मुगाची खिचडी आणि फोडणी

रतन's picture
रतन in पाककृती
10 Oct 2010 - 3:51 pm

रामराम मन्ड्ळी.

मिपा वरील हे माझे पहिलेच लेखन. मिपची आणि माझी गाठ आन्तरजालावरती मिसळची पाकक्रुती शोधताना पडली. मिपा वरील अनेक पाकक्रुती पाहून या कट्याच्या प्रेमात पडलो. हिन्दुस्थानात लग्न होइपर्यन्त खाणवळीत पोट भरत होतो लग्न झाल्यावर बायकोच्या हातचे आयते पदार्थ गिळत होतो.

साइटनिमित्त देशाच्या बाहेर पडलो आणि खायचे वान्धे झाले. मग बोंबलत आन्तरजालावर पाकक्रुती शोधत हिण्डू लागलो. प्रवास शेवटी मिपा वर येउन थबकला आणि आम्हि इथेच वस्ति करयचे ठरवले. विश्वास ठेवा, मी प्रथम आठवडाभर मिपावर फक्त पाकक्रुतीच आहेत असे समजत होतो. नन्तर येथिल विविधता पाहुन इथला सदस्य होण्याचा निर्णय घेतला.

मिपाचा सदस्य झालो तेव्हा नविन भप्कर प्रकरण चालु झाले आणि मी या परिवारचा सदस्य बनु शकेन का? असा प्रश्न पडला आणि मी थांबलो. तरी मिपावर रोजच पडिक आसयचो.

शेवटी सगळ्या शंका मिटल्या. असो. जरी मिपावरिल बल्लवचार्यांच्या क्रुपेमुळे थोडफार स्वयंपाक जमत असला तरी सुरवातीच्या दिवसांमधे मुगाच्या खिचडीने माझ्या पोटला आसरा दिला.

सहित्य :
खिचडीसाठी
तान्दुळ ३ वाटी
मुगाची डाळ १ वाटी
हळद चिमुट्भर
मिठ
फोडणीसाठी
तेल २ चमचे
लसूण २-३ पाकळ्या
मोहरी १ टीस्पून
जिरे १ टीस्पून
हिन्ग चिमुट्भर
कढीपत्ता ५-६ पाने
मिरची पुड मानवेल तशी

क्रुती :
१. डाळ व तान्दुळ धुवून घ्यावेत.
२. यात साधारणपणे ८ वाटी पाणी टकावे. चवीनूसार मीठ आणि चिमुट्भर हळद टाकून बिनधास्तपणे कुकर लावुन द्यावा. ३. कुकरची एक शीटी झाल्यावर गॅस बन्द करून टाका व थन्ड व्हायची वाट पहा.
४. एका छोट्या कढई मधे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर यात मोहरी टाका. मोहरीचा तडतडण्याचा आवाज आला कि त्यात हिन्ग आणि जिरे टाका.
५. आता या तेलात लसूण आणि कढीपत्ता टाका. लसूण थोडा लालसर होत आला कि त्यात मिरची पुड टाका, मिश्रण ढवळा आणि गॅस बन्द करा. फोडणी तय्यार.
६. आता प्लेट्मधे खिचडी घ्या आणि त्यावर थोडीशी फोडणी टाका. मिक्स करा.
७. सोबत भाजलेला पापड आणि लोणचे घ्या आणि ताव मारा.

अवान्तरः
१. मला साधारपणे मऊ खिचडी आवडते म्हणुन मी जास्त पाणी घालतो.
२. शिजवताना या खिचडीमधे मोड आलेले चणे (छोले नाही) घातले कि खिचडीची चव अफाट वाढते.

प्रतिक्रिया

पैसा's picture

10 Oct 2010 - 4:38 pm | पैसा

बरोबर दही आणि कांदा पण छान लागतो.

कोणीतरी म्हटलेच आहे कि "खिचडी के चार यार, घी, दही, पापड और अचार"

चिंतामणी's picture

10 Oct 2010 - 5:51 pm | चिंतामणी

खिचडीची थोडी वेगळी पा़कृ आवडली.

फटु टाकल्यामुळे खात्री पटली मिपा नियमीतपणे वाचत असणार.

रतनभौ, फटु पाहील्यावर थोडी हळद कमी पडल्याचे जाणवले.

आणि फोडणी जरा जास्त तापली होती का?

रतन's picture

10 Oct 2010 - 7:07 pm | रतन

हळद नक्किच कमी झाली होती. पण फोडणी जरा ब्राउनच होते. कारण आपण उकळत्या तेलात मिरची पूड टाकतो आणि मग गॅस बन्द करतो. पण यातच खरी मज्जा आहे.

सुनील's picture

10 Oct 2010 - 7:46 pm | सुनील

उद्या मुगाची खिचडीच करायचा बेत होता. ही नवी पाकृ मिळाली. बरे झाले!

निवेदिता-ताई's picture

10 Oct 2010 - 9:33 pm | निवेदिता-ताई

"खिचडी के चार यार, घी, दही, पापड और अचार"

मस्त मस्त.........

आणखीही अश्या नवीन खिचडीच्या क्रुती पाहण्य़ात आल्यात.

स्पंदना's picture

11 Oct 2010 - 8:36 am | स्पंदना

भुक लागली ना?

मी करताना तांदुळ कमी अन डाळ जास्त वापरते, कार्बोहायड्रेट पेक्षा प्रथीने जास्त मिळावीत म्हणुन.
फोडणीत नंतर वरुन थोडे खिसलेले खोबरे घालुन पहा छान लागत कुरकुरीत!

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Oct 2010 - 9:47 am | llपुण्याचे पेशवेll

छान वेगळीच पाकृ आहे. आवडेश. लसूण घातलेली खिचडी खाऊन पहायला आवडेल. :)

वसुधा विनायक जोशी's picture

11 Oct 2010 - 9:58 pm | वसुधा विनायक जोशी

खिचडीवर लसणाचि फोड्णी टाकुन खाल्लि आहे पण त्यात तिखट टाकतात हे माहित नव्हते.
कल्पना फारच छान.