साहित्य..सामुग्री...:
लसुण, खोबरे, कांदा, टमाटा,सुगरण(कोथिंबिर),
गरम मसाला,लाल तिखट, चवीपुरते मीठ,
तेल्,जिरं,मोहरी....
पुर्वतयारी:
१) कांदा भाजुन घ्या...मिक्सर मध्ये बारीक करुन घ्या...
२) टॉमॅटो ची पेस्ट करुन घ्या...
३) लसुण्,खोबरे,कोथिंबिर ची पेस्ट करुन घ्या..
आता प्रत्यक्ष भाजी तयार करायला घेउ..
कृती :
१) फोडणी :
गॅस वरील कढईत फोडणीला तेल घ्या..
(तर्री जास्त हवी असेल तर तेल थोडे जास्त घ्या..)
त्या तेलात जिरं,मोहरी,हिंग प्रमाणात घ्यावे...
२) पुर्वीच तयार केलेली (क्र.३)लसुण्,खोबरे,कोथिंबिर ची पेस्ट त्यात घाला..
चांगली परतुन घेतल्यावर...
३) त्यात (क्र.१)ची कांदा पेस्ट घालुन चांगली परतुन झाल्यावर...
४) त्यात (क्र.२)ची टॉमॅटोची पेस्ट घालुन त्याला तेल सुटेपर्यंत परतुन घ्या..
वरील सर्व कृतीत गरजेप्रमाणे अधुन-मधुन ढवळत रहा...
५) तेल सुटल्यावर त्यात लाल तिखट,गरम(काळा)मसाला,चवीपुरते मीठ घाला..
हे मिश्रण व्यवस्थित कालवुन घ्या व परतुन झाल्यावर..
पाणी घाला..आणि एक मस्त पैकी उकळी घेउन गॅस बंद करा...
जेवायला वाढताना प्रथम डीश मध्ये शेव घ्यावी नंतर त्यात भाजीचा रस्सा घ्यावा...
म्हणजे शेव थोडी भिजते.. वरुन बारीक चिरलेली गावराणी कोथिंबिर पेरा..आणि लिंबु....
सोबत बाजरी..ज्वारी,मका कशाचीही भाकरी..भाकरी आवडत नसेल तर पोळी....
कांदा गोल चकत्या करुन...त्यावर मीठ,लिंबु.....
भातावर पण छान लागते...
कधीतरी रुचीपालट म्हणुन कमी वेळात झटपट बनणारा पदार्थ..
करुन पहा..आणि अनुभवा खान्देशचा गावरान झट्का...
वि.सु. : लिंबु,कोथिंबिर, कांदा याशिवाय ह्या भाजीचा विचार डोक्यात आणु नये.. ;)
खाद्यलालसा...
प्रतिक्रिया
24 Oct 2010 - 12:17 am | सुनील
शेव नक्की कधी आणि किती घालायची? कारण शेव ना साहित्यात लिहिली आहे ना कृतीत!!!!
24 Oct 2010 - 12:22 am | डावखुरा
सुनिलशेठ ताटाच्या फोटोखालील पहिलीच ओळ पहा..त्यात शेव केव्हा कशी कुठे व का ही सगळी उत्तरे आहेत..
धन्यु..प्रतिक्रियेबद्दल...
24 Oct 2010 - 12:31 am | सुनील
अच्छा॑, मिसळीसारखी शेव शेवटीच घ्यायची तर!
तरीच. किंचित गोंधळलो होतो की नक्की शेव शिजवायची कधी!
24 Oct 2010 - 12:37 am | डावखुरा
राजे शेव आयतीच मिळते किंवा घरीही बनवु शकतो..
पण शेव शिजवायची नाही..ती शेव नाही राहणार..त्याचे नवीन पदार्थात रुपांतर होईल... गोळा होउन जाईल..
ह.घ्या.
आता शेवभाजी बनवुन पहा आणि प्रतिक्रिया कळवा....
24 Oct 2010 - 12:38 am | पैसा
घरी या! हे हातचं आहे ना हो!
