हे लोक कॉलेजात का गेले ?

मिसळभोक्ता's picture
मिसळभोक्ता in काथ्याकूट
23 Oct 2010 - 12:53 am
गाभा: 

आज एक विचारप्रवर्तक लेख वाचण्यात आला:

http://chronicle.com/blogs/innovations/why-did-17-million-students-go-to...

सुमारे सव्वातीन लाख वेटर्स, अंशीहजार बारटेंडर्स ह्यांना कॉलेजातील ब्याचलर डिग्री आहे !

एवढेच नव्हे तर, आठ हजार वेटर्सना पीएचडी किंवा व्यावसायिक पदव्या आहेत.

अणि सर्वात धक्कादायक म्हणजे सुमारे ५०० भंग्यांना पी एचडी पदवी आहे !!!

प्रतिक्रिया

मिसळभोक्ता's picture

23 Oct 2010 - 12:54 am | मिसळभोक्ता

पाचशे ऐवजी पाच हजार वाचावे.

भारतात एल एल बी असल्याखीरीज बार मध्ये प्रवेश देत नाहीत हे माहीत आहे का?

पिवळा डांबिस's picture

23 Oct 2010 - 1:06 am | पिवळा डांबिस

तडाक!
फटाक!!
फाट!!!!
फुट!!!!!!
फडाक!!!!!!

काय नाय, पॉपकॉर्न करायला लावलंय, मायक्रोवेव्हमध्ये!!!!
आलोच इतक्यात!!
:)
अपॉर्च्युनिटीज अनलिमिटेड!!!:)
शिकून नायतरी कोणाचं भलं झालंय?

मस्त कलंदर's picture

23 Oct 2010 - 1:17 am | मस्त कलंदर

शिकून नायतरी कोणाचं भलं झालंय?

मिभो काकांचे झाले असावे. म्हणजे हे माझे वैयक्तिक मत हो...

माझे भले झालेय की नाही अजून मलाच काही कळाले नाहीय.. त्यामुळे कुणी असा प्रश्न विचारल्यास त्यास(पक्षी: प्रश्नास) योग्य ठिकाणी मारण्यात येईल!!!!

पंख's picture

23 Oct 2010 - 11:39 am | पंख

शिकून तुमचे काय भले झाले हो ?

आता मारा योग्य ठिकाणी (पक्षी : प्रश्नास )

पैसा's picture

23 Oct 2010 - 11:41 am | पैसा

अमेरिकतली असावी. आमच्या गोंयच्या शिक्षणमंत्र्यांचं शिकशान ७ वी तरी आहे का लोकाना सौंशय आहे.

पिवळा डांबिस's picture

23 Oct 2010 - 11:46 am | पिवळा डांबिस

गोंयच्या शिक्षणमंत्र्यांचं शिकशान ७ वी तरी आहे का लोकाना सौंशय आहे.

चांगलो शिकलो सवरलेलो पर्रीकर नको झालो तुमकां, मगे असलोच मॅळतलो....
खरां की खोटां?
:)

पैसा's picture

23 Oct 2010 - 11:49 am | पैसा

+१०००

पदवी असली म्हणजे तिचा उपयोग केलाच पाहीजे असा त्या लोकांचा अट्टाहास नसेल कदाचित. पण एक पदवी अडीअडचणीला असावी अशी मानसिक सुरक्षितता हवी असेल.

बारटेंडर आणि वेटर हे फार ल्युक्रेटीव्ह जॉब्स आहेत. बख्खळ पैसा आहे त्यात असं मी ऐकून आहे.

पिवळा डांबिस's picture

23 Oct 2010 - 1:21 am | पिवळा डांबिस

पदवी असली म्हणजे तिचा उपयोग केलाच पाहीजे असा त्या लोकांचा अट्टाहास नसेल कदाचित.
सहमत.
स्वतःला सुसंस्कॄत बनवण्यासाठी, मनोविकासासाठी किंवा अन्य काही कारणासाठीही माणसं उच्च शिक्षण घेत असतील.
कदाचित से व्यवस्याय स्वीकारुन ते फावल्या वेळात त्यांना हवं ते (एखादी कला म्हणा) परस्यू करत असतील ज्यातून त्यांना पैसा नसेल पण मानसिक आनंद मिळत असेल...

शुचि's picture

23 Oct 2010 - 1:23 am | शुचि

त्या लेखातच हा उतारा आहे -
Now it is true that college has a consumption as well as investment function. People often enjoy going to classes, just as they enjoy watching movies or taking trips. They love the socialization dimensions of schooling—particularly in this age of the country-clubization of American universities.

पिवळा डांबिस's picture

23 Oct 2010 - 8:31 am | पिवळा डांबिस

अगदी बरोबर!
मी पूर्णतः सहमत आहे!!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Oct 2010 - 1:14 am | विश्वनाथ मेहेंदळे

>>अणि सर्वात धक्कादायक म्हणजे सुमारे ५०० भंग्यांना पी एचडी पदवी आहे !!!
काय मिभोकाका, इतरांवर आरोप करता ते तुम्हाला लागू होतात की नाही?

(सदासर्वदा विरजण न घालणारा पण वेळप्रसंगी घालू शकणारा) वि. मे.

मिसळभोक्ता's picture

23 Oct 2010 - 2:51 am | मिसळभोक्ता

आरोप कोणते, हे कळल्यास उत्तर देऊ शकेन.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Oct 2010 - 3:20 am | विश्वनाथ मेहेंदळे

गजनी झाला वाटते तुमचा. वेड पांघरून पेडगावला जायचे ठरवले असेल तर काय करणार बॉ आम्ही त्याला. सदर आरोपाचा दुवा व्यनी केला आहे. पुढील बातचीत तेथे करू.

मिसळभोक्ता's picture

23 Oct 2010 - 3:26 am | मिसळभोक्ता

मी भाषाशुद्धीविषयी काही तरी बोललो का ?

