नमस्कार्,नमस्कार,
गेली दोन तीन दीवस एक पुस्तक वाचतो आहे.त्यात एका चॅप्टरमधे एका व्यक्तीवर टीका करण्यात आली आहे.टीका म्हणजे साधीसुधी टीका नाही,सर्व मर्यादा ओलांडुन टीका करण्यात आली आहे.लेखकाने त्या व्यक्तीबद्दल जनसामान्यांत असलेल्या अफवांना त्या व्यक्तीच्या स्वभावाशी जोडले आहे.म्हणजे एखादी घटना सांगताना त्या अफवेचा वापर दाखला म्हणुन करण्यात आला आहे.जी अफवा अत्यंत धक्कादायक व त्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्याशी संबंधीत आहे.
त्या व्यक्तीशी लेखकाची झालेली मुलाखत लेखकाने लिहली आहे,त्यात त्या व्यक्तीच्या विचारांपासुन ते उच्चारापर्यंत सर्व बाबतीत उपहासात्मक टीका केली आहे.
असो,तर हे पुरेसे आहे.
मी जे पुस्तक वाचतोय त्याचे नाव कींवा कसलेही वर्णन मी ईथे देउ शकणार नाही.
'ती व्यक्ती कोण?'
तर ती व्यक्ती म्हणजे भारतातली,कदाचित,सर्वात प्रभावी व्यक्ती आहे,मला स्वःताला अगदी लहानपणापासुन आतापर्यंत त्या व्यक्तीबद्दल खुपशी माहीती आहे.ह्या व्यक्तीला एक शब्दही उलट बोलला जात नाही,त्या व्यक्तीबद्दल असे लिखाण???
जेव्हा मी सर्वात पहीले धक्कादायक वाक्य वाचले तेव्हा ह्या वाक्याचा अर्थ मला समजला नसेल अस मानुन ईकडे तिकडे अर्थ बघितला पण मला समजला तो अर्थ सोडुन दुसरा अर्थ शक्यच नव्हता.मी चक्रावलो.ते वाक्य ध्यानातुन काढुन पुढे दहा बारा पाने वाचली तर काय.....धड्डाsssssssम धुडुडुम......................एकावर एक धक्कादायक वाक्ये वाचायला मिळत होती.
एखादा लेखक त्या व्यक्तीबद्दल असे लिहुच कसे शकतो??
मला ह्याचे १ टक्का तर 'अरे तरीही काहीच विरोध झाला नाही ह्या पुस्तकाचा??? दंगे कसे झाले नाहीत??' ह्याचे १००० (हजार) टक्के आश्चर्य वाटले.
मला पडलेले काही प्रश्न :
१) मी Non-fiction ह्या श्रेणीत मोडतं म्हणुन हे पुस्तक आणल.पण 'हे काल्पनिक आहे' अस म्हणुन तर ह्या पुस्तकाला माफी मिळाली नाही ना??
मग सर्वच पुस्तकांना तसे बोलुन सोडुन टाका,तेव्हा मात्र दंगे का करता?
२)ज्या व्यक्तीला माहीतेय की हा माझी मुलाखत पुस्तकात छापण्यासाठी घेतोय्,मग त्या व्यक्तीने ते पुस्तक कधीच वाचले नाही?
आणि वाचले तर ती व्यक्ती स्वस्थ कशी बसली?
३) हे पुस्तक दुर्लक्षित झाले असेल हे तर पटतच नाही,कारण हे खुप प्रसिध्द पुस्तक आहे.
मग असे कोणते स्वातंत्र कींवा ताकद लेखकाकडे होती की त्या व्यक्तीला विरोधच करता आला नाही???
नोंद :
१) कृपया प्रश्नाचे उत्तर गंभीरपणे द्यावे.
२)पुस्तक व लेखकाबद्दलची माहीती कुठल्याही माध्यमातुन पुरवली जाणार नाही.
प्रतिक्रिया
10 Oct 2010 - 6:11 pm | शानबा५१२
अरे कुणी प्रतिक्रीया देत का प्रतिक्रीया??