24 Oct 2010 - 12:44 am | सुनील
पावन्यांचं शिक्षण पुण्यात झालय!
घरी या म्हणायचं पण पत्ता काय द्यायचा नाही!
अवांतर (खरे तर हेच मुद्द्याचं) - भाजीची शेव वेगळी मिळते, किंचित कडक, हे खरे का?
24 Oct 2010 - 1:13 am | डावखुरा
@पैसा ...हातचं कसं...???
@सुनिलदा..बरोबर हाय तुमचंबी दोन वरीस पुन्यात बी काढ्लंत आमी..
पहिले करुन तर पहा नाहीच जमली तर पत्ता देतो कि राव...
<< अवांतर (खरे तर हेच मुद्द्याचं) - भाजीची शेव वेगळी मिळते, किंचित कडक, हे खरे का?... >> खरंय पण ती कोण्त्याही हाट्लीत किंवा बाबा,डालर्,सुगोकी,ई. लोकल ब्रँड वर सुद्धा मिळते...
24 Oct 2010 - 8:55 am | तर्री
लालसातै ,
खासच . पुण्यात "टिळक रोड" वर गिरीजा नावच्या हटेलात एकदा सहज म्हणून खाल्ली आणि आपला ताबाच घेतला ह्या ढिशने.
जळगांव च्या लोकांची खास पाकृ आहे , पोळी बरोबर नाही जात ही . भाकरच हवी ती बी बाजरी किंवा ज्वारीची .
24 Oct 2010 - 10:09 am | अंतु बर्वा
पाहिली, केली आणी जमली बरका... छान प्रकार आहे... पुन्हा करण्यात येणार आहे. शिवाय आमच्यासारख्या ब्यॅचलर लोकांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बनवण्यास लागणारा वेळ फक्त १५ ते २० मिनीटं... :-)
24 Oct 2010 - 10:30 am | डावखुरा
तर्री भाउ..धन्यवाद....प्रतिक्रियेबद्दल..
गिरिजा माझंही आवडतं हॉटेल आहे...
बरोबर आहे..+१पोळी बरोबर नाही जात ही . भाकरच हवी ती बी बाजरी किंवा ज्वारीची .
पण मी तै नाहीये..
अंतु बर्वा..मनापासुन धन्यवाद... हे पण पहा
24 Oct 2010 - 10:38 am | पर्नल नेने मराठे
सकाळचे सव्वा नऊ वाजलेत... सॉलीड भुक लागलिये.. त्यात हि भाजि न भाकरी.... खरच खायला मिळाली तर ;)
24 Oct 2010 - 12:46 pm | कच्ची कैरी
लालसा बापु गैरच मस्त!!!
24 Oct 2010 - 1:40 pm | रतन
सुन्दर पाकक्रुती.
जेव्हा राखणीसाठी शेतावर जायचो, तेव्हा शेतात हिच भाजी बनवायचो. तुरीच्या काठ्यांचा जाळ करुन.
सोबत कळण्याची भाकरी.
अहाहा. गेले ते दिवस
24 Oct 2010 - 5:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा...!
-दिलीप बिरुटे
24 Oct 2010 - 5:58 pm | अवलिया
पाहीली... केली.... खाल्ली !!
24 Oct 2010 - 6:03 pm | सुहास..
आजच बनविओ आहे !!
24 Oct 2010 - 6:17 pm | स्वछंदी-पाखरु
आग पडलीये पोटात.........
छान दीसते आहे.
मस्त आठवण करुन दीली.....
आजच बनवतो......
स्व पा
खान्देशी शेव भाजीचा चाहता....
25 Oct 2010 - 9:25 am | चाफेकळी
मागच्याच आठवड्यात खास भाजीची शेव म्हणून घेऊन आले होते पण नक्की कशी करायची शेव-भाजी माहित नव्हतं....शोधतच होते ही पाकृ.
धन्यवाद. :)
25 Oct 2010 - 7:40 pm | स्पंदना
भाकरी!!!!!!!!!!!!!
