चेहऱ्यांचे राजकारण..................

गांधीवादी's picture
गांधीवादी in काथ्याकूट
20 Oct 2010 - 8:56 am
गाभा: 

चेहरा म्हणजे काय ?
दोन डोळे, दोन कान, एक नाक, ओठ, गाल, कपाळ,
थोडी त्वचा, त्याच्या मागे रक्त-मांसाचा चिखल. सगळ्यांचा चिखल सारखाच, त्वचा जवळजवळ सारखीच, सर्व अवयव एक ठराविक प्रमाणात, तरीसुद्धा विधात्याने प्रत्येकाचा चेहरा वेगळा केला आहे. शाहरुख खान संपूर्ण देशाला भुलवतो, तिथेच क्रूर कसाबचा चेहरा समोर आले कि मनात संताप येतो. सर्व चित्रपट जग ह्या एक चेहऱ्यावरचा आपले पोट भरते. आजकाल नेते सुद्धा चेहरा वापरून अभिनय ह्याच एका गुणाने यशस्वी होऊ पाहतात. कामावर मालकासमोर क्षणोक्षणी हा चेहराच साथ देतो. रडणारे मुलसुद्धा आईचे केवळ तोंड बघूनच शांत होते. संपूर्ण देशाला इंग्रज विरुद्ध बंड करून उठविण्यास प्रवृत्त केले ते सुद्धा एक महान चेहर्यानेच. आज सुद्धा हा देह नतमस्तक होतो ते एका चेहर्यापुढेच. चेहऱ्याची हि महती मी काय वर्णावी ? माझे शब्द, माझे लेखन शुल्लक आहे.

चेहर्याबद्दल मिपाकरांच्या काय भावना आहेत. मिपाकरांना काय वाटते ?

(काही पक्ष मात्र उगाचच ह्या चेहऱ्याच्या नावाने राजकारण करू इच्छितात त्यांच्याबद्दल न बोललेलेच बरे.)

प्रतिक्रिया

हा लेख वाचूनच अनेकांचे चेहरे पाहण्यालायक झाले असतील...

बाकी काही न बोलणे.......

योगी९००'s picture

20 Oct 2010 - 10:57 am | योगी९००

चेहर्याबद्दल मिपाकरांच्या काय भावना आहेत. मिपाकरांना काय वाटते ?

तुमचा फोटू टाका..मगच तुमच्या चेहर्‍याबद्दल आम्हाला काय वाटते ते सांगतो..

तिमा's picture

20 Oct 2010 - 8:50 pm | तिमा

आमचेकडे सर्व प्रकारच्या विरजणांच्या आनन्ददायक श्रीखंडाचे अती आनंददायक पियूष करून

त्या थंडगार पियुषचा एनिमा देण्यात येईल आणि मग त्या चेहेर्‍याचे परीक्षण करण्यात येईल.

अरुण मनोहर's picture

20 Oct 2010 - 11:06 am | अरुण मनोहर

>>>>माझे शब्द, माझे लेखन शुल्लक आहे. <<<<

आता आम्ही कशाला वाचायचे?
त्यापेक्षा फोटूच टाका राव!

नाम गुम जायेगा
चेहेरा ये बदल जायेगा
मेरी आवाज ही पहचान है
गर याद रहे....

गांधीवादी's picture

20 Oct 2010 - 11:16 am | गांधीवादी

>>नाम गुम जायेगा,
चेहेरा ये बदल जायेगा,
मेरी आवाज ही पहचान है,
गर याद रहे....

ह्या गोष्टी फक्त सभेत/पडद्यावर बोलायच्या असतात.
एक नम्र शंका, passport काढलाय का ?

(खरंच हलके घ्या हो)

प्रशु's picture

20 Oct 2010 - 11:34 am | प्रशु

संपूर्ण देशाला इंग्रज विरुद्ध बंड करून उठविण्यास प्रवृत्त केले ते सुद्धा एक महान चेहर्यानेच

एका नाही हो ते काम अनेकांनी केले. ह्या तुमच्या एका चे नाव कळेल का?

नितिन थत्ते's picture

20 Oct 2010 - 11:55 am | नितिन थत्ते

सहमत आहे.

एकाने नाही अनेकांनी.

गांधीवादी's picture

20 Oct 2010 - 12:12 pm | गांधीवादी

माफ करा,
पण माझ्या भावना 'समजून घेण्यात' / 'मी समजून देण्यात' काहीतरी गल्लत होते आहे.

