शेवटी लागला एकदाचा फैसला ! ! ! आयोध्येचा निकाल लागला.

गांधीवादी's picture
गांधीवादी in काथ्याकूट
30 Sep 2010 - 4:47 pm
गाभा: 

गेली 60 वर्षे अडकून पडलेला हा आयोध्येचा फैसला आज दिनांक ३०/९/१० रोजी दुपारी अलाहाबादच्या उच्च न्यायालयात सुनावण्यात आला. ज्या निकालावर केवळ भारतीय जनताच काय, संपूर्ण जगभरातले लोक डोळे लाऊन बसली आहेत, असा हा निकाल लागला.
तर बघूया काय निकाल लागला ते .
रामलल्ला जिथे आहेत तिथेच राहतील, आयोध्या हे रामजन्म स्थान आहे. पण जागेची वाटणी करून हिंदू (एक त्रीतीयांश) आणि मुसलमान (एक त्रीतीयांश) यांना दिली जाईल.

ज्यांचं बाजूने निकाल लागलेला नाही त्यांना मात्र सर्वोच्च न्यायालय अपील करण्याचा अधिकार आहेच. अलाहाबादच्या न्यायालयाने अपील करण्यासाठी 60 दिवसांची मुदत दिली. त्यामुळे हि केस आता सर्वोच्च न्यायालय लढली जाईल ह्यात काही शंका नाही.
सर्व जणांनी शांतता राखावी, हेच आमच्याकडून सर्वांना आवाहन.

संपादक मंडळ :- आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे की मत मांडताना संयत भाषा वापरावी.

प्रतिक्रिया

सर्व जणांनी शांतता राखावी, हेच आमच्याकडून सर्वांना आवाहन.................असेच.....

विजुभाऊ's picture

30 Sep 2010 - 7:11 pm | विजुभाऊ

बरे झाले निकाल लागला.
आता भारताचे कल्याण होईल. देशाला पुन्हा ते सोनेरी दिवस येतील. ऑलिम्पीकमध्ये खोर्‍याने पदके मिळतील. रुपयाची क्रयशक्ती वाढेल. बहुतेकाना काम मिळेल. डेंग्यू , मलेरीया , डायबेटीस , अतीरेकी वगैरे संकटे नष्ट होतील.
सर्व मुलांना शिक्षण मिळेल.
भारत जी ८ देशांत सर्वात बलवान पुढारी होईल . एक शैक्षणीक आर्थीक लश्करी वगैरे वगैरे महामहासत्ता होईल

समंजस's picture

1 Oct 2010 - 10:57 am | समंजस

आशावाद आहे :)

[अवांतरः असं म्हणता येईल का, गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली ]

पैसा's picture

30 Sep 2010 - 5:59 pm | पैसा

निकाल पाहता काही गडबड होईलसं वाटतं नाही. साधारण हाच निकाल अपेक्षित होता.

निकाल हाच अपेक्षित होता मान्य आहे.
परंतु हाच निकाल द्याय्चा होता तर येव्हडा वेळ लागण्याचे तसे काहीच कारण नव्हते . असे वाटले

निवेदिता-ताई's picture

30 Sep 2010 - 5:04 pm | निवेदिता-ताई

होय..........हाच निकाल अपेक्षित होता............जय श्रीराम........

प्रमोद्_पुणे's picture

30 Sep 2010 - 5:07 pm | प्रमोद्_पुणे

बरीच गुंतागुंत असेल निकालात. थोडे थांबूयात. वकफने title claim केले होते. ते रीजेक्ट झाले का? असेल तर ते अपीलात जातीलच.

गांधीवादी's picture

30 Sep 2010 - 5:16 pm | गांधीवादी

Allahabad High Court verdict on Ayodhya title suits out | The ownership of the disputed site is to be divided into three parts: the site of the Ramlala idol to Lord Ram, Nirmohi Akhara gets Sita Rasoi and Ram Chabutara, Sunni Wakf Board gets the rest | Status quo to be maintained for three months
TIMES OF INDIA

प्रमोद्_पुणे's picture

30 Sep 2010 - 5:24 pm | प्रमोद्_पुणे

गांधीवादी ते समजले. But how can Hon'ble HC decide on division of a disputed land? It can at the most suggest. अ आणि ब मधे Title dispute असेल तर मालकी हक्क एकतर अ कडे जायला हवा अथवा ब कडे.

असो, हे प्राथमिक मत. सविस्तर लिहिनच.

नावातकायआहे's picture

30 Sep 2010 - 5:14 pm | नावातकायआहे

लिंक??

नावातकायआहे's picture

30 Sep 2010 - 5:28 pm | नावातकायआहे

जय श्री राम!

सेंट्रल सुन्नी वक्फ़ बोर्डाची याचिका फेटाळली गेली आहे. आणि कोर्टाने हे मान्य केले आहे की जेथे सध्या मूर्ती आहेत तीच रामजन्मभुमी. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणा नुसार मशिदीच्या खाली हिंदु मंदिराचे अवशेष आहेत.
अर्थात दोन्ही बाजू कोर्टात जाणार आहेत. पण मोहन भागवत म्हणत आहेत की चला आता राममंदिर बांधू या!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Sep 2010 - 5:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंत, मिपावर अजूनही अधिकृत निकालाचा दुवा आणि त्यावरील माहिती काही मिळेना. माझं नेट मंद झाले आहे. कोणी या दुव्यावरुन असलेला निकाल वाचून काही माहिती डकवतील काय ?

-दिलीप बिरुटे

सुधीर१३७'s picture

5 Oct 2010 - 10:41 pm | सुधीर१३७

मी संपूर्ण निकाल वाचलेला नाही, परंतु मा. न्या. सुधीर आगरवाल यांचे निकालपत्रातील काही पाने वाचली आहेत व त्यावरून मला असे वाटते की, न्यायालयाने कायदेशीर बाबींचा संपूर्ण विचार करूनच योग्य असा निर्णय दिला आहे.
केवळ वाद मिटविणे अथवा दोन्ही बाजूंना खुश ठेवण्याच्या हेतूने असा निकाल दिला गेलेला नाही.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे कयदेशीर दृष्ट्या विचारात घेऊनच ह निर्णय दिला आहे.

हिंदूंचे म्हणण्यानुसार या जागेवर मंदिर पाडून मशीद बांधली गेली हे न्यायालयाने मान्य केले आहे, कारण...
१) याबाबत हिंदूंचे म्हणणे कायम एकच (Consistent) आहे, त्यामध्ये बदल केला नाही व तसा पुरावा न्यायालयासमोर आलेला आहे.

२) मुस्लीमांनी मोकळ्या जमिनीवर सदर मशीद बांधली आहे असा पवित्रा दावा लावताना घेतला होता; परंतु त्यांनी पुरावा देताना मात्र A.S.I. चा रिपोर्ट आल्यानंतर , जुना इदगाह पाडून त्यावर नवीन मशीद बांधली अश्या स्वरुपाचा पुरावा देण्याचा प्रयत्न केला, जो मुळातच त्यांचा दावा नव्हता, त्यामुळे त्यावर न्यायालयाने अविश्वास दाखवला आहे. असा खोटा पुरावा देण्यास मदत करणारे हिंदू आहेत हे ही येथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अशा अर्धतज्ज्ञांच्या (हा शब्द माझा आहे) साक्षीवर न्यायालयाने अविश्वास दाखविला आहे.

३) न्यायालयात साक्ष देणा-या साक्षीदारांनी मशिदीचे बाजूला चबुत-यावर रामपूजन कैक वर्षांपासून चालू असल्याचे मान्य केले, इतकेच नव्हे तर हिंदु संपूर्ण परिसराला परिक्रमा करतात व त्यामध्ये मशीदही येते हे देखील मान्य केले. अशी साक्ष देणारे मुस्लीमही आहेत.

४) सीता रसोईचा परिसर निर्मोही आखाड्याचे ताब्यात आहे.

५) ताब्याबाबत संपूर्ण जमीन ही तीनही पक्षकारांच्या ताब्यात वर्षानुवर्षे आहे असेही न्यायालयापुढील पुराव्यात आले आहे. प्रत्येकाच्या ताब्यात विशिष्ट जागा आहे, ती ती जागा त्या त्या पक्षकारांना देण्यात आलेली आहे.

