माझा वाढदिवस (शीघ्र मदत हवी आहे).

इंटरनेटस्नेही's picture
इंटरनेटस्नेही in काथ्याकूट
22 Oct 2010 - 8:14 pm
गाभा: 

दिनांक २६ ऑक्टोबर २०१० रोजी माझा बावीसावा वाढदिवस आहे. मात्र त्या दिवशी अंगारकी असल्याने बहुतेक मित्र मैत्रीणींचा उपवास असण्याची शक्यता विचारात घेऊन तो मी २४ ऑक्टोबर २०१० रोजी साजरा करण्याचे ठरविले आहे.

आम्ही एकुण ६ मुले/मुली सर्वचजण सुमारे १८ ते २४ वयोगटातील आहोत. [एक लहान मुलगा आहे, पण त्याला पिटाळता येईल लवकर ;)] केक आणि बिर्याणी असा बेत केला आहे.

या दिवशी खेळण्यासाठी काही धम्माल पार्टी गेम्स (आमच्या वयाला अनुसरुन) ची माहिती देण्याची नम्र विनंती मी याद्वारे मिपाकरांना करतो. तसेच पार्टी मुड तयार करण्यासाठी काही लेटेस्ट गाण्यांची देखील नावे सुचवावीत ही नम्र विनंती, (आम्ही जनरली जुनी गाणे ऐकत असल्याने आमचे या बाबतीतील नॉलेज हे फारच तोकडे आहे.)

आपल्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत,
इंट्या.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

22 Oct 2010 - 8:21 pm | चिरोटा

लहान मुलगा केक,बिर्याणी खाउ शकत नाही का?
गावांत्,टेकड्यांवर,रेसॉर्टवर जाऊ नका म्हणजे झाले.जे काही करायचे ते घरीच करा!!

मूकाभिनयावरून सिनेमाचे नाव ओळखणे याव्यतिरिक्त कोणताच खेळ आठवत नाही.
पण आपला दिवस मस्त जावो.

पर्नल नेने मराठे's picture

22 Oct 2010 - 8:37 pm | पर्नल नेने मराठे

मेनु छान आहे.
दारवा वैगरे पिउ नका हं. मजा करा. गाणी म्हणा. धमाल नाचा.
आम्ही मिपाकर येउन बड्दे बम्प्स देउच ;).

असुर's picture

22 Oct 2010 - 8:41 pm | असुर

हा धागा पहा!

तसेच याच धाग्यावरील हा प्रतिसाद देखील वाचा! आपणास नक्की उपयोग होईल.

आपण चक्क यावेळी पराषेट यांची मदत मागितली नसल्याचे निदर्शनास आले आहे. तेही करुन पहा! एकदा त्यानी मदत केली की बाकीच्यांच्या मदतीची गरजच पडणार नाही! त्यानी अशीच भरघोस मदत एकदा स्पा याना आत्महत्येच्या धाग्यावरही केली होती!

--असुर

सूड's picture

22 Oct 2010 - 8:44 pm | सूड

+१
तसेच याच धाग्यावरील हा प्रतिसाद देखील वाचा! आपणास नक्की उपयोग होईल.

पार्टी गेम्स लग्न झाल्यावर मुलांच्या पार्ट्यात त्यांचे आई-बाबा खेळतात अशी माझी ऐकीव माहिती आहे.
असो.
तुम्ही ज्या वयात आहात त्या वयात धम्माल करायला कोणत्याही गेम्स वगैरेंच्या कुबड्यांची गरज भासु नये असे वाटते.

ऋ शी सहमत...

काय करायचंय ते कर रे इंट्या..विचार नाय करायचा जास्त..

धमाल मुलगा's picture

22 Oct 2010 - 9:04 pm | धमाल मुलगा

प्रभूमास्तरांना संपर्क करा....
सर्व प्रश्नांबाबत योग्य ते दिशादर्शन होइल.

