दवाखान्यातील दोन प्रसंग - एक अनुभव

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in काथ्याकूट
9 Oct 2010 - 2:41 pm
गाभा: 

चार दिवसांपूर्वीच माझ्या सात महीन्यांच्या मुलीला फणफणुन ताप आला होता.नुकतेच प्रवासावरुन परत बेंगलोरला आलो होतो आणि येतानाच जाणवले की लेकराला ताप भरला आहे.पण प्रवासाचा शीण असेल आणि थोड्या विश्रांतीनंतर तिला बरे वाटेल असे वाटले.कंपनीमध्ये अगोदरच प्रोजेक्टची डेडलाईन जवळ आल्याने आणि बॉसनेही यांनंतर कृपया रजा घेऊ नको अशी विनंती करुन रजा दिल्याने त्या दिवसाचीही रजा टाकणे मला पटले नसते म्हणुन प्रवासावरुन आल्या आल्यावर पटापट आवरुन कंपनीमध्ये गेलो.कंपनीत जाऊन दोन-तीन तास झालेच नसतील तोवर बायकोचा फोन आला कि पटकन घरी या मुलीला १०३ टेम्परेचर आहे.बॉसला सांगुन लगोलग निघालो.डॉक्टरचे क्लिनिक ५-३० ला उघडते. जाऊ पर्यंतच ५-४५ वाजले.जाण्याआधी डॉक्टरला फोन केला होता व त्याला सर्व परिस्थिती सांगितली होती.त्याने सांगितले की बाहेर जर कुणी आणखी पेशंट उभे असतील तर त्यांना विनंती करुन बघा. आणि लवकर मला दाखवा.पण जायला उशीर झाल्यने अगोदरच ७ पेशंट आले होते आणि माझा नंबर आठवा होता.बायकोने विचारले कुणाला विनंती करायची का? मी म्हटले कुणाकुणाला करणार आणि आठवाच तर नंबर आहे.थोडाच वेळ वाट पाहावी लागेल.वगैरे.तिला संयमाने घे असे वारंवार सांगत होतो.पण खरेतर मलाच कुणाला विनंती करायची हिम्मत झाली नाही.बाकीची कारणे हुडकत बसलो.माझ्या आधीचे सातही जण काहीना काही प्रॉब्लेम घेऊनच आले आहेत.त्यांनाही त्यांच्या लहान मुलांना दाखावायचे आहे ते कशाला मला त्यांच्या अगोदर जाऊ देतील वगैरे वगैरे.. थोड्या वेळाने नंबर आला आणि लेकराला डॉक्टरला दाखविले.आता मुलगी ठिक आहे.

