भारतीय इंग्रजी माध्यमांचे अनाकलनीय वर्तन

महानगरी's picture
महानगरी in काथ्याकूट
2 Oct 2010 - 9:12 am
गाभा: 

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय जाहीर झाला आणि माझ्यासारख्या अनेक भारतीय नागरिकांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला. बहुचर्चित रामजन्मभूमी - बाबरी मशिद वादात हिंदू गटांचा दावा मान्य करण्यात आला व वादस्त जागेची मालकीही सोपवण्यात आली. सुन्नी वक्फ़ बोर्डास १/३ जागेची मालकी देण्यात आलेली असली तरी हा निकाल सर्वसाधारणत: हिंदूंच्या बाजूने लागल्याचे दिसते.
लोकशाही ही बहुसंख्यांच्या मताचा/भावनेचा आदर करण्यासाठी राबवली जाते. न्यायालयाचा निर्णय हा इतर पुराव्यांच्या उपलब्धी/अनुपलब्धी बरोबरच बहुसंख्यांच्या भावनेचा आदर करणारा आहे.

पण ह्या सुखद भावनेस धर्मनिरपेक्षतेचे अवघड सुकाणु पेलणार्‍या भारतीय इंग्रजी माध्यमांनी मात्र अजिबात थारा दिला नाही
एनडीटीवी ची बरखा दत्त ह्या एकाच पत्रकाराचे दोन्ही दिवस कार्यक्रम पाहुन त्यांच्या भूमिका, त्यांचे ग्रह, त्यांचे आवेश ह्या सगळ्याचाच अचंबा वाटू लगला. राजदीप सरदेसाई, अर्णब रॉय वगैरे ही त्याच गटात मोड्तात पण त्यांचा ’परफ़ॉर्मन्स’ मी पाहिला नाही.

बरखाबाईंच्या वागण्यातील खटकलेले काही मुद्दे असे
१. मुलिमांनी १/३ जागेवर मशिद बांधावी असे निकालपत्रात म्हणलेले नाही पण बांधू नये असेही म्हणलेले नाही. त्यमुळे वक्फ़ चे वकिल जिलानी यांच्या मते -’ त्या मोकळ्या जागेवर आम्ही मशिद बंधू शकतो व ह मुद्दा त्यांना (हिंदूंना) कटकटीचा होईल.’ - बरखाला तिथे मशिद बांधता येणार याचा अवर्णनीय आनंद झाला. आणि त्यानंतर मंदिर शब्दा बरोबर मशिद बांधण्याचा सतत उल्लेख करुन, तसे प्रश्न गरज नसताना विचारून एक प्रकारे काडी लावायचा प्रयत्न केला.

२. एनडीटीवी च्या मते जाणकार असलेले अनेक इतिहासकार बोलावून त्यांच्याकडून हा निकाल ’ कसा जरासा चुकीचा वाटतो आहे नाही?’ असा सुरात सूर मिळवून घेतला. बोलावलेले इतीहासकार म्हणजे राम गुहा, विनय लाल जे डावे व कम्युनिस्ट म्हणून प्रसिध्द आहेत. एकांगी मते व तीही मुस्लिमांच्या बाजूची असतील तर एका बाजूने शांततेचा जप करत ती प्रसृत करण्याचा व त्यायोगे तेढ वाढवण्याचा बरखाचा प्रयत्न दिसला जे खरच अचंबीत करणारे होते. निकालानंतर पहिली प्रतिक्रिया विरोधी ( राजीव धवन) देण्यामागे निकालाला पाठिंबा स्पष्ट होत नाही. दुसर्‍या दिवशी ASI चा रिपोर्ट देखील डागाळलेला आहे असे टाइम्स चे मत होते, त्याला आधार अर्थात इरफ़ान हबीब यांचा होता.

३. १९९२ सालची बाबरी मशीद पाडण्याची घटना कोणीही विसरू नये याची बरखास तळमळ लागून राहिलेली दिसली. हा निकाल म्हणजे बाबरी पाडण्याच्या धिक्कारदायक व गुन्हेगारी घटनेपासून मुक्ती आहे असे तर समजले जाणार नाही ना हा प्रश्न तिला वारंवार पडला. पण १९४७ च्या पूर्वीच्या सर्व घटनांचे विस्मरण झाले असल्याने, ’मशिद का पाडली’ ह्यावर चर्चाच काय एक शब्द ही बोलला गेला नाही.