शुचि's picture

22 Oct 2010 - 9:12 pm | शुचि

>> काय करायचंय ते कर रे इंट्या..विचार नाय करायचा जास्त..>>
पण बी सेफ रे बाबा दॅन सॉरी

>>> पण बी सेफ रे बाबा दॅन सॉरी <<<
इंट्या, मित्रा, बी ह्याप्पी दॅन सेफ रे!!
शुचीतैला काळजी वाटणं सहाजीक आहे, पण तू खेळ बिंधास! दिवस आहेत तुझे खेळायचे, पडायचे आणि अजून कायकायचे!

--असुर

जेवढे मित्र आहेत तेवढ्या चिठ्ठ्या बनवा. प्रत्येक चिठ्ठीवर एखादी भन्नाट कृती लिहा...जसे की नाच , गाणे, अभिनय, उड्या मारणे, काहितरी विचित्र आवाज काढणे ..एक दोन कृति साध्या सरळ बाकी काहितरि भन्नाट असायला हवे. मग प्रत्येकाने एकेक चिठ्ठि उचलून आपल्या वाट्याला आलेली कृती करून दाखवायची. मुले कमी असतील तर दुप्पट चिठ्ठ्या करा आणी प्रत्येकाने दोनदा टर्न घ्या.
ह्या खेळाचे नाव लक्षात नाहिये. पण खुप मोठी गँग असेल तर धमाल येते.
DUMB CHARADES - मूकाभिनय हा खेळ वर शुचिताईंनी सांगितला आहेच.

दुसरा एक छान खेळ - टेबलवर असंख्य वस्तू मांडून ठेवायच्या. त्यावर चादर घालून ठेवायची. खेळाला सुरवात करताना मिनिट भर (किंवा अर्धा मिनिट मोजून ) चादर काढायची. सर्वांना सर्व वस्तू पहायला सांगायच्या आणी परत त्या वस्तू झाकायच्या. मग सर्वांनी आपापल्या कागदावर त्या टेबल वर काय काय होते ते आठवून कागदावर लिहायचे. ज्याची मेमरी चांगली तो सर्वात जास्त वस्तूंची नावे लिहू शकतो. वस्तू पण एकेक भन्नाट ठेवायच्या, टाचणी, पिन , खिळा , अशा बारिक वस्तूंपासून पुस्तक मोबाईल अशा मोठ्या वस्तू ठेवणे.
जिंकणार्‍याला काहितरी भन्नाट बक्षिस द्यायचे.

पैसा's picture

22 Oct 2010 - 9:24 pm | पैसा

आम्हाला कुठे बलवलंस? आमी नै सांगत ज्जा!

आमोद शिंदे's picture

22 Oct 2010 - 9:28 pm | आमोद शिंदे

१८-२२ वयोगटातील मुले अंगारकी वगैरे उपास करतात हे पाहून व्यथित झालो. वाढदिवसानिमित्त ह्या सगळ्यांना 'तुझं आहे तुझपाशी'चा प्रयोग दाखवावा.

मिसळभोक्ता's picture

22 Oct 2010 - 10:39 pm | मिसळभोक्ता

शिंद्यांशी सहमत आहे.

नगरीनिरंजन's picture

22 Oct 2010 - 10:49 pm | नगरीनिरंजन

+२

च्यायला हे मी वाचलंच नव्हतं. ट्रूथ ऑर डेअर नका खेळू रे. अध्यात्मिक होईल फार.

नगरीनिरंजन's picture

22 Oct 2010 - 9:45 pm | नगरीनिरंजन

ट्रूथ ऑर डेअर खेळा.

धमाल मुलगा's picture

22 Oct 2010 - 9:53 pm | धमाल मुलगा

अगागागा....
का पोरासोरांच्या जीवावर उठलायस रे?
ह्यापायात जय अन विरूचीसुध्दा हाणामारी होते ;)

नगरीनिरंजन's picture

22 Oct 2010 - 10:02 pm | नगरीनिरंजन

नै रे. आजकाल पोरांचा E.Q. चांगला असतो. :-)

धमाल मुलगा's picture

22 Oct 2010 - 10:04 pm | धमाल मुलगा

मग ठीक.

बाकी, उत्साहाच्या भरात उगं स्ट्रि.पो. खेळायला जाऊ नका रे पोरांनो.

