लहानपणापासूनच रंग, ब्रश पाह्यले की हात शिवशिवतात. ते रंग, ब्रश घेऊन जोवर दोन-चार फटकारे मारत नाही कॅनव्हासवर, तोवर समाधान नाही होत. ग्लास पेंटिंग हे कधी केलेलं नाही पण शाळेत असताना आमच्या कलाशिक्षकांनी केलेले असे पेंटिंग्ज पाह्यलेत. आठवडाभरापूर्वी असेच काही ग्लास पेंटिंग्ज नजरेखालून गेले आणि मला चळ भरलं. असे पेंटिंग्ज आधी पाह्यले जरी असले तरी गुगलून अधिक अपडेट घेतले. पुन्हा रंग सॉल्व्हन्ट बेस्ड बरे का वॉटर बेस्ड हा प्रश्न आला. मग मिपाकरांची थोडी मदत घेतली. मनि२७ या आयडीने थोडे मार्गदर्शन केले, त्यावरून सॉल्व्हन्ट बेस्ड रंग वापरुन केलेले हे ग्लास पेंटिंग.
हे माझे पहिलेच ग्लास पेंटिंग आहे त्यामुळे काही सूचना, टिप दिल्यास पुढील वेळेस मला नक्कीच त्याचा उपयोग होईल.
प्रतिक्रिया
26 Sep 2010 - 12:53 am | सूड
आलं रे !! हुश्श !!
26 Sep 2010 - 1:09 am | चिंतामणी
गुगलून अधिक अपडेट घेताना "पिकासा" बघा. त्यावर फोटु अपलोड करा आणि मग येथे टाका.
हेच ग्लास पेंटिंग अजून मोठे दिसेल.
26 Sep 2010 - 8:53 am | सूड
चिंतामणराव अहो पिकासावरुनच टाकलंय इथे !! माझ्या माहितीत तरी हार्ड डिस्क वरुन डायरेक्ट फोटो नाही अपलोड होत इथे.
26 Sep 2010 - 11:48 am | मस्त कलंदर
मीही ग्लासपेंटिंगच्या वाटेला एकदा गेले होते. त्यात फेविक्रिलचे तयार रंग-ज्यात काही मिसळावे लागत नाही, ब्रश वापरावा लागत नाही-वापरले होते. तुमचा प्रयत्न पहिलाच असला तरी माझ्या प्रयत्नापेक्षा जास्त चांगला वाटतोय.

आणि हा दुसरा प्रयत्नः

मला तुम्ही दोन रंगांच्या शेड्स कशा एकत्र केल्या ते वाचायला आवडेल. फक्त वाचायलाच, कारण करायला गेले तर त्याचा बट्ट्याबोळ करेन इतकी स्वतःबद्दल खात्री आहे.
26 Sep 2010 - 3:02 pm | सूड
मी पिडीलाईटचे रंग वापरलेत आणि ब्रश वापरलाय रंगवायला. पण ब्रश वापरला तर कॅमलिनचा थिनर वापरावा लागतो ब्रश स्वच्छ करायला.
दोन रंगांच्या शेड्स करताना आधी नारिंगी आणि पिवळा रंग मिसळून एक थर दिला आणि जिथे गडद शेड हवी होती फक्त नारिंगी रंगाचा एक हात फिरवला. आणि अॅक्वा ब्लू जो आहे त्याचा आधी एक पातळ थर देऊन नंतर वरच्या भागात परत एकदा त्याच रंगाचा थर दिला. त्यामुळे तो एकीकडे गडद आणि एकीकडे फिका दिसतोय.
तुम्ही केलेलं हे बाऊलवरचं पेंटींगपण छानच आहे की, पण हे बाऊल रोजच्या वापरात घेतले तर पाण्याचा रंगांवर काही परिणाम होतो का ?
26 Sep 2010 - 3:29 pm | मदनबाण
वा... बाप्पाचे पेटींग छान झालं आहे. :)
26 Sep 2010 - 4:03 pm | मस्त कलंदर
पाण्याचा परिणाम होत नसावा. तो आऊट्लाईन देण्यासाठीचा काळा रंग खुप पटकन सुकतो आणि एकदा लावला की लगेचच पुसला तरी पुसला जात नाही. मी दुसरा बाऊल बनवतानाही पहिल्या सारखीच भरगच्च डिझाईन घेतली होती. पण माझा हात इकडे तिकडे लागून, कधी आकार न जमून मला ते आवडले नाही. तेव्हा मी पटकन तो बाऊल भांडी घासण्याच्या स्क्रबरने जोर लावून घासून काढला होता. हा प्रकार दोन तीन वेळा झाल्यावर मी पण कंटाळले आणि मग हे असले सुटसुटीत आणि छोटे चित्र काढले. रंग हलकासा ओला असतानाही तो मला घासून काढताना त्रास झाला होता. एकदा सुकल्यावर तर आणखीच परिणाम होणार नाही असे वाटतंय मला.
26 Sep 2010 - 9:05 pm | सुनील
दिसतय छान!
पुपेंशु
27 Sep 2010 - 1:02 pm | मीरसिका
वा! काय पेंटींग आहे मस्त!
27 Sep 2010 - 1:06 pm | परिकथेतील राजकुमार
'ग्लास' पेंटिंग हे शब्द वाचुन डोक्यात आधी भलतेच काहितरी आले होते ;) त्यामुळे हिणकस प्रतिक्रीया द्यायच्या इराद्याने धागा उघडला होता. पण तुम्ही जी काय कलाकुसर केली आहे ती खरच आवडून गेली :)
मकीचे फावल्या वेळातले म्हणजे गॉसिपींग मधुन वेळ मिळाला की उद्योग देखील मस्तच.
27 Sep 2010 - 1:31 pm | ऋषिकेश
सुधांशु व मक,
दोघांच्यांही कलेचा नमुना आवडला.. मस्तच!
27 Sep 2010 - 1:50 pm | मस्त कलंदर
धन्यु रे ऋ. खरेतर मी आधीच्या प्रतिसादात माझ्याही धाग्याची लिंक[लिंक] दिली होती पण ती हरवली. पण हार न मानता मी ती पुन्हा एकदा देतेय.
असो, या धाग्याच्या निमित्ताने आमचे मित्र परा आणि मेघवेडा यांची जळजळ पोचली...
27 Sep 2010 - 1:37 pm | मेघवेडा
मस्त रे सुड!
आणि मकीचं काये, नसते उद्योग/उपद्व्याप करण्यामध्ये तिचा हात कुणीच धरू शकत नाही! :D त्यामुळे हे उद्योग म्हणजे किस झाड की पत्ती! ;)
29 Sep 2010 - 4:52 pm | सूड
प्रतिसाद देणार्या मंडळींना धन्स अ लॉट !!