४. एकुणात ह्या निर्णयातील मुस्लिमांच्या विरोधात गेलेल्या बाबी ह्या न्याय्य नसाव्यात असा स्वत:च्या व निमंत्रितांच्या बोलण्यातुन संदेह निर्माण होईल असा बरखाने पूर्ण प्रयत्न केला.

५. माहीती माध्यम अथवा ’बातम्या’ वाहीनी कडून प्रेक्षकांच्या काही अपेक्षा असतात, त्या तर अजिबात पूर्ण झाल्या नाहीत. खालील मुद्द्यांविषयी योग्य/अयोग्य कुठलीच माहिती पहिल्या दोन दिवसात मिळाली नाही.
- निर्मोही अखाडा म्हणजे नक्की कोण?
- खटल्यामधील वादी व प्रतीवादी कोण आहेत?
- वादग्रस्त जागेचे जुने व नवे प्रकाशचित्र, किंवा लघुरूप ज्यायोगे, नक्की जमीनीचा आराखडा लक्षात येइल व निकाल समजण्यास मदत होईल ( मला वाटते इंडिया टिवी वर हे दाखवले गेले पण त्यांच्या भडक पद्धतीने )
- जागेच्या वाटणीविशयी तद्न्यांच्या सूचना - कशा प्रकारे वापरता येईल हे स्थापत्य दृष्टीकोणातून पाहणे.

ह्याहून ही बरेच मुद्दे मांडता येतील, पण नमुन्यादाखल वरती दिलेले ही पुरेसे आहेत असे वाटते

केवळ मत-मतांतरे मांडून आपण उत्तम पत्रकारीता करत आहोत असे बरखा व तिच्या जमातीस वाटत असेल तर ते चूक अहे. त्याच प्रमाणे त्यांच्या स्टूडिय़ो मधे मांडलेली मते हाच अभ्यासू व नवीन भारताचा चेहरा आहे असे त्यंनी व प्रेक्षकांनी समजणे हेही चूक व धोकादायक आहे.
काल पर्यंत टाइम्स ऑफ़ इंडिया व एनडीटीवी वरच्या निवडक बातम्या व ब्लॉग वर आलेल्या ’कॉमेंट्स’ चा वरवर जरी आढावा घेतला तर खालील चित्र दिसते.
http://www.ndtv.com/article/india/ayodhya-verdict-cong-seeks-reconciliat...
Ayodhya verdict: Cong seeks reconciliation, BJP says let temple be built - Barakha’s live telecast
Slamming 17,Accepting 4,Other 4

http://timesofindia.indiatimes.com/india/ASI-report-far-from-foolproof/a...
total 5, against 5

http://timesofindia.indiatimes.com/india/Not-the-job-of-HC-bench-to-adju...
Opposing the views 16,Accepting 4

http://blogs.timesofindia.indiatimes.com/Introspection/entry/bapu-hindui...
30+ opposing comments,very few admiring comments

याचा अर्थ इंटरनेट ची उपलब्धी असणार्‍या लोकांमधले बहुसंख्य हे ह्या दूषित व ठरवून मुस्लिम धार्जिण्या बातम्यांना नाकारत आहेत हे स्पष्ट दिसते आहे. पण तरीही ही माध्यमे ह्याची दखल घेत नाहीत, व पक्षपाती पत्रकारीता चालूच ठेवतात.
आणि बरखा बोलतच राहते.

* ह्या लेखाचा रोख हा माध्यमांची पक्षपाती पत्रकारीता असून निकालाचे विश्लेषण नाही हे ध्यानात घ्यावे
* लेखातील शुध्द्लेखनातील त्रुटी व इंग्रजी प्रतीशब्द कळवल्यास आभारी असेन

प्रतिक्रिया

अहो ही मंडळी अशीच आहेत. काही दिवसांपूर्वी काश्मीरात सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाणार होते तेव्हा hawks ची यादी टाईम्स ऑफ इंडियात आली होती. त्यात हुरियतच्या गिलानींपेक्षा हॉक मध्ये अडवाणींचे नाव पुढे होते.आता बोला.