सुनील's picture

23 Oct 2010 - 1:19 am | सुनील

तरीच नुकताच जेपर्डी ह्या प्रश्नोत्तर मालीकेत एक बार टेंडर दोनदा जिंकून गेला!

प्रियाली's picture

23 Oct 2010 - 1:20 am | प्रियाली

अमेरिकेतही आपल्यासारखीच जाती व्यवस्था आहे हे पाहून डोळे भरून आले.

पॉपकॉर्न तयार आहेत. तोंडात घालायची कमी आहे. चालू द्या!

मिसळभोक्ता's picture

23 Oct 2010 - 2:39 am | मिसळभोक्ता

जॅनिटरला हल्ली "स्वच्छता कर्मचारी" म्हणतात का ? आम्ही पडलो जुनाट मनुवादी. आम्हाला भंगी स्वच्छता करतात, हे माहिती होते.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Oct 2010 - 10:42 pm | विश्वनाथ मेहेंदळे

जातिव्यवस्थेचा तुमचा इतका तगडा अभ्यास आणि तुम्हाला इतकेही माहित नाही? कमाल झाली म्हणायची. विरजण घालता घालता बेसिक्स विसरलात काय?

इतरांच्या लिखाणातील कुसळे काढताना तुमच्याच लिखाणात मुसळ राहून गेले की हो.

विकास's picture

23 Oct 2010 - 1:38 am | विकास

असले आकडे मोठ्या बूशच्या काळात आलेल्या अर्थिक डबघाईच्या सुमारास पण ऐकलेले होते. त्यात हार्वर्डचे पदवीधर कसे बार टेंडर्स झाले वगैरे आल्याचे आठवते.

एक प्रश्न आहे: यातील किती जण कायम स्वरूपी हे करत असतील असे वाटते? त्या शिवाय नक्की कुठल्या विषयातील पदवीधरांवर अशी अवस्था येते?

समस्या काय ते नीट समजले नाही.

कॉलजशिक्षणासाठी झालेल्या खर्चासाठी कर्ज काढले होते, ते परत करायला त्रास होतो, ही समस्या आहे काय?

लेखात नॅशनल ब्यूरो ऑफ एज्युकेशन रिसर्च संस्थेच्या अहवलामधील उद्धरण दिले आहे :

“In general, marginal and average returns to college are not the same.” (p. 28)
(सामान्यपणे बघता, कॉलेजावर केल्याल्या ठोक गुंतवणुकीवर जो ठोक फायदा मिळतो त्याची टक्केवारी वेगळी असते, आणि वाढीव रकमेवर मिळनारा वाढीव फायदा असतो, त्याची टक्केवारी वेगळी असते.)

त्यावर लेख लिहिणारे अधिक स्पष्टीकरण देतात :

In other words, even if on average, an investment in higher education yields a good, say 10 percent, rate of return, it does not follow that adding to existing investments will yield that return, partly for reasons outlined above.
(जरी उच्चशिक्षणामध्ये केलेल्या सरासरी गुंतवणुकीवर १०% फायदा मिळत असला, तरी असलेल्या गुंतवणुकीत वाढ केली, तर त्या वाढवलेल्या गुंतवणुकीवर त्याच दराने नफा मिळणार नाही.)

मात्र कॉलेजात जाणार्‍या विद्यार्थ्याच्या दृष्टीने "आपण सरासरी विद्यार्थी" हेच असू शकणार. "आपण वरकड विद्यार्थी" असा विचार शक्यच नाही. कारण वरकड विद्यार्थी आणि सरासरी विद्यार्थी यांच्यात भेद करण्यासाठी कुठलेच चिह्न नसते.

(एकदा चहाची ३ रुपये किंमत चुकती करताना मी चार रुपयांची नाणी चुकून दुकानदाराला दिली. एक रुपयाचे नाणे वरकड दिले, हे स्पष्टच आहे. पण त्या चार नाण्यांपैकी कुठली तीन देण्यास सुयोग्य होती, आणि कुठले वरकड होते? असे कुठलेच चिह्न त्या नाण्यांवरती नव्हते.)

तर कॉलेजात प्रवेश घेणारा विद्यार्थी आधीच कसे सांगू शकेल की "आपण शिक्षणास साजेसा व्यवसाय करण्यात यशस्वी होऊ की नाही?" (स्पर्धा परीक्षा, कॉलेजात प्रवेश-अर्ज या चाचण्यांमधून तो पुढे सरलाच आहे.)

शुचि's picture

23 Oct 2010 - 1:57 am | शुचि

On second thought ..... थोडंदेखील खोलवर जाता विषय खूप गंभीर वाटतो आहे. एक पुस्तक देखील आहे "फाइव्ह इयर पार्टी" म्हणून जे साधरण अशा प्रकारच्या विषयाला वाहीलेलं आहे.
http://www.thefiveyearparty.com/quick-facts/
त्यांची मतं जाणण्यास उत्सुक ज्या लोकांची मुलं सध्या कॉलेजमधे शिकत आहेत किंवा घरट्यातून नुकतीच उडाली आहेत.
हा "कधी ना कधी तोंड द्यावा लागेल" अशा यादीतला विषय दिसतो आहे एकंदर.

नंदन's picture

23 Oct 2010 - 2:15 am | नंदन

यात पदवीधारक हमालांचा समावेश आहे काय? ;). आणि १ अमेरिकन हमाल = य चिनी हमाल = क्ष भारतीय हमाल ह्या य-क्ष-प्रश्नाचे कुणी उत्तर देईल का? [यक्षनगरीकर आणि परिसरातले लोक डिस-क्वालिफाईड]

(पळा, मार खायची लक्षणं) :)

अवांतर - बगुनाना (दुवा) फडणवीस आठवले.

