दिवाळी जवळ आलेली आहे. हा भारतातील त्यातही हिंदूंचा सण असल्याने त्यातल्या अनेक ब-यावाईट परिणामांबद्दल जसे की फटाके फोडल्याने होणारे प्रदुषण, भरमसाठ खाण्यामुळे होणारी अन्नधान्याची टंचाई, एकमेकांना भेटुन मोठ्याने गप्पा मारुन होणारे ध्वनीप्रदुषण, सुट्ट्यांमुळे होणारी मानवी कार्यतासांची हानी, त्याचा जीडीपीवर होणारा परिणाम इत्यादी इत्यादी विषयांवर विचारवंतांच्या चर्चा सुरु होतील. आपण त्यात भाग घेण्याचे काही कारण नाही.
आज आपल्याला चर्चा करायची आहे फटाक्यांविषयी... :)
फटाके अनेक प्रकारचे असतात. काही आवाज करणारे असतात. तर काही नुसतेच शोभेचे असतात. काही खालच्याखाली म्हणजे जमिनीवर वाजवायचे असतात तर काही आभाळात उडवायचे असतात. त्यातही विशेष प्रांतातले काही काही फटाके जास्त प्रसिद्ध असतात.
तर मंडळी तुम्हाला कोणते फटाके आवडतात?
(हा खरं तर कौलाचाच विषय आहे पण कौलात विस्तृत लिहिता येत नसल्याने काथ्याकुट चालु केला आहे)
१) (टुकु टुक चालत आवज करणार्या) टिकल्या
२) (ढढाम आवाज करत फुटणारी) सुतळी
३) (डब्बल मजा और कम दाम ) डबलबार
४) (तडातडा उडणारी ) लवंगी
५) (दक्षिणेतला फेमस) अॅटमबॉम्ब
६) (हातातल्या हातात उडणारे) फुलबाजी
७) (गरागरा फिरणारे वा फिरवणारे) भुईचक्र
८) (कूठलाही नेम नसलेले) बाण वगैरे आकाशात उडणारे
९) वरील सर्व
१०) इतर (खुलासा करा)
प्रतिक्रिया
23 Oct 2010 - 12:48 pm | शिल्पा ब
चुकुन काथ्याकुटात पडलाय का लेख? नाही म्हणजे कौलं सोडुन भलतीकडंच आलात म्हणुन विचारलं हो..
23 Oct 2010 - 12:50 pm | अवलिया
लेख पूर्ण न वाचता प्रतिक्रिया देणारे असे बरोबर सापडतात.
लेखात वाक्य आहे.
(हा खरं तर कौलाचाच विषय आहे पण कौलात विस्तृत लिहिता येत नसल्याने काथ्याकुट चालु केला आहे)
आता उरलो (फुटकळ) कौलापुरता ! :)
23 Oct 2010 - 8:43 pm | कवटी
"स्वगृहात" फक्त लेखाचे नाव दिसते... लेखकाचे नाही.
तरी पण लेखाच्या नावावरुन हा लेख नान्याचाच असणार असे वाटले होते....
नानाशेठ , हल्ली तुम्ही प्रेडिक्टेबल व्हायला लागलाय... आणि मला वाटते असे होण बरोबर नाही.
बाकी लेखावर प्रतिक्रीया लेख आणि हातातला ग्लास संपवून देतोच...
24 Oct 2010 - 12:52 pm | सुहास..
बाकी लेखावर प्रतिक्रीया लेख आणि हातातला ग्लास संपवून देतोच... >>>
चियर्स रे "हडळ-ए-दिल-ए-सम्राट !!
23 Oct 2010 - 10:00 pm | शिल्पा ब
आजकाल नुसता विषय वाचूनच काय प्रतिक्रिया द्यायची वेळ आलीये. ;)
23 Oct 2010 - 12:51 pm | गांधीवादी
सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखून.
23 Oct 2010 - 12:53 pm | अवलिया
सहमती / असहमतीसाठी जागा राखीव
23 Oct 2010 - 7:13 pm | Dhananjay Borgaonkar
वरील सर्व.
