुषार्थ (धर्म, अर्थ, काम, मोक्ष) या दृष्टीने आहे.
(इथे जी चर्चा चालू आहे त्यावरून या लोकाना 'कामापुरताच' पुरूषार्थ समजलेला आहे असे वाटते. ते पौरूष मतिमन्दामधे पण व्यवस्थित असू शकते. म्हणा मतिमन्दाला अमर्याद पुरुषोत्तम!)
29 Oct 2010 - 2:13 pm | अनुराग
रगराव म्हणतात ते बरोबर आहे.
28 Oct 2010 - 10:23 pm | विसोबा खेचर
क्क्काय? कृष्णाला स्तन/स्तनाग्र नव्हती??
छ्या..! पियाली, थापा मारतो तुझा व्यास..! :)
तात्या.
28 Oct 2010 - 10:29 pm | प्रियाली
दुर्गाबाई म्हणाल्या हे माहित आहे. ;)
तुमचं आणि त्या व्यासांची जुनी दुष्मनी बॉ! आम्ही लक्ष देत नाही. ;)
28 Oct 2010 - 8:17 pm | रामदास
पुरुषांच्या छातीवर रुडीमेंटरी स्तन असतात .घोड्याच्या छातीवर तसे नसतात म्हणे म्हणून घोडा पूर्ण पुरुष.*
28 Oct 2010 - 8:21 pm | प्रियाली
उपक्रमावर आमच्या एका स्नेह्यांनी हेच म्हटले आहे आणि त्यांना मी सहमतीही दाखवली आहे. ;) पण घोड्याने विवाहबाह्य संबंध कसे ठेवावे? :(
28 Oct 2010 - 10:03 pm | मृत्युन्जय
घोडाच तो. त्याचे सगळे संबंध विवाहबाह्यच असतात. ;)
28 Oct 2010 - 6:18 pm | बिपिन कार्यकर्ते
मला सध्या वैवाहिक स्थैर्याची नितांत गरज आहे. आणि नुकतंच धम्याने अतिशय छान आमंत्रण दिले आहे. आलोच, जाऊन !!!
28 Oct 2010 - 8:26 pm | धमाल मुलगा
आवरा!
28 Oct 2010 - 8:29 pm | पैसा
बराच वेळ विचार करत होते, हे नेमकं काय आहे?
28 Oct 2010 - 8:48 pm | धमाल मुलगा
बघ ना!
मीही घाबरलो ना.
29 Oct 2010 - 3:54 pm | परिकथेतील राजकुमार
बिका हे असले काहितरी नका लिहित जाउ हो. एकतर तुम्ही असता शेख लोकांच्या घोळक्यात ;) उगाच गैरसंबंध गैरसमज नकोत.
28 Oct 2010 - 7:00 pm | चिंतातुर जंतू
पुरातन ग्रीसमध्येही विवाहित पुरुषांना विविध सेवा पुरवणार्या वेश्या असत. काही वेश्यांचा विशिष्ट विषयांचा अभ्यासही असे (राजकारण, साहित्य वगैरे). त्यामुळे निव्वळ लैंगिक सुखाच्या पलीकडच्या गोष्टीही वेश्यांकडून मिळत. प्रतिष्ठित समाजातल्या स्त्रीला शिक्षणाचं स्वातंत्र्य नव्हतं त्यामुळे कदाचित ती पुरुषाची प्रत्येक गरज भागवू शकायला पुरेशी सक्षम नव्हती. याउलट वेश्या स्वतंत्र आणि कमावती असल्यामुळे ती स्वतःला अधिक रोचक बनवू शकत असे. त्यामुळे लैंगिक गरजांखेरीज इतर (म्हणजे बौध्दिक वगैरे!) गरजांसाठीही स्त्रियांशी संबंध ठेवण्याचा इतिहास युरोपात आणि विशेषतः फ्रान्समध्ये दिसतो. दमीमोंद या संकल्पनेत त्याचा समावेश केला जातो. तूलूज लोत्रेक या फ्रेंच चित्रकारानं काढलेली वेश्यांची चित्रं प्रसिध्द आहेत. नमुन्यादाखल हे पाहा:
सगळी जरी नसतील तरी काही लग्नं अशा पर्यायांमुळे नक्कीच टिकत होती. आजच्या जगाविषयी बोलायचं झालं तर मुख्य मुद्दा हा या विषयी किळस वगैरे बाळगण्यापेक्षा असा आहे - ज्या न्यायानं स्त्रियांनी पुरुषांचा बाहेरख्यालीपणा स्वीकारावा त्याच न्यायानं पुरुषांनीही स्त्रियांचा बाहेरख्यालीपणा स्वीकारावा. मग काही अडचण येणार नाही. तसं करण्याला किती पुरुष तयार आहेत यात कदाचित आजच्या सुखी वैवाहिक जीवनाचं रहस्य असेल :-)
28 Oct 2010 - 7:16 pm | Dhananjay Borgaonkar
सहमत आहे.
