ग़ेले दोन दिवस झाले मी ह्या घटनेचा विचार करत आहे.
पहिल्यांदा मी नेहमीचच आहे म्हणून दुर्लक्ष करून विसरण्याचा प्रयत्न केला पण काल रात्री "बघूया काय चाललय देशात" म्हणून "टी व्ही" लावला तर तेच नाटक चालू. अशी सणक आली ना मस्तकात कि विचारू नका, म्हणूनच हा लेख लिहण्याचा खटाटोप ....
आत ह्यात गांधींचा काय संमंध ? पण मी ज्या लोकांबद्दल बोलतोय ते महात्मा गांधी नसून आजचे ढोंगी गांधी म्हणजे अनुक्रमे "सोनिया ग़ांधी, राहुल गांधी व प्रियंका वढेरा [ सोईसाठी ग़ांधी , कारण त्याशिवाय व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत नाही ]."
एकूण दोन घटना आहेत .....
१. पहिली म्हणजे गांधी-नेहरू घराण्याचे वफादार व आजच्या राजकारणातील एक अडगळ असे "अर्जूनसिंगांनी" भारताच्या पंतप्रधानपदासाठी सर्वश्री "राहूल गांधींचे " नाव पुढे करणे, अपेक्षेप्रमाने त्यावर राहूलने कोणतीही प्रतिक्रीया न देणे, त्यावर कॉग्रेस पक्षातर्फे "सध्या पंतप्रधानपदाची खूर्ची रिकामी नाही आणि सोनिया गांधींना चापलूसकी [ कॉग्रेसच्या राजकारण्यांसाठी कसा फिट्ट शब्द आहे बघा ] आवडत नाही" असा खूलासा करणे व शेवटी सोनिया व अर्जूनसिंगाची गुप्त बैठक [ ह्यात म्हणे त्यांना ठोकले , मी तर म्हणतो पाठ थोपटली असेल].
ह्यावरून एकंदरीत मला ह्या लोकांना म्हणायचे आहे तरी काय हे समजेना. अरे काही तरी किंमत ठेवा त्या "पंतप्रधान " पदाची. पुर्वीच्या शास्त्री, इंदीरा गांधी, राजीव गांधी, वाजपीई सारख्या माणसांनी हे पद भूषवून त्याची मानमर्यादा अतिशय उच्च करून ठेवली होती व आज त्याचे हाल कुत्रे पण खात नाही. ख़ुद्द मनमोहन सिंग कबूल करतात "मी हतबल आहे", बाकीचे काय पाहिजे अजून ? असो.
तर तो आपल्या चर्चेचा विषय नाही, तो आहे राहूलची योग्यता [ थोडक्यात लायकी ]. फ़क्त गांधी कुटुंबात जन्माला महान ,चांगले विदेशात शिक्षण घेतले, थोडा दिसायला चांगला आहे, झालच तर भाषने आईसारखी वाचून दाखवत नाही, व्यवस्थीत हिंदी बोलतो, झालच तर ४ दिवस गरिब आणि स्पेशली दलित जनतेत हिंडतो हे सर्व गूण भारताचा पंतप्रधान होण्यासाठी चिक्कार झाले का ? बाकी त्याची एकंदरीत देशाच्या परिस्थीतीबद्दल असलेली जाण, समज, थोडा अनुभव, ह्या लेवलला येण्यासाथी करावे लागणारे [ व लोकांनी केलेले ] कष्ट, करावा लागणारा त्याग ह्यांची काहिच किंमत नाही का ? का हा देश गांधी-नेहरू घराण्याला आंदण दिलाय ?
तसे असेल तर बंद करा ही लोकशाहीची नाटकं आणि जाहीर करा " यापुढे फक्त गांधी परिवारातील व्यक्तीलाच हे पद मिळेल, बकी कुणी ह्याला विरोध केला तर तो देशद्रोह समजला जाईल" म्हणजे विषयच संपला. आता तर ह्यांचे "चरणभाट " असा दाखला देतात की "राहूलने मनाचा मोठेपणा दाखवून मंत्रीपदाचा त्याग केला" . खरं की काय ? आम्हाला वाटलं सगळी नाटकंच चालू आहेत. छे छे किते मुर्ख ना मी ? मला एवढेच म्हणाय्चे आहे की सध्यातरी राहूलची या पदाचे स्वप्न सुध्धा बघायची लायकी नसताना त्याला मारून मुटकून फौजदार बनवायचा हा प्रयत्न कशासाठी? त्याला प्रोजेक्ट करण्यासाठी एवढी नाटके कशासाठी ? बाकीच्या कॉग्रेसमधल्या चरणभाटांना, चापलूसकरांना, चमच्यांना त्यांचा मतदारसंघात तोंड दाखवायला जागा नसल्यामुळे हा सर्व सावळागोंधळ का ?
अशाने देशाचे किते नुकसान होत आहे, आपली इमेज कशी खराब होत आहे याची काळजी कुणालाच नाही का ?
२. दुसरी घटना तर पहिल्यापेक्षा भयानक व निंदनीय. क़ाय तर म्हणे, प्रियंका गांधींनी म्हणे तिच्या पित्याचे मारेकरी नलिनी ची भेट घेतली, का तर की तिला ह्यामागचा हेतू जाणून घ्यायचा होता [ आत्तापर्यंत तपास करत असलेली पोलीस, गुप्तचर संघटना काय माश्या मारत होती का ?] , झालचं तर आपल्या पित्याला मारून किते मोठी चूक तिने केली आहे हे सुनवायचे होते [ तर तर , ती नलिनी पण संतच ना, मला तर वाटते आज पुन्हा एकदा वाल्याचा वाल्मीकी झाला असावा] व शेवटी येताना
"आपल्या मनात कोणतेही शतॄत्व नाही " हे सुनवून आपण किते महान हे जनतेला सांगायचे होते.