अजुनही काही आवडतात,
१. भुईनळे
२. पानपट्टी(त्रिकोणी आकाराचा छोटासा फटाका)
३. बंदुक आणि टिकल्यांचे रोल
४. ल़क्ष्मी बाँब
५. १०,००० ची लड(माळ)
23 Oct 2010 - 7:34 pm | नितिन थत्ते
मी आणि माझे कुटुंबीय जेव्हा फटाके उडवत असतात तेव्हा मला आवडतात. :)
इतर वेळी मला फटाक्यांची कटकट आणि प्रदूषणाचा त्रास होतो. :(
(आप्पलपोटा)
माझ्याकडून असेच काहीतरी वाचायला मिळेल अशी खात्री अनेकांना असेलच. ती खरी ठरल्याबद्दल अभिनंदन. :)
23 Oct 2010 - 8:02 pm | गांधीवादी
तुमच्या कडून असे काहीतरी वाचायला मिळेल अशी 'अपेक्षा' होती, 'खात्री' नव्हती.
आम्ही फटाके उडवत नाही. आवडत नाही. ऐपत नाही.
25 Oct 2010 - 8:04 pm | भास्कर केन्डे
गांधीवाद्यांनी वरीप प्रतिसादात दिलेत ना तसे फटाके बघायला आवडतात. पण स्वतः वाजवायला श्रीमंत नानासाहेबांनी यादीत टाकलेले सगळेच आवडतात.
23 Oct 2010 - 7:49 pm | प्रिया देशपांडे
परमपूज्य संस्कृत विद्वान नानासाहेबांना जे फटाके आवडतात तेच आम्हाला आवडतात.
25 Oct 2010 - 8:02 pm | भास्कर केन्डे
एकदम खल्लास प्रतिसाद!
+१ कोणाला द्यावे म्हणून प्रतिसाद बघत होतो. आता +१०० द्यावे म्हणतो.
23 Oct 2010 - 7:51 pm | शुचि
मला टिकल्या आवडतात. टिकल्यांच्या डब्या आता आठवत पण नाहीत :( काही मुलं लहानपणी शूरपणा दाखविण्यासाठी टिकल्या हातानी भींतीवर घासात फोडायची. बापरे :(
मी फक्त दगडाने टचाटच आपटत फोडत असे.
काही टिकल्यात डबल दारू येते :) मज्जा !!!
23 Oct 2010 - 8:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आकाशात उडणारे....!
-दिलीप बिरुटे
23 Oct 2010 - 8:13 pm | रामदास
फटाके बेभरवशाचे असतात.
काही अनुभव सिद्ध निरीक्षणं.
१ आयटम बाँब बरेच मिळतात.सगळेच वाजतात असे नाही. सूज्ञ पुरुष एका आयटम बॉबवर अवलंबून राहत नाहीत.
२ सुंदर आवरण म्हणजे फटाका वाजेल याची गेरंटी नाही.
३ फटाका साउथचा आयटम आहे. पानकोबी सारखा असतो. भरपूर आवरणे .बारुद इल्ला.
४ दाखवायचे आणि वाजवायचे फटाके वेगळे असतात.
५ फटाका चांगला वाजण्यासाठी आधी तापवावा लागतो.(उन्हात)
६ बर्याच वेळा वात गळून पडते. खात्री करून घ्यावी.
७ उदबत्ती तयार ठेवावी. बर्याच वेळा फटाका वात काढून तयार असतो. पण वाकल्यानंतर कळते की उदबत्ती विझली आहे.
८ फटाके वाजवण्यासाठी वाकावे लागते.उभ्याउभ्या फटाके वाजत नाहीत.उभ्यानी वाजवायला फुलबाज्या बर्या. त्यामुळे पोटाच्या घेराची काळजी घ्यावी.
९ वाजणे किंवा न वाजणे ह्यात आपला हात नसतो त्यामुळे ह्या सूचना हलकेच घ्याव्या.
१० "आवाज "बरेच वर्षात वाचला सॉरी बघीतला नाही त्यामुळे थोडे न्यून पुरते करावेसे वाटले.
आपला ,
रामदास
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी
(जुनी प्रतिक्रिया परत छापण्याची प्रेरणा देणार्या नानासाहेबांचा आभारी आहे.)
23 Oct 2010 - 8:31 pm | Nile
ह हा हा. थोडीशी भर?
१. वाजणार्या फटाक्यापेक्षा नेत्रदीपक फटाका चांगला.
२. दुसर्याचा नेत्रदीपक फटाका पहाणे खिशास सर्वोत्तम. ;-)
३. फार दिवस वापरला नाही तर फटाका सादळतो.