रेवती's picture

22 Oct 2010 - 9:52 pm | रेवती

अच्छा! असे आहे तर!
नव्या गाण्यांबद्दल फारशी माहिती नाही.
जुनी गाणी तुम्हाला माहित आहेतच, त्यावर सांगण्यात अर्थ नाही.
गेम्स बघा आवडतात का?
१. श्लोकांच्या स्पर्धा घ्या.
२. प्लास्टीकचे फोर्क्स घ्यावेत, कॉटनबॉल्स, मोठाले कुंडे, भांडी जे काही असेल ते, स्टॉपवॉच किंवा वेळ पाहून ओरडणारा मनुष्य!;) तीन भांड्यामध्ये कॉटनबॉल्स भरपूर घालावेत. दोन मिनिटांची वेळ लावून फोर्कने एकेक कॉटन्बॉल उचलायचा आणि न पाडता अंतरावर ठेवलेल्या दुसर्‍या रिकाम्या भांड्यात टाकायचा. ज्याचे सगळ्यात जास्त तो जिंकला.
३. ब्राउन पेपरबॅग्ज, विविधरंगी स्केच्पेन्स.
सर्वांनी आपल्या डाव्या हाताची मूठ वळून त्यावर पेपर बॅग चढवावी, सर्वांनी पेन्स घेउन दोन मिनिटाची वेळ लावून उजव्याहाताने आधार न घेता दुसर्‍याच्या पेपरबॅगवर आपली सही करायची. सही कशी असणारे ते आधीच ठरवून घ्या नाहितर नंतर पार्टीसिपंट्स नंतर स्वत:च्या नावाची आद्याक्षरे लिहून फसवतात. दोन मिनिटात सगळ्यांच्या सह्या घ्यायच्या.

काल कोणत्या १० वर्षाच्या पोराच्या बड्डे ला जाऊन आलीस की काय?? ;)

नाय रे!
आमच्याकडे सहा वर्षाचे झाल्यावर चिरंजिवांनाच कंटाळा आला होता.
तेंव्हापासून जिवाला शांतता आहे.
नाहितर दर शनिवार रैवार पिझ्झा आणि केक पाहूनच कंटाळा यायचा.
एके वर्षी इतके वाढदिवस झाले कि सहज म्हणून हिशोब घातला तर $१२०० हे फक्त प्रेझेंटं देण्यातच खर्च झाले होते.
येत्या विकांताला दोन वाढदिवस आहेत पण बरेच जुन्या टाऊनचे मित्रमंडळ एकमेकांना भेटायला मिळेल म्हणून येताय्त.
आणि पहिल्या वर्षाचा बाळाचा वाढदिवस असल्यास निदान मी तरी जाते. आईवडिलांना खूप उत्साह असतो. माझा मुलगा वर्षाचा झाल्यावर मलाही होता. त्यावेळेस कुणी न येणं हे वाईट दिसतं.
बाकी गेम्स वगैरे फारश्या माहित नसतात, पण या खरच चांगल्या आहेत.

प्रीत-मोहर's picture

22 Oct 2010 - 9:57 pm | प्रीत-मोहर

आम्चा प्न बड्डे .....आम्ही हापिसात खेळणार..............

आणखी एक गोष्ट सांगायची राहून गेली.
वाढदिवस हा वाढता करतात. जन्मतारखेनंतर केला तर चालेल पण आधी नको असे म्हणतात.
आता या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणायचे असेल तरी चालेल.
मी सांगायच काम केलं, बाकी तुम्ही ठरवाल ते योग्य!:)

कुसुमिता१२३'s picture

22 Oct 2010 - 10:07 pm | कुसुमिता१२३

पासींग पार्सल खेळत येईल..(हम आपके है कौन मधला उशीचा गेम)

सुहास..'s picture

22 Oct 2010 - 10:09 pm | सुहास..

ईंट्या !! ऐरवी माझ्याशी संपर्कात असतोस म्हणुन हा प्रतिसाद !!

हॅप्पी बर्थ-डे ईन अ‍ॅडव्हान्स !!!

कृपया त्या दिवशी आंतरजालापासुन दुर रहाणे ही माझी ध म की !!

