सध्या जालावर जे प्रकरण गाजतय ते म्हणजे - http://abcnews.go.com/US/california-student-finds-fbi-tracking-device-ca...
यासीर अफीफी हा अमेरीकेचा नागरीक असलेला , मुस्लीम युवक जेव्हा त्याच्या कारची तपासणी करण्यासाठी, ऑईल बदलण्यासाठी म्हणून मे़अॅनिककडे गेला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्याला लोहचुम्बकाने चिकटवलेलं एक यंत्र कारखाली लावलेलं सापडलं. त्याने ते यंत्र त्याच्या मित्राला दाखवलं.
मित्राने एका संस्थळावर त्या यंत्राची छायाचित्रं केवळ कुतुहलाने प्रसिद्ध केली. आणि त्यातून हे निघालं की गेले ३ ते ६ महीने यासीर आफीफी च्या मागे एफ बी आय हेर हात धुवून लागलेले होते. एकदा हे उघडकीस आल्यानंतर अर्थातच एफ बी आय ने यासीरची चौकशी केली. त्याला यामधे हे विचारण्यात आलं की त्याचे कुणा अशा व्यक्तीशी संबंध आहेत का जी व्यक्ती एखाद्या संस्थळावर विकृत, भडकाऊ विधानं करते? whether he knows anyone "extreme or abnormal" or who who has been posting anything online that they shouldn't be.
मला कळलेला मतीतार्थ हा -
(१) तुम्ही एखाद्या संस्थळावर निनावी फक्त त्या संस्थळावरील लोकांकरता असता. पण कायद्याचे हात फार लांब असतात.
(२) दुसरं तुम्ही जी काही भडकाऊ विधानं करता त्यात आत्ता सरकारला रस नसेल पण पुढे देखील तो नसेलच याची ग्वाही देता येत नाही. तुमच्या मागे कायद्याचं लचांड कधीही लागू शकतं.
Somebody somewhere knows what you are writing & your identity. Nothing is private. It's just a question of whether they want to take interest in you or not.
प्रतिक्रिया
11 Oct 2010 - 11:52 pm | बेसनलाडू
हे ओरडून मिभोकाकांचा घसा सुकला नि सुजला पण आता पर्यंत! काय काका बरोबर ना?
(स्मरणशील)बेसनलाडू
11 Oct 2010 - 11:55 pm | प्रियाली
मिभोंचा घसा सुकला असेल अजूनही म्हणून मी बोलून घेते. :)
11 Oct 2010 - 11:58 pm | प्रभो
मिभो आता घसा 'ओला करायला' गेले असतील असे मी म्हणून घेतो.. ;)
12 Oct 2010 - 12:37 am | मिसळभोक्ता
एवढ्या सक्काळी सक्काळी ?
काय बॉ, लोक काहीही म्हणतात !
12 Oct 2010 - 12:37 am | मिसळभोक्ता
प्रायवसी इज अॅन इल्यूजन.
किंवा स्कॉट मॅक्नीली म्हणायचे ते:
यू हॅव नो प्रायवसी. डील विथ इट.
12 Oct 2010 - 12:26 am | चतुरंग
'नॅशनल सिक्युरिटी एजन्सी' ही अमेरिकन संस्था यच्चयावत संगणक ट्रॅफिकवर, फोन्सवर नजर ठेवून असते.
अनेक भाषांचे तज्ञ तिथे रात्रंदिन कामात असतात. काहीही नजरेतून सुटत नाही. फरगेट योर प्रायवसी.
(पब्लिक्)रंगा
12 Oct 2010 - 1:24 am | धनंजय
द बेस्ट वे टु हाइड इज इन प्लेन साईट.
१९९२ काळात मला भारतीय सिग्नल कोरच्या एका अधिकार्याने ही गंमत सांगितली :
त्या काळात भारतीय सैन्य रेडियो संपर्कासाठी अतिशय महागडे स्क्रँब्लिंग तंत्रज्ञान वापरत असे. त्याच काळात पाकिस्तानी सैन्य तितकेच कार्यक्षम आणि अतिशय लो-टेक असे वेगळे धोरण वापरत असे. दिवस-रात्र २४ तास पाकिस्तानी सैन्याच्या अंतर्गत रेडियोवरती काही अगदी-शक्य वाटणारे, काही सहज-शक्य वाटणारे, अशा सर्व प्रकारच्या संदेशांचा भडिमार सारखा होत असे. त्यांच्यापैकी कुठले संदेश खरे याचे चिह्न फक्त त्यांनाच ठाऊक होते.
