ग्राम ते सेवाग्राम

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
16 Oct 2010 - 7:58 am
गाभा: 

नुकतेच कॉंग्रेसने ग्राम ते सेवाग्राम नावाचा कार्यक्रम केला. राजमाता सोनियाने आपल्या उपस्थितीने ह्या कार्यक्रमाला "चार चांद" लगावले.
http://72.78.249.107/esakal/20101015/5539132099363826945.htm

त्याआधी माणिकराव व अन्य कुणीतरी तसेच तेजस्वी रत्न यांच्या प्रांजळ चर्चेत अशी बाब उघडकीस आली की राजमातेच्या सभेकरता आणि अन्य कार्यक्रमाकरता कोट्यावधी रुपये मंत्र्यांकडून वसूल करण्यात आले. ( अर्थात सगळे मंत्री हे सेवेचे व्रत घेऊनच राजकारणात उतरले आहेत. त्यामुळे ते आपल्याच खिशात हात घालून तो सगळा खर्च करतील ह्याची खात्री आहे. सामान्य जनतेवर त्याचा पैशाचाही बोज पडणार नाही ह्याबाबत निर्धास्त असावे.)
स्वतः राजमाता असा कोट्यावधींचा त्याग रोजच करते त्यामुळे तिला त्यात काही विशेष वाटलेले दिसले नाही. चालायचेच.

पण ह्या सभेचे मिरवणूकांचे जे फोटो दिसतात त्यात भारताच्याच झेंड्याचे रंग असलेले असंख्य काँग्रेसचे झेंडे लोक मिरवताना दिसतात. तर अशाने ध्वजसंहितेचा भंग होत नाही का?
कुठल्याशा राजकीय पक्षाने देशाचा झेंडा एक प्रकारे बळकावून देशाची प्रतिष्ठा हायजॅक करायचा हा प्रकार नाही का?
इथे ध्वजसंहितेचे जाणकार मोठ्या संख्येने आहेत. कुणी सांगेल का?
बाकी कुठल्या पक्षाने असे केले तर त्याला ते स्वातंत्र्य आहे का?

प्रतिक्रिया

अशोक चक्र नसल्यामुळे सदरहू झेंडे वेगळे वाटले. आक्षेपार्ह वाटले नाही. शिवाय कार्यक्रम देखील सेवाग्राम आदि लोककल्याणाचा होता.

फक्त एक मनात येतं ते म्हणजे जर डेल्टा फरक चालवून दिला तर तो फरक नियंत्रित कसा करायचा?

जसं अशोक चक्राला २४ आरे आहेत . उद्या काँग्रेस झेंडा घेईल पण अशोक चक्राला २० आरे असलेला आणि म्हणेल की आम्ही हा झेंडा नाचवू आणि कोणी काही बोलू शकणार नाही कारण डेल्टा ची व्याख्या बनवली नसेल.

गांधीवादी's picture

16 Oct 2010 - 8:29 am | गांधीवादी

६० वर्षांपूर्वी,
देशभक्ती म्हणजे, "अंग्रेज चले जो", हि आरोळी ठोकणे आणि त्यांना कसेही करून हाकलून देणे इतपतच मर्यादित होता. तसेच काही क्रांतीकारांनी जुलमी इंग्रजांचे प्राण हरण केले ती सुद्धा देशभक्तीच असे आपण अजून मानतो. ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अल्पावधीतच जग सोडून गेले (गेले कि घालविले ?)

आज,
देशभक्ती आणि देशद्रोह ह्याच्या व्याख्या खूप किचकट बनल्या आहेत.
उदा : CWG ला नावे ठेवणे म्हणजे देशभक्ती कि देशद्रोह ? हे कोणीतरी मला स्पष्ट करून सांगेल काय ?
उद्या जर कोणत्या भ्रष्ट नेत्याची हत्या झाली तर ज्याने केली तो देशभक्त कि देशद्रोही ?

नितिन थत्ते's picture

16 Oct 2010 - 8:26 am | नितिन थत्ते

बाकी चालू द्या.

सर्वांना माहिती असलेली गोष्ट ट्विस्ट करून मांडली आहे.

काँग्रेस देशाचा झेंडा मॉडिफाय करून वापरत नसून देश काँग्रेसचा झेंडा मॉडिफाय करून वापरत आहे.

काँग्रेस तिरंगी झेंडा हा आपला ध्वज स्वातंत्र्यपूर्व काळापासून वापरत आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या झेंड्यासारखाच ध्वज देशाचा झेंडा म्हणून थोडा फरक करून स्वीकारला गेला.

काँग्रेस त्याचा गैरफायदा घेत आहे असे वाटत असेल तर त्यावर उपाय म्हणजे देशाचा झेंडा बदलून घेण्यासाठी चळवळ करणे हा असेल.

अवांतर : भाजपचा जो झेंडा सध्या वापरात आहे तो जनता पक्षाचा (१९७७ मधल्या) ध्वज आहे. (मुळात तो चरणसिंग यांच्या भारतीय लोकदल या पक्षाचा होता) त्यावेळी त्यावर नांगरधारी शेतकर्‍याचे चित्र असे. भाजपने तोच ध्वज शेतकर्‍या ऐवजी कमळाचे चित्र लावून स्वीकारला आहे.