पिवळा डांबिस's picture

23 Oct 2010 - 8:41 am | पिवळा डांबिस

यक्षनगरीकर आणि परिसरातले लोक डिस-क्वालिफाईड]
जाहीर कडक आणि जाज्वल्य निषेध!!!!

आपला (नायतर शिंचा कुणाचा?),
पिवळा डांबिस
टंच शिंडीशेजारी,
उफाड ब्रिटनीसमोर,
आरनॉल्ड पासून दडून
यक्षनगरी, काऽऽऽलिफोर्निया ४२०४२०

श्रावण मोडक's picture

23 Oct 2010 - 11:27 am | श्रावण मोडक

हाहाहाहा... हे वाचून वाटलं खाल्ले यानं ­फटके. पण पाहतो तर काही नाही... शु­भेच्­छा रे, नंदन.

परिकथेतील राजकुमार's picture

23 Oct 2010 - 11:36 am | परिकथेतील राजकुमार

यात पदवीधारक हमालांचा समावेश आहे काय? . आणि १ अमेरिकन हमाल = य चिनी हमाल = क्ष भारतीय हमाल ह्या य-क्ष-प्रश्नाचे कुणी उत्तर देईल का? [यक्षनगरीकर आणि परिसरातले लोक डिस-क्वालिफाईड]

+१ नंदनश्री ह्यांच्याशी सहमत.

तसेच टंकनकार्यासाठी उपयोगात आणल्या जाणार्‍या माकडांच्या शिक्षणाविषयी देखील काही विदा उपलब्ध आहे काय ?

पिवळा डांबिस's picture

23 Oct 2010 - 12:36 pm | पिवळा डांबिस

प्रकाटाआ

क्लिंटन's picture

23 Oct 2010 - 2:31 am | क्लिंटन

मी इंजिनिअरींगला प्रवेश घेताना ऐकलेला किस्सा सांगतो.हा किस्सा खरा आहे की नाही याविषयी कल्पना नाही पण आशय महत्वाचा आहे. माझ्या नातेवाईकांपैकी माझ्यापेक्षा ५-६ वर्षांनी मोठा असलेला एक नुकताच इंजिनिअर होऊन बाहेर पडला होता.आणि त्याचा मारवाडी मित्र कसेबसे बी.कॉम करून बिझनेसमध्ये लागला.माझा नातेवाईक मोठ्या अभिमानाने म्हणाला "मी इंजिनिअर झालो" त्यावर त्याचा मारवाडी मित्र म्हणाला "तुझ्यासारखे चार इंजिनिअर मी नोकरीला ठेवले आहेत"!

दुसरा किस्सा मात्र अगदी १००% खरा आहे कारण तो माझ्या बाबतीतच घडला आहे.मी आमच्या शाळेतील ’अ’ वर्गातला आघाडीच्या विद्यार्थ्यांपैकी एक होतो.आमचा सगळा ग्रुप स्वत:ला जरा ’लई शाना’ समजे आणि कमी टक्केवाल्यांना आम्ही खिजगणतीतही धरत नसू.शेवटच्या वर्षी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून इन्फोसिसमध्ये नोकरीची ऑफर आल्यावर तर काय आकाशालाच हात पोहोचायचे बाकी होते. आज इन्फोसिसमध्ये लाखापेक्षा जास्त employees आहेत. त्यावेळी होते १० हजार आणि तेव्हा तिकडे सिलेक्ट होणे ही मोठी प्रतिष्ठेची बाब होती. पण आम्ही इंजिनिअर म्हणून बाहेर पडल्यानंतर मंदीमुळे इन्फोसिसने आमची joining date अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली.आम्ही सगळे ’अ’ वर्गवाले आघाडीचे विद्यार्थी बसलो होतो घरी बेकार म्हणून. आणि दैवदुर्विलास असा की त्याच दरम्यान आमच्या शाळेत आमच्या बॅचचे reunion ठरले आणि त्यासाठी मिटिंगचे ठिकाण कोणते होते? तर आमच्याच वर्गात असलेल्या पण दहावीत कमी मार्क मिळवून पास झालेल्या आणि एकेकाळी आमच्या खिजगणतीतही नसलेल्या एकाचे ऑफिस. बाकी सगळे अवचित आलेल्या आणि अनपेक्षित असलेल्या बेकारीच्या निराशेच्या गर्तेत असताना हा गडी मात्र स्वत:चा बिझनेस उत्तम चालवत होता. आता बोला

तात्पर्य: आयुष्यात पुढे जायला शिक्षणापेक्षाही street-smart असणे गरजेचे आहे आणि शिक्षणाचा आणि त्या गोष्टीचा काही संबंध असेलच असे नाही.आणि असा street-smart पणा दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात असला आणि त्याचा उपयोग करून पुढे जाता येणार असेल तर तो करावा.

विकास's picture

23 Oct 2010 - 2:51 am | विकास

"तुझ्यासारखे चार इंजिनिअर मी नोकरीला ठेवले आहेत"!

अगदी शक्य आहे. माझ्या आधीच्या एका कामातला माझा सिंधी बॉस आणि जवळपास साडेतिनशे मिलीयन डॉलर्सच्या कंपनीचा मालक मला कायम म्हणायचा की पिई (प्रोफेशनल इंजिनियर सर्टीफिकेशन) घेण्यापेक्षा धंदा चालू करायचा आणि आपल्या हाताखाली चार पिई ठेवायचे...

आयुष्यात पुढे जायला शिक्षणापेक्षाही street-smart असणे गरजेचे आहे आणि शिक्षणाचा आणि त्या गोष्टीचा काही संबंध असेलच असे नाही.आणि असा street-smart पणा दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात असला आणि त्याचा उपयोग करून पुढे जाता येणार असेल तर तो करावा.