ही गोष्ट इथेच संपली असती आणि माझ्या मनात काट्यासारखी रुतुनही बसली नसती.पण आज तीन दिवसांनंतर मुलीला घेऊन पुन्हा एकदा त्याच डॉक्टरकडे गेलो.सर्वकाही ठिक आहे आणि मुलीला दिलेली औषधे अजुनही चालु ठेवु का ह्याबद्दल विचारायला.आज शनिवार.सुटीचा दिवसा त्यामुळे दवाखान्यात गर्दी होती.कंपनीत गेले काही दिवस टेबल टेनिसच्या मॅचेस चालु होत्या आणि त्यात चीअर करताना बेंबीच्या देठापासुन बोंबलल्यामुळे माझा आवाज पूर्णपणे बसला होता. अक्षरशः एकेक शब्द बोलायला महत्प्रयास करावे लागत होते.सकाळची वेळ.बायकोला दवाखान्यात बसुन वाट पाहत बसण्यापेक्षा त्यावेळात शनिवारची इतरची कामे उरकता आली तर उरकुन टाकायची होती.त्यामुळे मला दवाखान्यात थांबायला सांगुन ती इतर कामे करायला गेली. नंबर येण्याच्या आधी पाच मिनिटे फोन करा मी लगोलग येत असे सांगुन ती निघुन गेली.मी वाट पाहत बसलो.अकरावा नंबर आला आणि पुढचा नंबर माझाच होता म्हणुन मी डॉक्टरच्या केबिनबाहेर मुलीला घेवुन थांबलोच होतो.तेव्हाच एक स्त्री माझ्या आणि डॉक्टरच्या केबिनचे दार ह्यामध्ये येऊन उभे राहुन चुळबुळ करत राहीली.मी अस्वस्थ झालो.बायकोला फोन लावत होतो.अकरावा पेशंट केबिनमधुन बाहेर आला.त्या स्त्रीने कन्नडमध्ये मला काहीतरी सांगितले .मला फक्त त्यातले रिपोर्ट रिपोर्ट एवढेच कळले.(तिला बहुदा म्हणायचे होते कि फक्त रिपोर्ट दाखवायला आत जायचे आहे.) रिपोर्ट रिपोर्ट असे सांगुन मला तिने आत जायची विनंती केली.माझ्या डोक्यात गोंधळ चालु.एकतर ती कानडीभाषक स्त्री होती.आणि एकुण आविर्भाववरुन कामगार वर्गातील वाटत होती.तिच्याशी बोलताना एकतर आवाज बसल्यामुळे माझ्या तोंडातुन नीट शब्द बाहेर पडत नव्हते आणि तिला हिंदी किंवा इंग्रजी बोलता येत असण्याची शक्यता कमीच होती.बायको अजुनही आली नव्हती.माझ्या मनात विचार आला तिचा नंबर एक्स्चेंज करावा म्हणजे तोपर्यंत बायकोही येईल.तिचे रिपोर्ट रिपोर्ट चालु होते.ह्या सगळ्याच एकत्रित परिणाम झाला आणि माझा हात आपोआप तुम्ही जा केबिनमध्ये अश्या अर्थाने पुढे झाला.ती बाई लगेच केबिन मध्ये गेली.आणि तेव्हा मला कळले आपण चूक केली.तेरावा नंबरला एक मराठीच फॅमिली होती.माझ्या आधी मी दुसर्याच कुणाला जाऊ दिले हे पाहुन त्यातील स्त्री मला म्हणु लागली तुम्ही जाता की आम्ही जाऊ?.तोपर्यंत मला काय झाले ह्याची कल्पना आली आणि मी म्हटले कि ती बाई आत घुसली आहे पोराला पुढे करुन्.मी तिला जाऊ दिले नाही.(पण मी तिला पुढे हो म्हणुन हात केला होता हे सर्वांनीच पाहीले होते.).बाकीच्या इतर लोकांना कुठला नंबर आत गेला आहे आणि काय झाले आहे ह्याची कदाचित कल्पना नसावी.पण त्या मराठी बाईला दुसरीने विचारले काय झाले आणि पुढच्या चार पाच नंबर्सना समजले कि मी कुणाला तरी मध्ये घुसु दिले आहे.माझी अवस्था विचित्र झाली.उगाच फोनवर मेसेज पाहत आहे असे भासवुन वेळ मारुन न्यायला लागलो.बायकोला फोन केला आणि तितक्यात ती मध्ये घुसलेली बाई केबिनबाहेर आली.आणि थॅन्कु थँक्यु म्हणत निघुन गेली.मी मात्र हे काय केलेस बाई अशी चर्या घेवुन आत घुसलो.बायको फोनवर होती आणि लेकराला काय होतेय हे तिच जास्त चांगल्या पध्दतीने डॉक्टरला सांगु शकेल असे वाटल्याने मी माझा फोन डॉक्टरला दिला.तिने डॉक्टरला सांगितले की ती दवाखान्यातच येत आहे. त्यामुळे डॉक्टर मला म्हणाला की तुम्ही बाहेर बसा आणि बायको आल्यावर आत या.मी पुन्हा मुलीला घेवुन बाहेर आलो.केबिनबाहेर पुढचा नंबर चिकटुनच बसला होता आणि मी बाहेर आल्या आल्या तो लगोलग आत गेला आणि त्याचा पुढचा नंबर येऊन केबिनला चिकटुन उभा राहीला.मी तिला विनंती केली की असे असे झाले आहे आणि डॉक्टरने मला आता आत गेलेल्या पेशंटनंतर आत यायला सांगितले आहे.त्यामुले तो पेशंट बाहेर आल्यावर मी आत जातो त्यावर ती स्त्री म्हणाली कि माझ्यानंतर जा.मी ठिक आहे म्हणालो पण आता बाहेरचे सगळे समीकरणच बदलले होते.प्रत्येक नंबरला त्याचा पुढचा नंबर कोणता आहे हे माहीत होते त्यामुळे ती बाई आत गेल्यावर मला आत जाणे मुश्किल झाले असते. तिथला एकजण मला विचारता ही झाली कि तुमचा नंबर किती आणि हे अगदी प्रोफेशनल इंग्लिशमध्ये चेहर्यावर अगदी कनिंग हावभाव ठेवुन. सुदैवाने तोपर्यंत बायकोही आली आणि आम्ही दोघे वाट पाहत बसलो.आतला पेशंट बाहेर आला आणि पुढचा नंबर आत जाण्याअगोदरच सुदैवाने डॉक्टरनेच आम्हाला आत बोलावल्याने आमची सुटका झाली.