माझं तर डोकं सुन्न झालं. ह्यांनी आता बापाच्या मरण्याचे पण भांडवल करायला सुरवात केली तर. बर आत्ताच कसा निवडणूकीच्या तोंडावर हा महान विचार मनात आला ? जर ही गोष्ट पर्सनल असेल तर बरोबर आपल्या लाचार मिडियाची फौज कशाला बरोबर न्हेली आणि अख्ख्या देशाला हा नजारा कशासाठी दाखवला कारण तुमच्या मते ही गोष्ट अतिशय पर्सनल होती ? नेहमीप्रमाणे ह्या घटनेचे पण भाटांनी व मिडियाने उदे उदे केलेच, दुसरी अपेक्षा तरी काय ठेवणार हो ?
आता प्रश्न असा आहे की ह्या घटना ज्या रितेने घडल्या व त्या प्रोजेक्ट केल्या गेल्या ती पद्धत बरोबर आहे का ? का पब्लिकला चुत्यात काढायचे धंदे आहेत हे ? आपल्या देशात ह्या गांधींपेक्षा दुसरे कोणी लीडर बलायला नालायक आहे का ? मिडियापण ह्या लोकांच्या दावणीला बांधल्यासारखा का वागतो कारण तो तर लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे ? बाबासाहेबांना अपेक्षीत असलेली लोकशाही हिच का ? हे असे लोकच भविष्यात आपले नेतत्व करणार आहेत का ?
तसे असेल तर माझ्यासारख्या सुशिक्षीत, पांढरपेश्या माणसाला तो फक्त स्वताचे बघतो, त्यांचे देशाशी काही देणेघेणे नाही अशा शिव्या देण्यात काय अर्थ आहे जर हे लोक असेच वागणार असतील. ह्या गोष्टींवर आपल्याकडे काहीच उपाय नाही का ? हे सर्व असेच चालू राहणार आहे का ? तसे असल्यास ह्याला कंटाळून राजकारणाकडे ढ़ूंकून न बघणाऱ्या व कदाचेत देश सोडून जाणाऱ्या माणसाला दोष देण्यात काय अर्थ आहे ? आपले मिशन "२०-२०" असेच लोक पूर्ण करणार आहेत का ? होय असेल तर त्यानंतर देशाची परिस्थीती काय असेल ? ह्या अश्या भाटगिरी करणाऱ्या न्युज चॅनेल्स वर बंदी आणावी का ?
मला माहित आहे की असे लिहून काही उपयोग नाही, कारण "हम नही बदलेंगे" असे त्यांनी ठरवले आहे. आपण जर हे वाचून काही करण्याचा प्रयत्न करणार असाल तर मी त्यात माझे थोडेसे समाधान मानतो व पुढे आपण अगदीच परिस्थीती हाताबाहेर जाउ देणार नाही अशी आशा बाळगतो.
प्रतिक्रिया
17 Apr 2008 - 8:18 pm | आनंदयात्री
डानराव, छान लेख, तुम्ही उगाच मनाला लाउन घेउ नका राव. गांधींचे तुम्ही काहीही करु शकत नाही, कारण तुम्ही (म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या विचारसरणीचे लोक) मतदान करत नाही, केलं तरी त्याचा काही उपयोग नाही, कारण एक भिंगरी अन एक साडी या जोरावर मतदान करणारे हजारो लाख्खो आहेत, अहो तुमच्या मताला विचारतय कोण ? परिणामी गांधी अन त्यांचे भाटच येनकेनप्रकारे निवडुन येणार अन तुम्ही परत हात चोळत बसणार. चोट्ट्या भामट्यांचा धंदा आहे हो, एका रात्रित शिश्टीम बदलते ती फक्त पिक्चरात !
17 Apr 2008 - 6:39 pm | विदेश
आपण काही करू शकत नाही.
ग़ेले दोन दिवस झाले मी ह्या घटनेचा विचार करत आहे.
फक्त विचारच करण्याखेरीज आपल्याला(-च असलेल्या मेंदूला)पर्याय नाही.
"सध्या पंतप्रधानपदाची खूर्ची रिकामी नाही आणि सोनिया गांधींना चापलूसकी [ कॉग्रेसच्या राजकारण्यांसाठी कसा फिट्ट शब्द आहे बघा ] आवडत नाही"
खुलाशाचा अर्थ-"नाही"च्या जागी "आहे"असा घेणारेच आहेत.
तसे असेल तर बंद करा ही लोकशाहीची नाटकं
जग ही रंगभूमी आहे आणि पक्षपल्टू /होत्याचे नव्हते कलाकार राजकीय रंगभूमीवर अगणितच!
मला माहित आहे की असे लिहून काही उपयोग नाही, कारण "हम नही बदलेंगे" असे त्यांनी ठरवले आहे. आपण जर हे वाचून काही करण्याचा प्रयत्न करणार असाल तर मी त्यात माझे थोडेसे समाधान मानतो व पुढे आपण अगदीच परिस्थीती हाताबाहेर जाउ देणार नाही अशी आशा बाळगतो.
भ्रष्टाचारी परिस्थिती पहात राहणे व क्रांतीकारक स्थितीसाठी आशाळभूत होऊन राहणे इतकेच आपल्या नशिबात; बरे का छोटा (-पण विचाराने मोठा) डॉन!
17 Apr 2008 - 7:03 pm | शितल
आपल्या देशात, देशा पेक्षा पक्ष मोठा कसा होईल हेच पाहिले जाते, आणि कॉग्रेस पक्षा एवढा जातीचे राजकारण करून निवड्णुक लढवणारा दुसरा पक्ष नसेल.
17 Apr 2008 - 7:07 pm | मनस्वी
पक्ष-बिक्ष सारे छू. आपण आणि आपले खिसे कसे मोठे होतील हे पाहिले जाते. त्यासाठी या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात. आज त्याचा निषेध - उद्या त्यालाच पाठिंबा.
17 Apr 2008 - 7:08 pm | मनस्वी
सहमत.
17 Apr 2008 - 7:12 pm | छोटा डॉन
"भ्रष्टाचारी परिस्थिती पहात राहणे व क्रांतीकारक स्थितीसाठी आशाळभूत होऊन राहणे इतकेच आपल्या नशिबा""
असं बिलकूल नाही, परिस्थीती खरच बदलू शकते ...