६) न्यायालयीन निकालपत्रात हिंदूंच्या मूळ वादाचे निराकरण झाले असून मंदिर पाडून मशीद बांधली गेली असल्याबाबत उत्खननात मिळालेले पुरावे ग्राह्य धरण्यात आलेले आहेत. याकामी अतिशय जुन्या काळाचा विअचार केला गेलेला आहे.

७) प्रत्यक्ष वाटपाबाबत मात्र १२ वर्षांचे कायदेशीर तत्त्वाचाच वापर केला आहे, यामध्ये प्रामुख्याने १९३४ ते १९४९-५० या काळाचा विचार केला आहे, जे पूर्णपणे कायदेशीर आहे.

यापेक्षा अधिक माहिती देणे सध्या शक्य नाही, कारण संपूर्ण निकालपत्र वाचणे व्यक्तिगत कारणांमुळे मला सध्या शक्य नाही.

पैसा's picture

30 Sep 2010 - 5:42 pm | पैसा

अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल पुढे आहे.

लिंक

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणा नुसार मशिदीच्या खाली हिंदु मंदिराचे अवशेष आहेत.
मग प्रश्न संपायला हवा.
हे निर्मोही अखाडा काय प्रकरण आहे? त्यांचा या जागेशी काय संबंध? त्यांना इथे काय उभे करायचय?कोणी जाणकार प्रकाश टाकतील काय?

अवांतर : अयोध्येतील वादग्रस्त जागा रामजन्मभूमीच! कोर्टाचे असे म्हणणे असेल तर मधे कुठल्यातरी काँग्रेसी नेत्याला पडलेला "राम होता की नव्हता" हा प्रश्नही अपोआप निकालात निघालेला आहे असे म्हणावे काय?

यशवंतकुलकर्णी's picture

30 Sep 2010 - 5:43 pm | यशवंतकुलकर्णी

होय!

तन्गो's picture

30 Sep 2010 - 6:22 pm | तन्गो

मला एक समजत नाहि कि मुलिमानान्ना ह्यान सगल्या गोश्ति खतकत कश्या नाहित.
म्हन्जे....
अयोध्येत राम मन्दिर , इस्रएल मध्येन जेरुस्लेम .... बर ह्या झाल्या इतिहसात्ल्या गोश्ति.

पन आता 'New york mosque' बद्दलहिन तेच......

९/११ नन्तर तेथे मुस्लिमासाथि गूदविल तयार कर्ने हे तेथिल मुस्लिमाचे काम.पन ते सगले सोदुन म्हने आम्हि त्या जागि मशीद बान्धु .

आरे काय दोक सतक्लय का?...

इन्द्र्राज पवार's picture

30 Sep 2010 - 5:41 pm | इन्द्र्राज पवार

आत्ताच विविध चॅनेल्सवर या संबंधातील बातम्या पाहिल्या; आणि सर्वात शहाणपणाची गोष्ट तिन्ही बाजूच्या दावेदारांकडून झाली असेल तर ती ही की, प्रत्येकाने सर्व देशबांधवांना 'हा निकाल मान्य करावा आणि ज्यांना आपला विजय झाला असेल असे वाटते त्यांनी फटाके उडवून वा मिठाई वाटून तो साजरा करू नये....तर ज्यांना अन्याय झाला आहे असे वाटते त्यांनी त्याविरूध्द उग्रता दाखवू नये. त्यांना सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडे आहेतच.'

प्रथमच चॅनेल्सवाल्यांनीही भडकाऊ प्रतिक्रिया दाखविणे जाणीवपूर्वक टाळले आहे....तसेच पॅनेलसमवेत कोर्टाच्या निकालातून 'रीड बिटवीन द लाईन्स' हा प्रकारही केल्याचे दिसत नाही.

तेव्हा इथेही निकालाचे 'पोस्टमार्टेम' न करता एकतेचे, बंधुत्वाचे, सलोख्याचे वातावरण राहील अशीरितीने या धाग्यावर चर्चेचे रूप ठेऊ या.

इन्द्रा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Sep 2010 - 5:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>प्रथमच चॅनेल्सवाल्यांनीही भडकाऊ प्रतिक्रिया दाखविणे जाणीवपूर्वक टाळले आहे.
अगदी अगदी...! अजूनतरी वाहिन्यांवर संयमित चर्चा चालू आहे.
मोहन भागवतांनी जरा दम धरावा, असे वाटते.

-दिलीप बिरुटे

पुष्करिणी's picture

30 Sep 2010 - 5:48 pm | पुष्करिणी

एन डी टिव्ही वर जरा वेगळं चित्र आहे. हरिश साळव्यांनी आत्ताच दत्त बाईंना जोरदार झापलय .

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Sep 2010 - 6:03 pm | बिपिन कार्यकर्ते

का?

पण दत्तबाई झापायच्याच लायकीची आहे.

प्रमोद्_पुणे's picture

30 Sep 2010 - 6:08 pm | प्रमोद्_पुणे

फार आगाउ आहे. सर्वज्ञानी असल्यासारखे वागते. साळवे म्हणजे लय झाडले असेल बाईला. मिस केले..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Sep 2010 - 6:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कुठे बघायला मिळेल का इंटरनेटवर?

मुशाफिर's picture

2 Oct 2010 - 4:48 am | मुशाफिर
पुष्करिणी's picture

30 Sep 2010 - 6:22 pm | पुष्करिणी

न्यायमूर्तींची वाक्यं अर्धवट वाचून मतं विचारतेय, भडकावतेय उगाचच .

साळवे म्हणाले , 'बाई जरा पूर्ण वाक्य वाचा बरं' , मग पूर्ण वाक्य आणि पुढची २ वाचल्यावर अर्थ बदलला.
'एका जर्नॅलिस्ट्ला हे महत्वाचं वाटत्च नाही आश्चर्य आहे आणि उगाच पूर्ण रिपोर्ट वाचल्याशिवाय कशाला प्रश्न विचारताय, जरा दम खा' असं जोरात म्हणालेत साळवे .

अगदी गप्राव :) . थोडी शांत झालीय ..

मोहन भागवतांच बोलणं अ‍ॅक्चुअली अत्यंत संयमित वाटलं मला.

शिल्पा ब's picture

30 Sep 2010 - 9:05 pm | शिल्पा ब

लिंक द्या...
बाकी मन आनंदीत झाले..

विनायक प्रभू's picture

30 Sep 2010 - 6:09 pm | विनायक प्रभू

असे का म्हणता हो आपण बिपिन कार्यकर्ते राव साहेब जी.?
त्यांना म्हणे पद्मश्री पण मिळाली आहे.

निखिल देशपांडे's picture

30 Sep 2010 - 5:49 pm | निखिल देशपांडे

इंद्रा चा प्रतिसाद आवडला
सध्या http://rjbm.nic.in/ इथे निकालाचा गोषवारा वाचत आहे. त्यानंतरच मत मांडेन

चिरोटा's picture

30 Sep 2010 - 6:14 pm | चिरोटा

बरेच वर्षे अडकून पडलेला बोळा तात्पुरता का होईना निघाला आहे असे म्हणता येईल.

तिमा's picture

30 Sep 2010 - 8:27 pm | तिमा

बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,ह्युस्टन,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल,फ्रिमॉन्ट्,हेवर्ड,बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे
ह्या लिस्टमधे अयोध्या पण घाला आता!

मदनबाण's picture

30 Sep 2010 - 6:39 pm | मदनबाण

योग्य निर्णय...
परकियांनी सदैव या महान देशावर आक्रमण केलेले आहे.
मूर्ती भंजन करणारे परकियच होते., आणि असाच परकिय बाबर... त्यांनी ही बांधलेली मशिद. तेही रामलल्लाच्या जागेवर.
ती आज रामलल्लाला परत मिळाली. :)
हे बाबराने ( परकिय आक्रमक) केलेले बांधकाम गैरइस्लामी आहे, हे निकालात म्हंटले गेले आहे...