जेथवर माझ्या ओळखीच्या अधिकार्याना माहीत होते, ती लो-टेक योजना अतिशय कार्यक्षम होती.
एनएसए सर्व काही तपासू शकते, पण धोकादायक संदेश आणि बिनधोक संदेश यांच्यात फरक करणे अतिशय कठिण असू शकते. आणि फार संदेश "संशयास्पद" म्हणून मानले, तर त्यांचा पाठपुरावा करण्याइतके मनुष्यबळ शासनापाशी नाही.
मागे एका वकिलाने सांगितले - आयकर देण्याबाबत बारीकसारीक घोटाळा केलास, आणि तुझे वार्षिक उत्पन्न १ लाख डॉलरपेक्षा कमी असेल, तर फार काळजी करू नको. अशा बारीकसारीक घोटाळ्यांची छाननी करण्यात आयकर विभागाला पैसे वसून होण्यापेक्षा अधिक मनुष्यबळ खर्च होते! अजून मी विषाची परीक्षा घेतलेली नाही :-) पण येथे करोडो लोकांनी आपणहोऊन शासनाला पुरवलेल्या माहितीची छाननी सुद्धा शासनाला करता येत नाही. मग करोडो लोकांवर हेरगिरी करून मिळवलेल्या अर्धवट संदर्भांची छाननी करणे दुरापरस्त.
(कदाचित मिभो माझे म्हणणे खोडून सांगतील, की हे सहज शक्य आहे.)
12 Oct 2010 - 1:48 am | मिसळभोक्ता
(कदाचित मिभो माझे म्हणणे खोडून सांगतील, की हे सहज शक्य आहे.)
होय, हे शक्य आहे. (पण सहज शक्य नाही.)
फ्रॉड डिटेक्शन तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे. व्हिसा आणि मास्टर कार्ड, तसेच अमेरिकन एक्स्प्रेस हे तंत्रज्ञान वापरतात. त्यासाठी मनुष्यबळाची फारशी आवश्यकता नाही. आय आर एस देखील हे तंत्रज्ञान वापरू शकते. परंतु, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान अस्तित्त्वात असले, तरी त्याला कायद्याचे बळ नाही. उदाहरणार्थ, करबुडवेगिरीमुळे क्रेडिट स्कोअर कमी होत नाही.
12 Oct 2010 - 1:58 am | धनंजय
करोडो लोकांच्या अर्धवट आणि नि:संदर्भ संदेशांच्या गोंगाटात धोकादायक संदेश शोधणे कठिण असावे, असे वाटते.
आर्थिक व्यवहार त्या मानाने मर्यादित असतात, आणि "हा आर्थिक व्यवहार आहे" इतपत संदर्भ तरी असतो.
12 Oct 2010 - 2:05 am | मिसळभोक्ता
स्पँम डिटेक्शन ?
एक मात्र खरे, की "धोकादायक" संदेश शोधण्यासाठी, जे मॉडेल बनवावे लागते, त्यासाठी आवश्यक तितकी (स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट) उदाहरणे उपलब्ध नसावीत. त्यामुळे मॉडेल ट्रेनिंग नीट होत नाही.
(ता. क. दहशतवाद्यांचे शेवटचे संदेश शोधण्या ऐवजी, त्यांच्या आर्थिक देवाणघेवाणीचे पॅटर्न शोधणे सोपे आहे, म्हणून पहिला घाव त्याच मुळावर केला गेला, आणि ते योग्यच झाले.)
12 Oct 2010 - 2:06 am | शुचि
सातत्यानी कोणी विकृत, भडकाऊ संदेश देत असेल तर ते ओळखणं सरावाने शक्य होत असावं तसच हे ओळखणारे लोक त्या त्या विषयातील तज्ञ देखील असावेत.
मॉल मध्ये अंदधुंद गोळीबार आदि घटना होतात त्याची व्यक्ती बहुधा पूर्वकल्पना देत असावी ऑनलाइन फोरम आदिं मधून. त्या त्या ठिकाणचे गुप्तहेरखाते बहुधा सजग, सतर्क होत असावे.
Precaution is better than cure.
12 Oct 2010 - 2:12 am | मिसळभोक्ता
मोठ्या आय एस पी, मेल, मेसेंजर, चॅट, ऑनलाईन फोरम्स वगैरे चालवणार्या कंपन्यांना दर वर्षी पोलिस/एफबीआय कडून किमान १०-२० वेळा ट्रान्सस्क्रिप्टची मागणी होत असते, आणि त्यांना ती पुरवावीच लागते.
