दिल्लीत चाललेल्या राष्ट्रकुल खेळांमधिल भारतीय खेळाडुंचे प्रदर्शन पाहुन संपुर्ण जगाने तोंडात बोटे घातली आहेत.खेळाडुंचे प्रदर्शन आणि भारताने केलेला उद्घाटन समारंभ व खेळांचे आयोजन यामुळे 2020 साली होणार्या ऑलंपिक स्पर्धाँचा प्रबळ दावेदार म्हणुन भारत पुढे आला आहे.
भारताची सर्वात जास्त शक्ती ही प्रेक्षकांकडुन मिळणारया पाठिंब्यात आहे.जेव्हा सर्व प्रेक्षक एका सुरात 'जितेगा भाई जितेगा,ईँडीया जितेगा.' आणि 'भारत माता की.....जय!' असे म्हणतात तेव्हा खेळाडू आपली पुर्ण क्षमता पणाला लावतो व त्यातुनच त्याची सर्वश्रेष्ठ कामगिरी होते.राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्याला या गोष्ठीचा वारंवार अनुभव आला आहे.
परंतु काही खेळाडुंना प्रेक्षकांच्या या ध्वनी पाठिंब्यामुळे प्रंचंड दडपण येते आणि त्यामुळे ते एकाग्रता साधु शकत नाही आणि परिणामी त्यांना पराजय पत्कारावा लागतो.अनेक खेळाडुंनी आपल्या पराभवाला यालाच जवाबदार मानले आहे.
याउलट काही खेळाडू मात्र या पाठिब्याचा पुरेपुर फायदा उठवतात आणि देशाला पदक मिळवुन देतात.
10000M RUNNING मध्ये भारताला कास्य पदक मिळवुन देणार्या नाशिकच्या कविता राऊतने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हणले आहे की -"घरच्या प्रेक्षकांचे मला जोरदार समर्थन मिळाले नसते तर मी कदाचीत स्पर्धेत मागे पडली असते आणि आपले पदक हुकले असते..मात्र प्रेक्षकांच्या जबरदस्त पाठिँब्यामुळे मला जोर आला आणि काहीच विचार न करता केवळ सुसाट धावले...आणि मला तिसरे स्थान व पदक मिळाले".
आता अजुन तीन दिवस शिल्लक आहेत .प्रेक्षकांचा पाठिँबाही आहेच.गरच आहे ती फक्त दडपण येवू न देता खेळायची.भारतीय खेळाडू भारतासाठी अजुन पदके मिळवतील अशी आशा आणि शुभेच्छा.
-भूषण कुलकर्णी,
म.ए.सो.रेणावीर माध्यमिक विद्यालय.
अहमदनगर.
प्रतिक्रिया
10 Oct 2010 - 1:44 pm | सुक्या
केवळ उद्घाटन समारंभ चांगला केला की ऑलंपिक स्पर्धाँचा प्रबळ दावेदार होता येत हे जरा कै च्या कै. झाला तेवढा विचका, गेली तेवढी लाज कमी की काय म्हणुन ऑलंपिक भरवावी?
बाकी प्रेक्षकांकडुन मिळणारया पाठिंबा हा खेळाडुला जोश देतो हे खरे आहे. पण स्पर्धेची स्टेडीयम जवळ जवळ रीकामी असतात हे ही आपली उदासिनता दाखवुन देतात.
10 Oct 2010 - 3:38 pm | Bhushan Kulkarni
Jar apan thoda vel kadhun DD SPORT var ekhada khel pahila tar aplyala kalel.
Indian media ne rashtrakulche fakt vait kam dakhvale pan atta sarv kahi apekshepeksha changale chalu ahe yakade matra koni laksha det nahi.
Videshi kheladunchya mate game village he jagatil sarvat changale living complex ahe.
10 Oct 2010 - 5:20 pm | Bhushan Kulkarni
कृपया लेख वाचल्यावर अभिप्राय लिहल्यास आनंद होईल.