जाता जाता :---

पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम्
झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी॥१०- ३१॥
अर्थात :---
पवित्र करने वालों में मैं पवन (हवा) हूँ और शस्त्र धारण करने वालों में भगवान राम। मछलियों में
मैं मकर हूँ और नदीयों में जाह्नवी (गँगा)।
संदर्भ :--- श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० वा.
http://alturl.com/5m9zp

(जय श्रीराम)

गुंडोपंत's picture

30 Sep 2010 - 6:43 pm | गुंडोपंत

ती जागा मशिद नाहीच... नव्हती असे कोर्टाने सांगितले आहे.
मग तेथे नमाज पढलेले, पढलेले... काफिर ठरतात का?
म्हणजे ते मंदिरात जात होते त्यांना तर हिंदूच म्हंटले पाहिजे... ;))

मदनबाण's picture

30 Sep 2010 - 6:48 pm | मदनबाण

मी तर बर्‍याचवेळा त्याचा उल्लेख बाबरी ढाचा असाच केलेला वाचला आणि ऐकला आहे.

चिंतामणी's picture

1 Oct 2010 - 1:43 am | चिंतामणी

ती जागा मशिद नाहीच... नव्हती असे कोर्टाने सांगितले आहे.
मग तेथे नमाज पढलेले, पढलेले... काफिर ठरतात का?

एक नंबरचा प्रश्ण. जास्त बोलायची जरूरी नाही.

:))

चित्रा's picture

30 Sep 2010 - 6:47 pm | चित्रा

लिहीता-बोलताना संयम बाळगावा, अशी अपेक्षा आहे.
निकाल कोर्टाने दिला आहे, जर चर्चा व्हायची असली तर कोर्टाच्या निर्णयावर व्हावी.
येथे आपल्यावैयक्तिक धार्मिक श्रद्धांचे प्रदर्शन करण्याची गरज भासू नये. ते सध्याच्या परिस्थितीत सवंग, भडकवणारे वाटू शकते याची नोंद घ्यावी.

मदनबाण's picture

30 Sep 2010 - 6:49 pm | मदनबाण

लिहीता-बोलताना संयम बाळगावा, अशी अपेक्षा आहे

कवितानागेश's picture

30 Sep 2010 - 6:56 pm | कवितानागेश

संयम बाळगून येथे शांतता राखून ठेवत आहे.

||शांतता||

चित्रा's picture

30 Sep 2010 - 7:13 pm | चित्रा

मनापासून धन्यवाद. :)

गोरिला's picture

30 Sep 2010 - 7:09 pm | गोरिला

सग्ला पोपत झाला बाला.

कै पन प्रतिक्रियआ नै देनर .

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Sep 2010 - 7:11 pm | बिपिन कार्यकर्ते

निकाल काय ते नक्की कळले नाहीये अजून. पण एकंदरीत सगळ्यांना खुश करायचा प्रयत्न आहे का? कोणाही एका बाजूने निकाल लागणे अपेक्षित असते. मग ती कोणतीही बाजू असो. विशेषतः तिथे खाली मंदिराचे अवशेष आहेत असे निकालातच म्हणले आहे असे ऐकतोय. मग अजून काय कारण होते की १/३ वाटप करावे लागले?

जाणकारांनी / अभ्यासूंनी इथे मते मांडावीत अशी अपेक्षा आहे. धनंजय, विकास इत्यादींची वाट बघत आहे.

नितिन थत्ते's picture

30 Sep 2010 - 7:17 pm | नितिन थत्ते

मला एक गंमतीदार शोध लागला आहे.
एका जमिनीच्या तुकड्यावर एका ठिकाणी नितिन थत्तेला बसवला आहे. त्यावर ती जमीन स्वतःची असल्याचे अनेकांचे दावे आहेत. दाव्याच्या सुनावणीत कोणीच काहीच पुरावे (जमिनीच्या मालकीचे) दाखवू शकले नाहीत.

निर्णय :
१. सगळे दावेदार जॉईंट ओनर समजून तेवढ्या भागात वाटणी करा.
२. पुरावे नसल्याने वहिवाटीनुसार नितिन थत्तेला जिथे बसवला आहे तेथून त्याला हटवायचे नाही. त्यामुळे भाग करताना 'ती' जागा नितिन थत्तेलाच मिळेल.
३. दोन हिंदू दावेदार आणि एक मुस्लिम दावेदार होते म्हणून तीन भाग केले. आठ हिंदू दावेदार आणि आणि दोन मुस्लिम दावेदार असते तर वाटणी दहा भागात होऊन चार पंचमांश हिंदूंना आणि एक पंचमांश मुसलमानांना मिळाला असता. उलट असते तर उलट झाले असते.

ज्याने 'रामलल्ला विराजमान' ला एक दावेदार केले तो देशातला सगळ्यात हुशार माणूस आहे. :)

गंमत मान्य, पण सदर जागा ह्या तिघाही दावेदारांना खाजगीरीत्या वा व्यावसायिक फायद्यासाठी वापरता येणार नाही अशी काही तरतुद केली आहे की नाही? असल्यास गमतीची गम्मत कमी होईल. :-)

समंजस's picture

1 Oct 2010 - 2:26 pm | समंजस

<<< ज्याने 'रामलल्ला विराजमान' ला एक दावेदार केले तो देशातला सगळ्यात हुशार माणूस आहे.

--- सहमत. तो हुशार माणूस आहेच परंतू सगळ्यात हुशार नाही, कारण त्याच्या पेक्षा किंवा त्याच्या एवढाच हुशार होता तो 'शहेनशहा बाबर' :)
'शहेनशहा बाबर' ज्याने उत्तर हिंदूस्थानात राज्य प्रस्थापित केलं (अयोध्या नगरी सकट) त्या शहेनशहाला संपुर्ण अयोध्येत फक्त एकच जागा सापडावी मशिद बांधायला आणि ती सुद्धा अशी की जिथे पुर्वी एक मोठ्ठ मंदिर होतं आणि त्या मंदिराचे अवशेष तिथे विखुरलेले होते :)

सगळीच गमंत आहे. नाही? :)

इन्द्र्राज पवार's picture

1 Oct 2010 - 4:31 pm | इन्द्र्राज पवार

"शहेनशहा बाबर' ज्याने उत्तर हिंदूस्थानात राज्य प्रस्थापित केलं (अयोध्या नगरी सकट) त्या शहेनशहाला संपुर्ण अयोध्येत फक्त एकच जागा सापडावी मशिद बांधायला....."

श्री.समंजस.....वरील वाक्य काहीसे चुकीचे वा अपुर्‍या माहितीचे आहे. प्रत्यक्षात बाबरने ती मशिद बांधलेलीच नाही. बाबरने आक्रमण करून अनेक हिंदू राजांना पराभूत केले. तो काळ होता १५२७चा! त्याच्या सैन्याने उत्तर भारतातील खूप मोठा प्रदेश व्यापला आणि मीर बांकी यास आपल्या सरदारपदी नियुक्त केले. १५२८ मध्ये या मीर बांकी याने अयोध्येस भेट दिली आणि अनेक मंदिरांना जमीनदोस्त केले. त्यापैकी एका जागेवर त्याने जी मशीद बांधली, तिला त्याने आपल्या राजाचे- 'बाबरा'चे नाव दिले. त्यावेळेपासून म्हणून ती "बाबरी मशीद" म्हणून ती ओळखली जाऊ लागली....असा इतिहास आहे.

इन्द्रा

समंजस's picture

1 Oct 2010 - 8:36 pm | समंजस

बाबरच्या ठिकाणी मीर बांकी याचं नाव वाचू शकता त्यामुळे माझ्या वरील प्रतिसादाच्या मुळ अर्थात फरक पडणार नाही :)

[ माझ्या माहिती प्रमाणे 'बाबर मशिद' या नावाने ओळखल्या जाणारी इमारत ही कोणी बांधली आहे यावर बरेच मतप्रवाह आहेत. विकी तसेच आणखी काही ठिकाणी मीर बांकी याने ही इमारत बांधली असा उल्लेख कदाचीत असेल तरी सुद्धा इतर बर्‍याच दस्तवेजांमध्ये मात्र बाबरचं नाव आहे :) उच्च न्यायालयात अश्याच काही दस्तवेजांच्या प्रती पुरावा म्हणून सादर केल्या गेल्या आहेत. सध्या उच्च न्यायालयाचा निर्णय वाचतोय त्यावरून काही निश्चीत मत तयार झालं की या विषयावर बोलेन :) ]

एकूण किती दावेदार होते ...? (नक्की फक्त तीनच का?)