एका मोठ्या कंपनीच्या प्रायव्हसी पॉलिसीतल्या खालील ओळी बघा:
We believe it is necessary to share information in order to investigate, prevent, or take action regarding illegal activities, suspected fraud, situations involving potential threats to the physical safety of any person, violations of ***'s terms of use, or as otherwise required by law.
12 Oct 2010 - 9:37 am | युयुत्सु
मिसळपाव पण कायद्याच्या अशा नजरे आड नसावे...
12 Oct 2010 - 9:43 am | मिसळभोक्ता
आणि त्या एफ बी आय मध्ये बायका पण असतात, म्हणे !
12 Oct 2010 - 10:11 am | शिल्पा ब
काय सांगता ? !!
अहो मग त्या गुन्हेगारांचा छळ करत असतील हो!!
12 Oct 2010 - 6:02 pm | इन्द्र्राज पवार
"...तुमच्या मागे कायद्याचं लचांड कधीही लागू शकतं."
शुचिताईंच्या लिखाणाचा कल 'अमेरिके'तील या संदर्भातील हवा दाखविण्यासाठी आहे असे सकृतदर्शनी वाटते; आणि ९/११ च्या घटनेनंतर तिथल्या सिक्युरिटीने 'तसे' पुन्हा होऊ नये यासाठी काही मजबूत पाऊले उचलली असतील (जी दिसतातच...) तर त्यांना निश्चितच दोष देता येणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तिथे कुणीही आणि कितीही तळी उचलून धरली तरी शेवटी देशाच्या अस्तित्वाचाच प्रश्न 'आ...' वासून उभारला असेल तर एफबीआय/सीआयए करत असलेली कार्यवाही ही अनुचित म्हणता येत नाही. मात्र भारतातील स्थितीपुरते बोलायचे झाल्यास कायद्याचे 'लचांड' लागण्याइतपत जागरूकता (सायबर लॉ संदर्भात...) अद्याप इथल्या मातीत रुळलेली नाही. मुळात इथल्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविणार्या हवालदारालाच हा लॉ नेमका काय आहे याचा अजिबात पत्ता नाही. अर्थात ते महत्वाचे नाही. मुळात भारतात 'नॅशनल सिक्युरिटी' ची व्याख्या 'देशाच्या सुरक्षिततेला धोका' इतपतच मर्यादित आहे. खरे तर 'सर्वसामान्य नागरिकाच्या शांतपणे जीवन जगण्याच्या रितीला कोणत्याही प्रकारे निर्माण होणारा धोका' हा त्या व्याखेच्या कक्षेत यायला हवा, तो अजून आलेला नाही. त्यामुळे वर धाग्यात दिलेली एक व्याख्या (who who has been posting anything online that they shouldn't be) इथे सिद्ध करणे - तेही पेन नेम ने पाठविलेल्या मॅटरच्याबाबतीत - केवळ कठीण आहे.
अर्थात हेही तितकेच सत्य आहे की, नागरिकाच्या शांत जगण्याच्या व्याखेत त्याला जालीय मार्गाने येणार्या कोणत्या छळाला सामोरे जावे लागेल आणि त्यामुळे त्याचे जीवन धोकादायक कितपत होऊ शकते याची पक्की व्याख्या करणे भारतासारख्या देशात शक्य असले तरी येथील भ्रष्टाचाराच्या सागरात त्या व्याख्येचा चोथा होऊन जाईल. 'कायद्याचे लचांड कधीही मागे लागू शकेल' हे सत्य आहे पण त्याचा अर्थ असा बिलकुल होणार नाही की तक्रार करणारा निवांत राहील आणि तो 'बेनाम' पकडला जाईल.. गेलाच तर त्याला तरतुदीप्रमाणे शिक्षा होईल. हायली इम्पॉसिबल. [मी हे 'एक्स्टर्नल सिक्युरिटी' च्या संदर्भात म्हणत नसून 'भडक विधानं' करण्याच्या पलिकडे जावून जी 'डिस्टर्बिंग' विधान नेटर्स एकमेकाच्या खाजगी आयुष्यासंदर्भात इझीली करू शकतात, त्यांच्याबाबतीत लिहिले आहे.]
