रोबो भेटला बाळासाहेबांना.

चिंतामणी's picture
चिंतामणी in काथ्याकूट
6 Oct 2010 - 1:21 am
गाभा: 

रजनीकांत उर्फ शिवाजी गायकवाडेने आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.

'मातोश्री'वर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी 'महाराष्ट्र देशा' हा फोटो अल्बम रजनीकांतला भेट दिला. शिवसेनाप्रमुखांना भेटताच तो भारावून गेला. यापूर्वीही तो शिवसेनाप्रमुखांना भेटला होता. त्यामुळे आज पुन्हा त्यांची भेट झाल्यानंतर रजनीकांतच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. त्याचा तो आनंद पत्रकारांशी गप्पा मारताना दिसून येत होता. मूळचा मराठी असलेल्या रजनीकांतचा मराठी बाणा अचानक उफाळून आला आणि त्याने आपणास मराठी चित्रपटात काम करायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली. शिवाय असंख्य मुंबईकरांचे आभार मानले. आपण मराठी-तमीळ माणूस आहोत. आपण भारताचे-महाराष्ट्राचे-मुंबईचे सुपुत्र आहोत, अशा प्रकारचा संवाद त्याने मराठी भाषेत साधला. शिवसेनाप्रमुख माझ्यासाठी देवतुल्य आहेत. ज्यांना आपण आदर्श मानतो, अशा व्यक्तींपैकी ते आहेत, असेही रजनीकांत म्हणाला.

ही बातमी येथे सविस्तर वाचा.

http://www.esakal.com/esakal/20101005/5465582249772690928.htm

प्रतिक्रिया

सुनील's picture

6 Oct 2010 - 1:36 am | सुनील

त्याने आपणास मराठी चित्रपटात काम करायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली

मानधनात सूट दिली तरच हे शक्य आहे बॉ!!

चिंतामणी's picture

6 Oct 2010 - 1:41 am | चिंतामणी

:D

सही रे सही.

डोळे पाणावले हो ऐकून!
अजून कोणकोणत्या बातम्या आहेत हो ई-सकाळवर? माझ्या हापिसात ई-सकाळ दिसत नाही तेव्हा मुख्य बातम्यांचे धागे इथे काढलेत तर बरं होईल.

मेघवेडा's picture

7 Oct 2010 - 5:52 pm | मेघवेडा

>> अजून कोणकोणत्या बातम्या आहेत हो ई-सकाळवर? माझ्या हापिसात ई-सकाळ दिसत नाही तेव्हा मुख्य बातम्यांचे धागे इथे काढलेत तर बरं होईल

असेच म्हणतो.

आणखी एक : नुस्ता एक परिच्छेद देण्यापेक्षा अख्ख्या बातम्याच कॉपी-पेस्ट केल्यात तर बरं होईल. आमच्याही हापिसात सकाळला ग्रहण लागले आहे.

>> शिवसेनाप्रमुखांना भेटताच तो भारावून गेला. >>
हे अ‍ॅक्टर्स अ‍ॅक्टींग कधी करतात आणि खरं कधी असतं कसं कळणार?
असो "बेनिफिट ऑफ डाऊट" देऊ या ;)

विकास's picture

6 Oct 2010 - 5:05 am | विकास

आपण भारताचे-महाराष्ट्राचे-मुंबईचे सुपुत्र आहोत, अशा प्रकारचा संवाद त्याने मराठी भाषेत साधला.

भारत-महाराष्ट्र-मुंबईचे ---- असणे ठीक आहे.. पण सुपुत्र म्हणायचा नक्की काय क्रायटेरीया आहे? ;)

अनामिक's picture

6 Oct 2010 - 8:32 am | अनामिक

त्यात क्रायटेरीया काही नाही... ते मेलेल्या आप्ताच्या नावामागे स्वर्गवासी लावण्यासारखेच आहे असे वाटते.

सन्जोप राव's picture

6 Oct 2010 - 5:46 am | सन्जोप राव

शिवाजीराव आणि बाळासाहेब यांच्यात अभिनय कुणाचा सरस हे ठरवणे अवघड आहे. अधिक मेकप कोण करतो हे ठरवण्याइतकेच. दोघेही सामान्य जनतेच्या प्रेमाचे ल.सा.वि. आहेत, यामुळे समाजाच्या बुद्ध्यांकावरही प्रकाश पडतो.

विशाल कुलकर्णी's picture

6 Oct 2010 - 1:03 pm | विशाल कुलकर्णी

सहमत :)

परिकथेतील राजकुमार's picture

6 Oct 2010 - 1:18 pm | परिकथेतील राजकुमार

धाग्याचे शिर्षक वाचल्याबरोब्बर धाग्यापेक्षाही संजोपरावांची प्रतिक्रीया वाचायची घाई झाली होती.

सन्जोप राव's picture

6 Oct 2010 - 5:21 pm | सन्जोप राव

धाग्याचे शिर्षक वाचल्याबरोब्बर धाग्यापेक्षाही संजोपरावांची प्रतिक्रीया वाचायची घाई झाली होती.
अरे वा! हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन, दिलको खुश रखनेको गालिब ये खयाल अच्छा है!

बातमीखालच्या काही प्रतिक्रीया अत्यंत मनोरंजक आहेत :-)

चिरोटा's picture

6 Oct 2010 - 10:52 am | चिरोटा

सासरा झाला हा माणूस हल्लीच आणि आता वय झाल्यावर ह्याचा मराठी बाणा का म्हणतात तो उफाळून आला!!
मुंबईचा सुपुत्र हा काय प्रकार आहे? 'रोबो'चा जन्म आहे बेंगळूरचा,लहानाचा मोठा तिकडेच झाला,करीयर केले तामिळनाडूत आणि मुंबईचा/महाराष्ट्राचा सुपुत्र कसा ब्वॉ? असो,महाराष्ट्रभूषण लवकरच मिळायची शक्यता वाटतेय.