कुणी आहे का???
जन्मात पहील्यांच कुठल टाईम पास म्हणुन पुस्तक वाचल तर हे असल!!
आणि रहावलच नाही म्हणुन ईथे प्रश्न विचारला तर हे लोक असले!!
टु बी ऑर नॉट टु बी ईट ईज द Q!!
12 Oct 2010 - 3:07 am | अविनाश कदम
पुस्तक गेल्या पाच सहा वर्षात अनेकांनी वाचलय. कुणालाच काही आक्षेपार्ह वाटलं नाही. अनेक प्राध्यापकांनी ते शिकवल. त्यांनाही तेव्हा काही आक्षेपार्ह वाटलं नाही मग आताच का गदारोळ? कुणा बालकाच्या बोळ्याने दुध पिण्यापेक्षा आपल्या स्वत:च्या बुद्धीवर विश्वास ठेवावा हे चांगले. मराठीत वासुनाका पासून गोलपीठा पर्यंत अशी अनेक पुस्तके आली आहेत. कोणी फारसा गदारोळ केला नाही. आणि त्या महान व्यक्तींच्या भक्तांच्या टोळक्यात जाऊन जरावेळ उभे रहा दर वाक्यागणीक एक दोन तरी आई-भैनी वरून शिव्या ऐकायला मिळतील. आपण आपली खाजगीतली भाषा तपासून पहावी. सगळ्यांचीच भाषा बिघडलीय त्यात त्या बिचार्या लेखकाचा काय दोष.
मिपा तर्फे भाषाशुद्धीची चळवळ आता सुरू करा म्हणजे प्रश्न सुटेल तरी. .
12 Oct 2010 - 11:18 am | शानबा५१२
ही व्यक्ती कोण??
तुम्ही कदाचित मी खाली एका प्रतिसादात लिहलेल्या पुस्तकबद्दल बोलत आहात.पण मी हा लेख त्या पुस्तकासंबंधात लिहला नाहीये.
त्या पुस्तकात वापरलेली भाषा व काही व्यक्तीबद्दल वापरलेले अपशब्द मी तुम्हाला मराठीत लिहुन पाठवु शकतो.वाचायचे असल्यास कळवावे.
म,भ,च ह्या शब्दांवरुन सुरु होणारे शब्द(शीवी) एखाद्या मराठीचे नेतृत्व करणा-या नेत्याबद्दल काढणे कींवा ईतर कोणाबद्दलही कोणताही चांगला उद्देश नसताना काढणे योग्य आहे का?
आणि हे पुस्तक (ज्याबद्दल आपण बोलत आहात) ,such a long journey ,शिकवण्यात आलय का? की फक्त आभ्यासक्रमात सामिल करायच्या गोष्टी झाल्या व नंतर कुलगुरुंनी ते नाकारल?
13 Oct 2010 - 2:24 am | अविनाश कदम
Such a long journey हे पुस्तक १९९१ सली प्रसिद्ध झालं आहे. त्याला गव्हर्नर जनरल अवार्ड, कॉमनवेल्थ रायटर्स अवार्ड इ. काही अवार्ड मिळाले आहेत. बुकर प्राइजसाठी हे पुस्तक सुचवलं गेलं. जर्मन, स्विडीश, नॉर्वेजीयन, दॅनिश, जपानी इ. भाषातून व मराठी व हिंदी इ. भारतीय भाषातूनही ते भाषांतरीत झालं आहे. १९९८ ला त्यावर एक फिल्मही निघाली. पण गेल्या वीस वर्षात हे पुस्तक वादग्रस्त ठरलं नाही. समिक्षकातही व सामान्य वाचकातही.