भारतातील इंग्रजी माध्यमे ही हिंदूद्वेषावर आधारुन पत्रकारिता करत असतात हे नवे नाही.

अनिल २७'s picture

2 Oct 2010 - 11:25 am | अनिल २७

भारतीय ईंग्रजी माध्यमे व वृत्तवाहिन्या यांना "मूर्ख " हा शब्द चपखल बसतो...

प्रशु's picture

2 Oct 2010 - 11:49 am | प्रशु

निखिल वागळे, प्रकाश बाळ, हे मराठी वाहिन्यांवर असाच गोंधळ घालीत होते. तरी एक प्रश्न असा उरतो कि न्यायालयाच्या निर्णयावर अशा पद्ध्तीने चर्चा करणे म्हणजे न्यायालयाचा अपमान नाहि का?

विनायक पाचलग's picture

3 Oct 2010 - 4:40 pm | विनायक पाचलग

निखिल वागळे, प्रकाश बाळ, हे मराठी वाहिन्यांवर असाच गोंधळ घालीत होते. तरी एक प्रश्न असा उरतो कि न्यायालयाच्या निर्णयावर अशा पद्ध्तीने चर्चा करणे म्हणजे न्यायालयाचा अपमान नाहि का?

५०० % सहमत ...
न्यायालयाचा निकाल हा पहिल्यांदा मान्य करायचा असतो आणि मग कृती आणि चर्चा वगैरे करायची असते .....
इथे सगळीच बोंब होती .....
आणि यातुन आम्ही दंगा न माजण्यासाठी हे करत होतो असे स्पष्टीकरण ....
काही वृत्तपत्रानी देखील .. जागेचे त्रिभाजन अशा बातम्या दिल्या ..
मात्र तिथे राम मंदिर होते हे मान्य केले हे कुठेतरी कोपर्‍यात दिले ..

अपूर्व कात्रे's picture

2 Oct 2010 - 1:31 pm | अपूर्व कात्रे

काही वृत्त वाहिन्यांवर "राम" ही व्यक्तिरेखा खरी असल्याचे पुरावे नसल्याने पूर्णपणे काल्पनिक असूनही राममंदिर बांधण्यासाठी सरकारने जागा कशी काय दिली असेही विचारले गेले. जर राम काल्पनिक असेल तर मग मशिदीत बसून ज्या अल्लासाठी नमाज पढला जातो तो अल्ला काय खरा आहे काय? किंवा त्याचे जन्म-मृत्यूचे काही रेकॉर्ड सापडले आहे काय असे विचारावेसे वाटते.

बाकी बरखा दत्त अश्या चित्र विचित्र गोष्टी करण्यात पुढे आहेतच. कारगिल युद्धाच्या वेळी त्या बाईंचे युद्धभूमीवर जाऊन चित्रीकरण करणे म्हणजे भारतीय सैन्यदलासाठी मोठी डोकेदुखी ठरली होती असे त्या युद्धात भाग घेतलेल्या एका निवृत्त अधिकार्याने म्हटले होते.

आणि बरखा दत्त ज्या वाहिनीसाठी काम करतात ती (NDTV) वाहिनीही पीतपत्रकारितेसाठी बदनाम आहे.

गुंडोपंत's picture

2 Oct 2010 - 1:58 pm | गुंडोपंत

एक नंबरचे *** लोक आहेत हे वार्ताहर. आपल्या देशाचे कलंक!!
ही बातम्या देणारी संस्था फार माजल्री आहे साली! :)

*येथे *** श्ब्द त्या लोकांचे वर्णन करण्यासाठी वापरला आहे शिवी म्हणून नाही.

नेत्रेश's picture

2 Oct 2010 - 2:24 pm | नेत्रेश

पंत, शब्दापेक्षा अर्थ खटकतो.
हा अर्थच शीवी आणी ओवी मधला फरक आहे ना?

वाईट शब्द लिहुन त्याला तीतकाच वाईत अर्थाचा दुसरा शब्द सुचवण्यात काय मतलब?

असो, पण भावना पोहोचल्या.