गांधीवादी's picture

16 Oct 2010 - 8:37 am | गांधीवादी

मला जास्त माहित नाही, पण खुद्द राष्ट्रपिता महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळाल्यावर कॉंग्रेस आता बरखास्त करा अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणी प्रमाणे (इच्छे प्रमाणे) कॉंग्रेसच्या नेत्यांनी तो पक्ष सोडून दुसरे नवीन पक्ष (आपापल्या विचारानुसार) स्थापन करायला पाहिजे होते. त्यामुळे कोण कोणाचे काय वापरत आहे ह्याला काय अर्थ आहे ?

(ह्या वरील माझ्या प्रतिसादात काही सुद्ध्लेखनाची चूक झाली असेल तर निदर्शनास आणून देणे.
३-४ वेळा वाचून मी प्रतिसाद लिहिला आहे. कोणत्याही व्यक्तीची निंदा करण्याचा उद्देश नाही.)

विजुभाऊ's picture

18 Oct 2010 - 3:59 pm | विजुभाऊ

कुठल्याशा राजकीय पक्षाने देशाचा झेंडा एक प्रकारे बळकावून देशाची प्रतिष्ठा हायजॅक करायचा हा प्रकार नाही का?

नाय बॉ एकाच पक्षाने कुठे. आमच्या घड्याळवाल्या काकांच्या पक्षाचा झेंडा त्याच रंगाचा आहे.
भाजपने तोच ध्वज शेतकर्‍या ऐवजी कमळाचे चित्र लावून स्वीकारला आहे.

याचा अर्थ शेतकर्‍याला हाकलून देवून कमळावरील लक्ष्मीच्या पूजनाचे व्रत स्वीकारले आहे ;)

तिमा's picture

16 Oct 2010 - 7:16 pm | तिमा

काँग्रेसवाल्यांना 'सेवाग्राम' म्हणताना मनांत 'मेवाग्राम' असेच असते.

भारी समर्थ's picture

18 Oct 2010 - 11:26 pm | भारी समर्थ

ध्वजसंहिता बरीचशी ध्वजारोहणाबद्दलच बोलते, बाकी नाही. मुळात "Also, no object, including flowers or garlands or emblems can be placed on or above the flag" हे वाक्य खूपशा जणांना माहितच नसतं. आम्ही शाळेत असल्यापासून झेंडा फडकला की फुलं खाली पडायची. आणि हे अपवादात्मक नसून सार्वत्रिक चित्र आहे. आताचं काही माहित नाही कारण काही शाळांमधून (सेंट्रल बोर्डाच्या) ध्वजारोहण करणच बंद केलेलं आहे (पण येश्याचा जनमदिन लय जोरात होतो). असो, तर रंग सारखे असले म्हणून झेंड्याचा अपमान होतो असं मला तरी नाही वाटत. खालच्या चित्रातल्या बाई (तिचे काही भक्त इकडेही मिळतील अशी 'उम्मीद' कायम आहे) राष्ट्रध्वजाबद्दल किती आदर बाळगून आहेत हे पहाण्याचे सामर्थ्य तुम्हास मिळो.

http://4.bp.blogspot.com/_iHZXZilBI3o/TLyFOK_VGFI/AAAAAAAAAjw/MlzKQ3gTMN...

http://3.bp.blogspot.com/_iHZXZilBI3o/TLyFCtJ-euI/AAAAAAAAAjo/z4eQ3JQvCb...

स्वातंत्र्य चळवळीलाही काही उद्योगपतींनी, समाजातील सामान्य माणसांनी उघडपणे अथवा छुपेपणाने मदत केलीच आहे. लोकशाहीचा डोलारा हा राजकीय पक्षांवर उभा असतो. नागरिकांनी एक विचारसरणी धरून फक्त मतदानच नाही तर नि:स्पृहपणे अशा पक्षांच्या सभांमधे सहभागी होणं अपेक्षित असतं. आज आपल्यापैकी किती करदाते नियमीतपणे एखाद्या पक्षाच्या कार्यालयात जातात? किती जण एखाद्या सभेला, निवडणूकीच्या बूथवर जेवणाची किंवा आणखी कशाचीही अपेक्षा न ठेवता जातात? राहता राहिला आजकालच्या सभांसाठी वेगवेगळ्या मार्गाने पैसे गोळा करण्याचा मुद्दा तर, अशा कार्यक्रमांना पैसा लागतोच आणि प्रत्येक पक्ष आपापल्या परीने उत्पन्नचे स्त्रोत शोधतच असतो. मग माणिकरावच कशाला, नानाजी देशमुखांची आणि वाडीयांच्या मैत्रीचाही विचार व्हावा. आणि हो, ठाकरेंची लाईफस्टाईल (कलानगरमधे बंगला वगैरे वगैरे) सपोर्ट करण्याजोगा त्यांचा व्यवसाय नेमका कोणता हे जो कोणी (मायेचा पुतः इति श्री. उद्धवजी) सांगू शकेल, त्या व्यक्तीस आदित्य साहेबांबरोबर तलवार घेऊन फोटो काढण्याची संधी मिळेल (आणि हो, आम्ही सर्वांना फेअर चान्स देतो. घराणेशाही नाही करत. शप्पत!).