२००७ पासून ते मुंबई विद्यापीठाच्या दुसर्या वर्षाच्या बीए साठी लावलेलं आहे.बर्याच कॉलेजातून शिकवलं गेलं आहे. यावर्षीही शिकवलं गेलं. अशावेळी शैक्षणीक वर्ष अर्ध संपलेलं असतांना ते अभ्यासक्रमातून अचानक काढून घेणं, तेही योग्य ती अधिकृत प्रक्रीया न राबवता. बाळराजेंनी निषेध केल्यावर २४ तासात ते पुस्तक अभ्यासक्रमातून काढून घेतल्याचं कुलगुरूंनी जाहीर करावं हा प्रकार आश्चर्यकारक आहे. म्हणजे राजकारण करण्यासाठी वा राजकारणात कुणाला तरी लॉंच करण्यासाठी मधून मधून पुस्तकांवर बंदीचे कार्यक्रम असे सगळ्याच पक्षाचे लोक घ्यायला लागले तर विद्यार्थ्यांचं काय होणार. शैक्षणिक वर्ष सुरू होतांना वा संपल्यावर योग्य प्राक्रीया राबवून (अॅकाडमिक कौन्सीलच्या संमतीने) पुस्तक अभ्यासक्रमातून काढून घेतलं असतं तर कुणाच्या लक्षातही आलं नसतं विद्यापीठ अधून मधून असे निर्णय घेतच असते.
सुकेतू मेहताचं पुस्तक येऊनही सहा वर्ष झाली त्याबद्दल वाद झालेला आठवत नाही. संबंधित व्यक्तींनीही वाद उपस्थित केलेला नाही मग आताच हा वाद का उकरून काढला जातोय? की इंग्रजी पुस्तकात काहीही लिहीलेलं असलं तर ते योग्य व लय भारीच असणार असा मराठी माणसाचा समज आहे?. मधेच कुणी राजकारण्यानी वाद उपस्थित केल्यावर गदारोळ करणार ? किती दिवस आपला भेजा गुडघ्यातच राहू देणार? कधीतरी त्याला डोक्यात बसवा.
13 Oct 2010 - 9:11 am | शानबा५१२
मी हे पुस्तक आधीही वाचले आहे,म्हणजे काही परीच्छेद एकाने दाखवले होते.
पण हे पुस्तक आभ्यासक्रमात असेल अस वाटल नव्हत व आता समजलय तेव्हा खरच आश्चर्य वाटत.
आपल्या माहीतीबद्दल धन्यवाद.
पण आपले मत काय आहे हे पुस्तक आभ्यासक्रमात असाव का?
राजकीय भांडवल बनवल जात असेल्,पण विरोध योग्य आहे,पण उशीरा आलेली जाग उपयोगी पडली,निदान ह्यापुढे तरी ते विकृत पुस्तक आभ्यासक्रमात नसेल.
मी कोणताही वाद उकरत नाहीये,मला माहीती करायच होत की असा एखादा कायदा कींवा कलम आहे का की ज्याच्या आधारावर लेखकाला अस लिहण्याचा अधिकार्,सुट कींवा पळवाट मिळते.
मी असल्या प्रकारात मोडणारी पुस्तके वाचली नसल्याने पहील्यांदा वाचुन खुप आश्चर्य वाटल ईतकच.
हे पुस्तक पहील्यांदाच आभ्यासक्रमात येतय असे एखा चुकीच्या माहीतीमुळे कळले.
धन्यवाद.
14 Oct 2010 - 1:47 am | अविनाश कदम
ही एक कादंबरी आहे साहित्यकलाकृतीबाबत नियम बरेच शिथील आहेत. विषेशत: या कादंबरीत जी व्हल्गर भाषा आहे तशी सध्या साहित्यप्रकारात सर्रास रूढ झाली आहे मराठीत ती भाऊ पाध्ये, नामदेव ढसाळ इ.नी ४० वर्षांपूर्वीच आणली. मधून मधून टिका होते. ती करण्याचा कोणालाही अधीकार आहेच.