>>दोन हिंदू दावेदार आणि एक मुस्लिम दावेदार होते म्हणून तीन भाग केले. आठ हिंदू दावेदार आणि आणि दोन मुस्लिम दावेदार असते तर वाटणी दहा भागात होऊन चार पंचमांश हिंदूंना आणि एक पंचमांश मुसलमानांना मिळाला असता. उलट असते तर उलट झाले असते.

दावेदार आहेत म्हणुन काहि पुरावा सादर करावा लागतो का? Gopal Singh Visharad ,Zahoor Ahmad , Rajendra Singh अशी बरीच नावे खटल्यात होती मग त्यांना जागेत वाटणी का दिली नाही....?

विचारवंतपणा (सुडो-से.) दाखवण्याचा नेहमीचाच प्रयत्न वाटला.

चेतन

कोर्टाने रामल्लालाच दावेदार मानले पण तो हजर राहू शकत नाही हे लक्षात आल्याने त्याचा बालमित्र, सखा याला दावेदार मानले. १९८९ पासून दोघे सखे वारले तेव्हा त्यांचा वारसदार रामल्ला विराजमान दावेदार झाला. आता वाराणसीच्या बालकृष्णाच्या बालमित्रांचा शोध सुरू झाला आहे. त्यांना शोधून कोर्टात खटला जिंकल्यावर बाबरी मशीद पाडली तशी वाराणशीची मशीद लोकांना पाडावी लागणार नाही. कोर्टाच्या आदेशाने सरकारलाच मशीद पाडावी लागेल. एकूण येत्या काही वर्षात डिमॉलीशनची कामे करणार्‍्या कंत्राटदारांची चलतीच आहे.
आता असे बरेच दर्गे व मशीदी पाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय हे कोर्टाच्या आदेशाने. म्हणजे वाद आणि तणाव निर्माण होण्याची शक्यता नाहीच.

अविनाश

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Sep 2010 - 8:14 pm | llपुण्याचे पेशवेll

जय श्रीराम, सत्यमेव जयते.
हायकोर्टात २/३ मिळाली. :) सुप्रीम कोर्टात ३/३ सगळी जागा मिळेल. :)

क्लिंटन's picture

30 Sep 2010 - 8:31 pm | क्लिंटन

आपले दुसऱ्या चर्चेत टोकाचे मतभेद असले तरी आपल्या या मताला माझा पूर्ण पाठिंबा. ती रामजन्मभूमीच आहे आणि बाबरी ही इस्लामच्या तत्वांविरूध्द आहे असे न्यायालयाने म्हटले आहे. आता हा प्रश्न शांततामय मार्गाने सुटेल अशी आशा करू या.

क्लिंटन

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Sep 2010 - 8:54 pm | llपुण्याचे पेशवेll

:) धन्यवाद.

अविनाश कदम's picture

9 Oct 2010 - 2:13 am | अविनाश कदम

आजच कळलं की रामाचा जन्म आमच्याच देवळाच्या जागी झाला असा दावा असलेली तीस मंदीरे आयोध्येत आहेत. त्याचे पुजारी हायकोर्टाच्या ”मशीदीच्या घुमटाखालीच रामाचा जन्म झाला” या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहेत त्यांनीही रामलल्लाचे बालमित्र (सखे) शोधले आहेत.. ,म्हणजे शिवाजीमहाराजांच्या जन्मतारखेच्या वादा प्रमाणे रामाचा जन्म कुठे झाला हाही वाद आता रंगणार.असे दिसते.नेहमीप्रमाणे हिंदूंच्या या आपसातील वादा मुळे मुस्लीमाना हायसे वाटले असेल. आता हायकोर्टाच्या जजना प्रभू रामचंद्रच वाचवू शकतो. आपला देश एक गमतीशीरच देश आहे. तरीसुद्ध बेटेहो मुव्ह ऑन !! .

ईन्टरफेल's picture

30 Sep 2010 - 9:03 pm | ईन्टरफेल

गपा वो नका झोकु आमि तर ५०% ५० वाले आहोत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Sep 2010 - 11:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कोणीतरी तो निकाल वाचा आणि मशीद गैरइस्लामी कशी आहे ते लिहा प्लीज!

(महाआळशी) अदिती

यशवंतकुलकर्णी's picture

1 Oct 2010 - 12:35 am | यशवंतकुलकर्णी

मशीद गैर-इस्लामी आहे असे निकालात का म्हटलंय ते माहीत नाही आणि एकूण ३९ पानांचे तीन वेगवेग्ळ्या (पक्षी: तिन्ही माननीय, आदरणीय, वंदनीय, चंदनीय इ.इ.इ.इ. न्यायमूर्ती) डोक्यांतून निघालेले निकालपत्र एका डोक्यात साठवून स्वत:चे म्हणणे मांडायला तसाच स्टॅमिना लागेल (ओव्हर टू इन्द्रराज पवार साहेब) ;-)

पण कालपर्वा रेल्वेत भेटलेला एक मुसलमान तावातावानं म्हणत होता-
"कुरान में कहा गया है की दुसरे की जगह पर मस्जिद बनाना हराम है, गैरईस्लामी बात है..हमारी जगह न हो तो हम कभी मस्जिद बनातेही नहीं, बनाई तो जमीन का मुआवजा अदा किया जानेपर ही मस्जिद बनाई जाती है....आजादी के समय गांधी, आंबेडकर जैसे बडे लोंगो ने क्यूं नहीं कहा की मुसलमानों ने उनकी जगह छीनकर हिंदूओं के साथ ज्यादती की है... बात ये है की मस्जिद वहां पहले से थी... और ये मसला आज ही क्यूं उठाया जा रहा है?? "
मी त्याला काही बोललो नव्हतो. काही फायदाच नव्हता बोलून.

तर मला भेटलेल्या मुसलमानाने सांगीतल्याप्रमाणे कुराणमधील अधोरेखीत वाक्याचे सायटेशन (थेट कुराणातून) प्रतिपक्षाने दिले असेल आणि तो न्यायालयाने ग्राह्य धरले असेल असे वाटते.

आंसमा शख्स's picture

1 Oct 2010 - 4:16 am | आंसमा शख्स

जब कोई चीज बनी थी तब तो उसुलोंके साथ ही थी...

और ये मसला आज ही क्यूं उठाया जा रहा है??

यही तो बात है!

शिल्पा ब's picture

1 Oct 2010 - 4:41 am | शिल्पा ब

इतने दिन सब सोये थे अब जाग उठे है.

यशवंतकुलकर्णी's picture

1 Oct 2010 - 5:19 am | यशवंतकुलकर्णी

आंसमा शख्स,
उसूल के आपके मायने शायद अलग हों ।
अगर कुरान की नजर में मुआवजा न दिये बगैर दुसरे की जगह पर मस्जिद बनाना गैर-इस्लामी बात है तो पुरी की पुरी मुघल या इस्लामी सल्तनतें जो हो चुकी है और मक्का-मदिना छोडकर और सभी मुल्कों में हाजीर इस्लामी आबादी - कुरान की नजर में ज्यादती करनेवाली कौमें बन जाती है - क्योंकी बाहरी मुल्क से धावा बोल कर आना और दुसरों की पूरी की पूरी जमीन पर कब्जा जमाना और सिर्फ मस्जिद की जमीन का मुआवजा देना उनका दोहरा रूख जाहीर करेगा - जो इस्लाम की नजर में तो छोड ही दिजीए आदमीयत की नजर में कतई लाजमीं नहीं है ।
गुजारिश करूंगा की चर्चा को शख्सी तौर पर न लें ।

Pain's picture

1 Oct 2010 - 5:29 am | Pain

जब कोई चीज बनी थी तब तो उसुलोंके साथ ही थी...