दवाखान्यातुन बाहेर आल्यावर माझे विचारचक्र सुरु झाले.काही दिवसांपूर्वी मलाही असे मध्येच घुसायची गरज असताना मी नुसताच बसुन राहीलो आणि इथे त्या स्त्रीला कदाचित काहीही गरज नसताना माझ्या मूर्खपणाचा फायदा घेवुन आत जाता आले.माझी स्वत:वर आणि बायकोवर फार चिडचिड झाली.तुझ्यामुळेच झाले असे म्हणुन तिच्यावर सुध्दा डाफरलो.चिडचिड व्हायचे महत्त्वाचे कारण म्हणजे मला ह्या गोष्टीचे मनाला पटेल असे काहीही स्पष्टीकरण सापडले नाही.(पहील्या अनुभवात निदान सगळ्यांनाच इमर्जन्सी असेल असे मनाला पटवता तर आले होते.) कुणी असे तुम्हाला व्यवस्थित मूर्खात काढुन तुमचा वापर केला तर ती गोष्ट मनाला फार बोचते.

मला मिपाकरांना इथे हेच विचारायचे आहे कि पहिल्या प्रसंगात माझ्याकडुन नेमके काय करणे अपेक्षित असायला हवे होते आणि दुसरा प्रसंगात जे घडले त्यात नक्की माझा मूर्खपणा होता की कधी कधी असे होते असे म्हणुन ही गोष्ट सोडुन द्यायला हवी.?

(पहील्या प्रसंगातील आणि दुसर्याप्रसंगातील विनंती करुन मध्ये घुसणे ह्या योगायोगाचेही मला आश्चर्य वाटते.(दुसर्या प्रसंगात तिथे इतके नंबर असताना सुध्दा नेमका माझाच नंबर आल्यावर त्या स्त्रीने मला आत जाऊ द्या म्हणुन विनंती करावी.))

ता.क :- काही दिवसांपूर्वी मिपावर मॉलमध्ये रांगेतुन मध्ये घुसणार्यांबद्दल एक कौल वा तत्सम धागा प्रकाशित झाला होता.त्यावर आलेल्या एकसेबढकर वाईट/बर्या/चांगल्या प्रतिक्रिया वाचुन क्षणभर असाही विचार केला कि त्या दवाखान्यात समजा काही मिपाकरच बसले असते आणि मी वर उल्लेखिलेली गोष्ट केली असती तर मिपाकरांनी माझे नक्की काय केले असते?

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

9 Oct 2010 - 4:54 pm | चिरोटा

सहसा दवाखान्यात असल्या विनंत्या पुरुषांनी केल्या तर त्या विचारात घेतल्या जात नाहीत.त्यामुळे बायकाच पुढाकार घेतात.पुढे परत ती रिपोर्टवाली बाई परत दवाखान्यात आली तर तुझ्याजागी कोणीही दुसरा पुरुष असेल तरी तो तेच करेल. अशावेळी बायकांना 'पुढे' करायचे असते.