अवांतर - तो स्वॅपिंग का काय तो प्रकार यातुनच आला असावा का?
28 Oct 2010 - 7:28 pm | स्वछंदी-पाखरु
आहो ते ती फ्रांस बद्दल सांगते आहे. तुम्ही मनाला का लावुन घेता????
बर अस काहे आहे का की हा ईशारा त्या सगळ्यांना (तुमच्या सकट) कि
"विवाह बाह्य संबंधाचे फायदे आहेत म्हणुन करा.... दोन चार होउन जाउद्या......" ;)
स्व पा
आताच्च बायको ला वरील TOI ची लिन्क देउन जाम खुश आहे.
माझा लोचा सोल्व झाला.......
ठन्क्स
28 Oct 2010 - 8:26 pm | मूकवाचक
निसर्गाचे नियम पाळण्याची हौस असलेल्यांनी जंगलात जावे. सगळ्यात बलवान नर आहोत हे सिद्ध करून हव्या तितक्या माद्या सांभाळाव्या. थोडी शक्ती क्षीण झाली की अंगभर मार खाऊन पळून जावे.
(सुसंस्कृत समाजात राहून, त्याचे सगळे फायदे घेऊन आपल्या सोयीने निसर्गनियमाचे दाखले देणे हा आचरटपणाच आहे असे वाटते. चू. भू. दे. घे.)
29 Oct 2010 - 4:01 pm | मालोजीराव
अगदी सहमत,त्यातले आपल्या सोयीने हे जास्त महत्वाचे.
28 Oct 2010 - 8:16 pm | नुसती बडबड
बाभो... बया काहीबी लिहिती राव... आपण तर पळालो इथून...
जाता जाता --- हिच्या नवरोबाचे परस्त्रीगमन झाले तर हिला काय वाटेल बुवा...?
28 Oct 2010 - 8:18 pm | Nile
इथे म्हणजे पृथ्वीवरच नविन दिसता? नाही भलतेच सोज्वळ प्रश्न हो तुमचे म्हणुन विचारले.
28 Oct 2010 - 8:24 pm | नुसती बडबड
Nile भाऊ, पृथ्वीवर नाही हो, मिपावर नवीन अहोत. आमची बडबड नुकतीच सुरु झालीये ओ...
29 Oct 2010 - 12:35 am | मूकवाचक
तुमचा प्रश्न दांभिक वाटावे अशी परिस्थिती आहे खरी.
हा स्थित्यंतराचा काळ आहे. आता सगळी जनता सुसंस्कृत होणे सोडून पुरती नैसर्गिक झाली कि सगळे प्रश्न संपले!
28 Oct 2010 - 8:22 pm | पैसा
तिनेच असं काहीतरी केलं असावं म्हणून आता त्याचं समर्थन! (चोराच्या उलट्या बोंबा)!
28 Oct 2010 - 8:25 pm | रामदास
a secret rendezvous with another woman, हे वाचल्यावर काश्मीरचे राजे हरीसिंग यांच्या प्रतापाची आठवण झाली . १९२५ साली पतीच्या संगनमतानी (फक्त संमती नाही) हरीसिंग यांच्या सोबत संबंध ठेवून एका युरोपीयन बाईनी त्यांना पन्नास लाखाचा गंडा घातला होता .
मी संदर्भ दिलेल्या लेखाचे फक्त पहिले वाक्य वाचले आहे. पूर्ण वाचल्यावर आणखी बरीच लफडी आठवतील म्हणून थांबलो.
28 Oct 2010 - 8:30 pm | नुसती बडबड
काश्मीर वाचुन का काय माहित, आम्हाला आपले नेहरूजी आणि माउंटबेटनच्या बायकुची आठवण झाली कि ओ... ;)
29 Oct 2010 - 4:09 pm | मालोजीराव
28 Oct 2010 - 8:37 pm | रामदास
अशी त्यावेळे बर्याच बायकांची इच्छा असायची .त्यात अग्रक्रमानी नाव माझ्या वाचनात साराभाई या बाईंचे नाव येते .विक्रम साराभाईंची मोठी बहीण .अंबालाल साराभाई या उद्योगाशी संबंधीत कुटुंब .
त्यानंतर सरोजीनी नायडूंच्या मुलीचे .