इंटरनेटस्नेही's picture

22 Oct 2010 - 10:31 pm | इंटरनेटस्नेही

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.. पण आंतरजालापासुन दूर राहण्याच्या धमकीला आम्ही दुर्लक्षित पँथरचे धडाडीचे कार्यकर्ते फाट्यावर मारतो!

(सदस्य, श्री परिकथेतील राजकुमार संस्थापित मिपा दुर्लक्षित पँथर)

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.. पण आंतरजालापासुन दूर राहण्याच्या धमकीला आम्ही दुर्लक्षित पँथरचे धडाडीचे कार्यकर्ते फाट्यावर मारतो!

(सदस्य, श्री परिकथेतील राजकुमार संस्थापित मिपा दुर्लक्षित पँथर) >>>>>>>>>>>

पहिले त्या पर्‍याला सांग की रविवारी मोबाईल पासुन दुर रहा म्हणुन !!

उपेन्द्र's picture

22 Oct 2010 - 10:31 pm | उपेन्द्र

भरपूर कोर्‍या चिट्ठ्या घ्या. त्यातील अर्ध्यावर "जर.." ने सुरू होणारी तर अर्ध्यावर "तर.." ने सुरू होणारी वाक्ये लिहा. (एकमेकाला न दाखवता) कोणत्या 'लेव्हल' ची लिहायची ते तुम्हीच ठरवा..
मग randomly एक ' जर ' ची आणि एक ' तर ' ची चिट्ठि सलग वाचा.. जे काही सार्थक निरर्थक वाक्य तयार होते त्याने भरपूर करमणूक होते...

उदा. जर मिपावर हा प्रश्न विचारला नसता ...
तर .. इश्श्य, मी नाही सांगत जा...!!

गंमतीशीर खेळ वाटतो आहे हा. :)

असाच आणखी एक खेळ आहे. जितके लोक तितकी मोठी पाने घ्या (fullscape).
प्रत्येकाने आपल्या मनात येईल ते एक वाक्य लिहा (विचार , गाण्याची ओळ इ. इ.). मग ते वाक्य झाकले जाईल अशी घडी घाला. मग प्रत्येकाने आपला कागद शेजार्‍याला द्या. आता नवीन वाक्य लिहा. पुन्हा घडी घालून कागद सरकवा. अशी ८- १० वाक्ये झाली, की सगळे कागद गोळा करा आणि घड्या उलगडून वाचा. खूप मजा येते.
उदा.
आज खूप उकडत आहे.
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
शी हा काय टाइमपास आहे

शिल्पा ब's picture

22 Oct 2010 - 11:06 pm | शिल्पा ब

अगदी खरडून विचारलेस म्हणून सांगते...स्पिन द बॉटल खेळा

बाकी तुम्ही लोक या वयात उपास करता हे वाचून गलबलून आले...म्हातारपणी काय करणार?

उपेन्द्र's picture

22 Oct 2010 - 11:21 pm | उपेन्द्र

अंगारकी चा उपवास आहे म्हणून वाढदिवस "प्रीपोन"...!!
देवा तू असशीलच कुठे तर या मुलांना माफ कर..
ते काय करतायत आणि त्यानी काय करायला पाहिजे..या वयात...छेछे..!!

नावातकायआहे's picture

22 Oct 2010 - 11:14 pm | नावातकायआहे

हे सोडुन काय पन खेळा..

अश्विनीका's picture

23 Oct 2010 - 4:16 am | अश्विनीका

वर रेवतीताईंनी म्हटल्याप्रमाणे वाढदिवस वाढदिवसाच्या आधी साजरा करत नाहीत. ज्या दिवशी वाढदिवस आहे त्यादिवसापासून नंतर २-३ आठवड्यात किंवा महिनाभरात केव्हाही साजरा केला तरी चालेल .