आत्ता लगेच का ? कदाचित याचे उत्तर नाही असे आहे ...
कोण बदलणार ? प्रत्येकाने शक्य तेवढे प्रतत्न करावेत ....
शेवटी " शिवाजी जन्माला यावा पण माझ्या घरी नको" ही मनोवॄत्ती कोठेतरी सोडावी लागेल ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
18 Apr 2008 - 12:17 am | llपुण्याचे पेशवेll
पटले डानराव तुमचे नाहीतर आम्ही म्हणत बसलो आहोत 'शिवाजी व्हावा शेजारच्या घरात, मावळा त्याच्या पलीकडच्या घरात, मग तुम्ही?? आम्ही मात्र राहणार स्वराज्यात." ;) अहो हे आजचे नाही हे तर फार पूर्वीचेच आहे.
शांत राहून संधीची वाट पहाणे हे उत्तम.
पुण्याचे पेशवे
17 Apr 2008 - 8:12 pm | मानस
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली तेव्हा ते सोळा वर्षांचे होते, त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा ते ४७ वर्षांचे होते. साधारणपणे तुमच्या मते कुठल्या वर्षी एखाद्याने पंतप्रधान व्हावे?
जगातला सगळ्यात लहान पंतप्रधान ३४ वर्षांचा होता (२००४ साली).
ह्यात मी राहुल गांधीची बाजू घेत आहे असे नाही, पण सध्या ह्या जगात "युवा" ह्या एका शक्तिची फार मोठी गरज आहे. हेच उद्याचे प्रतिनिधी आहेत,आशास्थानं आहेत. मी तर म्हणेन, वयाच्या ६५ वर्षानतंर निवडणूक लढवण्यास बंदी घातली पाहिजे.
निदान राहुल गांधी इतर राजकीय पुढार्यांच्या मुलांसारखा "व्यसनाधीन" तरी नाही. काँग्रेस काय, भाजप काय सगळे एका माळेचे मणी. तरीसुद्धा फक्त वय लहान आहे म्हणजे देश चालवता येत नाही, हे काही खरं नाही.
17 Apr 2008 - 10:04 pm | ऐश्वर्या राय
राहुलबाळाची आणि शिवाजी महाराजाची तुलना सुरू झाली. किती ते गांधीधार्जिणेपण...
17 Apr 2008 - 11:37 pm | मानस
तुम्ही महान आहात, तुलना व्यक्तिंची नसुन वयाची आहे.
17 Apr 2008 - 9:06 pm | विजुभाऊ
डॉनकाका मी असहमत आहे या विचारांशी.
राजकारणाचे जाउद्या / चॅनेल वाल्यांचे पण जाउद्या. ते पोटासाठी कोणालाही कसेही प्रोजेक्ट करतात . सबसे तेज म्हणत अमरसिंगना महात्मा बनवतात आणि राज ठाकरेना व्हीलन बनवतात.
पण मला खरे सांगा की राजीव गांधी सारखा पंतप्रधा आपल्याला मिळाला नसता तर?
कल्पना करा की ईन्दीरा गांधी नन्तर जर सिताराम केसरी अथवा चन्द्रशेखर जर पन्त प्रधान पदी आले असते तर? गेला बाजार मुल्ला मुलायम सिंग आले असते तर? आपण अजुनही प्रीमियर पद्मिनी मध्येच फिरत असतो. भारतात औद्यगिक क्रान्ती. आय टी क्रान्ती झाली असती का?
एका विश्वनाथ प्रतापाने काय प्रताप केले ते तुम्ही जाणताच.त्यांच्या एका निर्णयानी भरातात केव्हढी दुफळी माजली.
आडवाणी तेंव्हा रथ यात्रा काढत भारताला एक करायचा प्रयत्न करत होते. बाबरी मशीदीचा मुद्दा त्याना केवळ लोकाना चघळायला देण्यासाठी हवा होता हे लपुन राहीले नाही.
भारत आणि इराण किंवा पाकिस्तान यांच्यात फारसा फरक राहीला नसता.
राहुल गांधी बद्दल आज जे बोलले जात आहे तेच राजीव गांधींबद्दल बोलले गेले होते. तसेच इन्दीरा गान्धींबद्दल बोलले गेले होते. त्यांची तर
" गुंगी गुडीया" अशी हेटाळणी केली गेली होती. एक स्टॉप गॅप ऍरेन्जमेन्ट अशीच त्यांची छबी बनली होती.
देशाला जर दिशा द्यायची असेल तर नव्या विचारांची व्यक्तीच पंतप्रधानपदी असावी लागते. कसाही असला तरी हिटलरने जर्मनी ला नवी दिशा दीली. सद्दाम ने इराक उभा केला.सद्दाम असेपर्यन्त इराक मध्ये कोणतीही जातीयवादी शक्ती नव्हती. इराक एक सार्वभौम आणि पुढारलेले राष्ट्र होते.
दुर्दैवाने आपल्या देशाला काही काळ देवेगौडांसारखे महान पन्त्प्रधान मिळाले होते ज्यानी काहीही केले नाही.
तिसरी आघाडी कोणत्या आणि कसल्या लोकानी बांधली आहे ते सर्वच जाणतात.
नव्याअ रक्ताला वाव मिळाला पाहीजे हे नुसते बोलायचे आणि वेळ आली की त्यांच्यावर टीका करायची.
राहुल गांधी सुशिक्षीत आहेत. एक व्यक्ती म्हणुनही त्यांची प्रतिमा उजळ आहे.नादान ,उर्मट, गुंड , ही बिरुदे त्याना अजुन त्याना कोणी लावु शकले नाही.