बळी तो कान पिळी असा त्या काळचा उसुल* होता. त्यानुसारच हे राम मंदिर व इतर अनेक मंदिरे पाडण्यात आली. याच परंपरांना अनुसरून अफझुलखानाने तुळजापूर, पंढरपूरची देवळे तोडली.
तुम्हाला तो नियम आणि या सर्व गोष्टी पटतात का ?

समंजस's picture

1 Oct 2010 - 11:35 am | समंजस

<<< जब कोई चीज बनी थी तब तो उसुलोंके साथ ही थी...

-- हे कदाचीत बरोबर ही असेल. पण दावेदार जर त्याची बाजू न्यायालयात व्यवस्थीत मांडू शकले नाहीत किंवा आवश्यक ते पुरावे देउ शकले नाहीत तर न्यायालयाची काय चुक.

<<< और ये मसला आज ही क्यूं उठाया जा रहा है??
यही तो बात है!

--- हा वाद आताचा नाही तर जुना आहे. १८५३ मध्ये निर्मोही अखाडाने प्रथम आक्षेप घेतला त्या जागेवर मस्जिद असण्यावर.

पुष्करिणी's picture

1 Oct 2010 - 1:59 pm | पुष्करिणी

तारिख -ए-बाबरी हे त्याकाळी नोंदी असलेलं पुस्तक मिळाल्यास वाचा. यात बाबराच्या काळातलं बरच वर्णन आहे, फौजेन तोडफोड केलेल्या धार्मिक स्थळांची यादीही आहे.

इन्द्र्राज पवार's picture

1 Oct 2010 - 10:26 am | इन्द्र्राज पवार

"डोक्यांतून निघालेले निकालपत्र एका डोक्यात साठवून स्वत:चे म्हणणे मांडायला तसाच स्टॅमिना लागेल (ओव्हर टू इन्द्रराज पवार)....."

~~ धन्यवाद.... वेल, हे करता येईल....पण त्याची खरेच आवश्यकता आहे असे वाटत नाही, यशवंत जी. मूळ निकालपत्र ३९ नसूल १००३ पानांचे आहे व त्याचे सार [जे मिडियाला प्रकाशनासाठी दिले ते] ३९ पानांचे आहे. घटनाक्रम इ. स. १५२७ - होय सन १५२७ - पासूनचा आहे, जो गेली ६० वर्षे रखडलेल्या केसमध्ये प्रविष्ठ झाला आहे. त्या शतकापासून अगदी ३० सप्टेंबर २०१० चा नुसता आढावाच नव्हे तर इंच न इंच मोजली गेली आणि मग ते टायटॅनिक काईंड प्रचंड असे निकालपत्र तयार झाले आहे.

ते सर्व इथे मिपावर जरी देता आले तरी त्यातून हकनाक अन्य चर्चेला फाटे फुटत राहतील, आणि नेमके हे कुणालाच नको असावे ... हाय कोर्टाच्या निकालापूर्वी दोनतीन दिवस केन्द्र सरकार आणि सर्वच पक्षांनी, संघटनांनी सहिष्णुतेचे कमालीचे चांगले वातावरण निर्माण केले असल्याने दोन्ही धर्मीयांनी 'जसा आहे तसा' निकाल स्वीकारल्याचे दिसत आहे....भले वक्फ सुप्रीम कोर्टात जाणार अशा बातम्या आहेत....आणि लोकशाही प्रणालीमध्ये ते घटनाबाह्यही नाही.

Ek Hai
आज अहमदाबादच्या एका वर्तमानपत्रात प्रकाशित झालेला हा फोटो बरेच काही सांगतो.

इन्द्रा

यशवंतकुलकर्णी's picture

1 Oct 2010 - 10:39 am | यशवंतकुलकर्णी

या खुदा! हे राम! १००३ पाने???
कठीण आहे!
तुमचे नाव घेताना आम्ही टाकलेला विश्वास किती सार्थ ठरला बघा.
त्या ३९ पानांवर नजर टाकून प्लेंटीफ कोण आणि डिफेंडंट कोण हेच आम्हाला (किमान मला)कळलं नाही.

गुंडोपंत's picture

1 Oct 2010 - 10:40 am | गुंडोपंत

सर्व धर्म समभाव हीच तर मेजर मेजर मिष्टेक करून ठेवली आहे!

स्वातंत्र्याच्यावेळी तेव्हाच भारत हिंदुराष्ट्र घोषित होते तर या भानगडी न कराव्या लागत्या!
आज मक्के मदिनेला किंवा व्हॅटिकनला आपल्याच जागेसाठी असा झगडा द्यावा लागत नाहीये, हे लक्षात घ्या. मग ती वेळ या मूर्ख राजकारण्यांनी आणली आहे.
हिंदुंना पवित्र असलेली काशी आणि मथुरेची ठिकाणे अजूनही हिंदु नाहीत. तेथे मशिदींचे ढाचे आहेतच. त्यांचे निकाल कधी लागावेत? कृष्ण मंदिराची अवस्था तर पाहून या एकदा.
आपल्याच देशात आपण लाचार आहोत, मिंधे झालो आहोत.

मी म्हणतो की, जगात एका ठिकाणी तरी व्हॅटिकनच्या धर्तीवर संपूर्णपणे हिंदू अशा राष्ट्राचे निर्माण व्हावे!

समंजस's picture

1 Oct 2010 - 11:44 am | समंजस

इन्द्रसाहेब एक शंका, नक्कीच हा संपुर्ण निर्णय १००३ पानांचा आहे का? एके ठिकाणी माझ्या वाचनात आलंय की संपुर्ण निर्णय ८००० पानांचा आहे.

इन्द्र्राज पवार's picture

1 Oct 2010 - 12:07 pm | इन्द्र्राज पवार

खाजगी चॅनेल्स बाजूला ठेवू या, पण सरकारी अधिकृत 'डीडी न्यूज' निवेदकाचे शब्द होते "The judgement, running into about 10,000 pages, Is being analysed across India, .... इ..इ.. हा आकडा मी निसटता ऐकला होता, पण त्यावेळीही नाही म्हटले तरी त्या पर्वतासम आकड्याचे आश्चर्य वाटले. नंतर आजतकच्या चर्चेत श्री.प्रभु चावला यांच्या नेहमीच्या दुसर्‍यांची टोपी उडविण्याच्या धर्तीच्या बोलण्यात "अब ये हजार और तीन पन्नोंको उनचालीस पन्नोमें ठीक से दिया गया होगा ऐसा चलो हम मानते है..." हे वाक्य आल्यावर मला वाटले एकून पाने १००३ असतील. पण आता तुम्ही तर म्हणता तसे ८००० पाने असतील तर मग डीडी वाला सांगत होता तशी १०,००० पाने असतील ?

(जाता जाता > मघाशी १००३ पाने म्हटल्यावर आपल्या 'यशवंतराव कुलकर्णी' यांना चक्कर आली.... मग आता १०,००० आकडा ऐकल्यावर तर ते बळीराजासारखे पाताळातच गुडूप होतील अशी भीती वाटत आहे.)

इन्द्रा

समंजस's picture

1 Oct 2010 - 1:31 pm | समंजस

पाने नक्कीच १००० पेक्षा जास्त असतील असा माझा अंदाज आहे. काही कारणे खाली देत आहे;
ह्या खटल्याचा निकाल फक्त एका न्यायाधिशाने नाही तर तीन न्यायाधिशांनी दिला, ह्या खटल्यात दोन नसून तीन पक्षकार होते आणि प्रत्येकाचे आपापले दावे होते तसेच इतर ही अनेक मुद्दे ज्या वर न्यायालयाला निर्णय द्यायचा होता.

ह्या खटल्याचा संपुर्ण निकाल 'अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या' संकेत स्थळावर उपलब्ध आहे आणि तो खंड(volume) स्वरूपात ठेवलेला आहे [ खंड १ - २१ ].

सुधीर१३७'s picture

5 Oct 2010 - 10:02 pm | सुधीर१३७

१०००० चे जवळपास पाने आहेत निकालपत्राची, यामध्ये सर्वात मोठे निकालपत्र मा. न्या. सुधीर आगरवाल यांचे असून त्याखालोखाल मा. न्या. धरमवीर शर्मा व सर्वात लहान निकालपत्र मा. न्या. एस. यू. खान यांचे आहे. ३९ ही पानसंख्या सारांशची आहेत.