नेत्रेश's picture

2 Oct 2010 - 2:28 pm | नेत्रेश

> लोकशाही ही बहुसंख्यांच्या मताचा/भावनेचा आदर करण्यासाठी राबवली जाते.

चुक. लोकशाही ही बहुसंख्य आणी अल्प संखांक्यांच्या हीत रक्षण करण्यासाठी राबवली जाते. या मध्ये "अल्प संखांक्यांचे हीत रक्षण" हे बहुसंख्यकांवर अन्याय करुन करणे अभीप्रेत नाही.

१. आठवा, आपले पंतप्रधान म्हणाले होते की "या देशातील साधन सामग्रीवर पहीला हक्क अल्प संखांक्यांचा आहे". (त्यांना बरोबरीचा हक्क म्हणायचे असावे)

२. राजेशाही आणी हुकुमशाही मध्ये बहुतेक वेळा बहुसंख्यांच्या मताचा/भावनेचा आदर केला जातो. तेथे अल्प संखांक्यांच्या मताचा/भावनेचा आदर होईल याची खात्री नसते. किंबहुना तो होत नाही, म्हणुनच अल्प संखांक्यांना नेहमी लोकशाही प्रिय असते. (आठवा, तालीबानांनी फोडलेले बौद्ध लेणी. पुढारलेल्या आ़खाती देशात सुद्धा अल्पसंखांक्यांवरील बंधने)

३. लोकशाही मध्ये बहुसंख्यां कडुन बहुमताच्या जोरावर अल्प संखांक्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाते/जावी.
केवळ याच कारणांसाठी हे वाद न्यायालयाच्या माध्यमातुन सोडवीले जातात, भलेही त्याला १०० वर्षे लागोत.
अन्यथा ८०% हींदुंना तीथे मंदीर बांधणे अवघड नाही.

> न्यायालयाचा निर्णय हा इतर पुराव्यांच्या उपलब्धी/अनुपलब्धी बरोबरच बहुसंख्यांच्या भावनेचा आदर करणारा आहे.

न्यायालये बहुसंख्यांच्या भावनेचा आदर करण्यासाठी निर्णय देत नाहीत. किंबहुना निर्णय निष्पक्ष रहावा, कुणाचेही लांगुलचालन करणारा होऊ नये या साठी न्यायालये जागरुक असतात्/असावीत.
हा निर्णय संपुर्णपणे सादर केलेले पुरावे आणी वकीलांचा युक्तिवाद यांचावर आधारीत असेल याची खात्री (मी तरी) बाळगतो.

इंग्रजी माध्यमां संबंधी तुमच्या निरिक्षणाशी सहमत आहे. पण काही मराठी आणी हिंदी मध्यमे सुद्धा मागे नाहीत. लोकसत्ता सारख्या दैनीकातले काही लेख्/अग्रलेख तीडीक आणणारे असतात.

मुळात एखाद्या व्यक्तीवरील राग व्यक्त करायला आई-बहिणींवरुन शिव्या देणे चुकीचे नाही का? त्याच्या आई-बहिणींबद्दल अशा घाणेरड्या पद्ध्तीने अनादर व्यक्त करुन काय मिळते?

गुंडोपंत's picture

2 Oct 2010 - 4:43 pm | गुंडोपंत

स्वाती२ताई, तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे. असे करणे अगदी चुकीचेच आहे. भावनेच्या भरात दिला गेला बॉ हा प्रतिसाद!
पण त्यांचे वार्तांकनही देश विरोधी आहे असे वाटते. शिवाय कधी कधी वर्णन करायला शिव्या हाती येतात असेही होते.
संपादकांनी माझा प्रतिसाद काढून टाकायला माझी अजिबातच हरकत नाही.

आहेतच त्या लायकीचे तर शिव्या द्यायला काय हरकत आहे? आपण सारखा शांतता राखत, सभ्य बोलायचं आणि त्यांनी मात्र...
आणि काय मिळते म्हणाल तर काहीच न करता आल्यामुळे शिव्या देऊन मानसिक समाधान मिळते...ते तरी मिळू द्या..