४. फटाक्याच्या आकारवर जाउ नये, अनेक मोठे फटाके फुसकेच निघतात.
५. अश्यावेळेला फुलबाज्यांनी ("दीन दीन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी") वेळ निभावुन न्यावी.
६. एकाच प्रकारच्या (वाकुन वाजवायच्या) फटाक्यांनी कंटाळा येउ शकतो, म्हणुन वेगवेगळ्या प्रकारे फटाके उडवावेत.
23 Oct 2010 - 8:50 pm | कवटी
रामदासबुवांना आणि निळेरावांना साष्टांग नमस्कार....
नान्या लेका तुझ्याच लेखात तुला या दोघांनी झब्बू दिलाय.... काही तरी तोड काढ
24 Oct 2010 - 6:06 am | राजेश घासकडवी
आपले विकतचे फटाके लोकांना दुरूनच दाखवावेत. नाहीतर नेत्रसुख घ्यायला फुकटे लोक टपूनच असतात.
एकाच दिवशी फार फटाके उडवू नयेत. जपून जपून वापरावेत. नाहीतर अनेक अर्थांनी दिवाळीत दिवाळं निघण्याची पाळी येऊ शकते.
याउलट, फटाके फक्त दिवाळीतच उडवले पाहिजेत असा नियम नाही. 'दिन को होली रात दिवाली, रोज मनाती मधुशाला....' हे लक्षात ठेवावं.
उत्तम दर्जाच्या फटाक्यांसाठी काड्यापेटीची गरज नसते. फटाक्याच्या संपर्कात उदबत्ती आपोआपच पेट घेते.
एक फटाका पेटवताना आपल्या इतर फटाक्यांना दूर ठेवावं. नाहीतर स्फोट होऊन जबरी अपाय होण्याची शक्यता असते.
पूर्वी गोल गरगरीत, भरपूर दारू असलेल्या फटाक्यांची फ्याशन होती. आजकालचे फटाके मिनिमॅलिस्टिक असतात.
आतषबाजी होण्यासाठी योग्य प्रमाणात दारू हवी. अति तिथे माती.
फटाके आणि फटके हे शब्द उगीच सारखे नाहीत. काही फटाक्यांच्या बाबतीत फटक्यांचीही शक्यता असते.
खरे फटाके नसतील तेव्हा आपटबार बरे. बार बार आपटत बसता येतं.
26 Oct 2010 - 2:00 pm | सविता
दंडवत.. तुम्हाला...रामदास काका आणि Nile यांना पण!!!
26 Oct 2010 - 2:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
साष्टांग प्रणाम.
23 Oct 2010 - 8:32 pm | श्रावण मोडक
या माणसाच्या एकंदरच जगण्याच्या सर्व क्षेत्रांविषयीच्या गाढ्या अभ्यासापुढं पुन्हा एकदा दंडवत! त्यापलीकडं इथं काहीही प्रतिसाद देणं केवळ अशक्य!
23 Oct 2010 - 10:10 pm | आमोद शिंदे
रामदासांनी ग्यास पास केला तरी मोडक 'काय सुगंध सुटलाय' म्हणतील असं हा प्रतिसाद वाचून वाटतय. अहो रामदासांचे लिखाण हे बानवकशी सोने आहेच पण म्हणून त्यांच्या चावट आणि ग्राम्य प्रतिक्रियेतही सर्व क्षेत्रांमधला गाढा अभ्यास वगैरे दिसत असेल तर अवघड आहे.
23 Oct 2010 - 10:37 pm | श्रावण मोडक
माझा प्रतिसाद शीर्षकासह वाचावा. आपल्या आकलनात भर पडावी अशी आशा आहे. "न पडल्यास, ती माझ्या लेखनाची मर्यादा आहे, हे समजून घेऊन क्षमा करावी, ही नम्र विनंती."
23 Oct 2010 - 8:33 pm | नितिन थत्ते
विषय काथ्याकुटात टाकला आहे म्हणून थोडा काथ्या कुटतो.
शोभेच्या फटाक्यांऐवजी आवाजाचेच फटाके उडवावे.
कारणे.
१. आवाज करणार्या फटाक्यात खूप थोडी दारू असते. उलट शोभेच्या फटाक्यात खूप दारू असते. त्यामुळे वायुप्रदूषण शोभेच्या फटाक्यातून जास्त होते.