पिवळा डांबिस's picture

23 Oct 2010 - 9:37 am | पिवळा डांबिस

प्लीज लेट मी अंडरस्टॅन्ड!!!
६ मुलं /मुली....
१८ ते २४ वयोगटातली...
आंणि तुम्हाला पार्टी गेम्सबद्दल आयड्याज हव्यात....
तुम्ही खरंच १८ ते २४ वयोगटात आहांत ना?
मग तुमच्यात काही तारुण्यसुलभ भावना वगैरे काही नसतात का?
:)
बाकी कॉटनबॉल्सचे अनेक यापेक्षा वेगळे उपयोग तुम्हालासुचवू शकतो...
व्यनि करा......
:)

Dhananjay Borgaonkar's picture

23 Oct 2010 - 9:41 am | Dhananjay Borgaonkar

+१

मी-सौरभ's picture

24 Oct 2010 - 7:31 pm | मी-सौरभ

:)
नावात सगळ काही आहे तुमच्या...

Dhananjay Borgaonkar's picture

23 Oct 2010 - 10:03 am | Dhananjay Borgaonkar

तु जाहीरात क्षेत्रात नाव कमवशील हो..

sneharani's picture

23 Oct 2010 - 10:15 am | sneharani

वाढदिवसाच्या शुभेच्छा इन अडव्हान्स.
खुप मजा करा. गप्पा मारा.
वर बर्‍याचजणांनी बरेच गेम सांगितलेले आहेत, त्यातील आवडेल तो खेळा.
:)

विसोबा खेचर's picture

23 Oct 2010 - 10:31 am | विसोबा खेचर

शुभेच्छा..! :)

परिकथेतील राजकुमार's picture

23 Oct 2010 - 11:59 am | परिकथेतील राजकुमार

दिनांक २६ ऑक्टोबर २०१० रोजी माझा बावीसावा वाढदिवस आहे. मात्र त्या दिवशी अंगारकी असल्याने बहुतेक मित्र मैत्रीणींचा उपवास असण्याची शक्यता विचारात घेऊन तो मी २४ ऑक्टोबर २०१० रोजी साजरा करण्याचे ठरविले आहे.

उत्तम. ह्या दिवशी इतरांना काही इतर अडचणी देखील नाहितना ह्याची सुद्धा खात्री करुन घ्यावी. उगाच आनंदावर पाणी पडायला नको.

आम्ही एकुण ६ मुले/मुली सर्वचजण सुमारे १८ ते २४ वयोगटातील आहोत. [एक लहान मुलगा आहे, पण त्याला पिटाळता येईल लवकर ;)] केक आणि बिर्याणी असा बेत केला आहे.

लहान मुलाला पिटाळण्यापेक्षा त्याला दोन केकेचे तुकडे व थोडी बिर्याणी देउन 'पहारा करणे/ 'अत्यावश्यक वस्तु आणण्यास पिटाळणे' ह्यासाठी मदतीस घेता येईल.

या दिवशी खेळण्यासाठी काही धम्माल पार्टी गेम्स (आमच्या वयाला अनुसरुन) ची माहिती देण्याची नम्र विनंती मी याद्वारे मिपाकरांना करतो.

६ व्यक्तींपैकी मुले किती व मुली किती ह्याच्या उल्लेख नसल्याने सल्ला देणे अवघड बनले आहे. मात्र शक्य झाल्यास दोघा दोघांच्या जोड्या बनवुन खेळ खेळावेत. खेळात धमाल आणण्यासाठी मुली -मुली आणि मुले-मुले अशा जोड्या देखील करुन पहाव्यात.

तसेच पार्टी मुड तयार करण्यासाठी काही लेटेस्ट गाण्यांची देखील नावे सुचवावीत ही नम्र विनंती, (आम्ही जनरली जुनी गाणे ऐकत असल्याने आमचे या बाबतीतील नॉलेज हे फारच तोकडे आहे.)

१) मुन्नी बदनाम हुई
२) पिंजरे मे पोपट बोले
३) शेजारिण बाई तुमचा टिव्ही..
४) मी बाबुराव बोलतोय..

आपल्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत,
इंट्या

प्रतिसाद दिला आहे,
संट्या

गांधीवादी's picture

23 Oct 2010 - 8:13 pm | गांधीवादी

ह्या लेखाची आठवण झाली.
जन्मभराचं ऋण !

शिल्पा ब's picture

23 Oct 2010 - 10:07 pm | शिल्पा ब

कशाने?

