रंभा- सुधा----

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
5 Oct 2010 - 4:27 pm

हटके पदार्थ----------------

रंभा- सुधा----

साहित्य- सहा केळी , अर्धा लिटर दुध तापवून गार झालेले, साखर एक वाटी, खोवलेला नारळ एक वाटी.काजूचे काप पाव वाटी.

कॄती------ तीन केळीचे काप करावेत , तीन कुस्करुन घ्यावीत, त्यात बाकीचे साहित्य घालून ढ्वळत रहावे.साखर विरघळली की रंभा -सुधा खाण्यास तयार.

कालच हा पदार्थ केला होता.......पण फोटो काढायचा राहिला.

प्रतिक्रिया

म्हण्जे शिक्रणंच ना !!

विनायक प्रभू's picture

5 Oct 2010 - 4:33 pm | विनायक प्रभू

मस्त पाकॄ
@ सुधांशु
अरे भौ पाकृ मधे पण रंभा सुधा जिभेवर नाचणार हे काय कमी आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Oct 2010 - 5:13 pm | परिकथेतील राजकुमार

.
.
.
.
.
प्रतिक्रीया लिहिली होती........ पण पेस्टायची राहिली.

ब्रिटिश टिंग्या's picture

5 Oct 2010 - 5:24 pm | ब्रिटिश टिंग्या

हे तुम्ही बाहेरुन प्रतिक्रिया टंकुन आणुन उनिकोदात परावर्तित करणे सोडा बॉ.....

नितिन थत्ते's picture

5 Oct 2010 - 5:45 pm | नितिन थत्ते

>>उनिकोदात

आता हे कोण आणखी कोदा?

युनिकोड म्हणायचं असावं त्यांना.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Oct 2010 - 6:15 pm | परिकथेतील राजकुमार

आता हे कोण आणखी कोदा?

Oh my God.*

थत्ते चाचा आज चक्क चक्क तुमचा अभ्यास कमी पडतोय ?

*सध्या प्रतिसादातील पहिले वाक्य इंग्रजीत लिहिण्याची फॅशन आली आहे म्हणे.

मितान's picture

5 Oct 2010 - 5:24 pm | मितान

हे नाव वाचून 'सुशिला', 'शकुंतला',' माणिकमोती', 'त्रिपुरसुंदरी ' अशी नावं असलेले पदार्थ आठवले :)

अवांतर :
कर्नाटकात मणिकेरीच्या जंगलात रहाणार्‍या एका मैत्रिणीकडे शिकरणाचा अजून एक वेगळाच प्रकार चाखला होता. तिकडे मिळतात ती लाल मोठ्ठी केळी काप करून दुधात घालायचे. थोडी साखर नि वेलची घालायची. आणि हे मिश्रण मातीच्या मडक्यात थोडे विरजण घालून रात्रभर ठेऊन द्यायचं. फार सुंदर चव होती त्याची. आपल्याकडच्या केळ्यांचा असा पदार्थ चांगला लागला नाही :(

विसोबा खेचर's picture

5 Oct 2010 - 5:25 pm | विसोबा खेचर

आमचे अण्णा म्हणतात, 'आम्ही किराणावाले मुरांबा-पोळी, शिक्रणपोळी खाणंच अधिक पसंत करतो..आमचा यमन, शुद्धकल्याण अगदी तसाच आहे! :)

असो, छान पाकृ...फार्फार आवडली.

जियो..!

तात्या.

--
प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..

नितिन थत्ते's picture

5 Oct 2010 - 5:46 pm | नितिन थत्ते

हा पदार्थ राजेळी केळी म्हणून मिळतात त्याचा करतात का?

बेसनलाडू's picture

5 Oct 2010 - 10:18 pm | बेसनलाडू

राजाळी केळी शक्यतो केळ्याचा हलवा करण्यासाठी वापरतात, असे वाटते.
(अंदाजपंचे)बेसनलाडू

निवेदिता ताई पाकृ छानच आहे.
मी हे शिक्रण करताना केळी किसुन घेते त्यामुळे दुधाला थोडा दाटपणा येतो.

निवेदिता-ताई's picture

5 Oct 2010 - 9:55 pm | निवेदिता-ताई

ह्याच्या मध्ये आपण खोवलेले खोबरे घातलेले आहे त्यामुळे आपोआपच दुधाला थोडा दाटपणा येतो.

गणेशा's picture

6 Oct 2010 - 4:40 pm | गणेशा

मस्त