कानडाऊ योगेशु's picture

9 Oct 2010 - 5:29 pm | कानडाऊ योगेशु

शक्य आहे.

माझी बायकोही हेच म्हणाली कि तुम्ही पुरुष मंडळी जास्त भांडकुदळपणा करत नाही जर समोर एखादी स्त्री असेल तर. मी तुमच्या जागी असते तर तिला नक्कीच जाऊ दिले नसते.

आणि विशेष म्हणजे ती रिपोर्टवाली बाई आत गेल्यावर मला जाब विचारणारी व्यक्ती ही एक मराठी बाईच होती.तिचा नवराही तिच्याबरोबर होता पण तिने मला "आता आम्ही जाऊ आत का तुम्ही जाताय?" हे विचारल्यावरच त्याला झाला प्रकार कळला आणि तरी देखील तो समजुतदारपणे गप्प बसला.

इकडे बेंगलोरचे गळेकापु व्यावसायिक वातावरण पाहता मला जर कुणी टोकाचे ऑब्जेक्शन घेतले असते तर काय झाले असते ही कल्पना करुनच हुडहुडी भरली.

संजय अभ्यंकर's picture

9 Oct 2010 - 9:50 pm | संजय अभ्यंकर

मुलीला १०३ ताप, आणी तुम्ही लायनीय?

१०३ ताप म्हणजे काय माहीत आहे?

मुलीला घेउन डॉक्टरच्या केबीन मध्ये घुसायचे.
दुनीया बाxxx.

दुसर्‍या प्रसंगात तुम्हाला घाई नव्हती म्हणून एका स्त्रीला तुम्ही पुढे जाऊ दिलेत, हे उत्तम झाले.
परंतु दुसरी (मराठी) बाई घुसत होती, तीला भीक घालायची नव्हती.

नानाचा डायलॉग " बच्चा समझके कंधेपे बीठाया तो कानमे xxx है!"

कानडाऊ योगेशु's picture

9 Oct 2010 - 11:04 pm | कानडाऊ योगेशु

धन्यवाद संजयजी.

जाण्याआधी पत्नीने डॉक्टरला फोन केला होता.आणि डॉक्टरने पटकन येऊन दाखवायला सांगितले होते आणि जर माझ्यापुढे काही पेशंट असतील तर त्यांना विनंती करुन त्याला दाखवायला सांगितले होते.

दुर्दैवाने माझ्याआधी ७ पेशंट होते. ह्या सिच्युएशनमध्ये डॉक्टरने स्वत: मला प्रायोरिटी द्यायला हवी होती असे वाटले.डॉक्टरचे क्लिनिक म्हणजे एक रुम आणि त्यालगत असलेल्या फुटपाथवर सगळे पेशंट उभे. कुणी रिसेप्शनिस्टही नसल्याने कुणाकुणाला विनंती करणार!(बेंगलोरमध्ये अश्या विनंतीचा काही उपयोग होत नाही असा अनुभव पत्नीला काही ठिकाणी आला होता.).ह्या डॉक्टरची फि कमी आहे आणि डायग्नोसिसही चांगले आहे त्यामुळे त्या परिसरातल्या सार्‍या वर्गातली लेकुरवाळे कुटुंबे त्याच्याकडे जातात.

पण माझा नंबर येण्याच्या अवधीत तिथेच जवळपास असलेल्या दुसर्या एका चांगल्या चाईल्ड क्लिनिकमध्येही मी तिथे तरी डॉक्टर लवकर भेटेल ह्या हेतुने जाऊन आलो.पण ते क्लिनिक त्या दिवशी बंद होते.

असो.सुदैवाने आता सर्व काही ठिक आहे.मुलीचा ताप दिड दिवसातच उतरला पण अद्यापही थोडी सर्दी आणि खोकला आहे.पण तिथल्याच जवळपासच्या एका चांगल्या हॉस्पिटल बद्द्ल आणि दुसर्या चांगल्या पण महागड्या चाईल्ड क्लिनिकबद्दल माहीती झाली आहे.(महागडे आहे म्हणुन गर्दी कमी असते.)