त्यांच्या कडे नव्या कल्पना असु शकतील. त्या ते आमलात आणु शकतील
मला एवढेच म्हणाय्चे आहे की सध्यातरी राहूलची या पदाचे स्वप्न सुध्धा बघायची लायकी नसताना त्याला मारून मुटकून फौजदार बनवायचा हा प्रयत्न कशासाठी? पंतप्रधान होण्याची राहुल गांधी यांची लायकी आहे की नाही हे कोण ठरविणार? राहुल महाजन? की त्याला "वो अभी जवान है" असे म्हणणारे दुड्ढाचार्य? की केवळ आंबेडकरांचे पुतळे उभारणार्या मायावती नी की गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणार्या अमानुश खाटीकाना अभय देत हिन्दुत्वाची ग्वाही देणार्या मोदीनी?बाकी जाउ देत; अजीतदादा पवार याना तुम्ही तरी पंतप्रदान म्हणुन प्रोजेक्ट कराल का?
गांधी घराण्याचे वारस असता तर मला सांगा तुम्ही स्वतः काय केले असते? राहुल गांधी हे एक संयमी व्यक्तीमत्व आहे हे तरी मान्य करा.
ते कदाचीत त्यांच्या शिक्षणा नुसार भारताला राजीव गांधी नी जशी नवी दिशा दिली तसेच काहीतरी करुन दाखवतील अशी आशा करायला नक्कीच वाव आहे. गांधी घराण्याची पार्श्वभुमी त्याना लोकांचा पाठींबा मिळवुन देइल.हा त्यांचा ऍडीशनल यु एस पी असु शकतो.
17 Apr 2008 - 9:41 pm | मानस
विजुभाऊ ...
तुमच्या सर्व मतांशी मी सहमत आहे. कुठलाही राजकारणाचा अनुभव नसताना राजीव गांधींनी देशाला एक वेगळी दिशा मिळवून दिली. आज आपण "टेलीकम्युनिकेशन्स" क्षेत्रात तसेच "ईंटरनेट" द्वारे जे काही करतो आहे, त्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. वयाच्या ४० व्या वर्षी पंतप्रधान झाल्यानंतर कधीही असे वाटले नाही की त्यांना राजकारणाचा अनुभव नाही. खरंतर राहुल गांधी सारखे तरुण, तडफदार व्यक्तिमत्वाची माणसं ह्या देशाला हवी आहेत.
17 Apr 2008 - 10:08 pm | ऐश्वर्या राय
आम्हालाही समजू दे.
आमच्याकडे इन्टरनेट येण्यामध्ये राजीवचे काय नक्की महान कर्तृत्व होते बरे? आपल्या म्हणण्याप्रमाणे राजीव नसता तर आज भारतात इन्टरनेट नसते? जगात प्रत्येक देशात कसे बरे इन्टरनेट पोहोचले मग? की राजीवनेच गुपचुपपणे जाऊन वायरी जोडल्या?
17 Apr 2008 - 10:57 pm | विजुभाऊ
जगात प्रत्येक देशात कसे बरे इन्टरनेट पोहोचले मग?
जगात भारता इतके सॉफ्ट वेयर तज्ञ कोणत्या देशात आहेत ते सांगा ना?
भारतातली वाहन क्रान्ती त्यांच्यामुळे झाली. हे तरी खुल्या दिलाने मान्य करा.
17 Apr 2008 - 11:25 pm | देवदत्त
इंटरनेट आले असते की नाही ते नक्की सांगता येत नाही. परंतु
जगात प्रत्येक देशात कसे बरे इन्टरनेट पोहोचले मग? की राजीवनेच गुपचुपपणे जाऊन वायरी जोडल्या?
ह्याचा अर्थ पूर्ण जगात फक्त राजीव गांधींनीच हे कार्य केले असा काढायचा आहे का? हे काम भारतात राजीव गांधींमुळे झाले असे त्यांचे म्हणणे असेल.
17 Apr 2008 - 11:48 pm | मानस
असच म्हणायच होतं.
17 Apr 2008 - 11:44 pm | मानस
ऐश्वर्या राय
तुम्ही महामानव आहात. तुमच्या विचारांची जितकी प्रशंसा करावी, ती कमीच आहे.
17 Apr 2008 - 9:47 pm | नीलकांत
विजूभाऊंच्या विचारांशी सहमत आहे.
नीलकांत
17 Apr 2008 - 10:14 pm | ऐश्वर्या राय
एकमेकाचे कौतुक करू अवघे होऊ खूष. 'मिसळपावी'परंपराच आहे ना? इथले सारे 'कंपू' सभासद एकमेकांची थोपटण्यात (पाठ हो! तुम्हाला काय मी तात्या वाटले का वाह्यात लिहायला?) अगदी तत्पर असतात. अहो रुपम् अहो ध्वनी!
17 Apr 2008 - 11:11 pm | नीलकांत
ह्या प्रतिक्रियेला मनापासून उत्तर एवढेच की शक्य असल्यास कुठल्याही विषयावर उत्तर देताना लेखक विसरा आणि स्वतःच मत द्या, असं असावं, असं वाटतं.
बाकी तुम्हासारख्या मिसळपावच्या परंपरा कोळून प्यायलेल्यांना मी पामर ते काय सांगणार? एवढंच म्हणू शकतो की एवढ्यात मिसळपावच्या परंपरेबद्दल लेख येत असेल तर तो विनोदी वगैरे आहे का अशी शंका येते. :-)
बाकी तुम्ही ही काही लिहा की राव, त्याला आमच्या भाषेत 'नेट' लागतो असं म्हणतात, कुठं ते विचारू नका. ;-)
नीलकांत
18 Apr 2008 - 12:48 pm | छोटा डॉन
विजूभाउ, प्रथम मी सांगतो की मला ह्या मिडीयाबद्दल काहीही बोलायचे नाही, आजचा मिडीया त्या योग्यतेचा राहिलेला नाही त्यामुळे तो कुण्ला हिरो ठरवतो आनि कुणाला व्हिलन ह्या गोष्टी सध्या बाजूला राहूदेत ...
"पण मला खरे सांगा की राजीव गांधी सारखा पंतप्रधा आपल्याला मिळाला नसता तर?