२. शोभेच्या फटाक्यांतून रंगीत प्रकाश निघावा म्हणून त्यात स्ट्रॉन्शियम, मॅग्नेशियम आदि धातूंची संयुगे घातलेली असतात. श्वासावाटे ही संयुगे शरीरात गेल्यास अपाय होऊ शकतो.
३. आवाजाचे फटाके उदबत्तीने पेटवता येतात. शोभेचे फटाके उडवण्यासाठी एका भुइचक्रामागे एक फुलबाजी पण जाळावी लागते. म्हणजे अतिरिक्त प्रदूषण.
कानाला इजा होऊ नये असे वाटत असेल तर लवंगी किंवा डांबरी फटाकेच फक्त उडवावे. फार तर बॉम्ब उडवू नयेत. पण शोभेचे फटाके अजिबातच उडवू नयेत.
काय म्हणता?
23 Oct 2010 - 9:54 pm | रन्गराव
ईंजिनीयरींगमध्ये असताना वर्गात मास्तर फळ्यावर लिहायला लागले की एकचवेळी शक्य तेवढे फोडण्याची प्रथा होति! त्यानंतर वर्गातल्या कन्या असा काही गळा काढत की दिवाळी आहे का शिमगा हा प्रश्न पडायचा ;)
23 Oct 2010 - 9:59 pm | कवटी
रन्गराव ,
काही निट कळाले नाही... जरा सविस्तर लिवा की राव.
23 Oct 2010 - 10:10 pm | रन्गराव
आपट्बार, त्याला "लसून गड्डा " असही म्हणतात. त्याचा आकार लसणा सारखच असतो. त्याला जमीनवर जोरात आपट्ला की मोठा आवाज आणि धूर निघतो. वर्गात फोडायला लै भारी वाटतं.
23 Oct 2010 - 10:05 pm | शिल्पा ब
हवेत कशाला फटाके? फटाके भारतीय संस्कृतीचे देणे नाही...हि बहुतेक चायनीज गोष्ट आहे.
स्वतःला त्रास, दुसर्याला त्रास, खिशाला चाट अन वातावरणाचा नायनाट.
26 Oct 2010 - 8:45 pm | टिउ
बरोबर आहे. फोडायचे तर जमिनीवर फोडा, हवेत कशाला?
23 Oct 2010 - 10:12 pm | मदनबाण
कौलरुपी कथ्याकुटा सुरु करुन.चांगला प्रतिसाद ( आता कोणता ते वेगळं सांगावं लागणार काय ? ;) ) वाचण्याची संधी उपलबध करुन दिल्या बद्दल आभारी आहे... ;)
23 Oct 2010 - 10:14 pm | प्रियाली
आमच्या गल्लीत आम्ही सोडून दुसरे कोणीच दिवाळी साजरी करत नाही. :) म्हणून आम्ही झोकात दिवाळी साजरी करतो. आवाजाचे सोडून सर्व फटाके उडवतो.
रंगीबेरंगी प्रकाशांची उधळण करणारे अनार, भुईचक्र, फुलबाजे, फिरते अनार वगैरे वगैरे
23 Oct 2010 - 10:38 pm | रेवती
आमच्या इथे फटाके कुठे विकत मिळतात हे माहित नाही.
मला फुलबाज्यांशिवाय काही आवडत नाही. पूर्वी भूइनळा अथवा झाड आवडायचे पण एकदोनदा ते उडून संपल्यावर बॉम्ब फुटल्यासारखा फुटला मग तो प्रकार बाद झाला.
24 Oct 2010 - 6:28 am | विकास
आमच्या इथे फटाके कुठे विकत मिळतात हे माहित नाही.
आपल्या (तुमच्या-आमच्या) राज्यात वैयक्तिक अथवा घरादारांच्या भागात (रेसिडेन्शियल भागात) फटाके उडवण्यास बंदी आहे. :( त्यामुळे केवळ चार जुलैचे रोषणाईवाले फटाकेच बघावे लागतात...