असो अधिक माहीतीसाठी "आय वॉज नेहरूज शॅडो "हे पुस्तक वाचावे
28 Oct 2010 - 9:45 pm | विसोबा खेचर
थोडक्यात काय, तर व्हॅलिएन्ट बाईच्या मते विवाहबाह्य लफडी/बाहेरख्यालीपणा केला तरी चालण्यासारखं आहे..
ओक्के..! :)
तात्या.
28 Oct 2010 - 10:07 pm | Nile
च्यायला, आमच्या पुराणातलं ज्ञान कुणा परदेशी बाईने लिहलं तर लगेच कौतुक लोकांना. लेको पुराणं वाचा की, हेच सगळं आहे त्यात.
-पुराणोक्ता
28 Oct 2010 - 10:10 pm | विसोबा खेचर
विवाहबाह्य झेंगटं करा असं पुराणात सांगितलं आहे म्हणता..?
ओक्के..!
कृपया दुवा/संदर्भ द्या..
शरदच्या दर्शनात टाकतो तो पुरावा एक नवं ' दर्शन ' म्हणून! ;)
काय बोल्ता? :)
तात्या.
28 Oct 2010 - 10:14 pm | प्रियाली
पुराणांत अमुक करा असं सांगत नाही. तिथे तमुक आणि ढमुक अलरेडी केलेलं असतं. ;)
28 Oct 2010 - 10:16 pm | विसोबा खेचर
असं का? बरं बरं..! :)
तात्या.
28 Oct 2010 - 10:15 pm | Nile
अहो हे काय विचारणं झालं? कमाल आहे आजच्या लोकांची! चराचरातील संपुर्ण ज्ञान वेदांत आहे यावर कुणाचे दुमत आहे का? दुवे वगैरे दिले असते हो, पण संस्कृत श्लोकाचे अर्थ कळतात कुठे लोकांना आताशा? आणि हो श्रद्धा हवी, त्याशिवाय तुम्हाला तो अर्थ दिसणार नाही अन कळणारही नाही. ;-)
बाकी दर्शनात टाकुन द्यायला हरकत नाही, कुणी तोंडात ब्रह्मांड बघतं तर कुणी... हॅ हॅ हॅ असो! ;-)
28 Oct 2010 - 10:49 pm | आनंदयात्री
अरे अरे !!
बाईला कोणीतरी चांगले म्हणा रे .. आणि या नाईल्याला आपले म्हणा रे !!
28 Oct 2010 - 10:52 pm | Nile
ह्या धाग्यावर कुणी आम्हाला आपले न म्हणलेलेच बरे, नाहीतर लोक नसते संबंध जोडायचे हो! ;-)
28 Oct 2010 - 10:50 pm | Nile
विवाहबाह्य संबंधांचे संदर्भ हवे होते ना तुम्हाला हे घ्या.
परशुरामाने जेव्हा पृथ्वी सात वेळा नि:क्षत्रिय केली तेव्हा ह्या राजांच्या बायकांना काय ऑप्शन होता सांगा बरे? आम्ही तर ऐकतो व्यासमुनींनीही अश्या प्रकारची मदत करुन भीष्माच्या राज्याला वारस मिळवुन दिले. खरे का खोटे हो?
आता उद्या कुणी कनेडीयन ह्यावर लिहीलं की होईल त्याचा उदो उदो! ;-)
29 Oct 2010 - 2:56 am | मूकवाचक
तात्यांचा प्रश्न तसाच राहिला - विवाहबाह्य संबंधाची नव्हे, तर त्यांच्या उदात्तीकरणाची आणि तोच निसर्ग आहे असे ठासून सांगणारी पुराणातली काही उदाहरणे द्याल तर बरे होईल.
29 Oct 2010 - 7:10 am | विकास
परशुरामाने जेव्हा पृथ्वी सात वेळा नि:क्षत्रिय केली
सात नाही एकवीस वेळा... तुमचे २/३ मार्क कापण्यात आलेत. :-)
आम्ही तर ऐकतो व्यासमुनींनीही अश्या प्रकारची मदत करुन भीष्माच्या राज्याला वारस मिळवुन दिले. खरे का खोटे हो?
त्याला नियोगविधी म्हणत असत. त्याचे देखील नियम होते पण तो वेगळा विषय आहे. बाकी हे पुराणात नसून इतिहासात आहे. रामायण-महाभारताला पारंपारीक पद्धतीस इतिहास म्हणतात.