सहमत. मात्र म्हणून शिक्षणाला अथवा कशालाच तुच्छ लेखायची सवय करून घेऊ नये, जी अशा स्मार्टनेस मधील यशातून कधी कधी येऊ शकते. हाच माझा बॉस मला कायम, "ये गोरे लोग बुद्दू होते है" अशा अर्थाचे म्हणायचा. त्याला शेवटी एकदा वैतागून विचारले की मग आपण (तुम्ही-मी) इथे त्यांच्याकडे का राहतोय? भले तुमचा धंदा असेल पण तो मिळवायला त्यांच्याकडेच जावे लागत आहे ना? अर्थात हेच उलट अर्थाने "गोर्‍यांना" (अमेरिकन्सना, आडनाव वाले नाही ;) ) लागू होतेच...

शुचि's picture

23 Oct 2010 - 3:18 am | शुचि

असे ४ पिई "हाताखाली ठेवणार्‍या" माणसाशी ४ शब्द बोलावेसे वाटतात का? त्याची संगत किती सुखद, हवी हवीशी सोडाच पण सुसह्य होते हा वेगळाच मुद्दा आहे. विद्येला पैशाने तोलणारे लोक म्हणजे पुस्तकं रद्दीच्या भावाने जोखणार्‍या लोकांसारखेच की.

पिई माणसाची साथ सुखद, संवाद उत्तम असं काही नसतं की पण.
मला तर अपवादानेच चौकोन नसलेले पिईवाले भेटलेत.

मिसळभोक्ता's picture

23 Oct 2010 - 2:50 am | मिसळभोक्ता

इतक्या महत्त्वाच्या विषयावर अनेक लोक पॉपकॉर्न खाताहेत, हे बघून एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

अ‍ॅडम्स ने सांगितल्याप्रमाणे, सप्लाय पेक्षा डिमांड (पुरवठ्यापेक्षा मागणी) जास्त असेल, तर किंमती वाढतात.

भंगी, वेटर्स वगैरे कॉलेजात गेले नसते, तर उच्चशिक्षण महाग झाले नसते.

अर्थात, ह्याला फाटेच फोडायचे असतील, तर कॉलेजात जाऊन शिकलेल्याचा तुम्हाला आता काय उपयोग होतो ? असे कुणी विचारील. माझे उत्तर, सुमारे ९५ टक्क्याचा उपयोग आजवर मला झाला आहे. तुमचे तुम्ही ठरवा.

आणखी एक, म्हणजे:

चार वर्षाच्या स्वस्त कॉलेजासाठी साधारणत: ३०००० डॉलर्स खर्च होतात. ह्या ऐवजी शाळेनंतर लगेच वेटर म्हणून नोकरी केली, तर अगदी किमान पगारावर देखील, ४० * ५२ * ४ * ८= ६६५६० इतकी कमाई चार वर्षात होते. म्हणजे सुमारे १ लाख डॉलर्स सरप्लस. त्यावर दरवर्षी ६ टक्क्यांचे व्याज धरले, आणि रिटायरमेंट ६५ वर्षांची धरली, तर (६५ - २१) = ४४ वर्षांत ह्या एक लाखाचे १.३ मिलियन डॉलर्स होतील. म्हणजेच सरकारी सोशल सेक्युरिटी वर अवलंबून रहावे लागणार नाही.

नंदन's picture

23 Oct 2010 - 3:01 am | नंदन

तर कॉलेजात जाऊन शिकलेल्याचा तुम्हाला आता काय उपयोग होतो ? असे कुणी विचारील. माझे उत्तर, सुमारे ९५ टक्क्याचा उपयोग आजवर मला झाला आहे. तुमचे तुम्ही ठरवा.

या संदर्भात, हे खुले पत्रही वाचनीय.

मिसळभोक्ता's picture

23 Oct 2010 - 3:25 am | मिसळभोक्ता

बुकमार्क टाकला आहे. नंदन लिंकन, धन्यवाद !

क्लिंटन's picture

23 Oct 2010 - 10:08 am | क्लिंटन

ही calculations बघून माझ्यातला फायनान्सवाला जागा झाला. त्यामुळे पुढील प्रश्नांची उत्तरे द्यावीत ही विनंती

१. मी २००७ पर्यंत अमेरिकेत होतो त्यावेळी तरी २-२.५% पेक्षा जास्त व्याज दर मला बॅंकांमध्ये कुठे आढळले नव्हते.नंतरच्या काळात आलेल्या आर्थिक संकटामुळे व्याजाचे दर आणखी कमी झाले. सध्याचे दर माहित नाहीत पण ६% दर कोणत्या आधारावर धरला?की विद्यार्थी शेअर बाजारात-म्युच्यअल फंडात गुंतवणूक करेल असे धरले?
२. सरसकट ६% दर constant कसा काय धरला?व्याजाच्या दरात चढउतार होत असतातच.तेव्हा ६% सरासरी व्याजदर धरला आहे का?
३. महागाईचे काय?महागाई हा मुद्दाच धरला नसल्यामुळे महागाई ०% असून ६‍% real returns (व्याजाचे दर वजा महागाई) आहेत हे धरले का? १९८०-८२ दरम्यान व्यजाचे दर खूप जास्त होते (१०-१२%) पण महागाई पण इराण प्रश्नामुळे जास्त होती. त्यावेळी पेट्रोलचे दर बरेच जास्त (बहुदा ३-३.५० डॉलर प्रति गॅलन ) झाले होते त्यामुळे व्याजाचे दर भरमसाठ वाढूनही महागाई वाढल्याने त्याचा फारसा उपयोग नव्हता. अमेरिकन सरकार Treasury Inflation Indexed Bonds विकते. त्यात व्याजाचे दर महागाईच्या पातळीप्रमाणे ठरविले जातात.थोडक्यात हे बॉंड real returns देतात.१९९७ पासून कधीही या बॉंडनी ४% पेक्षा जास्त real returns दिलेले नाहीत.आणि असे बॉंड विकत घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असते कारण त्यात उलाढाल मिलियन डॉलरची होते. असे बॉंड विकत केवळ Financial institutions विकत घेऊ शकतात. सामान्य माणसाला बॅंकेत गुंतवणुक करून मिळणारा real return हा ४% पेक्षा बराच कमी (काही वेळा अगदी ऋणसुध्दा) असतो.तेव्हा ६% चे लॉजिक कळले नाही.
४. चार वर्ष कॉलेज करून विद्यार्थ्याला नक्कीच जास्त पगार मिळू शकतो आणि तो हा एक लाख डॉलरचा backlog भरून काढू शकतो. तसेच एक लाख डॉलरचा backlog असेल असे नाही कारण ४ वर्षात शिकतही अनेक विद्यार्थी विद्यापीठातच किंवा बाहेर मॉल, मॅकडॉनल्ड यासारख्या ठिकाणी काम करून अनेकदा पैसे मिळवताना दिसतातच.तेव्हा १ लाख डॉलरपेक्षा हा backlog नक्कीच कमी आहे.
५. विद्यार्थी नंतरच्या काळात Student loan वरील व्याजावर आयकरात deduction घेऊ शकतो त्याचा फायदा शिकलेल्या विद्यार्थ्याला होईल तो न शिकलेल्याला होणार नाही त्याचे काय?