फक्त वक्फ बोर्ड नव्हे तर हिंदू महासभाही कोर्टात जाणार आहे. त्यांना एकतृतीअंश जागा मान्य नाही. त्यांचा संपूर्ण जागेवरच दावा आहे. निर्मोही आखाड्याबरोबरही ते जागा शेअर करायला तयार नाहीत. त्यामुळे निर्मोही आखाड्याच्या संतांनी वक्फ बोर्डाबरोबर बोलणी सुरू केली आहेत. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असं म्हणतात.

कुठे झाला हे नक्की झालं नाही तरी रामाचा जन्म अयोध्येत झाला हे नक्की असेल तर संपूर्ण अयोध्येवरच दावा करायला काय हरकत आहे?

सुधीर१३७'s picture

5 Oct 2010 - 9:47 pm | सुधीर१३७

मशीद गैर्-इस्लामी आहे असे निष्कर्ष निकालपत्रात नाहीत; तर असे म्हणणे ज्या पक्षकारांकडून मांडले गेले ते या म्हणण्याबाबत कोणताही पुरावा देऊ शकले नाहीत असे मा. न्या. सुधीर आगरवाल यांचे निकालपत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.

नितिन थत्ते's picture

5 Oct 2010 - 10:03 pm | नितिन थत्ते

आहे की.

न्या. शर्मा यांनी तसे म्हटले आहे. शिवाय ती जागा (की मूर्ती?) देवतुल्य आहे वगैरेही म्हटले आहे.

न्या खान व न्या सुधीर अग्रवाल यांनी तसे काही म्हटलेले नाही.

गुंडोपंत's picture

1 Oct 2010 - 5:57 am | गुंडोपंत

शांतता पाळा, कुणीही काहीही बोलले काहीही केले तरी शांतता पाळा....
कशाला उगाच त्या संमंची वाट लावता?
शेवटी कुणी काहीही केले तरी आपली संस्कृती सहिष्णुवादाची आहे की नाही बाळांनो?
भारताची निर्मिती करतांना एकदा सर्वधर्म समावेश केला की मग शांतता पाळलीच पाहिजे! मग कोर्टाचा आदेश असे वा वल्ड व्हिजनने दिलेला प्रभुचा संदेश, सर्व काही स्वीकारले पाहिजे. यातच आपली भलाई आहे.
हे सर्व देवाचे संदेश आहेत. मग देव त्यांचा की आपला हा वाद कशाला?
त्यांचा तर त्यांचा! काय फरक पडतो बाळांनो?
जगातले महान नाटककार, खुद्द प्रेमानंद गज्वी, किरवंत च्या प्रस्तावनेत म्हणतात*, "हा धर्म पृथ्वी वरून नाहीसा झालेलाच बरा" तेथे आपली काय कथा?

त्यामुळे शांतता पाळा मग भलेही तुम्ही नाहिसे झालात तरी चालेल, पण शांतता पाळाच असे माझे आवाहन आहे!
-----
संमं = संपांदक मंडळ

प्रियाली's picture

1 Oct 2010 - 6:28 am | प्रियाली

शांततेचं कार्ट चालू आहे!

गुंडोपंत's picture

1 Oct 2010 - 6:51 am | गुंडोपंत

गुंडो? 'पंत' विसरलात?

बाबूराव से बाबू?
ग्लेनफिडिश? कार्यबाहुल्य.? कार्यप्रकल्पाचा ताण..? की रक्तवारूणी...?

असो,
मी शांतीला ठेवण्याचेच आवाहन केले आहे...!

आपला
साधु ऋतंभरापंत

अविनाश कदम's picture

9 Oct 2010 - 2:43 am | अविनाश कदम

हायकोर्टाच्या निकालाच्य दिवशी मुंबईत कित्ती छान शांतता होती. तशीच शांतता नेहमीच पाळायला हवी. त्यासाठी नेहमी नेहमी कोर्टाच्या निकालाची आणि टिव्हीवरील त्याचे दळण घालण्याची गरज नाही.

शांत रहा! म्हणजे स्मशान शांतता पाळायची वेळ येणार नाही हे लक्षात ठेवा .
शांतता पाळा !!!!!

ती जागा हिंदुच्या मान्यतेप्रमाणे,तसेच त्याच्या श्रध्देप्रमाणे भगवान रामाचे जन्मस्थळ आहे. कोर्टाने ती जागा रामजन्मभुमी आहे असे सांगितले नाही आहे. निकाल पुर्ण वाचा.भगवान रामाचा जन्म तिथे झाला ह्याला अजुन एक ही पुरावा मिळालेला नाही आहे.
तसेच हिंदुना जसा मंदिर बांधण्याचा हक्क मिळाला आहे त्याप्रमाणे मुस्लिमांना मश्चिद बांघण्यास देखिल न्यायालयाने परवानगी दिली आहे्आ निकाल खुपच गुंतागुंतीचा व लबाड आहे.

निकाल गुंतागुंतीचा आहे, परंतु

लबाड

मात्र नाही. कृपया संयमित व जबाबदारीने शब्दांचा वापर करावा ही विनंती.

अविनाशकुलकर्णी's picture

1 Oct 2010 - 10:14 am | अविनाशकुलकर्णी

कुणाला किती कुठे जागा मिळेल हे नकाशा द्वारे कुणी सांगु शकेल काय>..नुसते १/३ ने खुलासा होत नाहि..

जय श्रीराम.....
वारुणी.. प्रमदा प्रिय...असलेल्या मीपा करांनी संयमित प्रतिक्रिया दिल्या बद्दल त्यांचे हि अभिनंदन....

कुणाला किती जागा आहे ते आता लगेच सांगता येणार नाही.. पण येत्या काही निवडणूकांमध्ये भाजप २/३ च्या जवळ पोहोचण्याची शक्यता आहे.. मायावतीही बाह्या सरसावून (कि पदर खेचून?) पुढे आल्या आहेत व सर्व पक्ष संयमाची भाषा करित असताना त्या मात्र "होणार्‍या परिणामांना केंद्र सरकार जबाबदार असेल" असे काहीतरी बरळत आहेत.. न्यूज चॅनेल्सही टीआर्पीच्या जमान्यात २/३ टीआरपी मिळावा म्हणून "तज्ञ" (?) लोकांना चर्चेसाठी आमंत्रित करून बळेच काहीतरी ब्रेकिंग मिळते का याचा अंदाज घेताना दिसत आहेत.. तसे काही मिळत नाही असे दिसताच स्वतःच काहीतरी ब्रेकिंग विचारून सनसनाटी तयार करून सबसे तेज राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.. त्यातल्या त्यात वृत्तपत्रे मात्र कौतुकास्पद अशी प्रगल्भता दाखवित आहेत.. कोणाची नक्की काय जागा आहे हे येणार्‍या काही दिवसांत कळेलच... तोपर्यंत संयम!

धमाल मुलगा's picture

1 Oct 2010 - 8:40 pm | धमाल मुलगा

जे टिव्हीवर ऐकले वाचले त्यानुसार :
१.प्रभु रामचंद्रांची मुर्ती ठेवलेला चबुतरा आणि त्याच्या आजुबाजुची जमीन जी एकुण जागेच्या १/३ आहे ती 'रामलल्ला विराजमान' ह्या दावेदारास.

२.सीता रसोई आणि त्याआसपासची १/३ जागा निर्मोही आखाड्यास.

३.उर्वरीत बाहेरील जागा जिच्यावर असा हक्क सांगितलेला नाही ती सुन्नी वक्फ बोर्डास.

सुधीर१३७'s picture

5 Oct 2010 - 9:52 pm | सुधीर१३७

दाव्यांमध्ये दाखल नकाशे पाहिल्यास व निकाल नीट वाचल्यास याचे उत्तर मिळेल. सर्व आवश्यक कागदपत्रे निकालासोबत इंटरनेटवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

जागा कशी वाटायची हेच अजुन कुणाला समजले नाही. मायावतीने तर स्पष्ट सांगितले आहे आता अयोध्येतल्या जागेची राखण आम्ही करणार नाही. जे काही राखण व वाटणी करायची आहे ती केंद्रशासनाने करावी.

