गाभा:
भारतातील दलित नेते शिक्षणात आरक्षण असावे म्हणून आंदोलने करतात. त्याचा फायदा केवळ मूठभर दलित विद्यार्थ्य़ांना होऊ शकतॊ. यातील बरेचसे विद्यार्थी सामान्य दर्जाच्या माध्यमिक शाळांतून शिकलेले असल्याने बरेचदा उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळूनही पूर्णत: फायदा घेऊ शकत नाही. मार्टीन ल्युथर किंग यांनी हार्वर्ड येथे प्रवेश मिळविण्यासाठी जाळ्पोळ केली नाही, तर संपूर्ण माध्यमिक शिक्षणपद्धती समतेच्या तत्त्वावर व उच्च दर्जाची असावी यासाठी आग्रह धरला. भारतातील सामाजिक चळवळीने असाच आग्रह धरला तरच ज्ञानगंगा तळागाळापर्यंत पोहोचू शकेल.
संदर्भ- एका दिशेचा शोध, लेखक- संदिप वासलेकर, प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे
आपणांस काय वाटते? हे शक्य आहे का?
प्रतिक्रिया
28 Oct 2010 - 3:43 pm | चेतन शिवणकर
एकदम सहमत.आरक्षण हे गरीब विद्यार्थ्यांसाठी असावे,खुल्या प्रवर्गातील बहुतांश लोक पैशांअभावी उच्च शिक्षण घेउ शकत नाही
28 Oct 2010 - 4:49 pm | स्वतन्त्र
१०० % सहमत !
आरक्षण हे गरीब विद्यार्थ्यांसाठीच असावे !
28 Oct 2010 - 11:11 pm | शिल्पा ब
ते ठीक आहे, पण लोक यातसुद्धा काहीतरी गोलमाल करून गरीब असल्याचे भासवून फायद उपटणार नाहीत हे कशावरून?
माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब हे अजूनही शेतकरीच आहे हे माहिती आहे का?
29 Oct 2010 - 12:16 pm | स्वतन्त्र
आता जातीचाच घेतलं तर आरक्षणा साठी कागदोपत्री जात बदलून घेणे,हे देखील ऐकून आहे.
ज्या माणसाच्या नावावर शेतजमीन आहे (Agricultural Land ) तो शेतकरीच आहे असा आपला कायदा मानतो.
सगळेच शेतकरी काय गरीब नसतात.
29 Oct 2010 - 1:01 pm | भारी समर्थ
असतील, पण त्याचा इथला संबंध नाही समजला ताई...
अभिमानाने असेल तर उत्तम!
उपहासाने असेल तर, त्यांची शिरीमंती बगून तर नाही आला ना हा उपहास?
भारी समर्थ
28 Oct 2010 - 4:03 pm | नितिन थत्ते
आरक्षण रद्द करण्यासाठीचे फ्रेश आर्ग्युमेंट.
पण जुनीच दारू नव्या बाटलीत.
संपूर्ण शिक्षणपद्धती बदलायला माझा पूर्ण पाठींबा आहे. ज्यांना या आरक्षणाचा तथाकथित त्रास होतो त्यांनी हे आंदोलन ताबडतोब सुरू करावे.
28 Oct 2010 - 10:01 pm | सुनील
हे संदीप वासलेकर म्हणजे स्र्टॅटेजिक फोरसाइट ग्रुप वाले की काय? पुस्तक वाचायला हवे!
4 Nov 2010 - 4:10 pm | प्रमोद सावंत१
होय, स्ट्रटजिक फोरसाईट ग्रूपचे संदीप वासलेकरांचे हे पुस्तक आहे. राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती अवघ्या १५ दिवसांत संपली असून दुसरी आवृत्ती बाजारात आली आहे. किंमत रु २५०/- एवढी आहे.
28 Oct 2010 - 10:14 pm | रन्गराव
आरक्षणाने फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्ती होतो. कारण आरक्षणचा फायदा मिळण्याआधी बारा वर्ष शाळेत पूर्ण झालेला असत. त्यात जर नीट शिकल नाही तर आरक्षणाचा फारसा उपयोग नाही. दर्जेदार प्राथमिक शिक्षण सर्वांना उपल्ब्ध करून देणे गरजेचा आहे. त्यानंतर आरक्षणाची गरज रहानार नाही.