29 Oct 2010 - 9:07 am | Nile
ह्या स्पष्टीकरणाची वाटच पहात होतो. म्हणजे रामायण-महाभारतातील लोक पुराणाप्रमाणे वागत नव्हते असे तुम्हाला सुचवायचे आहे का? :-)
29 Oct 2010 - 9:13 am | विकास
ह्या स्पष्टीकरणाची वाटच पहात होतो.
आशा करतो जास्त वेळ तातकळत ठेवले नाही. ;)
म्हणजे रामायण-महाभारतातील लोक पुराणाप्रमाणे वागत नव्हते असे तुम्हाला सुचवायचे आहे का?
मी तेंव्हा नव्हतो. मात्र तुम्ही पुराणातील म्हणून दिलेले उदाहरण हे पुराणातले नाही इतकेच मी म्हणालो होतो आणि म्हणत आहे. :-)
29 Oct 2010 - 9:19 am | Nile
हॅ हॅ हॅ, सब्र का फल हे ही कुठल्याश्या पुराणातच सांगितलेले आहे ना? ;-)
अहो तात्यांनी संदर्भ मागीतला, रामायण महाभारतातील लोक पुराणाच्या बाहेर जाउन काही करु शकतात का? (काही म्हणजे काय अहो, हे असे काही के जे केले नसते तर तुमचे महाभारतच घडले नसते की). इतके महत्त्वाचे निर्णय (बर ते एकदा नाही अनेकदा घेतले गेले) तेही साक्षात व्यासांसारख्यांनी घेतले म्हणजे पुराणात अशी काही 'सोय'(आमच्याभाषेत) होती हे संदर्भापुरते पुरावे असे आम्हाला वाटते. :-)
नाहीतर आता सुरुवात पुराणाच्या व्याख्येपासुन करावी लागेल, करा ब्वॉ कुणीतरी उपक्रमावर धागा सुरु. ;-)
29 Oct 2010 - 9:28 am | विकास
हॅ हॅ हॅ, सब्र का फल हे ही कुठल्याश्या पुराणातच सांगितलेले आहे ना?
ते वाक्य मी साईबाबांच्या फोटो खाली बघितल्याचेच फक्त आठवते.
रामायण महाभारतातील लोक पुराणाच्या बाहेर जाउन काही करु शकतात का?
आता हेच तर्कशास्त्र पुढे नेयचे ठरवले तर आजचे श्रद्धाळू रामायण-महाभारताच्या म्हणजे पर्यायाने पुराणाच्या बाहेर जाऊन काही करू शकतील का? म्हणजे मग तुमच्या तर्काने प्रत्येकाने पुराणातल्या प्रमाणे वागायला हवे! ;)
इतके महत्त्वाचे निर्णय (बर ते एकदा नाही अनेकदा घेतले गेले) तेही साक्षात व्यासांसारख्यांनी घेतले म्हणजे पुराणात अशी काही 'सोय'(आमच्याभाषेत) होती हे संदर्भापुरते पुरावे असे आम्हाला वाटते.
तसे नाही वाटत. असे म्हणून श्रूती-स्मृतींना तुम्ही विस्मृतीत घालत आहात. :-)
29 Oct 2010 - 10:19 am | Nile
क्काय? म्हणजे तुम्ही आजचे लोक अन रामायण महाभारतातील लोक एकच असे समजता? कलीयुग वगैरे कुठे गेलं हो??
मग अश्या निर्णयाचे काय कारण असावे असे तुम्हाला वाटते?
29 Oct 2010 - 10:31 am | विकास
तो वेगळा विषय आहे. चर्चा सुरू करा. हा मी आलोच. ;)
28 Oct 2010 - 10:58 pm | शिल्पा ब
सातत्याचा कंटाळा येतो असे म्हणतात...
बायकांनी असे काही केले तर लगेच युयुत्सु धागा टाकणार " बाहेरख्याली पाशवी बायका " म्हणून..
बाकी लोकांच्या खाजगी आयुष्यात आपण कशाला डोकवा ?
28 Oct 2010 - 11:12 pm | प्रिया देशपांडे
का हो युयुत्सु, विवाहित स्त्रियांनी असेच वागले तर चालेल का? त्या वर्तणूकीला तुम्ही निसर्गनियम वगैरे म्हण्णार का?
येवू द्या पुस्तक महाराष्ट्रात, रोहिंटन मिस्त्रीबरोबर आता हिचा ही नंबर लागणार.
28 Oct 2010 - 11:44 pm | अपूर्व कात्रे
बापरे..... TOI(let) मधली बातमी एवढी मनावर घेतली गेली??
28 Oct 2010 - 11:48 pm | शिल्पा ब
युयुत्सु कोणत्याही वृत्तपत्रातला पाशवीपणा इतकाच मनावर घेतात.