>>एकाने नाही अनेकांनी.
तंतोतंत मान्य.
पण कलात्मक भाषेत हे काम चेहर्यांनीच केले. त्या जरी अनेक व्यक्ती असल्या तरी त्या सर्व व्यक्ती मिळून एक चेहराच होता.
व्यक्ती अनेक होत्या, पण त्यांचा सर्वांचा चेहरा एक होता.
(इथे चेहरा म्हणजे खांद्याच्या वरचा एक शरीराचा भाग असे न समजत एक विचारसरणी असे समजावे हवेतर)

अवांतर : पहिल्यांदाच एवढे कलात्मक लिहित आहे, मार्गदर्शन करावे. (चू.भू. दे. घे.)

नितिन थत्ते's picture

20 Oct 2010 - 1:36 pm | नितिन थत्ते

नाही.... विचारसरणीही अनेक होत्या. त्यांच्या एकूण योगदानाचे आणि परिणामकारकतेचे प्रमाण मात्र वेगवेगळे होते.

विकास's picture

20 Oct 2010 - 8:57 pm | विकास

असे म्हणायचे आहे का? ;)

kamalakant samant's picture

20 Oct 2010 - 12:05 pm | kamalakant samant

चेहरा पाहून ख्ररच नतमस्तक होतो का?
अवयव जरी सारखे असले तरी बारकावा वेगळा असू शकतो.
भव्य कपाळ ,पाणिदार डोळे.गरुडासार्खे नाक इत्यादि.
त्याशिवाय कारणपरत्वे येणारे भाव वेगळेच.
डोळे मोडणे.डोळे घाळणे,नाक मुरडणे,ओठ विलग करणे,ओठाचा च॑बू करणे,
भुवइ वक्र होणे,चेहरा लाल होणे,रडवेला होणे,आरक्त होणे ,हसणे इत्यादि.
आपण अनेक वेळा खोटा भाव चेहर्यावर आणतो.त्याचे काय?
चेहरा बरच काही सा॑गत असला तरी बरच काही लपवतो पण.
थोडक्यात आपण चेहरा पाहून नतमस्तक होत नसून कर्तुत्व पाहून नतमस्तक होतो.
तसे नसेल तर मधुबाला पासून बीपाशा पर्य॑त नतमस्तक व्हावे लागेल.
याला अपवाद असूही शकेल.

गांधीवादी's picture

20 Oct 2010 - 12:27 pm | गांधीवादी

>>थोडक्यात आपण चेहरा पाहून नतमस्तक होत नसून कर्तुत्व पाहून नतमस्तक होतो.
मी तरी कुठे म्हणालो कि आपण चेहरा 'पाहून' नतमस्तक होतो. कृपया मूळ लेख पुन्हा एकदा पहावा.
आपण 'चेहरा' पाहून नाही तर 'कर्तुत्व' पाहून नतमस्तक होतो हे मान्य,
पण शेवटी नतमस्तक होतो ते चेहर्यापुढेच ना ?
दारोदारी, जागोजागी कशाचे फोटो लटकवलेले असतात ? चेहर्याचेच ना ?

>>चेहरा बरच काही सा॑गत असला तरी बरच काही लपवतो पण.
सहमत. त्यातूनच पुढे चोरया-माऱ्या होतात.
'त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी चेहरा स्पष्ट दिसावा' असे मत करण्यास पुष्टी मिळते का ?

योगी९००'s picture

20 Oct 2010 - 7:17 pm | योगी९००

मधुबालेला पाहून मी खरोखर नतमस्तक होतो..कारण तिच्या कर्तुत्वाचा मला आदर करायचा असतो.

बिपाशाला पाहून सुद्धा मी नतमस्तक होतो..पण कारण वेगळे आहे..

अवलिया's picture

20 Oct 2010 - 1:04 pm | अवलिया

दिल को देखो चेहरा न देखो
चेहरेने लाखोंको लुटा...

गांधीवादी's picture

20 Oct 2010 - 1:07 pm | गांधीवादी

>>दिल को देखो चेहरा न देखो
चेहरेने लाखोंको लुटा...

हे सभेत बोलण्याची वाक्ये झाली, passport / मतदान पत्र आहे ना,
त्यावर काय 'दिल' चा फोटो डकवला आहे का ?

अवलिया's picture

20 Oct 2010 - 1:10 pm | अवलिया

आमच्याकडे पासपोर्ट नाही. धन्यवाद.

गांधीवादी's picture

20 Oct 2010 - 4:32 pm | गांधीवादी

मतदार ओळखपत्र, दहावी पासचे प्रमाणपत्र, गेला बाजार एखाद्या लायब्ररीचे/व्यायामशाळेचे ओळखपत्र, काहीतरी असेल. त्यावर काय 'दिल' चिकटवले आहे का ?