कल्पना करा की ईन्दीरा गांधी नन्तर जर सिताराम केसरी अथवा चन्द्रशेखर जर पन्त प्रधान पदी आले असते तर? गेला बाजार मुल्ला मुलायम सिंग आले असते तर? आपण अजुनही प्रीमियर पद्मिनी मध्येच फिरत असतो. भारतात औद्यगिक क्रान्ती. आय टी क्रान्ती झाली असती का?'
हा मुद्दा मला अमान्य. कुठला नेता म्हनाला म्हनून देशात नव्या गोष्टी, वने तंत्रज्ञान आले हे पण अमान्य. नेता नवी दिशा देतो हे मान्य पन सर्व प्रगतींच्या योजनांची आखणी व अंमलबजावणी ही आपल्या "नोकरशाह" वर्गाकडून केली जाते हे खरे सत्य आहे. आता तुम्ही म्हणाल की लालूजींनी रेल्वे फायद्यात आणली, मी म्हणेन की रेल्वे खात्यात काम करणार्या नोकरशाह वर्गाने म्हणजेच "आय ए एस" अधिकार्यांनी हे सर्व केले. लालूंनी फक्त "मम" म्हणायचे काम केले. एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी कुढल्या चाम्गल्या योजनेत आडकाढी घातली नाही. त्यामुळे कुणामुळे रेल्वे सुधारली, नेट आले, भारी गाड्या आल्या हे झूट....
फरक असा की ते फक्त त्यावेळी सत्तेत होते....
"राहुल गांधी सुशिक्षीत आहेत. एक व्यक्ती म्हणुनही त्यांची प्रतिमा उजळ आहे.नादान ,उर्मट, गुंड , ही बिरुदे त्याना अजुन त्याना कोणी लावु शकले नाही."
एवढा मुद्दा पुरेसा होऊ शकत नाही त्यासाठी. आणि बाकी बिरूदांचे म्हणाल तर मला नाही वाटत की गांधी घराण्यावर असे आरोप करण्याची कुणाची छाती आहे.
अहो खुद्द "संजय गांधी " एवढा नादान, गुंड, उर्मट होता तरी सगळे मुग गिळून शांत होते.
आज तर "राहूल" युवराज आहे. मला असे नाही म्हणायचे की राहूलचे कॅरेक्टर चांगले नाही पण तो मुद्दा ठरू शकत नाही.
"पंतप्रधान होण्याची राहुल गांधी यांची लायकी आहे की नाही हे कोण ठरविणार? राहुल महाजन? की त्याला "वो अभी जवान है" असे म्हणणारे दुड्ढाचार्य? की केवळ आंबेडकरांचे पुतळे उभारणार्या मायावती नी की गर्भार महीलेचे पोट तलवारीने चिरणार्या अमानुश खाटीकाना अभय देत हिन्दुत्वाची ग्वाही देणार्या मोदीनी?बाकी जाउ देत; अजीतदादा पवार याना तुम्ही तरी पंतप्रदान म्हणुन प्रोजेक्ट कराल ?"
हम्म. मुद्दा मान्य पण माझे वैयक्तीक मोदींबद्दल असे मत नाही ...
मायावती तर दखल न घेण्याच्या लायकीची ...
"गांधी घराण्याचे वारस असता तर मला सांगा तुम्ही स्वतः काय केले असते?"'
मुद्दा विचार करन्याजोगा नक्कीच आहे.
मी पण पुण्याई वापरली असती पण सध्या जी नाटके चालू आहेत ती चालू दिली नसती.
अर्जून्सिंगासारख्या "हुजर्यांनी" नक्कीच फटकारले असते...
बाकी राहूलने जरूर पंतप्रधान व्हावे, ह्यात चिडचिड व त्रागा करण्यासारखे काही नाही व करूनही काही उपयोग नाही. पण कमीत कमी त्याआधी त्याने स्वतला सिद्ध करावे ...
दुसरे घोड्यावर बसवतात म्हणून लगेच गुडघ्याला बाशिंग बांधू नये एवढीच अपेक्षा...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
18 Apr 2008 - 1:27 pm | आनंदयात्री
नोकरशाह वर्गाने म्हणजेच "आय ए एस" अधिकार्यांनी हे सर्व केले. लालूंनी फक्त "मम" म्हणायचे काम केले. एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी कुढल्या चाम्गल्या योजनेत आडकाढी घातली नाही. त्यामुळे कुणामुळे रेल्वे सुधारली
बिनतोड मुद्दा, पटले. पण असेही वाटले की "दगडापेक्षा वीट मउ" एटलिष्ट मम म्हणाले हे ही नसे थोडके !
17 Apr 2008 - 9:09 pm | पान्डू हवालदार
सगळॅ तसेच ...
बळासाहेब उद्ध्व ला प्रोजेक्ट करतात ... पवार सहेब पोरिला ... मग ही घराणे शाही नाही का ....
काहीही म्हणा .. कोन्ग्रेस ला पर्याय नाही ...म्हण जे "गान्धी" ला पर्याय नाही ...
तसेही कोणत्याही शाळ्कर्री मुलाला विचरा ... "गान्धी" कोण ... उत्तर मिळेल .. "सोनिया गान्धी" :)
देशाची सुन .. ;)
17 Apr 2008 - 9:37 pm | विजुभाऊ
पान्डोबा बाकी काही जमले नाही तरी जरा कलफलक वापरायला शिका. किती दिवस त्याच त्याच चुका करत रहाणार तुम्ही.
17 Apr 2008 - 9:46 pm | नीलकांत
पहिली म्हणजे गांधी-नेहरू घराण्याचे वफादार व आजच्या राजकारणातील एक अडगळ असे "अर्जूनसिंगांनी" भारताच्या पंतप्रधानपदासाठी सर्वश्री "राहूल गांधींचे " नाव पुढे करणे, अपेक्षेप्रमाने त्यावर राहूलने कोणतीही प्रतिक्रीया न देणे, त्यावर कॉग्रेस पक्षातर्फे "सध्या पंतप्रधानपदाची खूर्ची रिकामी नाही आणि सोनिया गांधींना चापलूसकी [ कॉग्रेसच्या राजकारण्यांसाठी कसा फिट्ट शब्द आहे बघा ] आवडत नाही" असा खूलासा करणे व शेवटी सोनिया व अर्जूनसिंगाची गुप्त बैठक [ ह्यात म्हणे त्यांना ठोकले , मी तर म्हणतो पाठ थोपटली असेल].