असो.अशी वेळ पुन्हा कधीही माझ्यावर येऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

दुसर्‍या प्रसंगात तुम्हाला घाई नव्हती म्हणून एका स्त्रीला तुम्ही पुढे जाऊ दिलेत, हे उत्तम झाले.
परंतु दुसरी (मराठी) बाई घुसत होती, तीला भीक घालायची नव्हती.

ती मराठी स्त्री मध्ये घुसत नव्हती.तर मी कुणाला तरी आत जाऊ दिल्यामुळे ती बिथरली.तिला तिच्या नंबरवरच जायचे होते.पण सुदैवाने तो प्रसंग लवकर आटोपला.बेंगलोरमध्ये मराठी बोलणारे कुणी भेटले तर मला खूप आनंद होतो आणि मी स्वत:हुन ओळख वाढवण्याच प्रयत्न करतो.पण ह्या वेळेला त्या कुटुंबाला मी काही भाव दिला नाही.पुन्हा जर ते कुटुंब त्याच क्लिनिकमध्ये भेटलेच तर त्यांचाकडे दुर्लक्षच करेन.

शिल्पा ब's picture

9 Oct 2010 - 10:06 pm | शिल्पा ब

खरं तर असे काही प्रसंग बहुतेकांच्या येऊन गेलेत ... फार विचार केला तरी त्रास होतो...त्या वेळेस जे योग्य तेच केले असे समजून घ्यायचे अन पुढच्या वेळी विचार करूनच निर्णय घ्यायचा...
कारण होऊन गेलेले तर बदलता येत नाही.

कानडाऊ योगेशु's picture

9 Oct 2010 - 11:20 pm | कानडाऊ योगेशु

फार विचार केला तरी त्रास होतो...त्या वेळेस जे योग्य तेच केले असे समजून घ्यायचे अन पुढच्या वेळी विचार
करूनच निर्णय घ्यायचा...

येस.मी हे हाच धडा ह्या अनुभवांतुन शिकलो.

धन्यवाद शिल्पातै!

पक्या's picture

10 Oct 2010 - 5:58 am | पक्या

थोडेसे अवांतर : १०३ ताप असताना आणि डॉक्टरकडे जायला वेळ लागत असताना प्रथमोपचार करायला हवेत. कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे आणि थंड पाण्याने वरचेवर पूर्ण शरीराला स्पंजींग (ओल्या कापडाने अंग पुसून काढणे) हे सोपे आणि ताप उतरण्यास मदत करणारे उपाय आहेत. ताप असताना खाणे पिणे नकोसे वाटते. पण पाणी मात्र व्यवस्थित प्यायला हवे. लहान मूल ताप असताना स्वतःहून अजिबातच पाणी पित नसेल तर थोडे थोडे पण वारंवार आपणच मुलाला पाणी पाजायला हवे.

बा़की तुम्ही सांगितलेल्या पहिल्या प्रसंगात डॉक्टरला फोन केला होता तेव्हाच मी आलो की मला आत घ्याल का असे सांगितले असते आणि तुम्ही तिथे पोहचल्यावर आल्याची फोन वरून वर्दी देताच नर्स ने किंवा डॉक्टरच्या कोणा सहायकाने तुमचे नाव पुकारून तुम्हाला लगेच आत घेतले असते तर एवढा वेळ थांबावे लागले नसते . अर्थात हे तुम्ही लिहिल्याप्रमाणे तुम्हाला तातडीची गरज होती असे समजून सांगत आहे. नाहितर नंबर प्रमाणेच जाणे योग्य.

दुसर्‍या प्रसंगात तुम्ही त्या बाईला कानडी येत नाही असे सांगून माझा नंबर असल्याने सरळ नाही सांगायला हवे होते. जर तिला रीपोर्ट च घ्यायचा होता आणि तुम्हाला वाटत असेल १-२ मि. च्या कामासाठी त्या बाईला पूर्ण लाईन संपेपर्यत खूप वेळ थांबावे लागेल हे योग्य नाही तर तुमच्या बरोबरच आत यायला सांगायचे होते.