सुहास..'s picture

20 Oct 2010 - 1:10 pm | सुहास..

अस्सल ऊत्कर्षवादी लेखाला,लेखकाची खिल्ली ऊडवणारे प्रतिसाद पाहुन एक मिपाकर म्हणुन पर्‍याला शरम वाटली !!

पैसा's picture

20 Oct 2010 - 8:57 pm | पैसा

हा पर्‍याच्या ७/८ लोकांच्या टोळक्यापैकी एक आहे काय? की सुहासच्या चेहर्‍याआड पर्‍याचा मुखवटा आहे?

पैसा's picture

20 Oct 2010 - 4:38 pm | पैसा

किंबहुना सगळ्या जगात, मुखवटे किती आणि चेहरे किती कसं ओळखावं?

गांधीवादी's picture

20 Oct 2010 - 4:46 pm | गांधीवादी

मुखवटे बाजूला करून चेहरे मोजते येणार नाही. मुखवटे बाजूला करण्याचा कायदा नाहीये,
मुखवटे एकूण ६०० (+/- २५) करोड.

तुम्ही जे पासपोर्ट, ओळखपत्र वगेरे बोलताय ते फक्तं वरवरची ओळख पटण्यापुरतंच. चेहरा काय मुखवटा घालूनही तयार करता येतो, पण त्यामुळे मुखवट्या मागे लपवलेलं तुमचं व्यक्तीमत्व बदलत नाही. तुम्हीच जा बरं शाहरुखचा मुखवटा घालून गौरी किंवा करन जोहरकडे... जवळही घेणार नाहीत. तुम्ही म्हणता बॉलीवूड चेहर्‍यावर पोट भरते... काही अंशी खरं असेलही ते, पण सगळ्यांच्या बाबतीत खरच असं होतं? कितीतरी चेहर्‍याने डावे दिसणारे फक्तं अभिनयाच्या बळावर चित्रपट सृष्टीवर राज करताहेत.

तुम्ही म्हणता इंग्रजाविरुद्ध सर्व देशाला बंड पुकारायला लावणारा एक चेहरा होता? खंरंच असं वाटतं की काय तुम्हाला? तो एक चेहरा नसून एक व्यक्तीमत्व होतं. चेहर्‍यामु़ळे ओळख पटेल, पण चेहरा हा तुमच्या कर्तुत्वाला कारणीभूत ठरत नाही.

शिवाय भारतातही कोणत्याही कागदपत्रावर तुमची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा घेतात. त्याच्या जोडीला चेहरा आताशा लागायला लागला. अमेरिकेतही तुमची "एकमेव" ओळख पटण्यासाठी तुमच्या बोटांचे ठसे आणि डोळ्याच्या स्कॅन घेतात.

असो, "माझे शब्द, माझे लेखन शुल्लक आहे"... असं तुम्हीच म्हणताय ते खरंच आहे असे वाटते. शिवाय तुमचा चेहर्‍यावरचा विचार फारंच उथळ वाटला.

गांधीवादी's picture

21 Oct 2010 - 6:18 am | गांधीवादी

>>तुम्ही जे पासपोर्ट, ओळखपत्र वगेरे बोलताय ते फक्तं वरवरची ओळख पटण्यापुरतंच.
'ओळख पटणे' हे 'व्यक्तीमत्व पटण्याइतकेच' महत्वाचे आहे. जर चेहरा लपवून केवळ व्यक्तिमत्वाच्या आधारे व्यवहार करायचे झाले तर जगातील बहुतांशी व्यवहार/कामे ठप्प होतील.
उदा : मी जेव्हाही मतदान वा एखाद्या बँकेत खाते काढायला गेलो तेव्हा, तिथे माझे व्यक्तीमत्व नाही, चेहर्याचा फोटोच कामी आला.
मी आजतागायत कोणत्याही ओळखपत्रावर केवळ (किमान) फोटोच पहिले आहेत, 'व्यक्तीमत्व' असा उल्लेख कुठे आढळला नाही.
असे कोणते ओळखपत्र असेल, तर जरूर कळवावे. बघण्यास उत्सुक.

'सार्वजनिक ठिकाणी व्यवहार करताना चेहरा आणि व्यक्तिमत्व हे दोन्ही स्पष्ट दिसावे' असे माझे मत आहे.आपले ?

शुचि's picture

20 Oct 2010 - 9:50 pm | शुचि

A man's face is his autobiography. A woman's face is her work of fiction. ~Oscar Wilde

मला दुर्गा खोटे खूप सुंदर वाटतात नेहमी.