लागणारे साहित्य:
गरजेनुसार किंवा २ सुक्या खोबर्याच्या वाट्या
मुगाचे पिठ १ वाटी
रवा अर्धी वाटी
कणीक अर्धी वाटी
२ चमचे खसखस
चारोळी
बेदाणे
आवडते ड्रायफ्रुट्स
वेलची पावडर
तुप
पिठी साखर
क्रमवार पाककृती:
तुम्हाला जर घरी भरपुर वेळ असेल, टाईमपास काही नसेल, कष्ट करायची खुप हौस असेल तर खालील प्रमाणे खोबर्याच्या वाटीच्या पाठीवरचे काळे स्क्रॅपरने खरवडून काढा.
आता ह्या टकलू झालेल्या वाट्या किसुन घ्या. मग असे अगदी पांढरे शुभ्र म्हातार्यांच्या केसांसाखा त्यांचा किस पडतो. मला तर हा मधुन मधुन जवळाही वाटतो.
आता किसलेल कोरड खरपुस भाजून घ्या. गॅस मंद ठेवा नाहीतर परत केस काळे होतील.
भाजलेले खोबरे हाताने कुस्करुन घ्या. मस्त खमंग वास येतो हे कुस्करताना. मग मुगाचे पिठ, कणीक, रवा, खसखस वेगवेगळे तुपावर खरपुस भाजून घ्या. खुप पेशन्स लागतात हे करताना. कोणतही पिठ कच्च राहुन चालत नाही. गॅस मंद किंवा त्यापेक्षा थोडा मिडीयम ठेवायचा. खमंग वास येईपर्यंत सगळे भाजायचे. नंतर सगळे एकत्र करुन त्यात चारोळी, बेदाणे, ड्रायफ्रुट्स, वेलची पुड टाकायची.
http://farm2.static.flickr.com/1147/5116929735_c24f41eb39_m.jpg
आता जेवढे जिन्नस तयार झाले असेल तेवढीच पिठी साखर घालुन सगळे एकजीव करुन थंड होऊ द्या.
http://farm2.static.flickr.com/1419/5117534424_78d47b7454_m.jpg
http://farm2.static.flickr.com/1098/5117536138_bbbac1d100_m.jpg
हे थंड झालेले पुरण हवाबंद डब्यात घट्ट दाबून भरून ठेवा. सारखे सारखे उघडू नका . मी डबा बंद केल्यावर आठवण आली फोटो काढायचा आहे ते. मग म्हटल नाही. आता डबा उघडायचा नाही.
अधिक टिपा:
तुम्ही ह्यात तुमच्या अंदाजाने प्रमाण कमी जास्त करु शकता.
कणीक न घालता त्यात नुसते मुगाचे पिठ घातले तरी छान लागते.
मी वेलचीपुड बरोबर जायफळ पुडही घातली होती.
तुप जर साजुक असेल तर उत्तमच.
प्रतिक्रिया
27 Oct 2010 - 12:05 pm | जागु
खालील फोटो दिसत नाहीत म्हणून मी परत फोटो लोड करुन दुसरा धागा टाकला आहे. कृपया व्यवस्थापकांनी हा धागा काढून टाकावा.
27 Oct 2010 - 12:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> ... टाईमपास काही नसेल ... <<
यात आणखी एक भर, नेमका मिपाचा सर्व्हर बंद असेल ... ;-)
इतर कोणी केलेल्या असतील तर करंज्या मला फार आवडतात. जागु, तू या करंज्या बेक करतेस का तळतेस?
27 Oct 2010 - 1:07 pm | जागु
आदिती अग त्या दुसर्या धाग्यावर जा. इथे फोटो अपलोड नाही झालेत. मी तळते करंज्या.
27 Oct 2010 - 1:45 pm | विसोबा खेचर
वा वा!
27 Oct 2010 - 3:01 pm | प्राजक्ता पवार
मस्त :)
27 Oct 2010 - 3:01 pm | प्राजक्ता पवार
मस्त :)
27 Oct 2010 - 4:00 pm | निवेदिता-ताई
मस्त.
27 Oct 2010 - 6:49 pm | प्रभो
झ का स!!
30 Oct 2010 - 5:07 pm | जागु
विसोबा, प्राजक्ता, निवेदिता ताई, प्रभो धन्यवाद.