सुरक्षिततेची नव्याने व्याख्या [Redefinition of Security] करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे कारण जी सद्या अस्तित्वात आहे ती मूलतः स्पष्ट नाही आणि पंजाबमध्ये होत असलेली या कायद्याची जशीच्यातशी महाराष्ट्रात्/कर्नाटकात केली जात नाही. कमीजास्त प्रमाणात सर्वच राज्यांची ही अवस्था आहे. राज्य सरकार अशा गोष्टीचा कितपत पाठपुरावा करेल याबद्दल साशंकता आहेच कारण तोच पटलावरील एकमेव विषय कधीच नसतो. शिवाय निष्णात वकीलांचा फौज इथे अशा केलेल्या कायद्यांची चिरफाड करण्यास सज्ज असतेच असते.
दिल्लीतील माझ्या मित्राच्या बहिणीने एका नामवंत कंपनीत स्टाफ सिलेक्शन झाल्यानंतर पे पॅकेजच्या मुद्द्यावरून दोन महिन्यात तिथली नोकरी सोडली व त्याच दर्जाच्या [त्याच एरियात] दुसर्या कंपनीत नोकरी स्वीकारली. नव्या नोकरीतील दुसर्या आठवड्यापासून बेनामी मेल्सचा (स्पॅम नव्हे, थेट नावाने...) असा काही रतीब तिच्या मेल अकौंटवर सुरू झाला की तिची झोपच उडाली. इतकेच नव्हे तर नव्या ठिकाणात असलेल्या एक्झेक्युटिव्हजंनादेखील त्याच्या सी.सी. ~ अर्थात नवीन ठिकाणाच्या सी.ई.ओ.ला बिझिनेस कट-थ्रोट गिमिक्स माहित असल्याने त्यांनी हिला कुठेही तक्रार न करण्याचा चांगला सल्ला दिला. 'Ignoring is the Best Policy...' यावरच संबंधितांनी (त्यात माझ्या मित्राचाही समावेश होता) भर दिल्याने तो रोग औषधाविनाच बरा झाला.....हे झाले, ते निव्वळ इथल्या 'कायदे-रक्षका'वर नसलेल्या विश्वासामुळे.
त्यामुळे 'लचांड' ही काही सर्वव्यापी व्याख्या इथे होणार नाही.
इन्द्रा
12 Oct 2010 - 6:21 pm | धमाल मुलगा
बिग ब्रदर इज वॉचिंग.
हे वाक्य आठवले.
12 Oct 2010 - 6:24 pm | परिकथेतील राजकुमार
शनी देओल ?
12 Oct 2010 - 6:26 pm | नगरीनिरंजन
शिल्पा शेट्टी होती ना त्यात?
12 Oct 2010 - 6:29 pm | परिकथेतील राजकुमार
शनी आणि प्रियांका चोप्रा होते.
12 Oct 2010 - 6:36 pm | गांधीवादी
सनी भाय आपल्याला जाम आवलत. काय धुतो एकेकेला.
12 Oct 2010 - 6:39 pm | नगरीनिरंजन
आयला ते होय..
मी समजलो हे..
12 Oct 2010 - 6:29 pm | धमाल मुलगा
शिरेस व्हा रे शिरेस व्हा.
कुठुन असले टवाळ दोस्त भेटलेत... :D
12 Oct 2010 - 6:33 pm | परिकथेतील राजकुमार
आता लघुशंका आली तर विचारायला नको का ?
आता सॉफ्ट कॉर्नरमुळे तुम्ही आम्हाला गप्प बसवणारच म्हणा. ;)
असो...
12 Oct 2010 - 6:33 pm | अवलिया
सहमत आहे... शिरियस व्हा रे पोरांनो...
संपादक.. चुकलो.. बिग ब्रदर.. चुकलो.. बिग बॉस... चुकलो चुकलो.. "ते" पहात आहेत
12 Oct 2010 - 6:31 pm | मृत्युन्जय
प्रियांका चोप्रा आहे बहुधा
12 Oct 2010 - 6:28 pm | मृत्युन्जय
हॅ हॅ हॅ ते साहेब असतील तर मग कायबी पासिबल हाय. कदाचित काही भडकाउ विधाने केल्याबद्दल सनीदा पीसी मधुन अपना ढाइ किलो का हात बाहेर काढुन एक सणसणीत लाफा पण मारु शकतील
12 Oct 2010 - 6:28 pm | तिमा
बिनधास्त लिहा हो 'बटाट्याच्या चाळी'तल्यांना कोणी सिरियसली घेत नाही.