काल्पनिक कथा असेल तर त्यातील तपशील व राजकीय मते याबाबतही कोणी फारसे गांभिर्याने घेत नाही. हे पुस्तकही फार महान आहे असं माझं मत नाही. पण ते विद्यापीठाच्या अकाडमिक काउन्सील मधील लोकानी (सुमारे १०० असतात) बहुमताने निवडलेलं पुस्तक आहे. अभ्याक्रमात हे एकच नव्हे तर इतरही दोन तीन आहेत. त्यामुळे हे पुस्तक शिकवायचे की नाही याला ऑप्शन आहे. ज्या कॉलेजांना व विद्यार्थ्याना हे पुस्तक निवडायवे ते निवडू शकतात वा डावलू शकतात. मुद्दा आहे तो ज्याप्रकारे हे पुस्तक अचानक एका रात्रीत अभ्यासक्रमातून काढले गेले त्याबद्दल. शिवाय पुस्तक वीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालं आहे. येवढ्या काळात या पुस्तकावर कोणीच का (पक्षाच्या धुरीणांपैकीही) टिका केली नाही?
10 Oct 2010 - 6:17 pm | वेताळ
ठिक आहेस कारे?
10 Oct 2010 - 6:17 pm | पैसा
म्हणजे ते प्रसिद्ध झालेलं आहे. मग तुम्ही नाव का देत नाही? आपण नेमकं कशाबद्दल बोलतोय हे तरी लोकाना कळू द्या ना!
10 Oct 2010 - 6:22 pm | शानबा५१२
धन्यवाद हो खरच!!
अहो ती व्यक्ती म्हणजे अंगार आहे अंगार!!!!!:-)
मला खरच सांगावस वाटत नाही,मी स्वःता त्या व्यक्तीचा आदर करतो.
त्या पुस्तकात ईतरही खुप व्यक्तीबद्दलच्या घटना आहेत काही माहीती होत्या,पण ज्या नव्याने माहीती झाल्या त्या खुप रोचक होत्या.
माझा प्रश्न एकच आहे की,एखाद्या पुस्तकावर वादळ का उठत नाही??
मग हा न्याय सर्व पुस्तकांना लागु करा की!
10 Oct 2010 - 7:09 pm | नावातकायआहे
>>म्हणजे ते प्रसिद्ध झालेलं आहे. मग तुम्ही नाव का देत नाही? आपण नेमकं कशाबद्दल बोलतोय हे तरी लोकाना कळू द्या ना!
हेच म्हनतो....
10 Oct 2010 - 6:20 pm | वेताळ
कोणत्या स्टॉलवर घेतले? नाव कोणत्या माध्यमातुन कळु न देण्या लायक ते पुस्तक येलो पेजेस कॅटगरीत मोडते काय?
10 Oct 2010 - 6:25 pm | शानबा५१२
वेताळभाउ व्यनी बघा.
आणि द्या उत्तर!!
10 Oct 2010 - 6:43 pm | धनंजय
कितीतरी पुस्तके असतात, आणि त्यांत वैविध्यही खूप असते. बरीच पुस्तके "प्रसिद्ध" झाली तरी तशी थोड्याच लोकांना ठाऊक असतात. ठाऊक नसली तर प्रतिक्रिया कशी उमटणार.
कुठल्या पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया तीव्र होते, हे थोडे कोडेच आहे. कदाचित "तीव्र प्रतिक्रिया" सुरुवातीला संघटित कराव्या लागतात. तशा चळवळींची संघटना करायचे कौशल्य थोड्याच लोकांपाशी असते, आणि त्या लोकांपाशी वेळही मर्यादित असतो (दिवसात २४च तास). चळवळीची साधने कितीही म्हटली तरी मर्यादित असतात. म्हणजे वर्तमानपत्राची पाने मर्यादित असतात, गुंडांची संख्या मर्यादित असते... वगैरे. (वर्तमानपत्रांत टीका->->दंगल. या प्रचंड "रेंज"मध्ये कुठल्या प्रकारची जहाल प्रतिक्रिया होण्याची अपेक्षा तुम्हाला आहे? मला ठाऊक नाही. ते पुस्तक, "ती व्यक्ती" वगैरे काहीच माहिती नाही.) पण कुठली का प्रतिक्रिया असेना, त्यासाठी साधने मर्यादितच असतात. ती कौशल्ये आणि साधने ज्या व्यक्तींच्या हातात आहेत, ते थोडे व्यक्ती ठरवू शकतात : अमुक पुस्तकाच्या विरोधात कुशल संघटित प्रतिक्रिया चालू करू.