शिल्पा ब's picture

10 Oct 2010 - 7:27 am | शिल्पा ब

खूप ताप असेल तर थंड नाही तर कोमट पाण्याने अंग पुसावे....तसेच एक विशिष्ट जेल असलेला pack मिळतो जो कायम फ्रीझरमध्ये ठेवायचा अन पटपट डोक्यावर फिरवायचा...ताप लवकर कमी होण्यास मदत होते.

कानडाऊ योगेशु's picture

10 Oct 2010 - 12:52 pm | कानडाऊ योगेशु

पक्याजी तुम्ही अगदी परफेक्ट सल्ला दिला आहे.

दुसर्या प्रसंगात डोक्यात अगदी गोंधळ चालु असल्याने मनात नसताना सुध्दा त्या स्त्रीला पुढे जाऊ दिले. पण इथुन पुढे कुणी रिपोर्ट दाखविण्यासाठीच आत जायचे आहे असे विचारायला आला तर तुम्ही लिहिल्याप्रमाणे त्याला चला माझ्याबरोबर आत असे म्हणता येईल. (देवळात आणि दवाखान्यात जिथे प्रत्येकजण तुमच्या इतकाच गरजू असतो अश्या ठिकाणी केवळ लोकांच्या सौजन्यशीलतेचा गैरफायदा घेवुन पुढे घुसणार्यांबद्दल माझ्या मनात फार चीड आहे. ह्या निमित्ताने ती बाहेर आली.)

फारएन्ड's picture

10 Oct 2010 - 8:40 am | फारएन्ड

वरच्या प्रत्येक वेळेस 'विचारावे' म्हणून जे जे तुमच्या डोक्यात आले होते ते विचारायला हवे होते. प्रत्येक वेळेस नकारार्थी उत्तर आले असते तरी न विचारल्याने जो वेळ लागला तेवढाच लागला असता.

आजारी व्यक्तीसाठी धावपळ करताना तर हे जास्तच लागू होते. अशा वेळेस आपल्या भिडस्तपणामुळे त्या व्यक्तीस त्रास होण्याची शक्यता असते. (माझेही असे कधी कधी झाले असेल)

चिंतामणी's picture

10 Oct 2010 - 9:59 am | चिंतामणी

कानडाऊ योगेशु - जास्त विचार करू नका. तुमच्याजागी मी असतो तर असेच झाले असते.

स्पंदना's picture

10 Oct 2010 - 11:59 am | स्पंदना

माझी तर कायमच तुमच्या सारखी अवस्था असते, त्यामुळे सल्ला नाही देउ शकत पण समजुन मात्र घेउ शकते की नंतर तुम्हाला चीडचीड का होत होती. पण हा स्वभाव काही बदलत नाही.

डॉ.प्रसाद दाढे's picture

10 Oct 2010 - 12:03 pm | डॉ.प्रसाद दाढे

नवीन संशोधनानुसार कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्याने फार फायदा
होत नाही परंतु अंगभर स्पंजिंगचा नक्कीच होतो. लहान बाळ घरी असेल तर घरात अथवा
प्रवासात काही औषधे जरूर बाळगावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने (प्रसंगी नेहमीच्या डॉक्टरांशी
फोनवरून सल्ला विचारावा; रविवारी वा डॉक्टर गावाला गेले असतील तर गोची होऊ शकते
म्हणून अल्टरनेट डॉक्टर वा आपल्या डॉक्टरचा 'लोकम' असेल तर त्यांचे मोबाईल व
घरचा फोन नं सुद्धा जवळ ठेवावा) त्यांचा वापर करावा.
सध्याच्या व्हायरल प्रादुर्भावात (तसेच मलेरिया टायफॉईडमध्येसुद्धाताप अतिशय वेगाने १०३-०४ पर्यंत चढतो
व कधी-कधी आकडी येते (फेब्राईल कन्व्हल्जन). अश्यावेळीस डॉक्टर प्रत्यक्ष लगेच भेटू शकत नसतील
तर क्रोसिन सिरप हाताशी असावे. १५ मिग्रॅ प्रति किलो वजन असा पॅरासिटॅमॉलचा डोस असतो. १०४ ताप
जर लवकर उतरत नसेल तर (व डॉक्टर सहजी उपलब्ध होत नसेल तर फोनवर विचारून) जोनॅक पेडिअ‍ॅट्रीक सपोझिटरी ही गोळी बाळाच्या गुदद्वारात सोडावी; ताप तात्काळ उतरतो.
कित्येक वेळा असे होते की मेडीकल स्टोअर बंद असते वा रात्रीची वेळ असते त्यामुळे हवे ते औषध
पटकन उपलब्ध होतेच असे नाही त्यामुळे अशी काही औषधे स्टॉकमध्ये नेहमी ठेवावीत. अर्थात आपल्या
नेहमीच्या चाईल्ड स्पेशालिस्टला विचारूनच त्यांचा उपयोग करावा.

