टीप देणे

बगाराम's picture
बगाराम in काथ्याकूट
17 Apr 2008 - 7:27 am
गाभा: 

मी सध्या परदेशात राहतो. इथे बर्‍याचदा वेगवेगळ्या हाटेलात जाऊन आम्ही वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असतो. पण इथे टिप देणे हि फार मोठी भानगड आहे. झालेल्या बिलावर १५-१८% टीप देणे जीवावर येते राव. आपल्याकडे ५-१० रुपये टीप दिली की भागायचे पण ५-१० डॉलर नुसते टीपचे द्यावे लागतात तेव्हा नुसता जळफळाट होतो. आमच्या मित्रमंडळात ह्यावर नेहेमीच चर्चा होते की बाकीच्या हॉटेलात ठीक आहे पण 'इंडीयन रेस्टॉरंट' मध्ये गेल्यावर पण तितकीच टीप द्यावी का? तुम्ही काय करता?

-बगाराम

प्रतिक्रिया

शैलेश दामले's picture

17 Apr 2008 - 8:47 am | शैलेश दामले

मी सिन्गपुरला राहतो. येथे बीलात दहा टक्के रक्कम वाढवतात व टीप घेत नाहीत

व्यंकट's picture

17 Apr 2008 - 9:05 am | व्यंकट

अमेरिकेत आहात काय? अमेरिकेत सिस्टीम अनफेअर आहे, ४-६ डॉलर्स ताशी पगार मिळतो. शक्यतो सगळे वेटर्स पार्ट टाईम असतात. मालकानी योग्य पगार द्यायला हवा पण तसे होत नाही, कारण टीप्सचे कल्चर आहे. बसबॉय्स आणि इतर कर्मचार्‍यांबरोबर टीप्स वाटून घ्याव्या लागतात. मी १०% द्यायचो, पण एक मित्र होता तो येथे शिकत होता, तो म्हणाला की यू नीड टू वर्क एज वेटर टू अप्रिशिएट टीप्स. वेटर्स २०% अपेक्षा ठेवतात. ६ पेक्षा अधीक लोक असतील तर १८% बीलात आपोआप ग्रॅच्युईटी मिळवूनच बील येतं. आणि सर्विस म्हणजे काय तर एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणा पर्यंत ताट नेणे. अमेरिकन सरकार ८% टीप्स गृहीत धरून वेटर्सकडून टॅक्स मागतं असं सुद्धा मला त्या मित्राने सांगितलं होतं.

४-५ स्टार मधे गेल्यास डिनर टेबलवर बसल्याबसल्याच टीप देणे अपेक्षीत असते, आणि जातांना पण :) वॅलेट पार्कींग करता सुद्धा द्यावीच लागते.

उपायः १. वेटर सर्वीस असलेल्या हॉटेल्स मधे जाऊ नये.

२. बफे असल्यास टीप्स नाही दिल्यातरी चालतात.

भारतीय, अमेरिकन असं काही नसत टीप्स करता, इट्स जस्ट कल्चर.
मी अस ऐकून आहे की, बर्‍याच युरोपियन देशात टीप्सच कल्चर नाहीये, विशेषतः साउथ आणि इस्ट युरोप.

व्यंकट

स्वाती दिनेश's picture

17 Apr 2008 - 11:58 am | स्वाती दिनेश

बर्‍याच युरोपियन देशात टीप्सच कल्चर नाहीये
मी जर्मनीत राहते आणि इथे टीप दिली जाते.रेस्टॉरंटच काय तर टॅक्सीड्रायव्हरही टीपची अपेक्षा करतो.जर्मनीच नव्हे तर फ्रान्स,इटली,स्पेन आदि देशातही वेटर्सची टीपची अपेक्षा असते.
टीप अजिबात 'न स्वीकारणारे' लोक(म्हणजे आपण बक्षिसी देऊ केली तरी न घेणारे) मी तरी फक्त जपान मध्ये पाहिले आहेत.
स्वाती

व्यंकट's picture

18 Apr 2008 - 9:07 am | व्यंकट

अच्छा, कधी गेलेलो नाही, ऐकीव माहिती आहे.

व्यंकट

धनंजय's picture

17 Apr 2008 - 9:10 am | धनंजय

(येथे तपशील अमेरिकेचा आहे.)

मलाही तसाच डोक्याला त्रास पूर्वी होत असे.

पण काही माहिती कळून वेगळे वाटू लागले. अमेरिकेत बहुतेक मजूर व्यवसायांकरिता तासाला कमीतकमी काही पगार द्यावा लागतो. तसा कायदा आहे. परंतु हॉटेल मजुरांना १५% टीप मिळते असे गृहीत धरून त्यांना कमी पगार दिला तर चालतो. इंडियन रेस्टॉरंटवाले काही वेगळे नाहीत. ही येथील अनिष्ट (पण कायदेशीर) प्रथा आहे. माझ्या मते हॉटेलमालकाने पूर्ण पगार द्यावा आणि मला टीप द्यायची भीड पडू नये.