10 Oct 2010 - 7:52 pm | ज्ञानेश...
'ताकाला जाऊन भांडे लपवणे' यालाच म्हणत असावेत.
11 Oct 2010 - 12:54 am | चिंतामणी
:D :D: D :D: D :D: D:D :D: D:D:D: D:D:D: D:D:D: D:D:D: D:D:D: D:D:D: D:D:D: D:D:D: D:D:D: D:D:D: D:D:D: D :D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D
=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))=))
11 Oct 2010 - 1:02 am | शानबा५१२
'ताकाला जाऊन भांडे लपवणे'
म्हणजे काय??
'आलिया भोगासी असावे साधनं' मला हेच समजत.
11 Oct 2010 - 9:04 am | llपुण्याचे पेशवेll
आलिया भोगासी असावे सादंर असे म्हणायचे आहे का रे तुला?
11 Oct 2010 - 1:10 pm | शानबा५१२
साधन म्हणजे उपाय वगैरे अस समजत होतो.
सादंर म्हणजे काय?
धन्यवाद्,पुन्हा कधी अस काही लिहायच्या भानगडीत पडणार नाही.
(व्यनीत पुस्तकाबद्दल वाचावे)
11 Oct 2010 - 1:33 pm | विजुभाऊ
सादंर म्हणजे काय?
आलीया भोगासी असावे सादर
याचा अर्थ एखादी आपत्ती आली तर त्यास स आदर ( योग्य आदर दाखवत) सामोरे जावे
सादर = स आदर.
सादर करणे = दाखवणे /मांडणे उदा: पुरावा सादर करणे. कार्यक्रम सादर करीत आहोत
11 Oct 2010 - 5:29 pm | शानबा५१२
आपल्यासारखे माहीतीगार मिपाकर असेल तर मराठीतल्या (माझ्या) खुपश्या चुका मला सुधारता येती.
धन्यवाद विजुभाउ.
10 Oct 2010 - 8:07 pm | नगरीनिरंजन
>>पुस्तक व लेखकाबद्दलची माहीती कुठल्याही माध्यमातुन पुरवली जाणार नाही.
मग ज्या व्यक्तीबद्दल लिहीलंय तिचं नाव सांगा.
तुम्हाला सगळा तपशील माहिती असूनही कळाले नाही की लेखकाकडे अशी काय शक्ती होती तर काहीच माहिती नसताना बाकीचे काय सांगणार? माझ्या अंदाजाप्रमाणे लेखकाकडे सत्याची ताकद असेल आणि जिच्याबद्दल लिहीलंय त्या व्यक्तीला ते छापल्याने काहीच फरक पडत नसेल.
11 Oct 2010 - 12:35 am | शानबा५१२
मी सर्व प्रतिसाद देणा-यांना ते पुस्तक व ईतर सर्व उदाहरणासहीत व्यनीत सांगितले आहे.
पण तसे करताना मी लेखात जे लिहले आहे त्याच्या विरुध्द वागलो हे मला चुकीच वाटत.
सॉरी
11 Oct 2010 - 3:32 am | शहराजाद
अहो तुम्ही लेखात पुस्तकाचे नाव, भाषा, व्यक्तीचे नाव, लेखकाचे नाव, काय टीका केली आहे, कुठली अफवा काही काही म्हणून सांगितलेले नाही. त्यामुळे प्रतिक्रियादेखिल त्या विशिष्ट पुस्तकाबद्दल न देता सर्वसामान्य कुठेही लागू होईलशी देत आहे.
सज्जनांनी अफवांवर आधारीत पुस्तके लिहू नये.
पुस्तकांतील सत्याधारित लेखनही हीण व हिणकस नसावे.
पुस्तकांचे तेल, पाणी व सैल बांधणीपासून रक्षण करावे.