चिंतामणराव's picture

4 Oct 2010 - 10:14 am | चिंतामणराव

आपल्या हातांत एक गोष्ट आहे. ह्यांचे कार्य़क्रम न पहाणे. ह्यांची TRP घसरली तरच हे लोक कांही शिकण्याची शक्यता आहे. जॉर्ज फर्नांन्डिस ह्यांनी GAT करारावर सह्या केल्यानंतर झालेल्या टिकेला उत्तर देतांना म्हटलं होत कि आम्ही केवळ करारावर सह्या केल्या म्हणून कोकाकोला भारतांत विकला जाणार नाही, भारतांतील जनतेला कोकाकोला हवा असेल तरच विकला जाईल.

अभिरत भिरभि-या's picture

2 Oct 2010 - 6:11 pm | अभिरत भिरभि-या

आणि गंमत म्हणजे या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी डॉन दैनिकाने या निर्णयाची व एकूण भारतीय जनतेच्या संयमाची चक्क प्रशंसा केली आहे.

मुख्य म्हणजे मिडियाची बेजबाबदार सेन्सेशनल बातमीबाजी पाकिस्त्नानच्या हिंस्त्र वर्तमानाला कारण ठरल्याचे म्हटले आहे.
यातील भारतीय मिडीयाला उद्देशून असलेली काही वाक्ये उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही . भारतीय मीडीया .. ऐकतोय ?

Here is where the new electronic media in India will have to play a vital role. Such issues are tailor-made for the kind of sensationalism that these days pass as being investigative journalism on TV.

These channels should learn from their counterparts in Pakistan what not to do. In Pakistan, many major TV news channels in their ratings-hungry madness have, over and again, contributed in inadvertently fueling a lot of the violence that has taken place in this country in the name of faith and sect in the last decade or so.

दुवा
http://www.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/news/pakis...

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Oct 2010 - 8:02 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे. :) अजूनही लोक इंग्रजी लोक इंग्रजी मिडीयाला सिरीयसली कसे घेतात. ते चॅनेल बघायचे ते फक्त मनोरंजनासाठी.

तिमा's picture

2 Oct 2010 - 8:03 pm | तिमा

ह्या जगात सर्वात दुर्दैवी माणूस ठरेल जो 'बरखा दत्तचा नवरा बनेल.
तिचे अज्ञान इतके आहे की बाबरी ढाचा पाडण्याबाबतचे खटले वेगळे आहेत आणि या खटल्याशी त्याचा काहीही संबंध नाही हे तिला माहित नसावे.

पुष्करिणी's picture

3 Oct 2010 - 10:27 pm | पुष्करिणी

जम्मू आणि काश्मिर बँकेचे माजी चेअरमन हासिब्-ए-द्राबू तिचा नवरा आहे असं म्हणतात .
चेहर्‍यावरून तरी दुर्दैवी वगैरे वाटत नाहीत :)

गोरिला's picture

3 Oct 2010 - 6:59 pm | गोरिला

इंग्रज गेले पण ह्या माकडांना सोडून गेले .

आंसमा शख्स's picture

4 Oct 2010 - 5:49 am | आंसमा शख्स

हे लोक कधी काय बोलतील याची शाश्वती नाही. फार मनावर घेऊ नये.

त्या मोकळ्या जागेवर आम्ही मशिद बंधू शकतो व हा मुद्दा त्यांना (हिंदूंना) कटकटीचा होईल

हे वाक्य जिलानीसाहेब कधी म्हणाले? असेल तर तसे होईल का? का कटकट होईल असे त्यांना वाटते? खुदाच्या जागेवर जाऊन दुसर्‍यांना कटकट होणार असे असेल तर त्यात कसला आला अमन? माझ्या मते तरी ही जागा हिंदूंना देऊन टाकली पाहिजे. पण त्या बदल्यात हिंदूंनी वेगळ्या ठिकाणी एक उत्तम मस्जिद बनऊन द्यावी. या द्वारे दोन्ही कडचे कडवे शांत होतील. आर एसेस ने पुढाकार घ्यावा.

अनिल २७'s picture

5 Oct 2010 - 10:42 am | अनिल २७

+१०० % सहमत..

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Oct 2010 - 12:35 pm | llपुण्याचे पेशवेll

अंशतः सहमत. हिंदूनी मुसलमानांना इतरत्र चांगली जागा देऊ करावी व त्यावर मुसलमानांनी मशिद बांधावी.