विसोबा खेचर's picture

6 Oct 2010 - 10:56 am | विसोबा खेचर

आपण साला फॅन आहोत रजनीकांताचे.. साला शिग्रेट काय मस्त ष्टाईलिष्ट शिलगावतो..! :)

तात्या.

--
प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..

अनिल २७'s picture

6 Oct 2010 - 11:21 am | अनिल २७

"साला फॅन" हा काय प्रकार असतो..??

मस्त ! आपण तर दोघांचेही फॅन आहोत.... इच्छा असो नसो.. समोरच्याला दखल घ्यायला भाग पाडतात... अगदी ज्यांची बुद्धी आकाशाला भिडली आहे अशा समाजातल्या तथाकथित अभिजनांना सुद्धा !!

विशाल कुलकर्णी's picture

6 Oct 2010 - 1:06 pm | विशाल कुलकर्णी

आपण तर नानाचे फॅन झालो बाबा आता ;)

उध्दव ठाकरेचे कर्तुत्व म्हणजे त्यानी काढलेला फोटोचा अल्बम हेच आहे. त्याना कुणीही भेटले कि त्याला फोटोचा अल्बम भेट देतात. त्यापेक्षा दादरला स्टुडीओ काढला असता तर तो जोरात चालला असता.

विकास's picture

6 Oct 2010 - 7:13 pm | विकास

त्यापेक्षा दादरला स्टुडीओ काढला असता तर तो जोरात चालला असता.

इथेच मराठी माणूस मार खातो आणि धंद्यात मागे पडतो. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2010 - 9:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =))

धमाल मुलगा's picture

6 Oct 2010 - 9:20 pm | धमाल मुलगा

सौ सुनार की, एक लोहार की. ;)

ईन्टरफेल's picture

6 Oct 2010 - 9:12 pm | ईन्टरफेल

<इथेच मराठी माणूस मार खातो आणि धंद्यात मागे पडतो. >

म्हनुनच म्हराठि मानसाचा ईकास झाला नाय व्हय ?

हैयो हैयैयो's picture

6 Oct 2010 - 11:15 pm | हैयो हैयैयो

विनंती.

प्रतिसादाआधी एक चूक दुरुस्त करू इच्छितो. "रजिनिकांत ऊर्फ शिवाजीराव गाएकवाड" नव्हे, "शिवाजीराव गाएकवाड ऊर्फ रजिनिकांत!"

असो. ह्या चर्चेच्या निमित्ताने माझे प्रीतपात्र नटश्री. रजिनिकांत ह्यांचे एक वाक्य आठवते. आमच्याकडे राजकारणात त्यांनी यावे अशी अनेकांची इच्छा आहे, त्यासंदर्भात एकदा त्यांनी "महाराष्ट्रात गेलो, तर मला तमिळ म्हणतात, तर तमिळनाडुत मला मराठी म्हणतात. ना घरका ना घाटका अशी माझी विचित्र परिस्थिती आहे." असे उघड प्रतिपादन केले होते. ही परिस्थिती दुर्मिळ आहे. ह्या पार्श्वभूमिवर आज रजिनि स्वतःला महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणवू इच्छितात ह्यात नवल काही नाही.

स्वतःची वोळख शोधण्याचा केलेला तो आणखी एक प्रयत्न आहे. ह्या प्रयत्नाला हसण्यावारी नेवू नका ही कळकळीची विनंती.

-

विकास's picture

6 Oct 2010 - 11:29 pm | विकास

स्वतःची वोळख शोधण्याचा केलेला तो आणखी एक प्रयत्न आहे. ह्या प्रयत्नाला हसण्यावारी नेवू नका ही कळकळीची विनंती.

जरी मला इथे लिहीणार्‍या (माझ्या व्यतिरीक्त) कुणाचाही उद्देश माहीत नसला तरी तसे वाटत नाही की हे हसणे/टाईमपास हा रजनीकांतच्या ओळख शोधण्यास कोणी करत असेल. केवळ त्याची चित्रपटातील प्रतिमा, बाळासाहेबांना भेटणे इतके पुरेसे आहे. तेंव्हा तुमच्या भावना समजत आहेतच पण कृपया जास्त गांभिर्याने घेऊ नका, हलकेच घ्या ही विनंती.

चिंतामणी's picture

7 Oct 2010 - 2:58 pm | चिंतामणी

येथील काही प्रतिक्रीया वाचल्यावर एका ईमेलची आठवण झाली. ती इथे पोस्ट केली आहे. वाचली नसल्यास जरूर वाचा.

http://www.misalpav.com/node/14755#comment-245178

चिंतामणी's picture

7 Oct 2010 - 2:58 pm | चिंतामणी

येथील काही प्रतिक्रीया वाचल्यावर एका ईमेलची आठवण झाली. ती इथे पोस्ट केली आहे. वाचली नसल्यास जरूर वाचा.

http://www.misalpav.com/node/14755#comment-245178

नाना बेरके's picture

7 Oct 2010 - 6:01 pm | नाना बेरके

रजनीकांतची प्रसिध्दी आणि ऐश्वर्य इतकं आहे कि तुमच्या लेखाचं शिर्षक "रोबो भेटला बाळासाहेबांना" च्या ऐवजी "बाळा भेटला रोबोसाहेबांना" असं ठेवायला पाहीजे होतं.