साहित्य-
२ कांदे मध्यम आकराचे
१ टोमॅटो
२ चमचे आलं-लसुण पेस्ट
कढिपत्ता
जीरं
मोहोरि
तेल
हगद
धणेपूड
लाल तिखट
शेंगदाण्याचा कूट
कोथिंबीर
पाणी
क्रुती-
कढईत तेल गरम करत ठेवावे त्यात जीरं ,मोहोरि घालावी
मोहोरी तडतड्ली कि मग त्यात कढिपत्ता घालावा.त्यानंतर कांदा लालसर परतुन घ्यावा तसेच आलं-लसुण पेस्ट घालवी
त्यातच टोमॅटो घालुन परतावे नंतर त्यात धणेपूड ,हळद व लाल तिखट घालावे व परतुन घ्यावे.आता त्यातच शेंगदण्याचा जाड्सर कूट घालुन खमंग परतुन घ्यावे व त्यात गरम पाणी घालावे ,चविनुसार मीठ घालावे व चान्गली १-२ उकळी येउ द्यावी ,शेवटी कोथिंबीरिने सजवावे.
प्रतिक्रिया
21 Oct 2010 - 11:10 pm | तर्री
खल्लास फोटो .
सजावट तर अशी केली आहे कि बस्स.त्या कांद्यांची "ही " ( योग्य शब्द सुचत नाही ) पाहून "ऑलिंपिक" चटणी म्हणावेसे वाटते आहे.
21 Oct 2010 - 11:27 pm | मेघवेडा
चकती?
बाकी तंतोतंत असेच म्हणतो!
21 Oct 2010 - 11:30 pm | मराठमोळा
एक नंबर..
माझी आजी हा प्रकार बनवते. मला फार आवडते ही चटणी.
फोटु जबरा.. :)
21 Oct 2010 - 11:36 pm | कच्ची कैरी
मराठ्मोळा तु खान्देशी आहेस हे तुझ्या प्रतिक्रियेवरुन ओळखले आहे त्यामुळे हि चट्णी तुझ्या ओळखिचीच असनार आहे
21 Oct 2010 - 11:33 pm | पुष्करिणी
एकदम टेस्टी , सजावटही सुंदर. लगेच खाविशी वाटतेय
22 Oct 2010 - 12:05 am | पैसा
असेच म्हणते.
24 Oct 2010 - 5:37 am | स्वाती२
+२
सहमत!
22 Oct 2010 - 12:00 am | शिल्पा ब
मस्तच...या विकांतला करुन बघेन.
22 Oct 2010 - 12:28 am | अनामिक
वा वा, छान छान!
अवांतर : कैरी कच्चीच असते, नाही का? मग नाव असं का म्हणे? हे म्हणजे पाण्याची वॉटरबॅग्/बॉटल असं वाटलं.
22 Oct 2010 - 10:36 am | कच्ची कैरी
कैरी पिकलेली सुद्धा असते ,पिकलेल्या कैरीला शाक असे म्हणतात्.ती आंबट -गोड असते तर कच्ची कैरी फक्त आंबट असते
.
22 Oct 2010 - 12:30 am | मितान
मी ही करून बघेन :) चविष्ट दिसतेय..
22 Oct 2010 - 12:39 am | कुंदन
कांदे आख्खेच टाकायचे की काय?
22 Oct 2010 - 10:44 am | कच्ची कैरी
फोटोवरुनच अंदाज लावा कांदे अख्खे घालायचे की बारिक चिरुन
22 Oct 2010 - 7:36 am | नगरीनिरंजन
पदार्थांचं प्रमाण काय आहे? आमच्याकडे कमी कूट आणि जास्त टोमॅटो घालून टोमॅटोची चटणी करतात म्हणून विचारलं.
दाण्याचा कूट किती घ्यायचा एक टोमॅटो आणि दोन कांद्यांसाठी?
22 Oct 2010 - 10:41 am | कच्ची कैरी
दाण्याचा कूटाचे प्रमाण्-दीड वाटी (म ध्यम आकाराची )
22 Oct 2010 - 12:14 pm | विसोबा खेचर
शब्द नाहीत..!
तात्या.
22 Oct 2010 - 1:20 pm | गणपा
चटणी लाजवाब :)
22 Oct 2010 - 1:26 pm | विंजिनेर
काय रंग आला आहे, एकदम खल्लास.
22 Oct 2010 - 1:39 pm | परिकथेतील राजकुमार
अर्रे वा ! नविन पाकृ कळली आज.
धन्यवाद.
22 Oct 2010 - 5:57 pm | अवलिया
जबरा !! !
22 Oct 2010 - 7:17 pm | प्रभो
ही चटणी मला ब्रेडटोस्ट सोबत खायला आवडते..मस्त लागते....
बाकी शेंगा चटणी म्हटल्यावर आमच्यासारख्या सोलापुरकरांच्या डोळ्यासमोर हे फोटू येत नाहीत... ;)
23 Oct 2010 - 7:22 am | निवेदिता-ताई
मस्तच...........आज पहिल्यांदाच वाचते आहे अशी चटणी.
24 Oct 2010 - 7:50 am | pramanik
Good!
4 Apr 2011 - 4:39 pm | आचारी
एकदम भारी !! बघुनच जिभ वळ्वळ्ली
6 Apr 2011 - 5:40 pm | मितभाषी
आज पहिल्यांदाच वाचते आहे अशी चटणी.>>>>>
ही चटणी नाही. याला "झिर्क" म्हणतात.
शेंगदाण्याची चटणी कोरडी असते.
चुभुदेघे.