गांधीवादी's picture

10 Oct 2010 - 5:40 am | गांधीवादी

न हिंदूंनी , न मुसलमानांनी,
ज्यांना धार्मिक स्थळे बांधण्याचा अनुभव आहे, जे त्या क्षेत्रात पारंगत आहेत, त्यांनीच बांधावी.
( ते CWG पुलासारखे व्ह्यायला नको.)

संजयशिवाजीरावगडगे's picture

4 Oct 2010 - 1:49 pm | संजयशिवाजीरावगडगे

भारतीय ईंग्रजी माध्यमे व वृत्तवाहिन्या म्हणजे शुद्ध फालतुपणा !!!!

समंजस's picture

5 Oct 2010 - 10:28 am | समंजस

दत्त या व्यक्ती बद्दल काय बोलावे.....ज्या व्यक्तीला देशातील सुरक्षीततेपेक्षा, शांतते पेक्षा, धार्मिक सौहार्दापेक्षा आपल्या वाहिनीचा आर्थिक फायदा बघणे, आपल्या वाहिनीच्या मालकाचा नफा कसा वाढणार हे बघणे जास्त आवश्यक आहे त्या व्यक्तीला जबाबदार पत्रकार म्हणणे तर दुरच राहीले त्या व्यक्तीला जबाबदार नागरीक म्हणणे सुद्धा चुकीचं आणि धाडसी ठरेल.

या बरखा दत्त तथाकथित पत्रकाराचं त्या दिवशीचं चर्चासत्र थोडं बघितलं(इतर दिवशी नाही बघत कारण अश्या लोकांच्या कार्यक्रमाचं टी.आर.पी. वाढवून त्यांच्या नफ्यात वाढ करायची नसल्यामुळे) त्यात स्पष्टपणे दिसत होतं कशाप्रकारे ही अर्धवट वाक्य घेउन, अर्धवट उतारे घेउन ह्या निर्णयामुळे भाजपाला/संघाला आनंद/फायदा झाला आणि मुस्लिमांना दु:ख/नुकसान झालं हे दाखवण्याचा प्रयत्न करणे तसेच या चर्चासत्रात भाग घेणार्‍यांकडून यावर तशी अनुकूल प्रतिक्रिया मिळवणे हा प्रयत्न न थकता सुरूच होता.
विषयाची गंभिरता लक्षात घेउन ईतर व्यक्ती समजूतीने बोलत होती मात्र बरखा दत्त त्यांनी या निर्णयावर काहीतरी निषेधात्मक बोलावं हा प्रयत्न करत होती.

जे व्यक्ती तिच्या टिप्पण्यांना मुळीच समर्थन करत नव्हती किंवा तीला हवं ती उत्तरे देत नव्हती त्या व्यक्तींना जास्त वेळ सुद्धा देत नव्हती बोलायला.

इंडीयन एक्सप्रेस चे पत्रकार शेखर हे तर शेवटी कंटाळून गेलेत तीला हे सांगताना की अडवाणी जे काही बोललेत मिळालेल्या १/३ जागेत भव्य मंदिर निर्माण करण्याबद्दल त्यात काही वावगं नाही कारण न्यायालयानेच ही १/३ जागा दिली आहे रामलल्ला करीता त्या जागेवर अर्थातच मदिर बांधलं जाणार मग ते भव्य बांधलं जाणार असं अडवाणी बोललेत त्यात वाईट काय? पण तरी सुद्धा बरखा दत्त त्या बद्दल शेखर ला परत परत विचारत राहीली कारण तीला जे उत्तर हवं होतं ते मिळत नव्हतं :)

निरपेक्ष पत्रकारीतेशी संबंध नसलेल्या बरखा दत्त या व्यक्तीला जास्त महत्व देणे म्हणजे अश्या प्रवृत्तीला खतपाणी घालणे होय. मी हे टाळत आलोय.