असो.

मिसळभोक्ता's picture

24 Oct 2010 - 12:13 am | मिसळभोक्ता

ह्यात म्युचुअल फंडांचे गेल्या १५ वर्षातले रिटर्न्स गृहीत धरलेले आहेत.

तसेच, जेनिटर शाळा-पास असो किंवा पी एच डी, दोघांनाही सारखाच मिनिमम वेज मिळेल असे गृहीत धरले आहे.

म्हणजेच चार वर्षाचे कॉलेज करून मग नंतर जॅनिटर बनण्यापेक्षा आधीच जॅनिटर बनल्यास किती पैसे वाचले असते, हे गणित आहे.

क्लिंटन's picture

24 Oct 2010 - 12:51 am | क्लिंटन

जर चार वर्षे कॉलेज, पुढे दोन वर्षे मास्टर्स आणि कमीतकमी चार वर्षे पी.एच.डी अशी दहा वर्षे जास्तीची घालून १२ वी पास झालेल्या विद्यार्थ्याइतकाच पगार आणि तोच जॉब मिळणार हे आधी माहिती असेल तर अर्थातच कोणीही दहा वर्षे जास्तीची डोकेफोड करणार नाही.जर का इतके करून पगार तितकाच मिळणार असेल तर तुमचे गणित नक्कीच बरोबर आहे. पण तरीही काही मुद्दे आहेतच

१. १२ वी नंतर कोणीही कॉलजला आपण तितक्याच मिनिमम वेजवर काम करू या अपेक्षेने जात नाही. तेव्हा जरी उच्चशिक्षित लोक जॅनिटर म्हणून काम करत असले तरी आपल्यावर शिकूनही ही वेळ येईल हे त्यांना आधीच माहित नसते. त्यामुळे १२वी नंतर लगेच जॅनिटर म्हणून काम करावे की शिकावे याचा निर्णय घेताना विद्यार्थी शिकून आपल्याला किती जास्त पगार मिळू शकेल याचा थोडाफार अंदाज नक्कीच घेईल आणि शिकून मिळणारा अपेक्षित पगार जॅनिटरपेक्षा नक्कीच जास्त असेल. त्यामुळे १२ वी नंतर बौध्दिक, आर्थिक कुवत आणि आणखी चार वर्षे शिकायला लागणारा संयम आणि कष्ट घ्यायची तयारी या गोष्टी असलेला विद्यार्थी नक्कीच शिकायला जाईल.

२. पी.एच.डी शिक्षित त्यांच्या शिक्षणाच्या मानाने कमी असलेले (उदा. क्लार्क, कुरियर डिलिव्हरी,सेल्समन) असे जॉब करतील हे एक वेळ समजू शकते. पण त्यांच्यावर एकदम जॅनिटर म्हणून काम करायची वेळ येईल हे पटायला थोडे अवघड जाते.

३. आणि समजा तशी वेळ आलीच तरी ते आयुष्यभर जॅनिटर म्हणून नक्कीच काम करणार नाहीत. प्रतिकूल काळात पडती बाजू घ्यायला लागली तर दुसरी चांगली नोकरी मिळत नाही तोपर्यंत ते असे काम करतील पण दुसरी चांगली नोकरी मिळताच जॅनिटरचे काम सोडून तिकडे जातील.

तुम्ही लिंक दिलेल्या लेखाची विश्वासार्हता मला माहित नाही.तरीही यावरून शिक्षणाला काहीच उपयोग नाही असा अर्थ निघू नये असे वाटते.वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे यशस्वी होण्यासाठी लागणारा street smartness सगळ्यांकडे नसतो. अशांसाठी शिक्षण नक्कीच महत्वाचे आहे.

मिसळभोक्ता's picture

24 Oct 2010 - 7:53 am | मिसळभोक्ता

लोक कॉलेजात का गेले, असे शीर्षक आहे.

लोक कॉलेजात का जातात, असे नाही.

शाहरुख's picture

27 Oct 2010 - 8:38 pm | शाहरुख

लोक कॉलेजात का गेले, असे शीर्षक आहे.

कॉलेजातून पी.एच. डी. झाल्यावर संडास साफ करावे लागतील असा अंदाज आधी न आल्याने !

बाकी लेख वाचलेला नाही..चुभूद्याघ्या !