चिरोटा's picture

1 Oct 2010 - 11:01 am | चिरोटा

Cake cutting algorithm ने जागेचे तीन 'समान' भाग करता येवू शकतात्.समान म्हणजे प्रत्येकाला १/३ जागा मिळाली आहे(fair division) असे वाटेल.इकडे तीनच players आहेत त्यामुळे सोपे आहे.२/३ methods आहेत.
१)divide and conquer
2)moving knife
3)one divides and others choose.

समंजस's picture

1 Oct 2010 - 10:50 am | समंजस

निकालाचा सारांश काही संस्थळावर वाचला.
आता हा जुना वाद संपुष्टात यायला काही हरकत नसावी :)
दोन्ही बाजूंना थोडी माघार ही घ्यावीच लागणार त्या शिवाय हा वाद संपुष्टात येणार नव्हता/नाही.
जर हा वाद सामोपचाराने संपुष्टात आणायचा होता तर त्या करता सुद्धा दोन्ही बाजूंनी थोडी माघार घेणे आवश्यक होतेच, परंतू या करता दोन्ही बाजू अर्थातच तयार नव्हत्या(दोन्ही बाजूंना संपुर्ण जागा हवी होती). त्यामुळे शेवटी न्यायालया कडे जाणे हाच एकमेव मार्ग होता. न्यायालयाने त्यांच्या कार्यपद्धतीनुसार कार्य केलं आणि पुढे ठेवण्यात आलेल्या पुराव्यांना अनुसरून, जुना ईतिहास लक्षात घेउन, जुन्या परंपरा लक्षात घेउन, दोन्ही धर्मांच्या भावना लक्षात घेउन, सारासार बुद्धी वापरून हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे हा निर्णय मला योग्य वाटतो. (ह्या निर्णयाची तुलना एकाच कुटूंबातील दोन भावांमधील जागेच्या वाटणीवर असलेल्या वादाशी संबंधीत निर्णयाशी करण्यात येउ नये).

जर संपुर्ण जागेची मालकी एकाच पक्षाला देण्यात आली तर पुढेही भविष्यात हा वाद सुरूच राहणार कारण ज्या पक्षाला काहीच भाग मिळणार नाही तो पक्ष असंतुष्ट राहणार तसेच त्यामुळे भविष्यात सुद्धा संघर्ष होत राहणार. मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हाच निर्णय कायम ठेवावा.

कर्ण's picture

1 Oct 2010 - 12:15 pm | कर्ण

बस्स आता हे ....झाल गेल ते विसरा .... तुम्हाला वाटत का आपलि मुल - नातवन्ड सुधा भाडतच रहावीत ...

अनामिका's picture

1 Oct 2010 - 1:39 pm | अनामिका

हिंदु बाहुल्य असलेल्या हिंदुस्थानात समज आल्यापासुन स्वतःस अभिमानाने " हिंदु"म्हणवुन घेणे हे एखादि शिवी हासडण्यासारखेच आहे अशी भावना मनात घर करु लागली होती...आज या निकालाने स्वत:स गर्वाने हिंदु म्हणावे असे वाटू लागण्यास वाव दिलाय्....निकाल देणार्‍या न्यायाधिशांना या सगळ्या प्रक्रियेत केव्हढा मानसिक तणाव सहन करावा लागला असेल याचा विचार करता त्यांनी दिलेला निर्णय हा अत्यंत संतुलित असाच आहे ............या खंडपिठावर विराजमान असलेल्या सर्व न्यायाधिशांना मनापासुन दंडवत..........

नितिन थत्ते's picture

1 Oct 2010 - 2:36 pm | नितिन थत्ते

>>स्वतःस अभिमानाने " हिंदु"म्हणवुन घेणे हे एखादि शिवी हासडण्यासारखेच आहे अशी भावना मनात घर करु लागली होती

अशी परिस्थिती मला कधी जाणवली नाही. तुम्हालाही जाणवली नसेल पण तुम्हाला तशी परिस्थिती आहे असे समज आल्याच्या काळापासून "सांगितले जात असावे". विशेषतः समज येण्याचा काळ १९९० ते २००० या मधला असेल तर तशी बरीच शक्यता आहे.

असो आम्हाला अभिमानाने हिंदू म्हणून घेण्याची गरजही कधी भासली नाही.


असो आम्हाला अभिमानाने हिंदू म्हणून घेण्याची गरजही कधी भासली नाही.


माझी तुमच्या अथवा इतर कुणाकडुन तसे वाटून घ्यावे अशी अपेक्षा देखिल नाही.............तसे देखिल अश्या प्रकारच्या निकालाची मला मुळात अपेक्षा नव्हती... प्रामाणिकपणे सांगायचेच तर माझ्यासाठी व इतर अनेकांसाठी हा निर्णय म्हणजे सुखद धक्का आहे ..आता या मागे देखिल काहि राजकारण नक्कीच असु शकत हे ताडण्याइतपत शहाणपण नक्कीच आहे........मला निकाल ऐकल्यावर जे व्यक्तीशः वाटल ते मी इथे नमुद केलय ...........कुणी सांगुन स्वत:चे मत बनविण्याचा प्रश्न उद्भवत नाही कारण इश्वर कृपेने स्वत:चा विवेक व बुद्धी वापरत मत तयार करण्याइतपत अक्कल बाळगुन आहे.
..सर्वधर्म समभावाच तुणतुण वाजवत बहुसंख्याकांच्या भावनांची, आस्थांची पायमल्ली करत मतांच राजकारण करण्यात धन्यता मानणार्‍यांकडून कसलीच अपेक्षा नाही खर तर्............. लागलेला निकाल हाच अंतिम असेल असा देखिल माझा दावा नाही आणि तसा कोणताही समज करुन घेण्याइतकी मी अल्पमती नक्कीच नाही......
आपल्या सारख्या थोर विचारवंतांशी कुठलाही वाद घालण्याची माझी इच्छा या आधी देखिल कधी नव्हती आणि यापुढे देखिल कधी असणार नाही.....आपण माझ्या प्रतिसादावर प्रतिक्रिया दिलीत म्हणुन केवळ टंकतेय......तेंव्हा माझ्याकडुन मी याला इथेच पुर्णविराम देते आहे....उगीच कुणाच्या भावना दुखवायला नकोत्.....कसे!

अविनाशकुलकर्णी's picture

1 Oct 2010 - 2:27 pm | अविनाशकुलकर्णी

हर्षद आनंदी's picture

1 Oct 2010 - 5:17 pm | हर्षद आनंदी

निकाल लागुन फायदा शुन्यच ...वाईट याचे वाटते की,

निकाल लागलाय निर्णय नाही.

परत सुप्रिम कोर्ट.. पर लढाई.. पैशाचा \ वेळेचा अपव्यय, पुन्हा तेच!

मंदीर \ मशीद काही होणार नाही कारण सुप्रिम कोर्टातुन स्टे आणला जाईल. अजुन ३ महिने जैसे थै असे असेल.

त्यामुळे रामाचा वनवास चालु आहे आणि राहिल...

आम्ही म्हणणार || जय श्रीराम ||

कुठल्याही वादाचा शेवट हा त्यागाने झाला तर उत्तम. मी स्वतः निधर्मी आहे आणि जेव्हा ह्या मुद्द्याकडे त्रयस्त नजरेने पाहतो तेव्हा हिंदूंना ती जमीन मिळणे हे न्याय्य आहे असे समजतो. "अल्पसंख्याकांना न दुखावणे" म्हणजे सहिष्णुता नव्हे. सुन्नी वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात न जाता हा वाद इथेच संपवावा. वास्तविक पाहता न्यायमूर्ती खान यांचे मत (जे थोडे वेगळे असले तरी इतर न्यायमूर्तींपासून फारच वेगळे नाही), पुरावे आणि संशोधन लक्षात घेता सुन्नी वक्फ बोर्डाने १/३ जमीनही हिंदूंना देऊन आपल्या ज्ञातीला एका वेगळ्या उंचीवर न्यावे. इतर जण जे राष्ट्रीय स्मारकाची भाषा करतात, त्यांनीही राम मंदिराला आ़क्षेप घेऊ नये. त्यामुळे हिंदूंवर अन्यायही होणार नाही आणि रामापेक्षा त्याग, प्रेम, शौर्य ह्याच प्रतीक काय होऊ शकतं?