25 Oct 2010 - 3:18 am | रेवती
बर्याच वर्षापूर्वीच्या दिवाळीला एका दिवाळसणवाल्या जोडप्याने नवीन हॅम्पशायरातून फुलबाज्या आणून आमच्या (त्यावेळी लहान असलेल्या) मुलांना दिल्या होत्या. ते आता इथे रहात नाहीत म्हणून फोन करून दारूबद्दल विचारायचे होते तर आता भारतात कायमचे गेलेत दोन दिवसांपूर्वी!:(
न्यु हॅम्पशायरात मिळतात कुठेतरी! बीन आवाजी फटाके उडवता येतात असे ऐकले आहे. नाहीतर चिन्मया मिशनमध्ये ते परवानगी काढतात तेंव्हा फुलबाज्या मिळतात किंवा आपल्याकडच्या असल्यास तिथे उडवता येतात. दोन वर्षे आम्ही गेलो होतो तर खूप गर्दी आणि सर्वात शेवटी फटाके.....मुले झोपेला येतात आणि त्यांना मजा वाटत नाही.
24 Oct 2010 - 11:08 pm | प्रियाली
अमेरिकेत फटाके उडवण्याबाबत राज्याराज्यांत वेगळे नियम असतात असे वाटते.
आमच्या इथे फटाक्यांची प्रचंड दुकाने असतात. :) इंडियानात रात्री १० पर्यंत स्वतःच्या अंगणात फटाके उडवण्याची परवानगी आहे. ज्या राज्यांत अशी परवानगी नसते तेथे फटाक्यांची दुकानेही सहसा नसतात किंवा ४ जुलै सोडून इतर वेळी फटाक्यांची विक्रीही होत नाही असे वाटते.
चू. भू. द्या. घ्या.
23 Oct 2010 - 11:20 pm | pramanik
अशा आर्टीकल मधे अजुन काही लिहावे असे सुचीत करतो.
फटाकेविषयी न लिहता लहान मुलांबाबत लिहावे असे मननं करतो.
24 Oct 2010 - 12:22 am | मिसळभोक्ता
साला, आपण ह्या "प्रमनिक" चा फ्यान झालोय !
24 Oct 2010 - 12:57 am | डावखुरा
लहान तोंडी मोठा घास...
या अवलिया का़कांना झालंय काय?
(हिकडे पाठवा बामोशीबाबाच्या दर्ग्यावर बांधुन ठिवतो.....ह.घ्या.)
बाकि त्या निमित्ताने रामदास काका यांचे "काही अनुभव सिद्ध निरीक्षणं."तसेच निले यांची त्यांच्याशी लागलेली जुगलबंदी समा बांधुन गेली...
तसेच थत्ते काकांचे गंभीर पण सत्य तत्वज्ञान(डोळे पाणावले खरंच....)
माझ्याकडे हातरुमाल आहे...
24 Oct 2010 - 9:39 am | विसोबा खेचर
आमची आवड -
(दक्षिणेतला फेमस) अॅटमबॉम्ब..! :)
अनार किंवा झाडंही आम्हाला आवडतात..
त्याचप्रमाणे चमनचिमणी व नानाविध बाणही आवडतात..
आपला
(दाक्षिणात्य अणुबाँब प्रेमी) तात्या.
24 Oct 2010 - 10:17 am | आनन्दा
मि. पा वर फुटणारे फटाके मला सर्वात जास्त आवडतात ;)
24 Oct 2010 - 1:01 pm | सुहास..
रामदासकाकांना कोपरापासुन दंडवत !!
बाकी फटाके म्हटल्यावर आम्हाला 'फटा के' चा जोक आठवला
कोल्हापुरी फटाकडीचा फॅन
पुण्यातल्या बेचव,साजुक तुपाला कंटाळलेला,
सुहास
25 Oct 2010 - 2:16 am | स्वछंदी-पाखरु
मला असले फटाके उडवायला आवडतात....
25 Oct 2010 - 10:41 am | आमोद
१) माधुरी दिक्शित
२) ऊर्मिला मातोडकर
इत्यादी.....
25 Oct 2010 - 6:38 pm | परिकथेतील राजकुमार
१८ वर्षावरील मुलांसाठी असतात ते.
26 Oct 2010 - 3:39 pm | चिंतामणी
गांधीवाद्यांप्रमाणे म्हणतो
आम्ही फटाके उडवत नाही. आवडत नाही. ऐपत नाही. (त्यात भर घालतो)फटाक्यामुळे होणारे प्रदुषण (ध्वनी आणि वायुचे) आणि आवाजामुळे बालकांना आणि वृध्दांना होणारा त्रास बघवत नाही.
सध्या एक फटाका प्रसीध्द आहे. हा फटाका जिवंत फटाका आहे. "खळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ" आणि "फटाक" असे आवाज निघाले की समजा "राज" फटाका वाजला. ;)