विकास's picture

23 Oct 2010 - 2:52 am | विकास

या लेखात एक माहीती दिलेली नसल्याचे आढळले: उच्च शिक्षण वगैरे असून जालावर संपादन करणार्‍यांचा ;) तसेच लेखन करणार्‍यांचा ;)

मिसळभोक्ता's picture

23 Oct 2010 - 2:54 am | मिसळभोक्ता

हा कुणाचा "फुल-टाईम" जॉब नसेल कदाचित. (अर्थात, काही लोक इथे इतका वेळ असतात, की लोकांना शुद्ध पाणी मिळते की नाही, ह्याची काळजी वाटते ;-)

विकास's picture

23 Oct 2010 - 3:47 am | विकास

की लोकांना शुद्ध पाणी मिळते की नाही, ह्याची काळजी वाटते

मात्र अशा कामांमधून शक्य तितके लोकांना पाणी पाजणे करता येतेच... शिवाय असे आहे की शुद्ध पाण्यापेक्षा शुद्ध विचार पसरवणे महत्वाचे. ;)

मिसळभोक्ता's picture

23 Oct 2010 - 3:51 am | मिसळभोक्ता

शुद्ध विचारांमुळे कॉलर्‍याची साथ येणार तर !

पिवळा डांबिस's picture

23 Oct 2010 - 10:19 am | पिवळा डांबिस

इतक्या महत्त्वाच्या विषयावर अनेक लोक पॉपकॉर्न खाताहेत, हे बघून एक मिपाकर म्हणून शरम वाटली.
चालायचंच! सध्या तसं वाटण्याचेच दिवस आहेत! सो जॉईन द क्लब!!

------------------------------------------------------------------
आजकाल आम्ही आमच्या स्वतःच्याच लिखाणाचा स्नॅपशॉट घेणं चालू केलं आहे!!!!
कालाय तस्मै नमः||

मराठमोळा's picture

23 Oct 2010 - 3:03 am | मराठमोळा

नुसतीच पदवी घेतली म्हणजे माणसं हुशार आणि कुशल झाली असे होत नाही.
काही लोकं तर नुसतीच नावाला पदवीधर असतात, अक्कल काडीची नसते. भले भले शिक्षणवीरसुद्धा मट्ठ असु शकतात. उदाहरणे आपण रोज पहातच आहोत.. :P

कधीच शाळेत न गेलेले पण स्वच्छतेची जाण असणारे आहेत आणि पीएच्डी करुन पचापच रस्त्यांव्र थुंकणारे सुद्धा. आपण शिक्षण का घेतोय हे सर्वात पहिले महित हवे ना, उगाच दुनिया ईंजीनीयर/डॉक्टर/एमबीए होतेय म्हणुन मी पण तिथे डोके चलत नसले तरी कसाबसा पास होईन आणि माझी पदवी बघुन मला लोकं नोकरी देतील असा विचार केला तर पदरी निराशाच येईल ना.

टुडेज् वर्ल्ड इज नॉट फॉर हार्ड वर्किंग अँड एड्युकेटेड पीपल, ईट ईज फॉर स्मार्ट अँड स्किल्ड पीपल.

गुंडोपंत's picture

23 Oct 2010 - 3:41 am | गुंडोपंत

मी म्हणतो माणसाने जे जमेल ते करावे. तरुणपणी कालेजात शिकायला मजा येते मग तेव्हा मजा करावी. एखाद्याला काही तरी शोधायला मजा येते त्याने ते करावे. काही लोकांना यांना पियच्डी द्यायला मजा येते त्यांनी ते करावे. ज्यांना खायला प्यायला आणि पाजायला आवडते त्यांनी ते करावे.
आजचा दिवस मजेत गेला तर बास! या शिवाय नक्की काय करायचे हे माहिती असेल तर अजूनच छान.
माझ्या तर फार उशीरा लक्षात आले की या भानगडी कशाला करा? मग मी ठरवले की, लोकांनी घाम गाळावा आणि त्याचे पैसे मी घ्यावेत! ह ह हा!!

शाळा आणि पदव्या हे विकणारे विकतात. आपण काय विकत घ्यायचे ते आपले आपण पाहून घ्यावे!
यातले काहीही विकत घेतले नाही, तरी अडते असे नाहीच!

आमच्या मिभोंनी काळेकाकांच्या बरोबर पीयच्डी साठी इतका जीव काढला.
पण पुढे त्याच पियच्डीतून त्यांनी हत्तीचे पिल्लू तयार केले हे महत्त्वाचे. सगळ्यांनाच हे जमते असे नाही. पिल्लाच्या अधिक माहिती साठी मिभोंशी संपर्क साधावा!
ज्यांना हे जमत नाही, ते कुठे तरी खराटे हाती घेऊन सल्ले देत बसतात इतकेच! :)

त्याच पियच्डीच्या काळात तेव्हढ्ज्याच मेहेनतीतून येक मोट्टा भिजिनेस पन उबा कर्ता आला अस्ता, पन नाही क्येला! कारन त्यांना एकावर येक प्यारेलल शोद काडायला मजा येत व्हती ना!

थोडक्यात काय, ज्यात मजा येते त्यात आपला वेळ घालवावा.

Nile's picture

23 Oct 2010 - 8:17 pm | Nile

सदर लेख वरवर चाळला. या मध्ये घेतलेल्या सर्वेक्षणातील विद्यार्थ्यांबद्दल पुरेशी माहिती नाही.