ह्या बद्दल म्हणाल तर ही कॉंग्रेसची परंपराच आहे. आपली घराणेनिष्ठा सिध्द करा आणि पुढच्या वेळी संभाव्य उमेदवारांमध्ये अग्रमान मिळवा. सोनीयाच्या घरी जाऊन त्यांना सक्रिय राजकारणात येण्यासाठी मन वळवणार्यांमध्ये आपले पवार साहेब सुध्दा होते की, मॅडमवर निष्ठा दाखवल्याचे फळ सुशिलकुमारांना नेहमीच भेटलेले आहे, चाकुरकर पाटलांना गृहमंत्रीपदाचा मान या निष्ठेपायीच आहे हो. आता एकदा कबड्डी खेळायचं म्हटल्यावर हाफपॅन्ट घालत नाही म्हणून कसं चालेल? त्यामुळे हे असं चालायचंच , याचा पुढे फायदा होतो असं कॉग्रेसचा इतिहास सांगतो.
दुसरी घटना तर पहिल्यापेक्षा भयानक व निंदनीय. क़ाय तर म्हणे, प्रियंका गांधींनी म्हणे तिच्या पित्याचे मारेकरी नलिनी ची भेट घेतली, का तर की तिला ह्यामागचा हेतू जाणून घ्यायचा होता
ही घटना घडल्यानंतर एका महिण्यानंतर प्रसारमाध्यमांना याची माहिती झाली. एक महिना जूनी का होईना, प्रसारमाध्यमांना याची दखल घ्यावीशी वाटली. त्या आधी प्रियंका एका लक्ष्मी-नारायणाच्या मंदीरात पुजा करायला गेल्या याचा मात्र उल्लेख नव्हता. तर आपल्या पित्याच्या मारेकरीला भेटायला जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गोडसे परिवाराशी सुध्दा गांधी परिवाराशी संबंध होता. त्यांच्या भेटी झालेल्या आहेत.
येथे एका गोष्टीकडे लक्ष वेधता येईल, की राहूलच्या आधी प्रियंकानेच आपल्या आईसाठी प्रचार केला आहे. त्यावेळी तिचं नाव प्रियंका गांधी असंच कॉग्रेसवाले सांगत होते. तीने मात्र आवर्जून आपलं नाव वढेरा असल्याचं सांगीतलं. मग त्यातून पळवाटा काढल्या की, प्रियंका गांधी - वढेरा किंवा नुस्तंच प्रियंका म्हणावं.
राहूल पंतप्रधान बनावेत का नाही?
- भारताच्या घटनेनुसार वय वर्षे २५ पुर्ण झालेला भारतीय नागरीक पंतप्रधान बनु शकतो. त्यामुळे राहूल गांधी पंतप्रधान बनण्यास पात्र आहेत. त्यांची सर्वात मोठी आणि सर्वात प्राथमिक पात्रता म्हणजे ते 'गांधी' आहेत हीच आहे, हे मला, तुम्हाला आणि खुद्द राहूलला सुध्दा मान्य आहे.
पंतप्रधान पदी या पुर्वी खुप मोठी माणसं बसली आहेत हे खरं आहे. सध्याच्या परिस्थितीत एवढ्या अल्पमतात राहूल पंतप्रधान होणं पसंत सुध्दा करणार नाहीत. मात्र येत्या नाही तर त्या पुढच्या वेळीतरी आपली प्रतिमा पंतप्रधान पदासाठी तयार करण्याची ही सुरूवात आहे.
माझं वैयक्तीक मत मात्र राहूलने बहूमतात येऊन पंतप्रधान बनावं असंच आहे. कारण नवीन रक्त आहे, जग आणि तत्रज्ञान आदींशी ओळख आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या पदाला पक्षांतर्गत आव्हाने नसतील. म्हणजेच निश्चींतपणे आणि कणखरपणे निर्णय घेता येतील. राहीलं अनुभवाचं तर त्यासाठी अनेक महत्वाची लोकं आजंच त्यांच्या भोवताली आहेत की !
आणि शेवटी कोण पंतप्रधान व्हावं हे आपली सार्वभौम जनता ठरवेल. एक मात्र सांगता येईल की, 'राहूल पंतप्रधान व्हावेत.' हे वाक्य एवढं साधं नाही महाराजा !
अहो बाकी सोडा, आमच्या बारामतीकर सायबांनीसुद्धा हाच घोष लावलाय. आता कुणाची बिशाद आहे या वाकयाचं व्याकरण चालवायची?
नीलकांत
17 Apr 2008 - 10:20 pm | ऐश्वर्या राय
अहो तेच ना ते, विदेशी महिला पंतप्रधान नको म्हणून वेगळा पक्ष काढणारे? परवा त्यांनीच तर त्याच विदेशी बाईला पंतप्रधानपदासाठी पाठींबा जाहीर केला की हो. वाक्याचे व्याकरण बरोबर आहे पण शुध्द्लेखन नाही. आणि अर्थ मात्र भयंकर आहे..पंतप्रधान असा शब्द आहे..जर चुकून कधी अचूक लिहायची इच्छा झालीच तर असूदे माहिती म्हणून लिहिले. आता तात्या परत कसे भडकतात त्याची मज्जा ;-)
17 Apr 2008 - 10:21 pm | मैत्र
याचा अर्थ असा होतो कि पर्याय नाही म्हणून त्यातल्या त्यात बरा कोण त्याला पंतप्रधान पद द्या... लायक आहे म्हणून किंवा खरंच तोच पाहिजे म्हणून नाही... दगडापेक्षा वीट मऊ... दोन्ही लागणारच ना ? घराणेशाही .. ती महाभारता पासुन आहे... आणि काँग्रेस च्या उघड घराणे शाही ला विरोध करणार्यांनी स्वतः सुद्धा केली आहे (पक्षी: शिवसेना आणि बारामती)...