विसुनाना's picture

1 Oct 2010 - 7:45 pm | विसुनाना

हा निकाल फारच मोठा आहे. त्याबद्दल नीट समजावून घेऊन भाष्य करावे.
निकाल खोलात जाऊन पाहता 'अयोध्या तो अभी बहोत दूर है'.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Oct 2010 - 8:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>निकाल फारच मोठा आहे. त्याबद्दल नीट समजावून घेऊन भाष्य करावे.
सहमत आहे....!

जन्मस्थानासाठी 'श्रद्धा आणि विश्वास’ हा पुरावा मानल्यामुळे भविष्यकाळ कठीण दिसतो. मात्र पुरातत्त्व विभाग म्हणते की, मशिदीपूर्वी मंदिर होते, हेच या निकालाचे यश म्हणावे लागेल. बाकी, रामलल्लाला मा. न्यायालयाने एका जागेचे मालक बनविणे. इस्लाम नुसार ती 'मशीदच’ नाही म्हणने. वक्फबोर्डाला जागा देणे. हे आणि अशा बर्‍याच प्रश्न आणि उत्तरांची गुंतागुंत आहे खरी. मा.न्यायालयाचा निकाल कमी आणि तडजोडच जास्त वाटते...!

-दिलीप बिरुटे

सुनील's picture

2 Oct 2010 - 2:26 am | सुनील

रथयात्रा आणि तदनंतरचे बाबरी-पतन ह्यामुळे निकालात काय फरक पडला? जर ते झाले नसते तर निकाल वेगळा लागला असता काय?

सदर दावा हा दिवाणी स्वरूपाचा होता तर बाबरी-पतनासंबंधीचा दावा हा फौजदारी स्वरूपाचा आहे. ह्या निकालानंतर तोही निकालात निघाला आहे किंवा कसे? जाणकारांनी खुलासा करावा.

अयोध्येच्या निकालाने मुस्लिम राजनैतिक आणि धार्मिक नेतृत्वाला स्वातंत्र्यपूर्व काळात अस्तित्वात असलेला व मी लहानपणी/तरुणपणी अनुभवलेला धार्मिक सुसंवाद पुन्हा प्रस्थापित करण्याची एक सुवर्णसंधी प्राप्त करून दिली आहे असे मला वाटते. आज सरहद्दीपलीकडे टपून बसलेल्या आपल्या शत्रूची मुंबई नरसंहार किंवा काश्मीरमधील सतत लुडबूड यासारखी आपल्या देशाला त्रास देणारी व आपल्या प्रगतीत खीळ घालणारी कारस्थाने हाणून पाडायला अशा सुसंवादाची गरज आहे.
कोर्टाने ६७ टक्के जमीन हिंदू समाजाला दिली असून ३३ टक्के जमीन मुस्लिम समाजाला दिली आहे. मी सार्‍या मुस्लिम नेतृत्वाला व सार्‍या मुस्लिम समाजाला आवाहन करतो कीं सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे पाऊल न उचलता ही ३३ टक्के जमीन त्यांनी हिंदू समाजाला देऊन टाकावी. असे केल्यास राष्ट्रीय एकतेच्या दिशेने ते एक प्रचंड योगदान ठरेल व केवळ भारतातच नव्हे तर सार्‍या जगात एक संवेदनाशील आणि समजूतदार समाज अशी त्यांची प्रतिमा प्रस्थापित होऊन हा समाज पुन्हा देशाच्या मुख्य प्रवाहात (mainstream) सामील होईल.
अशी संधी एकाद्या देशाच्या आयुष्यात एकादे वेळीच येते. आज अलाहाबाद न्यायालयाच्या निर्णयामुळे ही संधी मुस्लिम समाजाला मिळाली आहे. ते ती वाया घालविणार नाहींत अशी मी आशा करतो!

गुंडोपंत's picture

2 Oct 2010 - 1:51 pm | गुंडोपंत

१००% सहमती काळेसाहेब!

मी सार्‍या मुस्लिम नेतृत्वाला व सार्‍या मुस्लिम समाजाला आवाहन करतो कीं सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे पाऊल न उचलता ही ३३ टक्के जमीन त्यांनी हिंदू समाजाला देऊन टाकावी. असे केल्यास राष्ट्रीय एकतेच्या दिशेने ते एक प्रचंड योगदान ठरेल व केवळ भारतातच नव्हे तर सार्‍या जगात एक संवेदनाशील आणि समजूतदार समाज अशी त्यांची प्रतिमा प्रस्थापित होऊन हा समाज पुन्हा देशाच्या मुख्य प्रवाहात (mainstream) सामील होईल.
अशी संधी एकाद्या देशाच्या आयुष्यात एकादे वेळीच येते. आज अलाहाबाद न्यायालयाच्या निर्णयामुळे ही संधी मुस्लिम समाजाला मिळाली आहे. ते ती वाया घालविणार नाहींत अशी मी आशा करतो!

साहेब त्या वक्फ बोर्डालाच पत्र लिहा हो!

सुधीर काळे's picture

2 Oct 2010 - 11:12 pm | सुधीर काळे

ई-मेलचा पत्ता कळवा!

सुधीर काळे's picture

4 Oct 2010 - 1:27 pm | सुधीर काळे

माझे याच मतितार्थाचे पत्र पणजीच्या नवहिंदटाइम्सने आज प्रकाशित केले आहे. वाचा या दुव्यावर!
http://www.navhindtimes.in/opinion/letters-editor-173

बाबरी मशीची २/३ जागा (१/३ नव्हे) हिंदू समाजाला देऊन टाकण्याचे महान व पुण्यवान कर्म करण्याची एक सुवर्ण संधी मुस्लीम समाजाल प्राप्त झाली आहे. किती भाग्यवान ? हिंदू समाजाला असे महान पुण्यकर्म करण्याची संधी केव्हा मिळणार ?

गांधीवादी's picture

12 Oct 2010 - 1:03 pm | गांधीवादी

>>ते ती वाया घालविणार नाहींत अशी मी आशा करतो!
सांगण्यास वाईट वाटते कि हि सुवर्ण संधी वाया गेली(घालविली).

अविनाशकुलकर्णी's picture

2 Oct 2010 - 2:02 pm | अविनाशकुलकर्णी

अविनाशकुलकर्णी's picture

2 Oct 2010 - 2:15 pm | अविनाशकुलकर्णी

>

चिरोटा's picture

2 Oct 2010 - 11:01 pm | चिरोटा

असे केल्यास राष्ट्रीय एकतेच्या दिशेने ते एक प्रचंड योगदान ठरेल

कसे काय? माझ्या माहितीप्रमाणे रामजन्म्भूमीचा मुद्दा वि. हिं. प.(जी मुख्यतः उत्तर भारतात कार्यरत आहे)ने १९८४ पासुन चालु केला होता.नंतर तो भाजपाने उचलून धरल्याने हा मुद्दा राजकिय होता. तेव्हा ह्याला विरोध राजकिय पद्धतीनेच होणार हे उघड होते.

सुधीर काळे's picture

2 Oct 2010 - 11:13 pm | सुधीर काळे

समंजसपणा दाखविल्याने असे होईल.

सद्दाम हुसैन's picture

3 Oct 2010 - 1:03 am | सद्दाम हुसैन

सब से बडे बेवकुफ तो हम लोग है ऊई .. और ये राजनेता हमको और उल्लु बना रहे है उई !!
क्या मजहब की लडाई लडने का ? आपस मे भाईचारा रखो और खुशी से जियो और जिने दो !
अल्लाह की भी यही इच्छा होगी और राम भगवान की भी !
अगर इन मुद्दो मे आपस मे लडो और भाईयोंका खुन बहाओ तो ये ना अल्लाह को मन्जुर होगा ना राम को..
ये ऐसे दावे लडे जाते है ६०-६० सालो तक इस पे राजनिती होती है येही सब से बडी शर्मनाक बात है उई !
मेरी बात समझे तो सोचो उई..