जातीवर अवलंबून असलेलं आरक्षण ही अजून एक चुकीची गोष्ट. जातीएवजी वर्ग म्हणजे आर्थिक आणि सामाजिक स्थिती हा निकष असायला हवा. आणि एकदा एखद्याने आरक्षणाचा उपयोग केला की मग त्याला विकसित वर्गात समाविष्ट करावे. त्यामुळे त्याचा दुरूपयोग होनार नाही. आणि लवकरच कुणीही मागासलेलं रहाणार नाही.
पण ही फक्त सरकारची जबाबदारी आहे असं म्हणण जास्ती योग्य नाही. कारण सरकारी योजनेतून सर्वांसाठी चांगले शिक्षक आणने आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपल्ब्ध करने फार कठीण आहे. त्यामुळे आपण सर्वांनी थोडे प्रयत्न करण गरजेच आहे!
28 Oct 2010 - 11:44 pm | अविनाशकुलकर्णी
समतेच्या तत्त्वावर ???/
समता..समाज वाद..साम्यवाद...ही निसर्गाच्या विरुद्ध अशी तत्व प्रणाली आहे....दिसायला गोड व आदर्श असली तरी अव्यवहार्य म्हणून सिद्ध झाली आहे..त्या मुळेच जगातुन नाहिशी झाली आहे....यामुळेच भारत ९० साली भिकारी झाला व सोने गहाण टाकण्याची वेळ आली होति....
सध्या चालले आहे ते चालु द्या.. ...किति दिवस हात पसरणार..?
28 Oct 2010 - 11:50 pm | अपूर्व कात्रे
जाती, धर्म, वर्ग यावर आधारित शैक्षणिक आरक्षण देण्यापेक्षा "प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण" असा कार्यक्रम सुरु केला तर समाजाचा आणि पर्यायाने देशाचा अधिक फायदा होईल. यातूनच प्रत्येकाची नोकरी मिळवण्याची (किंवा उपजीविका करण्याची) क्षमता वाढल्याने पुढे नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचीही गरज राहणार नाही.
29 Oct 2010 - 12:23 pm | मराठमोळा
हॅ हॅ हॅ..
जाती/धर्म/प्रांत व्यवस्थेचे भांडवल करुनच राजकारणी लोकं जगत आहेत. तुम्ही त्यावरच घाला घालायला निघालात की. :)
ईंग्रज सरकार परत येईल तेव्हा शक्य होईल असे वाटते. ;)
असो, कमीत कमी कायदा तरी सर्वांसाठी समान व्हावा अशी मनोमन ईच्छा आहे.
29 Oct 2010 - 1:05 pm | परिकथेतील राजकुमार
इंग्रजांचे सरकार परत आणावे अशी मी मगणी करतो.
ह्यांच्यापेक्षा ते परवडतील ;)
29 Oct 2010 - 1:07 pm | अवलिया
त्यापेक्षा मोंगल काय वाईट ? ;)
29 Oct 2010 - 1:45 pm | परिकथेतील राजकुमार
हान हे पण बरोबर आहे.
आणि मोगल आल्याने अनेक फायदे होतील :-
१) बरिचशी मंदिरे पाडली गेल्याने अंधश्रद्धा,मुर्तीपुजा कमी होईल.
२) अनेक लोकांना मुस्लिम धर्मात प्रवेश मिळुन त्यांना जगातील एकमेव श्रेष्ठ अशा अल्लाची मर्जी प्राप्त होईल आणि त्यांना ह्या धर्माचा अभ्यास करता येईल.
३) खव्यातली भेसळ, आरक्षण वगैरे सगळे बंद होऊन जाईल.
४) घराणेशाहीचा नाश होईल.
५) संघ परिवारावर बंदी येईल आणि सर्व राजकिय पक्ष देखील बुडवले जातील.
६) साला मिपावर हे सगळे बंद झाल्याने फालतु (काल आवडलेला शब्द 'फुट्कळ') धागे बंद होतिल.
अवांतर :-
मिपा संपादक पदांसाठी देखिल आरक्षण असावे असे वाटते.
29 Oct 2010 - 2:31 pm | अवलिया
अजुन थोडे मागे गेले तर ? शक हुण ग्रीक यांच्या आधी?
29 Oct 2010 - 1:09 pm | सुहास..
चला !!
गॅलरीत बसुन शिट्ट्या मारायची वेळ झाली .