पण राजपुत्र राजा होण्याची तयारी केली जात होती... आता फक्त ती राज कारण म्हणजे मतांचं राजकारण कसं करायचं आणि सोयीस्कर युत्या कशा करायच्या यापुरतं च मर्यादित आहे... कोणत्याही लोक प्रतिनिधीला काही शिक्षण ज्ञान किंवा किमान खात्याची माहिती सुद्धा नसते हा सामान्य आणि गृहीत अनुभव आहे ..
आनंदयात्री यांची पहिली प्रतिक्रियाच बरोबर... बाकी आपल्या चर्चा पु लं च्या चपराशाच्या अणु युद्ध टाळण्याच्या उपाया सारख्याच...
17 Apr 2008 - 10:43 pm | नीलकांत
आनंदयात्री यांची पहिली प्रतिक्रियाच बरोबर... बाकी आपल्या चर्चा पु लं च्या चपराशाच्या अणु युद्ध टाळण्याच्या उपाया सारख्याच...
हे मात्र एकदम सही रे सही.
नीलकांत
18 Apr 2008 - 12:13 am | प्रा सुरेश खेडकर
पं नेहरू समर्थक व विरोधक दोघांनी वाचावे असे पुस्तक
An explosive book which must be read both by admirers & critisizers of Pandit Nehru
( First Prime Minister of India)पं. नेहरू यांचे समर्थक व विरोधक दोघांनी जरूर वाचावे असे आश्चर्याचे धक्के देणारे एक नवे पुस्तक.
http://www.orkut.com/AlbumZoom.aspx?uid=44441327930350077&pid=1207574261...
खुलासा:
ही माहिती मी एक जागरूक वाचक ह्या नात्याने देत आहे व माझा लेखक/प्रकाशक यांच्याशी कुठलाच संबंध नाही व त्यांनी मला नेमलेलेही नाही.लेखकाच्या सर्वच मताशी मी सहमत असेनच असे नाही.दिनांक ६ एप्रिल रोजी नागपूरला पुस्तकावर जाहिर चर्चा झाली.त्यात सर्वश्री मुज़फ्फर हुसेन(पद्मश्री),डॉ. वि.स.जोग,डॉ.कुमार शास्त्री व डॉ.किशोर महाबळ यांनी विचार मांडले.शेवटी लेखक डॉ. नि.र.व~हाडपांडे यांनी शंका समाधान केले. वृत्तांत ७ एप्रिलच्या सकाळ व इतर वर्तमानपत्रांत आला आहे.
18 Apr 2008 - 10:42 am | नीलकांत
देशावर उपकार करण्याची क्षमता कुणातच नाही.
फार फार ह्या लोकांच्या हातात त्याकाळी देशाची सत्ता होती आणि त्यावेळी यांनी चुकांपेक्षा चांगली कामे जास्त केली. म्हणून त्यांचं देशाच्या पायाभरणीत योगदान मान्य करावं. पण स्वातंत्र्यानंतर यांनीच देशाला दिशा दिली... सोबत पुढंचं वाक्य जर का असं असेल की... हे नसते तर देश इथवर आलाच नसता, तर हे मात्र चुक.
देश इथवर आला असताच. देश प्रगती करतो याला जेवढे नेते जवाबदार असतात त्याही पेक्षा देशाची जनता जवाबदार असते. याचा प्रत्यय आपल्या शेजारी देशांकडे पाहून यावा. आमच्या नेत्यांच्या धोरणाला जनतेने उत्तम साथ दिली म्हणून आपण इथवर आलो.
नेहरूंच्या काळीसुध्दा नेहरूंना उत्तम पर्याय उपलब्ध होते. मात्र आता या जर तर ला अर्थ नाही. नेहरुंनी देश निर्माणासाठी खुप कष्ट घेतले हे जसं मान्य करावं तसंच त्यांनी खुप घोडचुका केल्या आहेत हे सुध्दा मान्य करावं.
आज गांधी-नेहरूंना उगाच विरोध किंवा उगाच अनुनय करण्यात राजकिय सोडला तर अन्य कसलाच फायदा नाही.
ते होते त्यांनी त्यांचं योगदान दिलं, त्यांच्या पंचवार्षीक योजने दरम्यान उभारलेल्या बहुद्देशीय प्रकल्पांचा लाभ आजही होतो आहे, त्यांनी देशाला नवी दिशा दिली. मात्र त्याच वेळी त्यांच्या स्वप्नाळू भुमिकेमुळे काश्मिर प्रश्न रेंगाळला आहे, चीनचं आक्रमण आणि पराभव यांचं श्रेय सुध्दा त्यांचंच. याच शल्यात ते गेले.
असे अनेकानेक मुद्दे येथे देता येतील. विषयांतर होईल म्हणून थांबतो.
आपला चर्चा विषय आहे की भारताला तरूण पंतप्रधान हवा की नको. लायकी वयानुसार ठरते की नाही.
नीलकांत
18 Apr 2008 - 11:05 am | आनंदयात्री
विषयांतराबद्दल क्षमस्व पण राजकारणासारख्या विषयावरसुद्धा लिहीतांना त्याच्या लिखाणात कधीच कुठला अभिनिवेष नसतो, नीलकांताचे कौतुक वाटते. :)
मी स्वत: प्रयत्न करुनही अजिबात साध्य करु शकलो नाही आजतागायत. अभिनंदन नीलकांत.
18 Apr 2008 - 7:46 am | विद्याधर३१
तरुण रक्त वगैरे ठीक आहे. पण डायरेक्ट पंतप्रधानपद ??
आपण लायक आहे हे सिध्द तरी करुद्या की त्याला. सुमार केतकराना वाटले म्हणून राहूल आणी प्रियांका काही लायक ठरत नाही.
