सध्या चालू असलेल्या राष्ट्रकुलस्पर्धांत भारत पदकांची लयलूट करत आहे. फारच समाधानाची बाब आहे. भारताने वैयक्तिक तसेच सांघिक खेळात अनेक पदके जिंकली आहेत.
नेमबाजी, बॉक्सिंग, कुस्ती, घोडेस्वारी आदी सांघिक तसेच वैयक्तिक खेळांना कुठल्याही देशाच्या सैन्यात महत्व असते. सैन्यात शक्यतो सांघिक खेळात महत्व असते. (क्रिकेट हा खेळ सैन्यात खेळला जात नाही.) सैन्यात वरचेवर बंदूकांनी नेमबाजीचा सराव केला जातो. या सरावाने चांगले नेमबाज तयार होवून शत्रूचे सैनीक मारणे हा हेतू असतो. किंबहूना नेमबाज असणे हा त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असतो. सध्याच्या स्पर्धा पाहून खालील प्रश्न उपस्थीत होतात:
१. नेमबाजी या स्पर्धांत सैन्यातले लोक आहेत काय?
२. आपले सैन्याची संख्या पाहता हे प्रमाण कितीसे आहे?
३. नेमबाजी या स्पर्धेत सैनीक जास्त प्रमाणात यायला हवे. त्यांचा सराव नेहमीचा असतो.
४. की सैन्यातील लालफित अशा कमी सहभागाला कारणीभुत असावी?
५. भारताशिवाय इतर देशांत काय परिस्थीती आहे?
तसेच नेमबाजी या स्पर्धांत १० मीटर, २५ मीटर, ५० मीटर, पुर्ण बोर, स्किट (सर्व वैयक्तिक व सांघीक) आदी प्रकार आहेत. हे अंतर फारच कमी आहे. मान्य आहे की अशा स्पर्धा जागतीक नियमांच्या आधारेच होतात तरीही आजकालचे पिस्तूल, रायफल यांच्या तुलनेने हे अंतर फारच कमी आहे. इतक्या कमी अंतरावरच्या स्पर्धांसाठी सैन्यातले लोक अगदी तयार असावेत हे माझे मत आहे.
सैन्याच्या लोकांचा सहभाग अन आताच्या इतर स्पर्धा व प्रकार (केवळ राष्ट्रकूलच नव्हे तर आशियन, ऑलंपीक, राष्ट्रीय आदी. व केवळ नेमबाजीच नव्हे तर बॉक्सींग, घोडेस्वारी, कबड्डी, व्हॉलीबॉल आदी.) यावर चर्चा होवू शकते. जाणकारांनी आपली मते द्यावीत.
प्रतिक्रिया
8 Oct 2010 - 7:59 pm | नितिन थत्ते
मला तरी तसे वाटत नाही. सैन्यात नेमबाजी शिकवत असले तरी सैन्याला लागणारे नेमबाजीचे कसब बरेच सैल असावे. शत्रूला मारण्यासाठी आवश्यक अचूकता ही मेडल जिंकण्याच्या अचूकतेपेक्षा बरीच कमी असावी.
शिवाय बंदुकासुद्धा वेगळ्या असाव्यात.
अर्थात निश्चित माहिती नाही.
8 Oct 2010 - 9:25 pm | चिंतामणी
सैन्यदलाच्या विविध खेळांच्या स्पर्धा होउन त्यातुन एक प्रातिनीधीक संघ विविध खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धात भाग घेतो. सैन्यद्लाच्या संघाना विविध क्रिडा संघटनांनी संलग्नता दिलेली आहे.
हॉकी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॉक्सींग, कुस्ती, ऍथलेटिक्स, इक्वेट्रीअन (घोड्यावर स्वार होउन होणा-या स्पर्धा) ईत्यादी क्रिडा प्रकारात मोठ्या प्रमाणार सैन्यदलाचे दर्जेदार खेळाडु खेळतात.
ऍथलेटिक्समधील लांब पल्ल्याच्या स्पर्धांवर याच खेळाडुंचे वर्चस्व असते.
राज्यवर्धन राठोड सैन्यदलात अधीकारी आहे.
सैन्यदलाची "आर्मी स्पोर्ट्स इन्सटिट्युत" नावाची संस्था पुण्यात आहे. तेथे या खेळाडुंना प्रशिक्षण दिले जाते. तेथे प्रशीक्षणाच्या उत्तम सुविधा आहेत. त्याच बरोबर अत्याधुनिक उपकरणेसुध्दा आहेत ज्याचा उपयोग खेळाडुची क्षमता वाढण्यासाठी, स्टाइलसुधार्ण्यासाठी आणि "स्पोर्टस इंज्युरीज" टाळण्यासाठी केला जातो.
8 Oct 2010 - 10:25 pm | पाषाणभेद
@ नितिन थत्ते: बरोबर आहे तुमचे, पण त्यातूनच चांगले नेमबाज तयार मिळण्याची शक्यता कितीतरी अधीक आहे. अन जो सैनीक १००० मिटरवर जर ०.१०% अचूकतेने (accuracy) ने वार करू शकतो त्याला १० मीटर अन २५, ५० मीटर म्हणजे कोणत्या झाडाची पाने.
@ चिंतामणी: मौलीक माहीती दिलीत.
सैनीकांचे शारीरीक मानसीक बळ इतरांपेक्षा जास्त असते. त्यांना अशा प्रकारचे प्रशिक्षण घेणे त्यांच्या व्यवसायाचा भाग असतो. असे असतांना त्यांनी अशा स्पर्धात भाग घेवून जिंकण्याची शक्यता निश्चितच जास्त आहे. असे असतांना त्यांचा सहभाग कमीच आहे.
५. भारताशिवाय इतर देशांत काय परिस्थीती आहे?
थोडक्यात, जास्तीत जास्त पदके मिळवण्यासाठी सैन्यातील गुणवत्ता वापरली जाते का?
8 Oct 2010 - 10:21 pm | रणजित चितळे
आर्मी मध्ये सुद्धा नेमबाजी चा सराव नित्त्याने होत असतो पण सैन्यात वापरण्यात येणा-या बंदुका व अशा अंतरराष्ट्रीय स्पर्धेत वापरात येणा-या बंदुका वगळ्या असतात त्या मुळे तो सराव वेगळा व स्पर्धां मधला कस पण वेगळा. पण तरी सुद्धा काही मार्कस् मॅन ना शिकवुन तरबेज करतात. हर्शवर्धन हा सैन्यातलाच, आजच्याच पेपरात एक हवालदार व एक नेव्ही मधल्या ला पदक मिळाल्याचे वाचण्यात आले. मिल्खासिंग आर्मी मधलाच. स्कॅश प्लेअर अर्जुन सिंग पण आर्मी मधलाच. बाकी श्री चिंतामणी यांने बरोबर लिहीले आहे.