अमुकतमुक वेटर्स, बारटेंडर्स हे "शिक्षण पुर्ण करुन" वेटर वा बारटेंडरची नोकरी करत आहेत की त्यांच्या पुढील शिक्षणात असताना सदर नोकरी करत आहेत? अमेरीकेत वेटरची नोकरी करणे अगदी सामान्य आहे. बॅचलर 'करणार्‍यां'मध्ये वेटर वा तत्सम नोकरी करण्याचे प्रमाण खुपच जास्त आहे पण त्याचबरोबर उच्च शिक्षण घेणारे अनेक लोक अश्या प्रकारची नोकरी करतात हेही तितकेच खरे.
(चटकन आठवुन पाहिले, माज्या विद्यापीठातील, २००९ साली भारतातुन मास्टर्स करायला आलेल्या सुमारे ५० पैकी, १५-२० जण कुठल्यातरी हॉटेलात काम करत होते. वेटरचे काम 'हलके' समजणार्‍या (नुकत्याच) भारतातुन आलेल्या विद्यार्थ्यांमधील ही आकडेवारी आहे. )

सदर लोकांनी घेतलेले शिक्षण "वेटर, जॅनीटर इ. जॉब करता आहे" असा सबंध लावला जातो आहे का?
कीती वेटर वेटर आधी आणी बॅचलर/पी एच डी नंतर असे आहेत? ह्याबद्दल विदा काही म्हणत नाही. अमेरीकेत प्रौढ शि़क्षणाचे प्रमाण खुप आहे असे माझे निरीक्षण आहे. अनेक लोक फुल टाईम नोकरी असतानाही पुन्हा कॉलेजात जाउन काहीतरी शिकत असताना दिसतात.

'बॅक टु कॉलेज' प्रकारचे लोक हे 'कम्युनीटी कॉलेजात' सहसा जातात. इथे फी पुष्कळ कमी असते. त्याशिवाय तुम्ही जर स्टेट रेसीडेंट असाल तर पुन्हा कॉलेज पुष्कळ स्वस्त असते. (प्रायव्हेट कॉलेजांमुळे फी अ‍ॅव्हरेज जरी वर जात असले तरी एनरोल्मेंट अ‍ॅव्हरेज कमी असावे.) उच्च शि़क्षणामध्ये, विद्यापीठांमध्ये सहसा शिक्षण फुकट घेता येते. सद्ध्या जरी पीएचडी विद्यार्थांना मिळणार्‍या आर्थिक मदतीमध्ये कपात झाली असली तरी सहसा त्यांना पुर्ण फी सवलत+ तासाने नोकरी या हिशेबाने त्यांच्या बचतखाती अनेकदा बेरीजच होते.

अ‍ॅडम्स ने सांगितल्याप्रमाणे, सप्लाय पेक्षा डिमांड (पुरवठ्यापेक्षा मागणी) जास्त असेल, तर किंमती वाढतात.

डिमांड पुष्कळ असली तरी सप्लाय पेक्षा जास्त आहे का? या बद्दल काही विदा असल्यास पहायला आवडेल. डिमांड नक्कीच वाढली आहे, पण मला वाटतं, उच्च शिक्षणाच्या बाबतीत मार्केटमध्ये 'सरप्लस'च असावा 'शॉर्टेज' नाही. सद्ध्या वाढलेल्या किमतीची मुख्य कारण रीसेशनच अहे असे मला वाटते. मागील दिड वर्षात माझ्या युनीव्हर्सीटीची फी ६०%+ ने वाढली आहे. उच्च शिक्षण प्रवेशसंख्येत झालेली वाढ १०% पेक्षा जास्त नाही.

मिभोकाकांनी दिलेल्या गणिताचा विचार केला तर, बॅचलर विद्यार्थ्यांना सरासरी पगार कीती असतो? वगैरे माहीती काढल्यास गणित करण्यास मदत होईल. पीटरसन्सचा रेफरंस घेता येईल. असो.

BLS च्या वेब वर जाउन वेटर जॉबचा विदा पाहिला. २००० ते २००९ साला मधील विद्यामध्ये (रीसेशनमुळे वगैरे) काही विशेष वाढ २००८ नंतर झाल्याचे आढळले नाही. उलट वेटर्सचा एकुण नं. २००६,७,८ पेक्षा ९ मध्ये कमीच आहे. हे श्री रिचर्ड यांच्या निष्कर्षाच्या विरोधात जाते असे मला वाटते.

तिमा's picture

23 Oct 2010 - 8:18 pm | तिमा

पदवीचा एकच उपयोग असतो आणि तो म्हणजे त्याची सुरनळी करुन ................... ......
शिक्षणाने माणूस भित्रा होतो आणि आयुष्यात कुठलेच रिस्क घेऊ शकत नाही.

अप्पा जोगळेकर's picture

24 Oct 2010 - 10:04 am | अप्पा जोगळेकर

सर्वात धक्कादायक म्हणजे सुमारे ५०० भंग्यांना पी एचडी पदवी आहे !!!
येथे ५०० भंग्यांना हा शब्द जातीवाचक आहे अशी शंका आहे. लेखकाचा हेतू वाईट नसेल पण अनवधानाने का होईना हे घडले आहे. कॄपया संपादक मंडळाने संपादन करावे. अथवा माझा गैरसमज एक्स्प्लनेशन देउन दूर करावा.

चित्रा's picture

24 Oct 2010 - 6:45 pm | चित्रा

मिभोंचे लिखाण बघता हा शब्द जातीवाचक म्हणून वापरला असे नसावे. पण मुद्दाम वापरला असावा.
हल्ली वेगळ्या जाती असतात-त्या बरेच जण पाळतात उदा. आय आय टीतले इंजिनीअर, साध्या कॉलेजांमधील इंजिनीअर. इ. इ. असो.
अलिकडेच 'विदा' नको, 'डेटा' हवा, म्हणून जे झाले त्यामुळे ही भाषाशुद्धी इथे नको तेथे (का स्वतःच्या पॅव्हिलिअनमध्ये?) राबवली असावी.
http://mr.upakram.org/node/2903#comment-48340

हा प्रतिसाद पूर्ण अवांतर ठरू नये यासाठी --
वर उत्तरे आली आहेत. अजून एक उत्तर आईबापांकडे पैसा आहे म्हणून गेले, असेही उत्तर असू शकते.

आमच्या इथे एक बेकरी (पावाची भट्टी?!) चालवणारी बाई आहे - ती हार्वर्डमधून इकॉनॉमिक्स आणि मॅथमॅटिक्स केल्यानंतर आता बेकरी चालवते. http://www.boston.com/lifestyle/food/articles/2010/10/20/joanne_chang_sp...

