खमंग लसूण चटणी --

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
11 Oct 2010 - 12:25 pm

From

साहित्य:- खिसलेले खोबरे एक वाटी,लसूण पाकळ्या दहा-बारा, जिरे एक टे. स्पुन,
मिठ चविनुसार, लाल मिरची पावडर एक टे. स्पून.

कॄती:- खोबरे थोडे भाजून घ्यावे.गार होवु द्यावे. आता वरील सर्व साहित्य एकत्र करुन
कुटावे. खमंग लसूण चटणी तयार.
ही चटणी..ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी बरोबर ..चटणीत तेल किंवा गोड दही घालुन खावी.
ही चटणी आम्ही हुरड्याबरोबर खातो.

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

11 Oct 2010 - 12:34 pm | परिकथेतील राजकुमार

जबर्‍या !!!

स्वैर परी's picture

11 Oct 2010 - 12:47 pm | स्वैर परी

चटणीचा सुवास इथपर्यन्त आलाय हो!

पैसा's picture

11 Oct 2010 - 7:32 pm | पैसा

आणि भूक खवळली! चटणीवर कच्चं तेल हवं. म्हणजे आहा!

नगरीनिरंजन's picture

13 Oct 2010 - 11:39 am | नगरीनिरंजन

तेल घालून बाजरीच्या भाकरीबरोबर खायची.. ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म....

माझी सगळ्यात आवडती चटणी :)

निवेदिता ताई, खोबर सुकच घेतलत ना ?
मी सुक खोबर घेते आणि लसूण पुर्ण सोलत नाही. थोडी चिकटलेली साल राहू देते. त्यमुळेही छान होते चटणी. मी जिरे नाही टाकत. थोडी साखर टाकली की अजुन चव येते.
हीच चटणी मिरचीपुड ऐवजी मिरे घालुण पण करता येते. मिर घालून केलेली चटनी बाळंतीणीसाठी पौष्टीक असते.

लसूण पुर्ण सोलत नाही. थोडी चिकटलेली साल राहू देते.

+१

थोडी साखर टाकली की अजुन चव येते.

न्हाय बा. ही चटणी कशी झणझणीतच असली पाहिजे.. पण हे फक्त माझं मत.
नो ऑब्जेक्शन टु जागुतै.

ज्वारीची भाकरी, लसूण चटणी, त्यावर शेन्गदाण्याचे तेल आणि सोबत ज्वारीचा निखार्‍यावर भाजलेला पापड! व्वा! जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

स्वाती२'s picture

11 Oct 2010 - 4:16 pm | स्वाती२

नुसता फोटो बघूनच जीभ खवळली!

थोडी साखर म्हणजे अगदी चिमुटभर त्यामुळे थोडी चव लागते. बाकी ही झणझणीतच लागते.

ह्या चटणीवर करडईचे तेल घालुन भाकरी/गरम गरम चपातीबरोबर खाण्याची मजा वेगळीच.

स्पंदना's picture

12 Oct 2010 - 9:31 am | स्पंदना

नो जीरे पण थोडी कोथींबिर पण ठेचुन पहा अन मग भाकरी बरोबर्...हं मला भाकरी हवीय ,,आत्त्ता..

फोटो टाकला नसता तरी चालल असत, हाल हाल होतायेत.

खादाड_बोका's picture

13 Oct 2010 - 2:28 am | खादाड_बोका

माझी सगळ्यात आवडती चटणी ...पण मी त्यात साबुत सुकलेली लाल मिरची वापरतो.