पैसा's picture

23 Oct 2010 - 11:46 pm | पैसा

पत्ता चुकला असावा.

इंटरनेटस्नेही's picture

24 Oct 2010 - 1:02 am | इंटरनेटस्नेही

भेन्डि बाजार दि. शुक्र, 22/10/2010 - 20:21.
शुचि दि. शुक्र, 22/10/2010 - 20:33.
पर्नल नेने मराठे दि. शुक्र, 22/10/2010 - 20:37.
असुर दि. शुक्र, 22/10/2010 - 20:41.
सुधांशु देवरुखकर दि. शुक्र, 22/10/2010 - 20:44.
ऋषिकेश दि. शुक्र, 22/10/2010 - 20:46.
प्रभो दि. शुक्र, 22/10/2010 - 21:05.
धमाल मुलगा दि. शुक्र, 22/10/2010 - 21:04.
पक्या दि. शुक्र, 22/10/2010 - 21:19.
आमोद शिंदे दि. शुक्र, 22/10/2010 - 21:28.
मिसळभोक्ता दि. शुक्र, 22/10/2010 - 22:39.
नगरीनिरंजन दि. शुक्र, 22/10/2010 - 22:49.
रेवती दि. शुक्र, 22/10/2010 - 21:52.
प्रभो दि. शुक्र, 22/10/2010 - 21:56.
कुसुमिता१२३ दि. शुक्र, 22/10/2010 - 22:07.
सुहास.. दि. शुक्र, 22/10/2010 - 22:09.
उपेन्द्र दि. शुक्र, 22/10/2010 - 22:31.
रुपी दि. शनी, 23/10/2010 - 08:28.
शिल्पा ब दि. शुक्र, 22/10/2010 - 23:06.
नावातकायआहे दि. शुक्र, 22/10/2010 - 23:14.
अश्विनीका दि. शनी, 23/10/2010 - 04:16.
पिवळा डांबिस दि. शनी, 23/10/2010 - 09:37.
Dhananjay Borgaonkar दि. शनी, 23/10/2010 - 09:41.
sneharani दि. शनी, 23/10/2010 - 10:15.
परिकथेतील राजकुमार दि. शनी, 23/10/2010 - 11:59.
गांधीवादी दि. शनी, 23/10/2010 - 20:13.
प्रीत-मोहर दि. शुक्र, 22/10/2010 - 21:57.
पैसा दि. शनी, 23/10/2010 - 23:46.

वरील सर्व माननीय सदस्यांनी वेळात वेळ काढुन प्रतिसाद दिल्या बद्दल , मी आपले मनापसुन आभार मानतो. __/\__

माझा वाढदिवस आनंदात साजरा होण्यासाठी आपण दिलेल्या सुचना फार मोलाच्या आहेत.

एक खुलासा: त्या लहान मुलाला पिटाळुन लावणार होतो / आहोत ते गेम्सच्या वेळेस आणि ते देखील ते गेम्स त्याला त्याच्या वयाला अनुसरून सुगोग्य न ठरल्यास, खाण्याच्या वेळेस नाही! इतके निर्दयी आम्ही नक्कीच नाही. ;)

असो. आपण सर्च जणांनी इतक्या आपलेपणाने प्रतिसाद दिल्यामुळे आनंद वाटला. असेच प्रेम असावे.

पुन्हा एकदा शुभेच्छा / सुचना / टोपी उडवणारे पण खळखळुन हसवणारे प्रतिसाद दिल्याबद्द्ल आभार व्यक्त करतो.

धन्यवाद. :)

मी-सौरभ's picture

24 Oct 2010 - 7:34 pm | मी-सौरभ

:)
खेळ चालू देत......
पण जरा दमान नाय तर मस्करी ची कुस्करी होईल..

विजुभाऊ's picture

25 Oct 2010 - 12:34 am | विजुभाऊ

धम्माल पार्टी गेम्स
कब्बड्डी
खोखो
संगीत खुर्ची
फुगड्या
डॉक्टर डॉक्टर

मग !! काय-काय गेम्स खेळलात रे आज ??