29 Oct 2010 - 2:29 am | गोगलगाय
अत्ताच तुमचा अजुन एक दुवा वाचला.. सांभाळा!..
http://misalpav.com/node/14287
29 Oct 2010 - 10:46 am | युयुत्सु
या सगळ्या चर्चेत एक युक्तीवाद मला बालिश वाटतो तो म्हणजे मानवाची ती संस्कृती आणि पशूंची ती विकृती. मानवी संस्कृतीने पशूंपेक्षा अनेक विकृती जन्माला घातल्या त्या माणसे सोयिस्कर का विसरतात. ही पण एक विकृतीच मानायची नाही का? विकृत मानले गेलेले पशू 'भूक' भागली की इतर पशूना त्रास देत नाहीत. माणसाची एकतर भूक कशानेही भागत नाही किंवा दूसरे टोक म्हणजे 'भूक' मारणे याला संस्कृती बनवले जाते. सर्वात मूलभूत प्रश्न असा आहे की विकृत पशूंशिवाय मानवाला अस्तित्व असेल काय?
जाता जाता बायकांनी विवाहबाह्य ठेवले तर चालतील का असा प्रश्न मला काहीनी विचारला आहे. या प्रश्नाला माझे उत्तर 'चालेल' असेच आहे, पण फक्त कायदे समान असतील तरच... सूज्ञांस अधिक सांगणे न लगे.
29 Oct 2010 - 3:40 pm | मूकवाचक
" माणसाची एकतर भूक कशानेही भागत नाही"
- त्यामुळेच निसर्ग प्रमाण न ठरवता काही सामाजिक बंधने पाळणे ओघानेच आले. नाही का?
"किंवा दूसरे टोक म्हणजे 'भूक' मारणे याला संस्कृती बनवले जाते."
- मग भूक भागवताना काही मर्यादा कटाक्षाने पाळायच्या की सामाजिक, नैतिक बंधने झुगारून चवचालपणे जगणे आणि मी दोन्ही टोके न गाठता मध्य गाठला अशी मल्लीनाथी करणे असे कोरेगाव पार्कातून आलेले "बुद्धत्व" पकडून बसायचे?
29 Oct 2010 - 6:52 pm | पैसा
प्रतिसाद काय आहेत ते जरा नीट वाचा. मी किंवा शैलेन्द्रनी "पशु विकृत असतात" असं कुठेही म्हटलेलं नाही. एवढंच लिहिलय की
आता बालिश कोण आहे इथे? आमचे दोन्ही प्रतिसाद एकदा नीट वाचा आणि मग काय ते पुन्हा लिहा.
29 Oct 2010 - 5:33 pm | चिगो
>> ज्या न्यायानं स्त्रियांनी पुरुषांचा बाहेरख्यालीपणा स्वीकारावा त्याच न्यायानं पुरुषांनीही स्त्रियांचा बाहेरख्यालीपणा स्वीकारावा. मग काही अडचण येणार नाही. तसं करण्याला किती पुरुष तयार आहेत? <<
हेच म्हणतो. जर पुरुषाचे विवाहबाह्य संबंध, विवाहसंबंध "सुदृढ" व्हायला मदत करत असतील, तर मग स्त्रीयांबद्दलही तेवढाच अॅक्सेप्टंस दाखवायला पाहीजे ना.. उगाच "माझं ते हेल्दी, तुझं ते पाप" कशाला ?
29 Oct 2010 - 5:34 pm | मृत्युन्जय
शतकी प्रतिसाद
29 Oct 2010 - 5:56 pm | Dhananjay Borgaonkar
मी पण हेच म्हणनार होतो.
अस शक्य तरी आहे का की युयुत्सुंनी धागा काढला आणि शंभरी नाही गाठली..
@युयुत्सु - तुम्ही तो एक संगितविषयक धागा काढला होता.तसेच लिखाण परत व्हावे ही नम्र विनंती.
29 Oct 2010 - 6:49 pm | ५० फक्त
म्हणजे या बाइंना असं म्हणायचं आहे का की - होडी स्थिर ठेवण्यासाठी होडिच्या बाहेर वल्हवले पाहिजे.
या द्रुष्टिकोनातुन या विषयाकडे पाहता त्या जे म्हणत आहेत ते बरोबर आहे असं वाटेल. पण मला तरी एकुणच त्यांचं डोकं ठिकाणावर नसावं असं वाट्त, बहुधा त्यांच्या नव-या / -यांच्या बाहेरख्याली सवयींमुळे त्या या निष्कर्षावर आल्या असाव्यात.
हर्षद