अबईच्या शेंगा

जागु's picture
जागु in पाककृती
4 Oct 2010 - 4:55 pm

अबब, अगबाई केवढ्या मोठ्या शेंगा ह्या संवादावरुन कदाचित ह्या शेंगांना अबई हे नाव पडल असेल. गुलमोहराच्या शेंगांप्रमाणे ह्या शेंगा लांब होतात. फोटोतील शेंगा कोवळ्या आहेत त्यामुळे त्या छोट्या आहेत.
अबईच्या शेंगांची भाजी व आमटी दोन्ही करतात.

अबईच्या अश्या प्रकारे किंवा तुम्हाला हव्या त्या शेप, साईझ मध्ये कापुन घ्या.

अबईच्या शेंगांची डाळ घालुन आमटी
लागणारे साहित्य:
7-8 अबईच्या शेंगा धुवुन,चिरुन
कोणतीही डाळ गरजेनुसार
१ मोठा कांदा,
१ मिरची
४-५ लसुण पाकळ्या
हिंग,
हळद,
मसाला १ चमचा
अर्धा चमचा गरम किंवा गोडा मसाला
चविनुसार मिठ
थोडासा गुळ
२,३ कोकम किंवा लिंबाचा रस
फोडणीसाठी तेल
(ह्या सगळ्यांचा अदृश्य फोटो)

पहिला मस्त गरम गरम तेलावर लसुण गुलाबी करा म्हणजे मस्त स्वाद येतो. आता त्यावर कांदा, मिरची घाला. मिरची ऑप्शनल आहे. मी स्वादासाठी घातली होती.

आता कांद्याला गुलाबी रंग आला की त्यात हिंग, हळद टाका, थोडे परतवुन हिरव्या गार अबईच्या शेंगा घालुन त्यावर मस्त लाल लाल मसाला टाका. त्यावर लगेच कोणतीही डाळ घाला. आता कलर कॉम्बिनेशन न्याहाळा.

नुसत बघत बसु नका रंगसंगती, नाहीतर करपुन जाईल. मी तेच केल. रंग आवडले म्हणुन बघत बसले आणि भाजी खाली थोडी करपली. न्याहाळून झाले की सगळ एकजीव करा. त्यात गरजेप्रमाणे पाणी घाला. आता जरा धिर धरुन डाळ आणि शेंगा शिजुद्या. सगळ शिजल की त्यात राहीलेला माल मसाला म्हणजे मिठ, कोकम किंवा लिंबुरस, गुळ गरम किंवा गोडा मसाला घाला. चांगल उकळू द्या रटरट आवाज करत. आता अबईच्या आमटीचा "अगबाई झाली तय्यार" म्हणून गॅस बंद करा. बघा झाली तय्यार तुमची अगबाई अरेच्चा अबईची आमटी.

प्रतिक्रिया

ग्रेट पाकृ आणि सांगण्याची ष्टाईल!
भारीच!
अगंबाई, चला आता दुसर्‍या धाग्यावर!;)

जासुश's picture

4 Oct 2010 - 5:11 pm | जासुश

मस्त च दिसताय अबईच्या शेंगा
..पण मला काय बाजारात या शेंगा दिसत नाहीत..त्यापेक्षा तयार आहे तेच पाठवून द्या ..जागुतै..

जागु, तुला कित्ती वेगवेगळ्या भाज्या माहित आहेत. मी प्रथमच बघतेय ही भाजी.

गणपा's picture

4 Oct 2010 - 6:17 pm | गणपा

प्रथमच बघतोय ही भाजी.

सहज's picture

4 Oct 2010 - 6:26 pm | सहज

जागुताईंनी भाजीकोश बनवावा. इतक्या वेगवेगळ्या भाज्या तुम्हाला मिळतात व तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करुन आम्हाला दाखवता मनापासुन धन्यवाद.

प्राजु's picture

4 Oct 2010 - 7:28 pm | प्राजु

ही भाजी पहिल्यांदाच पाहिली.
जागु.. इतक्या वेगवेगळ्या भाज्या कुठून आणतेस??

भाजी मस्त दिसतेय.. तू खरंच एक कोष बनव अशा ऑड भाज्यांच्या..

प्रियाली's picture

4 Oct 2010 - 8:28 pm | प्रियाली

सर्वांशी सहमत. ;)

धनंजय's picture

5 Oct 2010 - 1:19 am | धनंजय

असेच +१

विसोबा खेचर's picture

4 Oct 2010 - 7:07 pm | विसोबा खेचर

गिरेट..! :)

--
लाखाची गोष्ट, अवघाची संसार, पेडगावचे शहाणे, आम्हा जातो आमुच्या गावा, वरदक्षिणा, सुवासिनी, यासारखे सुंदर चित्रपट कुठे गेले आता?

कौशी's picture

4 Oct 2010 - 8:15 pm | कौशी

पाकक्रुती आवडली....करून बघेन.
मी ही भाजी 'सारगा' मधे बघितली.. पण रेसीपी माहिती नव्ह्ती.

अजबराव's picture

4 Oct 2010 - 8:46 pm | अजबराव

आम्हि याला पटाडिच्या शेंगा म्हणतो...गावाकडे याचि भाजी खाल्लि आहे लहानपणि...आता त्या विकायलाहि नाहि बघितल्या कधि...

अजबराव's picture

4 Oct 2010 - 8:47 pm | अजबराव

आम्हि याला पटाडिच्या शेंगा म्हणतो...गावाकडे याचि भाजी खाल्लि आहे लहानपणि...आता त्या विकायलाहि नाहि बघितल्या कधि...

शिल्पा ब's picture

5 Oct 2010 - 1:47 am | शिल्पा ब

जागू, मस्त पाकृ आहे..
या भाज्या मी तरी कधी पहिल्या नाहीत..मस्त...भारतात आले कि तुला कळवेन आणि घरी येईन , खास या भाज्या खाण्यासाठी. (तू नाही म्हणालीस तरी येईनच.)

मितान's picture

5 Oct 2010 - 2:15 am | मितान

मी इथे या शेंगांची आमटीसारखी भाजी करते. पण त्या शेंगांना एक उग्र वास असतो. तो आवडत नाही. मग दुसरा पर्याय म्हणून नारळाचे दूध आणि अमसुले घालून भाजी करायची. भातावर मस्त लागते.

शेखर's picture

5 Oct 2010 - 2:34 am | शेखर

तुमची पाकृ पण येऊ द्या.

स्मिता_१३'s picture

6 Oct 2010 - 4:16 pm | स्मिता_१३

अबईच्या शेंगा मस्तच गं जागुताई.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Oct 2010 - 4:26 pm | परिकथेतील राजकुमार

जागुतै कुठुन कुठुन शोधुन आणतेस ग हे सगळे ? माहितीचा कोष आहेस बै तु :)

मस्त पाकृ आणि फटू. त्यातल्या त्यात कांद्यावरच्या हिरव्याग्गार मिरच्यांचा फोटु एकदम आवडून गेला.

स्मिता धन्स.

राजकुमारजी, तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे हल्ली भाजी मंडईत घुसल्यावर नजर वेगवेगळ्या भाज्याच शोधत असते.
अजुनही काही वेगळ्या भाज्या इथे टाकायच्या आहेत. पण फोटूसाठी अडलय. त्या भाज्या अजुन बाजारात आल्या नाहीत. आल्या की लगेच टाकतेच.