मिसळभोक्ता's picture

25 Oct 2010 - 9:07 pm | मिसळभोक्ता

"मेहतर" हा शब्द शिवकालीन (उदा. मदारी मेहतर) असल्याने चालला असता का ?

चित्रा's picture

27 Oct 2010 - 7:24 am | चित्रा

चालला असता, कारण कोणाला कळला नसता ;)

तुमचे म्हणजे आ बैल मुझे मार असे झाले. असो. (कोणालाही बैल म्हटलेले नाही, ह्याची कृपया नोंद घ्यावी. कसली वेळ आली आहे, प्रत्येक गोष्ट सांगावी लागते).

पिवळा डांबिस's picture

27 Oct 2010 - 9:56 am | पिवळा डांबिस

इथे मिभोकाकांनी आपल्या सर्वांच्या लाडक्या भाईकाकांचे उदाहरण अनुसरण्यास हरकत नसावी....
भाईकाकांनी आपल्या चितळे मास्तर या व्यक्तिचित्रात प्रथम लेख लिहितांना भंगी हा उल्लेख केला आहे (१९६०च्या दशकात)
पण चितळे मास्तर ही कॅसेट काढतांना मात्र झाडूवाले असा उल्लेख केलेला आहे (१९८०च्या दशकात)
:)
बरे सत्य बोला, यथातथ्य चाला!!!!
:)

नितिन थत्ते's picture

27 Oct 2010 - 12:44 pm | नितिन थत्ते

उल्लेख जातीवाचक आहे की नाही याचे काही लॉजिक असावे.

जेव्हा व्यवसायाचे नाव म्हणून 'भंगी', 'लोहार', 'चांभार', 'गवळी', हे शब्द येतात तेव्हा ते जातीवाचक नसतात.

"तू आत्ता आलास तेव्हा कोपर्‍यावरचा चांभार होता काय रे?" या प्रश्नात चांभार हा शब्द व्यवसायदर्शकच आहे. कोपर्‍यावरचा 'चपला शिवणारा' जातीने चांभार आहे की नाही हे माहितीही नाही.

पण एखादा भंगी जातीचा इंजिनिअर मनुष्य माझा बॉस असताना मी जर "मी भंग्याच्या हाताखाली काम करतो" असे म्हटले तर तो जातीवाचक (पक्षी: डिरॉगेटरी) उल्लेख आहे.

पुलंच्या त्या वाक्यात "भंगी पण जाऊन येतात" हा उल्लेख जातीवाचक आहे असे मला वाटते. म्हणूनच त्यांनी तो बदलला असावा.

अवांतर : वरच्या लेखातला उल्लेख अमेरिकेसंबंधी असावा त्यामुळे तर तो जातीवाचक असण्याची काहीच शक्यता नाही.

विकास's picture

27 Oct 2010 - 4:55 pm | विकास

जेव्हा व्यवसायाचे नाव म्हणून 'भंगी', 'लोहार', 'चांभार', 'गवळी', हे शब्द येतात तेव्हा ते जातीवाचक नसतात.

हे सर्वशब्द तसेच इतर तत्सम सर्वच शब्द आधी व्यवसायाशी निगडीत आहेत आणि नंतर त्याचे गैरवापर झाले आहेत. पेशांवरून अचूक निरिक्षण करून मराठीत काही चपखल म्हणी देखील पूर्वापार चालत आल्या आहेत. त्याचा देखील विचार केला तरी असेच लक्षात येते की त्यात "जात" म्हणून हिणावणे नसते... असो.

पण एखादा भंगी जातीचा इंजिनिअर मनुष्य माझा बॉस असताना मी जर "मी भंग्याच्या हाताखाली काम करतो" असे म्हटले तर तो जातीवाचक (पक्षी: डिरॉगेटरी) उल्लेख आहे.

नक्कीच डिरॉगेटरी आहे.

पुलंच्या त्या वाक्यात "भंगी पण जाऊन येतात" हा उल्लेख जातीवाचक आहे असे मला वाटते. म्हणूनच त्यांनी तो बदलला असावा.
शक्य आहे. पण जर अधुनिक मराठी साहीत्य शोधले तर त्यात असे अजूनही प्रयोग मिळू शकतील असे वाटते. पुलंना कोणी तरी नंतर "पॉलीटीकली करेक्ट" होण्यास सांगितले असावे.

तात्पर्यः मिभोंनी जातीवाचक उल्लेख केला असे अजिबातच वाटले नाही.

वरच्या उदाहरणात जर मिभोंनी ५०० भंग्यांना पिएचडी पदवी आहे असे म्हणायच्या ऐवजी ५०० बस कंडक्टर्सना/पोस्टातील कारकुनाला/थिएटरमधील तिकीटाच्य खिडकीतल्याला पिएचडी आहे असे म्हणले असते तर चालले असते का? वास्तवीक अशांची तर हल्ली अनेकदा थट्टा होते पण त्यात जात नसल्याने चालून जाते.

थोडक्यात आपण इतरांबद्दल नक्की सेन्सेटीव्ह आहोत का नुसतेच पॉलीटकली करेक्ट हा विचार करायला हवा.

मूळ दुवा न वाचताच प्रतिसाद देतो आहे म्हणजे म सं स्थळाच्या लौकीकाला जागतच आहे.
शिकताना अ‍ॅसिस्टंटशीप वगैरे मिळते म्हणून त्या मोहाने जास्त काळ शिकत राहायचे आणि पिएच्डी वगैरे झाली की शिक्षणाआधीच्या व्यवसायाकडे वळायचे असे काही असेल का? :) तसे असेल तर अमूक इतके पिझा डिलेवरी बॉय सध्या बॅचलर करत आहेत वगैरे विदा जास्त उत्साहवर्धक असेल.