पण त्या विचित्र कायद्याला वेटर, टेबल पुसणारा पोर्‍या, हे जबाबदार नाहीत. म्हणून त्या अनिष्ट कायद्याला लाथ घातली, तर ती त्यांच्या पोटावर लागू नये. म्हणून मी १५% टीप तरी देतोच. मेनूमधून किमतीला ५% कर आणि १५% टीप = २०% अधिभार जोडतो, ती "खरी" किंमत मानतो. आणि त्या किमतीला परवडला, तरच पदार्थ मागवतो.

(कमीतकमी पगारावर दिवसाला ८ तास काम केले तर उदरनिर्वाह जेमतेम चालतो, हे लक्षात असू द्यावे.)

चतुरंग's picture

17 Apr 2008 - 8:48 pm | चतुरंग

होय मी ही एकूण बिलावर (त्यात ५% टॅक्स असतोच) १० ते १२ % एवढी टीप देतो.
पूर्ण पगार न दिल्याने तिथे काम करणार्‍यांना तोशीस पडते. बरेचदा विद्यार्थीही सुटीत काम करीत असतात.
त्यांना थोडे पैसे आपल्याकडून मिळाले तर हरकत नसावी असे वाटते. त्यामुळे अगदी कायद्यावर डोळा ठेऊन वागण्यात किंवा त्रास करुन घेण्यात अर्थ नाही.

चतुरंग

वरदा's picture

17 Apr 2008 - 9:19 pm | वरदा

इथे काही गुजराथ्यांनी आता एक कॉमन डब्बा ठेवायला सुरुवात केलेय हवी तेवढी टीप टाकायची आणि मग ते वाटून घेतात. तिथे थोडी कमी टाकलॉ तरी चालते. पण नॉर्मल ठीकाणी मिनिमम १५% देतेच्...फक्त रेस्टॉरंट कशाला अगदी ब्यूटी पार्लर मधे गेलं तरी द्यावी लागते की १५%

जर खरोखरच सर्विस चांगली मिळत असेल तर टीप वाढवतो सुद्धा.
पण जर वेटर उर्मटपणा करत असेल. ऑर्डर केलेलं अन्न नीट नसेल तर तर एक डॉलर सुद्धा टीप देत नाही..हे अनुभव मला ९९% भारतीय रेस्टॉरंट मधेच आले..(मी कॅलिफोर्निया संबंधीत लिहितो आहे.. इतर ठिकाणी माहित नाही)

इथल्या भारतीय रेस्टॉरंट मधले वेटर विशेषत: साऊथ ईंडियन हॉटेल्स मधले वेटर्स विलक्षण उर्मट असतात. हा माझा अनुभव आहे. पण हेच वेटर्स गोर्‍या लोकांपुढे लाळ घोटताना पाहिलं आहे. (उत्सुक लोकांनी "पॅसेज टू ईंडिया" मधे जाऊन बघावे).

या उलट पुण्यातल्या उडूपी हॉटेल्स.. कधीही जा. वेटर हसून स्वागत करतो. त्यांना इथल्या वेटर्स पेक्षा प्रचंड काम असतं (हे मी अत्यंत जवळून बघितलं आहे.) त्यांना मात्र मी हात न राखता टीप देतो..

वरदा's picture

17 Apr 2008 - 11:32 pm | वरदा

इथल्या भारतीय रेस्टॉरंट मधले वेटर विशेषत: साऊथ ईंडियन हॉटेल्स मधले वेटर्स विलक्षण उर्मट असतात. हा माझा अनुभव आहे. पण हेच वेटर्स गोर्‍या लोकांपुढे लाळ घोटताना पाहिलं आहे.
१००% सहमत.. असं केलं होतं "चौपाटी" मधल्या एका वेटरने आणि जेवण तर सॉलीड टुकार तिथे नाही दिली मी अज्जिबात टीप....

बगाराम's picture

18 Apr 2008 - 8:03 am | बगाराम

एक रावांना माझा मुद्दा बरोब्बर समजला आहे.

अहो कधी कधी इंडियन रेस्टोरंट मध्ये मालकच जेवण आणून वाढताना बघायला मिळतो मग अश्या वेळेस टीप द्यावी का? कारण मग वरचे सगळे पगारतुन शोषण केलेले मुद्दे वगैरे गैरे ठरतात. अश्यावेळेस वरील लोक काय करतात ते जाणून घ्यायला आवडेल.

-बगाराम