[अवांतरः खुप आधी म्हणजे जेव्हा त्रयीतील बरखा दत्त ही स्टार प्लस या वाहिनीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती तेव्हा एका कुठल्याशा मासिकात तीची एक छोटीशी मुलाखत वाचण्यात आली होती.
त्यात तीने सांगितले होते की ती निधर्मी आहे, ती लहान असतानाच तीची आई वारली तसेच ती आयुष्यात लग्न करणार नाही. तेव्हा तीचं वय मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे २८ होतं. काही वेळेस माझ्या डोक्यात विचार येतो की निधर्मी असल्याचा परिणाम तीच्या पत्रकारीतेत दिसून येतो का? आई नसल्यामुळे निधर्मी झाली असेल का? निधर्मी असणे आणि भाजपावर/हिंदुत्ववादी पक्षांवर राग असण्याचा काय संबंध? ]

पुष्कर जोशी's picture

5 Oct 2010 - 6:43 am | पुष्कर जोशी

बरखा दत्त या व्यक्ति बद्दल चांगली किंवा वाइट अशी कोणतिही चर्चा करु न तिला प्रसिद्ध करु नये

१० वेळेस नाव ऐकले कि लक्षात राहते.

विसरुन जाणेच उत्तम

येडा
-- ढकल कर

अनिल २७'s picture

5 Oct 2010 - 10:45 am | अनिल २७

चालेल..

बरखा प्रसिध्द होण्याचे दु़:ख नाही पण अशी बुध्दीभेदी पत्रकारीता फोफावते..

बरखा दत्त नेहमीच डो़क्यात जाते.

व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍या ह्या लोकांचे विचार किती तकलादु आहेत हे चैतन्य कुंटे प्रकरणावरुन लगेच कळते.

चेतन

अविनाश कदम's picture

10 Oct 2010 - 2:10 am | अविनाश कदम

चर्चा चांगलीच रंगलीय. पण मशीद पाडणार्‍यांना गुन्हेगार ठरवून उद्या शिक्षा झाली तर ते आता हुतात्मेच ठरतील असं आलाहबाद कोर्टाच्या निकालावरून दिसतं मग आपापल्या गावातून, वाडीतून मशीद पाडायला गेलेल्यांचे पुतळे उभारायला आताच सुरवात का करू नये? खरं तर भारत देशावरील पापाचा कलंक धुवून काढण्याकरीता प्रयत्न करणारे आडवानी वगैरे विष्णूचेंच अवतार आहेत. त्यांचीही खरं म्हणजे मंदीरं बांधायला हवीत. आता रामराज्य अवतरणार हे नक्की झालं आहे याचा फारच आनंद झाला. २१ व्या शतकात जगात उंच भरारी घेण्यासाठी भारताला या रामराज्याचा खूपच उपयोग होईल..

गांधीवादी's picture

10 Oct 2010 - 6:01 am | गांधीवादी

२१ व्या शतकात जगात उंच भरारी घेण्यासाठी भारताला धर्म नावाचे ओझे थोडे बाजूला ठेवावे लागणार आहे.
त्याचू सुरुवात कोण करणार ? हिंदू कि मुस्लीम ?
दोघे एक आहेत, अल्ला राम एक आहे, दोघांच्या रक्ताचा रंग एक आहे, सगळी मानव जात एक आहे, हे सगळे कितीही खरे असले तरी एक होण्यासाठी पाऊले दोघांकडून उचलली गेली पाहिजे. पहिले पाऊल कोण उचलणार ?
पहिले पाऊल कोणीही उचलले तरी दुसरा सुद्धा पाऊल उचलेल ह्याची शाश्वती काय ?
हा प्रश्न केवळ राम मंदिरासाठी नाहीच्चे मुळी. प्रश्न ह्या दोन धर्मातील विचारसरणीचा आहे. असे मला वाटते.
आपल्या माहितीसाठी, आमच्या पेठेतील एक हनुमानाचे मंदिर ३ वेळा रस्ता रुंदीकरणासाठी आम्ही हलविले. त्यासाठी संबधित सरकारी अधिकार्यांना आमचे पूर्ण सहकार्य होते. अशी मी बरीच उदाहरणे देऊ शकेल कि जनहितासाठी मंदिरे हलविण्यास हिंदूंनी काही हरकत न घेता उलट सहकार्य केले आहे. आमच्या झोपडपट्टीत अंदाजे १२०० कुटुंबे असतील, त्यात ४-५ मुस्लीम कुटुंबाबरोबर आमचे चांगले (अगदी घनिष्ट नाही) संबंध आहेत.