१) सिरप क्रोसिन- ताप व सौम्य वेदनाशामक
२) सिरप मॅक्स्ट्रा वा टिमिनिक वा अ‍ॅलग्रा - अ‍ॅन्टि अ‍ॅलर्जिक (सर्दी- खोकला, कान दुखणे, घशात खवखवणे वा
एखादा किडा वगैरे चावल्यावर उठणारे लोकलाईझ्ड पुरळ उदा सुरवंट्-स्पर्श झाल्यावर उठणारे पुरळ व खाज
असह्य असते; औषध दुकान बंद असेल तर बाळाचे हाल होतात तेव्हा जरूर घरी ठेवावे)
३) सिरप कोलीकेड - पोटात वेठ येऊन पोटदुखीने बाळ रडत असेल वा जुलाब होतांना मुरडा येत असेल तर
उपयुक्त
४) सिरप कार्मिसाईड वा कार्मिल - गॅस धरल्याने बाळाचे पोट दुखत असल्यास उपयुक्त
५) सिरप न्युट्रोलिन बी - जुलाब होत असतील तर उपयुक्त
६) सिरप कॉसम - कोरड्या खोकल्याची ढास असेल तर उपयुक्त
७) बाळ-दम्याचा त्रास असेल तर नेब्युलाईझर अथवा स्पेसर घरी ठेवावा व श्वासाला धाप लागली
वा चातीतून घरघर आवाज (व्हीजिंग) येत असेल तर तातडीने ड्युओलिनसारख्या औषधाचे नेब्युलायझेशन द्यावे.
८) जोनॅक सपोझिटरी- हाय फीवर उतरविण्यासाठी उपयुक्त

वरील सर्व औषधे नेहमीच्या चाईल्ड स्पेशालिस्टच्या संमतीनेच द्यावीत
लहान बाळांना होमिओपाथिक औषधेसुद्धा चांगली सूट होतात असा अनुभव आहे. त्या तज्ञांचा सल्ला
जरूर घ्यावा. विशेषतः दात येत असतांना मुले वारंवार आजारी पडतात; आमच्या अ‍ॅलोपाथीमध्ये त्याचे
विश्लेषण 'मुले ह्या काळात खाली पडलेल्या कोणत्याही वस्तू चोखतात म्हणून पोट बिघडते वा ताप येतो' असे
असले तरी होमिओपाथीत यास वेगळ्या थिअरीज आहेत व त्या क्लिनिकली जास्त सक्सेसफुल आहेत.

कानडाऊ योगेशु's picture

10 Oct 2010 - 12:38 pm | कानडाऊ योगेशु

दाढेसाहेब फारच उपयुक्त माहीती तुम्ही दिली आहे.
वेळात वेळ काढुन इतकी सविस्तर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
१०३ ताप आहे हे पाहुन पत्नीने बाळाला त्यावेळी घरी असलेले (इंजेक्शन दिल्यानंतर कधी कधी येणार्या बाळाच्या तापाच्या ट्रीटमेंटसाठीच घेतलेले घरात असलेले) सिनारेस्ट हे औषध बाळाला दिले होते.

आणि पत्नीने सर्व प्रथमोपचारही केले होते पण बाळाची अशा पध्दतीने आजारी पडण्याची ही पहीलीच वेळ असल्याने ती आणि मी दोघेही बिथरलो होतो.