लालसा जागी झाली ( तुम्हाला नाही हो. वर कळल तुम्ही बै नाही बौ आहात)
करुन मग साम्गते . पण एकुन प्रकरण खल्लास दिसतय.
26 Oct 2010 - 8:05 am | नेत्रेश
काल सकाळी ही पाककृती पाहीली, तोंडाला पाणी सुटले.
दुपारी एका मित्राने जेवायला बोलावले होते. बेत होता, दाल-बाटी आणी शेवभाजी.
- तृप्त
नेत्रेश
28 Oct 2010 - 2:54 am | डावखुरा
चुचुतै.. अगदी प्रत्येकाच्या मनातली असावी ही प्रतिक्रिया
कच्ची कैरी...तुमच्या पाकृंचा पंखा..लय भारी..
रतन दा... कळ्ण्याच्या भाकराची सविस्तर पाक़रुती फोटुसकट टाकळीच गेली पाहिजे...ही जबाबदारी आता तुमची..
आम्हा मिपा करांवर अन्याय नका करु..सोबत झुण्का असेल तर क्या केहेने.. येउ द्या मग ..प्रतिक्षेत
प्रा.डॉ. : दिलीपजी मनापासुन आभार...
अवलियाजी..: पुन्हा कौलारु टणक भाषा..>> पाहीली... केली.... खाल्ली !! >> पुढे कोण सांगेल आवडी की नै??
सुहासजी बनविओ>खावो>और बतावो कैसी माझी टंकन कला फळास गेली का नाही..
स्वच्छंदी पाखरु.. नावाप्रमाणेच प्रतिकृयाही छान दिलीत ..आणंद वाटला..(स्व पा म्हन्जे?)
चाफेकळी तै मी प्रतिकृयेच्या प्रतिक्षेत कासावीस होतोय ..कशी झाली होती भाजी?
अपर्णातै : << करुन मग साम्गते . >> वाट पाहुनी डोळे थकले...
नेत्रेश=तृप्त= :)
आम्हाला प्रचंड स्तुतीने हर्भर्याच्या झाडावर चढवल्याबद्दल मंडळ आपले आभारीय....(उत्तरीय सावरीत..)
खाद्यलालसा
20 Feb 2011 - 9:05 pm | हृदय भेदी
नुसतं नांव काढलं की लाळ टपकायला लागते. फोटो पाहुनतर येडाच झालो.
आमचे कडे आम्ही ही तर्री बनवुनच ठेवतो. नुसती तर्री पण पोळी/भाकरीबरोबर मस्त लागते.
खानदेशात नवीन लग्नं झाल्यावर नववधूच्या हातची शेवभाजी खाल्ल्यावरच तिची Acceptance Test होते. जर भाजी उत्तम झाली तर ती पास. अन्यथा सासूच्या हाताखाली उमेदवारी करावी लागते.
तर्री मधे तिखट पदार्थांचे प्रमाण वाढवले तर ती खास ' जांबाज कामयाब आणि बाजीगर' लोकांसाठी होते.
शेर का कलेजा लगता है ऐसी चीज खाने को. आणि यावर कळस म्हणजे जेवण संपल्यावर एकेक वाटी तर्री 'बाटम्स अप' करावी म्हणजे म्हणजे शेवाच्या भाजीला पूर्ण मान दिल्यासारखं होतं.
आणि खरोखरंच शेर दिल असेल तर जेवतांना पाणी अजिबात प्यायचं नाही. करुनच बघा !!!
21 Feb 2011 - 12:37 pm | विलासराव
करायला नाय जमणार.
पत्ता द्या.
खरोखर येणार त्यामूळे तयार असाल तरच पत्ता द्या.
९८२०६५८३४८ हा आमचा नंबर. लवकर आमंत्रण आनी पत्ता द्या.
आमंत्रनाबद्दल अगोदरच आभार.
22 Feb 2011 - 8:30 am | ५० फक्त
लालसा, या साठिच तर खरड केली होती तुला, कधि येतो आहेस आणि आमंत्रण प्रत्यक्षात येतंय ते पहायला. माझा फोन नंबर तर आहेच.
योग्य वेळी फोनवा.