असत्याधारित व हिणकस वाटणार्या पुस्तकावर तीन- तीन दिवस फुकट घालवू नयेत.
अर्थात ही माझी वैयक्तिक मते आहेत बरे.
11 Oct 2010 - 3:46 am | सुनील
असत्याधारित व हिणकस वाटणार्या पुस्तकावर तीन- तीन दिवस फुकट घालवू नयेत
सहमत.
11 Oct 2010 - 4:49 am | कौशी
आम्हाला पण व्यनीव्दारे माहिती द्या...
11 Oct 2010 - 9:23 am | Nile
तिच्यायला, लेख वाचुन बसलेल्या धक्क्याने हार्ट अॅटॅक आला!
11 Oct 2010 - 9:32 am | श्रीकान्त ताकवले
आम्हाला पण व्यनीव्दारे माहिती द्या...
श्रीकान्त
11 Oct 2010 - 10:25 am | भारतीय
नेहमीप्रमाणेच छान लेखन.. पुस्तक परिक्षण कसे असावे याचा उत्तम नमुना.. वाचताना गुंग होऊन गेलो होतो.. पुढील लेखनास शुभेच्छा..
11 Oct 2010 - 7:54 pm | शानबा५१२
जेवढ्यावेळा वाचलं तेवढ्यावेळा हसलो.
थॅन्क्स.
11 Oct 2010 - 12:43 pm | sagarparadkar
कॄपया व्य. नि. तून मलापण कळवा ...
11 Oct 2010 - 2:55 pm | सर्वसाक्षी
सामुहिक व्य नि ची व्यवस्था संपादक/ संचालक वगैरेंमार्फत करुन घ्या आणि एकच महा व्यनि करा. यामुळे आपल्या लेखाची गोपनियता अबाधित राहिल आणि समस्त मिपाकरांचे कुतुहलनिरसनही होईल.
11 Oct 2010 - 3:05 pm | प्रशु
हे तेच पुस्तक आहे क जे मुंबई विद्यापिठाने नुकतेच अभ्यास्क्रमातुन काढुन टाकले?
11 Oct 2010 - 5:13 pm | शानबा५१२
नाही ते हे नाही.
त्याचे नाव Such a long journey
- Rohinton Mistry
ह्याबद्दल न बोललेले बरे,भयंकर आहे.
मी काही परीश्चेद वाचले,अस का लिहलय माहीती नाही.पण भाषा वाचुन आ वासायला होईल इतक शिवराळ्,अश्लिल व असभ्य लिहल आहे. उद्देश ठाउक नाही.
11 Oct 2010 - 5:53 pm | हापुस आम्बा
आम्हाला पण हे पुस्तक कोणते हे जाणून घ्यायचे आहे. कोणाबाबत आहे?
11 Oct 2010 - 6:08 pm | अर्धवट
हे पुस्तक मी लिहिलेले आहे अशी कुजबूज कानी आल्यामुळे खुलासा करत आहोत..
सदर पुस्तक मी लिहिलेले आणि वाचलेलेही नाही
11 Oct 2010 - 6:29 pm | Nile
तुम्हाला चुकीची माहिती मिळालेलीए दिसते. पुस्तक तुमच्या बद्दल आहे असे मला कळाले. तुम्ही खरेच, जे तुमच्याबद्दल लिहले गेले आहे, तसे केले आहे का?
(व्यनीतुन कुठलाही खुलासा मागु नये)
11 Oct 2010 - 6:43 pm | तिमा
मागे एकदा फक्त सर्वनामे वापरुन कोणीतरी एक कथा लिहिली होती त्याची आठवण आली.
बाकी चालू द्या.
11 Oct 2010 - 7:29 pm | कळस
नाव उघडपणे घ्यायचे नव्हते म्हणून मागे संसदेत एका महीला सदस्याने आयडीया केली..
"म.प्रदेश के मुख्यमंत्री ,जिनका नाम मैं सदनमे नही बताना चाहती, ..."
पाहूया कोणी मिपाकार काही आयडीया लढवतो का...
बाकी चालू द्या,असेच म्हणतो..