विद्याधर
18 Apr 2008 - 9:51 am | विसोबा खेचर
छान चर्चा सुरू आहे, वाचून जरा टाईमपास झाला! ;)
बाकी, हल्लीचं राजकारण हा माझ्या आवाक्याबाहेरचा आणि बुद्धीपलिकडचा विषय आहे...
चालू द्या...
तात्या.
18 Apr 2008 - 11:30 pm | एक
आजचं राजकारण आणि बुद्धी यांचा काही संबंध राहिला आहे का?
बिन मणक्याची पाठ, दोन हात (वरच्यांचे पाय पकड्ण्यासाठी) आणि जीभ (वरच्यांचे *** चाट्ण्यासाठी, किंवा गुणगान गाण्यासाठी) असली कि पुरे..
*** == वरच्याच्या मनात येईल तो अवयव.
यापैकी कुठलही क्वालिफिकेशन तुमच्या आमच्याकडे नाही. त्यामुळे आपण बाहेरच बसलेलं बरं, काय म्हणता?
18 Apr 2008 - 10:25 am | नीलकांत
भारतात निवडून आलेला कुणीही पंतप्रधान होऊ शकतो. लोकसभेच्या निवडणूकीसाठी उभे राहण्याची वयाची पात्रता आहे २५ वर्षे. ती राहूलनी पुर्ण केली आहेत. येत्या निवडणूकीत जर का तो बहूमत (आता हे शक्य नाही) किंवा बहूमताच्या जवळ जर गेला आणि त्याची इच्छा झाली पंतप्रधान व्हायची तर त्याला अडवणार कोण?
याचा अर्थ मला या देशाचा पंतप्रधान केवळ राहूलच व्हावा असं वाटतं असं नाही. मात्र राहूल गांधी पंतप्रधान झाल्याने देशाचं काही नुकसान होईल असंही वाटत नाही. उलट झालंच तर , राहूलला आपल्या खुर्चीची चिंता नसल्यामुळे तो जास्त निश्चिंतपणे भारताच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकेल असं वाटतं.
सध्या देशाची परिस्थिती पाहता, प्रादेशीक पक्षांना आलेलं महत्व लक्षात घेऊन असं म्हणता येईल की कुठलाही एक पक्ष बहूमतात येणं शक्य नाही. त्यामुळे येत्या काळात ज्याला जास्त गतीनं आणि योग्य असं राजकारण करता येईल तो पंतप्रधान पदाच्या जवळ जाईल. ह्यात मात्र राहूल कच्चा असण्याची शक्य आहे. कारण अशी गळेकापू स्पर्धा त्याने कधीच अनुभवलेली नसेल.
राहूलसाठी मार्ग मोकळा व्हावा म्हणून काही वर्षांपुर्वी खुप फार्मात असलेल्या ज्योतिरादित्य शिंदेंना मध्यप्रदेशात लक्ष केंद्रीत करण्यास सांगण्यात आले. कॉग्रेसच्या परंपरेप्रमाणेच सारं घडतंय.
सध्या राहूल आपला ग्रुप बनवताहेत, सचिन पायलट, मिलींद देवरा आदी नवी मंडळी सुध्दा सोबत आहेत.
ज्यांना काँग्रेस आवडत नाही त्यांनी निवडणूकीत कॉग्रेसला हरवावं. म्हणजे वादच मिटला.
या चर्चेत केवळ एवढंच सांगावसं वाटतं की कॉग्रेस परिवार म्हणजे देशाचे शत्रु वगैरे असं काही नाही हो. गेल्या तीन पिढ्यांपासून त्यांनी या देशाला योगदान दिले आहे. त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करणार्या परिवारांतून सुध्दा आता युवराज आणि युवराज्ञी समोर येताहेत. या युवराज्ञी बद्दल वरचाच उल्लेख करता येईल की प्रमोद महाजनांच्या मुलीच्या नावात महाजन कायम ठेवून मग त्यांना समोर आणल्या गेले आहे. गोपीनाथरावांचे सुपुत्र सुध्दा राज्यस्तरीय पदाधिकारी आहेत. 'परिवारा'च्या भाषेत जवाबदारी किंवा दायित्व असा शब्द आहे.
आपण लायक आहे हे सिध्द तरी करुद्या की त्याला. सुमार केतकराना वाटले म्हणून राहूल आणी प्रियांका काही लायक ठरत नाही.
हे मात्र पटले, केतकरांना काय वाटतं हे मात्र कुणीही सांगू शकतो. ;-)
सोबतच काही नावं देतो पंतप्रधान झालेल्यांची, देवेगौडा, चंद्रशेखर आणि इंद्रकुमार गुजराल.
नीलकांत
18 Apr 2008 - 10:39 am | आनंदयात्री
>>या चर्चेत केवळ एवढंच सांगावसं वाटतं की कॉग्रेस परिवार म्हणजे देशाचे शत्रु वगैरे असं काही नाही हो.
अम्म्म .. टु बी डिप्लोम्याटीक .. ते देशापेक्षा स्वतःचे जास्त मित्र आहेत.
>>गेल्या तीन पिढ्यांपासून त्यांनी या देशाला योगदान दिले आहे.
अहो राजकारण हा पिढीजात धंदा आहे त्यांचा !
18 Apr 2008 - 10:58 am | मदनबाण
टु बी डिप्लोम्याटीक .. ते देशापेक्षा स्वतःचे जास्त मित्र आहेत.
ज्याला जे मिळेल ते त्याने ओरबाडुन घ्यावे अजुन काय !!!!!
हे राजकारणी म्हणजे आपल्या देशाला चिकटलेली गोचीड आहेत.....
(१०० मै से ९९ धोकेबाज ) असे समजणारा.....
मदनबाण
18 Apr 2008 - 4:30 pm | इनोबा म्हणे
'आम्ही पंतप्रधानपदासाठी इच्छूक नाही' असे आम्ही आत्ताच जाहीर करतो. मागाहून उगाच वाद नकोत.
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
19 Apr 2008 - 4:40 pm | अजय जोशी
आज कोणीही महात्मा नाही, नलिनी म्हणजे नथुराम नाही.
आपला
बे-सुमार
अजय जोशी